अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

पाणीपुरी विक्रेत्याची मुलगी कु. रागिणी ९५.२० टक्के गुणांसह अनुभूतीत प्रथम

जळगाव, दि. २ जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनींनी बाजी मारली. कु.रागिणी मधुकर झांजरे-प्रथम (९५.२० %), चि. पीयुष वासुदेव वाणी- द्वितीय (९४.२० %) व चि. यश शेखर शिंदे – तृतीय (९३.२० %), चि. अभिजीत संदीप भंगाळे – चतुर्थ (९२.२०), चि. प्रतीक ज्ञानेश्वर येवले – पाचवा (९१.२०) उत्तीर्ण झालेत. गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी अभिनंदन केले. ८९ टक्के विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. १० विद्यार्थी ९० टक्केच्या गुणप्राप्त केले. सर्वच विदयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी.

“अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत असलेल्या या वि्दयार्थ्यांना आव्हानात्मक परिस्थितीत असली तरी सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत निष्ठेने व सातत्याने आपला अभ्यास केला आणि दैदिप्यमान मिळविले याचे विशेष कौतूक आहे.” अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.
शाळेत प्रथम आलेली कु. रागीणी हिचे वडील जुन्या बि. जे. मार्केटमध्ये पाणीपुरी विकतात तर आई धुणी-भांडी करते. “आपल्या कन्येने मिळविलेल्या यशामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत”, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी नोंदविली. स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. पियुषचे वडीलांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. अशा प्रकारे परिस्थितीशी दोन हात करून अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

लव राजेंद्र माळी ला दहावीत 89.40 टक्के

जळगाव दि.2 – बि. यू. एन. रायसोनी स्कूलमधील विद्यार्थी लव राजेंद्र माळी हा 89.40 टक्क्यांनी उत्तीर्ण झाला. त्याला संस्कृत विषयात 92, समाजशास्त्र 90, विज्ञान 89, गणित 86, इंग्रजी 70 गुण मिळाले. त्याचे आई माधुरी, वडील राजेंद्र, आजी- आजोबा यांच्यासह गुरुजन व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले. मेडीकल क्षेत्रात करिअर करण्याची ईच्छा आहे.

WTC फायनल कधी आणि कुठे खेळला जाईल ? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल सर्व माहिती येथे आहे ..

ट्रेडिंग बझ – इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझन 16 नंतर, चाहते आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल) च्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनी लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी नेट सराव सुरू केला आहे. त्याचबरोबर अनेक खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत. सामन्यापूर्वी, WTC फायनलची तारीख, ठिकाण आणि दोन्ही संघांबद्दल संपुर्ण माहिती जाणून घ्या.

फायनल 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवली जाईल :-
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाईल. भारतात त्याचे प्रसारण दुपारी 3 वाजता सुरू होईल. आयसीसीने फायनलसाठी ‘राखीव दिवस’ही ठेवला आहे जेणेकरुन खराब हवामान या दिवशी खेळ घेता येईल. आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक वसीम खान म्हणाले, “आम्ही स्वच्छ हवामानाची आशा करत आहोत जेणेकरून आम्हाला पाचही दिवस चांगले क्रिकेट पाहायला मिळेल, तथापि, हवामानामुळे होणारा व्यत्यय भरून काढण्यासाठी आम्ही ‘राखीव’ ठेवले आहे,” असे क्रिकेटचे आयसीसीचे महाव्यवस्थापक वसीम खान म्हणाले. निवडक मीडिया व्यक्तींशी संवाद साधताना.

हे WTC चे अंपयार असतील :-
इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी हे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मैदानावरील पंच म्हणून काम पाहतील. इलिंगवर्थ हे दोन वर्षांपूर्वीच्या WTC फायनलमध्येही पंच होते. तिसरे पंच रिचर्ड केटलबरो हे सलग दुसऱ्या WTC फायनलमध्ये देखील जबाबदारी सांभाळतील. श्रीलंकेचे कुमार धर्मसेना हे चौथे पंच तर वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन मॅच रेफ्री असतील. तुम्हाला सांगू द्या की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही दुसरी फायनल आहे. याआधी 2021 साली भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता.

टीम इंडियाने सराव सुरू केला :-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारतीय संघाच्या सदस्यांचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये कोहलीशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांचाही समावेश होता. बीसीसीआयने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “टीम इंडियाचे सदस्य WTC 2023 ची तयारी Orandale Castle क्रिकेट क्लबमध्ये करत आहेत. कोहली, उमेश आणि सिराज हे नवीन प्रशिक्षण किटमध्ये जॉगिंग करताना दिसत आहे तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे.

सलग 6 दिवस सुरू असलेला हा PSU स्टॉक तेजीच्या टॉप गियरमध्ये, तज्ञ काय म्हणाले?

ट्रेडिंग बझ – शेअर बाजारात सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. मिडकॅप निर्देशांकाने नवीन सार्वकालिक उच्चांक तयार केला आहे. असाच एक मिडकॅप स्टॉक सध्या फोकसमध्ये आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील शेअरचे नाव “माझगाव डॉकयार्ड” आहे. हा PSU शेअर सलग 6 दिवसांपासून हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे. बाजारातील तज्ज्ञही या शेअरवर तेजीत आहेत.

PSU स्टॉकशी संबंधित विशेष बातम्या :-
जहाजबांधणी व्यवसायात गुंतलेल्या या सरकारी कंपनीला 3 पाणबुड्यांसाठी ऑर्डर मिळणे अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Mazagon डॉकला आणखी 3 पाणबुड्यांसाठी ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. डिफेन्स अक्विझिशन कौन्सिल म्हणजेच DAC च्या पुढील बैठकीतही याला मंजुरी मिळू शकते. DAC ची पुढील बैठक 1 ते 2 महिन्यात होणार आहे.

Mazagon Post ला मोठी ऑर्डर मिळू शकते :-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 पाणबुड्यांची किंमत सुमारे 32,000 कोटी रुपये असू शकते. Mazagon Dock ने प्रोजेक्ट 75 अंतर्गत 5 पाणबुड्या बांधल्या आहेत. माझगाव डॉकच्या शेवटच्या 5 पाणबुड्यांची किंमत सुमारे 53,000 कोटी रुपये होती. या धडक कारवाईमुळे आजही स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. 26 मे पासून हा शेअर हिरव्या रंगात व्यवहार करत आहे.

तज्ञांनी दिला शेअर खरेदीचा सल्ला :-
शेअरखानचे जय ठक्कर म्हणाले की, पीएसयू समभागांची तेजी कायम राहणार आहे. त्यामुळे शेअर्सवर खरेदीचे मत आहे. पुढील 1-3 महिन्यांसाठी 736 रुपयांच्या स्टॉप लॉससह स्टॉकवर खरेदी कॉल आहे. यासाठी 1000 आणि 1120 रुपयांचे उद्दिष्ट आहे.

अस्वीकरण : वरील तज्ञांनी व्यक्त केलेली मते आणि गुंतवणुकीच्या टिप्स त्यांच्या स्वतःच्या आहेत आणि वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाच्या नाहीत. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे आणि कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या .

शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग

जळगाव, दि. १ शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा खडतर परंतु तितकाच प्रेरणादायी प्रवास शेतकऱ्यांनी उलगडून दाखविला. फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्स येथे प्रगतशील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. त्यात अत्यंत प्रेरक व मोलाचे विचार शेतकऱ्यांच्या संवादातून मिळाले.

फालीच्या पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कृषिसंबंधीत विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. कृषितज्ज्ञांशी संवाद साधला. भविष्यातील शेतीविषयी अनेक बाबी जाणून घेतल्या. दिवसभरात विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थसह अत्याधुनिक पद्धतीने फळबागेची लागवड कशी केली जाते, याबाबत प्रत्यक्ष शेतात जाऊन सघन लागवड पद्धतीत आंबा व संत्रा उत्पादनाचे प्रात्यक्षिक बघितले. शेतकन्यांशी संवाद साधला. शिवारफेरीतून टिश्यूकल्चर तंत्रज्ञान समजून घेतले. संशोधनाच्या दृष्टीने जैन इरिगेशनच्या आर ॲण्ड डी लॅबमधील तज्ज्ञांशी संवाद साधला. सोलर पार्क, टिश्युकल्चर भविष्यातील शेतीचे प्रयोग, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, सिंचन प्रकल्प यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतले.
जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानातून गवसला शेती समृद्धीचा मार्ग
जळगावच्या जवळच असलेल्या करंज येथील प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी अनिल जिवराम सपकाळे यांनी आपल्या शेतीचा अनुभव सांगितला. १९९३ पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत असू त्यावेळी आमची जेमतेम परिस्थिती होती. टिश्युकल्चर रोपे लावण्याआधी केळीचे खोड लावत असू, मोकाट पद्धतीने सिंचन करत होतो. त्यावेळी केळी काढणीस १५ ते १६ महिने लागायचे. टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड केल्यावर केवळ ११ महिन्यात अत्यंत गुणवत्तेची, एक्सपोर्ट क्वालिटी केळी पिकवू लागलो. केळीची निर्यात केली आहे. स्वतः बरोबर गावाची देखील प्रगती साध्य केली. आमचे एकत्र कुटुंब असून कुटुंबाची १३ हेक्टर तर माझ्या वाट्याला २ हेक्टर ७२ आर इतकी शेती आहे. चार वर्षांपूर्वी आम्ही ५० शेतकरी मिळून गट स्थापन केला आणि बेबीकॉर्नची शेती केली होती ती यशस्वी करून दाखविली.
अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन करू केळी सोबत गहू, हरबरा, तूर पिके घेत असतो. सपकाळे हे शेतीमध्ये विविध प्रयोग अव्याहत करतात. २०२२ मध्ये राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते शासनाच्या कृषी विभागाचा कृषीभूषण पुरस्काराने गौरव झाला. याच सोबत रितेश परदेशी (कोचूर ता. रावेर), जयंत सुभाष पाटील (फैजपूर ता.यावल), संदीप पाटील, बापू खंडू पाटील (जळके,ता.जळगाव) उमेश गोपाळ महाजन (हिवरखेडे ता. जामनेर) यांनी आपल्या शेती आणि शेतीतील विविध प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
याच कार्यक्रमात ज्या कंपन्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे अशा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील फाली विद्यार्थ्यांचा मुक्तपणे संवाद झाला. यात गोदरेज अॅग्रोव्हॅटचे वरिष्ठ अधिकारी डाॕ. आर. एस. मसळी, युपीएल कंपनीचे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश विभागाचे प्रमुख अमोल कदम, जीसीएमएमपीचे अजय सेठ, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, वरिष्ठ अधिकारी डॉ. बालकृष्ण यादव, आंतराष्ट्रीय कृषीतज्ज्ञ डॉ. पी. सोमण, रॅलीज इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी रवींद्र पाटील, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे आशिष गणपुळे, सुरज पानपत्ते, एचडीएफसी बँक कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी बळवंत धोंगडे यांचा सहभाग होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फालीच्या व्यवस्थापिका रोहिणी घाटगे यांनी केले.

गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष नादीर गोदरेज यांनी फालीच्या विद्यार्थ्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या सहाय्याने संवाद साधला. फालीचे नेमके भारतातील काम त्यांनी उत्स्फूर्त रचनेतून सादर केली.

फळ व भाजीपाला मूल्यवर्धन साखळीने शेतीत शाश्वतता निर्माण होऊ शकते


राष्ट्रीय फलोत्पादन परिषद तांत्रिक सत्र सादरीकरणात तज्ज्ञांचा सूर

जळगाव दि. ३० उत्पादन करताना उत्तम प्रतीचे बी बियाणे, उच्चकृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने शाश्वतशेती करून, सूक्ष्म सिंचन फर्टिगेशन तंज्ञानाचा वापर सर्वात महत्त्वाचे म्हणजे काढणी पश्चात तंत्र (फ्रुट केअर), ग्राहकांपर्यंत चांगल्या वेष्टनात फळे जाणे हे महत्त्वाचे ठरते. शेतात पिकविलेल्या शेतमालाची मूल्यवृद्धी साखळी खूप मोलाची ठरते याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा तज्ज्ञांनी केली. जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी तज्ज्ञांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनाबाबत विविध विषय तज्ज्ञांचे सादरीकरण झाले त्यात वरील संदर्भात विचार व्यक्त केले गेले. या तांत्रिक सत्र सादरीकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. एच.पी. सिंग, को-चेअरमन एस. के. मलहोत्रा आणि डॉ. डी.एन. कुळकर्णी होते.

केळी बाबत तांत्रिक सत्र सादरीकरण करताना केळी तज्ज्ञ के.बी. पाटील व्यासपीठावर डॉ. एच.पी. सिंग, को-चेअरमन एस. के. मलहोत्रा आणि डॉ. डी.एन. कुळकर्णी

आजच्या तिसऱ्या दिवसाचे सादरीकरण सीआरआयचे डॉ. रमेश एस.व्ही. यांच्या सादरीकरणाने झाले. त्यांनी नारळाचे मूल्यवर्धन करणारे उत्पादने व शाश्वतता याबाबत आपले सादरीकरण केले. गुणवत्ता असेल तर ग्राहक हव्या त्या किंमतीला वस्तू विकत घेतात असे नमूद केले.
जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी डॉ. डी.एन. कुळकर्णी यांनी फळे व भाजीपाला याविषयीचे मूल्यवर्धन व वास्तवता याबाबत सादरीकरण केले. भाजीपाला व फळांच्या उत्पादनात भारताचे असलेले स्थान व जागतिक बाजारपेठेत भारताचा अधिक वाटा वाढविण्यासाठी काय करायला हवे याबाबत सादरीकरण केले. फळे व भाजीपाला निर्यातीत भारत का कमी पडतो याबाबतची कारणमिमांसा देखील त्यांनी केली. वैश्विक पातळीवर आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना स्पर्धा करावी लागते. गुणवत्ता व किंमत हा घटक देखील भारतातून होणाऱ्या निर्यातीसाठी अत्यंत प्रभावी घटक असतो. निर्यात वृद्धीसाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत डॉ. कुळकर्णी यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली.
जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के.बी. पाटील यांनी देखील केळी व त्याच्या मूल्यवर्धनाबाबत मोलाचे सादरीकरण केले. प्री आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटबाबत त्यांनी प्रकाशझोत टाकला. भारतात इतर देशांच्या तुलनेने केळी लागवड क्षेत्र अधिक असून देखील केळीची नगण्य निर्यात होते याबाबतच्या मुख्य कारणांवर चर्चा केली. इराण, यूएई, दक्षिण आफ्रिकेत भारतातून केळीची निर्यात होते ती निर्यात वाढण्याची संधी आहे याबाबतचा विश्वास के.बी. पाटील यांनी व्यक्त केला. केळीची काढणी व पॅकहाऊसमध्ये पॅकींग केल्यास आंतरराष्ट्रीय दर्जा सांभाळला जाईल. केळी हे अत्यंत संवेदनशील फळ असून त्याची फ्रुट केअर जितकी जास्त घेतली तितके अधिकचे मूल्य मिळू शकते याबाबत सांगितले.
भारतातील मसाले उत्पादन व मूल्यवर्धन याबाबत डॉ. निर्मल बाबू यांनी सादरीकरण केले. भारतात पिकणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांना जगात मोठ्या प्रमाणावर मागणी आणि भविष्यात खूप मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगत जागतिक पातळीवर भारताचा असलेला वाटा व तो वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याबाबत सांगितले. आले आणि हळद या दोन्ही पिकांच्या कक्षा विस्तारलेल्या आहेत. आयुर्वेदात हळदीला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. मसाल्याच्या पदार्थात हळदीचा अग्रभागी सहभाग आहे तो औषधी उद्योगात देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. भारताला भविष्यात या क्षेत्रात विकासाच्या कशा व किती मोठ्या प्रमाणावर संधी आहे त्याबाबत अत्यंत प्रभवीपणे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथील मिनिस्ट्री ऑफ अॅग्रिकल्चर अँण्ड फार्मर्स वेल्फेअरचे वरीष्ठ अधिकारी बिनोद आनंद यांनी देखील भारतातील शेती उत्पादनांची मूल्यवर्धन, मूल्यवर्धन साखळी कशा पद्धतीने कार्यरत आहे व त्यासाठी शासनाचे पाठबळ कसे मिळते याबाबत चर्चा केली. अत्यंत सहज व रंजक पद्धतीने त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. बीएयू साबोर भागलपूर बिहार येथील डॉ.एम.फिजा अहमद यांनी आपले सादरीकरण केले. सीआयसीआरचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी शेतीमाल व त्याच्या मूल्यवर्धनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्याच प्रमाणे डॉ. दिनेश कुमार, डॉ. एस.एम. जोगधन, डॉ. रश्मी कुमारी, डॉ. नवीन कुमार यांनी देखील तांत्रिक सादरीकरण केले.
या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष डॉ. एच.पी. सिंग यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी उत्तम गुणवत्तेचे बी-बियाणे, अत्याधुनिक सिंचन पद्धती त्याच्या जोडीला फर्टिगेशन आणि काढणी पश्चात उत्तम तंत्रज्ञान अवलंबले तर शेतमालाचे शाश्वत मूल्यवर्धन शंभर टक्के होईल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी जैन इरिगेशनच्या टिश्युकल्चर रोपांचे उदाहरण त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी टिश्युकल्चर केळीची रोपे वापरली तर त्यांच्या केळी उत्पादनात दुप्पट वाढ झालीच शिवाय गुणवत्तापूर्ण फळे मिळू लागली. घड व्यवस्थापनासाठी एका घडाला कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर पैसे स्कर्टिंग बॅगसाठी लागतात. ती लावली तर किलोमागे कमीतकमी ३ रुपये अधिक किंमत अशा गुणवत्तापूर्ण केळीला मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला हवी व नव्या तंत्रज्ञानानुसार शेती करायला हवी असे सांगितले.

बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती बदलणे गरजेचे

राष्ट्रीय फलोद्यान परिषदेतील दुसऱ्या दिवशी तज्ज्ञांचा सूर

जळगाव, दि. २९ – केळी आणि बटाटा जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून या दोहोंमध्ये भरपूर पोषणमूल्ये व खाद्यान्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. भविष्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जगाचे पोट भरण्याची क्षमता केळी, बटाट्यामध्ये आहे असा सूर केळी उत्पादकांच्या परिसंवादात तज्ज्ञांचा उमटला. केळीवर वातावरण बदलामुळे झालेले बदल तसेच बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे या विषयांवर तज्ज्ञांनी आपले मोलाचे विचार मांडले. जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन कार्यशाळा व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.

केळी उत्पादन व रोग व्यवस्थापण विषयावर-राष्ट्रीय केळी कार्यशाळा यामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. एच. पी. सिंग. व्यासपीठावर डावीकडून डॉ. के. बी. पाटील, डी. के. महाजन, डॉ. टी. दामोदरन, डॉ. आर. सेल्व्हाराजन, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अनिल पाटील

परिश्रम, कस्तुरबा हॉल, बडी हांडा व सुबीर बोस हॉल या चार ठिकाणी विविध विषयांवर शास्त्रज्ञ व अभ्यासकांनी संशोधन पेपर सादर केले. परिश्रम हॉलला सकाळच्या सत्रात केळीवरील रोगराई व्यवस्थापन व कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे अध्यक्ष अमितसिंग मेमोरियल फाउंडेशनचे तथा चाईचे अध्यक्ष डॉ. एच.पी. सिंग होते, को चेअरमन तिरुचिरापल्ली एनआरसीबीचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन होते. डॉ. टी. दामोदरन, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अनिल पाटील, के.बी. पाटील, केळी उत्पादक प्रगतशील शेतकरी डी. के. महाजन हे व्यासपीठावर उपस्थित होते. केळीचे उत्पादन व त्यावर होणारा बदल्या हवामानाचा परिणाम, धोरणात्मक योजन, केळी कीड व रोग नियंत्रण, कार्यक्षम नवतंत्रज्ञान यावर तज्ज्ञांचे सादरीकरण झाले.
डॉ. टी. दामोदरन यांनी पनामा रोगाचे व्यवस्थापन व महाराष्ट्रात रोग येवू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी यावर संबोधन केले.
यात डॉ. आर. सेल्व्हराजन यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर केळीमध्ये भारत खूप मागे होता परंतु उच्च गुणवत्तेची टिश्युकल्चर रोपे जैन इरिगेशनसह काही मोजक्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिले तसेच आधुनिक सिंचन व फर्टिगेशन तंत्रज्ञानामुळे चांगल्या दर्जाची केळी उत्पादन होत आहे. केळी पिकावरी कीड व रोगांचा सामना करण्याण्यासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे महत्त्वाचे विचार त्यांनी मांडले. यावेळी प्रगतशील शेतकरी डी. के. महाजन, डॉ. एच.पी. सिंग, डॉ. प्रकाश पाटील यांनी देखील आपले मौलीक विचार मांडले. डॉ. सुरेश कुमार यांनी केळी प्रक्रिया उद्योगातील व्यवसाय व संधी, डॉ. के.जे. भास्करन यांनी केळी उत्पादनासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन व कॅलकुलेशन- माती परिक्षणानुसार व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ. करपगम यांनी केळी निर्मिती व वापर, डॉ. एम. एस. सरस्वती यांनी केळी रोपांवरील संशोधन पेपर सादरीकरण केले. डॉ. लोगनाथन नवीन तंत्रज्ञानातून रोगाचे व्यवस्थापन यावरही मार्गदर्शन केले. डी. के. महाजन यांनी केळी पिकातील समस्यांवर संशोधन करून केळी उत्पादकांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे असे नमूद केले. के. बी. पाटील यांनी डि. के. महाजन यांच्या मनोगताचा हिंदी अनुवाद केला.
केळी परिषदेसाठी जळगाव, बऱ्हाणपूर, आनंद, बडवाणी, शिरपूर, सोलापूर येथील बिहार, उडिसा या राज्यातील केळी उत्पादक सहभागी झाले. प्रशांत महाजन, संतोष लवेटा, विशाल अग्रवाल, संदीप पाटील, योगेश पटेल, सचिन महाजन, महेंद्र सोलंकी, प्रेमानंद महाजन, आशुतोष पाटीदार, अशोक पाटीदार, जगदीश जाट, ईश्वर पाटील, पद्माकर पाटील, बापू गुजर यासह २५० शेतकरी सहभागी झाले होते.
दुपारच्या सत्रामध्ये ‘बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या विषयावर संशोधक व अभ्यासकांनी विचारमंथन केले. प्रास्ताविक डॉ. बिरपालसिंग यांनी केले. शिमला येथील सीपीआरआयचे संचालक डॉ. ब्रजेशसिंग यांनी आपले सादरीकरण केले, त्यात त्यांनी भारतीय उष्ण हवामानामध्ये कमी पाण्यात येणाऱ्या बटाटाच्या वाणांविषयी माहिती दिली. एरोपोनिक्स बटाट्याविषयी सांगतांना गुणवत्तापूर्ण बटाटा बियाणे यातूनच चांगले उत्पादन शक्य असल्याचे ते म्हणाले. पूर्वी एका रोपातून सहा तर आता या तंत्रज्ञानामुळे ५० हून अधिक बटाटा बियाणे तयार केले जाते असेही ते म्हणाले. गुजरात येथील बटाटा उत्पादक शेतकरी महेशभाई पटेल, अरविंदभाई पटेल यांनी शेतकऱ्यांच्या वतीने बटाटा पिकांमध्ये येणाऱ्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. यात अरविंदभाई म्हणाले की, बटाट्यावर काळे डाग आल्याने त्याचा दर्जा खालावतो त्यावर शास्त्रज्ञ व तज्ज्ञांनी त्यावर उपाय शोधावा असे सांगितले तर महेशभाई यांनी आतापर्यंत बटाट्याचे अनेक कंपन्यांच्या बियाण्यांची लागवड केली परंतु सर्वात चांगले गुणवत्तापूर्ण बियाणे जैन इरिगेशनकडून मिळाले. त्याबाबत ठळक अनुभव विषद केला. यावेळी एम.डी. ओझा यांनी बटाटा बीज निर्मिती यावर प्रकाश टाकला, डॉ. आर.के. सिंग यांनी बिजनिर्मितीतील तंत्रज्ञानामध्ये झालेले बदल, डॉ. रविंद्र कुमार यांनी उत्तम बीज निर्मितीबद्दल सांगितले. उत्तर बंगाल कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.के. चक्रवर्ती यांनी आपले संशोधनपर अनुभव सादर केले.
या परिषदेच्या तिसऱ्या दिवशी ३० मे रोजी दुपारी उद्यानरत्न पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये विविध विषयांवरील संशोधन पेपर यातील शेती उपयुक्त शिफारशींचा धोरणात्मक दृष्टीने स्वीकार करण्याच्या दृष्टीने मांडणी केली जाईल.

तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे २५ खेळाडू उत्तीर्ण

जळगाव दि.२९ : – तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बॅडमिंटन हॉल येथे ब्लॅक बेल्ट (डॅन) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत १७७ खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या २५ खेळाडूंनी या परीक्षेत यश संपादन केले. त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जळगाव, जीवन महाजन, रावेर, सुनील मोरे पाचोरा, श्रीकृष्ण चौधरी शेदूर्णी, श्रीकृष्ण देवतवाल शेंदूर्णी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण खेळाडू पुढीलप्रमाणे: अर्णव अविनाश जैन , दानिश रहेमान तडवी , संकेत गणेश पाटील , हिमांशू महाजन , रूतीक कोतकर , निकेतन खोडके , निकीता पवार, निलेश पाटील (सर्व जळगाव ), नियती गंभीर , साहिल बागुल , प्रविण खरे , अमित सुरवाडकर, रूतीका खरे, जीवनी बागुल , रुपल गुजर (सर्व पाचोरा), जय गुजर, भावेश चौधरी , श्रीकृष्ण चौधरी, लोचना श्रीकृष्ण चौधरी, मोहित श्रीकृष्ण चौधरी (सर्व शेंदूर्णी ), हेमंत गायकवाड, यश शिंदे , यश जाधव, महिमा पाटील , दिनेश चौधरी (सर्व रावेर ) सदर यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे यांनी कौतूक केले

‘चाई’ ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत संशोधकांसह शेतकऱ्यांचा सन्मान

जळगाव दि. २८ – जैन हिल्स येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चरल असोसिएशन ऑफ इंडिया) ची ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषद झाली. ११ विविध पुरस्कारांनी देशभरातील प्रगतीशील शेतकरी, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संस्था व कृषि विद्यापिठांचे विभागप्रमुखांचा सन्मान करण्यात आला.

जैन हिल्स येथील परिश्रम सभागृहामध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरीक्त सचिव व डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, डाॕ. विशाल नाथ, डाॕ. हर्षवर्धन, डॉ. जे. एच. परिहार, डॉ. पी. रतमन, शिमला सीपीआरआयचे माजी संचालक डाॕ.बिरपाल सिंग, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे डॉ. के. बी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविक डॉ. हर्षवर्धन यांनी केले. चाई च्या कार्याविषयी डाॕ. विशाल नाथ यांनी सांगितले.

पुरस्कार व पुरस्कारार्थी असे पुढीलप्रमाणे : –
१) चाइ – डॉ. आर. एस. परोडा पुरस्काराने डॉ. तुषार कांती बेहेरा, संचालक, आयसीएआर-आयआयव्हीआर, जाखिनी (वाराणसी, युपी)
२) चाइ – डॉ. बी. एच. जैन पुरस्काराने डॉ. ए. व्ही. ढाके, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेड
४) चाइ – कौटिल्य लोकनिती पुरस्कार-२०२३ ने डॉ. सुधीर जगन्नाथ भोंगळे
५) चाइ – अचिव्हर्स पुरस्कार-२०२३ ने प्रो. अरविंद कुमार, माजी कुलगुरु, आरएलबीसीएयु (झाशी, युपी), डॉ. ए. के. सिंग, कुलगुरु, आरएलबीसीएयु (झाशी, युपी), डॉ. डी. आर. सिंग, कुलगुरु, बीएयु (साबोर, भागलपूर, बिहार), डॉ. मेजर सिंग, सदस्य, एएसआरबी, डेअर, एमओएएफडब्ल्यू (नवी दिल्ली) डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालक, आयसीएआर-डायरेक्टोरेट ऑफ फ्लॉरीकल्चरल रिसर्च (पुणे), डॉ. कंचेरला सुरेश, संचालक, आयसीएआर-इंडियन इन्स्टीटयूट ऑफ ऑइल पाम रिसर्च (आंध्र प्रदेश), डॉ. ब्रजेश सिंग, संचालक, आयसीएआर-सीपीआरआय (शिमला, एचपी) डॉ. जी. बायजू, संचालक, आयसीएआर-सीटीसीआरआय (थिरुवनंतपूर, केरळ), डॉ. विजय महाजन, संचालक, आयसीएआर-डीओजीआर, राजगुरुनगर (पुणे), डॉ. मनिश दास, संचालक आणि प्रकल्प समन्वयक, आयसीएआर-डीएमएपीआर बोरीआवी (आनंद, गुजराथ)
६) चाइ – अॅप्रेसिएशन पुरस्काराने डॉ. राम अवध राम, माजी मुख्य शास्त्रज्ञ, सीआयएसएच, रेहमानखेरा (लखनौ, युपी), डॉ. दयाराम, माजी प्रमुख, मायकोलॉजी विभाग, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार)
७) चाइ – जेआयएसएल फेलोशीप पुरस्काराने डॉ. एच. उषा नंदिनी देवी, असोसिएट प्रोफेसर, टीएनएयु (कोइंबतोर, तामिळनाडू)
८) चाइ – डॉ. रे बेस्ट डेझर्टेशन पुरस्काराने डॉ. सुमेरसिंग पाटील, केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) यांचा त्यांनी आंब्याच्या फुलांसंबंधी जीन्सचा अभ्यास केल्याने सन्मान करण्यात आला. तर डॉ. रवी. वाय. शास्त्रज्ञ, आयसीएआर-एनआरसी ऑन सीड स्पाईसेस (अजनेर, राजस्थान)
९) चाइ – डॉ. क्रीती सिंग बेस्ट पेपर पुरस्काराने दलासनुरु चंद्रेगौडा, मंजुनाथा गौडा, विजय महाजन, राम दत्ता, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजर सिंग यांनी “कांद्याच्या गठ्ठ्यावरील सीएमएस-एस मेल-स्टराइल सायटोप्लाझम चे संशोधन केले त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
१०) चाइ – इन्स्टीटयूशनल फेलो पुरस्कार-२०२३ हा नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ), नवी दिल्ली., महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्नोलॉजी (उदयपूर, राजस्थान), मे. निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, पाचोरा जि. जळगाव,
११) चाइ – फेलो पुरस्कार-२०२३ हा संस्थांना देण्यात आला यामध्ये डॉ. डी. के. रॉय, संचालक, बियाणे (सीड्स) आणि मुख्य शास्त्रज्ञ, अॅग्रोनॉमी, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार), नॅशनल हॉर्टीकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ) (नवी दिल्ली), डॉ. रवी वाय, शास्त्रज्ञ, आयसीएआर-एनआरसीएसएस (अजमेर, राजस्थान), निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएसपीएल) पाचोरा जि. जळगाव, डॉ. बाल क्रिष्णा, वरिष्ठ शास्त्रज्ञ,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव, डी. के. महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, रावेर ता. जळगाव, राजाराम गणू महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी, रावेर ता. जळगाव, डॉ. राम अवध राम, माजी मुख्य शास्त्रज्ञ, सीआयएसएच, रेहमानखेरा (लखनौ, युपी), डॉ. दयाराम, माजी प्रमुख, मायकोलॉजी डिपार्टमेंट, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार), प्रेमानंद हरी महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी रावेर जि. जळगाव, विशाल रामेश्वर अग्रवाल, रुची बनाना एक्सपोर्ट्स रावेर, जि. जळगाव, प्रशांत वसंत महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, तांदलवाडी रावेर जि. जळगाव, रामदास त्र्यंबक पाटील, निंबोल रावेर जि. जळगाव, विशाल किशोर महाजन, प्रगतीशील केळी उत्पादक, नायगाव, मुक्ताईनगर जि. जळगाव, दादासाहेब नामदेव पाटील, बितरगाव, करमाळा जि. सोलापूर, प्रियम सिंग, एनएच कन्सल्टन्सी, ओखला (नवी दिल्ली) यांचा सन्मान करण्यात आला.

भवरलाल जैन यांच्या कार्याच्या सकारात्मक लहरी शेतकऱ्यांना कायमच प्रेरणादायी – डॉ. अशोक दलवाई

आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते– अनिल जैन


जैन हिल्स येथील राष्ट्रीय फलोद्यान परिषद सुरू

जळगाव दि.२८ –  भारतीय कृषी क्षेत्रात नैसर्गिक संसाधनाचे जतन करून अधिकाधिक फलोत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मजूरांचा अकार्यक्षम वापर वाढत आहे. यामुळे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. भवरलाल जैन यांनी शेती आणि शेतकऱ्यांना कायमच महत्त्व दिलं आणि त्याअनुषंगाने त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या विधायक कार्याच्या सकारात्मक लहरी आजही इथं अनुभवायास मिळतात. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गानेच शेतकऱ्यांची सेवा केली. नवनवीन प्रयोग करून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न केला.

जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये अमित कृषी ऋषी अॅवार्डने श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांचा त्यांनी केलेल्या कृषिक्षेत्रातील अनमोल कार्याला अधोरेखित करून गौरव करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन व सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन.
जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे दीपप्रज्वालन करून उद्घाटन करताना डॉ.अशोक दलवाई. सोबत डावीकडून डॉ. मेजर सिंग, नॅन्सी बेरी, एइर इशेल, डॉ.एच.पी.सिंग, अनिल जैन, आय. एम. मिश्रा, डॉ. एस. के. चक्रवर्ती, सुरजित चौधरी, डॉ. ए. आर. पाठक, अॅम्नोन ऑफेन.

भगवान महावीर यांच्या  श्रद्धा, ज्ञान आणि वर्तन या त्रिसुत्रीवर भवरलाल जैन यांनी आपले आयुष्य समर्पित केले. असे  प्रतिपादन केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव व डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी राष्ट्रीय फलोद्यान परिषदेच्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचा रविवारी (ता.२८) प्रारंभ झाला. येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) ही परिषद सुरू राहणार आहे. परिषदेत देशातील १०० शास्त्रज्ञ बारा आयसीएआर केंद्रांचे संचालक सहभागी झाले आहेत. उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजर सिंग, इस्त्राईल येथील लसूण शास्त्रज्ञ एइर इशेल,  इस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष  डॉ. एच. पी. सिंग, माजी सनदी अधिकारी तथा कृषितज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. विशाल नाथ, फ्युचर अग्रीकल्चर लीडर्स इन इंडिया (फाली) च्या संचालिका नॅन्सी बेरी, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. एम. मिश्रा, जुनागड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, उत्तर बंगा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. के. चक्रवर्ती आदी उपस्थित होते.नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून शाश्वत विकास साधता येतो, त्या दिशेने जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी ‘सार्थक करूया जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे’ याप्रमाणे कार्य केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ८० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल केला आहे. नव्या पिढीने शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. या पुढील काळात शेतीसाठी ड्रोन, सॅटेलाईट, स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर व्हायला हवा. यासह तरुणाईने देखील शेतीमध्ये सामर्थ्यांने पुढे यायला हवे, असे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन झाले. प्रास्तावीक डॉ. एच. पी. सिंग यांनी केले. यात त्यांनी कृषिक्षेत्रातील भविष्यातील उद्दिष्टे विशेषत: फळबागांमध्ये संशोधन आणि विकास यावर भर देण्यासाठी ही परिषद महत्त्वाची असल्याचे सांगितले. नॅन्सी बॅरी, डॉ. इंद्रमणी मिश्रा, डॉ. एस. के. चक्रवर्ती, डॉ. मेजर सिंग, डॉ. ए. आर. पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘शोध चिंतन-२०२३’ या शोधप्रबंधाची १५  वी आवृत्ती, सारांश पुस्तक, मागील वर्षातील इतिवृत्त व सीडी यांचे  प्रकाशन करण्यात आले. डॉ. विशाल नाथ यांनी आभार मानले. गुरूवंदना दिपक चांदोरकर यांनी सादर केली. डॉ. सुब्रम्हन्या यांनी सूत्रसंचालन केले.माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी  मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जैन इगिरेशनसारख्या संस्था भविष्यातील शेतीचे मंदीर किंवा मार्गदर्शक आहेत. कृषी क्षेत्रातील समस्यांना पर्याय उपलब्ध करून देत आहेत. प्लास्टिकचा योग्य वापर करून शेतीला कसा लाभ मिळू शकतो, याचेही उत्तम उदाहरण जैन इरिगेशनमध्ये दिसते. रसायनांचा बेसुमार वापर झाला आहे. हरित क्रांतीनंतर ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. पुढे पर्यावरण पूरक काम व्हायला हवे. धोरणकर्त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असेही ते म्हणाले. शेतीसमोरील संकटे दूर करण्यासंबंधीचे संशोधन बांधावर पोचायला हवे. असे मत माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेत व्यक्त केले.यावेळी चाईतर्फे शेतकरी व शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चाई ऑनरड फेलो-२०२३ या पुरस्काराने नवीदिल्ली येथील डीएआरई आणि डीजी आयसीएआरचे सेक्रटरी डॉ. हिमांशू पाठक यांचा सन्मान करण्यात आला. लाईफ टाईम अॅच्युमेंट अॅवार्ड- २०२३ ने डॉ. मेजर सिंग, चाई लाईफ टाईम रिक्यनुशेन अॅवार्ड डॉ. बलराज सिंग, चाई  अॉनररी फेलो डॉ. बिजेंद्र सिंग, प्रो. अजित कूमार कर्नाटक, निर्मल सिडचे डॉ. जे. सी. राजपूत यांनी सन्मानित करण्यात आले.अमित सिंग मेमोरियल फाऊंडेशन अॅवार्डने बबिता सिंग यांनी फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहिर केले. त्यात अमित कृषी ऋषी अॅवार्डने श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांचा त्यांनी केलेल्या कृषिक्षेत्रातील कार्याला अधोरेखित करून गौरव  करण्यात आला. हा पुरस्कार जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन व सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन यांनी स्वीकारला. अमित पद्म जागृती अॅवार्ड हा निर्मल सिड्स प्रा. लि. ला मिळाला तो जे. सी. राजपूत यांनी स्वीकारला. अमित प्रभुध मनिषी अॅवार्ड उदयपूरच्या एमपीयूएएटीचे कुलगुरू प्रो. अजितकुमार कर्नाटक यांना देण्यात आला. दरम्यान तांदलवाडी ता. रावेर येथील प्रगतीशील शेतकरी राजाराम गणू महाजन यांना रामनंदन बाबू या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला. यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना जैन इरिगेशन कंपनीची शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी स्पष्ट करून सांगितले. डॉ. एन. कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पहिले तांत्रिक सत्र पार पडले. या सत्रात उपाध्यक्ष म्हणून केरळचे डॉ. के. निर्मलबाबू, डॉ. एम. फिजा अहमद काम बघितले. संमेलनाचे आयोजक म्हणून जैन इरिगेशनचे डॉ. बाळकृष्ण यादव, तामिळनाडू कृषि विद्यापीठाच्या डॉ. एच. उषा नंदिनीदेवी यांनी जबाबदारी पार पाडली. डॉ. एच. पी. सिंग यांचे उपजिवका, पोषणद्रव्ये आणि पर्यावरणीय बदल यातून फळबागांचे लागवड व व्यवस्थापन यावर सादरीकरण झाले. इस्त्राईलच्या अॅम्नोन ओफेन यांनी भारत आणि इस्त्राईल यांच्यातील कृषी आणि सिंचन क्षेत्रातील सहकार्य याविषयी सादरीकरण केले. इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल यांनी लसूणाच्या संशोधनाविषयी माहिती दिली.अल्प संसाधने वापरून जास्तीत जास्त फळबागांमधून उत्पादन घेण्यासाठी दुसऱ्या सत्रात विचारमंथन करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष सुरजीत चौधरी ह्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तर डॉ. हर्षवर्धन चौधरी आणि विनोद आनंद यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. या सत्राचे आयोजक म्हणून त्रिचीच्या एनआरसीबी चे डॉ. पी. सुरेश कुमार आणि डॉ. विनोद कुमार यांनी कार्य केले. या सत्रात मेजर सिंग, अरविंद कुमार, बलराज सिंग, जय सिंग परिहार यांनी फळबागातील पिकांसाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग, प्रिसीजन अॅग्रीकल्चर, ग्रीनहाऊस तंत्रज्ञान, भौगोलिक माहितीचा फळबागांसाठी उपयोग यावर सादरीकरण झाले. तर तिसऱ्या सत्रात पपईची उत्पादकता आणि दर्जा सुधारण्यासाठी अचूक तंत्रज्ञान, संसाधनांचा कार्यक्षम वापरासाठी उपाय, फळबागांमधील सेन्सर वापरून फलोत्पादनाचे व्यवस्थापन, किसान ड्रोनचा शेती वापर यावर सादरीकरण झाले. या परिषदेसाठी आयसीएआरचे केळीचे संचालक डॉ. सेव्हाराजन, डॉ. घोष (नागपूर), डॉ. टी. दामोदरण (लखनौ), माजी कुलगुरू डॉ. एनकुमार यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी भाग घेतलाकेळी व बटाटा पिकावर आज कार्यशाळाराष्ट्रीय फलोत्पादन परिषदे दरम्यान उद्या दि. २९ मे ला ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन कार्यशाळा व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या दोन विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये केळी उत्पादकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीचे सचिव के. बी. पाटील यांनी केले आहे.

https://tradingbuzz.in/wp-content/uploads/2023/05/VID-20230528-WA0007.mp4
https://tradingbuzz.in/wp-content/uploads/2023/05/VID-20230528-WA0009.mp4
जॉईन Trading Buzz
Exit mobile version