‘बोलवा विठ्ठल’ मध्ये पांडुरंगाची प्रचिती

जळगाव दि.29 – ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली, चल ग सखे पंढरीला या भक्ती गितांसह अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या चिमुकल्यांनी दिंडी, पालखी, रामकृष्ण हरीचा गजर करीत अवघी पंढरी उभी केली आणि पांडुरंगाची प्रचिती जळगावकर रसिकांना करून दिली.

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित ‘बोलावा विठ्ठल’ या भक्ती मैफिल कांताई सभागृह येथे पार पडली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, ज्येष्ठ रंगकर्मी शरद पांडे, जळगाव चे उत्तम वेणूवादक रमेश बणकर उपस्थिती होती.
त्यांच्यासह भवरलाल ॲण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या वतीने अनिल जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी पियूष रावळ, प्रा. राजेंद्र देशमूख, रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह अनुभूती स्कूलचे शिक्षवृंद उपस्थित होते.
आषाढी एकादशी निमित्त माऊलीच्या भेटीला चिमुकल्यांच्या स्वरांची हाक आली. आणि गजर, पालखी, रिंगण सोहळ्यात थाळ-मृदंग साथीने वातावरण भक्तीमय झाले. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून सादरीकरणाने लक्ष वेधून घेतले.

भक्ति अभंगाने विठू नामाचा गजर
बोलावा विठ्ठल मध्ये ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली,देव माझा विठू सावळा, विठू माउली तू, चल ग सखे पंढरीला, रखुमाई रखुमाई,विठ्ठलाच्या पायी वीट, विष्णुमय जग, ज्ञानियांचे ज्ञेय, निजरूप दाखवा हो, पांडुरंग नामी लागलासी, हरिभजना वीण, काळ देहासी आला, काया ही पंढरी, मालकौंस अभंगमाला अशी एकाहून एक भक्ति अभंगांनी रसिक श्रोत्यांना चिंब केले. स्पर्श मोहिते, प्राप्ती गुगले, वीरा महाकाळ, देवश्रृती अंबुलकर, भाविका पाटील, साची पाटील, दिव्येश बाघमार, दक्ष ठक्कर, भावेश पाटील, रेहांश चांडक या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंकित कुमार, अम्रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गितांचे सादरीकरण केले. यावेळी तबल्यावर प्रसन्न भुरे, हार्मानियमवर शौनक दीक्षित, मंजीरीची साथ शुभम कुलकर्णी यांनी साथ संगत दिली. सिद्धेश भावसार, निरजा वाणी, स्वरा जगताप, विवेक चव्हण, अथर्व मुंडले, मानसी असोदेकर यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. दीपिका चांदोरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. गुरूवंदना वरूण नेवे यांनी सादर केली. प्रास्तविक व आभार दिपक चांदोकर यांनी केले. जान्हवी पाटील हिने उत्कृष्ट निरूपण केले.

३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर मुले व मुली तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा खेळाडू रूतिक दिपक कोतकर ला ७८ किलो वरील वजन गटात सुवर्ण

३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर मुले व मुली तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा खेळाडू रूतिक दिपक कोतकर ला ७८ किलो वरील वजन गटात सुवर्ण, राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघात निवड
एकुण १ सुवर्ण ३ कांस्य पदकाची कमाई

जळगांव : तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्टस् असोसिएशन तथा युवासेना रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर मुले व मुली तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन दिनांक २४ ते २६ जून २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन माननीय नामदार श्री उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत महाराष्ट्रतुन २८ जिल्ह्यांतील खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा ९ मुले व ६  मुलींचा संघ सहभागी झाला होता यामध्ये मुलांच्या ७८ किलो वरील वजन गटात रूतिक दिपक कोतकर याने सुवर्ण पदक पटकावले व ६ ते ९ जुलै २०२३ शिमोगा, कर्नाटक येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघात निवड झाली आहे. त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर ( एन आय एस  ) याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे सर तसेच राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ श्री अविनाश बारगजे सर, मिलिंद पठारे महासचिव, प्रविण बोरसे, दुलीचंद मेश्राम, व्यंकटेश कररा आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील इतर विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे मुलींच्या ५५ किलो आतील वजन गटात कु निकीता दिलीप पवार ( कांस्यपदक ), लोकेश महाजन ( कांस्यपदक ), यश जाधव ( कांस्यपदक ) सदर खेळाडूंना जयेश कासार, सुनील मोरे, श्रेयांग खेकारे याचं मार्गदर्शन लाभले

( डावीकडून अमोल थोरात, चंद्रशेखर जेऊरकर, पदक विजेता रूतिक दिपक कोतकर याला पदक वितरण करताना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री प्रविण बोरसे, सचिव अजित घारगे, प्रशिक्षक जयेश बाविस्कर )

आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जळगाव दि.28 अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त भजन, दिंडी आणि पालखी सोहळा झाला. 460 मुलं-मुली सहभागी झालेत. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लाहोटी यांनी विठ्ठल रूक्मिणीच्या मुर्तीचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. मुले विठ्ठल रूक्मिणीच्या वेषात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात मुलांनी टाळ वाजवत ताल धरला, फुगड्या खेळल्या व रिंगण तयार केले. मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लोहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुकीर्ती भालेराव, प्रियंका श्रीखंडे, अरविंद बडगुजर, नाना सर आणी शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनची जिल्हा न्यायालयात स्वच्छता मोहीम

‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ करण्याचा संकल्प

जळगाव दि. २४येथील जिल्हा सत्र न्यायालय आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयूक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या सहकार्यातून स्वच्छता अभियानासह जनजागृती करण्यात आली. ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेवर कार्य करण्याचा संकल्प न्यायालयीन सहकाऱ्यांनी केला. जवळपास ४ टन कचरा संकलित करून महानगरपालिकतर्फे घंटागाडी द्वारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

सकाळ पासून सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. पी. सय्यद, कोर्ट व्यवस्थापक जगदिश माळी, अधिक्षक सुभाष एन पाटील, अश्विनी भट, प्रमोद पाटील, अविनाश कुळकर्णी, प्रमोद ठाकरे, हर्षल नेरपगारे, मनोज बन्सी, जावेद एस. पटेल, प्रकाश काजळे, जितेंद्र भोळे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र करंगे, रमेश कांबळे, अर्जून पवार यांच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने मदन लाठी, हेमंत बेलसरे, सुधीर पाटील, तुषार बुंदे व स्वयंसेवक उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या वतीने अनिल जोशी, बाळू साबळे, देवेंद्र पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानासह पर्यावरणाबाबत जनजागृती केली. प्लास्टीकचा कमीत कमी वापर करण्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेविषयी सांगितले. यावर न्यायालयीन सहकाऱ्यांनी माझे घर, वॉर्ड, शहर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगत, त्यावर कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. नियमित स्वच्छता मोहिमेसाठी पाच ते सहा स्वयंसेवकांची एक टिम करण्याचा मानस यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्याला गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे मार्गदर्शन राहिल. येणाऱ्या काळात नियमीत शहराला स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याचे उपक्रम राबविले जातील असेही यावेळी सर्वांच्या वतीने जाहिर करण्यात आले.

उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून योग साधना

जळगाव दि. २१ – जैन इरिगेशनच्या जैन अॅग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन हायटेक प्लान्ट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा यासह अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, गांधी रिसर्च फाऊंडेशन यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आरोग्याविषयी सजग होत प्रशिक्षकांकडून योगाभ्यास समजून घेतला. स्वस्थ हृदयासाठी योग्य योग आणि आहार या संकल्पनेवर योग दिन साजरा केला. सांस्कृतिक, धार्मिक उत्सवांप्रमाणेच योगउत्सव असून योग, प्राणायाम, ध्यान हे दैनंदिन जीवनात अंगिकार करण्याचा संकल्प जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या सहकाऱ्यांनी केला.सात्विक आहारासह योगाचे महत्त्व जैन फूडपार्क, एनर्जी पार्क व अॅग्री पार्क च्या ९०० च्यावर सहकाऱ्यांनी योग आणि आहारातून आरोग्यमय जगण्याचा मंत्र समजून घेतला. योग प्रशिक्षीका कमलेश शर्मा यांनी स्वात्विक, राजसीक, तामसीक आहाराबाबत सांगितले. सकस आहार असेल तरच मन शांत राहते. मन शांत ठेऊन शारिरीक व्याधींना दूर ठेवता येते, यासाठी रोज एक तास सूर्यनमस्कार करावे. यामूळे बाह्य शरीर, अवयव आणि मन यावर काम करता येते. चांगली झोप, भोजन, व्यायाम व प्राणायाम यातून उत्तम आरोग्य राखता येते. असे मार्गदर्शन करत सहकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकांसह योगाची विविध आसने  कमलेश शर्मा यांनी करून घेतले. त्यांचे स्वागत डॉ. जयश्री राणे यांनी केले. वरिष्ठ सहकारी रोशन शहा यांनी आभार मानले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल ढाके, सुनील गुप्ता, प्रदीप सांखला, व्ही. पी. पाटील, आर. बी. येवले यांच्यासह वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, भिकेश जोशी, आर. डी. पाटील यांच्यासह मानव संसाधन विभागाच्या सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

जैन प्लास्टिक पार्क येथे योगा दिवस साजरा
मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांना संयमित करण्यासाठी योगाभ्यास ही उत्तम साधना आहे. २१ जून जागतिक योग दिनाच्या औचित्याने जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथील प्रशासकीय इमारतीसमोरच्या पटांगणावर योगगुरु सुर्यागीरीजी उर्फ सुभाषजी जाखेटे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करून घेतला. यावेळी कंपनीच्या सहकारी सौ. संगीता खंबायत यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्लास्टिक पार्क येथील सुमारे हजारहून अधिक स्त्री व पुरुष सहकारी उपस्थित होते. आरंभी कंपनीचे सहकारी किशोर बोरसे यांनी प्रास्ताविक केले. त्यात ते म्हणाले की, ज्या प्रमाणे मोठ्याभाऊंनी कार्याचा वारसा दिला त्याच प्रमाणे उत्तम आरोग्याचा मंत्र ही दिला. सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे या दृष्टीने कंपनीत विविध उपक्रम राबविले जातात याबाबत त्यांनी सांगितले. सहकाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती, शरीरास हानिकारक असे चहा-कॉफी आणि मादक द्रव्य सेवनास बंदी तसेच कँटिनमधील जेवणात अत्यल्प प्रमाणातील तेल, मीठ, मिरची इ. अशा अनेक बाबींमधून श्रद्धेय मोठ्याभाऊंनी आपल्या सहकाऱ्यांच्या निरोगी आणि सुरक्षित आयुष्यासाठी नेहमीच काळजी घेतली. आजही मोठ्याभाऊंच्या प्रेरणादायी विचारांमध्ये अनेकदा सहकाऱ्यांच्या आरोग्य विषयक जागरूकता दिसून येते असेही त्यांनी सांगितले. सकाळी ८ वाजता सर्व सहकाऱ्यांनी ओंकाराने योगाभ्यासास सुरूवात केली. अर्ध तितली आसन, ताडासन, तिलक ताडासन, अनुलोम मिलोम, भ्रमरी प्राणायम करताना श्वास-उच्छवासाचे नेमके तंत्र त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखविले. या दिवसाच्या निमित्ताने काही सहकाऱ्यांनी वर्षभर योग करण्याचा संकल्प ही घेतला. अनिल जैन, राजेश आगिवाल, राजेश शर्मा, युवराज धनगर, हेमराज वाणी, महेंद्र पवार, योगेश नारखेडे, निलेश भावसार तर डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ.अनिल पाटील  यांनी परिश्रम घेतले.

जैन टिश्यूकल्चर पार्क
महिलांच्या निरामय आरोग्य या विषयावर कमलेश शर्मा यांनी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथे मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिनी जीवनात योग करण्याच्या पद्धती समजून सांगितले. विजयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक व स्वाग केले. यावेळी त्यांच्यासोबत विजयसिंग पाटील, सुरक्षा विभाग इंद्रजित कुमार, डॉ. अश्विनी पाटील, राजाराम देसाई, मानव संसाधन विभागाचे सी. पी. चौधरी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मानव संसाधन विभागाचे सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

अनुभूती निवासी स्कूल
डिव्हाईन पार्कच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योग दिनाचे महत्त्व समजून घेत योग साधना केली. प्रत्येक वर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवाय अनुभूती स्कूल निवासी असल्याने रोज सकाळी योगाचे विशेष सत्र घेण्यात येते. भारतीय संस्कृतीत ओमकार आणि प्रार्थनेचे महत्त्व अनुभूती स्कूलच्या निवासी डॉक्टर तथा योगशिक्षिका डॉ. स्नेहल पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडून त्यांनी ताडासन, कटिचक्रासन, त्रिकोणासन, गोमूखासन, मेरूदंड, वक्रासान, शशांकासन, भ्रमरी प्राणायम यासह विविध योगाभ्यास करून घेतला. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य देबासिस दास यांच्या उपस्थितीत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. दरम्यान अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलमध्ये सुद्धा योग दिवस साजरा झाला.

गांधी रिसर्च फाऊंडेशन
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या प्रांगणात सर्व सहकाऱ्यांनी विविध योगासने करून योग दिन साजरा केला. डॉ. गिता धरमपाल यांच्याहस्ते महात्मा गांधीजींची प्रतिमा व सूतीहार देऊन कमलेश शर्मा यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व आभार डॉ. अश्विन झाला यांनी केले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व गुजरातला होईल राष्ट्रीय महिलांची बुद्धिबळ स्पर्धा

जळगाव दि.१९ क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनतर्फे फिडे नामांकित महिलांची राज्यस्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथे पार पडली.

या स्पर्धेत जळगाव येथील कु. सािनया रफिक तडवी हिन ८ पैकी ७ गुण (६ विजय २ ड्रॉ) मिळवून स्पर्धेत अपराजित राहत प्रथम क्रमांक मिळविला. सानिया हिला चषक व १५ हजार रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून मदर अली, प्रशांत विघ्नेश्वर, संग्राम शिंदे, आश्विन मुसळे, मुख्य ऑर्बिटर सप्नील बनसोड, ऑर्बिटर कुमारी गायत्री पाणबुडे, कुमार कनकम, नरेंद्र कन्नाके उपस्थित होते. या कामगिरीमुळे गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सानिया तडवी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तिने स्पर्धेत कोल्हापूर ची दिव्या पाटील, आदिती कायल पुणे, ह्यांना हरवून श्रुती काळे औरंगाबाद, तसेच दिशा पाटील कोल्हापूर ह्याच्याशी बरोबरीत डाव साधत महाराष्ट्रात यश मिळवून विजय मिळवला. दि.१६ ते १८ जून दरम्यान तीन दिवसीय स्पर्धेत महाराष्ट्रातूून ४४ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा ८ राऊंड मध्ये घेण्यात आली. सानिया ही महिला बाल कल्याण विभागाचे उपजिल्हाधिकारी रफिक तडवी यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी कौतूक केले आहे.

या खात्याशिवाय तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार नाही! जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर हे अपडेट जाणून घ्या

ट्रेडिंगबझ: शेअर बाजारात गुंतवणूक करून आपण चांगले रिटर्न्स मिळू शकतो. हा रिटर्न मिळवण्यासाठी चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्येही गुंतवणूक करावी. त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विशेष खाते आवश्यक आहे. हे खाते डिमॅट खाते आहे, डिमॅट खात्याच्या मदतीने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला डीमॅट खात्याबद्दल काही खास गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

डिमॅट खाते
डीमॅट खाते किंवा डीमॅट खाते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स आणि सिक्युरिटीज ठेवण्याची सुविधा प्रदान करते. ऑनलाइन ट्रेडिंग दरम्यान शेअर्स खरेदी केले जातात आणि ते डिमॅट खात्यात ठेवले जातात. त्यामुळे वापरकर्त्यांना व्यवसाय करणे सोपे जाते. डिमॅट खात्यामध्ये शेअर्स, सरकारी सिक्युरिटीज, एक्सचेंज ट्रेडेड फंड, बाँड्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये केलेली सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी ठेवली जाते.

स्टॉक ट्रेडिंग
डीमॅटने भारतीय शेअर ट्रेडिंग मार्केटची डिजिटायझेशन प्रक्रिया सक्षम केली आहे आणि SEBI द्वारे चांगले प्रशासन केले आहे. शिवाय, डिमॅट खाते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सिक्युरिटीज साठवून स्टोरेज, चोरी, नुकसान आणि गैरव्यवहाराचे धोके कमी करते. हे पहिल्यांदा 1996 मध्ये NSE द्वारे सादर केले गेले.

खाते सहज उघडता येते
सुरुवातीच्या काळात, डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया मॅन्युअल होती आणि गुंतवणूकदारांना सक्रिय होण्यासाठी अनेक दिवस लागायचे. आज एखादी व्यक्ती सहजपणे ऑनलाइन डिमॅट खाते उघडू शकते. एंड-टू-एंड डिजिटल प्रक्रियेने डीमॅटच्या लोकप्रियतेला हातभार लावला आहे, जी साथीच्या रोगात गगनाला भिडली.

डीमॅट खात्याचे फायदे-

  • समभागांचे सहज आणि जलद हस्तांतरण.
  • डिजिटल स्वरूपात सिक्युरिटीज सुरक्षित ठेवण्याची सुविधा.
  • सुरक्षा प्रमाणपत्रांची चोरी, खोटेपणा, नुकसान आणि नुकसान दूर करते.
  • व्यवसाय क्रियाकलापांचे सुलभ ट्रॅकिंग.
  • सर्व वेळ प्रवेश.
  • लाभार्थी जोडण्यास अनुमती देते.
  • बोनस स्टॉक, राइट्स इश्यू, स्प्लिट शेअर्सचे स्वयंचलित क्रेडिट.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न झाले

जळगाव दि.१२ जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ०९ जुन ते ११ जुन २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९० खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जैन स्पोर्टस अकॅडमी चा राष्ट्रीय खेळाडू शुभम पाटील व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सदस्य श्री शेखर जाखेटे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक श्री रवींद्र धर्माधिकारी व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह व डॉ. अमित राजपूत उपस्थित होते.

याप्रसंगी पुणे येथे नुकत्याच झालेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू शुभम पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करून यशस्वी सहभाग नोंदविला, तसेच साऊथ कोरिया येथे होणार असलेल्या वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिप मध्ये श्रीमती वृषाली पाटील यांची निवड झाल्याबद्दल बॅडमिंटन साहित्य देऊन या दोघांचा संघटनेच्या वतीने सचिव श्री विनीत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – विहान राहुल बागड
उपविजयी – आरव अमित दुडवे

११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील उपविजयी – ओवी पुरुषोत्तम बोरनारे

१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शांतनु शैलेश फालक
उपविजयी – सक्षम ब्रिजलाल तुलसी

१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – पियुष योगेश खडे
उपविजयी – अन्वेष सुधीर नारखेडे

१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – पूर्वा किशोर पाटील उपविजयी – तनिषा अनिल साळुंखे

१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – अंकित हरिश्चंद्र कोळी आणि अन्वेष सुधीर नारखेडे
उपविजयी – वीर किशोर भोसले आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उपविजयी – दक्ष धनंजय चव्हाण

१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – इशिका कपिल शर्मा उपविजयी – ओवी अमोल पाटील

१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – गीता अखिलेश पंडित उपविजयी – इशिका कपिल शर्मा

१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – जाजीब सुहेल शेख आणि अर्श रहीम शेख
उपविजयी – रौनक नितीन चांडक आणि तेजम केशव

पुरुष एकेरी
विजयी – कौशिक प्रवीण बागड
उपविजयी – सौरभ शिवचंद बर्वे

महिला एकेरी
विजयी – गीता अखिलेश पंडित
उपविजयी – इशिका कपिल शर्मा

पुरुष दुहेरी
विजयी – कौशिक प्रवीण बागड आणि मयूर राजेंद्र भावसार
उपविजयी – अर्श रहीम शेख आणि जाजीब सुहेल शेख

३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – विनायक बालदी
उपविजयी – अमित दुडवे

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा
उपविजयी – समीर सुनील रोकडे आणि अमित दुडवे

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि डॉ. वृषाली वरून सरोदे
उपविजयी – डॉ. अमित राजपूत आणि प्रज्ञा अमित राजपूत

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून देवेंद्र कोळी, योमेश टोंगले, भूषण पाटील, दर्शन गवळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत आयशा खान, सोमदत्त तिवारी, अक्षय हुंडीवाले, जाजीब शेख, अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, रौनक चांडक, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, कृष्णा केशव, तेजम केशव, राखी ठाकूर, दीपिका ठाकूर, हमजा खान, आर्य गोला, ओम अमृतकर यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमी ची खेळाडू गीता पंडित व आभार प्रदर्शन प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.
या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक श्री अरविंद देशपांडे यांनी केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची निवड

जळगाव दि. ११: – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.११ जून) ला जिल्हापेठ व्यायामशाळा येथे १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या जिल्हास्तर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीमध्ये रावेर, पाचोरा, शेंदुर्णी, जळगाव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहा खेळाडूंची निवड झाली. प्रथम विजेते खेळाडूंची रत्नागिरी येथे दि. २४ ते २६ जून २०२३ दरम्यान ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.

डावीकडून विशाल बेलदार, जयेश बाविस्कर, अजित घारगे, अंकिता पाटील, सुनील मोरे व‌ तायक्वांडो खेळाडू )

निवड झालेले खेळाडू
मुलांच्या गटात – (४५ किलो आतील) दानिश तडवी जळगाव, (४८ किलो आतील) भावेश चौधरी, शेंदुर्णी, (५१ किलो आतील) प्रबुद्ध तायडे रावेर, (५५ किलो आतील) जय गुजर शेंदूर्णी, (५९ किलो आतील) लोकेश महाजन रावेर, (६३ किलो आतील) दिनेश चौधरी रावेर, (६८ किलो आतील) जयेश पवार जळगांव, (७३ किलो आतील) यश जाधव रावेर, (७८ किलो वरील) रूतीक कोतकर जळगांव तर मुलींमध्ये : – (४२ किलो आतील) सिमरन बोरसे जळगांव, (४६ किलो आतील) रूतूजा पाटील पाचोरा, (४९ किलो आतील) जीवनी बागुल पाचोरा, (५२ किलो आतील) नियती गंभीर जळगांव, (५५ किलो आतील) निकीता पवार जळगांव, (५९ किलो आतील) रूतिका खरे पाचोरा इत्यादींंची निवड झाली आहे. प्रथम विजेते खेळाडूंची रत्नागिरी येथे दि. २४ ते २६ जून २०२३ दरम्यान ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. पंच म्हणून अंकीता पाटील, विशाल बेलदार, पुष्पक महाजन, निलेश पाटील, श्रेयांग खेकारे आदींनी परिश्रम घेतले. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर (जळगाव), जीवन महाजन, जयेश कासार (रावेर ), सुनील मोरे (पाचोरा), श्रीकृष्ण चौधरी, श्रीकृष्ण देवतवाल (शेंदूर्णी ) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतूक केले आहे.

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना – ” केवळ एकदा गुंतवणूक करा, रक्कम दुप्पट होईल”

ट्रेडिंग बझ – जर तुम्ही अशा गुंतवणुकीसाठी असा पर्याय शोधत असाल ज्यामध्ये तुमचे पैसे वेगाने वाढतील आणि कोणताही धोका नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करावी. पोस्ट ऑफिस एफडीला टाइम डिपॉझिट देखील म्हणतात. तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये 1,2,3 आणि 5 वर्षांपर्यंत पैसे जमा करू शकता.

व्याजदर देखील वर्षानुसार बदलतात. पण जर तुम्हाला FD द्वारे मोठी कमाई करायची असेल तर तुम्हाला त्यात दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट FD द्वारे करू शकता. ते कसे ? चला तर मग पाहूया..

जाणून घ्या रक्कम दुप्पट कशी होईल :-
सध्या तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 5 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. समजा तुम्ही पोस्ट ऑफिस FD मध्ये 5,00,000 रुपये गुंतवले तर 5 वर्षांनी 7.5% दराने तुम्हाला त्यावर 2,24,974 रुपये व्याज मिळतील. मुद्दल आणि मुदतपूर्तीवरील व्याजासह एकूण 7,24,974 रुपये मिळतील. पण जर तुम्हाला ही रक्कम दुप्पट करायची असेल, तर तुम्हाला ही रक्कम मॅच्युरिटीनंतर काढायची नाही, तर तुम्हाला ती पुन्हा 5 वर्षांसाठी निश्चित करावी लागेल. 5 वर्षांनंतर, सध्याच्या व्याजदरानुसार, यावर 3,26,201 रुपये व्याज जोडले जाईल. अशा प्रकारे, तुम्हाला 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर फक्त 5,51,175 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि 10 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 10,51,175 रुपये मिळतील.

वर्षानुसार, हा सध्याचा व्याजदर आहे :-
1 वर्षासाठी निश्चित केल्यावर – 6.8%
2 वर्षांसाठी निश्चित केल्यावर – 6.9%
3 वर्षांसाठी निश्चित केल्यावर – 7.0%
5 वर्षांसाठी निश्चित केल्यावर – 7.5%

जॉईन Trading Buzz
Exit mobile version