इन्फोसिसने निकाल जाहीर केला, नफा 11 टक्क्यांनी वाढून 5945 कोटी रुपये

Infosys Q1 Result: IT क्षेत्रातील देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या Infosys ने एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. CC महसूल वाढ वार्षिक आधारावर 4.2 टक्के होती, तर ती तिमाही आधारावर 1 टक्के होती. ऑपरेटिंग मार्जिन 20.8 टक्के राहिला. EPS ने वार्षिक आधारावर 12.4 टक्के वाढ नोंदवली. मोठा करार $2.3 अब्ज किमतीचा होता. कंपनीचा निव्वळ नफा 5945 कोटी रुपये होता. मात्र, बाजाराचा अंदाज जास्त होता.

निव्वळ नफा रु. 5945 कोटी

BSE वर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा निव्वळ नफा 5945 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर, त्यात 10.9 टक्के वाढ नोंदवली गेली. वर्षभरापूर्वी ते ५३६२ कोटी रुपये होते. महसुलात वार्षिक 10 टक्के वाढ नोंदवली गेली आणि ती 37933 कोटी रुपये झाली.

ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 20.8 टक्के आहे

एकूण नफ्यात 14.4 टक्के वाढ झाली आणि तो 11551 कोटी रुपये झाला. ऑपरेटिंग नफा 14.1 टक्क्यांच्या वाढीसह 7891 कोटी रुपये झाला. ऑपरेटिंग मार्जिन 20.1 टक्क्यांवरून 20.8 टक्क्यांपर्यंत वाढले. EPS म्हणजेच कमाईवर, शेअर 12.78 रुपयांवरून 14.37 रुपयांपर्यंत वाढला.

सिद्धांत गुजर याचे सीए परिक्षेत यश

जळगाव दि.१६ येथील सिद्धांत भागवत गुजर याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सीए ची परिक्षा उत्तीर्ण केली. अंतिम परिक्षेत ४२६ गुण प्राप्त झाले. जैन इरिगेशनमधील टिएबील विभागातील सहकारी भागवत गुजर यांचा सिद्धांत मुलगा असून त्याच्या यशाबद्दळ आई-वडिलांसह नातेवाईकांनी कौतूक केले आहे. ऑडीट विभागातील वरिष्ठ सहकारी लक्ष्मिकांत लाहोटी यांचेही सिद्धांतला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते.

चंद्रयान-3 साठी हातेडच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका

हातेड येथील संजय देसर्डा शास्त्रज्ञाची द्रवरुप इंधनासाठी कामगिरी

जळगाव, दि. १५ – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण केले. एलव्हीएम-3 लाँचरचा वापर करण्यात आलेला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरेल. या मोहिमेमध्ये कान्हदेशातील जळगाव जिल्ह्यातील हातेड या छोट्याशा गावातून इस्रो पर्यंत पोहचणारे संजय गुलाब देसर्डा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरलेली आहे. जैन फार्म फ्रेश फुडस् च्या करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा, प्लास्टिक पार्क येथील कस्टम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोंगरमल देसर्डा आणि जैन फूडपार्क येथे कार्यरत छगनमल देसर्डा यांचे ते पुतणे असून या त्यांच्या सहभागाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व कंपनीच्या विस्तारीत कुटुंबातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

615 कोटी रुपये खर्चून तयार केलेले हे मिशन सुमारे 50 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. या मोहिमेत चंद्रयानचा एक रोव्हर (छोटा रोबोट) बाहेर येईल जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचं स्थान निश्चित केले जाईल. इथेच रोव्हर चंद्राच्या या भागात कोणते खनिजे आहेत, पाणी आहे का, इत्यादीचा शोध घेईल असे संजय देसर्डा यांनी सांगितले.

मूळ हातेड येथील राहणारे व चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद देसर्डा यांचे सुपुत्र संजय हे गेल्या २० वर्षांपासून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-3 यशस्वी प्रक्षेपण झाले. या यानासाठी त्यांनी द्रवरुप इंधनावर काम केले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या मोहिमेसाठी कार्यरत होते. अवकाशात सोडल्या जाणाऱ्या तीन प्रकारचे यानांसाठी इंधन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. यानाचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि काल प्रक्षेपीत झालेल्या यानात एलव्हीएम ३ मध्ये द्रव (लिक्विड) इंधन लागत असते. यात वरीष्ठ शास्त्र म्हणून इस्त्रोकडून जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती. यापूर्वी संजय देसर्डा यांनी मंगळयान, चंद्रयान – २, चंद्रयान -३ या व्यतिरिक्त अनेक मोहिमेत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावलेली आहे. चंद्रयान मोहिमेसाठी हातेडच्या सुपुत्राचे परिश्रम व बुद्धीची कामगिरीसाठी मोलाची भूमिका पार पाडता आली याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतवासियासाठी आहे. संजय देसर्डा यांच्या या विशेष कार्याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हातेड ते इस्त्रो खडतर प्रवास…

संधी प्रत्येकाला मिळत असते परंतु संधीचे सोन्यात रुपांतर करणे फार कमी लोकांना जमते. संजय गुलाबचंद देसर्डा यांचा जन्म हातेडच्या देसर्डा परिवारात झाला. शालेय शिक्षण हातेडच्या सरकारी शाळेत झाले नंतर त्यांना अभियांत्रिकीमध्ये अधिक रस असल्याने फैजपूरच्या जे.टी. महाजन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा व लाभलेली प्रगल्भ बुद्धीमत्ता आणि देसर्डा परिवाराने दिलेल्या प्रोत्सहनामुळे ते गेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयआयटी वाराणसी म्हणजे बनारस हिंदु युनिर्व्हसिटी येथून एमटेक पद्युत्तर शिक्षण घेत असताना २००३ मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू साठी इस्त्रोचे कमिटी आली व त्यात संजय यांची निवड झाली. ऑगस्ट २००३ मध्ये नियुक्ती झालेल्या संजय देसर्डा यांनी इस्त्रोकडून विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या त्या यशस्वी पार पाडल्या आहेत. जसे भारतातील इस्त्रो आहे तसेच पॅरिस येथील ‘केनेस’ नावाची रॉकेटमध्ये काम करणारी संस्था आहे त्यासाठी आठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झालेली होती. याशिवाय ‘टीम एक्सलन्स’ पुरस्काराने देखील त्यांचा गौरव झालेला आहे. हातेड ते इस्त्रो हा प्रवास आपल्यासाठी अनुभवांनी भरलेला होता असे संजय म्हणतात. संजय यांच्या परिवारात त्यांची पत्नी सौ. चित्रा या गृहिणी आहेत, मोठी कन्या ऊर्जा आणि लहान मुलगा आयुष हा बारावीमध्ये असून तो देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शास्त्रज्ञ म्हणून आपले करियर करणार अशी त्याची इच्छा आहे.

बाजार ऑल टाइम हाई वर, या तेजीमध्ये मजबूत परतावा मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी काय करावे? तज्ञांकडून समजून घ्या

शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारातील बेंचमार्क निर्देशांक विक्रमी पातळी दाखवत आहेत. शेवटच्या दिवसात व्यवहारात सेन्सेक्सने ६६ हजारांचा आकडा पार केला. तर निफ्टी 50 ने 19500 ची पातळी ओलांडली. या वेगवान बाजारपेठेत म्युच्युअल फंड गुंतवणूकदार इक्विटी योजनांमध्येही मोठी गुंतवणूक करत आहेत. जून 2023 मध्ये इक्विटी फंडातील निव्वळ आवक रु. 8637 कोटी होती. एसआयपीचा प्रवाह 4,734.45 कोटी रुपये झाला. येथे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बाजाराने विक्रमी अव्वल कमाई केली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी या तेजीच्या प्रसंगी पुढे काय करावे? दुसरीकडे, मार्केटमध्ये सुधारणा असल्यास म्युच्युअल फंडांमध्ये कोणत्या प्रकारची रणनीती अवलंबावी?

एयूएम कॅपिटलचे नॅशनल हेड (वेल्थ) मुकेश कोचर म्हणतात, बाजार सर्वकालीन उच्च पातळीवर आहे. अशा वातावरणात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी गोष्टींचा विचार करायला हवा. अशा वेळी तुम्ही इक्विटी फंडात गुंतवणूक करणार असाल तर नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. बाजारातील चढ-उतारांवर आधारित निर्णय घेणे ही सर्वात मोठी चूक असू शकते. अशा परिस्थितीत बाजाराचे मूल्यांकन करणे टाळावे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी योग्य फंड निवडणे आणि मालमत्ता वाटप करताना शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. त्याच वेळी, अल्पकालीन अस्थिरतेपासून घाबरू नका.

बाजारात सुधारणा झाल्यास काय करावे?

मुकेश कोचर म्हणतात, बाजारात सध्या सुरू असलेल्या या बुल रनमध्ये गुंतवणूकदारांनी दुसरी रणनीती राखली पाहिजे. जर येथून बाजार खाली गेला तर ते 10-20 टक्के कॅश कॉल घेऊ शकतात. म्हणजेच, तुम्ही तुमचे फंड 10-20% ने टॉप-अप करू शकता. कोणत्याही ड्रॉडाउनमध्ये टॉप-अपचा फायदा असा आहे की तो तुम्हाला अतिरिक्त अल्फा तयार करण्यात मदत करू शकतो. एकंदरीत, दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करत राहणे हा सर्वात मोठा सल्ला आहे.

जूनमध्ये किती गुंतवणूक आली

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, जून 2023 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील निव्वळ गुंतवणूक वाढून 8637 कोटी रुपये झाली आहे. जे मे 2023 मध्ये 3,240 कोटी रुपये होते. स्मॉल कॅप फंडांमध्ये 5472 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. MF उद्योगाची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) 44.39 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

एएमएफआयच्या मते, इक्विटी श्रेणीमध्ये, व्हॅल्यू फंड/कॉन्ट्रा फंडमध्ये 2,239.08 कोटी, मिड कॅप फंडमध्ये 1,748.51 कोटी, मल्टी कॅप फंडमध्ये 734.68 कोटी, लार्ज आणि मिड कॅप फंडमध्ये 1,146.69 कोटी, 397.59 कोटी फंड/डिव्हिडल फंड आणि फंडामध्ये 397.59 कोटी गुंतवणूकदारांनी 459.25 कोटी रुपये ठेवले. दुसरीकडे, इक्विटी विभागात, जूनमध्ये लार्जकॅप फंडातून 2,050 कोटी रुपयांचा निव्वळ आउटफ्लो झाला. याशिवाय गुंतवणूकदारांनी फोकस्ड फंडातून रु. 1,018.31 कोटी, ELSS मधून रु. 474.86 कोटी आणि Flexi Cap Fund मधून रु. 17.30 कोटी काढले.

जूनमध्ये ओपन-एंडेड डेट फंडातून 14,136 कोटी रुपयांचा निव्वळ आउटफ्लो झाला. हायब्रीड फंडात 4611 कोटींची निव्वळ आवक आहे. 28,545 कोटी रुपयांच्या लिक्विड फंडाचा निव्वळ आउटफ्लो होता. तर मनी मार्केट फंडातील निव्वळ आवक 6827 कोटी रुपये आहे. जूनमध्ये आर्बिट्रेज फंडात रु. 3,366 कोटी, इंडेक्स फंडात रु. 906 कोटी आणि गोल्ड ETF मध्ये रु. 70.32 कोटी आणि इतर ETF मध्ये रु. 3,402.35 कोटींचा निव्वळ आवक होता.

(अस्वीकरण: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

जळगाव दि.7 अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलचा स्थापना दिन व ‘फेशर्स डे’ साजरा केला.

अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील एकमेव शाळा सुरू केली. सोळा वर्षापासून सुरू असलेल्या अनुभूती स्कूल च्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘फेशर्स डे’ साजरा केला. याची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या समवेत सौ. ज्योती जैन, सौ.शोभना जैन, डाॕ. भावना अतुल जैन, सौ. अंबिका अथांग जैन, प्राचार्य देबासिस दास यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरक संवाद साधला. अनुभूती स्कूल हे एक कुटुंब असून येथे फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही, तर आपल्या कलागुणांमध्ये निपूण होण्याची संधी मिळते. कला, साहित्य, स्पोर्टस यासह सांस्कृतिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाच उद्देश अनुभूती स्कूलचा असल्याचे अतुल जैन म्हणाले.
प्राचार्य देबासिस दास यांनी अनुभूती स्कूलच्या विकासात्मक वाटचालीबाबत सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला नृत्यासह गणेश वंदना विद्यार्थ्यांनी सादर केली. सारे जहाँ से अच्छा हे देशभक्तीपर गीत, लकडी की काठी, हरे क्रिष्णा हरे रामा अशा एकाहून एक गीतांसह मेमिक्री, भांगडा नृत्य, तबला वादन, मानवतेचा संदेश देणारे ‘हिच आमची प्रार्थना’, केदारनाथ व ईच्छा पूर्ती एकांकिका अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. सोशल मीडीयाचा प्रभाव या विषयावर विद्यार्थ्यांनी नाटिकेतून प्रबोधन केले. 5 व 6 च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले महादानी नाटक विशेष ठरले. ‘फुलो ने मिट्टीसे पुछा..’ हे पर्यावरण गीत सादर केले. राजस्थानच्या पारंपरिक नृत्याने ‘फेशर्स डे’चा समारोप झाला.

दरवर्षी स्कूलचा स्थापना दिन व फेशर्स डे साजरा केला जातो. यादिवशी स्कूलमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना अनुभूती स्कूलची शैक्षणिक जीवनमूल्यांची ओळख झालेली असते. अनुभूती स्कूल निवासी असल्याने विद्यार्थी येथील वातावरणाशी एकरूप होतात. हा आनंदोत्सव म्हणजे फेशर्स डे यात विद्यार्थ्यांनी धम्माल केली.

आभार प्रमोद कांबळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले.

स्व. विनोद जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप – २०२३ स्पर्धा

जळगाव दि.७ – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित व ४ फेदर्स बॅडमिंटन अॅकॅडमी आयोजित स्वर्गीय विनोद (बंटी भाई) जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ “जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप-२०२३” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जुलै ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी तसेच पुरुष आणि महिला खुलागट व ३५+ वर्षावरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा स्वरूपात घेतल्या जातील. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात नाव नोंदणीची अंतिम दिनांक १६ जुलै २०२३ असून संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी किशोर सिंह (९४२११२११०६) यावर संपर्क साधावा. किंवा पत्ता:- जैन स्पोर्ट्स अकॅडमी, कांताई सभागृह, नवीन बस स्टॅन्ड जवळ, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अतुल जैन व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन यांचे अध्यक्ष डॉ. तुषार उपाध्ये यांनी केले आहे.

कमावण्यास सज्ज व्हा; SEBI ने 3 IPO ला मान्यता दिली, तपशील लक्षात घ्या

आगामी IPO: बाजार नियामक सेबीने बुधवारी 3 IPO ला मंजुरी दिली आहे. यामध्ये Nova Agritech, Netweb आणि SPC Life या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. लवकरच मंजुरी मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांना पब्लिक इश्यूमध्ये पैसे गुंतवायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. सध्या या कंपन्यांबद्दल जाणून घ्या.

Nova Agritech IPO

तेलंगणा आधारित कृषी इनपुट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नोव्हा अॅग्रीटेकचा व्यवसाय कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. यामध्ये माती आरोग्य व्यवस्थापन, पीक पोषण, पीक संरक्षण उत्पादने तयार करणे समाविष्ट आहे. DRHP च्या मते, कंपनी IPO अंतर्गत 140 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करेल. याशिवाय प्रवर्तक नुतलपती व्यंकटसुब्बाराव OFS अंतर्गत भाग विकतील. या अंतर्गत, 77,58,620 इक्विटी विक्री होईल.

Netweb Technologies IPO

कंपनीला IPO द्वारे 257 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यासाठी कंपनीकडून नव्याने इश्यू केले जातील. यासोबतच प्रोमोटर्सही त्यांचे शेअर्स विकणार आहेत. दिल्ली स्थित कंपनी खाजगी क्लाउड, हायपर कन्व्हर्ज्ड इन्फ्रास्ट्रक्चर, एआय एंटरप्राइजेस वर्कस्टेशनसह डेटा सेंटरच्या विभागांशी संबंधित आहे.

SPC लाइफ IPO

बाजार नियामक सेबीने सक्रिय फार्मा घटकांसाठी प्रगत इंटरमीडिएट्स बनवणाऱ्या या कंपनीच्या IPO ला मान्यता दिली आहे. कंपनीला पब्लिक इश्यूद्वारे 300 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यामध्ये ताजे अंक प्रसिद्ध केले जातील. तसेच, प्रवर्तक स्नेहल राजीवभाई पटेल OFS द्वारे 89.39 लाख इक्विटी शेअर्स विकतील. डीआरएचपी फाइलिंगनुसार, हा निधी 55 कोटी रुपयांच्या कर्जाच्या पेमेंटसाठी आणि दहेजमधील प्लांटच्या फेज-2 च्या 122 कोटी रुपयांच्या विस्तारासाठी वापरला जाईल. याशिवाय सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी खर्च होणार आहे.

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा तसीन तडवी प्रथम तर गुणवंत कासार द्वितीय

जळगाव – येथील जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ फेऱ्याअखेर ६ गुण मिळवीत स्पर्धेत जळगावच्या तसीन तडवी याने प्रथम क्रमांक मिळवला.त्यास १२०० रूपयांचे पारितोषिक व चषक प्राप्त केला. तर दुसर्‍या स्थानी जळगावचाच फिडे मानांकित खेळाडू गुणवंत कासार ५ याने गुणांसह द्वितीय स्थान पटकाविले.त्यास तर तिसरे स्थान जयेश सपकाळे पटकाविले.
स्पर्धेत खुल्या गटातील पहिल्या दहा खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


तसेच उत्तेजनार्थ बक्षीस वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना मेडल देऊन गौरवण्यात आले
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव तसेच अप्पर कोषाधिकारी शकील देशपांडे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू नथू सोमवंशी, प्रवीण ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेत एकूण ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यात १५ फिडे मानांकित खेळाडू होते.स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांनी काम पाहिले.
पारितोषिक वितरण समारंभाचे आभार अभिषेक जाधव यांनी मानले.

खुला गटातील विजयी खेळाडू पुढील प्रमाणे
१) तसीन तडवी सहा गुण
२) गुणवंत कासार
३) जयेश सपकाळे
४) अक्षय सावदेकर
५) विवेक तायडे
६) संस्कार पवार
७) अजित कुमार शेगोकार
८) आयुष गुजराथी
९) किरण सोनवणे
१०) अजिंक्य निकम

१३ वर्षाखालील वयोगट
१) क्षितिज वारके
२) टिळक सरोदे
३) सोहम चौधरी

११वर्षाखालील वयोगट
१) आरुष सरोदे
२) निकुंज जैन
३) हिमांशू सरोदे

९ वर्षाखालील वयोगट
१) देवांक लड्डा
२) गौरव बोरसे
३) रोनीत बालपांडे
विशेष उत्तेजनार्थ
श्लोक वारके, अजय पाटील,गुणवंत पाटील, सुकृत पाठक यांना बक्षिसे देण्यात आली.

उत्तेजनार्थ महिला खेळाडू
१) ऋतुजा बालपांडे
२) चेतना सोनवणे
३) शरण्या शिंदे
तर सर्वात लहान खेळाडू म्हणून विशेष उत्तेजनार्थ चाळीसगावची , शौर्या पाटील हिला गौरवण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, नथू सोमवंशी,परेश देशपांडे,अभिषेक जाधव, आकाश धनगर यांनी काम पाहिले.

श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय अध्यक्षपदी अशोक जैन यांची एकमताने पुनर्निवड

जळगाव, दि. ३ – गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालयच्या श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने पुनर्निवड झाली. श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय येथे रविवारी २ जुलै २०२३ रोजी मंदिर विश्वस्तांची बैठक पद्मालय येथे संपन्न झाली. त्यात सर्व विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाची घोषणा विश्वस्त अमित पाटील यांनी केली.

विश्वस्तांच्यावतीने पुनर्नियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. अशोक जैन यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस महाराष्ट्र शासनाच्यावतीने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकताच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला.
१ जुलै २०१८ रोजी पहिल्यांदा गणपती मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळात निवड करण्यात आलेली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही सभा बोलवण्यात आली होती. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. श्रीक्षेत्र पद्मालयाच्या विकासासाठी भक्कम नेतृत्वाची आवश्यकता असून त्यासाठी अशोक जैन यांची अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात यावी, असा ठराव संस्थानचे विश्वस्त अमित पाटील यांनी मांडला. या ठरावास सर्व विश्वस्तांनी एक मताने मंजुरी दिली. त्यास भिका लक्ष्मण पाटील यांच्यासह सर्व विश्वस्तांनी अनुमोदन दिले. या वेळी संस्थानचे माजी अध्यक्ष अर्जुन पाटील, आनंदराव पाटील व अमृत कोळी गोकुळ देशमुख, भिका पाटील, शिरीष बर्वे, डॉ. पी.जी. पिंगळे, अमित पाटील, गणेश वैद्य आदी विश्वस्त, अशोक पाटील डोणगावकर उपस्थित होते.

देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होणार – अशोक जैन
पर्यटकास पद्मालयाचे पौराणिक महत्त्व चित्र व म्युरल प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसेल असे नियोजन आहे. या संस्थानला ‘ब’ दर्जा मिळाल्यामुळे नियोजीत कामांना वेग येऊन मंदिर आणि परिसराचा विकास होईल. या संस्थानचा सर्वतोपरी विकास साध्य करण्याचा संकल्प विश्वस्तमंडळाने घेतला आहे. भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल अशी खात्री आहे असे पुनर्निवड झालेले अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थी अभ्यासताय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

जळगाव दि. ०१ – अनुभूती निवासी स्कूल मध्ये नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यांची सांगड घातली जाते. जेणे करून विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य ते शिक्षण घेता यावे. काळाच्या पुढे जाऊन अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरवातीपासूनच विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणित या विषयाला धरून (STEM Lab) कार्यान्वित आहे.

अनुभूती इनोव्हेशन सेंटर मध्ये आता आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि रोबोटिक लॅबची भर पडली आहे. इयत्ता ५ वी पासून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण मिळत आहे. पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक सांकेतिक दुनियेत विद्यार्थी सक्षम होऊ पाहत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व औद्योगिक कौशल्ये विकसीत केली जावीत म्हणुन सीआयएससीई, दिल्ली बोर्डाने या वर्षापासून अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) विषयाचा समावेश केला आहे. अनुभूती स्कूलमध्ये विद्यार्थी इयत्ता ९ वी पासून हा विषय अभ्यासत आहेत. तसेच इयत्ता ५ वी ते ८ वी चे विद्यार्थीसुद्धा आर्टिफ़िशियल इन्टेलिजन्स क्लब मध्ये प्रात्याक्षिकासह अनुभव घेत आहेत. जेणे करून याविषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल. त्याकरिता अनुभूती निवासी स्कूल व्यवस्थापनाने स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून अत्यंत अनुभवी शिक्षकांची नेमणूकसुद्धा केली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थी रोबोटिक्स, कोडिंग, थ्री डी प्रिंटींग, ड्रोन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी अशा विषयांचा सखोल अभ्यास करू शकतील. त्यासाठी लागणाऱ्या अद्ययावत संसाधनांची पुर्ततासुद्धा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी, अनुभवाधारित शिक्षणासाठी अनुभूती निवासी स्कूल कायम कटिबद्ध आहे. एवढ्या विस्तृत श्रृखंलेत विविध विषयांचे ज्ञान देणारी अनुभूती स्कूल अजून तरी अशा प्रकारची एकमेव स्कूल असल्याचे प्रतिपादन संचालिका सौ. निशा जैन यांनी केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version