जैन हिल्स येथे उद्यापासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद

देशभरातील १०० शास्त्रज्ञांचा सहभाग; वातावरणातील बदलांसह तंत्रज्ञानावर होईल मंथन


जळगाव, दि. २७ – नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मे दरम्यान जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या परिषदेमध्ये 11 सत्रात असून जवळपास 100 शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करतील.

जैन हिल्स येथे होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, दिल्लीच्या एएसआरबीचे सदस्य डॉ. मेजर सिंग, माजी सचिव सुरजित चौधरी, ईस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाईचे चेअरमन डॉ. एच. पी. सिंग, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, दिल्ली येथील एनआरएएचे सीईओ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या आयसीएआर-आयएआरआयचे डॉ. विशाल नाथ, माजी सचिव सुरजीत चौधरी यांच्या उपस्थित होणार आहे.

फलोद्यान म्हणजे विविध फळ पिकावर व भाजीपाला व अन्नधान्य उत्पादनाव वातावरण बदलाचा होणारा परिणाम त्यावर मात करण्यासाठी विविध तंत्रज्ञान क्रॉप कुलींग, टर्मिनल हिट मॅनेजमेंट, अल्ट्रा हायडेन्सिटी,अचूक पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा विविध विषयावर शोधनिबंध सादर करतील. यातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्ता यावर विचारमंथन केले जाणार आहे. याच परिषदे दरम्यान ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या दोन विषयावर २९ मे रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे.

या परिषदेमध्ये एकूण ११ सत्र असून जवळपास १०० शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. देशभरातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक व शास्त्रज्ञ, देशातील विविध कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांचा सहभाग असणार आहे. या परिषदेमध्ये काही विद्यापीठांचे कुलगुरू व माजी कुलगुरू देखील उपस्थित असतील. २८ मे रोजी (Confederation of Horticulture Associations of India) CHAI ‘चाई’चे पुरस्कार दिले जाणार आहेत. याच श्रुंखलेत ३० मे रोजी ‘उद्यान रत्न’ पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहेत. संबंधीत सर्वांनी या परिषदेचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती नोंदवावी यासाठी 9422774943 व 9422776925 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग

जळगाव, २७ मे :- जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमात महाराष्ट्र व गुजरातमधील १५५ सरकारी अनुदानित ग्रामीण शाळांमधील १०८५ विद्यार्थी सहभागी होत आहेत. शाळांमधील इन्होवेशन व कृषी व्यवसाय योजना स्पर्धांचे विजेते असलेले ८ वी व ९ व्या इयत्तेतील विद्यार्थी संमेलनामधे सादरीकरण करतील. संमेलन आयोजनाचे हे ९ वे वर्ष असून ते १ व २, ४ व ५, आणि ७ व ८ जून अशा तीन टप्प्यामधे जैन हिल्स जळगाव येथे पार पडेल.

फाली या अत्यंत अनोख्या आणि प्रभावशाली कार्यक्रमाने १३,००० विद्यार्थ्यांसह नववे वर्ष पूर्ण केले आहे. आधुनिक, शाश्वत शेती आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यवसाय आणि नेतृत्व काैशल्ये आणि संधी देऊन पुढील पिढी शेती क्षेत्राकडे आकर्षित व्हावी यासाठी फाली कार्यरत आहे.

असोसिएशन फाॅर फ्युचर अग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडियाची स्थापना कंपनी कायदा कलम ८ अंतर्गत झाली आहे. कंपनीचे संचालक : नादिर गोदरेज – गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, राजू श्राॅफ-यूपीएलचे अध्यक्ष, अनिल जैन – जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नॅन्सी बॅरी – एनबीए एंटरप्राइझ सोल्युशन्स टू पाॅव्हर्टीच्या अध्यक्षा यांचा समावेश आहे. फालीमधील प्रमुख सीएसआर योगदानकर्ते गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, जैन इरिगेशन, स्टार अग्री, रॅलीज आणि ऑम्निवोर या कंपन्या आहेत. या अर्थिक वर्षात फालीला सहकार्य देण्यासाठी इतर अनेक अग्रगण्य कृषी व्यवसाय आणि बँका सामील होण्याची शक्यता आहे.

फालीच्या मागील ९५ टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे की, फालीने आधीच करिअर म्हणून शेतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. ते आता आधुनिक शेती आणि कृषी-उद्योगाकडे एक उत्तम आकर्षक भविष्य म्हणून पाहतात. ते म्हणतात की, फाली उपक्रमाने त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती दिशा आणि योगदान दिले आहे. बहुतांश फाली विद्यार्थी घरच्या शेतीत किंवा कृषी उद्योगात काम करतानाच प्रामुख्याने कृषी, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेत आहेत. ३३,००० पेक्षा जास्त माजी फाली विद्यार्थ्यांसह फाली उपक्रमाने माजी फाली विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, शिष्यवृत्ती आणि व्यवसाय निधी कार्यक्रम तयार केला आहे. ज्यात फालीच्या प्रायोजक कंपन्या विद्यार्थ्यांना थेट सहकार्य देतात. हे फाली विद्यार्थ्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात महत्त्वाच्या टप्प्यांवर कृषी आणि कृषी-उद्योगाबद्दलचे त्यांचे ज्ञान आणि वचनबद्धता दृढ करण्यासाठी प्रोत्साहित करते.

फालीचे दोन दिवसीय होणारे ३ समान भागांमध्ये नववे संमेलन जूनच्या पहिल्या आठवड्यात जैन इरिगेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. फालीच्या १०८५ विद्यार्थ्यांसोबत कंपन्या आणि बँकांचे ५० हुन अधिक प्रतिनिधी सामील होतील जे फालीला सीएसआर निधीतून सहकार्य करतात. क्षेत्र भेटीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात, वेबिनार आणि फाली इनोव्हेशन फिल्म्समध्ये भाग घेतात आणि नाविन्यपूर्ण स्पर्धाचे परीक्षण करतात. फाली अधिवेशनात भाग घेणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक या तरुण लीडरला मार्गदर्शन करतात आणि त्यांना शेती व्यवसाय करण्यास प्रेरित करतात. फालीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी फालीचे माजी विद्यार्थी देखील अधिवेशनाला उपस्थित राहतात..

पहिल्या दिवशी, फाली विद्यार्थी आणि सहभागी कंपनी व्यवस्थापकांना जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी, फालीचे विद्यार्थी बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन स्पर्धांमध्ये भाग घेतील. त्यासाठी कंपनी व्यवस्थापक परीक्षक म्हणून काम करतील.

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर 

जळगाव, २६ मे २०२३ :- भारतातील सर्वात मोठी ठिबक व सूक्ष्म सिंचन आणि केळी व डाळिंब टिश्युकल्चर मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर करण्यात आले आहे. आज जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.

ठळक सकारात्मक बाबी
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने रिवूलीसबरोबर ठरवलेला विलीनीकरण करार २९ मार्च २०२३ ला पूर्ण झाला. 
३१ मार्च २०२३ रोजी जैन इरिगेशनने एका वर्षाच्या कालावधीत यशस्वीपणे पुनर्रचनेची प्रक्रिया अमलात आणली.
तसेच क्रिसील (CRISIL) व इकरा (ICRA) या दोन्ही क्रेडिट रेटिंग एजन्सीनी जैन इरिगेशनचे पत मानांकना (क्रेडिट रेटिंग) मध्ये सुधारणा करून ते स्टँडर्ड अॅसेट (BBB-) केले आहे.
जैन इरिगेशनचा बँक अकाऊंट हा स्टँडर्ड अॅसेट झाला व तो (बँकांच्या) व्यापारी शाखांना हस्तांतरीत झाला.
एकत्रित निकलात FY23 (आर्थिक वर्ष २०२२-२३) ला व्याजाच्या खर्चाची रक्कम २०० कोटी रुपयांनी कमी झाली. नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ ला व्याजाच्या खर्चाची रक्कम एनसीडी (कर्जरोख्यांवरील) व्याजाची रक्कम रोख नसलेली वगळून ३२० कोटी रूपये राहील.


रिवूलीस बरोबर विलीनीकरणाचे रचनात्मक फायदे
निव्वळ किंमतीतील भरपूर वाढ १५२५.१ कोटी रुपये (४१.७ टक्के) : ३१ मार्च २०२२ला ती वाढ ३६५६ कोटी रुपये  होती व  ती ३१ मार्च २०२३ला ५१८१.१ कोटी रुपये एवढी झाली. 
कर्जात २६८३ कोटी रुपयांची घट (४१.९ टक्के) : संपूर्ण एकत्रित कर्ज ३१ मार्च २०२२ अखेर ६४०४.९ कोटी रुपये होते. ते ३१ मार्च २०२३ अखेर ३७२१.९ कोटी रुपये इतके राहिले.
कंटींजेंट लायाबिलीटी (Contingent Liability) देण्याच्या रकमेत ३० कोटी अमेरिकन डॉलर्सने घट.
कर्जाचे कर,व्याज, कर व घसारापूर्व नफ्याशी असलेले गुणोत्तर १.७७ टक्क्यांनी सुधारले. संपूर्ण कर्जाचे कर, व्याज व घसारापूर्व नफ्याशी असलेले गुणोत्तर ६.८५ टक्के इतके ३१ मार्च २०२२ ला होते. ते ३१ मार्च २०२३ला ५.०८ टक्के इतके सुधारले.
जैन इरिगेशनचे रिवूलिसमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर नवीन कंपनीत १८.७ टक्के भागभांडवल राहील. याची किंमत १३.७५ कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी राहील.
अचानक एखादा होणारा फायदा : कामकाज बंद असलेल्या यंत्रांची विक्रीतील फायदा १२३४.६६ कोटी रुपये हे मागील आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये घडले.
एकल निकाल आढावा २०२३ची चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपणारे आर्थिक वर्ष
कंपनीने किरकोळ बाजारातील उत्तम मागणीमुळे उत्पन्नात भरपूर वाढ नोंदवली आणि त्यात मुख्य म्हणजे पाईप विभागास दक्षिण व पश्चिम क्षेत्राहून अधिक मागणी आणि जल जीवन मिशनची चौथ्या तिमाहीतील सतत मागण्यांमुळे वरील उत्पन्नात भरीव वाढ झाली.
चौथ्या तिमाहीत हायटेक विभागाच्या २६.६ टक्के वाढ चौथ्या तिमाहीत तर ३१ मार्च २०२३ अखेर २३.८ टक्के वाढ कंपनीने साध्य केली. याचे कारण म्हणजे सध्याचे प्रकल्प, किरकोळ बाजारातून खूप ऑर्डर्स आणि टिश्यूकल्चर व्यवसायात झालेली वाढ आहे.
कंपनीच्या प्लास्टीक विभागाने चौथ्या तिमाहीत आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात अनुक्रमे ५६.१ टक्के आणि ३५.९ टक्के वाढ नोंदवली. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यात असलेल्या पीव्हीसी पाईपच्या भरपूर ऑर्डर्स व जल जीवन मिशनमध्येसुद्धा चांगली वाढ झाली.
उत्तम नफ्याचे मार्जिन, कामकाजातील कार्यक्षमतेत झालेली वाढ आणि कारखान्यातील  क्षमतेच्या वापरातील चांगल्या वाढीमुळे चौथ्या तिमाहीत कर, व्याज व घसारापूर्व नफा (इबीआयडीटीए) ६८.८ टक्क्यांनी वाढला. 
कंपनीने मागील वर्षात १८३.९ कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज फेडले. पण एनसीडीच्या ६९.39 कोटी रुपयांच्या व्याजाची नोंद रिव्हर्स केल्यामुळे निव्वळ कर्जातील घट ९२.० कोटी रुपये राहिली.
ऑर्डर्स बुक :- सध्या कंपनीच्या ऑर्डर्स पुस्तकामध्ये  १३२७.८ कोटी रुपयांच्या संपूर्ण ऑर्डर्स हातात आहेत. त्यापैकी हायटेक अॅग्री इनपुट विभागाच्या ५९२.४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत व ७३५.४ कोटी रुपये प्लास्टिक विभागाच्या ऑर्डर्स आहेत.
एकत्रित निकाल आढावा २०२३ची चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपणारे आर्थिक वर्ष
कंपनीच्या सर्व व्यवसायात नोंदवलेली उत्पन्नात वाढ ही भारतामध्ये सगळ्या विभागात झालेली आहे. कंपनीच्या उत्पन्नातील वाढ ही प्लास्टिक आणि अन्न प्रक्रिया विभागात नफ्याच्या मार्जिनमध्ये सुधारणा झाल्यामुळे कंपनीच्या कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात (इबीआयडीटीए) सुधारणा झाल्यामुळे कंपनीने साध्य केली.
चौथ्या तिमाहीत हायटेक विभागाने सध्या चालू असलेल्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम, उत्पादनांना किरकोळ बाजारातील जास्त मागणी आणि भारतातील कंपनीचा टिश्यूकल्चर विभागातसुद्धा जास्त मागणी आहे. यामुळेच हायटेक विभागात भरपूर वाढ शक्य झाली. भारतातील निर्जलीकृत कांद्याच्या चांगल्या ऑर्डर्स असल्यामुळे अॅग्रो विभागाची चांगली वाढ झाली. कंपनीच्या फळभाजीपाला प्रक्रियात भारतात आणि जगात पण चांगली वाढ कंपनीने नोंदवली. 
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विलीनीकरण केलेल्या (Discontinned) विभागातून मिळालेले उत्पन्न २२३२.१ कोटी रुपये (आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये  २३८६.१ कोटी रुपये) आणि कर, व्याज व घसारापूर्व नफा (इबीआयडीटीए) २१६.२ कोटी रुपये/९.७ टक्के (आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३८३.६ कोटी रुपये/१६.१ टक्के)
ऑर्डर्स बुक:- सध्या कंपनीच्या हातात ऑर्डर्स पुस्तकामध्ये  २३५४.८ कोटी रुपयांच्या संपूर्ण ऑर्डर्स हातात आहेत. त्यापैकी हायटेक अॅग्री इनपुट विभागाच्या ५९२.४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत, ७५७.१ कोटी प्लास्टीक विभागाच्या ऑर्डर्स व १००५.३ कोटी रुपये अॅग्रो प्रक्रिया विभागाच्या ऑर्डर्स आहेत.

(वक्तव्य) :- श्री. अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

आम्हाला ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर करतांना अतिशय आनंद होत आहे.  कंपनीने सर्व व्यवसायात उत्पन्नात भरपूर वाढ  नोंदवली आहे व नफादेखील आमच्या अपेक्षेनुसार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देखील कंपनी आपली जोरदार वाढ चालू ठेवेल अशी आमची आशा आहे. सकारात्मक ऑर्डर्समुळे आमच्या सर्व व्यवसायात कंपनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करुन धाेरणांची अंमलबजावणी करेल. आम्ही वाढीचा दर साध्य करु आणि तरीही ताळेबंदावर लक्ष केंद्रित करत आहोत. कंपनीने एकत्रित चौथ्या तिमाहीच्या उत्पन्नात Y ON Y बेसिसवर २७ टक्क्यांची वाढ साध्य केली आणि ते १७४५ कोटी रुपयावर पोहोचले. (कर, व्याज व घसारापूर्व नफा मार्जिन [इबीआयडीटीए] १४.१ टक्के). तसेच कंपनीने ३१ मार्च २०२३ अखेरीस एकत्रित उत्पन्न २१.४ टक्क्यांनी वाढून ते ५७४८ कोटी रुपये नोंदवले (कर, व्याज व घसारापूर्व नफा मार्जिन [इबीआयडीटीए] १२.७ टक्के). एकत्रित निकालात कंपनीने संपूर्ण वर्षात ४५ कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलात रोख व एकल निकालात कंपनीने संपूर्ण  वर्षात ३९३.१ कोटी रुपये रोख प्रवाह (कॅश फ्लो) निर्माण केला. निव्वळ खेळत्या भाडवलाच्या चक्रात २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६४ दिवसांची सुधारणा कंपनीने केली आहे. तसेच कंपनीने जल जीवन मिशन अंतर्गत रेट काँट्रॅक्ट करारावर महाराष्ट्रात पुरवठा सूरु केला आहे. तसेच कंपनी सातत्याने नफ्याचे मार्जिन आणि कॅश फ्लो मध्ये सुधारणा करत आहे आणि ते दीर्घ काळात आमचे लक्ष्य गाठायला मदत करेल. सध्या एकत्रित बेसिसवर कंपनीच्या हातात २३५४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत.
अनिल जैन,उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

एश्वर्य नितीन चोपडा ला वाणिज्य शाखेत ९७ टक्के

जळगाव दि.२५ – एम.जे.कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी (क) वाणिज्य शाखेचा विद्यार्थी एश्वर्य नितीन चोपडा हा ९७ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला. त्याला अकॉउंट्स विषयात १०० पैकी १००, गणित १०० पैकी १००, माहिती तंत्रज्ञान १०० पैकी १०० गुण मिळाले. त्याची आई सौ. रेशमा (हेमलता), वडील नितीन, आजोबा मोहनलाल चोपडा यांच्यासह गुरुजन व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, बहिण समीक्षा व गरिमा यांचे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३”

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ या स्पर्धा शुक्रवार, दिनांक ०९ जून ते रविवार, दिनांक ११ जून २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा स्वरूपात घेतल्या जातील.


संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात नाव नोंदणीची अंतिम दिनांक ०६ जून २०२३ असून संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी व माहितीसाठी श्री किशोर सिंह मोबाईल नंबर ०९४२११२११०६. पत्ता:- कांताई सभागृह जैन स्पोर्ट्स अकॅडमी, नवीन बस स्टँड जवळ, जळगाव. यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अतुल जैन यांनी केले आहे.

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जळगाव दि.२४ जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले.

जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघ (डावीकडून) प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, व मागील रांगेत आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले


कांदिवली येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या. त्यात १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. विजयासाठी १६६ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब ला २० षटकांत ९ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. जैन इरिगेशनचा फिरकीपटू शुभम शर्मा, शशांक अत्तरदे आणि जगदीश झोपे यांनी अचूक मारा करत विजय सुकर केला. जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघात प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले यांचा समावेश होता.
संक्षिप्त धावफलक जैन इरिगेशन सीसी : २० षटकांत ८ बाद १६५, त्यामध्ये कौशल तांबे (२७ चेंडूंत ४४ धावा, २ चौकार, २ षटकार), सुवेद पारकर (२४ चेंडूत ३७ धावा, ५ चौकार), जय जैन २४; संतोष चव्हाण ३/२४, आदित्य राणे ३/२९) विजयी विरूद्ध ऑटोमोटिव्ह सीसी : २० षटकांत ९ बाद १४४. त्यामध्ये आदित्य शेमाडकर (२४ चेंडूंत ३७ धावा ६ चौकार, मनेश भोगले (२१ चेंडूत नाबाद ३२, चौकार १, षटकार २, सुशांत वाजे (१९ चेंडूत २७ धावा, २ चौकार, २ षटकार); शुभम शर्मा ३/१६, जगदीश झोपे २/२२, शशांक अत्तरदे २/२४)

सेबीची मोठी कारवाई! एका कंपनीवर 6 महिन्यांची बंदी, 5 संस्थांना ₹ 25 लाखांचा दंड, तपशील वाचा

ट्रेडिंग बझ – भांडवली बाजार नियामक सेबी (SEBI- Securities and Exchange Board of India / भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड) ने 5 संस्थांना एकूण 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. SEBI ने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मधील इलिक्विड स्टॉक ऑप्शन्स सेगमेंटमध्ये अयोग्य व्यवहार केल्याबद्दल या लोकांना हा दंड ठोठावला आहे. SEBI ने ज्यांच्यावर एकूण 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे त्यात चित्राबाई वसंतराव निकम, दमयंती झुनझुनवाला, नेमीचंद कस्तुरचंद जैन, नरेश कुमार अग्रवाल आणि चंद्र लक्ष्मी सेफ्टी ग्लास लिमिटेड (CLSG) यांचा समावेश आहे. सेबीने या लोकांना 5-5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

एप्रिल 2014 ते सप्टेंबर 2015 दरम्यान तपास :-
SEBI ने BSE वरील इलिक्विड स्टॉक ऑप्शन्समधील मोठ्या प्रमाणावर उलटसुलट व्यवहारांची तपासणी केली, ज्यामुळे एक्सचेंजमध्ये कृत्रिम खंड निर्माण झाला. एप्रिल 2014 ते सप्टेंबर 2015 पर्यंत, नियामकाने या विभागाशी संबंधित काही संस्थांच्या व्यापार क्रियाकलापांची तपासणी केली.

या 5 लोकांनी या नियमाचे उल्लंघन केले :-
SEBI ला आढळले की हे 5 लोक या उलट व्यवहारात गुंतलेले लोक आहेत, त्यामुळे SEBI ने त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिव्हर्सल ट्रेडचे स्वरूप कथितरित्या अयोग्य आहे कारण ते सामान्य व्यवहारात चालवले जातात. नियामकाने निदर्शनास आणून दिले की कृत्रिम व्हॉल्यूममध्ये व्यापार करताना ते खोटे आणि दिशाभूल करणारे स्वरूप तयार करतात. सेबीने आपल्या आदेशात सांगितले की, या 5 जणांनी अशा कृतीद्वारे PFUTP (फ्रॉड्युलंट अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस प्रतिबंध) नियमांचे उल्लंघन केले आहे.

सेबीने या कंपनीवर बंदी घातली :-
याशिवाय, दुसर्‍या आदेशात, भांडवली बाजार नियामक सेबीने उदय इंटेलिकॉल प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर सिक्युरिटीज मार्केटमधून 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. सेबीने सांगितले की ही कंपनी अनधिकृत गुंतवणुकीचा सल्ला देत होती, त्यानंतर सेबीने कारवाई करत या कंपनीवर आणि तिच्या संचालकांवर बंदी घातली.

कंपनी अनधिकृत गुंतवणुकीचा सल्ला देत असे :-
पुढील 3 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र किंवा वेगळे परत केले जावेत, असेही सेबीने म्हटले आहे. रजत सराफ आणि कल्पना जैन हे या कंपनीचे संचालक होते. सेबीच्या म्हणण्यानुसार, उदय इंटेलिकॉल गुंतवणूक सल्लागार सेवा पुरवते आणि कंपनीकडे आवश्यक प्रमाणपत्रे नव्हती. सेबीने सांगितले की ही कंपनी सेबीकडे नोंदणीकृत नाही.

सराफ आणि जैन हे कंपनीचे संचालक तसेच कंपनीचे भागधारक असल्याची माहितीही सेबीने दिली. हे दोन्ही लोक कंपनीने दिलेल्या सल्ल्याचा फायदा घेऊन पैसे कमवत होते, जे गुंतवणूक सल्लागार (IA) नियमांचे उल्लंघन आहे. SEBI ने सांगितले की मार्च 2018 पासून आतापर्यंत कंपनीने अनधिकृत गुंतवणूक सल्लागाराद्वारे 1.06 कोटी रुपये जमा केले आहेत.

टेस्ला कार भारतात येणार की नाही ? भारत सरकार आणि टेस्ला अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला !

ट्रेडिंग बझ – टेस्ला आणि भारत सरकार यांच्यात टेस्लाच्या गाड्या भारतात बनवल्या जातील की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे कारण अलीकडेच भारत सरकारशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की टेस्लाने भारत सरकारशी संपर्क साधला आहे. टेस्ला ही अमेरिकेतील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने माहिती दिली की, टेस्लाने केंद्र सरकारशी संपर्क साधला असून दोघांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

केंद्र सरकार शुल्क कमी करणार :-
पीटीआयच्या वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लाने भारत सरकारशी संपर्क साधला आहे. भारत सरकार नो ड्युटी कटवर ठाम आहे आणि सध्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी ड्युटी कमी करण्याचा कोणताही इरादा नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले आहे.

टेस्लाने बैठकीसाठी सरकारशी संपर्क साधला :-
अधिकाऱ्याने सांगितले की, “टेस्लाने या बैठकीसाठी केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. याआधीही टेस्लाने आयात शुल्क कमी करण्याचा पहिला प्रस्ताव स्वीकारलेला नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. कारण देशातील देशांतर्गत उत्पादन उद्योगाला चालना देण्यावर सरकारचा अधिक भर आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आता आम्हाला माहित नाही की टेस्ला हाच प्रस्ताव घेऊन येत आहे की दुसरा प्रस्ताव घेऊन.” असे ते म्हणाले .

यावर इलॉन मस्क ठाम आहेत :-
मात्र, भारत सरकार नो ड्युटी कटची पूर्णपणे अंमलबजावणी करेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी, टेस्लाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी एलोन मस्क, जे आधी भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्यासाठी आयात शुल्कात कपात करण्याच्या विचारात होते, ते यापुढे त्यांची उत्पादने तयार करणार नाहीत तोपर्यंत ते देशात प्रथम त्यांच्या कार विकू शकत नाहीत.

मतांच्या भांडणामुळे कामे होत नाहीत :-
एका ट्विटला उत्तर देताना एलोन मस्क म्हणाले की, टेस्ला अशा कोणत्याही ठिकाणी उत्पादन प्रकल्प उभारणार नाही जिथे आम्हाला आधी कार विकण्याची आणि सेवा देण्याची परवानगी नाही. यापूर्वी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी म्हणाले होते की टेस्ला भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास तयार असताना कोणतीही अडचण नाही परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये.

ऑगस्ट 2021 मध्ये, एलोन मस्क यांनी सांगितले होते की जर टेस्लाची आयात केलेली युनिट्स भारतात यशस्वी झाली नाहीत तर तो तोपर्यंत उत्पादन युनिट स्थापन करणार नाही. ते म्हणाले की, टेस्लाला भारतात कार निर्मिती करायची आहे पण भारतात सर्वाधिक आयात शुल्क आहे. सध्या, भारत पूर्णपणे आयात केलेल्या कारवर 100 टक्के आयात शुल्क आकर्षित करतो ज्यामध्ये CIF म्हणजेच किंमत, विमा आणि मालवाहतूक यांचा समावेश आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी – महागाई भत्ता कधी जाहीर होणार, तारीख लक्षात घ्या!

ट्रेडिंग बझ – केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना आनंदाची बातमी घेऊन येत आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. पुढील बदल जुलै 2023 मध्ये होणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर त्यात 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. पण, त्याच्या घोषणेबाबतही एक इशारा मिळाला आहे. AICPI निर्देशांकाची मार्चपर्यंतची आकडेवारी आली आहे. अजून तीन महिन्यांचा आकडा येणे बाकी आहे. यामुळे डीए स्कोअर वाढू शकतो. सध्याच्या आकड्यांच्या आधारे अडीच टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र, अंतिम आकडा आल्यानंतर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, महागाई भत्त्यात (डीए वाढ) 4% वाढ होईल. त्याचबरोबर सप्टेंबरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते.

महागाई भत्ता 4% वाढ निश्चित आहे :-
नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू होईल. या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या पगारात वाढीव डीए जोडून लाभ दिला जाणार आहे. सध्याच्या डीएचा फरक थकबाकीसह दिला जाईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. निर्देशांकाचा कल पाहिला तर तो 4 टक्क्यांनी वाढण्याची खात्री आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवर जाईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI निर्देशांकाशी जोडलेला आहे. आतापर्यंत आलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, महागाई भत्त्यात मोठी झेप पाहायला मिळते.

सप्टेंबरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत घोषणा केली जाऊ शकते :-
जानेवारी आणि जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ लागू आहे. परंतु, मार्च आणि सप्टेंबर महिन्यात ते जाहीर केले जातात. जानेवारी 2023 साठी वाढलेला महागाई भत्ता 24 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. त्याच वेळी, आता जुलै 2023 साठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा सप्टेंबरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये अपेक्षित आहे. सध्या, महागाई भत्त्यात (डीए वाढ) 4% वाढ होण्याची शक्यता आहे. निर्देशांक 133.3 वर पोहोचला आहे. AICPI निर्देशांकाचा पुढील क्रमांक 31 मे रोजी संध्याकाळी प्रसिद्ध केला जाईल.

डीए 4% ने वाढेल असा तज्ञांचा दावा :-
महागाईची गणना करणारे तज्ञ दावा करतात की जुलै 2023 साठी 4% DA वाढ मंजूर केली जाईल. ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स- IW चे एप्रिल, मे आणि जूनचे आकडे अजून समोर आलेले नाहीत, पण आतापर्यंत ज्या गतीने निर्देशांक वाढला आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे की महागाई भत्ता 4% पर्यंत वाढेल. निर्देशांकाचा अंतिम क्रमांक 31 जुलैपर्यंत येईल, जो महागाई भत्त्यात एकूण वाढ निश्चित करेल.

डीए हाईक, किती वाढेल हे कसे कळणार :-
केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ग्राहक महागाईवर अवलंबून असतो, म्हणजेच अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक. जर या आकड्यात सतत वाढ होत असेल तर त्याच क्रमाने महागाई भत्ताही वाढतो. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील ग्राहक महागाईचे आकडे तीन महिन्यांवर आले आहेत. हा ट्रेंड पाहता येत्या काही दिवसांत महागाई भत्ता 4% दराने वाढेल असे दिसते. पण, आता उर्वरित निर्देशांकांचे आकडेही पाहावे लागतील.

7 वा वेतन आयोग, नवीन सूत्रातून महागाई भत्त्याची घोषणा :-
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महागाई भत्त्याच्या गणनेचे सूत्र बदलले होते. कामगार मंत्रालयाने डीए गणनेचे आधार वर्ष बदलले आहे. मजुरी दर निर्देशांक (WRI-मजुरी दर निर्देशांक) ची नवीन मालिका प्रसिद्ध झाली. यामध्ये कामगार मंत्रालयाने 2016 = 100 या आधारभूत वर्षासह WRI ची नवीन मालिका जारी केली. हे 1963-65 बेस इयरच्या जुन्या मालिकेच्या जागी लागू केले गेले.

SBI ची जबरदस्त स्कीम – एकदा पैसे जमा करा, दर महिन्याला पैसे मिळेल, जाणून घ्या काय आहे खासियत !

ट्रेडिंग बझ – जेव्हा नोकरदार लोक निवृत्त होतात तेव्हा त्यांना निवृत्तीच्या काळात एकरकमी रक्कम मिळते. समस्या फक्त नियमित उत्पन्नाची आहे. अशा परिस्थितीत, SBI ची वार्षिकी ठेव योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या योजनेत तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतील. त्या बदल्यात, तुम्ही व्याजाच्या स्वरूपात नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

3वर्षे ते 10वर्षे उत्पन्नाची व्यवस्था :-
एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, कोणतीही व्यक्ती वार्षिकी ठेव योजनेद्वारे 3 वर्षे ते 10 वर्षांपर्यंत नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकते. या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा केले जातात. योजनेत किमान इतके पैसे जमा करणे आवश्यक आहे की तुम्ही निवडलेल्या कालावधीपर्यंत तुम्हाला दरमहा किमान 1000 रुपये मिळू शकतील. कमाल ठेवीवर मर्यादा नाही.

किती व्याज मिळते :-
आता व्याजाचा प्रश्न येतो कारण नियमित उत्पन्नातून जे काही पैसे मिळतात ते व्याजदरानुसार मोजले जातात. या योजनेतील व्याजदर बचत खात्यापेक्षा जास्त आहे. बँकेच्या मुदत ठेवीवर म्हणजेच FD (फिक्स्ड डिपॉझिट) वर मिळणाऱ्या ठेवीवर तेच व्याज मिळते. खाते उघडण्याच्या वेळी कोणताही व्याजदर उपलब्ध असेल, तो तुम्हाला योजनेच्या कालावधीसाठी उपलब्ध राहील.

मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम :-
तुम्हाला अन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये मुदतपूर्व ठेवीचा पर्याय देखील मिळतो. आपत्कालीन परिस्थितीत, कोणत्याही एका खात्यातून जास्तीत जास्त 15 लाख रुपये काढता येतात. 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा राहील आणि त्या बदल्यात, निर्धारित वेळेपर्यंत मासिक हप्ते मिळतील. दंडाबाबतही तेच नियम लागू होतात, जे FD ला लागू होतात. तथापि, खातेदाराचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीद्वारे संपूर्ण रक्कम काढता येईल.

75% पर्यंत ओव्हरड्राफ्ट घेऊ शकता :-
एसबीआयच्या या योजनेत गरजेच्या वेळी खूप काम आहे. यामध्ये तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. आवश्यक असल्यास, खात्यातील शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत ओव्हरड्राफ्ट/कर्ज मिळू शकते. कर्ज घेतल्यानंतर, अन्युइटी पेमेंट कर्ज खात्यात जमा केले जाईल. या योजनेत ग्राहकांना युनिव्हर्सल पासबुकही दिले जाते. बँकेची ही सुविधा SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असेल.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version