अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात विद्यार्थ्यांच्या 37 प्रकल्पांचे अजित जैन यांच्याहस्ते उद्घाटन

जळगाव दि. 28 -विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहज सुलभ होते. रसायनशास्त्र, भौतीक शास्त्र आणि जीवशास्त्र यांची प्रचिती आपल्या दैनंदिन जीवनात पदोपदी मिळत असते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्वच प्रकल्प स्पृहनिय आहेत असे गौरोद्गार जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी सांगून अनुभूती निवासी स्कूल तशी हरित शाळा म्हणून भारतात प्रसिद्ध आहे या जोडीला लवकरच बॉटनीकल गार्डन विकसीत करण्यात येईल व त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येईल. असे सांगून राष्ट्रीय विद्यान दिनी स्कूलमधील 5 वी ते 8 व्या इयत्तेतील विद्यार्थ्यांनी मांडलेले विज्ञान मॉडेल, प्रोजेक्टचे अवलोकन करून विद्यार्थ्यांकडून ते समजावून घेतले. या राष्ट्रीय विज्ञानाचे औपचारिक उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, शास्त्र, गणिताचे शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

अनुभूती निवासी शाळेतील राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अजित जैन, शेजारी प्राचार्य देबासीस दास, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, विज्ञानाचे शिक्षक वेणू गोपाल सर आणि यु.बी. राव.


अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देत संशोधात्मक वृत्ती यातून जोपासली जाते. मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, भौतिकशास्त्रातील प्राथमिक बाबी समजाव्या जेणे करून विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करतात. यावर्षी 37 निरनिराळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट साकारलेले आहे. त्यातील विशेष उल्लेखनीय असे की, ड्रोन टेक्नॉलॉजी, फ्युचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक्स, बेसिक रोबोटिक्स, स्मार्ट इरिगेशन, ऑटो सेन्सार हॅण्ड सॅनेटायझर, लाय फाय यांचा समावेश आहे. यासोबतच माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित ही सारी प्रोजेक्ट आहेत. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण केले जात आहे. सादरीकरणामधील विशिष्ट विषयांवर प्रश्नोत्तर स्पर्धा घेतली गेली.
आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे महत्त्व आहे व जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी या योगे एक व्यासपीठ मिळालेले आहे.राष्ट्रीय विज्ञान दिन वैज्ञानिक वृत्तीला चालना देख्यासाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे विद्यार्थी, शास्त्र विषयाचे शिक्षक यांचा हिरिरीने सहभाग आहे. असे स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी प्रतिक्रेयेत सांगितले.
विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प बघण्याची आज संधी
विद्यार्थ्यांमधील नवनवीन कल्पनांना संशोधकदृष्टीने चालना मिळावी, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमधील प्रोजेक्ट हे इतर स्कूल मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी पाहता येणार आहे. इयत्ता ४ ते ९ मधील विद्यार्थी व त्यांचे पालकांना हे प्रदर्शन दि. १ मार्च ला दुपारी ३ ते ६ या वेळेत अनुभूती निवासी स्कूल येथे पाहता येणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्या पाल्यांमधील संशोधकवृत्तीला हेरून, वैज्ञानिकदृष्टीने त्याला आधार देण्यासाठी जास्तीतजास्त पालकांनीसुद्धा प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कु. रितू प्रविण मंडोरा सी. एस. परिक्षा उत्तीर्ण


जळगाव दि.२८ जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी प्रविण मंडोरा यांची कन्या कु. रितू मंडोरा हिने कंपनी सेक्रेटरी सी. एस. या अभ्यासक्रमात पदवी उत्तीर्ण केली. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला ती भारतातून १० व्या रॅंकने तर जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यातून पहिल्या रॅंकने उत्तीर्ण झाली होती. उज्ज्वल स्प्राउटरला १० वी पर्यंत त्यानंतर बी. कॉम बाहेती कॉलेज व सध्या एस. एस. मणियार लॉ कॉलेजला एल. एल. बी. च्या द्वितीय वर्षाला रितू मंडोरा शिक्षण घेत आहे. पुढील उच्चशिक्षणासाठी ती पुण्याला जाणार आहे.

प्रयोगशिलतेतून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास – दिलीप जोशी
गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमाला संपन्न


जळगाव दि. 26 कृषी संस्कृती हे भारताचे वैभव असून शेतकरी स्वत: संशोधकवृत्तीने काम करतो. कुठलेही प्रयोग शाळेतील संशोधन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच निसर्गाकडे डोळसपणे पाहून जे शेतातील आहे तेच मातीत टाकले तर जमीन सूपीक ठेवता येईल. यात जमीनीची शेती न करता सूर्य प्रकाशाची शेती करावी, त्यासाठी व्हिजन असलेली दूरदृष्टी हवी हे व्हिजन शेतकऱ्यांमध्ये भवरलाल जैन यांनी निर्माण केले. त्यांच्या जीवनातील प्रयोगशिलता हाच शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाचा मार्ग आपण सर्वांनी स्विकारावा असे आवाहन पर्यावरण कार्यकर्ता व अभ्यासक दिलीप जोशी यांनी केले.


गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘बंजर भूमि और बंजर मन से मुक्त पृथ्वी’ या विषयावर डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार होते. त्यांच्यासोबत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अनिल जैन, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. आरंभी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेरी भावना ही प्रार्थना आणि नमोक्कार मंत्र सादर केले.
प्रास्ताविक अनिल जैन यांनी केले. त्यात ते म्हणाले, ‘जगाला दिशा देण्याचे काम भारत करत आहे. भारतातील शेतकऱ्यांमुळेच संवेदनशिल समाजनिर्मिती होत आहे. शेत, शेतकरी यांच्यात सकारात्मक बदल कसा होईल, याचा ध्यास भवरलालजी जैन यांनी घेतला. ज्ञान विज्ञानातून पुढे आलेले संशोधन थेट सहजसोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल यासाठी अव्याहतपणे त्यांनी कार्य केले. आपल्या मातीशी आत्मीयता ठेवावी हाच संस्कारातून ‘पाणी थेंबाने पिक जोमाने’ हे ब्रिद तंत्रज्ञानाच्या रूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. संशोधन पोहचवित असताना शाश्वत पर्यावरण कसे सांभाळे जाईल याचीही काळजी घेतली. हाच संस्कार घेऊन निसर्गाकडून जे घेतले त्याहीपेक्षा अधिक सुंदर कसे करता येईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.
‘बंजर भूमि और बंजर मन से मुक्त पृथ्वी’ या विषयावर पुढे मार्गदर्शन करताना दिलीप जोशी यांनी निसर्गाकडून जे संसाधन आपल्याला प्राप्त होतात ते कसे चांगले राहतील यासाठी निरीक्षणातून समजून घेतले पाहिजे. रोगमुक्त, परिपुर्ण शेती करण्यासाठी निसर्गाशी एकरूप कसे होता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेती हे विज्ञान आहे हे समजून घेतले पाहिजे. देशातील प्रत्येक शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी आहे. फक्त कुठेलेही जगातील नवीन संशोधन जे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणतील ते शास्त्र, ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे अपेक्षित असून हेच काम भवरलालजी जैन यांनी केले. त्यांनी सृजनशक्तीचा वापर करून बंजर जमीन सुजलाम् सुफलाम् केली आणि आजही पुढची पिढी शेतकऱ्यांसाठी ते काम करीत आहे. शेतीत भविष्य असून यातील उदासिनता दूर करणे हाच भवरलालजी जैन यांचा धर्म राहिला. आपल्या मातीशी एकनिष्ठ राहून, भूमिची सेवा विज्ञान व माहिती तंत्रज्ञानातून, प्रयोगातून त्यांनी केली. पर्यावरण अभ्यासक व कार्यकर्ते तसेच एनआयडी पहिल्या बॅचचे पदवीधारक असलेले दिलीप जोशी यांनी दाभोळकरांच्या प्रयोग परिवाराने केलेले शेतीविषयक संशोधन आणि त्यांनी त्यात केलेले कार्य सादरीकरणातून सांगितले. यानंतर मुक्तसंवादामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसनही दिलीप जोशी यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी मानवता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांमधील स्थिरता महत्त्वाची असून प्रयोगशिलतेतून भवरलाल जैन यांनी हे स्थैर्य शेतकऱ्यांच्या जीवनात आणले. शेती करताना शाश्वत उत्पादन क्षमता कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले. डॉ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. गिरीष कुळकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने व्याख्यानमालेची सांगता झाली.

आदरणीय मोठे भाऊ यांच्या श्रद्धावंदन दिना निमित्त मदन लाठी यांचे ८३ वे रक्तदान

आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ महत्वाचा दिवस म्हणजे श्रद्धेय पदमश्री डॉ भवरलालजी जैन ( अर्थातच आपल्या सर्वांचे मोठे भाऊ ) यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते & पत्रकार मदन रामनाथ लाठी यांनी आपले ८३ वे रक्तदान येथील  + इंडियन रेड क्रॉस सोसायटी  येथे केले .

मदन लाठी यांचा आयुष्याचा रक्तदानाचा प्रवास चोपडा येथे कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यलयात शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्प मध्ये
सत्र!सेन येथे सुरवात झाली . त्यानंतर जसा जसा त्यांचा आयुष्याचा प्रवास होत गेला तिथे तिथे ते रक्तदान करीत गेले त्यात  जास्त  जळगाव येथे, नागपूर, शिर्डी, मागील ४ वर्षांपासून ते सप्टेंबर २०२२ पर्यंत पिंपरी चिंचवड येथील वाय सि एम येथे & नांतर  १४ नोव्हेंबर & आज दिनांक २५ फेब्रुवारी असे करत गेले .
त्यांनी आज पर्यंत ८१ वेळेस साधे रक्तदान & २ वेळेस प्लास्मा ( देऊन ४ रुग्णांना पुणेत  जीवनदान मिळाले आहे )
त्यांचा या कार्य बद्दल त्यांचे  गुरु आदरणीय भाऊ , मोठे बंधू यांनी वेळो वेळी कौतुक केले आहे. २०२२ मध्ये त्यांना महाराष्ट्र माहेश्वरी युवा संघटनने कोरोना योद्धा सन्मान पात्र दिले असून त्या काळात पुणे & जळगाव येथे त्यांचा विविध संघटने तर्फे सत्कार करण्यात आला आहे. २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डा हर्षवर्धन यांनी मदन लाठी चे या करीत असलेल्या कार्य बद्दल कौतुक केले आहे & त्याबरोबर विविध शासकीय अधिकारींनी सुद्धा कौतुक  केले आहे.
“रक्तदान म्हणजे सर्वश्रेठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वछंदी रक्तदानकरून आणि कुणास जीवनदान देवून लाडके देवाचे व्हावे .” हे ब्रीदवाक्य लाठीनी ठरविले आहे.  .  ऑक्टोबर २०२१ मध्ये  आपल्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविंद सिरांचा ७६ वा वाढदिवस & त्याच वेळी मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान म्हणजे तो एक योगायोगच म्हणावा लागेल . त्यानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी त्यांचे अभिनंदन केले होते . त्यानंतर विविध दिवस & एक रक्तदानानंतर ३ महिन्याचा विश्रांती देऊन पुन्हा तीन महिन्याने रेगुलर करीत राहिले त्यात  २ जानेवारी  २०२२ महाराष्ट्र पोलीस स्थापणा दिवस, १ मे महाराष्ट्र कामगार दिवस, १५ऑगस्ट २०२२  आपल्या देशाचा ७५ व आझादीका महोत्सव, १४ नोव्हेंबर २०२२ & आज २५ फेब्रुवारी  २०२३ असे रक्तदान करीत आहे. लाठीचा वयाचा ६५ वर्षांपर्यंत  डॉक्टरांच्या सल्यानुसार ते रक्तदान करीत राहणार आहेत & इतरांना प्रोत्साहित करीत आहे

त्यांच्या आजच्या उपक्रमाबद्दल जैन उद्योग समूहाचे चेअरमन आदरणीय श्री अशोक भाऊ यांनी त्यांचे अभिनंदनद्या उपक्रमाबद्दल कौतुक केले आहे .

मदन लाठी या बरोबर विविध सामाजिक कार्य & पत्रकारिता करीत आहे.

अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन चित्रातून वेगळा आनंद मिळतो : अशोक जैन


जळगाव दि.25 : स्व. पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुण्यतिथी निमित्त चित्रकार व आर्टिस्ट शिवम संजीव हुजुरबाजार याच्या पेंटींग चित्र प्रदर्शनाचे शनिवारी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिवम ने रेखाटलेल्या कलाकृतीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.


25 ते 28 फेब्रुवारी पावेतो वसंत वानखेडे आर्ट गॅलरी, भाऊंचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आर्टिस्ट शिवम हुजुरबाजार यांचे जळगाव, पुणे, मुंबई येथे 9 चित्रप्रदर्शने झाली असून नेहरू आर्ट गॅलरी वरळी, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथेही पेंटींगचे प्रदर्शन झालेले आहे. या अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले. 28 फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन खुले असेल. सर्वांनी चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजीव हुजूरबाजार, जळगाव जनता सहकारी बॅकेच्या संचालिका आरतीताई हुजूरबाजार, कविवर्य ना.धो.महानोर, चित्रकार तरूण भाटे आदी उपस्थित होते. यावेळी शिवमने रेखाटलेल्या कलाकृतींचे अशोक जैन यांनी कौतुक केले. आजचे हे चित्रप्रदर्शन वेगळे आहे.अनेक प्रदर्शनांचे आपण आतापर्यंत उद्घाटन केले मात्र शिवमची ही कलाकृती वेगळी व लक्षवेधी असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रत्येक कलाकृतीतून काहीतरी वेगळे मिळते असे चांगले चित्रकार येथील मातीतून घडले याचा आपणास अभिमान असल्याचेही अशोक जैन म्हणाले. या उपक्रमास नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.सायंकाळी हे चित्रप्रदर्शन पहाण्यासाठी गर्दी झाली होती.

भवरलाल जैन यांना अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’ तुन आदरांजली

जळगाव दि.२५ – औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांचा आज श्रद्धावंदन दिन. त्यानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन विद्यार्थ्यांकडून किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले.
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘स्वरानुभूति’ या पद्मश्री भवरलाल जैन स्मृती संगीत समारोहात ‘भक्ती संगीत संध्या’ संपन्न झाली.


भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे झालेल्या ‘भक्ती संगीत संध्या’ चे कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशन सिस्टीम चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, प्रविण जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
गुरू आणि शिष्य यांच्या नात्यातील भावार्थ समजून सांगणारे ‘ है प्रार्थना..’ याने भक्ती संगित संध्या ची सुरूवात झाली.
समानता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ हे गीत सादर केले.
भवरलाल जैन यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. दुसऱ्यांची पिडा समजून त्यांच्या मदतीला धावून येणे म्हणजे पुरषार्थ असे ते मानत हेच अधोरिखित करणारे ‘वैष्णव जन तो..’ हे सादर करून विद्यार्थ्यांनी अहिंसा, सद्भावचा संदेश दिला. पवित्रता हे मनुष्याचे वैभव आहे हे सांगणारे ‘पवित्र मन रखो’ हे गीत सादर केले. यानंतर ‘श्री महालक्ष्मी स्तूती’ सादर झाली. उत्तरप्रदेशचे लोकगीत ‘बरसन लागी बदरीयाझूम झूम के’ सादर झाले. मनुष्याने अहंकाराचा त्याग करण्याचा संदेश देणारे संत कबिर यांचे ‘मत कर माया मत काया…’ ही रचना सादर करून रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. मिराबाई यांची ईश्वराप्रती निस्सीम भक्ती सांगणारी ‘मन चाह कर राखो जी…’ ही प्रस्तुती सादर केली. गुजराथी संगीत असलेले ‘आकाश गंगा’ सादर केली.तेरा मंगल मेरा मंगलने समारोप झाला. प्रा. शशांक झोपे यांनी प्रेक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक व आभार ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.

भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी अनुभूती निवासी स्कूलतर्फे आज ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन


जळगाव दि.२४ औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी उद्या दि. २५ फेब्रुवारी विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘भक्ती संगीत संध्या’ भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे संध्याकाळी ६ वाजता होईल. यामध्ये विद्यार्थ्यांकडून किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले जाईल. कार्यक्रमावेळी अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन यांची प्रमुख उपस्थिती असेल.
अनुभूती निवासी स्कूल निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारली आहे. याठिकाणी इयत्ता ५ व ते ६ वी मधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी डे बोर्डींग तर इयत्ता ७ वी ते १२ पर्यंत पूर्ण निवासी आहे. ‘इथे शिकणारा विद्यार्थी नोकरी मागणाऱ्यापेक्षा तो नोकरी देणारा ठरावा’ या विचारांनी या शाळेची वाटचाल सुरू आहे. स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनुभूती स्कूल कडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांशी भवरलाल जैन सुसंवाद साधायचे. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे परिपूर्ण लक्ष असायचे हाच संस्कार आजही अनुभूती निवासी स्कूलमध्ये तंतोतंत पाळला जातो. या श्रद्धेपोटी विद्यार्थ्यांनी विशेष भक्ति संगीत संध्या चे आयोजन केले आहे. भक्ती संगीत संध्यामध्ये प्रेम, आपुलकी व सामाजिक बांधिलकीतून संवेदनशील समाज निर्मितीसाठीचे योगदान अधोरेखित केले जाणार आहे. गीतांच्या शब्दांमधील अर्थासह श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्याचे स्मरण केले जाईल. विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट शैलीमध्ये निवेदनही सादर केले जाईल. या भक्ती संगीत संध्येला उपस्थिती राहून नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाला शैक्षणिक व स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवकांचा प्रतिसाद

स्वच्छ, सुंदर, हरित जळगावासाठी सज्जनशक्तीचा दृढ संकल्प


जळगाव दि.२३ –  स्वच्छता दूत, आठवड्यातून किमान एक तास स्वच्छतेसाठी, आपल्या परिसरातील विधायक काम करण्याऱ्या पाच व्यक्तींचे जनजागृतीसाठी एकत्रीकरण, स्वच्छता अभियान राबविणे, परिसरातील नागरिकांचे प्रबोधन, यातून जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी सर्वसमावेशक विचार करण्याचा दृढ संकल्प आज जळगावातील सज्जनशक्तींने केला.
महात्मा गांधीजीप्रमाणेच स्वच्छतेचा प्रचार प्रसार करणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या 146 व्या जयंतीनिमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या स्वच्छ जळगाव… सुंदर जळगाव… हरित जळगाव  संकल्पना साकार करण्यासाठीची प्राथमिकस्तरावरील बैठक गांधीतीर्थ येथे आज संपन्न झाली. याप्रसंगी विविध शाळा, महाविद्यालयांमधील स्काऊट, एनएसएस, एनसीसी तसेच सामाजिक संस्था व सामाजिक कार्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी अशा ६० च्यावर स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक तथा गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची प्रमुख मार्गदर्शन केले.
शहराच्या विकासात, सौंदर्यीकरणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो या दृष्टीने गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे प्रस्ताव मांडण्यात आले. यात प्रत्येकाने स्वच्छता दूत या भूमिकेतून किमान एक वर्ष जोडावे, आठवड्यातील किमान एक  तास स्वच्छता विषयासाठी द्यावा. आपल्या परिसरातील किमान पाच व्यक्तींचा एक समूह तयार करून पुढील तीन महिन्यात घरापर्यंत स्वच्छतेविषयी प्रबोधन करावे. नगरसेवकांच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी यांचेकडून स्वच्छता करून घ्यावी. परिसरातील प्लास्टिक कचरा एकत्रित गोळा करण्यासाठी एक दिवस उपक्रम राबविणे.  ज्या भागात स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे, असे भाग शोधून त्या भागातील नागरिकांना प्रोत्साहनाच्या दृष्टीने एकत्रिकरण करणे असे प्रस्ताव ठेवण्यात आले. यावर साधक बाधक चर्चा होऊन सकारात्मकेतसह स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव, हरित जळगाव करण्यावर रूपरेषा ठरविण्यात आली.
गांधी रिसर्च फाऊंडेशन विधायक काम करित असताना समन्वयकाच्या भूमिकेत राहिल. वृक्षारोपणासह संवर्धन करत असतानाच स्वच्छतेच्या दृष्टीने जळगावात आज स्थिती काय आहे. समस्या कुठे आहेत, त्यावर उपाय करण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार झाला पाहिजे जेणे करून समस्येवर योग्य तोडगा काढता येईल. त्यादृष्टीने शाळा महाविद्यालयांपासून सामाजिक संस्था, व्यक्तींनी काम केले पाहिजे. आपला परिसर स्वच्छ करत असतानाच कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावावी. कुठेलेही अभियान राबविताना आरोग्याच्या दृष्टीने सजग राहिले पाहिजे. त्याबाबत जागरूकता करावी आपला वेळ देत असताना नागरिकांचा वेळ कसा विधायक कामांमध्ये लागेल यासाठी प्रयत्न करावे. विधायक कामातून प्रशासनावर चांगले काम करण्यासाठी दबाव आणला पाहिजे असे मार्गदर्शन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.
समाज व प्रशासन एकत्र येणार नाही तोपर्यंत जळगाव सुंदर होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ओला सुका कचरा वेगळा असेल तरच घ्यावा. सेवा नाही तर आपण स्वच्छतेची सवय लावू, कचऱ्याला कचरा म्हणून बघितले नाही तोपर्यंत स्वच्छता मोहिम यशस्वी होणार नाही. स्वच्छ वर्ग ही संकल्पना राबविण्याबाबतच्या सुचना उपस्थितांनी केल्या.
यावेळी बैठकीत प्रामुख्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विन झाला, गिरीष कुळकर्णी, सुधीर पाटील, निवृत्त वनाधिकारी पी. आर. पाटील, आय. एस. रितापूरे, एनसीसीचे गोविंद पवार, डॉ. महेंद्र काबरा, वसीम पटेल,  दुर्गादास मोरे, राजेंद्र खोरखेडे, मुकेश कुरील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, मदन लाठी यासह शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व सामाजीक कार्यकर्ते आदी उपस्थीत होते. प्रास्ताविक व संचालन गिरीष कुळकर्णी यांनी तर आभार हेमंत बेलसरे यांनी मानले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गुरुवारी स्वच्छ जळगाव उपक्रमाबाबत बैठक


जळगाव दि.२१ येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ जळगाव… सुंदर जळगाव… हरित जळगाव संकल्पना साकार करण्यासाठी प्राथमिक स्तरावर कार्य सुरु झाले आहे. या उपक्रमाची यशस्विता समाजाच्या सहभागावर अवलंबून आहे. यासाठी म्हणून येत्या गुरुवारी (दि. २३ फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जैन हिल्सवरील गांधीतीर्थ येथे होणाऱ्या या बैठकीस संस्थेचे संचालक तथा गुजराथ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक संस्था व व्यक्तींनी उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. शहराच्या विकासात, सौंदर्यीकरणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. यासाठी विविध शाळा, महाविद्यालयांमधील स्काऊट, एनएसएस, एनसीसी तसेच सामाजिक संस्था, गणेश मंडळे व सामाजिक कार्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी आपले प्रतिनिधी पाठवून आपला सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे.

महाशिवरात्रीनिमित्त नागाई जोगाईला अशोक जैन यांच्याहस्ते महापूजा


जळगाव दि.16 -तालुक्यातील नागझिरी येथील श्रीक्षेत्र नागाई जोगाई मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त नागाई जोगाईला अशोक जैन, सौ.ज्योती जैन यांच्याहस्ते महापूजा होणार आहे. दि. 18 रोजी सकाळी 9.30 कांताई बंधाराजवळील नागाई जोगाई मंदीरात होणाऱ्या महापूजेचा सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. असे ग्रामस्थ नागझिरी, मोहाडी, धानोरा, दापोरा, खेडी, कढोली, शिरसोली प्र.बो. व प्र.न. यांच्यावतीने नागाई-जोगाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर गोटु सोनवणे, उपाध्यक्ष श्रीमती लिलाताई भिलाभाऊ सोनवणे, नगरसेविका अंजनाताई सोनवणे यांनी केले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version