गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ

जळगाव, दि. 21  –  नव्या पिढीत अहिंसा, सहअस्तित्व, संरक्षण और सर्व जीवांच्याप्रती आत्मियतेची भावना वृद्धींगत व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे दर वर्षी गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबीर घेतले जाते. ह्या शिबिराचे औपचारिक उद्घाटन 21 रोजी झाले.  यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन आयंगार, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, रिसर्च डीन गीता धरमपाल, डॉ आश्वीन झाला यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले. भारतातील 56 व नेपाळ येथील 4 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यात विविध प्रकारचे सत्र होणार आहेत. या शिबिराचा समारोप 1 जानेवारी 2023 ला होणार आहे.

सध्याच्या परिस्थिती संदर्भात गांधीजींच्या विचारांच्या प्रासंगिकतेच्या आधारे नेतृत्व तयार करणे या प्रमुख उद्देशाने या शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नव्या पिढीतील युवकांना शांतता दूत बनवणे, व्यक्तिमत्व घडवून त्याच्या ज्ञान व परिश्रमाने समाज घडवणे, चारित्र्य घडवून राष्ट्र निर्माण करणे,  पर्यावरण आणि विकासावर आधारित नेतृत्वाची निर्मिती करणे याच बरोबर तरुणांना अहिंसक जीवनशैलीवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणे, सार्वजनिक प्रशासन आणि सार्वजनिक धोरणावर आधारित नेतृत्वाची निर्मिती, संघटनेची भावना निर्माण करणे, तरुणांचा प्रभावी सहभाग आणि शासन प्रक्रियेत त्यांचे नेतृत्व निर्माण करणे इत्यादि या शिबिराचे प्रमुख उद्दिष्टे आहेत.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलननाने शिबिराचे औपचारिक उद्घाटन झाले. डॉ. सुदर्शन आयंगार, डीन गीता धरमपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सौ. अंबिका जैन, डॉ. झाला, गिरीश कुळकर्णी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिती शहा यांनी केले.

या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना क्षेत्र भेट, प्रशिक्षण / कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य भूमिका, गट असाइनमेंट, ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव, प्रवास, संप्रेषण, समुदाय संवाद, व्याख्यान, माध्यमांचे विविध प्रकार प्रशिक्षणासाठी उपयोगात आणले जातात. या गांधीयन लिडरशीप शिबिरात सहभागी झालेल्यांसाठी एक वेगळाच अनुभव असतो. नेतृत्व क्षमता वाढीसाठी युवा शिबिरामध्ये विशेषत: एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी संघ, राज्यशास्त्राचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि क्षेत्रीय स्तरावर युवा शाखा हाताळणारे कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांचा प्रामुख्याने सहभाग असतो.

गांधी रिसर्च फाउंडेशन ही जळगाव, महाराष्ट्र येथे स्थित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था नवीन पिढीला अहिंसा, सहअस्तित्व इत्यादिंची शिकवण देते.  गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे स्थानिक आणि जागतिक स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. उदाहरणार्थ, विविध अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, क्षेत्रात मोठे काम केले आहे. ग्रामविकास, ग्रामीण रोजगार, प्रशिक्षण यासारखे अनेक लोकाभिमुख कार्य गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे केले जाते. ‘खोज गांधीजीकी’ जगातील सर्वात मोठ्या व पहिल्या क्रमांकाचे ऑडियो गाइडेड व मल्टीमीडिया संग्रहालय म्हणून लौकीक मिळविलेला आहे. त्या  माध्यमातून गांधीजींच्या जीवन कार्याचा अभिनव रितीने या संग्रहालयास भेट देणाऱ्यांना परिचय होत असतो. वर्षातून देश- विदेशातील हजारो व्यक्ती खोज गांधीजीकी या संग्रहालयास भेट देतात. युवकांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातील एक भाग असलेल्या या राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिराकडे पाहिले जाते.

विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकॅडमीचा यश धोंगडे प्रथम

जळगाव (दि.19) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत मुलांच्या १४ वर्षे वयोगटात जैन स्पोर्ट्स अॅकॅडमीमधील कॅरमपटू यश योगेश धोंगडे याने प्रथम, तर महमंद हमजा द्वितीय व पाचवे स्थान प्राप्त करीत विभागीय कॅरम स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.

 

१४ वर्षे वयोगटातील विभागीय कॅरम स्पर्धा धुळे क्रीडा संकुल येथे १६ डिसेंबर ला झाल्यात. या स्पर्धेत १४ वर्षे जैन स्पोर्ट्स अॅकॅड‌मी व आर. आर. विद्यालयाचा विद्यार्थी यश योगेश धोंगडे याने धुळे येथील अबुजर अन्सारी या अंतिम फेरीत 25-0 असा सरळ पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. अबुजर अन्सारीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यश धोंगडे याने आपल्या खेळ कौशल्याच्या जोरावर स्पर्धेत शेवटपर्यंत आपली पकड कायम ठेवली. त्याने उपान्त फेरीत जैन स्पोर्ट्स अॅकॅडमी व जि. एच. रायसोनीच्या कार्तिक हिरे याचा देखील २५-४ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सदर १४ वर्षे वयोगात जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार विभागातील ४८ कॅरमपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात जळगाव येथीन जैन स्पोर्टस अॅकॅडमीतील योगेश घोंगडे, कार्तिक हिरे तृत्तीय तर महमंद हमजा पाचवे स्थान प्राप्त करून प्रथमच प्रथम, विभागीय स्पर्धेत जळगावचे नाव रोशन केले. वरील सर्व यशस्वी जळगाव येथील कॅरमपटूंना घडविण्याचे व यशस्वतिपर्यंत पोहचविण्याचे कार्य ॲकॅडमीतील प्रशिक्षक योगेश धोंगडे व सय्यद मोहसनी यांनी लिलया पेलले. विजयी खेळांडूपैकी यश योगश धोंगडे याला धुळे कॅरम संघटनेतर्फे ट्रॉफी देऊन विशेष कौतुक व गौरविण्यात आले. जैन स्पोर्ट्स अॅकॅडमीतीक विभागीय स्पर्धेत स्थान प्राप्त करणाऱ्या यश, कार्तिक, हमजा या खेळाडूंचे अभिनंदन जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे अतुल जैन, अरविंद देशपांडे यांनी केले व राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्यात.

अनुभूती स्कूल ‘इंडियाज् टॉप 10 बोर्डिंग स्कूल’ श्रेणीत’ एज्युकेश टुडेच्या सर्वेक्षणात भारतात आठवी तर महाराष्ट्रात प्रथम

जळगाव दि.12– शैक्षणिक क्षेत्रातील भारतामधली नावाजलेली संस्था ‘एज्युकेशन टुडे’ यांनी ‘भारतातील टॉप 10 बोर्डिंग स्कूल’ सर्वेक्षणात अनुभूती स्कूलला भारतातील 8 आणि महाराष्ट्रील पहिल्या क्रमांकाची स्कूल असल्याची श्रेणी मिळाली. हॉटेल ताज बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या समारंभात स्कूलचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविले गेले. या आधी काही दिवसांपूर्वी अनुभूती स्कूलचा ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड्स 2022-23’ ने महाराष्ट्रात प्रथम सन्मान झालेला आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारलेली अनुभूती स्कूल इयत्ता 5 वी ते 12 पर्यंत पूर्ण निवासी आहे. अनुभूती मध्ये औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रुजविणे जातात. ‘इथे शिकणारा विद्यार्थी नोकरी मागणाऱ्यापेक्षा तो नोकरी देणारा ठरावा’ या विचारांनी या शाळेची वाटचाल सुरू आहे. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनुभूती स्कूल कडे पाहिले जाते. शाळेच्या व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे परिपूर्ण लक्ष असते.

76,738 शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण, प्रत्यक्ष परिस्थिती आणि नामांकन या तीन पद्धतीने सर्व स्कूलची श्रेणी तपासून पाहिली गेली. या सर्वेक्षणात प्रामुख्याने शैक्षणिक प्रतिष्ठान, शिक्षकांचे शिक्षण, अनुभव, गुणवत्ता, डिजिटल लर्निंग, क्रीडा शिक्षण, पालकांचा सहभाग, फ्युचर प्रुफ लर्निंग, शाळेची सेवा साधने, पैशाचे मूल्य, कम्युनिटी सर्व्हिस, विद्यार्थ्याचे मनोवैज्ञानिक कल्याण, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तीक लक्ष तसेच स्कूलची वेगळी काही वैशिष्ट्ये इत्यादी निकष लावलेली होती. या सर्वात अनुभूती स्कूल अव्वल ठरलेली आहे.

‘संस्कार आणि संवेदनशील मन निर्माण करणे हे आपल्या शिक्षणाचे उद्दिष्ट असावे’ असे मानणारे श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित, शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक संवेदना जपणाऱ्या अनुभूती स्कूलने भारतातील निवासी शाळा क्रमवारीत भारतातील आठवी आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे ही मोठी गौरवाची गोष्ट आहे. फक्त भौतिक गोष्टी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट ठेवलेल्या आमच्या स्कूलने निस्पृहपणे शैक्षणिक यज्ञ चालविलेला आहे. श्रद्धेय भाऊंच्या मार्गदर्शनानुसार स्कूलची प्रगतीकडे वाटचाल सुरूच असेल’.

– श्री. अतुल जैन, चेअरमन, अनुभूती स्कूल

  ‘शिक्षणामुळे आपल्या पिढीबरोबरच येणाऱ्या अऩेक पिढ्यानपिढ्या सुसंस्कृत होतील.’ असे या स्कूलचे संस्थापक श्रद्धेय मोठे भाऊंचे विचार होते. आज विविध क्षेत्रात नाव उज्ज्वल करत आहेत ह्या पेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही. जळगाव येथील स्कूल महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविते, स्कूलला मिळालेला सन्मान हा जळगावसह महाराष्ट्रासाठी मोठा अभिमानास्पद आहे. शाळेच्या नावलौकीत या सन्मानामुळे भर पडलेली आहे. हा लौकिक टिकविण्यासाठी स्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर सहकाऱ्यांसह विद्यार्थी व पालकांचे विशेष सौजन्य आहे हे मात्र तितकेच खऱे आहे.’

– सौ, निशा जैन, संचालक, अनुभूती स्कूल

चित्रवेणूच्या आविष्कारासह शास्त्रीय-उपशास्त्रीय संगिताची अनुभूती

जळगाव दि.७ चित्रवेणू वादकाची स्वत:ला चिकारीसारखी तारेची साथ देण्याची क्षमता तसेच मधुर, सुर आणि पाश्चात् संगीताची अनुभूतीसह बासरी, सिताराच्या शतताराचा संगम असलेल्या चित्रवेणूतुन मिश्र भैरवी रागातील धून पं.उदय शंकर यांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय-उपशास्त्रीय संगितामध्ये कट्यार काळजात घुसली मधील किरवानी रागातील दिल की तपिष, रानी तेरो चिरजीयो,नामगाऊ नामध्याऊ ह्या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली.

बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात लंडन येथील डाॕ. लिना परदेशी, कॕनडा येथील मोहन कोरान्ने, समाजकल्याण विभागाचे आयुक्त योगेश पाटील, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसीडेंट पर्सोनल श्री. चंद्रकांत नाईक, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. भरत अमळकर, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांच्या उपस्थितीत दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला.


स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत.
द्वितीय दिनाची सुरुवात चित्रवेणू या नवीन वाद्यावर पं. उदय शंकर यांनी सुरवातीला राग यमन मध्ये जोड, झाला अतिशय उत्तम रित्या सादर केला. हा राग मध्य लय रूपक या तालात निबद्ध होता व बंदिश द्रुत तीनतालात सादर केली. यानंतर मिश्र भैरवी रागातील धून वाजविली. पं. उदय शंकर यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर केले. पंडितजींशी प्रश्नोत्तराचे एक उत्तम सेशन झाले. यामध्ये मुलाखतीच्या रूपाने सुसंवादिनी दीप्ती भागवत यांनी बोलतं केलं. यात चित्रवेणू वाद्याविषयी सांगितले. बासरीच्या ध्वनी किंवा आवाजावर आणि वार्याच्या (Wind Instrument) यापुर्वी कधीही न वाजविले गेलेले भारतीय अभिजात संगीत वाजविण्याची क्षमता असलेले चित्रवेणू वाद्याची अनुभूती जळगावकरांना विश्लेषणासह घेतली.

कट्यार काळजात घुसलीने जिंकली मने
द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने झाले. राग जोग. मध्यलय झपताल मध्ये बडा ख्याल : “रट नाम श्री गुरु का” द्रुत तीनताल: “तुम बिन कैसे कटे.” त्यानंतर अंकिता यांनी दादरा सादर केला बोल होते – “बलामा ओ मोरे सैया”, त्यानंतर राग- मारू बिहाग सादर करून आपल्या प्रतिभेची चुणूक रसिकांना दाखविली. सुप्रसिद्ध चित्रपट कट्यार काळजात घुसली मधील किरवानी रागातील दिल की तपिष. ह्या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर सादर झाले. हवेली संगीत – रानी तेरो चिरजीयो गोपाल, मराठी अभंग- नामगाऊ नामध्याऊ सादर करून आपल्या मैफिलीची सांगता केली. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे, धनंजय कंधार, मानसी महाजन यांनी दिली.


बालगंधर्व महोत्सवाचा आज समारोप
तृतीय दिनाचे प्रथम सत्र सहगायनाने संपन्न होईल. शास्त्रीय व उप-शास्त्रीय सहगायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील मुंबई चे गायक व गुरु पं. डॉ. राम देशपांडे, व त्यांचा मुलगा गंधार देशपांडे. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील. बालगंधर्व महोत्सवाचा समारोप थ्री जनरेशन कॉन्सर्ट अर्थात तीन पिढ्यांच्या मैफलीने होणार असून ही मैफल सजवणार आहेत पद्मभूषण व ग्रॅमी ऍवार्ड विजेते पं. विश्वमोहन भट (मोहन वीणा) पं. सलील भट (सात्विक वीणा) व अथर्व भट (गिटार) यांच्या सहवादनाने एकविसावा महोत्सव संपन्न होईल.
कार्यक्रमाच्या सुरवातीला गतवर्षी निधन झालेल्या कलावंतांना चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मयूर पाटील यांनी गुरूवंदना म्हटली.

अभिजात संगीताचा बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात कथक नृत्याच्या जुगलबंदीसह फ्युजन बँडव्दारे स्वरांची झाली रूजवात

जळगाव दि.६ – कथक नृत्यातील बनारस घराण्याची परंपरेची सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची जुगलबंदीची जळगावकर रसिकांना अनुभूती दिली. तसेच अभिजात संगीताचा आणि पाश्चात्त्य संगीताचा संगम असलेल्या फ्युजन बँड ने स्वरांची रूजवात करीत रसिकांकडून कलावंतांनी दाद मिळवली.

भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे ची सुरवात झाली.
छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात होणाऱ्या दीपप्रज्वलनाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे विश्वस्त डाॕ. सुभाष चौधरी, जाई काजळचे राजेश गाडगीळ, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, दिपक चांदोरकर, दीपीका चांदोरकर, वेगा केमिकल्स चे भालचंद्र पाटील, अनदान देशमुख, आरजे टिया, अतुल्य भारतच्या सहाय्यक संचालक स्नेहल पाटील उपस्थित होते. उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत.
अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवाच्या एकवीस आवर्तने स्वराभिषेकाची! यातील प्रथम सत्रात कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड चे सादरीकरण केले. मॅसिव अटॅक कलेक्टिव्ह या बँड ने सुरवातीला ताल तिनताल मध्ये तबला, ड्रम आणि पर्कशनवरती राग किरवाणीमध्ये सादरीकरण केले. त्यानंतर राग कौशी कानडा मधील एक तराणा ताल एकताल मध्ये गायन, सारंगी आणि की बोर्ड यांच्या बरोबरीने सादर झाला. तराणा नंतर पं. जसराज जी यांनी गाऊन प्रसिद्ध केलेला हवेली संगीत हा गायनाचा प्रकार या बँड मध्ये वेगळ्या प्रकारे सादर झाला. यानंतर राग हंसध्वनी मध्ये एक गाणं सर्वांनी मिळून प्रस्तुत केले. आणि मृगनयनी या पं जसराज जी यांनी गायलेल्या रचनेने या कार्यक्रमाचा शेवट झाला.
दमदार कथक नृत्याची मेजवानी
बालगंधर्व संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध सारंगी वादक पं भवानी प्रसाद मिश्रा ह्यांचे नातू व सुप्रसिद्ध सतार वादक पं अमरनाथ मिश्रा ह्यांचे पुत्र सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची प्रस्तुती केली. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान यांनी केली. कथक नृत्यातील बनारस घराण्याच्यी वैशिष्ट्ये त्यांनी नृत्यातून ठळकपणे दाखवत रसिकांची दाद मिळवली. “INDIA’S BEST JUDWAAH” हा उपाधी मिळवणाऱ्या सौरव गौरव ह्यांनी त्यांच्या सादरीकरणाची सुरवात राग अहिर भैरव आणि ताल रुपक मधे बांधलेली “डमरु पानी,शूल पानी,हे नटराजन नमो नमः ” ह्या दमदार शिवस्तुती ने केली.त्यानंतर ताल त्रितालात गुरु पं रविशंकर मिश्रा ह्यांच्याकडून शिकलेल्या बनारस घराण्याच्या प्राचीन बंदीशी,तोडे तुकडे,परन,तसेच काका (मौसाजी ) पं बिरजू महाराजांकडून शिकलेल्या बंदीशी प्रस्तुत केल्या. ताल त्रिताला नंतर राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाची प्रचिती देणारी बंदीश “क्रृष्णप्रिया” वर केलेल्या भावप्रदर्शनाने प्रेक्षकांना मोहित केले.. ह्या दमदार कथक नृत्याची सांगता सौरव गौरव ह्यांनी “आनंद तांडव ” ह्या नृत्याने करुन रसिकांची वाहवा मिळवली…

गुरूवंदना चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले.

आज अनुभवा शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनासह चित्रवेणू

द्वितीय दिनाची सुरुवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल कि ज्यांनी चित्रवेणू या नविन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ संपन्न होणार

जळगाव दि.5-भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ, व संस्कृती मंत्रालय, भारत सरकार हे असून भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात यावर्षीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.


महोत्सवाची सुरुवात दि. ६ जानेवारी रोजी उद्गाटन समारंभानंतर प्रथम सत्रात तरुण, उदयोन्मुख आणि आश्वासक असे कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड ने होणार आहे. द्वितीय सत्र तरूण व आश्वासक व बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे सौरव व गौरव मिश्रा यांच्या कथक जुगलबंदिने संपन्न होणार आहे. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान करतील.
द्वितीय दिनाची सुरुवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल कि ज्यांनी चित्रवेणू या नविन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.
तृतीय दिनाचे प्रथम सत्र सहगायनाने संपन्न होणार आहे. शास्त्रीय व उप-शास्त्रीय सहगायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील मुंबई चे गायक व गुरु पं. डॉ. राम देशपांडे, व त्यांचा मुलगा गंधार देशपांडे. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.
बालगंधर्व महोत्सवाचा समारोप थ्री जनरेशन कॉन्सर्ट अर्थात तीन पिढ्यांच्या मैफलीने होणार असून ही मैफल सजवणार आहेत पद्मभूषण व ग्रॅमी ऍवार्ड विजेते पं. विश्वमोहन भट (मोहन वीणा) पं. सलील भट (सात्विक वीणा) व अथर्व भट (गिटार) यांच्या सहवादनाने एकविसावा महोत्सव संपन्न होणार आहे.

https://tradingbuzz.in/wp-content/uploads/2023/01/VID-20230105-WA0010.mp4

तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून या महोत्सवाच्या तीनही दिवसांचे सुत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी दिप्ती भागवत करणार आहेत. तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, तसेच विविध प्रायोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्षा सौ दीपिका चांदोरकर, विश्वस्त अशोकभाऊ जैन, रमेशदादा जैन, दत्ता सोमण, प्रा. शरदचंद्र छापेकर, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे व डॉ. अपर्णा भट यांनी केले आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ नागपूरला महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 साठी रवाना

जळगाव दि. 1 – जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ महाराष्ट्र ओलंपिक गेम्ससाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 च्या स्पर्धा दि. 2 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान नागपूर येथील मानकापूर स्टेडियममध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी हा संघ आपली छाप सोडण्यासाठी रवाना झाला आहे.

महाराष्ट्रातून पुरुषांचे आठ संघ पात्र झालेले आहेत. यामध्ये जळगाव, नागपूर, ठाणे, पुणे, ग्रेटर मुंबई, नाशिक, सांगली, पालघर या संघांचा समावेश आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चा संघसुद्धा यामध्ये पात्र ठरलेलाआहे. जळगावचा पुरुष संघ महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022 – 23 मध्ये सहभागी होणे ही जळगावच्या संघासाठी ऐतिहासिक आणि गौरवाची बाब आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या संघात शुभम पाटील, प्रणव पाटील, दीपेश पाटील, गोपाल पाटील, उमेर देशपांडे, ओजस सोनवणे, अथर्व शिंदे, देवेश पाटील, सुफियान शेख, किशोर सिंह सिसोदिया यांची निवड झाली आहे. या खेळाडूंसोबत प्रशिक्षक अमोल पाटील, संघ व्यवस्थापक विनीत जोशी हे नागपूरला होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष तेजेंद्र महिंद्रा, सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य शेखर जाखेटे व जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांनी पुढील स्पर्धेसाठी संघाचे कौतूक केले आहे.

कलेच्या दृष्टीने पिसुर्वो यांची मॉर्डन आर्ट वेगळेपण सिध्द करणारं – अशोक जैन

जळगाव– जगभरातील १६ देशात ज्यांच्या चित्रकलेला मानाचे स्थान त्यांनी श्रध्दापूर्वक मोठेभाऊ तथा भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रांचा आविष्कार केला. कलावंत ज्यावेळी सभोवतालची सृष्टी जेव्हा आपल्या आतल्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा तो कुंचल्यातून सजीव करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रतिभावंतावर जीवनमूल्यांची सखोल जाण असली तर त्या कलाकृती निश्चितच व्यापक भावार्थ घेऊन साकार होतात. भवरलालजी जैन यांच्या ८५ चित्रांकृती मनाला आनंद देणाऱ्या, चांगल्या कृतीचा जागर करणाऱ्या सुंदर मनाचं प्रतीक आहे असे मनोगत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.

https:///storage/emulated/0/Android/media/com.whatsapp/WhatsApp/Media/WhatsApp Video/VID-20221231-WA0000.mp4

जामनेर येथील जगविख्यात चित्रकार जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो) यांनी भवरलालजी जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनानिमित्त मोठेभाऊंच्या जीवनावर आधारित ८५ चित्र चितारलेली आहेत. त्या ‘A tribute to बडे भाऊ’ चित्रप्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे दि.३० डिसेंबर ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत सर्वांना उद्यानाच्या वेळेत पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जगविख्यात चित्रकार जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो), चोपडा ललित कला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन, तरूण भाटे, विकास मल्हारा, विजय जैन, सचिन मुसळे, सुशील चौधरी, सचिन मुसळे, चेतन पाटील, योगेश सुतार, मनोज जंजाळकर, जितेंद्र चौधरी, रूपाली पाटील यांच्यासह कलाप्रेमी उपस्थित होते. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
कान्हदेशातील मातीत वाढून जगाला वेगळी ओळख निर्माण करणारे भवरलालजी जैन हे जामनेर तालुक्यातील वाकोद येथील आणि चित्रकार पिसुर्वो ही जामनेर तालुक्यातीलच. पिसुर्वो यांनी कान्हदेशातील रंग, माती, संस्कृती आणि निसर्गाला आपल्या विशिष्ट चित्रशैलीत जगासमोर आणले. यातून त्यांची जवळपास १६ देशांमध्ये प्रदर्शनी कलाप्रेमींना भुरळ करून गेली. याच भूमिपुत्राने आपल्याच तालुक्यातील ज्येष्ठ विचारवंत तथा उद्योजकाच्या उद्देशून ‘माणूस कितीही व्यस्त किंवा मोठा असला तरी समाजासमोर तो अनेकांतील एक असतो’ तसे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन. यांच्या जीवनावरती ८५ चित्रे चितारलेली आहेत. कलाप्रेमींसाठी सतत प्रोत्साहन देणाऱ्या भवरलालजी जैन यांच्या चित्रांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व कलाप्रेमींसह रसिकांना प्रदर्शनामध्ये अनुभवता येईल.
पिसुर्वो यांनी जीवनातील सात या आकडाचे गणित उलगडे आणी सात पासून सुरू झालेला चित्रप्रवास सांगताना मोठ्याभाऊंची पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. सातपुड्याचा सात रांगा, अंबाई, निंबाई, उमाई, गौराई, मुक्ताई, पावराय, भिवराई या सात बहिणींचे प्रतिकात्मक इन्स्टाॕलेशन मांडले आहे. कान्हदेशाची संस्कृती, निसर्ग येथील मातीतील रंग, सुगंध यातुन एखादी व्यक्ती आपल्या भूमितील कलावंताला प्रोत्साहन देण्यासाठी जी साथ देतो ते अधोरिखेत करणारी कृतज्ञतेचे प्रतिकात्मक दर्शन पिसुर्वो यांच्या प्रदर्शनात दिसते. भवरलालजी जैन यांच्या आदर्श असलेले महात्मा गांधी यांच्यापासून समाजाकडे विश्वस्त या भावनेने पाहण्याची ऊर्जा, केळी,आंबा लागवड यासह तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या जीवनमात घडविलेला बदल, यातुन ग्रामीण भागात निर्माण झालेले रोजगाराचे जाळे यासह पिसुर्वा यांच्या २००६ ते २०२२ पर्यंत चा चित्रप्रवास या प्रदर्शनात पाहता येईल. यासाठी वसंत वानखेडे कलादानास जळगावकरांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यान माला

जळगाव, दि. 27 – ‘महात्मा गांधीजी यांच्या ‘ग्रामस्वराज्य’ या संकल्पनेवर आम्ही काम करत गेलो गावाच्या समस्या गावातच सोडविल्या आहेत. ग्रामसभेत सर्व सहमतीने स्वराज्यच्या दिशेने प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश याप्रमाणे लोकसभा, विधानसभा आणि ग्रामसभा होय यातील ग्रामसभा हीच सुप्रिम पॉवर आहे; यात महात्मा गांधी व विनोबा भावे यांची गामस्वराज्याच्यादृष्टीने सत्ताविकेंद्रीकरण ही संकल्पना दिसते ‘ असे महत्त्वपूर्ण विचार देवाजी तोफा व्यक्त केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ याविषयावर देवाजी तोफा ह्यांनी दुसरे पुष्प गुंफले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, संचालक अशोक जैन यांनी ऑनलाईन उपस्थिती दिली. त्यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. देवाजी तोफा, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचा सुतीहार देऊन सत्कार उदय महाजन, नितीन चोपडा यांनी केला. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधीजींची प्रतिमा, खादीवस्त्र देऊन देवाजी तोफा यांचा सन्मान करण्यात आला. व्याख्याच्या सुरवातीला देवाजी तोफा, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. गांधीतीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास उपस्थित युवक-युवतींनी ‘गाव छोडत नही…जंगल छोडतं नही’ हे आदीवासींचे गाणे म्हटले. सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले. आभार डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी मानले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्याख्यानमालेची भूमिका स्पष्ट केली. त्यात गांधी रिसर्च फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे गांधी विचारानुसार जीवन जगले त्यांनी सुरू केलेली परंपरा गांधी रिसर्च फाऊंडेशन कार्य करीत असल्याचे डॉ. अनिल काकोडकर म्हणाले. संचालक अशोक जैन यांनी महात्मा गांधीजींचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी देवाजी तोफा सारखे कार्य वाढले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा रोचक परिवर्तनाची प्रेरक कहाणी देवाजी तोफा यांनी मांडली त्यात ते म्हणाले की, पृथ्वीवरील मानव मंगळावर पोहोचला परंतु तो दुर्दैवाने माणसापर्यंत पोहोचू शकला नाही. विज्ञानाला दिशा नसते ती दिशा अध्यात्मातून मिळते. अध्यात्म म्हणजे आत्मा व शरीर हे विज्ञान आहे. जल, जंगल, जमीन आणि निसर्गापासून मानवाने शिकायला हवे असे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करत देवाजी तोफा यांनी विषयाची मांडणी केली.
महिला सक्षमीकरणाशिवाय गावाचा विकास होणार नाही यासाठी गावात मातशक्तीला मानले पाहिजे. कुणी दारू पिऊन महिलेला मारहाण करत असेल तर महिलांना जाऊन त्याला समजावीले पाहिजे यातून ति एकटी नाही हा संदेश जातो.
गावाच्या स्वावलंबनासाठी संसाधनांचा वापर, गावाच्या सर्व सहमतीतून विकास प्रक्रियेच्या निर्णयात प्रत्यक्ष सहभाग यासाठी ग्रामसभा महत्त्वाची मानली जाते. विशेष ग्रामसभेत प्रत्येकाने उपस्थित असणे अनिवार्य आहे. जर कुणी गैरहजर राहत असेल तर त्याचे कारण द्यावे लागते. ग्रामसभेत सर्व स्त्री-पुरुषांना आपापले मत मांडण्याचा समान अधिकार आहे. गावाच्या निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा, अभ्यास करण्यासाठी अभ्यास मंडळ अशा दोन स्वतंत्र रचना आहेत. अभ्यास मंडळात फक्त चर्चा करायची, निर्णय घ्यायचा नाही असेही ठरलेले आहे. सरकारची योजना गावात राबविली जात नाही. कायदा कानून बनविले जातात पण त्यांचा फायदा किती मिळतो? ह्यावर अभ्यासपूर्ण अध्ययन, विचार करण्याची गरज असल्याचे मत देवाजी तोफा यांनी व्यक्त केले. ‘दिल्ली, मुंबई हमारी सरकार, हमारे गाव में हम ही सरकार’ असा नारा देण्याची गरज आहे. यातून महात्मा गांधीजींनी दिलेल्या विचारांना आत्मसात करून त्या मार्गावर चालणे म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस होणे होय असेही त्यांनी सांगितले.
ग्रामदान कायदा -1964 हे समजून सांगितले त्यासाठी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाबाबतचे अनुभूव त्यांनी सांगितले. जमीन वाढत नाही तर लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या सर्वांच्या गरजा पाहता अनेक समस्या निर्माण होतात. मात्र जेवढे विरोध प्रश्न निर्माण करून होत नाही तेवढी ती चर्चा करून सहज सोडविता येते यासाठी सकारात्मकता महत्त्वाची आहे. सर्व सहमती कुठेच होणार नाही मात्र एक विचाराने, अभ्यासू पणाने विचार करून सामूहिक व लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधीजींना सांगितलेला अहिंसेचा मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी दिलेल्या संविधानिक स्वातंत्र्यातून मी पणा सोडून आम्ही सर्व या भावनेतून प्रत्येकाने आचरण केले पाहिजे यातूनच गावाचा विकास आणि प्रगती होऊ शकते परिणामी देश बलशाली होऊ शकते असे महत्त्वपूर्ण विधान देवाजी तोफा यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार श्री. देवाजी तोफा

गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा परिवर्तनाचा प्रवास उलगडणार

जळगाव दि.25 – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये मागीलवर्षी डॉ. अभय बंग यांनी प्रथम पुष्प गुंफले होते. यावेळी श्री. देवाजी तोफा हे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ याविषयावर ते संवाद साधतील. अवघ्या 500 लोकवस्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा रौचक इतिहासासह परिवर्तनाची प्रेरक कहाणी काही महत्त्वाच्या आठवणींचे क्षण उलगडणार आहेत.

जैन हिल्समधील गांधी तिर्थ येथील कस्तूरबा सभागृहामध्ये दि. २७ डिसेंबर ला संध्याकाळी ४ वाजेला श्री. देवाजी तोफा व्याख्यानात मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची असेल. वरिष्ठ गांधीयन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यात तत्वनिष्ठता, सज्जनता आणि विवेकशीलता यांचा संगम होता. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी कार्य केले आणि सर्वोदय समाज घडविण्यासाठी दिशा दिली. त्यांच्या सन्मानार्थ 2021 पासून गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. मागील वर्षी डॉ. अभय बंग यांनी मार्गदर्शन केले तर यावर्षी श्री. देवाजी तोफा दुसरे पुष्प गुंफतील. वन अधिकार कानून – २००६ नुसार २००९ मध्ये सामुहिक वन अधिकार पत्र प्राप्त करणारे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा ही ग्रामसभा देशातील पहिली ठरली होती. यावेळी ‘दिल्ली, मुंबई हमारी सरकार, हमारे गाव में हम ही सरकार’ याचा बुलंद आवाज सार्थक करणारे मेंढा-लेखा गावाचे नायक श्री. देवाजी तोफा हे ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ या विषयावर संवाद साधणार आहे. यावेळी मेंढा-लेखा गावात झालेल्या परिवर्तनिय बदलांविषयीची रोचक माहिती न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या स्मृति व्याख्यानाप्रसंगी उपस्थितांना श्री. देवाजी तोफा अवगत करतील. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसभा व ग्रामपंचायत यांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्यांविषयी ते अवगत करतील. कुणीही न चुकवावे असे या व्याख्यानात ग्रामसभेचे महत्त्व त्यातील बाराकावे समजण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, सरपंच, राज्यशास्त्राचे विद्यार्थी यासह आदिवासी भागातील बंधू-भगिनींना अभ्यासपूर्ण माहिती श्री. देवाजी तोफा यांच्या व्याख्यानातून मिळेल. त्यामुळे व्याख्यानाप्रसंगी उपस्थितीत राहण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version