संक्रातीला प्रातःकालीन स्वरोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

जळगाव दि.15 – दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर (सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार) व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची प्रातःकालीन सभा गुलाबी थंडीच्या पार्श्वभूमीवर व मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाली. ऐन गुलाबी थंडीत हा स्वरवर्षाव तमाम जळगावकर रसिकांना सुखावून गेला.
प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार सुरुवातीला गुरुवंदना मयूर पाटील यांनी सादर केली. दीपप्रज्वलन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. अमन मित्तल यांच्यासह कलावंत ओंकार प्रभू घाटे व संपदा माने यांच्याहस्ते झाले. या संगीत सभेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे स्वागत प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. कलावंत ओमकार प्रभू घाटे यांचा सत्कार जिल्हाधिक्कारी अमन मित्तल यांनी केला. तर संपदा माने यांचा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, रामकृष्ण करंबेळकर यांचा दीपक चांदोरकर, वरद सोहनी यांचा प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे, गणेश मेस्त्री यांचा मेजर नानासाहेब वाणी तर सुसंवादिनी अनुश्री फडणीस-देशपांडे चे स्वागत दीपिका चांदोरकर यांनी केले.


खानदेशच्या सांस्कृतिक मानदंडाचा स्वराभिषेक अर्थात एकविसावं आवर्तन स्वराभिषेकाचं.. या कार्यक्रमात ओंकार आणि संपदा यांनी अनेक गाजलेली नाट्यगीत व अभंग सादर केलेत. यामध्ये प्रामुख्याने ‘ब्रह्ममूर्ती मंत्र’, ‘श्रीरंगा कमला कांता’, ‘निराकार ओंकार’, ‘सोहम हर डमरू बाजे’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘निर्गुणाचा संग’, ‘जोहार मायबाप जोहार’ ही नाट्यपदं ओमकार व संपदा यांनी दमदारपणे सादर करून रसिकांना या गुलाबी थंडीत आसनांवर खेळवून ठेवलं. त्याचबरोबर ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘पांडुरंगी नामी’, या अभंगांनी मैफिल भक्तीरसात चिंब भिजू लागली. ओंकार ने ‘ध्यान लागले रामाचे’, ‘संत भार पंढरीत’, ‘अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर’, ‘इंद्रायणी काठी देहाची आळंदी’ हे अभंग सादर करून रसिकांना वाहवा मिळवून त्यांना भक्ती रसाच्या स्वरवर्षावात तृप्त केले. त्याला उपज अंगाने तितकीच दमदार साथ संगत रामकृष्ण करंबेळकर (तबला) गणेश मेस्त्री (पखावज) यांनी केली संवादिनीवर वरद सोहनी यांची बोटे लिळ्या फिरत होती. वरद ने संगत केली. तालवाद्यावर धनंजय कंधारकर यांनी आपलं महत्त्व अधोरेखित केलं. या संपूर्ण कार्यक्रमाला एका सूत्रात गुंफण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सुसंवादीनी अनुश्री फडणीस-देशपांडे यांनी उत्तमरित्या केलं ‘अग वैकुंठीचे राया’ या भैरवीने २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या स्वरोत्सवाची प्रातःकालीन संगीत मैफल झाली. आभार दीपक चांदोरकर यांनी मानले. या प्रातःकालीन सभेच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त वरुण देशपांडे, मयूर पाटील, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर, जुईली कलभंडे, आशिष मांडे, अनघा गोडबोले, शोभा निळे यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र स्टेट कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजयी

जळगाव दि. १४ – ५६ व्या सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धा २०२२-२३ मुंबई-दादर येथील श्री हलारी ओसवाल समाज हॉल येथे  दि. ११ जानेवारी २०२३ ला पार पडली. या स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकडमीची खेळाडू कु. दुर्गेश्वरी योगेश धोंगडे विजयी झाली. तिने रत्नागरीच्या निधी सप्रे हिचा ४-२५ व ५-२५ ने पराभव केला. दुर्गेश्वरी धोंगडे हिने कॅडेट ग्रुप १२ वयोगटामध्ये पहिला क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्रातून प्रथम आल्याने दुर्गेश्वरीचा चषक, प्रमाणपत्र ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे अरूण केदार यांच्याहस्ते गौरविण्यात आले. या यशानंतर तिची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून राष्ट्रीय कॅरम स्पर्धा वाराणसी येथे खेळविली जाणार आहे. दुर्गेश्वरी धोंगडे हिला प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्टस ॲकडमीतील प्रशिक्षक सय्यद मोहसीन व योगेश धोंगडे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल जैन स्पोर्ट्स अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे यांच्यासह सहकाऱ्यांनी कौतूक केले.

सीए परिक्षेत देशभरातून अनुभूती स्कूलची सौम्या जाजू २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

जळगाव दि. 13 – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या वतीने नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा अंतिम व इंटरमीडिएट परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये देशभरातून अनुभूती स्कूलची माजी विद्यार्थीनी सौम्या गिरिराज जाजू २८ व्या रॅंकने उत्तीर्ण झाले.
अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत जळगाव येथील अनुभूति स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरीची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.  सीए अंतीम नवीन कोर्स दोन्ही ग्रुपमधून सौम्या जाजू ही जळगाव शहरातून प्रथम तर भारतात २८ व्या क्रमांकाने सौम्या जाजू उत्तीर्ण झाली आहे. तसेच फायनलमध्ये अंशुमा लुंकड, अनिकेत अग्रवाल, जय मारू हे विद्यार्थीही उत्तीर्ण झाले तर विनित ठोले, सुरज चौधरी यांनी इंटरमीडिएट परीक्षेत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अनुभूतीस्कूलचे चेअरमन श्री. अतुल जैन व संचालिका सौ. निशा जैन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कौतूक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी (दि. ३० जानेवारी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी भव्य अशा  “ग्राम संवाद सायकल यात्रे”चे आयोजन करण्यात आले आहे. १३ दिवस चालणारी हि यात्रा जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून सुमारे ३५० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

समाजातील सहभागाने हि सायकल यात्रा यशस्वी करण्याचे नियोजन सुरु आहे. सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. या सहभागी स्वयंसेवकांसाठी संबंधित कालावधीत वापरासाठी सायकलींची आवश्यकता आहे. आपणास विनंती आहे कि, आपल्याकडील चालू स्थितीतील व प्रवासासाठी योग्य सायकल उपलब्ध करून द्यावी. सायकल यात्रेनंतर आपणास आपली सायकल योग्य स्थितीत परत करण्यात येईल. सायकल वापरण्यायोग्य करण्यासाठी काही दुरुस्ती करावी लागणार असल्यास तसेही सांगावे.

सायकलसह यात्रेच्या मार्गावरील गावातील शाळा/महाविद्यालयात कार्यक्रम, स्थानिक पातळीवर रात्री गावकऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन, सकाळी गावात प्रभात फेरीचे आयोजन आदी माध्यमातून स्थानिक नागरिक आपला सहभाग नोंदवू शकणार आहेत. तसेच सहभागी स्वयंसेवकांचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण आदी विषयातही आपला सहभाग नोंदवू शकणार आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३३६२३३०) यांचेशी संपर्क साधावा.

सौरभ यालकर सीए परिक्षा उत्तीर्ण

जळगाव दि.11- जैन उद्योग समूहातील व्यवस्थापक पदावरील वरिष्ठ सहकारी राजेंद्र यालकर यांचा मुलगा चि. सौरभ राजेंद्र यालकर याने नोव्हेंबर-२०२२ मध्ये सि.ए.(CA) परिक्षा दिली होती. या परिक्षेचा अंतिम निकाल लागला. यात सौरभने चांगल्या गुणांसह सीए ची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. सौरभच्या यशाबद्दल त्याचा परिवार,दिगंबर जैन समाजातील मान्यवर यांच्यासह सर्वस्तरातून त्याचे कौतूक होत आहे. तसेच जैन इरिगेशनच्या व्यवस्थापनाकडूनही त्याचे कौतूक झालेे. त्याने यापूर्वी बी.कॉमला 79 टक्के प्राप्त केले होते.  दिगंबर जैन समाजातील साधारण कुटुंबात वाढलेला  एक आदर्श विद्यार्थी सीए अंतिम परिक्षा उत्कृष्टरित्या उत्तीर्ण झाला याचा आनंद वडील राजेंद्र यालकर यांनी व्यक्त केला.

बालगंधर्व संगीत महोत्सवाची प्रातःकालीन मैफल


जळगाव दि.१२ २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवावी प्रात:कालीन मैफलीचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन मैफल रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता महात्मा गांधी उद्यानात संपन्न होत आहे.

रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे ही विनंती आहे.
या मैफिलीचे कलावंत तरुण व युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. यामध्ये ओंकार प्रभुघाटे व संपदा माने आहेत. नाट्यसंगीत व अभंगवाणी ने ओतप्रोत भरलेली ही मैफिल संक्रांतीच्या शुभदिनी रसिकांची सकाळ गोड करणारी ठरेल. या कलावंतांना साथ संगत रामकृष्ण करंबेळकर (तबला), गणेश मेस्त्री (पखावज), वरद सोहोनी (संवादिनी), धनंजय कंधारकर (तालवाद्य) व सुसंवादिनी म्हणून निरुपण करणार आहे अनुश्री फडणीस-देशपांडे. चुकवू नये अशी ही मैफल तमाम जळगावकरांसाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानची नवीन वर्षाची संक्रांतीची भेट आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्री. अमन मित्तल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. २१ व्या वर्षानिमित्त संपन्न होणाऱ्या या स्वरोत्सवात सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत असून आसन व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य क्रमाने आसन व्यवस्था आहे.
चुकवू नये अश्या या प्रातःकालीन नाट्यसंगीत व अभंगवाणी च्या कार्यक्रमास जळगावकर रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) चे संचालक डॉ. दिपक खिरवाडकर, अधिकारी श्रीकांत देसाई व कार्यक्रम अधिकारी श्री. दिपक कुलकर्णी तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी केले आहे.

विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टर ला राज्य शासनाचा पुरस्कार!


मुंबई दि.10 – जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार श्री. विजय जैन यांच्या प्लास्टिक प्रदूषण विषयाचे गांभीर्य अधोरेखित करत, घराबाहेर पडताना आपली कापडी पिशवी सोबत बाळगण्याची आठवण करून देणाऱ्या लक्षवेधी पोस्टर रचनेला महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६२ व्या वार्षिक प्रदर्शनात ५० ००० (रुपये पन्नास हजार) चे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्रा प्रमोद रामटेके, अमूर्त चित्रकार, नागपूर, श्री. राजीव मिश्रा, कला संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि १० जानेवारी २०२३ रोजी सायं ५.३० वा. प्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते जैन यांना गौरविण्यात आले.

उपयोजित कलेच्या सदर पोस्टरसह विजय जैन यांच्या रेखा व रंगकला विभागात “रंगलीपी” ही जलरंग चित्र मालिका देखील या वार्षिक कला प्रदर्शनाचा भाग आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ११ ते १६ दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी प्लास्टिक कचऱ्यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयाला साध्या सोप्या रुपात मांडल्याचे सांगत श्री विजय जैन उपयोजित कलेबरोबर रेखा व रंगकलेमध्ये देखील आपले योगदान सातत्याने देत असल्याबद्दल यांचे कौतुक केले आहे. नुकताच “पुरुषी अहंकार” या विषयावरच्या त्यांच्या पोस्टरला मुंबईच्या “डूडल सोशल ॲड फेस्ट” या राष्ट्रीय स्पर्धत नामांकन मिळाले आहे. सदर स्पर्धेचे ते २०१७ चे विजेते आहेत. विजय जैन यांच्या “स्त्री शिक्षणा”च्या पोस्टर ला उत्तर प्रदेश ललित कला अकादमी चा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत, प्रौढ शिक्षण, झाडं वाचवा, बाल कामगार, सकस आहार- विद्यार्थी, सोशल मीडिया वापर: एक जबाबदारी आणि कोरोना काळातील मास्क वापरासाठी उद्युक्त करणारी सोशल मीडिया मालिका अशा सामाजिक विषयाला धरून त्यांनी अतिशय कल्पक आणि प्रबोधनात्मक पोस्टर रचना साकारल्या आहेत. त्यांच्या या कामाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वरोत्सवात सहगायनातुन रसिकांची तृप्ती

२२ वा बालगंधर्व महोत्सव ५, ६, ७ जानेवारीला; बालगंधर्व महोत्सवाच्या २१ आवर्तने अनूभवना-या रसिक श्रोत्यांचा गौरव

जळगाव दि.8– बालगंधर्व संगीत महोत्सवात आजच्या दिवसाची संध्याकाळ रम्य झाली रसिक स्वरोत्सवात न्हाऊन निघाले. कारण होते ज्येष्ठ गायक पंडीत डॉ. राम देशपांडे व त्यांच्या सौभाग्यवती अर्चना देशपांडे मुलगा गंधार देशपांडे यांच्या सहगायनाचे. पंडीत डाॕ.राम देशपांडेंनी आपल्या गायनाची सुरवात राग यमन कल्याणने केली. ताल तीलवाड्यात बंडा ख्याल “जिया मानत नाही” व द्रुत ख्याल तिनतालात ” ननदिके बचनुवा संह न जाये ” अत्यंत दमदार पणे सादर केले. त्यानंतर पंडितजीचा स्वरचित तराणा “देनी देनी देनी तनन” हा एकतालातील सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर पंडिता किशोरीताई अमोणकर यांनी गाऊन अजरामर केलेल्या ” बोलावं विठ्ठल, पहावा विठ्ठल” या अभंगला स्वतःची राग भिन्न षड्ज रागात बांधलेल्या चालीचा तोच अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असलेले आणि अजरामर झालेले सं. कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालेवर आधारित “सूरत पिया बिन छिन बिसराये” हे पद सादर करून रसिकांना तृप्त केले. पंडितजींनी आपल्या मैफिलीची सांगता कोण जागता कोण सोता या भजनाने झाला. पं. कुमार गंधर्व यांची गाऊन अजरामर केलेल्या “सावरे ऐजैयो, जमुना किनारे मोरा गाव” या गीताने केली. आणि रसिकांच्या कानात हे सूर घुमत राहिले. त्यांना साथ संगत तबल्यावर रामकृष्ण करंबळेकर, संवादिनीवर अभिनय रवंदे, तानपु-यावर मयूर पाटील, वरूण नेवे यांनी केली.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत. दोघंही सत्रात सहभागी कलावंताचा सत्कार जैन इरिगेशनचे डाॕ. अनिल पाटील, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, वेगा केमिकल्सचे भालचंद्र पाटील, निनाद चांदोरकर, दीपिका चांदोरकर, डाॕ. अर्पणा भट यांनी केले.


मोहन वीणा, सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने समारोप
बालगंधर्व संगीत महोत्सतील व्दितीय समारोपाच्या सत्रात पद्मभुषण व कॕनिडीयन ग्रॕमी ॲवार्ड विजेते पिता पुत्र पं. विश्वमोहन भट व पं. सलिल भट यांच्या मोहन वीणा व सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने झाले. सुरूवातीला पंडीतजींनी स्वरचित विश्वरंजनी रागामध्ये आलाप, जोड , झाला, विलंबीत तिन तालात व मध्य व द्रुत लय तिन तालात सादर करून रसिकांना एका वेगळ्या रागाची अनुभूती रसिकांना दिली. १९९० दशकात अमेरिकेमध्ये पंडीतजींनी एका अल्बमची निर्मिती केली त्यामध्ये असलेली रचना “अ मिटींग बाय द रिव्हर” या रचनेसाठी ग्रॅमी ॲवार्ड दिले गेले हा ग्रॅमी ॲवार्ड सर्वप्रथम भारतात आणण्याचा मान पं. विश्वमोहन भट यांना मिळाला. त्याचसोबत राग जोग मधील एक उत्कृष्ट रचना सादर केली. ही रचनासुध्दा ग्रॕमी ॲवार्डमध्ये समाविष्ट होती. पंडीतजींच्या मैफिलाचा आणि २१ व्य बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप दोन्हीही कलावंतांनी जुगलबंदीच्या माध्यमातून वंदे मातरम् ने केला. त्यांच्याबरोबर तबल्याची संगत युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे बडोद्याचे हिंमाशू महंत यांनी केले.


रसिक श्रोत्यांचाही झाला गौरव


बालगंधर्व संगीत महोत्सवात या २१ व्या आर्वतनाच्या माध्यमातून ज्या रसिक श्रोत्यांनी ही २१ आवर्तने उपस्थित राहून हा महोत्सव काना- मनात साठवला आहे, अशा रसिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी व विश्वस्त प्रा.शरदचंद्र छापेकर यांच्याहस्ते कृतज्ञता गौरव करण्यात आला. यात इंद्रराव पाटील, दिगंबर महाजन, सुदिप्ता सरकार, मेजर नाना वाणी, देविदास पाटील तसेच मायटी ब्रदर्सच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे मिलींद थथ्थे यांचाही सन्मान झाला.


२२ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ ला
आभार प्रदर्शन करताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी पुढील वर्षी बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ होणार असल्याचे जाहीर केले. तसेच याच महोत्सवाची एक मैफल ‘अभंगवाणी’ च्या माध्यमातून रविवार दि.१५ जानेवारी २०२३ ला महात्मा गांधी उद्यानात सकाळी ६.३० आयोजित करण्यात येणार असल्याची माहीत त्यांनी दिली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले. गुरूवंदना मयूर पाटील यांनी म्हटली.

स्वानुभवातून शिक्षण म्हणजे उद्योजकीय संस्कार- अथांग जैन

जळगाव दि. 29 – “स्वानुभवातून काही उत्तम करता करता शिकत जावे ते असे शिकावे की आपण नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनण्याचे गुण स्वतःमध्ये विकसित करू शकतो. श्रद्धेय दादाजींनी (भवरलालजी जैन यांनी) या अनुभूती स्कूलची स्थापनाच ‘Enlightened Entrepreneurship’ ह्या प्रमुख उद्दिष्टावर केलेली आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतक्या चांगल्या शाळेत उद्योजकीय संस्कार मिळत आहेत, त्यादृष्टीने शिकायला मिळत आहे.” असे मोलाचे विचार व्यक्त केले जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन यांनी. अनुभूती निवासी स्कूलच्या कॉमर्स वीक म्हणजेच ‘अर्थानुभूती’ च्या  उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास व शिक्षकगण स्वागत रथ, अशोक महाजन, प्रदीप्तो चॅटर्जी व्यासपीठावर उपस्थित होते. 29 ते 31 डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकवून जाणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थी स्वतःहून हिरीरीने भाग घेत असतात हे विशेष.  

उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यां समोर बोलताना अथांग जैन म्हणाले की, फाउंडर्स डे आणि कॉमर्स वीक या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग असतो. प्रत्येक जण आपापल्या कौशल्याचा, हुशारीचा उपयोग करीत असतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सर्व समावेशकता यावी यासाठी हे करणे खूप मोलाचे आहे. वेगवेगळ्या नावीण्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यात विद्यार्थी गुंतलेला असतो व तो जे करतो ते उत्तमच करत असतो हे भविष्यातील करियर किंवा जीवनासाठी मोलाचे आहे असे सांगून कॉमर्स वीक च्या ‘मॅनेजिंग फॉर सस्टॅनिबीलिटी…’ ही बॅकड्रॉपची संकल्पना, तीन दिवसांमध्ये आखलेले कार्यक्रम उत्तमच आहेत असे कौतुक त्यांनी केले. पृथ्वीला, पर्यावरणाला वाचवायचे असेल तर शासनाबरोबर व्यक्तींनी देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. जी कंपनी पर्यावरण संरक्षणाचे काम करते त्या कंपनीचे उत्पादने नागरिकांनी घेतले तर पर्यावरण संरक्षणात त्यांचाही अप्रत्यक्ष हातभार लागेल हा महत्त्वाचा विचार अथांग जैन यांनी उपस्थितांसमोर मांडला. 

30 डिसेंबरला ‘नुक्कड’ पथनाट्य 

30 डिसेंबर रोजी विद्यार्थी निसर्ग, पाणी इत्यादी बाबत नुक्कड पथनाट्य सादर करणार आहेत. तीन पाण्याचे रंग हिरवा म्हणजे शेतीसाठी, काळे म्हणजे गोरगरीब आणि लाल म्हणजे महिला सशक्तीकरण इत्यादी विषय घेऊन विद्यार्थी मोठ्या कल्पकतेने सादरीकरण करणार आहेत. वाणिज्य दृष्टीकोन ठेऊन प्रत्येक सादरीकरण होणार आहे हा मुख्य धागा याचा असेल. नुक्कड पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थी काही सकारात्मक संदेश देणार आहेत. 

31 रोजी अर्थानुभूती म्हणजेच कॉमर्स वीकचा समारोप 

सुरू असलेल्या अऩुभूती कॉमर्स वीकचे दि. 31 डिसेंबर रोजी समापन होणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या अंगी विक्री कौशल्य यावे यासाठी खास ‘ट्रेडिंग’ दालन म्हणजे स्टॉल मांडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे विक्री कौशल्य त्यातून विविध वस्तू ते विकतील. सेल्समनशीप हा प्रात्यक्षिक विषय देखील विद्यार्थ्यांना अनुभवता येईल. या संपूर्ण इव्हेंटचे व्यवस्थापन विद्यार्थीच करत असतात. 

 

जैन इरिगेशनचा ‘बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड’ने गौरव त्रीची येथे केळी निर्यातीवर राष्ट्रीय कार्यशाळा

 दि२२ डिसेंबर २०२२ (प्रतिनिधी)- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्यावतीने भौगोलिक निदेशांक प्राप्त केळीची निर्यात आव्हाने संधी व भविष्यातील वाटचाल‘ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेदि२१ डिसेंबर रोजी अपेडाचे चेअरमन डाॅअनगामुथू (आयएएसयांच्या हस्ते उद्घाटन झालेउद्घाटनपर संबोधन करताना डाॅअनगामुथु म्हणाले कीशंभर वर्षांपू्र्वी दअमेरिकेत तेथील कंपन्यांनी केळी निर्यात सुरु केलीआज आशिया खंडात ८० टक्के व लॅटीन अमेरिकेत २० टक्के केळी होतेआपल्याला मागे वळून बघण्याची गरज आहे आणि जगातील चौथ्या महत्त्वाच्या पिकाबद्दल तंत्रज्ञानाची जोड देऊन काम होणे गरजेचे आहेआपण गतवर्षी ३.४ लाख टन केळी निर्यात केली पण आपण कुठे कमी पडत आहोत याचा अभ्यास करुन काम केल्यास टिश्यूकल्चरपॅकींग तंत्रज्ञानलागवड तंत्रज्ञान यावर लक्ष देणे गरजेचे आहेसाधारण सामुग्रीचा उपयोग करुन भौगोलिक निर्देशांकीत केळीच्या जातींना युरोप व आखाती देशात प्रमोट करणे गरजेचे आहेआज आपण पंधरा देशात केळी निर्यात करीत आहोतपरंतु आपण खूप जास्त देशात केळी निर्यात करु शकतो इतकी आपली क्षमता आहेतामीळनाडू कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅगीतालक्ष्मी यांनी केळीसाठी ठिबक सिंचन व फर्टिगेशन या तंत्रज्ञानावर आम्ही खूप काम केले त्याचे अचूक व शास्त्रोक्त वापर करुन निर्यातक्षण केळी आपण तयार करु शकतो यावर भर दिलाबागलकोट कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅइंद्रेश यांनी कर्नाटकमध्ये मातीपाणी व वातावरण निर्यातक्षण केळी उत्पादनासाठी उत्तम असून केळीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितलेजैन इरिगेशनच्या केळी संशोधन व विकास कार्याला अधोरेखित करत बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्डने गौरव करण्यात आलाकंपनीच्यावतीने केळी तज्ज्ञ के.बीपाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्वागतपर भाषणात डाॅआरसेल्वराजन – संचालकराष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांनी आपण ग्रॅण्ड नाईन जातीची केळी मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत आहोत परंतु विविध स्थानिक जातींना भौगोलिक निदेशांक मिळालेले आहेतत्यांची निर्यातसुद्धा वाढली पाहीजेकारण २० मिलियन तामिळ नागरिक परदेशात राहतात आणि त्यांची पसंती स्थानिक जातींना असतेडी.जी.एफ.टी.च्या महाव्यवस्थापक श्रीमती राजलक्ष्मी देवराज यांनी निर्यातदारांनी पुढे यावे असे सांगूनफोरेन ट्रेड मंत्रालय त्यांना खूप सहकार्य करीत असल्याची माहीती त्यांनी दिलीदुसऱ्या सत्रामध्ये जैन इरिगेशनचे वरिष्ठ केळी तज्ज्ञ के.बीपाटील यांनी सांगीतले कीआंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे केळी उत्पादनासाठी काम करावेजेणे करुन युरोपजापानरशिया या देशांनासुध्दा आपण केळी पुरवू शकूजगात केळीचे उत्पादन घटले आहेआपण भौगोलिकदृष्ट्या आखाती देश दुबईरशियाजपानइराणचीन यांच्याजवळ आहोतत्यामुळे इक्वेडोर व फिलीपीन्स प्रमाणे काम केल्यास निर्यातीत मोठी वाढ होईलकारण ठिबकटिश्यूकल्चरफर्टिगेशन व उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब जळगाव व सोलापूर मध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत्याचा फायदा निर्यातीसाठी होत आहेऑस्ट्रीया येथील एफ जी झिंगलश्रीअनिल डीकस्टम आयुक्त त्रिचीतामीळनाडू बनाना फेडरेशन सचिव श्रीअजितनडाॅअझर पठानकेळी निर्यात तज्ज्ञ कार्तीक जयरामअलायन्स इन्शुरन्सचे सी.श्रीनीवासनडाॅकेइन्गरसलजीएम नाबार्डपीतमील सल्वन उदमलपेठ यांच्यासह अनेक अभ्यासकांनी वेगवेगळे सादरीकरण करुन केळी निर्यातशीत साखळीकस्टमप्लन्टकाॅरेन्टाईनपॅकींगशिपींगअर्थसहाय्य उत्पादन तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर चर्चा झालीसोलापूर येथून किरण ठोकेबलरामसिंग सोळुंखेचाळीसगावसील्वाकुमार ए.पीकरपैय्या यांचेसह केळीशी संबंधीत ३०० जणांनी सहभाग नोंदविलाकेळी निर्यातीला उत्तम चालना देणारी कार्यशाळा झाली.

जैन इरिगेशनचा केळीतील इनोव्हेटीव्ह कार्यामुळे सन्मान

जैन इरिगेशनच सिस्टीम्स लिनेहमीच केळी पिकासाठी पुढाकार घेऊन विविध प्रकारचे काम करीत आहेकेळीसाठी ठिबक सिंचनटिश्यूकल्चरऑटोमेशन या सारखे तंत्रज्ञान निर्माण करुन केळी उत्पादनात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहेशेतकऱ्यांची उत्पादकता जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्र ज्ञानामुळे झालेली आहेत्यासाठी बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड‘ देऊन गौरव करण्यात आलाकंपनीचे सहकारी केळी तज्ज्ञ के.बीपाटील यांनी डाॅअनगामुथु (अपेडा चेअरमनयांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version