आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ जाहीर

जळगाव दि. 9-  नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर (१७ वर्षाआतील) आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा-2022 दि. 12  ते 17 नोव्हेंबर 2022 यादरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चा संघ जाहीर करण्यात आला. यामध्ये तेजम केशव, करण पाटील, उजेर देशपांडे, अर्श शेख, शुभम चांदसरकर, सौम्या लोखंडे, इशिका शर्मा, गार्गी पाटील, सताक्षी वाणी, स्वरा पाटील या खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे संघटक व प्रशिक्षक म्हणून अतुल देशपांडे व प्रणव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रत्येक सदस्याला जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्या.  असोसिएशनचे सचिव विनीत जोशी व खजिनदार अरविंद देशपांडे व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक किशोर सिंह यांनी पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

हृदय विकाराचा झटका येण्या आधीच त्यावर प्रतिबंध आवश्यक- डॉ.  रमेश कापडिया

जळगाव , दि.2- भारतात अलीकडे विशीच्या युवकांमध्ये हृदय विकार दिसून येतो आहे. युवकांचा हृदय विकाराने मृत्यू हे देशासाठी शोचनीय आहे.  ते टाळण्यासाठी हृदय विकारांवर प्राथमिक प्रतिबंध (अर्थात प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ हार्ट अटॅक ) आवश्यक आहे असे मोलाचे मार्गदर्शन निष्णात हृदय रोग तज्ज्ञ डॉ. रमेश कापडिया यांनी केले.  गांधी रिसर्च फौंडेशनच्या गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात कंपनीच्या सहकाऱ्यांसाठी डॉ. कापडीया यांचे मार्गदर्शनपर सुसंवाद काही दिवसांपूर्वी आयोजण्यात आला होता. त्यांचे स्वागत गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सौ. अंबिका जैन यांनी केले. जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन यांनी डॉ. कापडिया यांची ओळख करून दिली.

हृदय विकार हा आजार नव्हे तर तुमच्या चुकीच्या जीवन पद्धतीचा तो परिणाम आहे. जगातील तरुण मंडळी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडतात ही दुर्दैवी बाब आहे. युवक त्या त्या देशाची अनमोल संपत्ती आहे युवाशक्तीचे हृदयविकाराने निधन होणे ही बाब देशासाठी, समाजासाठी खूप हानीकारक आहे असे कळकळीने सांगितले. युवकांना त्यातून वाचवण्यासाठी प्रत्येकानेच वयाच्या 21 वर्षानंतर आरोग्याच्या, हृदयाबाबतच्या काही तपासण्या अवश्य कराव्यात. व्यक्तीच्या कौटुंबिक हिस्टरीचा  विचार अवश्य करावा. एलडीएल कोलेस्ट्रॉल 70 च्या खाली नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करावा ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आपल्या व्याख्यानात त्यांचे स्वतःचे अनुभव तर त्यांनी सांगितले पण त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे हृदय विकारांच्या झटक्याने निधन झाले एक डॉक्टर म्हणून त्यांनी काय केले  त्याबाबत देखील मोलाचे सांगितले. वजन, नियंत्रण ठेवणे,  योगा, व्यायाम, चालणे इत्यादी करून आरोग्य उत्तम ठेवावे असे मार्गदर्शन डॉ. कापडिया यांनी केले. त्यानंतर उपस्थित कंपनीच्या सहकार्‍यांनी मोकळे पणाने प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करुन घेतले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन के.बी. पाटील यांनी केले.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गेल्या चार महिन्यांपासून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) मार्गदर्शनाखाली तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (टीएफआय) या राष्ट्रीय महासंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत 36 राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्यातून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई (ताम) या अधिकृत संघटनेचे अध्यक्ष प्रवीण साळुंखे व महासचिव मिलिंद पठारे यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून अध्यक्ष प्रवीण साळुंके, महासचिव मिलिंद पठारे व कोषाध्यक्ष विनायक गायकवाड यांची तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ( ताम) संघटनाच अधिकृत असल्याचा पुन्हा एकदा शिक्का मोर्तब झाला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये तायक्वांदो खेळात दोन फेडरेशन व महाराष्ट्रातही दोन संघटना तयार झाल्या होत्या. 28 एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया हीच अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे जाहीर करून निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टीएफआयच्या निवडणुकीसाठी अधिकृत मतदार राज्य संघटना निश्चित करण्याचे काम चार महिन्यांपासून ऑलिम्पिक भवन, नवी दिल्ली येथे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सस्तानी यांच्या समोर सुरू होते. शुक्रवारी (दि.28) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, टीएफआयची मतदार यादीही जाहीर करण्यात आली. 14 नोव्हेंबर रोजी निवडणुकीतून टीएफआयची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील अधिकृत राज्य संघटना व खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

निवडणूक कार्यक्रम असा
मतदार अर्ज दाखल करणे – 30 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 30 आक्टोबर ते 1 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेणे – 4 नोव्हेंबर
उमेदवारांना चिन्ह वाटप- 7 नोव्हेंबर
निवडणूक – 14 नोव्हेंबर
निवडणुकीचा निकाल- 14 नोव्हेंबर

हृदयरोगापासून बचाव विषयावर
डॉ. रमेश कापडीया यांचे व्याख्यान-
गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब जळगाव चा उपक्रम

जळगाव दि.30 – येथील रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथील जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ व युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचे जनक डॉ. रमेश कापडीया यांचे “हृदयरोगापासून बचावाचे प्राथमिक उपचार” विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गणपती नगरातील रोटरी क्लब जळगावच्या सभागृहात सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२२ ओजी सायंकाळी ६.०० ते ७.३० वेळात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन आयोजक संस्थांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे चिंताजनक प्रमाण , त्यामामागची कारणे व त्यापासून बचावाची प्राथमिक माहिती याबाबत फारच कमी लोकांना माहिती असते. यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांमधील वाढते हृदयरोगाचे प्रमाण लक्षात घेता हे व्याख्यान युवकांसाठीही लाभदायक ठरणार आहे. अहमदाबाद येथील रहिवासी असलेले ८९ वर्षीय डॉ. रमेश कापडीया १९६४ पासून हृदयरोग्यांवर उपचार करीत आहेत. १९९१ पासून ते औषधोपचारांसह युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचा वापर करीत आहे. हजारोवर रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठात विज्ञान व अहिंसा विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. १९९८ साली त्यांना प्रतिष्ठित अशा अशोक गोंधिया ताबीबी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी देश-विदेशात व्याख्याने दिली आहेत. आपल्या पाच दशकांच्या अनुभवावरून युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅम हा पर्याय नसून आवश्यक पूरक घटक असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांची या विषयावरील ९ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात पाडवा पहाट संपन्न

जळगाव शहरात दीपावली निमित्त प्रातःकालीन स्वरोत्सव साजरा करण्याची परंपरा स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाने सुमारे २० वर्षांपासून सुरू केली. या सर्वोत्सवाची सुचिर्भूतता, चैतन्य, मांगल्य, रेखीव रांगोळ्या, उपस्थितांचे मन प्रसन्न करते. कलावंतांनाही यापेक्षा जास्त काय हवे असते ? बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी महात्मा गांधी उद्यानाच्या कस्तुरबा रंगमंचावर मान्यवरांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने मैफल सजली.

कलाकार होती चेन्नई येथील तरुण आश्वासक गायिका दीपिका वरदराजन. वरून नेवे यांच्या गुरुवानदानेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिपप्रजवलन कलाकार दीपिका वरदराजन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी प्रायोजक डॉ. राहुल महाजन , मेजर नानासाहेब वाणी व शहराच्या प्रथम नागरिक सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. कलावंतांचे सत्कार आदरणीय नानासाहेब वाणी, डॉ. विवेकानंद, प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. शरदचंद्र छापेकर, व डॉ. अपर्णा भट यांनी केले दीपिकाच्या मातोश्री गीता वरदराजन यया विशेष करून या मैफिलीस उपस्थित होत्या त्यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांनी केला कलावंताचा परिचय दीपक चांदोरकर यांनी केला आणि सुरू झाला एक सुरेल प्रवास.

दीपिकाने आपल्या मैफिलीची सुरवात राग ललत ने केली. विलंबित एकतालात निबद्ध “गुरू ही आये” तर छोटा ख्याल तीनतालात निबद्ध “भवंदा या नंदा जो बन”
“मोरा सैया बुलाई नदिया आधी रात” ही ठुमरी सादर केली. यानंतर दीपिकाने देस रागातील सं. मानापमान नाटकातील गोविंदराव टेम्बे यांनी संगीतबद्ध केलेले “शुरा मी वंदिले” हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर सं. सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीतबद्ध करून पं. प्रभाकर कारेकर यांनी गाऊन अजरामर केलेले ” प्रिये पहा, रात्रीचा समय सरूनी” हे नाट्यपद सादर केले. पं. भीमसेन जोशींनी अजरामर केलेले ” माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तीरी” हे भक्तीगीत सादर केले. यानंतर सं. मत्स्यगंधा नाटकातील”देवा घरचे ज्ञात कुणाला” हे नाट्यपद सादर केले. “तिन्ही सांजा सख्या मिळाल्या” भय इथले संपत नाही” यानंतर दीपक चांदोरकर यांनी आभार प्रदर्शन केली. “रसमे उलफत को निभाये कैसे” या गीतानंतर भैरवी ने मैफिलीची सांगता झाली. तबल्यावर नाशिकच्या गौरव तांबे, संवादीवर पुष्कराज भागवत यांनी साथ केली. तानपुऱ्यावर अथर्व मुंडले व वरुण नेवे यांनी साथ केली. कार्यक्रम यशशवितेसाठी प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरुण नेवे आशिष मांडे, निनाद चांदोरकर, वरुण देशपांडे, स्वानंद देशमुख यांनी परिश्रम घेतले

जळगांव जिल्ह्याचा १४ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

जळगाव दि.१७– महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी जैन स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील एकूण १५४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातून खालील ५६ खेळाडूंच्या प्राथमिक संघाची निवड सर्वश्री संजय पवार, डॉ. संतोष बडगुजर व प्रशांत वीरकर यांच्या निवड समितीने केली.

  • प्राथमिक संघ खालील प्रमाणे
    १. मानस वी पाटील ,
    २. प्रणव के जाधव ,
    ३. प्रतिक शिंदे ,
    ४. केशव ठाकुर ,
    ५. आर्यन वी पाटील,
    ६. विराज मंधवणी,
    ७. तनय प्रसाद ,
    ८. कार्तिक मारवाडी ,
    ९. कृष्णा पि महाजन ,
    १०. शिवाज डि चौधरी ,
    ११. प्रथम पवार,
    १२. आविष्कार सुभाष मेढे
    १३. निनाद दी पाटील,
    १४. हर्ष नेरकर,
    १५. वंश मिलींद पाटील ,
    १६. रत्नेश संदिप कुळकर्णी
    १७. अक्षय मेघनानी
    १८. श्लोक चंदन महाजन
    १९. हितेश प्रमोद पाटील
    २०. अभय सुनील वाघमारे
    २१. ऋषी झावक
    २२. प्रथमेश श्रीनिवास पाटील
    २३. जैनम जैन
    २४. मोहंमद नोमान
    २५. सोहम प्रमोद पाटील
    २६. अमय राहुल पाटील
    २७. आदित्य वाणी
    २८. प्रणव सोनवणे
    २९. सोहम जैन
    ३०. हेरंभ चौधरी
    ३१. पियूष पवार
    ३२. तनिष जैन
    ३३. सनी पवार
    ३४. हर्षल साळवे
    ३५. अथर्व कुळकर्णी
    ३६. आर्यन नथानी
    ३७. रुद्रा बीचवे
    ३८. वंश पाटील
    ३९. जुगल मनधान
    ४०. सर्वेश पाटील
    ४१. पवन दुबे
    ४२. पर्व नितीन जैन
    ४३. वरुण घेई
    ४४. शेख मुफिझ
    ४५. ध्रुव राजपूत
    ४६. ईशांत पाटील
    ४७. सर्वेश गुळवे
    ४८. शर्या गुरूचल
    ४९. आर्य त्रिवेदी
    ५०. अमूल्य पाटील
    ५१. पाशुपत्रा निकवाल
    ५२. विराट सुरवाडे
    ५३. बिजोय विश्वास
    ५४. रोहन साळुंखे
    ५५. राज राहुल पाटील
    ५६. जितसिंह जाधव

निवड झालेल्या खेळाडूंनी शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०८ : ०० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित राहावे व मुख्यप्रशिक्षक श्री सुयश बुलकुल यांच्यासी संपर्क साधावा असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन , सचिव श्री अरविंद देशपांडे, सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले व खेळाडुंचे अभिनंदन केले व पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

जळगाव, दि. 18– एका भारतीय व्यक्तीचा जगातील 120 पेक्षा अधिक देश सन्मान म्हणून टपाल तिकीट काढतात. ती 120 देशांतील मुळ टपाल तिकीटे गांधी रिसर्च फाउंडेशनकडे उपलब्ध आहे ही जळगावकरांसाठी मोठी गौरवाची बाब असून या तिकीटांचे गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे आयोजन महात्मा गांधी उद्यान करण्यात आले होते. त्याला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गांधी जयंती पंधरवाड्यात जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून आयोजीत हे प्रदर्शन खास जळगावकरांच्या आग्रहास्तव भाऊंचे उद्यान येेथे प्रदर्शीत करण्यात आले आहे. वानखेडे गॅलरीमध्ये दि. 18 ते 23 ऑक्टोबर पर्यंत भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 5 ते 9 वाजेदरम्यान पाहता येईल.

पोस्टाच्या स्टॅम्पवर महात्मा गांधीजींच्या वेगवेगळ्या विषयांवर स्टॅम्प निघालेली आहेत. जगात महात्मा गांधीजी हे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांचे इतक्या देशांमध्ये तिकिटे आहेत. महात्मा गांधीजींच्या टपाल तिकिटांचे जनसामान्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले आहे. देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पहायची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून जळगावकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘डाक टिकटों में महात्मा’ या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनची कार्यशाळा उत्साहात

जळगाव दि.16- गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय आहे. गणित आपल्याला समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. गणितातही सराव, साधना व सातत्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील चंद्रहास हलाई यांनी केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित “हाऊ गांधी कम्स अलाईव्ह” अंतर्गत ‘भारतीय गणिताची अद्भुत दुनिया’ विषयावरील कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे संचालक राकेश रामगुंदम, प्रा. गीता धर्मपाल व डॉ अश्विन झाला, सौ. अंबिका जैन आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना हलाई म्हणाले कि, आधुनिक गणितातील संकल्पना भारतीय ऋषी मुनींनी आपल्या ग्रंथातून हजारो वर्षांपूर्वी मांडलेल्या आहेत. पिंगलाचार्य, आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, लीलावती आदींच्या ग्रंथांमधील छंद काव्याचा अभ्यास केल्यास त्याची प्रचिती येते. महावीराचार्य यांचा गणितसारसंग्रह ,भास्करांचे सिद्धांत शिरोमणी, कात्यायना सुलभासूत्र, याज्ञवल्क्य यांचा शतपथब्राह्मणम् हि भारतीय गणिताची समृद्धी असल्याचे ते म्हणाले. गणितातील अनेक गमतीजमती सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. गीता धर्मपाल यांनी महात्मा गांधी , गणित व शिक्षण पद्धती यातील संबंध मांडला.

कार्यशाळेतील दोन्ही सत्रात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व गणिताच्या सोप्या युक्ती हलाई यांनी विद्याथ्यांना समजावून सांगितल्या. मैथिली थत्ते, भाविक कपूर, सुकीर्ती मणियार, नेहा दसोरे व ऐश्वर्य चोपडा यांनी मनोगत व्यक्त केले. गणित विषयाची भीती गेली, गणिताबद्दल गोडी निर्माण झाली, गणित व इतिहास विषयाचा संबंध कळाला, दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी देखील गणिताचा वापर कसा करता येईल याचे शिक्षण आजच्या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे मिळाले असे त्यांनी म्हटले. कार्यशाळेस रुस्तमजी इंटरनॅशनल, विवेकानंद प्रतिष्ठान, एल. एच. पाटील विद्यालय, लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क व कॉलेज ऑफ फार्मसी, मु. जे. महाविद्यालय आदींचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कस्तुरबा सभागृह गच्च भरले होते. सूत्र संचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार दीपक मिश्रा, रमीज यांनी केले. यशस्वीतेसाठी उदय महाजन यांच्यासह नितीन चोपडा, डॉ. निर्मला झाला, निलेश पाटील, अदिती त्रिवेदी, रीती साहा, निवृत्ती वाघ, राजू माळी, सुनील तायडे व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल व्हावा याच भावनेतून जैन इरिगेशनचे कार्य – अशोक जैन

मुंबई दि.15 – जैन इरिगेशनने कायमच शेत, शेती व शेतकरी हेच केंद्रबिंदू मानले आहे. कंपनीद्वारे विविध प्रयोग करुन शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडावा, सर्वांगिण विकासातून आर्थिक समृद्धी साधता यावी यासाठीच जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ही कंपनी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

मुंबई येथील जगप्रसिद्ध हाॅटेल ताजमहाल पॅलेस, गेट वे ऑफ इंडिया येथे कंपनीच्या वतीने आयोजित वितरक परिषदेत अशोक जैन बोलत होते. दोन दिवसीय वितरक परिषदेस महाराष्ट्रातून 171 निमंत्रित वितरक सहभागी झाले होते. अशोक जैन यांनी सांगितले की, जैन इरिगेशनची कायम शेतकऱ्यांशीच बांधिलकी राहणार आहे, जैन इरिगेशनचे प्रत्येक उत्पादन हे शेतकऱ्यांच्या विकासाला पूरक ठरेल असेच असेल. यातून बळिराजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या परिषदेला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, विपणन प्रमुख अभय जैन, अथांग जैन, अभेद्द जैन, स्टेट हेड एस. एन. पाटील, केळीतज्ज्ञ के. बी. पाटील व कंपनीचे महाराष्ट्रातील सर्व विभागीय व्यवस्थापक उपस्थित होते.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. तर्फे मुंबई येथील जगप्रसिद्ध हाॅटेल ताजमहाल पॅलेस येथे निमंत्रीत वितरकांच्या परिषदेमध्ये सहभागी वितरक.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. तर्फे मुंबई येथील जगप्रसिद्ध हाॅटेल ताजमहाल पॅलेस येथे निमंत्रीत वितरकांच्या परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सोबत व्यासपिठावर डावीकडून के. बी. पाटील, एस. एन. पाटील, अभय जैन, अशोक जैन, अजित जैन, अतुल जैन, अथांग जैन

परिषदेच्या सुरूवातीला वितरकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी कंपनीच्या वाटचाली बाबतचे सविस्तर सादरीकरण केले. एस. एन. पाटील यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांचे सादरीकरण केेले, तर के. बी. पाटील यांनी ऊती संवर्धित संबंधित रोपाविषयी मार्गदर्शन केले.

कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांचे जे आर डी टाटा हे आदर्श होते, त्यांची तत्वे आणि मूल्य त्यांनी कायमच अंगीकारली होती. आपण सर्वजण समाजाचे विश्वस्त असल्याने आपल्या मिळकतीच्या अधिक पटीने समाजाला देण्याची भावना ठेऊनच जैन इरिगेशनचे कार्य अविरत सुरू आहे. जैन इरिगेशनने शेतकऱ्यांच्या हितासाठी आतापर्यंत १२ हजार कोटींची गुंतवणूक केली असून याद्वारे ८० लाख शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अनिल जैन यांनी जगभरातील पर्यावरण बदलाची व त्याचा शेतीवर होणारा परिणाम याची सविस्तर माहिती विषद केली.

या परिषदेत कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनीही मनोगत व्यक्त करून वितरकांच्या विविध विषयांवर व बाजार पेठेत आणि व्यवसायात असणारी आव्हाने, होत असलेले बदल, अनुषंघाने व्यापाराचे परिवर्तन व धोरणनीती कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय परिषदेत वितरकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच वितरकांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ६० वितरकांना ‘ग्रोथ ड्रायव्हर, बीयांड ग्रेटफुल, सैल्युट टू लाॅयल्टी’ या पुरस्कारांनी तसेच कंपनीच्या विविध उत्पादनांची विक्रमी विक्री करण्याचा ६ वितरकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वितरकांच्यावतीने व्यवस्थापनाचा देखील सन्मान करण्यात आला. वितरक परिषेदेचे सूत्रसंचालन के. बी. पाटील यांनी केले. आभार अतुल जैन यांनी मानले.

विश्व मानक दिनाच्या औचित्याने मुंबई येथील कार्यक्रमात पहिले परवानाधारक म्हणून जैन इरिगेशनचा गौरव

मुंबई, दि. 14– जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाने भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक म्हणून मानांकन घेतले होते. या कार्याला अधोरेखित करत विश्व मानक दिनाच्या (14 ऑक्टोबर) औचित्याने भारतीय मानक ब्युरोने गौरव केला. मुंबई येथील हॉटेल मेलुदा द फर्न येथे रोजी जैन इरिगेशनचा सन्मान कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे आणि श्री. सुकुमार यांनी कंपनीच्या वतीने स्वीकारला. तारापूर अणूऊर्जा केंद्राचे केंद्र संचालक डॉ. संजय मुलकलवार यांच्या हस्ते हा गौरव प्रदान केला गेला.

 

भारतीय मानक ब्युरोतर्फे तारापूर अणूऊर्जा केंद्राचे केंद्र संचालक डॉ. संजय मुलकलवार यांच्या हस्ते जैन इरिगेशनचा सन्मान स्वीकारताना कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे आणि श्री. सुकुमार

जागतिक मानक दिन दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. भारतीय मानक ब्युरो पश्चित क्षेत्रीय कार्यालय मुंबईतर्फे बीआयएस मानक चर्चासत्र व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ‘Standards for sustainable Development Goals – A Shared Vision for a Better World’ अर्थात ‘सतत विकार लक्ष्यों के लिए मानक बेहतर विश्व हेतु साझा दृष्टिकोण’ असा विषय होता. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश ग्राहक, नियामक आणि उद्योगांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या मानकीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. जागतिक मानक दिन पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही राष्ट्रीय मानके ठरवणारी भारतातील पहिली भारतीय मानक संस्था आहे, ज्याची स्थापना 1947 मध्ये झाली. बीआयएस तर्फे  रसायन, चिकित्सा उपकरण आणि हॉस्पीटल्स, सिव्हील इंजिनयरिंग, धातूकाम, इंजीनियरिंग, विद्युत तंत्रज्ञान, पेट्रोलियम, कोळसा आणि संबंधित उत्पादने,  इलेक्ट्रॉनिक्स व सूचना प्रौद्योगिकी, उत्पादन व सामान्य इंजीनियरिंग (Production and General Engineering),  खाद्य व कृषि, कपड़ा (Textile), जल संसाधन इत्यादि क्षेत्रांसाठी मानक देण्यात येतात.

जैन इरिगेशनने भारतात आयएस 8008 मानकाचा पहिला परवाना घेतला याबाबत कार्यक्रमातील त्यांच्या सादरीकरणात विशेष उल्लेख करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठ्याभाऊंनी अर्थात भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून हे कार्य उभारलेले आहे त्यांच्या विचार व वारश्याची पुढेही वाटचाल सुरू आहे हे विशेष.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version