अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

जळगाव दि.7 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त  ‘फेशर्स डे’ साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील एकमेव स्कूल सुरू केली.  अनुभूती स्कूलशी जुळवून घेत आपल्यातील कलागुणांना आत्मविश्वासपूर्वक सादर केले. नवनिर्मिती, उत्कृष्टतेसाठी, स्वागतार्ह काय याची समज होऊन नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. भारतीय संस्कृतीत विविधता आहे. भाषा, पंथ, संस्कृती, सांस्कृतिक वारसा यातून भारतीय मूल्यशिक्षणाचे दर्शन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातुन झाले.

सतरा वर्षापासून सुरु असलेल्या स्कूलच्या स्थापना दिनाच्या औचित्याने ‘फ्रेशर्स डे ’ ची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कांताई नेत्रालयाच्या डॉ. भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची  प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘भिती ही यशाची पहिली पायरी बनविली पाहिजे कारण भितीमुळे आपण चांगले करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे हवे आहे ते मिळेलच असे नाही त्यामुळे क्रोध करून काहीही फायदा नाही. स्विकार करणे शिकले पाहिजे. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचा विचार करू नये यातूनच स्पर्धेच्या युगात यशस्वी होऊ शकतो.’

सुरवातीला स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केले.  ‘छमक छमक घुमर घुमर’ … या गीतावर राजस्थानचे पारंपारिक नृत्यातून संस्कृतीचे दर्शन घडविले.  उडिसाचे कांचीविजय नाट्य सादर झाले. यात राजा पुरूषोत्तम देव यांच्या संघर्षाची कहाणी विद्यार्थ्यांनी उलगडुन दाखविली. युध्दानंतरच्या परिणामांची परिस्थितीही दाखविली.  माणिक यांच्याकडून प्रभू जगन्नाथाने प्यायलेले पाणी, राजकुमारी पद्मावतीचा विवाहाचा प्रसंग  हूबेहूब सादर केले. ‘जय जगन्नाथ हमे रहने अपने चरनो मे हे भजन’,

‘सर देशा तू जननी भारत देशा’ हे देशभक्तीपर गीत, अनूभुतीचे विस दिवस यावर अथर्व कांबळे याने व्यक्त केलेले मनोगत, तामिळनाळुचे त्रिवृदा नृत्य, रामायणातील विश्वामित्रा, गुरू वशिष्ट यांची श्रीराम लक्ष्मण यांची भेट हा क्षण, भगवान श्रीकृष्णाच्या गीतावर नृत्य सादर केले. मेरी चौकट मे… राम भजन, मिमिक्री, मेरी माँ.. तेरे जैसा यार कहॉ.. हे गीत गायन, तबला वादन, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत भाषण अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलीत. मणिपूरच्या पारंपरिक नृत्याने ‘फेशर्स डे’चा समारोप झाला. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् झाले.

दरवर्षी स्कूलचा स्थापना दिन व फेशर्स डे साजरा केला जातो. यादिवशी स्कूलमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना अनुभूती स्कूलची शैक्षणिक जीवनमूल्यांची ओळख झालेली असते. अनुभूती स्कूल निवासी असल्याने विद्यार्थी येथील वातावरणाशी एकरूप होतात. हा आनंदोत्सव म्हणजे फेशर्स डे यात विद्यार्थ्यांनी धम्माल केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन क्रीश संघवी, वर्धनी अग्रवाल यांनी केले.

इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा संपन्न

जळगाव, दि. ५ प्रतिनिधी : –  ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली.

इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा आज (ता.५) ला हॉटेल नैवेद्य येथे पदग्रहण सोहळा सौ. निशा जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर इनर व्हिल क्लबच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. रितु कोगटा, सचिव डॉ. मयूरी पवार, नवनियुक्त अध्यक्ष सौ. उषा जैन, सचिव निशिता रंगलानी उपस्थित होत्या. मान्यवर उपस्थितांसह माजी अध्यक्ष नुतन कक्कड, संगिता घोडगावकर, मिनिल लाठी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले.

उषा जैन अध्यक्ष पदासाठी तर सचिवपदासाठी निशिता रंगलानी यांना बॅज पिनिंग पदाधिकारींच्या उपस्थित झाले. २०२४-२०२५ करिता निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा सौ. उषा जैन यांनी केली. कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसी रंजन शहा, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य दिप्ती अग्रवाल, साधना गांधी,  ज्योत्स्ना रायसोनी, संध्या महाजन, शैला कोचर, सल्लागार नुतन कक्कड, निता जैन यांची निवड करण्यात आली. निशा जैन यांच्यासह अध्यक्ष, सचिवांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.  डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. दिप्ती अग्रवाल, निकिता मयूर अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले.. डॉ. रितु कोगटा यांनी मागील दोन वर्षात इनर व्हील क्लब ने केलेल्या कार्याचा आढावा घेत नविन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. डॉ. मयुरी पवार, निशिता रंगलानी यांनीही मनोगत व्यक्त केले. इनर व्हिल क्लबचा लोगो आलेल्या पदाधिकारी व पाहुण्यांच्या वाहनांवर लावण्यात आला.

सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने काम करा- सौ. निशा जैन

आपण समाजाकडून भरपूर घेत असतो ते सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने सर्वसामान्यांना परत केले पाहिजे. नाविन्यता व कल्पकतेतून इनर व्हिल क्लबच्या उद्दिष्ट्यांची पेरणी समाजात करायची आहे. ही जबाबदारी विद्यमान अध्यक्ष उषा जैन यांच्यासह महिलांच्या टिमवर्कच्या माध्यमातून यशस्वी करतील व मैत्रभावनेतून प्रत्येक उपक्रम राबविला जाईल, अशा शुभेच्छा प्रमुख अतिथी म्हणून अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी  दिल्यात.

इनरव्हिल क्लब ऑफ जळगावचा सौ. निशा जैन यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा

जळगाव, दि.४ (प्रतिनिधी) –  इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा शुक्रवार सकाळी ११.०० वाजता हॉटेल नैवेद्य, काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

क्लबच्या अध्यक्षपदी सौ. उषा जैन यांची तर सचिवपदी निशिता रंगलानी यांची वर्ष २०२४-२५ करिता निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीची सोहळ्यात घोषणा करण्यात येणार आहे.

आयोजित पदग्रहण कार्यक्रमात अध्यक्ष व सचिव यांच्यासह नूतन कार्यकारिणी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत, असे मावळते अध्यक्ष डॉ. रितु कोगटा व सेक्रेटरी डॉ. मयुरी पवार  यांनी कळवले आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धेत शुभम पाटील ला तिहेरी मुकुट

जळगाव दि.२ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धा-२०२४ या स्पर्धा दि. २९ ते ३०  जुन दरम्यान झाल्यात. जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा तालुक्यांमधून १८३ खेळाडूंचा सहभाग घेतला.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडेमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, शिल्पा फर्निचरचे किर्ती मुनोत, आर्य मल्टीपर्पज फाउंडेशनचे डॉ. तुषार उपाध्ये व मुख्य पंच चेतना शाह उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन झाले. जिल्हातील बॅडमिंटन प्रशिक्षकांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा अजिंक्यपदचे चषक, क्रीडा साहित्य व प्रमाणपत्र प्रदान केले गेले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे

११ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – मुकुंदा मनीष चौधरी

उपविजयी –  नमित प्रशांत मगर

११ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी –   तवस्मी वरून मोहता

उपविजयी – रुषा राहुल झोपे

१३ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – अन्मय अमोल जोशी

उपविजयी – मयंक आनंद गाडेकर

१३ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – तवस्मी वरून मोहता

उपविजयी – यशश्री राजकुमार मुनोत

१५ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – देवदत्त नितीन अहिरे

उपविजयी – अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

१५ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – तनिषा अनिल साळुंखे

उपविजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – स्वामी उन्मेश पाटील आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

उपविजयी – रोहित किशोर सोनवणे आणि शांतनु शैलेश फालक

१५ वर्षा आतील मुली दुहेरी

विजयी – कुहू मयूर शर्मा आणि वैष्णवी शैलेंद्र पाटील

उपविजयी – सयुरी अमित राजपूत आणि स्वरा योगेंद्र नेहेते

१७ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – हेमराज अशोक लवांगे

उपविजयी – दक्ष धनंजय चव्हाण

१७ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी –  पूर्वा किशोर पाटील

उपविजयी – ओवी अमोल पाटील

१७ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी –  आर्य महेश गोला आणि हमझा साजिद खान

उपविजयी – ह्रिदय विशाल पिपारीया आणि मिहीर राजेश कुलकर्णी

१९ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – तेजम केशव

उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – पूर्वा किशोर पाटील

उपविजयी – स्वरा निलेश पाटील

पुरुष एकेरी

विजयी – शुभम मुरलीधर पाटील

उपविजयी – तेजम केशव

महिला एकेरी

विजयी – राजश्री संदीप पाटील

उपविजयी – स्वरा निलेश पाटील

पुरुष दुहेरी

विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि शुभम मुरलीधर पाटील

उपविजयी – शेखर सतीश सोनवणे आणि मंदार मुकुंद कासार

३५ वर्षावरील पुरुष एकेरी

विजयी – सचिन विष्णू बस्ते

उपविजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी

विजयी – डॉ. अमित चौधरी आणि किशोर सिंग सिसोदिया

उपविजयी – डॉ. अमित राजपुत आणि समीर सुनील रोकडे

 ३५ वर्षावरील मिश्र दुहेरी

विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया

उपविजयी – डॉ. वृषाली विवेक पाटील आणि डॉ. तुषार गणेश उपाध्ये

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून अर्श शेख, देवेंद्र कोळी, मशरूक शेख, तेजम केशव, शुभम जितेंद्र चांदसरकर, देवेंद्र कोळी, जाजीब शेख, दिपिका ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात सुफयान शेख, करण पाटील, देव वेद, मयंक चांडक, पुनम ठाकूर, अक्षय हुंडीवाले,  प्रणेश गांधी, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.  सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, मनोज आडवाणी यांनी केले.

केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु – अभिषेक देव

जळगाव दि.०२ (प्रतिनिधी) – ‘केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिकस्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८ व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश निर्यातीत पुढे आहेत. गत वर्षाची भारताची केळी निर्यात २९०.९ मिलीयन डॉलर्स होती. केळीची निर्यात एक बिलीयनच्यावर कशी होईल, याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा जैन हिल्स येथे झालेल्या अपेडा केळी उत्पादक व निर्यातदार यांच्यासमवेत बैठकीत झाली. यासाठी पायाभूत सुविधांसह फ्रुटकेअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्डस्टोअरेज, शेतातून पॅकहाऊस पर्यंत सुरक्षीत, जलद व कमी किंमतीत वाहतूक सुविधा निर्माण करण्याविषयी सुद्धा चर्चा झाली. जळगाव जिल्हा हा प्रमुख केळी उत्पादकांपैकी एक असून या परिसरात बडवाणी, बऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यातील केळी उत्पादकांवर आधारित अर्थव्यवस्था मोठी आहे. यातून ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होतो; त्यादृष्टीने देशातील प्रमुख बनाना क्लस्टर पैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर असावे, यासाठी विशेष अहवाल तयार करुन स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू’ असे आश्वासन अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले.

अॅग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथोरिटी (अपेडा) व  जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे कस्तुरबा सभागृह येथे आयोजित ‘बनाना ग्रोवर्स अॅण्ड एक्सपोटर्स मीट २०२४-२५’ मध्ये प्रमुुख अतिथी म्हणून अभिषेक देव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अपेडाचे व्यवस्थापक विनिता सुधांशू, महाराष्ट्र अपेडाचे प्रशांत वाघमारे, केळी उत्पादक संघाचे वसंत महाजन, अमोल जावळे, केळी निर्यातदारांपैकी आशिष अग्रवाल, किरण ढोके, केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत आरंभी दीपप्रज्वलन झाले. केळी उत्पादक असोसिएशनच्यावतीने डि.के. महाजन, वसंतराव महाजन, सचिन पाटील, ललित पाटील, संजीव देशमुख, संतोष लाचेरा, प्रेमानंद महाजन, दिगेंद्रसिंग भरुच यांच्याहस्ते अभिषेक देव यांचा सत्कार करण्यात आला. केळीचे झाड असलेली ट्रॉफी, शाल, सूतीहार असे सम्मानाचे स्वरुप होते.

अभिषेक देव बोलताना पुढे म्हणाले की, ‘आपण शेतात उत्पादन करतो ते गुणवत्तापूर्ण आहे का? त्यासाठी काय केले पाहिजे, आपण काय खातोय ते कुठून उत्पादन झाले आहे हे खाणाऱ्याला समजले पाहिजे. ग्लोबल गॅप, जैन गॅप तंत्रज्ञान त्यासाठी उपयुक्त ठरू पहात आहे. फ्रुट केअर मॅनेजमेंट, क्लिनींग, उत्पादन क्षमता वाढविणे, आंतरराष्ट्रीय मानांकानप्रमाणे निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रयत्न करणे, ज्या अॅसेट आहेत त्या पुर्ण क्षमतेने उपयोग करणे. जैन इरिगेशन ही केळी उत्पादकांसह फळ-भाजीपाला निर्यात करू पाहणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अॅसेट आहे. अचूक तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. इराण, इराक सह आखाती देशांसह रशिया, युरोप व अन्य देशात केळी निर्यातीला मोठी संधी आहे. त्यासाठी ब्रॅंडीग महत्त्वाचे आहे.’

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘वडील भवरलालजी जैन यांनी गांधी तीर्थ निर्माण केले गांधीजींनी ग्रामीण भारतात भविष्य बघितले. गांधीजींच्या या विचारांचा माझ्या वडिलांवर प्रभाव राहिला आहे. ‘ग्रामीण विकास घडला तर भारत विकास साध्य करेल’ हे त्यांचे विचार जैन इरिगेशन आपल्या कृतीतून साध्य करित आहे. अल्पभुधारक शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा, यासाठी केळीवर संशोधन करुन १९९४ ला टिश्यूकल्चर तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले. जोडीला ठिबक सिंचन, फर्टिगेशन, प्रिसीजन फार्मिंग, क्रॉप केअर अग्रेसर काम केले आहे. यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादन होऊ लागली.  शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणि अधिकच्या उत्पादनामुळे सुबत्ता आली. तीस वर्षातील हा बदल म्हणजे खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव म्हणता येईल. केळी हे आरोग्य, रोजगार, विदेशी चलन मिळविण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण रोपांची व निर्यातक्षम वाणाची उपलब्ध हा महत्त्वाचा भाग आहे सोबत मूल्यवर्धन साखळीतील प्रत्येकाची सकारात्मक दृष्टी निर्यात वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरते.’

केळी निर्यात वाढविण्यासाठी केळीसाठी स्वतंत्र केळी मिशन कार्यक्रम आखण्यात यावा

विनिता सुधांशू यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ‘महाराष्ट्रातील शेतकरी हा तंत्रज्ञान आत्मसात करण्यात अग्रस्थानी आहे. त्यातून उत्पन्न वाढीसाठी ते प्रयत्न करतात जैन इरिगेशन सारख्या संस्था उच्च तंत्रज्ञानातुन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे कार्य करत आहे. अपेडाचे कार्य विस्तारीत असून ७०० च्यावर उत्पादनांमध्ये निर्यातीसंबंधित कार्य सुरू असते. केळीमध्ये गेल्या दहा वर्षात निर्यातीचा वाटा वाढला आहे. निर्यातीचा वाटा अजून वाढविण्यासाठी शेतकरी, निर्यातदार आणि जैन इरिगेशनचे सहकार्य अपेक्षित आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निर्यात वाढविण्यासाठी शेतकरी, निर्यातदार, शासन व औद्योगिक संस्था यांच्यातील सुसंवाद वाढावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

शेतकरी व निर्यातदारांशी मुक्त संवाद

केंद्र सरकारने निर्यात वाढीसाठी धोरणात्मक दृष्टीने काय केले पाहिजे, त्यासाठी प्रश्नोत्तर स्वरुपात मुक्त संवाद शेतकरी व निर्यातदारांशी अभिषेक देव यांच्यासह अपेडाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यात शेतकऱ्यांनी निर्यातीसंबंधित तांत्रिक माहिती सहज उपलब्ध व्हावी, शेतकऱ्यांना प्रशिक्षीत केले पाहिजे, फ्रुटकेअर मॅनेजमेंट, पॅकिंग हाऊस, केळी उत्पादक परिसर व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे होईल त्याठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कोल्ड स्टोअरची उभारणी, फ्रुट केअरला लागणाऱ्या साहित्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सबसिडी, करपा निर्मूलनाच्यादृष्टीने फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांसाठी अनुदानाची योजना पुन्हा सुरु करावी, केळीला आधारभूत किंमत एमएसपी जाहीर करावे अशा प्राथमिक स्तरावर सूचना शेतकऱ्यांनी दिल्या. निर्यातदारांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, चिनशी निर्यातीबाबत धोरण शिथिल करावे, इराण, इराक व आखाती देशांमध्ये आर्थिक व्यवहार मध्ये बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणावी, आठ दिवसांची केळी २० दिवसांवर जाण्यासाठी ग्रॅण्डनैन पेक्षा नवीन जातींवर संशोधन केले पाहिजे, नवीन मार्केटसाठी शासनस्तरावर सहकार्य व्हावे, रशिया, युरोप मध्ये निर्यात करायची असेल तर स्थानिक पातळीवर कोल्ड स्टोअर, स्कॅनर्स उपलब्ध करुन द्यावे, रेल्वे स्टेशनवर कंटेनर लोडींग व प्लगींगची व्यवस्था करावी, गुणवत्तेसाठी पॅकिंगमध्ये तंत्रज्ञान आणले तर केळीचा दर्जा सुधारेल अशा सूचना केल्या. अपेडाच्यावतीने प्रशांत वाघमारे, प्रिन्स त्रिपाठी एन एचबी,  एश्वर्य गुप्ता उपस्थित होते.  बऱ्हाणपूर, बडवाणी, नंदुरबार, जळगाव मधील साधारण ३०० केळी उत्पादक उपस्थित होते. प्रामुख्याने आशिष अग्रवाल, राजेंद्र पाटील, भागवत पाटील, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल, विशाल महाजन, भागवत महाजन, उमेश महाजन, बि. ओ. पाटील, अनिल पाटील, निर्यातदार अमीर करीमी, प्रशांत धारपुरे, युवराज शिंदे, महेश ढोके, शफी शेख, रविंद्र जाधव, अनिल परदेशी, प्रमोद निर्मळ, डॉ. अझहर पठाण यांचे सह २० निर्यातदार उपस्थीत होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. के. बी. पाटील यांनी केले. सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले गेले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर – अनिल जैन

जळगाव/जळगाव, २८ जून (प्रतिनिधी):- ‘जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी उन्नत, शाश्वत शेती करून ते दुप्पट उत्पादन घेऊ लागले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनत आहेत.’ या सोबतच शाश्वत विकास, आधुनिक शेती, युवकांसाठी कृषी व कृषी उद्योगातील संधी, गांधीवाद याबाबतचा सुसंवाद जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी साधला. मुंबईच्या छात्र संसद आयोजित इंटरनेशन लीडरशीप टूर या उपक्रमांतर्गत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, पारुल विद्यापीठाचे सुमारे ३७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, छात्र संसदचे अध्यक्ष कुणार शर्मा, आदित्य वेगडा हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम जैन इरिगेशनच्या मुंबई कार्यालयात झाला.

इंटरनेशन लिडरशीप टूर २०२४ मध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष अनिल जैन यांनी  रोल मॉडेल म्हणून उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधावा अशी विनंती छात्र संसदेचे अध्यक्ष अॅड कुणाल शर्मा यांनी केली होती. त्यानुसार “भारतातील कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण सिंचन उपाय” या विषयावर अनिल जैन यांनी उपस्थितांसमवेत सविस्तर चर्चा केली. संपूर्ण भारतात ७ दिवसांचा टूर   असून सहभागी प्रतिनिधी  २४ ते २६ जून तीन दिवस मुंबईत आणि दिल्लीमध्ये २७ ते २९ जूनपर्यंत ठरवून दिलेल्या रोल मॉडेल कंपन्यांना भेटतील असा हा उपक्रम आहे. यावर्षी हे विद्यार्थी अनिल जैन यांच्यासह राज्यपाल मा. रमेश बैस, उद्धव ठाकरे, राजदीप सरदेसाई, किरण बेदी, संजय सिंग, आदित्य ठाकरे आदी मान्यवरांच्या भेटी घेऊन चर्चा केली.

इंटरनेशन हा आजच्या तरुणांसाठी एक इमर्सिव हँड्स-ऑन लर्निंग प्रोग्राम आहे. ज्यांना सर्वच दृष्टीने सक्षम व्हायचे आहे आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून भक्कम पाया करण्याची इच्छा आहे अशा युवाशक्तीसाठी खास कार्यक्रम आखला आहे. इंटरनेशनच्या माध्यमातून, छात्र संसद प्रतिनिधींना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तसेच सरकारमधील दूरदर्शी व्यक्तींना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी प्रदान करते जेणेकरुन ते सर्वोत्तम गोष्टींकडून शिकू शकतील. यामध्ये शासनाच्या विविध मॉडेल्सना प्रत्यक्ष अनुभव देखील यात मिळणार आहे. जे महत्त्वाचे काम करतात परंतु ते दृष्टीक्षेपात येत नाही अशा व्यक्तींशी ही संवाद साधण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे.

या पूर्वीच्या कार्यक्रमात हे विद्यार्थी नितीन गडकरी, रंजन गोगोई, आतिशी मार्लेना, स्वाती मालीवाल, आनंद नरसिम्हन, राजदीप सरदेसाई, भूपिंदर हुडा, दीपिंदर हुडा, चरणजीत सिंग चन्नी, बी के शिवानी, टेमजेंग अलॉन्ग आणि चारू प्रज्ञा यासारख्या उल्लेखनीय व्यक्तींना भेटले आहेत. डॉ. सी.एन. अश्वथ नारायण, पियुष मिश्रा, नीरजा बिर्ला, आशिष चौहान, भगतसिंग कोश्यारी, किरीट सोमय्या, वरुण ग्रोव्हर, जॅकी भगनानी, चारू प्रज्ञा, सॅवियो रॉग्रिग्ज, किरण बेदी, ऐश्वर्या महादेव, सुब्रमण्यम स्वामी, पियुष गोयल, स्मृती इराणी, नरेंद्र तोमर, परशोत्तम रुपाला, आनंदीबेन पटेल, अखिलेश यादव, कपिल सिब्बल, विनय सहस्रबुद्धे, उदय माहूरकर आणि स्वाती मालीवालयासह प्रभावशाली व्यक्तींना भेटलेले आहेत.

चार्तुमास समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –   जैन धर्माच्या चार्तुमासाच्या नियोजनासंबंधित महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. दरवर्षीप्रमाणे दि. २० जुलै पासून जैन धर्माच्या चार्तुमासाचे आयोजन स्वाध्याय भवन, गणपतीनगर येथे करण्यात आले आहे. या चार्तुमासाच्या काळात विविध धार्मिक अनुष्ठांन, धर्माराधना, परिषुण पर्व, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध संदेशपर सजीव देखावे, दररोज मंगल प्रवचनाचे तसेच संत-महात्मांच्या जयंती व दीक्षांत दिन मोठ्या उत्साहात साजरा केले जाईल. चार्तुमासात परमपूज्य आचार्य भगवंत १००८ श्री रामलालजी म. सा. यांचे आज्ञानुवर्ती शासन दीपक श्री सुमितमुनिजी म. सा., श्री भूतिप्रज्ञजी म. सा., श्रीऋजुप्रज्ञजी म.सा. आदी  ठाणा-३ यांच्याकडून ‘जैन दर्शन’ घडणार आहे.

जैन धर्मामधील  अत्यंत प्रज्ञावान संतमुनी म्हणून पूज्य सुमितमुनिजी म. सा. सह संतमुनी ओळखले जातात. त्यांचा मोठा शिष्यगण आहे. जैन मुनी आत्मोन्नती बरोबर लोकांना धर्मानुरुप आचारणासाठी प्रेरणा देत असतात. समस्त विश्वामध्ये ‘जैन दर्शन’ ला विशेष महत्त्व आणि ओळख आहे. सत्य, अहिंसा, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या मूलभूत सिद्धांतामध्ये समस्त मानवजातीच्या उध्दाराचे गुपित सामावले आहे. हे सर्व विस्ताराने जाणून घेण्यासाठी चार्तुमास काळ सर्वश्रेष्ठ मानला जातो. जन्मोजन्मींचा फेरांचे समापन करावयाचे असल्यास व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर करावयाचा असल्यास धर्म सिद्धांताच्या वाटेने जावेच लागेल. चार्तुमास काळात बाहेर गावाहून येणाऱ्या सुश्रावकांची ये-जा चालू असते. या संतांचा मागील चार्तुमास रतलाम, मध्यप्रदेश येथे होता.

या सभेमध्ये हा चार्तुमास कुण्याही एका संप्रदाय वा पंथाचा नसून समाज व मानव कल्याणासाठी चार्तुमास आहे. या चार्तुमासाच्या कालावधीत सर्वांनी आपआपली जबाबदारी समजून सेवा द्यावयाची आहे. तत्पूर्वी जैन स्थानकवासी चार्तुमास समिती-२०२४ च्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चार्तुमास समितीस सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. त्यांनी जळगाव जैन श्री संघाचा संपूर्ण भारतात असलेला गौरव अधिक वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. चार्तुमास समितीस प्रामुख्याने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे नियमित मार्गदर्शन करतील. यावेळी माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी हे शिर्षस्थानी असतील. बैठकीसाठी मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते तसेच सर्वांनी एकदिलाने चार्तुमास उत्साहात संपन्न, यशस्वी करण्याचा निश्चिय केला.

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव -२०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –  जळगावात दरवर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० एप्रिल २०२५ रोजी येणाऱ्या भगवान जन्म कल्याणक महोत्सवातसुद्धा विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांच्या प्रेरणेने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ही सर्व कार्यक्रम सुत्रबद्ध नियोजनासाठी सकल जैन श्री संघ यांच्या अधिनस्थ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे गठन केले जाते. त्यासंबंधित येणाऱ्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव-२०२५ च्या अध्यक्षपदी तेरापंथ महासभेचे ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष राजकुमार सेठीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

विविध धार्मिक कार्यात, जैन मुनींच्या सेवेत व सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये राजकुमार सेठीया सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांचे संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य विशेषत्वाने लक्षात घेऊन त्यांना या महत्त्वाकांक्षी महोत्सव समितीचे अध्यक्षपद सर्वानुमते प्रदान करण्यात आले. आज दि.२३ ला स्वाध्याय भवन येथे झालेल्या सभेत ही निवड केली गेली. या सभेला सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्र जैन यांनी हिशोबाचा लेखाजोखा उपस्थित बांधवांसमोर मांडला.

राजकूमार सेठिया यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आगामी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव -२०२५ च्या तयारीसाठी बराच कालावधी मिळाल्याने तयारीसाठी उपयुक्त वेळ मिळालेला आहे मी सकल श्री जैन संघाचे आभार मानतो. तसेच यावर्षी महोत्सव साजरा करण्यासोबतच २६२४ उपवास करण्याचे सर्वांना आवाहन करत आध्यात्मिकतेची जोड देण्याची साद राजकुमार सेठिया यांनी समाजबांधवांना घातली. सभेचे समन्वय संचालन अनिल कोठारी यांनी केले. या सभेत समाजबांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आभार स्वरूप लुकंड यांनी मानले.

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा

जळगाव दि. २१ (प्रतिनिधी) –  जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सर्व  आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार केल्यास शरीर हीच खरी संपत्ती होय. कितीही संपत्ती कमावली व आपले शरीर स्वास्थ उत्तम नसेल तर त्या संपत्तीची किंमत शून्य असते. या विचारातून आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी, नियमित योग आणि व्यायामास प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. जैन इरिगेशनतर्फे दरवर्षाप्रमाणे ‘जागतीक योग दिवसा’च्या औचित्याने जनजागृती करण्यात आली. यात नियमित योग करण्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.

प्रश्वास म्हणजे हृदयाची विश्रांती होय – सुभाष जाखेटे

योग ही आजच्या धकधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये अतिशय आवश्यक साधना आहे. योगाद्वारे  शरीर आणि मनाचे ताणतणाव दूर होऊन आपला श्वास दीर्घ होतो त्यामुळे मन:शांती सोबत हृदयालासुद्धा विश्रांती मिळते. प्राणायाम आणि ध्यान करताना हाताच्या मुद्रेला महत्त्वाचे स्थान आहे. अंगठा हे परमतत्वाचे त्याच्या बाजूला असलेली तर्जनी आत्मतत्वाचे प्रतिक असते. परमतत्त्वाखाली लीन करणं आणि रज तम जस गुणाचे ती बोटे सोडून देणे या मुद्रेला अतिशय महत्त्व आहे असे सांगत सुभाष जाखेटे यांनी प्लास्टीक पार्क मधील सहकाऱ्याकडून योगसाधना करुन घेतल्यात. अंगूलीमुद्रा, ओमकारसह बिहार स्कूल ऑफ योगाचे त्रिकुट मुद्रा (टिटिके)  ही आसने करुन घेतली. खांदा, मान, पाठीचा कणा यासाठी नियमित करता येणारी योगाअभ्यासही समजून सांगितला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनीही नियमीत योग करण्याचा संकल्प केला. यावेळी जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक यांच्या उपस्थित हा योगाभ्यास झाला. याप्रसंगी डॉ. राजकुमार जैन, आर.एस. पाटील, युवराज धनगर, अनिल जैन यांच्यासह मानव संसाधन विभागातील सहकारी उपस्थित होते.

जैन फूडपार्कमध्ये ११०० सहकाऱ्यांनी केला योगाभ्यास…

‘कंपनीत काम करणारा माझा प्रत्येक सहकारी सृदृढ असावा त्याला व्यसने नसावीत ही भावना कंपनीचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांची होती. चांगल्या हृदयासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आपण दररोज किमान अर्धा तास योग करावा.’ असे आवाहन योग शिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांनी केले. जैन अॅग्रिपार्क, जैन फूड पार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांसाठी सकाळी ८ वाजता जागतिक योग दिवसाच्यानिमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला त्याप्रसंगी त्यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधला.

आरंभी बायो एनर्जी विभागाच्या प्रमुख डॉ. जयश्री राणे यांच्याहस्ते योगशिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांचे स्वागत केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कंपनीचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी केले. सहकाऱ्यांशी प्रात्यक्षिक साधत सूर्य नमस्कार, झुंबा, सूक्ष्म व्यायाम, प्राणायम, योग्य पद्धतीने ओमकारचा करावयाचा उच्चार या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. टिश्युकल्चर लॅबमधील महिला सहकारी देखील हिरीरीने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुमारे ११०० सहकाऱ्यांनी योगाभ्यास करून घेतला. महिला सहकाऱ्यांना वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताने कार्यक्रमात शुभेच्छा ही देण्यात आल्या. यावेळी योग विषयक शंकांचे समाधानही करून घेतले. जी.आर. पाटील, राजेश आगीवाल, एस.बी. ठाकरे, भिकेश जोशी, वैभव चौधरी, अजय काबरा, धीरज जोशी, सुचेत जैन, दिनेश चौधरी, बी.एम. खंबायत यांनी परिश्रम घेतले.

जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान, संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) – ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच रामकृष्ण हरी, आदी शक्ती मुक्ताबाई की जय हा जय घोष…’ यामुळे जैन हिल्स येथील व्हीआयपी गेटचा परिसर भक्तीमय झाला नाही तर नवलच! हा प्रसंग आहे श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेशद्वारा संचालित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीच्या स्वागताचा!

गेल्या दोन दशकांहून अधिक वर्षांपासून श्रीराम मंदिर संस्थानच्या पंढरीसाठी निघालेल्या पायी  पालखी, वारीचे स्वागत पौर्णिमेच्या नियोजित दिवशी करण्यात येते. रितीरिवाजानुसार जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे जैन परिवारातील सौ. ज्योती अशोक जैन, सौ. निशा अनिल जैन, सौ. शोभना अजित जैन तसेच  अथांग व सौ. अंबिका जैन यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन परिवारातील सदस्यांनी श्रीसंत मुक्ताबाई यांच्या पादुकांची पूजा केली. त्यानंतर सुलभा जोशी, मानव संसाधन विभागाचे पी. एस. नाईक, जी आर पाटील, एस. बी, ठाकरे, राजेश आगीवाल, सिक्युरिटी विभागाचे प्रमुख आनंद बलौदी,  आर. डी. पाटील, एम.पी बागुल, संजय सोनजे, अजय काळे, जीआरएफचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अयंगार, समन्वयक उदय महाजन, डॉ. आश्विन झाला, अब्दुलभाई, गिरीश कुळकर्णी यांच्यासह जैन हिल्स येथील सुमारे ४०० स्त्री-पुरुष सहकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. मेहरुणच्या शिवाजी उद्यानातील संत मुक्ताबाई मंदिरात पुजेचा मान जैन इरिगेशनला दिला जातो. यावर्षी कंपनीच्यावतीने सहकारी अनिल जोशी यांच्याहस्ते ही पूजा केली गेली.

कंपनीच्यावतीने राजाभोज खानपान विभागाचे प्रमुख विजय मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी भीमराव दांडगे व सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या फराळाची व्यवस्था केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच दिंडीची उत्तम क्षणचित्रे उपयोगात आणून कला विभागातर्फे  उत्तम अशी सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता करून दिली आहे, हे वाहन पालखी बरोबरच जाईल. या पालखीची स्थापना १७९४ला झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातीथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते.

आजच्या या स्वागताचे वैशिष्ट्य असे की, आध्यात्म आणि पायी चालण्याचे, वारीचे महत्त्व प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना समजावे यासाठी डॉ. अविनाश आचार्य स्कूल, भ.गो. शानभाग स्कूल आणि काशिनाथ पलोड हायस्कूच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग करून घेण्यात आला होता. वारकरी स्त्री-पुरुष पारंपरिक वेषात सहभागी विद्यार्थ्यांमुळे वारीला खरा अर्थ प्राप्त झाला.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version