महत्वाची बातमी; कर्ज फेडल्यानंतर या 5 गोष्टी न केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकतात !

ट्रेडिंग बझ – आजच्या काळात महागाई एवढी वाढली आहे की सर्वसामान्यांना आपली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषत: जेव्हा घर किंवा फ्लॅट इत्यादी खरेदी करण्याचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोक कर्जाद्वारे त्यांचे काम पूर्ण करतात. गृहकर्ज दीर्घकाळासाठी घेतले जाते आणि दर महिन्याला त्याचा हप्ता खात्यातून कापला जातो आणि हप्ता जमा करण्यासाठी बँकेत जाण्याचा त्रास संपतो.

परंतु कर्ज पूर्ण झाल्यानंतर बँकेत जाऊन काही गोष्टी करणे आवश्यक आहे जेणेकरून कर्ज बंद होईल आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. जर तुम्ही पहिल्यांदा कर्ज घेतले असेल आणि तुम्हाला कर्ज बंद झाल्याबद्दल माहिती नसेल, तर जाणून घ्या ह्या खास गोष्टी.

कोणतेही देय प्रमाणपत्र मिळवा (नो ड्युज सर्टिफिकेट) :-
तुम्ही तुमचे कर्ज बंद केल्यावर, बँकेकडून थकीत नसलेले प्रमाणपत्र ग्राहकाला दिले जाते. हे प्रमाणपत्र मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र म्हणजे तुमची बँकेची कोणतीही देणी नसल्याचा पुरावा आहे. तुम्ही जे काही कर्ज घेतले होते ते तुम्ही परत केले आहे.

धारणाधिकार काढून टाका (Lien) :-
बँक किंवा कोणतीही कर्ज देणारी संस्था ग्रहणाधिकाराद्वारे तुमच्या मालमत्तेवर त्यांचे अधिकार जोडते. म्हणूनच कर्ज पूर्ण झाल्यानंतर धारणाधिकार काढून घेण्यास विसरू नका. धारणाधिकार काढून टाकल्यानंतर, तुमच्याशिवाय इतर कोणाचाही मालमत्तेवर अधिकार नाही.

तुमचे क्रेडिट प्रोफाइल अपडेट करायला विसरू नका :-
कर्ज बंद केल्यानंतर, तुम्ही तुमचे क्रेडिट प्रोफाइल अपडेट केले पाहिजे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कर्ज घेताना कोणतीही अडचण येऊ नये. जर हे त्यावेळी घडले नसेल, तर क्रेडिट स्कोअरवर लक्ष ठेवा आणि ते लवकरात लवकर अपडेट करा.

बोजा नसलेले प्रमाणपत्र (नॉन इन्कमब्रंस सर्टिफिकेट) :-
मालमत्तेवर कोणतेही नोंदणीकृत भार नसल्याचा पुरावा म्हणून गैर-भार प्रमाणपत्र जारी केले जाते. हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये सर्व परतफेडीचे तपशील दृश्यमान आहेत. जेव्हा तुम्ही तुमची मालमत्ता कुठेतरी विकायला जाता तेव्हा खरेदीदार तुमच्याकडून बोजा प्रमाणपत्र मागतो.

मूळ कागदपत्रे गोळा करायला विसरू नका :-
या सर्व गोष्टी केल्यावर तुमच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे बँकेतून जमा करा. खरं तर, जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुमच्या घराची मूळ कागदपत्रे बँकेत जमा केली जातात आणि फोटो स्टेट प्रत तुम्हाला दिली जाते. कारण जोपर्यंत तुमचे कर्ज पूर्ण होत नाही तोपर्यंत बँकेचा त्या मालमत्तेवर अधिकार असल्याचे मानले जाते. मूळ कागदपत्रे घेतल्यावरच मालमत्ता पूर्णपणे तुमची होईल. या प्रकरणात कोणतीही चूक करू नका कारण त्यासोबत वाटप पत्र, ताबा पत्र, कायदेशीर कागदपत्र विक्री करार, बिल्डर-खरेदीदार करार, विक्री करार आणि इतर अनेक कागदपत्रे असू शकतात.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं महागलं, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्यासाठी खिशातून किती पैसे काढावे लागतील ?

ट्रेडिंग बझ – आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने 440 रुपयांनी महागले, तर चांदीच्या दरात 1050 रुपयांची वाढ झाली. आज देशाची राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 60820 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. चांदीचा भाव प्रतिकिलो 74350 रुपये होता. परदेशातील बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, स्पॉट गोल्ड सध्या प्रति औंस $ 1965 च्या पातळीवर आहे, तर चांदीचा दर प्रति औंस $ 24.35 आहे.

डॉलर निर्देशांक पुन्हा वाढला :-
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी पीटीआयच्या एका अहवालात सांगितले की, अमेरिकन डॉलर निर्देशांकाने पुन्हा वेग पकडला आहे. बाँडचे उत्पन्न अधिक मजबूत होत आहे. अमेरिकेने कर्ज मर्यादा ज्या प्रकारे व्यवस्थापित केल्या, त्यानंतर जूनमध्ये FOMC बैठकीत व्याजदर पुन्हा वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर किती आहे ? :-
IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, आज 24कॅरेट सोन्याची बंद किंमत 5998 रुपये प्रति ग्रॅम होती. तसेच 22 कॅरेटचा भाव 5854 रुपये, 20 कॅरेटचा भाव 5338 रुपये, 18 कॅरेटचा भाव 4858 रुपये आणि 14 कॅरेटचा भाव 3868 रुपये प्रति ग्रॅम होता.

MCX वर सोन्याची घसरण :-
MCX वर ऑगस्ट डिलीवरी सोने सध्या 65 रुपयांच्या घसरणीसह 59286 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. जुलै डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 140 रुपयांनी घसरून 73810 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ सुरू

खा. उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन

जळगाव दि.९ जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ चे उद्घाटन दि. ०९ जून २०२३ रोजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येत आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९० खेळाडूंचा सहभाग आहे.

डावीकडून कल्पेश मालपुरे, मयूर भावसार, किशोर सिंह, रवींद्र धर्माधिकारी, खासदार श्री उमेश दादा पाटील, चेतना शहा, अमोल पाटील.

खा. उन्मेष पाटील यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी यांनी केले.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक किशोर सिंह आणि सहकारी जाजीब शेख, गीता पंडित, करण पाटील, रोनक चांडक, तेजम केशव, अतुल ठाकूर, आयशा खान, तसेच स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शहा व पंच म्हणून देवेंद्र कोळी, भुषण पाटील, योगेश टोंगले, दर्शन गवळी यांनी काम पाहिले.

फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

जळगाव दि.८ – शेत, शेतकरी यांच्या जीवनात विज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढीच्या दृष्टिने जैन इरिगेशनसह इतर कृषिपुरक कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सामाजीक, राजकीय, शासकीय सर्वच स्तरावर सामाजिक प्रश्न जो गांभीर्य धरत आहे तो म्हणजे शेत, शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळत नाही. ही प्रतिष्ठा फालीसारख्या उपक्रमातून मिळू पहात आहे. समाजाकडून जे घेतले त्यातून उतराई होण्याचा फाली हा उपक्रम कौतूकास्पद असल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केले.

फालीच्या विजेत्यांसोबत अतुल जैन, नॅन्सी बॅरी व प्रातिनिधीक कंपन्यांचे प्रतिनीधी
फालीच्या समारोपाप्रसंगी कॅप उडवून आनंद व्यक्त करताना सहभागी सर्व
फालीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अतुल जैन

जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली च्या नवव्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत अतुल जैन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांच्यासह ज्यांनी प्रायोजकत्व केले त्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुत्रसंचालन हर्ष नौटियाल, रोहिणी घाडगे यांनी केले. आभार नॅन्सी बॅरी यांनी मानले त्यात त्यांनी फाली ई कोर्सची संकल्पना राजस्थान येथून सुरू करत असल्याचे सांगितले. याची जबाबदारी सौ. अंबिका अथांग जैन यांनी घेतलेली असल्याचे जाहिर केले. रूचिता तोटे, क्षितीजा कुंभार, गुंजन चौधरी, सुप्रिया जिते या फालीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यासोबतच माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कंपनी प्रतिनिधींच्या वतीने डॉ. जयंत उमरे, मयूर राजवाडे, सौरभ घोषरॉय, आशिष शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरात संवाद साधला. यात जैन इरिगेशनच्या प्रेरणादायी प्रवासाची गोष्टी स्वरूपात माहिती दिली. शेती समोर असलेली आव्हाने दूर करत असताना सामाजिक दृष्टीने संवेदनशील पणे बघणे गरजेचे आहे. शेती समाजात पत, प्रतिष्ठा मिळावी. फाली हा विद्यार्थ्यांसह शेतीमधील भविष्यदर्शी नेतृत्व निर्माण करण्याचा यज्ञ आहे. आम्ही भारतीय म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा यज्ञ अव्याहतपणे सुरू ठेवावा. कारण शेती हाच जगातील कुठल्याही देशाचा प्रगतीचा मार्ग आहे. शेती हिच संस्कृती असून तेच जीवन आहे. भविष्यात शेत, शेतकरी यांची कास सोडू नका अशी साद अतुल जैन यांनी उपस्थितांना घातली.

जैन हिल्सच्या आकाश मैदानावर विद्यार्थ्यांनी ३१ इन्होव्हेशन व बिझनेस प्लॅन सादर केले. यात बायोडिझेल फॉर्म, स्पिरुलिना शेती, बांबु शेती व त्याची उत्पादने, मल्टी व्हिटामिन पावडर, मल्टि पर्पज फ्रूट एन्झाईम, आवळा शेती आणि त्याची अन्य उत्पादने, आयुर्वेदीय शेती, केळीचा खजिना, मधमाशी पालनातून मधाचे संकलन’ कापड निर्मिती, एकात्मिक शेती, चिया सिड फार्मिंग, नारळाच्या करवंटीपासून शोभेच्या वस्तू, मिरची पावडर व लोणचे, भरघोस वाढीसाठी ॲमिनो ॲसिड, काॕकनट फॕक्टरी, शेवगाची पानं, सेंद्रिय गुळ पेढा, धुप अगरबत्ती उत्पादन, मनुका तयार करणे, कढिपत्याची चटणी व अन्य उत्पादने, बिट उत्पादन व अन्य उत्पादने, तृणधान्यापासून कुरकुरे, भाजी व फळं निर्जिलीकरण, गोसबेरी प्रोडक्टर अशी भन्नाट कल्पना असलेले मॉडेल प्रभावीपणे सादर केले.

परिक्षक म्हणून यांनी काम पाहिले
परिक्षक म्हणून जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ.जयंत उमरे, रवी सिंग (गोदरेज ॲग्रोवेट), डॉ. शविंदर कुमार (महिंद्रा), सौरभ घोषरॉय, पराग सबनिस (स्टार ॲग्री), आशिष शेंडे (रॕलिज इंडिया), मयूर राजवाडे, अविनाश ठाकरे (यूपीएल), राजन शर्मा (एचडीएफसी बँक), एम. के. डे (नाबार्ड), यादेराव पडोळे (समुन्नती) उपस्थित होते.

बिझनेस प्लॅन सादरीकरण स्पर्धेतील विजेते
हर्ब रिच बनाना, नवमहाराष्ट्र विद्यालय पांढरे, जि. पुणे (प्रथम), कर्मवीर फिंगर क्रंची स्नॅक्स, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे जि.सांगली (द्वितीय), ब्रुम ग्रास फार्मिंग ॲण्ड ब्रुम प्रॉडक्शन वसंतराव नाईक हायस्कूल जरूड जि. अमरावती (तृतीय), जादुई पेरू सोमेश्वर विद्यालय, अंजनगाव जि. पुणे (चतुर्थ), सेंद्रिय गुळ पेढा श्री. निगमानंद विद्यालय, तळणेवाडी जि. बीड (पाचवा) क्रमांकाने विजयी झाले.

इन्होव्हेशन स्पर्धेतील विजेते
द्राक्ष फवारणी मॉडेल, न्यू इंग्लिश स्कूल रिधोरे जि. सोलापूर (प्रथम), स्मार्ट इरिगेशन सिस्टीम्स, प्रभात हायस्कूल पुसला जि. अमरावती (द्वितीय), ट्रान्सप्लान्टींग मशिन, श्री. संत मुक्ताबाई विद्यालय शेलगाव जि. पुणे (तृतिय), न्यू फार्मिंग सिक्युरिटी, न्यू इंग्लिश गर्ल स्कूल मलकापूरर जि. बुलढाणा (चतुर्थ), कर्मवीर चाळणी यंत्र, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा (पाचवा) हे विजेते ठरले.

फाली उपक्रमाची वैशिष्ट्ये
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकूण ८७ ॲग्रिकल्चर एज्युकेटर असुन त्यापैकी ५४ एमएस्सी ॲग्री व ३३ बिएस ॲग्री पदवीधर आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि आता मध्यप्रदेश मधील १८० ग्रामीण शाळेतील १५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग. फालीचा शिक्षणाचा विद्यार्थ्यांसह पालकांचा शेती व्यवसायात चपखल वापर होत आहे. यातील बहुतांशी विद्यार्थी (सुमारे ५४ टक्के) शेती क्षेत्रात भवितव्य घडविणार. फालीच्या प्रायोजक कंपन्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, व्यवसायासाठी बिज भांडवल, कामाच्या अनुभवासाठी इंटर्नशिप व सर्वतोपरी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..! 

शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

जळगाव दि. ७  इंजिनिअरींग झाल्यानंतर वडीलांनी दोन पर्याय समोर ठेवले. काळ्या आईची सेवा की नोकरी.. यात शेतीला पुढील काळात भवितव्य आहे यामुळेच इंजिनिअरींग पेक्षा शेती करण्याचा पर्याय निवडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, ऑटोमेशन, टिश्यूकल्चर या विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यातूनच ५० एकर पासून ११० एकर शेती वाढवली. आज मध्यप्रदेशातील सर्वात समृद्ध गाव म्हणून दापोरा (जि. बुऱ्हाणपूर) आहे. फार्मर ते फॉर्च्युनर ही समृद्धी केवळ आधुनिक शेतीमुळेच साधता आली. असे अत्यंत प्रेरणादायी बोल योगेश्वर पाटील यांचे आहेत. भवरलालजी जैन यांच्या चरित्रातून आपल्याला शेती करण्याची प्रेरणा मिळाली असेही त्यांनी आवर्जून सांगितले.जैन हिल्सच्या आकाश मैदानावर झालेल्या या सुसंवाद कार्यक्रमात स्वप्नील प्रकाश महाजन, (वाघोदा ता. रावेर), प्रविण पाटील (महेलखेडी, ता. मुक्ताईनगर), गणेश तराळ, (अंतुर्ली ता. मुक्ताईनगर), अतुल उल्हास चौधरी (सांगवी, ता. यावल), प्रमोद बोरोले (साक्रीफेकरी ता. भुसावळ) या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी शेतकऱ्यांनी आपआपले अनुभव कथन केले. यात ‘फार्मसीचे शिक्षण होऊन औषधालय सुरू केले. यातून जनसंपर्क वाढला. आपल्या शिक्षणाचा, जनसंपर्काचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा याच उद्देशाने स्वत: बरोबर इतरही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारा प्रवास शिरपूर तालुक्यातील प्रगतशील युवाशेतकरी पद्माकर पाटील यांनी फालीच्या विद्यार्थ्यांसमोर आपला कृषिविकासाचा पट मांडला. फाली विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात आपल्या कृषिज्ञानात भर पडेल अशा बाबी जाणून घेतल्या. यावेळी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कंपनी प्रतिनिधींदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फालीच्या तिसऱ्या टप्प्यात  पहिल्या दिवशी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन केंद्रावरील प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी बघितले. यात फ्युचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक, जैन स्विट ऑरेंज, अति सघन पद्धतीने लागवड केलला आंबा, पेरू व अन्य फळबागांची भेट  दिली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी शेतावर जाऊन माहिती घेतली. 

आज कृषि बिझनेस मॉडेल व इन्होव्हेशनचे प्रदर्शन
गत १ जून पासून तिन टप्प्यात पार पडत असलेल्या फालीच्या नवव्या संमेलनास महाराष्ट्र, गुजरात मधील ग्रामीण क्षेत्रातील १०८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील उद्या दि. ८ जून ला तिसऱ्या टप्प्याचा समारोप होईल. यामध्ये ३१ बिझनेस व इन्होव्हेशन विद्यार्थी सादर करणार आहेत.

फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट – अनिल जैन

फालीच्या दुसऱ्या सत्राचा समारोप

जळगाव दि.५ – कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषीक्षेत्रात भविष्यात सशक्त नेतृत्व निर्माण व्हावे, शेतीविषयक आत्मविश्वास वाढून ती व्यवसायाभिमूख व्हावी यासाठी फाली उपक्रम राबवित आहोत. शिष्यवृत्ती देणे, इंटर्नशिप उपलब्ध करून देणे आणि व्यवसाय उभारणीसाठी ‘बीजभांडवल’ उपलब्ध करून देणे ह्या तीन प्रकारे फाली विद्यार्थ्यांना मदत करत असते. विज्ञान, तंत्रज्ञानासह कृषिअभियांत्रिकी क्षेत्रात प्रगतीसाठी प्रोत्साहित करणे. यातुन ॲग्रिकल्चर इंजिनियर तयार होऊन कृषी क्षेत्राला व्यावसाईक रूप देतील व शेतीतील नैराश्य नक्कीच कमी होईल, अशा विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा फालीचे चेअरपर्सन अनिल जैन यांनी व्यक्त केला.

गोदरेज अॅग्रोवेटचे कार्यकारी संचालक बुर्जीस गोदरेज यांनी फालीतील विद्यार्थ्यांचे कौतूक केले. संशोधक वृत्ती, जिज्ञासा व परिश्रम हे तिन्ही गुण फ्युचर ॲग्रीकल्चर लिडर अर्थात फालीतील विद्यार्थ्यांजवळ असल्याचे सांगितले. फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांनी फाली उपक्रमांच्या फलश्रुतीबद्दल सविस्तर सांगितले. महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये सुरू असलेला फाली उपक्रम आता पुढील टप्प्यात मध्यप्रदेशमध्येही विस्तारीत केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्यात.
फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोप सत्रावेळी बोलत होत्या. यावेळी ५५ संशोधन यांत्रिकी मॉडेल व व्यवसाय योजना यांचे सादरीकरण जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर विद्यार्थ्यांनी केले.
पारितोषिक वितरणाप्रसंगी अथांग जैन, मोहित व्यास, जी. चंद्रशेखर, अंजिक्य तांदळे, सबोरणी पोद्दार, अजय तुरकाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. फालीचे माजी विद्यार्थी शिवम शेलार, रोहन रणवरे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्यावतीने श्रावणी गोलादे, अक्षरा देसले, भुषण लाहिटकर, संस्कृती काकोणे, सोहम पाटील यांनी आपले अनुभव कथन केले. सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाटगे यांनी केले. आभार नॅन्सी बॅरी यांनी मानले.
यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फूडस लि. संचालक अथांग जैन व प्रायोजित कंपन्यांचे परीक्षक असलेल्या सदस्यांनी यांनी पाहणी केली. एकात्मिक शेती पध्दत, पिक संरक्षक एके-47, सौर ऊर्जेवर चालणारे ट्रॅक्टर, सायकल वापरून ज्यूस तयार करणे, मल्टीपर्पज कृषीअवजारे यासह अनेक भन्नाट संशोधनात्मक यंत्रे विद्यार्थ्यांनी सादर केली होती.

संशोधनामुळे शेती समृध्द होऊ शकते- अशोक जैन
विद्यार्थ्यांनी सादर केलेले यंत्र बघितल्यानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणाले की, ‘शेती, शेतकरी ज्या अडचणींना सामोरे जात आहेत त्यावरील उपाययोजना म्हणून विविध संशोधक मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यात एक रोबोट आठ प्रकारची कामे करू शकतो, मजुरीवरील खर्च कमी होणारी उपकरणे यासह अन्य उपकरणे ती कृषिक्षेत्राला समृद्ध करतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
शेतीला सन्मान मिळावा – अतुल जैन
शेतीला सामाजिकस्तरावर उद्योग म्हणून बघितले पाहिजे. आयटी, मॅकेनिकल इंजिनियरपेक्षा किंवा त्या दर्जाचे उत्पन्न शेतकऱ्यांचे असले पाहिजे. शेतीकडे सुशिक्षित पिढी वळली पाहिजे. शेतकरी मुलांसोबतही आयुष्य चांगले जाईल, हा विश्वास निर्माण व्हावा यासाठी फालीसारखे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन म्हणाले.
दुसऱ्या सत्राचे कृषी बिझनेस व इन्होव्हेशन्सचे सादरीकरण
फालीच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी ५५ बिझनेस मॉडेल्सचे प्रभावी सादरीकरण केले. त्यात नीम तेल व पावडर, शेतातील पाचटापासून बायोडिग्रेडेबल प्लेट, बाऊल बनविणे, मश्रुमचे उत्पादन, इको फ्रेंडली बोरवडी, संत्राचे विविध उत्पादने, तृणधान्यांपासून स्नॅक्स, ह्युमिक अॅसिड बनविणे, चिंच व त्याचे बाय प्रॉडक्ट, कवठाचे उत्पादन व त्यापासून विविध पदार्थ, गोट फार्मिंग, पोल्ट्री, ऊसाचे विविध उत्पादने, मधमाशीपालन, केळी चिप्स, कांदा व त्याचे विविध पदार्थ, गायीच्या शेणापासून विविध उत्पादने, अॅग्रोटुरिझम, कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पिरूलिना म्हणजे शेवाळची शेती हा नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडल विद्यार्थ्यांनी सादर केले.

दोघंही स्पर्धांमध्ये हे होते परीक्षक
या दोन्ही स्पर्धांचे परीक्षक म्हणून गोदरेज अॅग्रोवेटचे बुर्जिस गोदरेज, मोहित व्यास, यूपीएलचे अजिंक्य तांदळे, प्रदीप पाटील, अमूलचे डॉ. जे. के. पटेल, डॉ. बी. एम. भंडारी, जैन इरिगेशनचे डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव, किशोर रवाळे, ओमनिओरचे सबोरणी पोद्दार, उज्जीवन स्मॉल फायनान्स रोहीत पाराशर, आयसीआयसीआय फाऊंंडेशनचे अनुज अग्रवाल, दीपक पाटील, मोनिका आचार्य, रॅलिज इंडियाचे अजय तुरकाने, सुचेत माळी, महेंद्राचे डॉ. शुभम, स्टार अॅग्रीचे विशाल पाठक, जी. चंद्रशेखर, अॅक्सीस बँकेचे मनिष साळुंखे, किरण नाईकवडी या सदस्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

बिझनेस प्लॅन सादरीकरण स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे

ब्लॅक सोल्जर फाय फार्मिंग, शारदाबाई पवार विद्यानिकेतन अॅण्ड डे स्कूल, बारामती, पुणे (प्रथम क्रमांक), सोया प्रॉडक्ट ज्ञानसागर निवासी शाळा, अष्टी जि. यवतमाळ (द्वितीय), मका कुट्टीपासून बायोडिग्रेडबेल प्लेट व बाऊल बनविणे जिजामाता विद्यालय साखरखेडा जि. बुलढाणा (तृतीय), स्पिरुलिना शेती, कन्या विद्यालय सामोळे जि. धुळे (चौथा क्रमांक) आणि पाचवा क्रमांक अॅग्रीस्टार न्युट्रीशेन, पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडा ता. चोपडा जि. जळगाव


इनोव्हेशन स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे

एअर कंडीशन ओनियन स्टोअर हाऊस, खान्देश गांधी बाबुभाई मेहता विद्यालय कासरे जि. धुळे (प्रथम), अॅग्रीकल्चर मल्टीपर्पज रोबोट, न्यू इंग्लीस हायस्कूल मोहपा जि. नागपूर (द्वितीय), मल्टीपर्पज सोलार ट्रॅक्टर, एस. एस. पाटील विद्यामंदीर, चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगाव (तृतीय), UV-C किरण वापरून फळे आणि भाज्यांचे निर्जंतुकीकरण, परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू जि. अकोला (चतुर्थ), शेतकऱ्यांची जीवनरक्षक काठी, एस. एम. हायस्कूल, खेडगाव जि. नाशिक यांचा पाचवा क्रमांक आला.

एफडी गुंतवणूकदारांचे वाईट दिवस आले! या सरकारी बँकेने व्याज कमी केले

ट्रेडिंग बझ – मे 2022 पासून, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि तो 2.5 टक्क्यांनी वाढवून 6.5 टक्के केला. मुदत ठेवी गुंतवणूकदारांना याचा फायदा झाला असून एफडी गुंतवणूकदारांना बँकांकडून 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू लागले आहे. पुढील आठवड्यात RBI मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक पुन्हा एकदा होणार आहे. असे मानले जात आहे की यावेळी रिझर्व्ह बँक दरावर विराम देऊ शकते. या क्षणी, आम्हाला सेंट्रल बँकेच्या निर्णयांची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे.

PNB FD च्या दरात कपात :-
या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे बँकांची तरलताही सुधारेल, असेही तज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी, त्यांच्या ठेवींचा आधार सुधारण्यासाठी FD वर व्याजदर वाढवण्याचा त्यांचा दबाव कमी असेल.

आता किती व्याज मिळत आहे ते जाणून घ्या :-
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने 1 जून रोजी मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, व्यक्तीला किमान 3.50 टक्के आणि कमाल 7.25 टक्के व्याज मिळत आहे. 1 वर्षाच्या एफडीवरील व्याजदर 6.80 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याजदरही 7.30 टक्क्यांवरून 7.25 टक्के करण्यात आला आहे. सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7.60 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आले आहेत.

“2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या दिवशी 1000 रुपयांची नोट चलनात येणार आहे ” काय आहे यामागील सत्य ?

ट्रेडिंग बझ – 1000 रुपयांच्या नव्या नोटेचा फोटो मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही नोट ₹ 1000 चे भारतीय चलन आहे आणि सध्या तरी ती बाजारात आलेली नाही. ही नोट बघणारे विचार करत आहेत की ही 1000 रुपयांची नोट कधीपासून लागू झाली. सोशल मीडियानुसार अनेक लोक याला योग्य तर अनेक लोक चुकीचे मानत आहेत. त्याच वेळी, काही लोक अफवा पसरवत आहेत की ही नोट आज रात्री 12 वाजल्यापासून नरेंद्र मोदी यांच्याकडून भत्ता म्हणून जारी केली जाईल. काही लोकांचे म्हणणे आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोशल मीडियावर ही साधी व्हायरल केली आहे. आणि भविष्यात अशा प्रकारे फक्त ₹1000 च्या नोटा येतील. तुम्हा सर्वांना माहित असेलच की ₹ 2000 च्या नोटेवर रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. भारतातील कोणत्याही व्यक्तीकडे ₹2000 च्या नोटा असतील तर 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जाऊन 2000 च्या नोटा बदलता येतील.

भारत सरकार आणि RBI कडून ₹ 2000 ची नोट जारी करण्याची घोषणा होताच, ₹ 2000 च्या नोटा बाजारात दिसू लागल्या. गेल्या 1 वर्षापासून 2000 रुपयांच्या नोटा कुठेही दिसत नव्हत्या. हेच अनेक लोक ₹ 2000 च्या नोटांनी खरेदी करत आहेत, त्याआधी दुकानदार सांगतात. की त्या 2000 च्या नोटा बाजारात दिसत नाहीत आणि RBI ने 30 सप्टेंबर 2023 नंतर भारतात ₹ 2000 च्या नोटा चालणार नाहीत असे जाहीर केले आहे, तेव्हापासून लोक ₹ 2000 च्या नोटा बाजारात आणत आहेत आणि खरेदी करत आहेत.

2000 रुपयांच्या नोटा दिसणेही दुर्मिळ झाले आहे. एटीएममधून बाहेर पडत नव्हते. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून ₹ 2000 च्या नोटा छापल्या जात नव्हत्या, त्यामुळे या नोटा अमर्यादित होत्या आणि बाजारात काही लोकांकडे या ₹ 2000 च्या नोटा होत्या. 2000 रुपयांची नवी नोट बंद केल्यानंतर 1000 रुपयांच्या नव्या नोटा येणार असल्याच्या बातम्या दररोज सोशल मीडियावर फिरत आहेत. ₹ 1000 च्या नवीन नोटसाठी, सरकारने कोणत्याही प्रकारची साधी नोट जारी केलेली नाही. रिझव्‍‌र्ह बँकेकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, बाजारात केवळ ₹ 1000 च्या नोटाच उपलब्ध असतील अशी कोणतीही योजना आतापर्यंत नाही.

तुम्हा सर्वांना सांगितले की ₹ 2000 च्या नोटांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे नवीन नोटा नक्कीच बाजारात येतील, पण फक्त ₹ 1000 च्या नोटाच सांगता येत नाही, सध्या RBI कडून कोणत्याही प्रकारची माहिती नाही, त्यामुळे ती सरकारकडून नाही. अफवांकडे दुर्लक्ष करा.

शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या

जळगाव, दि. उत्पन्नाच्या दृष्टिने कृषीक्षेत्र म्हणजे बेभो-यासाचे असते. त्यामुळे शेतीत करिअर होऊ शकत नाही अशी नकारात्मकता वाढत असते. मात्र उच्च कृषीतंत्रज्ञानाचा वापर करुन निरीक्षणातून शेतीला यशस्वी करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. शेतीकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे, यासाठी आपल्या पाल्यांना शिक्षणासह शेतीचे ज्ञान दिले पाहिजे. हेच देशाचे भविष्य आहे असे मोलाचे विचार शेतकऱ्यांनी मांडले.

फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कृषिसंबंधीत विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. कृषितज्ज्ञांशी संवाद साधला. भविष्यातील शेतीविषयी अनेक बाबी जाणून घेतल्या. दिवसभरात विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थसह अत्याधुनिक पद्धतीने फळबागेची लागवड, प्रत्यक्ष शेतात जाऊन सघन लागवड पद्धतीत आंबा व संत्रा उत्पादनाचे प्रात्यक्षिक बघितले. फलोत्पादनासाठी नर्सरी आणि टिश्यूकल्चर तंत्रज्ञान समजून घेतले. शेतीत सुरू असलेले नवनवीन संशोधनाच्या दृष्टीने जैन इरिगेशनच्या आर ॲण्ड डी लॅबमधील तज्ज्ञांशी संवाद साधला. सोलर पार्क, टिश्युकल्चर, एरोपोनिक, हार्ट्रोपोनीक शेती, व्हर्टिकल गार्डन यासह अन्य भविष्यातील शेतीचे प्रयोग, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, सिंचन प्रकल्प यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतले.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील प्रयोगशील शेतकरी ईश्वर ओंकारलाल पाटील यांनी आपल्या शेतीचा अनुभव सांगितला. पारंपारिक पध्दतीने कंदाची केळी आणि मोकाट पध्दतीने पाणी देऊन कापूस लागवड करत होतो. यातून उत्पन्न जेमतेम येत होते. चांगल्या दर्जाची जैन टिश्यूकल्चरची रोपांसह ठिबकचा फक्त सिंचनासाठी वापर न करता योग्य फर्टिगेशन साठी केला त्यामुळे उत्पन्न वाढले. टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड केल्याने सरासरी ८५ टक्के बागेची निसवण झाली. शिवाय अत्यंत गुणवत्तेची,एक्सपोर्ट क्वालिटी केळी पिकवू लागलो. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिले पाहिजे. लहानपणापासून शेतीचे ज्ञान अभ्यासक्रमात असावे. यातूनच मातृभूमीची सेवा करता येते असे मार्गदर्शन ईश्वर पाटिल यांनी केले.
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील प्रगतीशील शेतकरी डिगंबर केशव पाटील यांनी आपल्या ६२ एकर शेतीच्या व्यवस्थापनाविषयी सांगितले. दर वर्षी सुमारे २५ हजार जैन टिश्यूकल्चरची रोपांची लागवड करत असतो. सिंचन पध्दती, खतांचे नियोजन केले तर उत्पादन वाढते आणि आर्थिक समृद्धी साधता येते. यातून मुलांचे उच्च शिक्षण केले असून एक मुलगा अमेरिकेत शास्त्रज्ञ तर दुसऱ्या पुण्याला असल्याचे डिगंबर पाटील म्हणाले.
याच सोबत भागवत काशिनाथ महाजन (गोरगावले), ऋषिकेश अशोक महाजन (नायगाव ता. मुक्ताईनगर) यांनी आपल्या शेती आणि शेतीतील विविध प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराव्दारे सांगितली. यावेळी सृष्टी ऐनापुरे (कोल्हापूर), दिया गायकवाड (सातारा), कुंजन ससाले, निलेश चौधरी (धुळे), समिक्षा मिश्रा (यवतमाळ),पलक कोलते (अमरावती) हे फालीचे विद्यार्थी व्यासपिठावर होते.
याच कार्यक्रमात ज्या कंपन्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे अशा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील फाली विद्यार्थ्यांचा मुक्तपणे संवाद झाला. यात गोदरेज अॅग्रोव्हॅटचे वरिष्ठ ॲग्रोनाॕमिस्ट मोहित व्यास, युपीएल कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रदीप पाटील, ओमनीवोर च्या कम्युनिकेशन हेड सबोरणी पोतदार, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, रॅलीज इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी अजय तुरकणे, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे शुभम दुगडे, अमुलचे बी. एम. भंडारी, अॕक्सीस बँक चे किरण नाईकवाडे, उज्ज्वल फायन्सचे दीपक रावल यांचा सहभाग होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फालीच्या व्यवस्थापिका रोहिणी घाडगे यांनी केले.

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

जैन हिल्स येथे फालीच्या पहिल्या टप्प्याचा समारोप; विद्यार्थ्यांकडून कृषीवर सादरीकरण

जळगाव दि.२ : – शेतीचे भवितव्य संकटात येते तेव्हा भूमिपुत्रच शेतीला विकतो हे वास्तव आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरले तर ती शाश्वत होते. भारताच्या समृद्धीचे कणखर नायक तुम्ही आहात. ठिबक, शेडनेट व इतर संशोधनाची मदत घेऊन शाश्वत शेतीची कास धरली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि उज्ज्वल भारत घडेल असे प्रतिपादन गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष नादिर गोदरेज यांनी केले.

जैन हिल्स येथे फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया (फाली) उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्याच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांशी त्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी, निमित दोशी, दिलीप कुलकर्णी, रवींद्र पाटील, अमोल कदम, सुरज पानपत्ते, मुनेष सक्सेना, जितेंद्र गोरडे, इमरान खान, अशोक पटनायक, बळवंत धोंगडे, जिग्न्यासा कुर्लपकर, शैलेंद्र सिंह, डॉ. बी. के. यादव, डॉ. अनिल ढाके, डॉ. आर. एस. मसळी, डोमेनिक फर्नांडीस, आशीष गणपुले, अजय शेठ, शशीकांत हांडोरे हे प्रायोजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धेकांच्या ट्रॉफी, मेडल देऊन गौरव करण्यात आला.
गुजरात, महाराष्ट्रातील 155 शाळांमधील 1085 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तीन सत्रांत हा उपक्रम होणार आहे. यंदाचे हे ननवे वर्ष आहे. गुरुवारी (ता.1) पहिले सत्र सुरू झाले. शुक्रवारी (ता.2) विविध कृषी व्यवसाय व यंत्रांचे सादरीकरण जैन हिल्स येथे झाले केले. कृषी व्यवसायाबाबत 61 प्रतिमाने तर 61 कृषी यंत्रही विद्यार्थ्यांनी सादर केले. पारितोषिक वितरण समारंभावेळी कंपनी प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. फालीमधील यशस्वी झालेल्या १० विद्यार्थ्यांना प्रायोजक कंपनांतर्फे शिष्यवृत्ती व व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक मदत देण्यात आली. त्यात गोदरेज अॅग्रोवेटने विशाल माळी (नाशिक), रोहन रानवारे (पुणे), जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ने लोकेश देसले (नंदुरबार), अक्षय चांदुरकर (नागपूर), यूपीएल ने शिवांजली पवार (नंदुरबार), विवेक वरूळे (कोल्हापूर), ओमनीवर ने रागिनी फरकाळे (नागपूर), ईश्वरी बोडके (नाशिक), रॅलीस इंडिया ने श्रद्धा शिरके (सातारा), स्नेहा शिंगाडे (कोल्हापूर) यांच्यापैकी तिघांनी प्रातिनीधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाटगे यांनी केले. नॅन्सी बेरी यांनी आभार मानले.

बिझनेस प्लॅन सादरीकरण स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे

फिंगर मिलेट प्रॉडक्ट, हिरकणी विद्यालय गावडेवाडी जिल्हा पुणे (प्रथम क्रमांक), इंडियन गोसबेरी सेलेब्रशन, कुलस्वामिनी केंद्रीय विद्यालय हिवरे जि. पुणे (द्वितीय), राजगिरा चिक्की, श्री. पंढरीनाथ विद्यालय पोखरी पुणे (तृतीय), ऑरेंज बायप्रॉडक्ट, जिजामाता हायस्कूल आणि जूनियर कॉलेज खपा जि. नागपूर (चौथा क्रमांक) आणि पाचवा क्रमांक टमरीन बायप्रॉडक्ट, प्रकाश हायस्कूल मालेगाव जि. नागपूर
इनोव्हेशन स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे
ट्रायसिकल अॅग्रीकल्चर इम्प्लिमेंट, श्रीराम विद्यालय नांदगोमुख जि. नागपूर (प्रथम), फर्टीलायझर अॅप्लीकेशन मशीन, अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय नाशिक (द्वितीय), मल्टीपर्पज फार्म मशीन, श्रीमती राधाबाई शिंदे हायस्कूल हस्ता, संभाजीनगर (तृतीय), ओनियन कटर व ग्रेडिंग मशीन- स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल कालीमठ जि. संभाजीनगर (चतुर्थ), व्हेंटीलेशन सिस्टिम्स इन ओनियान स्टोअरेज स्ट्रक्चर – कुलस्वामीनी केंद्रीय विद्यालय हिवरे जि पुणे यांचा पाचवा क्रमांक आला.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version