३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेचे जळगावात थाटात उद्घाटन

राज्यभरातील २६ जिल्ह्यातील तिनशे हून अधिक खेळाडूंचा जळगाव सामना सुरू

जळगाव दि.27 प्रतिनिधी : ३२ व्या राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आज दि २७ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन संपन्न झाले. राज्यभरातील २६ जिल्ह्यातील तिनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
दि. 28 पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक संदिप गावित यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षपदी जैन इरिगेशन सिस्टीमच्या मिडीया विभागाचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशी, ताम चे महासचिव तथा सहसचिव तायक्वांडो फेडरेशन आॕफ इंडियाचे मिलिंद पठारे, तामचे उपाध्यक्ष प्रा.डाॕ.अविनाश बारगजे, जैन स्पोटर्स ॲकॕडमीचे अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, ताम सदस्य व्यकंटेश कररा, यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे स्वागत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, महेश घारगे, जयेश बाविस्कर, अमोल थोरात, रविंद्र धर्माधिकारी यांनी केले.


जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देताना पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले की, जग अत्याधुनिक होत असताना तायक्वांडो स्पर्धा इलेक्ट्रॉनिक स्कोरींग सिस्टीम (सेन्सर्स) वर घेण्यात येत असून जळगाव सारख्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्याचा आनंद पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी व्यक्त केला.
प्रास्तविक विक प्रा.डाॕ.अविनाश बारगजे यांनी केले. सुत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले. आभार व्यंकटेश कररा यांनी मानले.

ईपीएफओ कार्यालयातर्फे ‘निधी आपके निकट 2.0’ उपक्रम

ई-नोमिनिशनसह अन्य समस्यांवर संपन्न झाली कार्यशाळा

जळगाव दि.27 प्रतिनिधी – कर्मचारी भविष्य निधी संगठन श्रम एवं रोजगार मंत्रालय भारत सरकारतर्फे ‘निधी आपके निकट 2.0’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. हे औपचारिक उद्घाटन दिल्ली येथील मुख्य कार्यालयातुन आॕनलाईन पध्दतीने झाले. याप्रसंगी जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत अवगत केले गेले. कार्यशाळेमध्ये ई-नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ संबंधित बदलत असलेल्या नियमावली व घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेप्रसंगी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य श्री. प्रभाकर बाणासुरे, जैन इरीगेशन सिस्टीम लि.चे श्री. चंद्रकांत नाईक, लघुउद्योग भारतीचे नाशिक विभागाचे सचिव श्री. समिर साने, जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयाचे प्रवर्तक अधिकारी श्री. रमण पवार उपस्थित झाले. नाशिक येथील क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त श्री. अनिलकुमार प्रितम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, उपभोक्ता, सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. वाढीव पेंशन याविषयी सेवाविनृत्त कर्मचाऱ्यांनी कायदेदृष्ट्या झालेल्या बदलांविषयी प्रश्नोत्तर स्वरूपात चर्चा केली. यात त्यांचे शंकांचे निरसन श्री. प्रभाकर बाणासुरे यांनी केले. त्यात त्यांनी ईपीएस-1995 या कायद्याविषयी सविस्तर बारकावे सांगितले. 2014 मध्ये वाढीव पेंशन अंशदानाविषयी कायदेविषयक मार्गदर्शन केले. प्रत्येकाने नविन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे कुठेलेही ईपीएफशी संबंधित फाॅर्म हे आॕनलाईनच भरले जातात, यासाठी निधी आपके निकट 2.0 हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतो. भविष्यातील आर्थिक सुरक्षितेसाठी पेंशनधारकांची कर्तव्य त्यांच्यात जनजागृती संबंधी माहिती दिली. सोशल माध्यमांतुन येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन शंकांचे निरसन करण्याचे आवाहन श्री. प्रभाकर बाणासुरे यांनी केले. यामध्ये ई-नोमिनेशन बद्दलचे विस्तृत विवेचन, एम्पालाॅयर आणि एम्पाॅलय यांनी भरावयाची माहिती, कामगाराच्या मृत्यूपश्चात वारसाला मिळणारा लाभ त्यासाठी करावी लागणाऱ्या महत्त्वाच्या नोंदीविषयी सांगितले. उपस्थितीत आस्थापनांचे प्रतिनिधि यांच्या प्रश्नाला उत्तरे दिलीत व शंका समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमण पवार यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी जिल्हा भविष्य निधी संगठन कार्यालयातील अधिकारी शाम दुबे, सोपान विभांडीक, योगेश मदनकर व कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.

जेबी प्लास्टोकेमचा मॉडर्न  प्लास्टिक्स   इंडिया अॅवॉर्ड ने मुंबईत गौरव

मुंबई, दि. 23:-  जळगाव येथील जेबी प्लास्टोकेमच्या कार्याला अधोरेखीत करून  मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे  “मॉडर्न  प्लास्टिक  इंडिया अॅवॉर्ड 2023” फास्टेस्ट ग्रोविंग एमएसएमई पुरस्काराने मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट येथे गौरवान्वित करण्यात आले. हा पुरस्कार जे.बी. प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन व संचालक  कैलास खैरनार यांनी मुंबई येथील श्रीलंका दुतावासाचे डॉ. वल्सन के वेथोडी यांच्याहस्ते  स्वीकारला. या सोहळ्यास जगभरातील निवडक प्लास्टिक उदयोगातील उद्योजक, सरकारी अधिकारी, विविध कंपन्यांचे अधिकारी व प्रतिनिधी, संशोधक आणि निर्यातदार व आयातदार मान्यवर उपस्थित होते. 

मॉडर्न प्लास्टिक इंडिया हे एक अग्रणी मासिक आहे. जगभरातील प्लास्टिक विश्वातील घडामोडी प्रकाशीत होतात. गिनु जोसेफ हे मॉडर्न  प्लास्टिक ग्लोबल नेटवर्कचे सीईओ आणि मुख्य संपादक असून त्यांच्या संकल्पनेतून हे पुरस्कार दिले जातात. 

 

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धा जळगावात

२५ जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग निश्चित; तायक्वांडो स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे


जळगाव दि.२४ – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले असून जळगाव होणाऱ्या राज्यस्तरीय कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे आहे.
सदर स्पर्धेत आतापर्यंत २५ जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे या स्पर्धा इलेक्ट्रॉनिक स्कोरींग सिस्टीम (सेन्सर्स) वर घेण्यात येणार आहेत असे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या स्पर्धेत क्युरोगी या प्रकारात १० मुलं व १० मुली अशा २० विविध वजनी गटात या स्पर्धा रंगणार आहेत तर पुमसे स्पर्धा या वैयक्तिक, पेअर्स व सांघिक मुलं व मुली अशा प्रकारात होणार आहेत, साधारण ५०० च्यावर खेळाडू , संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक समावेश आहे.

2023 वरिष्ठ गटासाठी आंतर जिल्हा क्रिकेट चाचणीत ३८ खेळाडूंची निवड

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यातर्फे दिनांक 22 जनवरी 2023 रोजी वरिष्ठ गटासाठी आंतर जिल्हा क्रिकेट निवड चाचणी आयोजन अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळाच्या मैदानावर शिरसोली रोड येथे करण्यात आले होते या निवड चाचणीसाठी जिल्हाभरातून एकूण १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यातून निवड समितीने ३८ खेळाडूंची प्राथमिक निवड केली निवड झालेल्या खेळाडू खालील प्रमाणे.
जेसल पटेल ,नीरज जोशी, राहुल निंभोरे , साहिल गायकर, वरून देशपांडे, सिद्धेश देशमुख , सौरभ सिंग, तनिष जैन, बिपिन चांगले, रोहन चंद्रकांत पाटील , दर्शन खैरनार, क्रिशी नथानी , कुणाल फालक, पार्थ देवकर , प्रथमेश सरोदे, दर्शन दहाड, गौरव ठाकूर, अमिन पिंजारी, तुळजेस पाटील, कौशल वीरपणकर, इर्तेकाज अन्वर, प्रदीप पाटील, शुभम शर्मा , पंकज महाजन , कैलाश पाटील, हितेश नायदे, उदय सोनवणे , स्वप्निल जाधव, राज गुप्ता, खुशाल भोई, निहाल अहमद , रोहित तलरेजा, रिषभ कारवा , नचिकेत ठाकूर, जगदीश झोपे, प्रज्वल पाटील , अंकित मंडल , सागर पाटील,
या खेळाडूंची निवड समितीचे अध्यक्ष संजय पवार, प्रशांत ठाकूर, ॲड.सुरज जहागीर , प्रशांत विरकर व शंतनु अग्रवाल यांनी केली आहे तरी सर्व खेळाडूंनी बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजता अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर क्रिकेट साहित्य व पांढरा गणवेश सहा मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांना संपर्क साधावे असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस टी खैरनार, सचिव अरविंद देशपांडे , सहसचिव अविनाश लाठी यांनी केली व पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिली आहे.

जैन इरिगेशनचा ‘ब’ संघ टाईमस् शिल्ड
क्रिकेट स्पर्धेच्या ‘ड’ गटात अंतिम विजेता

मुंबई दि.21– मुंबई येथे नॅशनल क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर आज झालेल्या टाईम शिल्ड क्रिकेट स्पर्धेत ‘ड’ गटात अंतिम सामना जैन इरिगेशन ‘ब’ संघ विरुद्ध महिंद्रा लॉजिस्टिक यांच्यादरम्यान खेळण्यात आला. नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ‘ब’ संघाने प्रथम फलंदाजीसाठी महेंद्र लॉजिस्टिक संघाला आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करत महेंद्र लॉजिस्टिक्स संघाने ३० षटकात सर्व गडी बाद ११८ धावा केल्या. त्यात समीर चालके २३ आणि अर्पित धाडवे व अभिषेक पांडे प्रत्येकी १३ धावा केल्या. गोलंदाजीत जैन इरिगेशनतर्फे कर्णधार वरुण देशपांडे यांनी ९ षटकात २६ धावा देत ५ आणि समद फल्लाह ४ व अमित गावंडे यांनी १ गडी बाद केले. प्रतिउत्तरात जैन इरगेशन ‘ब’ संघाने हे लक्ष्य केवळ २२.१ षटकात २ गडी बाद ११९ धावा करून पार केला व हा अंतिम सामना ८ गडी राखून विजय मिळवला फलंदाजीत प्रतीक यादव ४१ व आदित्य राजहंस नाबाद ५२ आणि हर्ष आघव नाबाद १२ धावा केल्या.

महिंद्र लॉजिस्टिक संघातर्फे गोलंदाजीत साहिल मळगावकर व अभिषेक पांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. या सामन्यात पाच गडी बाद करणारा जैन इरिगेशन संघाच्या कर्णधार वरुण देशपांडे सामनावीराचा मानकरी ठरला. जैन इरिगेशन ‘ब’ संघ अंतिम विजेता ठरल्यामुळे त्यांना ‘ड’ गटातून बढती मिळून पुढील स्पर्धेसाठी ते ‘क’ गटात सामील झाले आहेत. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, संघाचे मार्गदर्शक मुंबईचे मयंक पारेख, अरविंद देशपांडे यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षक अनंत तांबेकर, मेंटोर व वरिष्ठ खेळाडू समद फल्ला यांचे अभिनंदन केले.

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक चे उत्साहात उद्घाटन

प्रतापनगर येथे आय केअर व चष्म्यांचे दालन रुग्णांच्या सेवत

जळगाव, दि. 19 – नेत्ररुग्णांच्या खास सोयीसाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत कांताई नेत्रालयाचे ‘ॲडव्हान्स्ड आय केअर’, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक, सुसज्ज अद्ययावत सेंटर तसेच चष्म्यांचे अत्यंत आधुनिक आणि भव्य दालनाचे शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. सुभाष चौधरी यांच्या ‘श्री क्लिनिक’ येथे शहरातील सर्व समाजातील प्रतिनिधी म्हणून 26 मान्यवरांच्या शुभहस्ते आज उद्घाटन उत्साहात झाले.
आरंभी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रास्तविक केले. यात सौ. कांताई यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने श्रध्देय भवरलालजी जैन यांनी सात वर्षापूर्वी कांताई नेत्रालय स्थापन केले. सर्व समाजातील सर्व घटकापर्यंत नेत्र चिकित्सा उपलब्ध व्हावी या हेतुने कांताई नेत्रालयाचे ॲडव्हान्स्ड आय केअर सेंटर काम करेल असा विश्वास व्यक्त करत या सेंटरचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पध्दतीने व्हावी ही संकल्पना उपस्थितीतांना सांगितली.
आज कांताई नेत्रालयाच्या ॲडव्हान्स्ड आय केअर सेंटरचे महापौर जयश्री महाजन, कांताई नेत्रालयाच्या संचालिका डाॕ. भावना जैन, संघपती दलिचंदजी जैन, डॉ. दिलीप पटवर्धन, ईश्वरलाल जैन, डाॕ. सुभाष चौधरी,अशोक जैन, सौ. रत्नाभाभी जैन, राजेंद्र मयूर, डाॕ. जी. एन. पाटील, डॉ. के. बी. पाटील, रजनीकांत कोठारी, खजानसिंग छाबडा, रविंद्र जाधव, हरिष मिलवाणी, भरत अमळकर,नंदुदादा बेंडाळे, गिमी फरहाद, डाॕ. सुनिल नाहटा, डाॕ. राहुल महाजन, डाॕ. शेखर रायसोनी, डाॕ. विश्वेश अग्रवाल, ॲड. अकिल ईस्माईल, डाॕ. के. के. अमरेलीवाला, नितीन लढ्ढा, राजेंद्र नन्नवरे यांच्याहस्ते आगळ्यावेगळ्या पध्दतीने उद्घघाटन झाले. याप्रसंगी अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. आ. सुरेश भोळे, शिरीष बर्वे, अनिश शहा यांच्यासह शहरातील मान्यवरांची उपस्थितीती होती.

नेत्ररुग्णांचा उपचार होईल असे मल्टीस्पेशॅलीटी आय हॉस्पीटल शहरात उभारले गेले असून कांताई नेत्रालयाची आशादायी वाटचाल सात वर्षात कांताई नेत्रालयाने नेत्रदीपक कार्य केले. आरोग्य क्षेत्रात मोठा लौकिक प्राप्त करून एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. २२ हजारहून अधिक शस्त्रक्रिया आणि सव्वा दोन लाखाच्यावर नेत्र तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. शिबिराच्या माध्यमातून जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील गरजू नेत्र रुग्णांपर्यंत कांताई नेत्रालय पोहोचले आहे. नेत्ररुग्णांसाठी सोईचे व्हावे या हेतुने शहरात “कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर” या नवीन शाखेचा आरंभ झाला.

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअरची वैशिष्ट्ये

मोतिबिंदू विभाग – (अत्याधुनिक सेंच्युरीअन गोल्ड मशिनद्वारे अतिसूक्ष्म छेद घेऊन २० मिनिटांहून कमी वेळात मोतिबिंदू पासुन मुक्तता), रेटिना विभाग – (ईंट्राव्हिट्रीयल ईंजेक्शन्स् लेझर्स व शस्त्रक्रिया), कॉर्निया विभाग – डोळ्यातील बबुळासबंधी उपचार व शस्त्रक्रिया, लहान मुलांमधील दृष्टीदोष निवारण विभाग – (तिरळेपणा, जन्मजात मोतिबिंदू, आळशी डोळा व इतर नेत्रदोष उपचार व शस्त्रक्रिया), मायोपिआ क्लिनीक, कॉन्टॅक्ट लेन्स् क्लिनीक, प्रशिक्षीत व अनुभवी ऑप्टोमेट्रीस्टस्, समुपदेशन विभाग, प्रत्येकाची कार्यपद्धत, गरज व वापर लक्षात घेऊन कस्टमाईज्ड चष्मा बनविण्याची सुविधा, सर्व प्रकारच्या औषधी उपलब्ध, डिजीटल मेडीकल रेकॉर्ड सिस्टीम, ऑनलाईन अपॉईन्टमेंटची सुविधा, कॅशलेस मेडिक्लेम असे खास वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअरचे आज उद्घाटन

प्रतापनगर येथे आय केअर व चष्म्यांचे दालन रुग्णांच्या सेवत

जळगाव, दि. १८ – नेत्ररुग्णांच्या खास सोयीसाठी बी ॲण्ड के संचलीत कांताई नेत्रालयाचे ‘ॲडव्हान्स आय केअर’, सुसज्ज अद्ययावत सेंटर तसेच चष्म्यांचे अत्यंत आधुनिक आणि भव्य दालनाचे शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. सुभाष चौधरी यांच्या ‘श्री क्लिनिक’ येथे गुरुवार १९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी 5.30 वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन होत आहे.

जळगाव शहरातील जुन्या हायवेवर जैन उद्योग समुहाच्या औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ जुन्या जैन फॅक्टरी या वास्तूपासून झाली आहे. त्या पावन जागेमध्ये सेवाप्रकल्प २०१६ ला कार्यान्वीत झाला. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन व त्यांच्या दिवंगत पत्नी सौ. कांताबाई जैन यांनी सेवेचा वसा व सामाजिक बांधिलकी मानून आयुष्यभर सामाजिक कार्य केले. याच उत्तरदायित्वातून कांताबाई यांनी नेत्रदानाचा संकल्प केलेला होता. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले व त्यांच्या डोळ्यांमुळे आज दोहोंना दिव्यदृष्टी लाभली, ते हे जग त्यांच्या नेत्रदानामुळे पाहू शकत आहेत. त्यांच्या या तळमळीला लक्षात घेऊन एकच छताखाली नेत्ररुग्णांचा इलाज होईल असे मल्टीस्पेशॅलीटी आय हॉस्पीटल शहरात उभारले गेले. या सात वर्षात कांताई नेत्रालयाने नेत्रदीपक कार्य केले.

कांताई नेत्रालयाने अवघ्या सात वर्षात आरोग्य क्षेत्रात मोठा लौकिक प्राप्त करून एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. २२ हजारहून अधिक शस्त्रक्रिया आणि सव्वा दोन लाखाच्यावर नेत्र तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. शिबिराच्या माध्यमातून जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील गरजू नेत्र रुग्णांपर्यंत कांताई नेत्रालय पोहोचले आहे.

कांताई नेत्रालयात डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या तपासण्या आणि उपचार, त्यावरील शस्त्रक्रिया अत्याधुनिक यंत्रणेसह गुणवत्तापूर्ण सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुंतागुंतीच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या महानगरांमध्ये न जाता कांताई नेत्रालयात यशस्वी उपचारासह होत आहेत. अतिशय क्लिष्ट रेटिना शस्त्रक्रियेची सुविधा येथे उपलब्ध आहे. कांताई नेत्रालयात सर्वप्रकारच्या नेत्रसेवा दिली जात असतानाच गोरगरिबांना सवलतीच्या दरात देखील शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जातात. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना अतुल जैन (एमबीबीएस, एम.एस., एफआरव्हीएस) या स्वत: रेटिना सर्जन आहेत. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. भावना जैन यांच्यासह डॉ. अमोल कडू (फेको व ग्लोकोमा सर्जन), डॉ. नितीन भगत (फेको व कार्निया सर्जन), डॉ. अंशु ओसवाल (कॅटरॅक्ट सर्जन, मायोपिया स्पेशालिस्ट), डॉ. इवानजिलीन राव (कॅटरॅक्ट सर्जन व जनरल ऑफथॅलमोलोजिस्ट) आणि डॉ. योगेग जायभये (कॅटरॅक्ट सर्जन व जनरल ऑफथॅलमोलोजिस्ट) असे तज्ज्ञ डॉक्टर्स कार्यरत आहेत. नेत्ररुग्णांसाठी सोईचे व्हावे या हेतुने शहरात “कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअर” या नवीन शाखेचा आरंभ होत आहे.

कांताई नेत्रालयाचे वैशिष्ट्ये

मोतिबिंदू विभाग – (अत्याधुनिक सेंच्युरीअन गोल्ड मशिनद्वारे अतिसूक्ष्म छेद घेऊन २० मिनिटांहून कमी वेळात मोतिबिंदू पासुन मुक्तता), रेटिना विभाग – (ईंट्राव्हिट्रीयल ईंजेक्शन्स् लेझर्स व शस्त्रक्रिया), कॉर्निया विभाग – डोळ्यातील बबुळासबंधी उपचार व शस्त्रक्रिया, लहान मुलांमधील दृष्टीदोष निवारण विभाग – (तिरळेपणा, जन्मजात मोतिबिंदू, आळशी डोळा व इतर नेत्रदोष उपचार व शस्त्रक्रिया), मायोपिआ क्लिनीक, कॉन्टॅक्ट लेन्स् क्लिनीक, प्रशिक्षीत व अनुभवी ऑप्टोमेट्रीस्टस्, समुपदेशन विभाग, प्रत्येकाची कार्यपद्धत, गरज व वापर लक्षात घेऊन कस्टमाईज्ड चष्मा बनविण्याची सुविधा, सर्व प्रकारच्या औषधी उपलब्ध, डिजीटल मेडीकल रेकॉर्ड सिस्टीम, ऑनलाईन अपॉईन्टमेंटची सुविधा, कॅशलेस मेडिक्लेम असे खास वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ गटासाठी निवड चाचणी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतर जिल्हा आमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून करण्यात आले आहे.
इच्छुक खेळाडूंनी आपले ऑनलाईन फॉर्म या https://forms.gle/QBq8yCNx6tt8vCnZ9 संकेतस्थळावर भरून द्यावे व आधार कार्डची झेरॉक्स व ओरिजनल कॉपी घेऊन निवड चाचणी साठी अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेचा मैदानावर शिरसोली रोड जळगाव येथे क्रिकेटच्या पांढरा गणवेश, बूट, व आपल्या क्रिकेट किट व १०० रुपये निवड चाचणी फी सह उपस्थित रहावे असे जळगांव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी असोसिशनचे सचिव श्री अरविंद देशपांडे ( मो.९४०४९५५२०५ )श्री अविनाश लाठी (मो.९८२२६ १६५०३) यांचेशी संपर्क साधावा

जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

जळगाव दि १५ – अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर १२ वर्षे खालील मुलांच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा दि. १२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी ठरला आहे.


या स्पर्धेत शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूर, नाशिक क्रिकेट ॲकॅडमी नाशिक, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा ऑरेंज जळगाव, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा ब्ल्यू जळगाव या चार संघांनी सहभाग घेतला होता. सर्व सामने लीग पद्धतीने खेळविण्यात आले. त्यात नाशिक क्रिकेट ॲकॅडमी सर्व सामने जिंकून आणि जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी ब्ल्यू दोन सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामना जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी ब्ल्यू संघ विरुद्ध नाशिक क्रिकेट ॲकॅडमी नाशिक यांच्या दरम्यान झाला. जैन स्पोर्ट्स ब्ल्यू संघाने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करत ३० षटकात ८ गडी बाद १०८ धावा केल्या. त्यात मानस पाटील ४२, दक्ष आठवले १९ व अहमद खान नाबाद १० धावा यांचे योगदान होते. गोलंदाजीत नाशिक क्रिकेट ॲकॅडमीतर्फे राजवीर बोथरा व मंथन पिंगळे प्रत्येकी ३ गडी बाद केले. १०९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या नाशिक क्रिकेट ॲकॅडमी संघ २१.४ षटकात सर्व गडी बाद ९५ धावा करू शकला. त्यात रियांश मुंदडा १९ आर्यन गवळी नाबाद १४ व आर्य पारख १२ धावा करू शकले. गोलंदाजीत जैन स्पोर्ट्स संघातर्फे रोनक मिश्रा व अमेय चौधरी प्रत्येकी २ गडी बाद केले तर चार फलंदाज धावबाद झाले आणि हा सामना जैन स्पोर्ट्स ब्लू संघाने १३ धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मानस पाटील व अमय चौधरी या दोघांना देण्यात आला. मालिकावीर म्हणून नाशिक क्रिकेट ॲकॅडमी आर्यन घोळके, उत्कृष्ट फलंदाज म्हणून जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा मानस पाटील, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा अमेय चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. बक्षीस समारंभ अंतिम सामन्यानंतर लगेच घेण्यात आला. याला जैन इरिगशनच्या कृषितिर्थ मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांच्या मुख्य उपस्थितीती होती. या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, नाशिक संघाचे प्रशिक्षक श्रीरंग कापसे, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे प्रशिक्षक मुस्ताक अली व तन्वीर अहमद, फजल मोहंमद व पालकवर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version