अनुभूती स्कूल ला ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड’ – ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंगमध्ये भारतात टॉप 5 तर महाराष्ट्रात प्रथम

जळगाव दि.13– ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंग (EWISR 2022-23) मध्ये अव्वल पाच क्रमांकावर असलेल्या शाळांनी ‘शैक्षणिक प्रतिष्ठा’, ‘नेतृत्व, व्यवस्थापन गुणवत्ता’ आणि ‘शिक्षक कल्याण आणि विकास’, ‘पैशाचे मूल्य’ या श्रेणीमध्ये सर्वाधिक गुण मिळविले. यात अनुभूती स्कूल द्वारे शैक्षणिक विकासातून सामाजिक समृद्धीच्यादृष्टीने केल्या गेलेल्या विशेष प्रयत्नांमुळे सर्व सहनिवासी शाळा (को-एड बोर्डिंग) श्रेणीत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक तर भारतातून पाचव्या क्रमांकाचे रॅंकिंग मिळाले असून त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड्स 2022-23’ ने सन्मानित करण्यात आले. हा भव्य पारितोषिक सोहळा दिल्ली, गुरूग्राम येथील हॉटेल लीला अँबियन्स इथे पार पडला. अनुभूती स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री. यु. व्ही. राव यांनी अनुभूती स्कूलच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी क्रिकेटपटू श्री. जतीन परांजपे, दिल्लीस्थित करिअर कौन्सिलिंग माईंडलर कंपनीचे संस्थापक श्री. प्रतिक भार्गव यांची उपस्थिती होती.

क्रिकेटपटू श्री. जतीन परांजपे व श्री. प्रतिक भार्गव यांच्याहस्ते ‘एज्यूकेशन वर्ल्डस इंडिया स्कूल अवॉर्ड’ स्विकारताना अनुभूती निवासी स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री. यु. व्ही. राव.

ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंग हे भारतातील शीर्ष आणि सर्वोत्तम शाळा एज्युकेशन वर्ल्ड सी फोरच्या सहकार्याने, एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग (EWISR) 2022-23 सादर करते जे 300 हून अधिक शहरांमधील भारतातील सर्वोत्तम आणि सर्वोच्च शाळांचे विश्लेषण करून रेटिंग करते आणि श्रेणी देते. ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंग (EWISR 2022-23) संकलित करण्यासाठी 11,458 नमुना प्रतिसादकर्ते – शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, SECA (सामाजिक-आर्थिक श्रेणी अ) पालक आणि वरिष्ठ शालेय विद्यार्थी – देशभरातील 28 शहरांमध्ये चार महिन्यांच्या कालावधीत 118 सी फोर फील्ड संशोधकांनी मुलाखती घेतल्या. (जून-सप्टेंबर) वार्षिक EWISR हे जगातील सर्वात मोठे शाळा रँकिंग सर्वेक्षण आहे. यामध्ये सर्व सहनिवासी शाळा (को-एड बोर्डिंग) श्रेणीत टॉप 5 मध्ये स्थान पटकाविले. अनुभूती स्कूलला ‘एज्यूकेशन वर्ल्डस इंडिया स्कूल अवॉर्डस’ ने महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांने तर भारतातील पाचव्या क्रमांची शाळा म्हणून सन्मानीत करण्यात आले.

निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारलेली अनुभूती स्कूल इयत्ता 5 वी ते 12 पर्यंत पूर्ण निवासी आहे. अनुभूतीमध्ये औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कारमूल्ये रूजविले जातात. ज्यामुळे स्पर्धायुक्त जगातसुद्धा अनुभूतीचे विद्यार्थी आपली वेगळी छाप सोडण्यास सक्षम आहेत. 2020-2021 शैक्षणिक जागतिक क्रमवारीत, केंद्र आणि राज्य सरकारी शाळांमध्ये अनुभूती 15 क्रमांकाच्या रॅकिंग होते. पहिल्यांदाच भारतातील पहिल्या पाचमध्ये तर महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानावर अनुभूती स्कूल ला बहुमान मिळाला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, अनुभवाधारित शिक्षण देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापनाची तळमळ यामुळेच ही रॅकिंग शक्य झाल्याचं मत अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी व्यक्त केलं आहे.

विद्यार्थ्यांना केवळ औपचारिक शिक्षणात पारंगत होण्यापेक्षा सर्वांगिण अनुभवाधारित शिक्षणाचा मार्ग दाखविणाऱ्या अनुभूती स्कूलला मिळालेला सन्मान हा जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. गुणवत्तेसह सर्वांगिण विकासावर भर देत शैक्षणिक अभ्यासक्रमांसह कलात्मक क्षेत्रातही अनुभूती स्कूल अधोरेखित करण्यासारखे यश प्राप्त करीत असते. यात स्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर सहकाऱ्यांसह विद्यार्थी व पालकांचे विशेष कौतूक आहे.

श्री. अतुल जैन, चेअरमन, अनुभूती स्कूल

‘शिक्षण हा सभ्यतेचा एक आविष्कार आहे’ असे मानणारे श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित, शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक संवेदना जपणाऱ्या अनुभूती स्कूलने भारतातील शाळा क्रमवारीत ‘एज्यूकेशन वर्ल्डस इंडिया स्कूल अवॉर्डस’ ने वेगळेपण अधोरेखित केले आहे. अनुभूती स्कूलमधील शिक्षक-शिक्षकतेतर सहकाऱ्यांसह पालक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतूक वाटते.

श्री. अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता पंधरा वर्षाखालील मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी

जळगाव दि.13 – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आगामी काळात होणाऱ्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता जळगाव जिल्हा मुलींच्या १५ वर्षाखालील संघाची निवड चाचणी रविवार, दि. १६ ऑक्टोबर ला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जैन स्पोर्ट्स अकॅडमी क्रिकेट ग्राउंड, विद्या इंग्लिश स्कूलच्या मागे, जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहे. ज्या मुलींचा जन्म 1 सप्टेंबर 2007 ते 31 ऑगस्ट 2009 या दरम्यान झालेला असेल अशाच मुली निवड चाचणी करिता पात्र ठरतील. तरी सर्व इच्छुक खेळाडूंनी आपल्या जन्मतारखेच्या दाखल्यासह, क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात व स्पोर्ट शूज घालून रविवार, १६ ऑक्टोबर ला दुपारी 4 वाजता मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री. अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) व सहसचिव श्री. अविनाश लाठी (९८२२६१६५०३) यांनी केले आहे.

 

जळगावची केळी’ पोस्ट पाकिटाचे गांधी उद्यानात आज प्रकाशन

जळगाव, दि. 10 -जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनात जळगाव जिल्ह्याची केळीच्या माध्यमातून संपूर्ण जगात ओळख निर्माण झालेली आहे. जगातील केळी उत्पादनात एकट्या जळगाव जिल्ह्याचा 3 टक्के इतका सिंहाचा वाटा आहे. केळीची महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकिटाचे (विशेष इव्हलपचे) प्रकाशन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व मान्यवरांच्याहस्ते करण्यात येत आहे.

जैन टिश्युकल्चर रोपे व उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करून जळगावची केळीची ओळख पोस्टाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचेल याहून उत्तम योग तो कोणता असावा. जळगावकरांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमास जळगावकर नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

या कार्यक्रमास बी. व्ही.चव्हाण (अधीक्षक, टपाल विभाग, जळगाव), जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदलवाडीचे शशांक पाटील, त्याच प्रमाणे जैन टिश्यू कल्चरचे वरिष्ठ अधिकारी व प्रगतीशील शेतकरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

जळगावची केळी आता पोस्टाच्या पाकिटावर!

या तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जळगावची ओळख सांगणाऱ्या केळीचे चित्र व माहिती असलेल्या पोस्टाच्या पाकिटाचे प्रकाशन देखील करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्याची केळीचे आगार म्हणून जागतिक ओळख आहे. जळगावला देशाच्या केळीचे केंद्र म्हणून सर्वदूर परिचय आहे. महाराष्ट्र राज्यातील 90,000 हेक्टर केळीच्या बागांपैकी सुमारे 60 टक्के भाग जळगावमध्ये मोडतो. त्यात जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली टिश्युकल्चर क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन व नवनवीन प्रयोग केले आहेत. जैनचे टिश्युकल्चर आणि उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या केळी येथे पिकविल्या जातात. शेतकऱ्यांच्या उत्पादनात 4 पटीहून अधिक वाढ झालेली आहे. केळी हे फळ उत्कृष्ठ फळ आहे त्यात भरपूर पोषक अन्नद्रव्ये आहेत. याबाबतचे 2017 मध्ये भौगोलिक संकेतक प्रमाण निसर्गराजा कृषि विज्ञान केंद्र यांच्याकडे प्राप्त झालेले आहे. जळगावची केळी म्हणजे अतुल्य भारत व अमूल्य खजाना असा गौरव आहे. ह्या कार्यक्रमात जळगावच्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

जळगाव, दि. 10-जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जळगाव जिल्ह्याची केळीच्या माध्यमातून संपूर्ण जगात ओळख निर्माण झालेली आहे. जगातील केळी उत्पादनात एकट्या जळगाव जिल्ह्याचा 3 टक्के इतका सिंहाचा वाटा आहे. केळीची महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकिटाचे (विशेष इव्हलपचे) प्रकाशन सुद्धा या प्रदर्शनातच अशोक जैन व मान्यवरांच्याहस्ते करण्यात येत आहे.

जैन टिश्युकल्चर रोपे व उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करून जळगावची केळीची ओळख पोस्टाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचेल याहून उत्तम योग तो कोणता असावा. जळगावकरांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमास जळगावकर नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या साजरे होत आहे. या काळातच जागतिक टपाल दिनानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ‘डाक टिकटों में महात्मा’ हे माहितीपूर्ण, रंजक प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास बी. व्ही.चव्हाण (अधीक्षक, टपाल विभाग, जळगाव), जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदलवाडीचे शशांक पाटील, त्याच प्रमाणे जैन टिश्यू कल्चरचे वरिष्ठ अधिकारी व प्रगतीशील शेतकरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

‘डाक टिकटों में महात्मा’

महात्मा गांधी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी आणि व्यक्तीमत्वांपैकी एक गणले गेलेले आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजींच्या टपाल तिकिटांचे जनसामान्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले आहे. बहुतेक देशांनी महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे जारी केली आहेत. देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पहायला मिळते. टपाल तिकिटांच्या जगात गांधीजी हे सर्वात जास्त दिसणारे भारतीय आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतातील सर्वाधिक टपाल तिकिटांवर गांधीजींची छबीच बघायला मिळते. टपाल तिकिटांच्या माध्यमातून गांधीजींचे जीवन दर्शन रसिकांना बघायला मिळणार आहे. जगातील जितक्या देशांनी टपाल तिकिटे काढली आहेत त्या 120 हून अधिक देशांची तिकिटे गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अभिलेखागारात उपलब्ध आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशनचा सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जन्मजयंती पंधरवडा सुरू आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत. टपालाच्या तिकिट संग्रह करणाऱ्यांसाठी, टपाल तिकीट गोळा करणाऱ्या छंद असणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.

 

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

जळगाव दि. १०- मलेशिया येथील लांगकवी येथे ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झालेल्या आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडके हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये तिने दोन सुवर्ण आणि एक कास्यपदक अशा तीन पदकांची कमाई केली. मूळची मुंबईची राहणारी नीलम घोडके हिने दुहेरीत रश्मी कुमारी सोबत खेळताना महिलांच्या अंतिम सामन्यात भारताच्याच काजल कुमारी आणि देबजानी तामोली यांचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. महिला सांघिक अजिंक्य पद गटात अंतिम सामन्यात भारतीय संघाने अमेरिका संघाचा ३-० ने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. त्यात नीलम घोडके हिने एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या पूजा राठी हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
त्यानंतर महिला एकेरीत भारतीय खेळाडूंनी आपले पूर्ण वर्चस्व राखले आणि क्रमांक एक ते चार अशी चारही पदके आपल्या नावे केली. त्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या रश्मी कुमारी हिने अंतिम सामन्यात पेट्रोलियमच्याच काजल कुमारी हिचा पराभव करून विजेचे पद प्राप्त केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत नीलम घोडके हिने डिफेन्स अकाउंटच्या देबजानी तामोली हिचा प्रभाव करून कास्यपदक प्राप्त केले. तदनंतर स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या एकेरी सामन्यांमध्ये जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रीपणकर याने आठ पैकी सात सामने जिंकून पाचवा क्रमांक प्राप्त केला. या गटात आपले सर्व एकेरीचे सामने जिंकत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या मोहम्मद गुफ्रान याने विजेतेपद प्राप्त केले. पुरुष एकेरीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघातील चारही खेळाडूंनी क्रमांक एक ते चार चे पारितोषिक प्राप्त करून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यात अंतिम सामन्यात संदीप दिवे (महाराष्ट्र) याने उत्तर प्रदेशच्या अब्दुल रहमान याचा अटीतटीच्या सामन्यात २-१ ने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या के. श्रीनिवास याने रिझर्व बँकेच्या प्रशांत मोरे याचा पराभव करून कास्यपदक प्राप्त केले.
जैन इरिगेशनच्या नीलम घोडके आणि अभिजीत त्रीपणकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी श्री. अरविंद देशपांडे, समन्वयक श्री. सय्यद मोहसीन, सुयश बुरकुल, मोहम्मद फजल व सर्व सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे.

“हाऊ गांधी कम्स अलाइव्ह”मध्ये संगीत कार्यशाळा संपन्न

जळगाव दि.9– संगीतामध्ये ज्याप्रमाणे साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचप्रमाणे गांधीजींच्या जीवनाचा साधना अविभाज्य घटक होता. समाजाला सोबत नेण्याची ताकद कलाकाराच्या साधनेत आहे, त्याद्वारे अनेक गोष्टी साधता येतात असे प्रतिपादन पुणे येथील दक्षिणा द्वारका फाऊंडेशनच्या सुश्रूती संथानम यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी जयंती’ व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” अंतर्गत संगीत विषयावर कार्यशाळेत सुश्रूती संथानम बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधन विभागाच्या डीन प्रा. गीता धर्मपाल, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या प्रशासकीय प्रमुख सौ. अंबिका जैन, बैठक फाऊंडेशनचे मंदार करंजकर, दाक्षायणी आठल्ये व पार्थ ताहाराबादकर उपस्थित होते.

संगीत, सभ्यता व भारतीय समाज याविषयावर बोलतांना सुश्रूती संथानम पुढे म्हणाल्या कि, भारतीय संगीताला दोन हजार वर्षांची परंपरा असून यादवांनी व तात्कालिक राजांनी संगीताला राजाश्रय दिला. आपल्या परंपरांवर आधारित सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे. संगीत कलाकाराची ओळख असून ती स्मृतिवृद्धीचे कार्य करते. संगीत माणसांना एकत्रित आणण्याचे काम करते. समाजाने रसिक बनून संगीताचा आनंद घेत असताना जाणकारांची भूमिका साकारली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भोजनोत्तर सत्रात मंदार करंजकर व दाक्षायणी आठल्ये यांनी ‘संगीताचा मानवी शरीर, मन व विचारानुसार होणारा परिणाम’ यावर सादरीकरणाद्वारे समजावून सांगितले. संगीतातून निर्माण होणारी कंपने शरीरातील अंतर्गत अवयवांची मसाज करते. शरीरातील प्रत्येक अवयवांची क्षमतावाढीचे काम संगीत करते. पुढच्या सत्रामध्ये गाण्यातील सौंदर्य स्पष्ट करताना त्यातील लय, सूर व ताल याचे महत्वही त्यांनी विशद केले. भारतीय संगीतात सुरांचा शोध अव्याहतपणे सुरु असून प्रत्येक कलाकाराची संगीतातून व्यक्त होण्याची पद्धती वेगवेगळी आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गीता धर्मपाल यांनी केले. संचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निर्मला झाला व रीती साहा यांनी केले. कार्यक्रमास संजय हांडे, दुष्यन्त जोशी, शीला पांडे, किरण सोहोळे, दिलीप चौधरी यांचेसह मु. जे. महाविद्यालय, जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, विवेकानंद प्रतिष्ठान, गोदावरी संगीत महाविद्यालय, स्वराध्याय, आराध्य व स्वरम संगीत संस्थांचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने आज संगीत विषयावर व्याख्यान व कार्यशाळा

जळगाव, दि. 08- गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” अंतर्गत संगीत विषयावर उद्या रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते १२.३० या वेळात पुणे येथील दक्षिणा द्वारका फाऊंडेशनच्या संचालिका सुश्रूती संथानम यांचे “संगीत , सभ्यता व भारतीय समाज” विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भोजनोत्तर सत्रात मंदार कारंजकर यांचे “शरीर, मन व विचारांवर होणारा संगीताचा प्रभाव” तर दाक्षायणी आठल्ये “हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सौंदर्यापूरक मूल्यांची समीक्षा” या विषयावर प्रस्तुती करणार आहेत. सर्व मित्रांना उपस्थिती देणाऱ्या संगीत साधकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा व त्यासाठी  गिरीश कुलकर्णी (नंबर ९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक संस्थांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

भारतीय मानसिकता परिवर्तनाची ताकद गांधी विचारातच

जळगाव, दि. 6-राजकीय स्वातंत्र्याबरोबरच पूर्ण स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची गरज, त्याचप्रमाणे भारतीय परंपरांचा डोळस अभ्यास भारतीयांचे मानसिक परिवर्तन घडवून आणेल असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन काऊंसिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गांधी रिसर्च फाउण्डेशन च्या संयुक्त विद्यामाने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आणि गांधी जयंती निमित्त आयोजित “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” व्याख्यानमालेतील वक्ते नागपूर येथील वंडरग्रासचे संचालक वैभव काळे व आयोजन कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य आनंद उकिडवे यांनी केले. याप्रसंगी मंचावर सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद राठी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष किशोर चोपडे, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. गीता धर्मपाल यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या सत्रात वैभव काळे यांनी मार्गदर्शन करतांना बांबू पासून निर्मित घरे आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून काळाची गरज असल्याचे सांगितले. आधुनिक घरांची निर्मिती व बांबू पासून घरांची निर्मिती यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी मांडला. बांबू पासून बनविलेली घरे दीर्घकाळ टिकण्यासाठी संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. पृथ्वीवरील जीवसृष्टीला आव्हान देणाऱ्या जीवनशैलीचा त्याग करून गांधीजींच्या विचारांवर वाटचाल करणारी शाश्वत जीवनशैली स्वीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या “सुचिता” स्वच्छता गृहांची यशोगाथा त्यांनी सांगितली. तसेच नागपूर, वर्धा, पुणे आदी ठिकाणी बांबूपासून साकारलेल्या प्रकल्पांची माहितीही दिली.

दुसऱ्या सत्रात प्राचार्य उकिडवे यांनी भारतीय परंपरांना अस्पृश्य न मानता त्याचा सारासार विवेकाने विचार केला पाहिजे. शुद्धता व सात्विकता हीच भारतीय परंपरांची ओळख आहे. देशातील अनेक वारसा स्थळांचे दाखले देत त्यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले. निर्मितीसाठी केवळ कौशल्याची आवश्यकता नसून त्यासाठी साधना, स्वामित्वाची गरज त्यांनी प्रतिपादित केली. विचार, सहभाग, कौशल्य व ज्ञान यातून साधना होते. साधनेतून होणारी निर्मिती सामान्यजनांना आश्चर्यकारक वाटते मात्र ती वास्तव असते. भारतीय स्थापत्य कलेची अनेक दाखले देत त्यामागील तंत्रज्ञांची माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेचे संचालन गिरीश कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निर्मला झाला यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, इंजिनीअर्स व वास्तुविशारद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामविकासाला चालना देणाऱ्या गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनाचे उद्घाटन

जळगाव दि.4- ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी कौशल्याला मूल्य कमी असेल असे वाटत असताना, महात्मा गांधीजींनी शिकविलेल्या रचनात्मक कार्यामुळे तंत्रज्ञानाला जोडून श्रमाची अस्मिता जपली जाऊ शकते, यातून आर्थिक समानता आणि रोजगार निर्मितीतून अहिंसात्मक समाजनिर्मितीचे कार्य आजच्या काळात सुरू ठेवण्याला प्रेरणा मिळते. याचेच दर्शन शाश्वत पर्यावरणासह ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या या प्रदर्शनातून होत आहे.’ असे उद्गार गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार यांनी काढले.
दिल्ली येथील भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएसएसआर) आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आणि गांधी जयंती निमित्त ‘हाऊ गांधी कमस अलाईव्ह’ (How Gandhi comes alive) या महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. सुदर्शन आयंगार बोलत होते. गांधी तीर्थ येथे सकाळी ११.३० वाजेला हा उद्घाटन सोहळा पार पडला.

चरखावर सुतकताई करून प्रदर्शनाचे उद्घाटन करताना डॉ. सुदर्शन आयंगार, प्रो. गिता धर्मपाल, अंबिका जैन, वैभव काळे, आनंद उकिडवे, उदय महाजन, अनिल जोशी, नितीन चोपडा, डॉ. अश्विन झाला, गिरीष कुलकर्णी, डॉ. निर्मिला झाला यांच्यासह मान्यवर.


याप्रसंगी नागपूर येथील नागपूर येथील वंडरग्रास संस्थेचे संचालक वैभव काळे, पुणे येथील आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य आनंद उकिडवे, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डीन प्रो. गिता धरमपाल, सौ. अंबिका अथांग जैन, उदय महाजन, गिरीष कुलकर्णी, नितीन चोपडा, अनिल जोशी, डॉ. आश्विन झाला उपस्थित होते. डॉ. सुदर्शन आयंगार यांनी चरखावर सुतकताई करून प्रदर्शनाचे उद्घान केले. प्रदर्शन 4 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत गांधी तीर्थ येथे पाहता येणार आहे. प्रदर्शनामध्ये महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यापैकी 18 बाबींवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. ग्रामीण भागात असलेल्या कौशल्याचा वैज्ञानिक कसोट्यांवर वस्तूनिष्ठपद्धतीने उद्योजकिय संस्कार देता येतो. यासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गांधीजींचे स्वदेशीचे विचारांचे प्रतिक प्रदर्शनात पाहता येते. या प्रदर्शनातील वैशिष्ट्य म्हणजे रेखाचित्रातून महात्मा गांधीजींची प्रतिमा साकारण्यात आली आहे. यातील एक रेषा ही सुताचा धागा असल्याचे प्रतिक मानले आहे. आणि हा धागा (रेषा) प्रदर्शनात अखंडपणे दाखविण्यात आली आहे. चरखाच्या सुताच्या धाग्यातून स्वराज्याची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

ग्रामोद्योग ही संकल्पना समोर ठेऊन गांधीजींचा हा सुताचा धागा पुढे जातो आणि स्थानिक कुशलता व ज्ञानव्यवस्थेवर आधारित वास्तुकला, विणकाम, भरतकाम, हस्तकला, वैदिक गणित पद्धती, संगीत, शिक्षण, आरोग्य, आदीसह ग्रामोद्योगामध्ये शाश्वत पर्यावरणासह विकासात्मक समाजव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणाऱ्या गांधी रिसर्च फाऊंडेशनसह अन्य सेवाभावी संस्थांची माहिती प्रदर्शनात देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील बाराबलुतेदारपद्धतीचा पुर्नविकासाचा संदेश हा धागा देतो. प्रदर्शनीच्या शेवटी याच धाग्याचे कापडात रूपांतर होऊन वर्तमानातील गांधीजींना अपेक्षित असलेली स्वराज्य ही संकल्पना समजविण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन गांधी तीर्थ अभ्यागतांना 16 ऑक्टोबर पर्यंत पाहता येईल. याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी डॉ. आश्विन झाला, डॉ. निर्मला झाला, योगेश संधानशिवे, आदिती त्रिवेदी, रिती शहा यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

‘महात्मा गांधीजींचे विचार आणि कल्पनांचा प्रचार व प्रसार ह्या प्रदर्शनातून होत आहे. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या प्रदर्शनाचा असून विविध कलाकौशल्यांसह ग्रामीण कलाकारांना व्यवसाभिमूख करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया सौ. अंबिका जैन यांनी दिली.’

‘गाव, खेड्यांमध्ये पारंपारिक कलाकौशल्य कलावंतांमध्ये असतात. त्यांच्याकडे पिढ्यान् पिढ्या हे कौशल्य संस्कारित होत असते मात्र उद्योजकीयदृष्टीने त्यांना व्यासपीठ मिळत नाही यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गांधीजींच्या रचनात्मक कार्यावर या प्रदर्शनात प्रकाश टाकण्यात आला आहे; कारण महात्मा गांधीजी हे स्वत: ग्रामीण भागातील जीवनशैली सुधारण्यासाठी कृतिशील प्रयत्न करित होते. त्यामुळेच त्यांनी खेडांकडे चला असा संदेश दिला. यामुळे हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया प्रो. गिता धरमपाल यांनी दिली.

जळगांव जिल्ह्याचा १९वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

जळगाव दि.०४– महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी जैन स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील एकूण ८५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातून प्राथमिक निवड समितीने ५६ खेळाडूनची निवड केली.

प्राथमिक संघ खालील प्रमाणे
१.मानव टिबरीवाला ,
२.कौशल विरपनकर,
३.ज्ञानदीप सांगोरे ,
४.गोपाल पाटील ,
५.गौरव ठाकूर ,
६.दीपज्योतसिंग आनंद ,
७.रितेश माळी ,
८.सुरज खंडेलवाल ,
९.सुरज खंडागळे ,
१०.हितेश नरेश नायदे ,
११.साई बनाईत ,
१२.ओजस सुवर्णकर
१३.क्रिशी नथानी,
१४.पवन सुधीर पाटील,
१५ क्रिश दीपक धांडोरे ,
१६.दर्शन दहाड
१७.अमित परदेशी
१८.आशुतोष मालुंजकर
१९. नंदलाल भोई
२०. प्रज्वल पाटील
२१.सिद्धेश पाटील
२२. सुनेद शेख
२३.मिर्झा तडवी
२४ तुषार चांगरे
२५. लोकेश पाटील
२६.राज सोनवणे
२७.हर्ष कुंदनानी
२८.पुष्पदान्त राठोड
२९.रोहन पाटील
३०.विक्रांत पवार
३१.हर्षल सोनवणे
३२.भावेश पाटील
३३.नीरज जोशी
३४.प्रतीक पवार
३५.सार्थक महालपुरे
३६.विश्वजीत जाधव
३७.सनी मोरे
३८.सतायू कुलकर्णी
३९ महेश राजपूत
४०.दर्शन खैरनार
४१.ताहा लोखंडवाला
४२.कृष्णा घोलप
४३.स्वस्तिक उमनिया
४४. तिलक महाले
४५.जतीन तळरेजा
४६ .प्रशांत बोहरा
४७. उबेदुल्ला खाटीक
४८.अविनाश झुरखडे
४९. अनुज गोसावी
५०. सचिन पाटील
५१. अमान पांडे
५२.पवन पाटील
५३.उमेश झुरके
५४.धनंजय पवार
५५.दर्शन शिंदे
५६.शैलेश पाटील

वरील संघ संतोष बडगुजर, शंतनु अग्रवाल, प्रशांत विरकर यांच्या निवडसमितीने निवडला त्यांना प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी सहाय्य केले. निवड झालेल्या खेळाडूंनी शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०८ : ०० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित राहावे व तन्वीर अहमद यांच्यासी संपर्क साधावा असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन,सचिव श्री अरविंद देशपांडे व सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version