जेष्ठ कवीवर्य, पद्मश्री ना.धो. महानोर यांना भावपुर्ण श्रद्धांजली – अशोकभाऊ जैन

जळगाव : महाराष्ट्राचे निसर्गकवी म्हणून ख्यातीप्राप्त असलेले प्रगतीशील शेतकरी तथा पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित  ना.धों.महानोर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज सकाळी 8.30 वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाप्रती जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती अशोकभाऊ जैन यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पद्मश्री ना.धो. महानोर यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख असल्याचे अशोकभाऊ जैन यांनी म्हटले आहे . पद्मश्री ना.धो. महानोर यांनी दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केले होते.   ते पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जात होते. तसेच हायटेक ऍग्री कल्चर शेतीचे ते पुरस्कर्ते होते. आमच्या परिवाराचे जेष्ठ सदस्य असलेल्या महानोर दादांना  आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली – अशोक जैन भवरलाल अँड कांताबाई जैन परिवार, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, गांधी रिसर्च फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट  व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमीटेडचे सहकारी.

5 वर्षात 5193% चा मजबूत परतावा; या शेअरवर पुन्हा एकदा एक्सपर्टची तेजी, पुढील टार्गेट लक्षात घ्या

आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात म्हणजेच मंगळवारी शेअर बाजारात मंदीचे सावट पाहायला मिळाले. शेअर बाजारात मंदी आणि हलकी खरेदी असतानाही शेअर बाजारातील तज्ज्ञांनी अनेक शेअर्सवर खरेदीचे मत व्यक्त केले आहे. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी मजबूत स्टॉक निवडला आहे आणि त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही या स्टॉकवर शॉर्ट टर्म ते लाँग टर्म असा पैज लावू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही या स्टॉकमध्ये खरेदी करू शकता.

तज्ञांनी हा स्टॉक निवडला

मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी ज्योती रेजिन्स खरेदीसाठी निवडले आहेत. तज्ञाने सांगितले की कंपनीचे मार्केट कॅप 1700 कोटी रुपये आहे. तज्ज्ञाने सांगितले की त्यांनी हा साठा यापूर्वीही खरेदीसाठी दिला आहे. जरी फक्त एकदाच खरेदीसाठी दिले. कंपनीत तरलता जास्त आहे आणि किंमतही जास्त आहे.

ज्योती रेजिन्स – खरेदी करा

CMP – 1499

लक्ष्य किंमत – 1690/1750

कालावधी – 4-6 महिने

कंपनीची मूलभूत तत्त्वे कशी आहेत?

शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे तर कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 51 टक्के आहे. याशिवाय सार्वजनिक शेअरहोल्डिंगमध्येही मोठी नावे आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, या स्टॉकमध्ये फारसा कमी धोका नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार या शेअरमध्ये खरेदी करू शकतात.

(अस्वीकरण: येथे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही ट्रेडिंगबझची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन


जळगाव दि.२९ जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट क्लब यांची सभा दि.२८ जुलै ला संपन्न झाली. यामध्ये येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये स्व. किरण दहाव स्मृती टी-२० व स्व. सुरेश अग्रवाल स्मृती एक दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले. ही स्पर्धा अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर घेण्यात येईल. ही सभा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांच्या उपस्थितीत पार पाडली. या सभेत क्लब प्रतिनिधी, खेळाडू यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उत्कृष्ट प्रतिसाद दिला. अरविंद देशपांडे यांनी सभेची सुरुवातीला सर्वाचे स्वागत करित परिचय करून दिला. अविनाश लाठी यांनी येणाऱ्या क्रिकेट मौसमात घेण्यात येणाऱ्या स्व. किरण दहाड स्मृती टि-२० क्रिकेट स्पर्धा व स्व. सुरेश अग्रवाल स्मृती एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा याबाबत चर्चा करण्यात आली. विजेता व उपविजेता यांना चषक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. स्वराज रेडीयन्स चे संचालक तेजल पाटील यांनी विजेता व उपविजेता संघांना ट्रॉफी देण्याची घोषणा केली. अशपाक शेख यांनी मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना वैयक्तिक पारितोषिके देण्याचे प्रायोजित केले. तर पंकज महाजन यांनी प्रत्येक सामनावीर खेळाडूस ट्रॉफी देण्याचे जाहीर केले आहे. सामन्यासाठी लागणारे चेंडू साठी अविनाश लाठी यांनी अंशतः अनुदान देण्याचे जाहिर केले. ही स्पर्धा साधारणत: २ ते ३ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येतील. संघाचा सहभाग हा दि. १ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे हे सर्व ऑन लाईन करण्यात

मुस्तुफा खानची जळगांव जिल्हा कॅरम संघात निवड

जळगांव . दिनांक २५ व २६ जुलै दरम्यान कांताई साभगृह येथे जळगांव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित जिल्हा स्तरीय सिताराम (बबन भाऊ) बाहेती यांच्या जयंती निमित्त जळगांव जिल्हा मानाकंन व निवड कॅरम स्पर्धेत नॅशनल कॅरम क्लब नशिराबादचा खेळाडू मुस्तूफा खान यांने जळगांव जिल्हयात ६वे स्थान प्राप्त केले. पुणे येथे दिनांक ०४ ते ०७ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता त्याची जळगांव जिल्हा पुरुष संघात निवड करण्यात आली आहे.
त्याच्या निवडीबद्दल नॅशनल कॅरम क्लब तर्फे सर्वश्री मोहम्मद फजल मन्यार, समद मेंबर, अजिज मोमिन, समद आयडिया,नवाब खान,समिर अली, अजमल खान ( राजु भाई ) रियाज अली ( भुरा भाई) अताऊल्लाह खान, मुज्जमिल मन्यार, सिद्दिक शेख, जमीर खान, मुनसफ अली, अहमद पठाण, मुजिबुद्दिन, वसीम अहमद,अकील अ.रहेमान, एजाज अ.रहेमान,गणेश माळी, आदी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

नविन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाचे विद्यार्थीही अभ्यासणार महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान

जळगाव दि. 27 – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात आज महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कराराद्वारे शैक्षणिक, संशोधन आदान-प्रदान, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आदींचा समावेश आहे. याअंतर्गत विद्यापिठातील विद्यार्थ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमांमधे सहभागी होता येणार आहे.

महात्मा गांधीजींची विचारधारा यांचा प्रचार-प्रसारासाठी पीजी डिप्लोमा, संपोषित ग्रामीण पुर्ननिर्माणासाठी स्नातकोत्तर डिप्लोमा, संघर्ष परिवर्तनवर कार्यशाळा, युवा पिढीचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प, आंतरराष्ट्रीयस्तरावर शांती व अहिंसेच्या संदर्भात विंटर स्कूल, संशोधनासाठी वेगवेगळे इंटर्शनशिप, फेलोशिप, महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन यांच्यासह गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रामविकास असे विविध उपक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशन राबवित असते. या सर्व उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील विद्यार्थ्यांनाही यात संधी निर्माण होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनने यापूर्वी अमेरिकेतील एरिझोना स्टेट विद्यापीठ, मेक्सिकोमधील सायंटिस विद्यापीठ, महात्मा गांधीद्वारा स्थापित गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, इटली येथील पीस फाऊंडेशन आदींमधे यापूर्वी सामंजस्य करार केलेले आहेत. या श्रृखंलेत आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

या करारावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. डॉ. गिता धर्मपाल यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या, यावेळी विद्यापिठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व संचालक डॉ. राजेश जावळेकर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने वरिष्ठ सल्लागार व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, समन्वयक उदय महाजन, असोसियट प्रोफेसर डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. विद्यापीठातर्फे प्रा. ए. एम. महाजन, प्रा. सतीष कोल्हे, प्रा. डी. एच. मोरे, प्रा. पी. पी. माहुलीकर, डॉ. विकास गिते, प्रा. प्रविण पुराणीक, प्रा. उमेश गोगडीया, प्रा.दीपक सोनवणे, सीए. रवींद्र पाटील, पीआरओ डॉ.सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ. के. बी. पाटील यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन व विद्यापीठाच्या कराराद्वारा भविष्यात युवकांसाठी रचनात्मक शिक्षण प्रणालीत नव-नवीन संकल्पना साकार होतील. डिग्रीपेक्षा प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अनुभव घेता येईल, असे प्रतिपादन यावेळी केले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी हा करार ऐतिहासीक असल्याचे सांगितले. डॉ. राजेश जावळेकर यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

धनादेश अनादर प्रकरणी कृपाण शेती सेवालयच्या आनंद कृपाणला शिक्षा

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – जळगाव च्या जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीला खात्यात पैसे नसताना ७ लाख ८४ हजार १९५ रूपयांचा धनादेश गोंदिया येथील कृपाण शेती सेवालय या फर्मचे प्रो. प्रा. आनंद कवडूजी कृपाण यांनी दिला होता.

हा धनादेश अनादर झाला. याप्रकरणी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगावच्यातर्फे कैलास नागोलाल अग्रवाल यांनी फिर्याद दाखल केली व साक्ष नोंदवली. फिर्यादी कंपनीचे वकील म्हणून  अॅड. निशांत सुशील अत्रे यांनी काम पाहिले. दि.१८ जुलै ला अंतिम सुनावणी झाली. त्यात ७ लाख ८४ हजार १९५ रूपयांचा धनादेश अनादर झाल्याने न्यायालयाने आरोपीस एन.आय.अॅक्ट मधील तरतुदीखाली दोषी धरले. एक वर्षाचा साधा कारावास व रक्कम १० लाख रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रक्कमेपैकी ९ लाख रूपये एवढी रक्कम फिर्यादी कंपनीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशसुध्दा केलेत.

डोळे येण्याच्या साथीवर डॉ. कडू यांचे मार्गदर्शन

पावसाळ्याचे वातावरण हे अनेक प्रकारच्या जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळेच ह्या वातावरणात अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी पसरतात. त्यापैकीच एक डोळ्यांचा साथीचा रोग जो ह्या वातावरणात पसरतो आहे तो आहे ‘कंजंक्टीवायटिस’. ह्या साथीच्या रोगाचे कारण व निदान काय?  डोळे येण्याची साथ ही मुख्यत्वे एक प्रकारच्या वायरसमुळे असते.

हा आजार कसा पसरतो?  हा आजार मुख्यत्वे वायरसच्या थेट संपर्कात आल्याने होतो. उदा. डोळे आलेल्या व्यक्तीच्या हातावर किंवा रूमालावर हा वायरस असू शकतो. ह्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श तुमच्या हातास झाला आणि तो हात  तुम्ही डोळ्यांना लावला तर तुम्हाला ह्या रोगाची लागण होऊ शकते.

अशा प्रकारे प्रादुर्भाव झालेले पृष्ठभाग उदा. दारांचे  हँडल्स, रूमाल, टाॅवेल, काॅम्प्युटरचे माऊस, इत्यादी ह्यांच्या स्पर्शाद्वारे हा आजार पसरतो. शिवाय आजार झालेल्या व्यक्तिच्या शिंकेतून किंवा खोकल्यातूनही हा आजार पसरू शकतो.

गैरसमज – असे मानले जाते की डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे बघितल्याने आपलेही डोळे येऊ शकतात, हा गैरसमज आहे. निव्वळ बघितल्याने आजार पसरत नाही.

लक्षणे -(१) डोळ्यात टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटणे.

(२) डोळे लाल, गुलाबी होणे.

(३) डोळ्यांना खाज, जळजळ होणे.

(४) सकाळी झोपेतून उठताना पापण्या एकमेकांना चिकटून बसणे.

(५) पापण्यांना सूज येणे, इत्यादी.

आजार झाल्यानंतर घ्यावयाची काळजी –

(१) लक्षणे दिसतच शाळेत किंवा कामावर जाणे बंद करावे.

(२) स्वतःच्या वस्तू उदा. टाॅवेल, रूमाल, उशी, इ. दुसऱ्यास वापरायला देऊ नये.

(३) घरच्या व्यक्तींच्या थेट संपर्कात येणे टाळावे.

(४) सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे.

(५) वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे.

(६) डोळ्यांना आणि चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे.

(७) प्रोटेक्टीव गाॅगल लावावा.

(८) स्वतःहून काही उपचार न करता डाॅक्टरांच्या सल्यानुसारच आैषधोपचार सुरू करावा.

कंजक्टीवायरिसमुळे डोळ्यात इतर कोणत्या गुंतागुंती (Complications) न झाल्यास हा आजार ५ ते ७ दिवसांत ठिक होतो. डॉ. अमोल कडू  विभाग प्रमुख, क्लिनीकल सर्व्हिसेस, कांताई नेत्रालय, जळगाव

जळगाव जिल्हा बॅडमिंटन  चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३ उत्साहात

जळगाव दि.२२ (प्रतिनिधी)– आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन  प्रायोजित आणि स्वर्गीय विनोद जवाहरानी उर्फ (बंटी भैय्या) यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत  जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक २१ ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९९ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याची पहिली बॅडमिंटन महिला राष्ट्रीय खेळाडू  कुमारी अनिता ध्यानी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे फाउंडर मेंबर डॉ. तुषार उपाध्ये,  शिल्पा फर्निचर चे मालक श्री राजकुमार मनोज व श्री शितलदास जवाहरानी आणि श्री राजेश जवाहरानी तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सहसचिव श्री तनुज शर्मा, सदस्य श्री शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत अनुप नाथांनी, प्रेम हसवानी, घनश्याम अडवाणी, डॉ. तळेले , अतुल ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा चॅम्पियन ची ट्रॉफी, प्रमाणपत्र व सिताफळ चे रोप देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – आरव अमित दुडवे
उपविजयी –  विहान राहुल बागड

११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी –   ओवी पुरुषोत्तम बोरनारे
उपविजयी – राखी विजय सिंह ठाकुर

१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शांतनु शैलेश फालक
उपविजयी – अन्मय अमोल जोशी

१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील
उपविजयी – तनिषा अनिल साळुंखे

१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अन्वेष सुधीर नारखेडे
उपविजयी – स्वामी उन्मेश पाटील

१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – तनिषा अनिल साळुंखे उपविजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – स्वामी उन्मेश पाटील आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे
उपविजयी – रजत प्रेमळ पटेल आणि शांतनु शैलेश फालक

१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – उजेर रियाज देशपांडे
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी –  सौम्या मनोज लोखंडे
उपविजयी – इशिका कपिल शर्मा

१७ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी –  दक्ष धनंजय चव्हाण आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे
उपविजयी – रितुल विनोद बोरा आणि सुंदर जयसिंग पवार

१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील  उपविजयी – सौम्या मनोज लोखंडे

१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि करण संजय पाटील
उपविजयी – जाजीब सुहेल शेख आणि अर्श रहीम शेख

पुरुष एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – कौशिक प्रवीण बागड

महिला एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील
उपविजयी – गीता अखिलेश पंडित

पुरुष दुहेरी
विजयी – उमर रियाज देशपांडे आणि करण संजय पाटील
उपविजयी – कौशिक प्रवीण बागड आणि मयूर राजेंद्र भावसार

३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – विनायक बालदी
उपविजयी – तनुज शर्मा

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा
उपविजयी – डॉ. अमित चौधरी आणि किशोर सिंग सिसोदिया

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – डॉ. वृषाली विवेक पाटील आणि कीर्ती मोतीलाल मुनोत

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून खुशाल भावसार, भूषण पाटील, गीता अखिलेश पंडित, शुभम जितेंद्र चांदसरकर, शुभम पाटील, देवेंद्र कोळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत जाजीब शेख, दिपिका ठाकूर, अक्षय हुंडीवाले,  अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, तेजम केशव, राखी ठाकूर,  हमजा खान, आर्य गोला, प्रणेश गांधी, करण पाटील, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमी ची खेळाडू गीता पंडित व आभार प्रदर्शन प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन व जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती व हॉटेल प्रेसिडेंट चे मालक श्री मनोज आडवाणी यांनी केले व पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शतरंजच्या खेळातून जीवन आणि गुंतवणुकीचा मंत्र शिका, या टिप्स फॉलो करा

गुंतवणूक धोरण: बुद्धिबळ हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. रणनीतीचा सर्वोत्तम खेळ तसेच राजेशाहीचा खेळ मानला जातो. दुसरीकडे, असेही म्हटले जाते की या गेममध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला फक्त 2 चालींमध्ये पराभूत केले जाऊ शकते. बुद्धिबळ हा एकमेव बोर्ड गेम आहे जो काळाच्या कसोटीवर उभा राहिला आहे. बुद्धिबळाचा उगम भारतात झाला असे अनेकांचे मत आहे. हे ‘चतुरंग’ म्हणून ओळखले जात असे, ज्याचे नाव सैन्याच्या चार भागांच्या नावावर ठेवले गेले होते जसे की हत्ती, रथ, घोडेस्वार आणि पायदळ. बुद्धिबळाचा उगम 2 सैन्यांमधील लढाईच्या रूपात झाला, हा खेळ जीवन आणि गुंतवणूकीबद्दल खूप काही शिकवतो असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाचे सीईओ सुरेश सोनी म्हणतात की बुद्धिबळ हा डावपेचाचा खेळ आहे. पहिली चाल होण्याआधीच, बुद्धिबळप्रेमी त्यांच्या खेळाच्या योजना आणि धोरणे तयार करतात. त्याचप्रमाणे, एखाद्याने आपले पैसे कामावर लावण्यापूर्वी, आपल्याला आपली आर्थिक उद्दिष्टे आणि आपण कोणत्या कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छितो याची जाणीव असणे आवश्यक आहे, जे नंतर आपली गुंतवणूक धोरण परिभाषित करेल. खेळाडू, अडकल्यावर, त्यांचा खेळ योजना सुधारण्यासाठी अनेकदा प्रशिक्षकाची मदत घेतात. त्याचप्रमाणे, जेव्हा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबत काही शंका असतील, तेव्हा ते आर्थिक सल्लागारांच्या कौशल्याचा लाभ घेऊ शकतात. आर्थिक सल्लागार गुंतवणूकदाराचे आर्थिक नियोजन सुधारण्यात मदत करू शकतात.

प्रत्येक तुकडा अद्वितीय आहे आणि गेममध्ये त्याची विशेष भूमिका आहे

बुद्धिबळात 6 प्रकारचे तुकडे असतात आणि एका खेळाडूच्या एकूण तुकड्यांची संख्या 16 असते. यामध्ये 8 प्यादे, 2 बिशप (उंट), 2 शूरवीर (घोडा), दोन रुक्स, एक राणी आणि एक राजा यांचा समावेश आहे. या प्रत्येक तुकड्याची एक परिभाषित हालचाल असते आणि ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर केवळ नियमांच्या परिभाषित संचाद्वारेच हल्ला करू शकतात. त्या प्रत्येकाचे गेममध्ये एक विशिष्ट स्थान आहे.

त्याचप्रमाणे, जेव्हा जीवनात येते तेव्हा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या अद्वितीय प्रवासामुळे आपण सर्व अद्वितीय आहोत. त्याचप्रमाणे, जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येक मालमत्ता वर्गाची स्वतःची वैशिष्ट्ये आणि गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये स्थान असते. उदाहरणार्थ, कर्ज योजना तुलनेने स्थिर असतात, तर इक्विटीमध्ये अस्थिरतेची शक्यता असते, परंतु कर्जापेक्षा जास्त परताव्याची क्षमता असते. आम्ही अनेकदा, विचार न करता, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कर्जाचा पर्याय वापरतो, ज्यामुळे आम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक केली असती तर आम्हाला मिळू शकणारे अतिरिक्त परतावा गमावतो. त्याचप्रमाणे, बाजारातील किरकोळ आणि अल्प-मुदतीच्या चढ-उतारांची भीती न बाळगता, आमची गुंतवणूक वाढवण्यासाठी पुरेसा वेळ न देता, आम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करतो आणि काही महिन्यांत किंवा दिवसांत पैसे जमा करतो.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी हा उत्तम आणि योग्य पर्याय आहे. कर्जामुळे अस्थिरता कमी होते आणि सोने महागाई किंवा भू-राजकीय घटनांच्या नकारात्मक परिणामांपासून बचाव म्हणून काम करते. जेव्हा आम्ही प्रत्येक मालमत्ता वर्गाची वैशिष्ट्ये आमच्या गुंतवणुकीचे क्षितिज आणि जोखीम भूक यांच्याशी जुळवून घेतो तेव्हाच आम्ही मजबूत पोर्टफोलिओ तयार करतो,

सातत्य प्यादेला राणी बनवू शकते

आम्ही अनेकदा लहान, सतत प्रयत्नांची शक्ती कमी लेखतो. बुद्धिबळात, एक मोहरा जो बोर्डच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकतो तो स्वतःला राणीमध्ये बदलू शकतो. जीवनात, जे आपल्या स्वप्नांसाठी चिकाटीने प्रयत्न करतात, ते ते साध्य करतात. सातत्याने गुंतवणे लहान आणि पद्धतशीर गुंतवणूक (SIPs) चक्रवाढ शक्तीचा फायदा घेतात आणि कालांतराने तुमचे पैसे वाढवतात.

यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी संयम ही गुरुकिल्ली आहे

बुद्धिबळ हा संयमाचा खेळ आहे. खेळादरम्यान असे काही वेळा येतात जेव्हा खेळाडूंना त्यांचे मन शांत ठेवावे लागते आणि पुढील वाटचालीबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. कोणत्याही अल्पकालीन नकारात्मक बातम्या किंवा गुंतवणुकीतील (आणि जीवनातील) बाजारातील अस्थिरता आपल्याला अस्वस्थ करू शकते. तथापि, गुंतवणूकदार म्हणून, आपण एका चांगल्या बुद्धिबळपटूप्रमाणे शांत राहणे, अविचारी निर्णय न घेणे, आमच्या योजनेला चिकटून राहणे आणि अस्थिर गुंतवणूक चक्र संपण्याची वाट पाहणे शिकले पाहिजे.

कोणत्याही किंमतीत राजाचे रक्षण करा

बुद्धिबळात असे म्हटले जाते की राणीकडे सर्वात जास्त शक्ती असते, जरी राजा मेला तर खेळ संपला. त्यामुळे राजाचे सदैव संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीत (आणि जीवनात) राजा आपल्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे आणि कशाचे संरक्षण करणे आवश्यक आहे याचे प्रतिनिधित्व करतो. आपण कोणत्या ध्येयाला महत्त्व द्यायचे हे ठरवायचे आहे. हे मुलाचे शिक्षण किंवा पालकांना त्यांच्या स्वप्नातील सुट्टीवर पाठवणे असू शकते. आपल्याला जी गोष्ट महत्त्वाची वाटते, त्या दिशेने आपण गुंतवणूक करायला सुरुवात करणेच योग्य आहे.

बुद्धिबळात जिंकल्याप्रमाणे, संपत्ती निर्मिती आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गामध्ये धोरण आणि शिस्त यांचा समावेश होतो. तुमचा गुंतवणुकीचा प्रवास पुढे नेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी या दोघांमधील समानता आहेत.

रेल्वे तिकीट बुकिंग सेवा ठप्प, ऍप आणि वेबसाइट सुद्धा ठप्प, अतिरिक्त तिकीट काउंटर सुरू, काय आहे प्रकरण ?

ट्रेडिंग बझ – प्रवाशांना मंगळवारी सकाळी IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन), ट्रेन तिकीट बुक करण्यासाठीचे सर्वात लोकप्रिय ऐप आणि भारतीय रेल्वेच्या उपक्रमांतर्गत कंपनीवर समस्यांचा सामना करावा लागला. प्रवाशांनी तिकीट बुकिंग (IRCTC तिकीट बुकिंग सेवा) आणि पेमेंटमध्ये काही तांत्रिक समस्या पाहिल्या. लोक सकाळी 10 ते 11 या वेळेत तत्काळ तिकीट (IRCTC तत्काळ तिकीट) बुक करण्यासाठी धडपडत असताना ही समस्या होत होती आणि नंतर ही बराच वेळ तशीच सुरू राहिली.

IRCTC काय म्हणाले ? :-
ट्विटरवर अपडेट्स देत, आयआरसीटीसीने प्रवाशांना पेमेंटसाठी वॉलेट वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बुकिंगसाठी Ask दिशा पर्याय निवडण्यास सांगितले. प्रवाशांना आयआरसीटीसी एप आणि वेबसाइट दोन्हीवर समस्या येत असल्याची माहिती आहे. मात्र, असे असूनही, ‘आस्क दिशा’ वरही अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून ट्विटरवर येत आहेत आणि पैसे कापूनही तिकीट बुक केले जात नाही. अनेक प्रवाशांनी त्यांचे पैसे कापले गेल्याचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत, मात्र तिकीट बुक केले जात नाही.

अजूनही समस्या सुटलेली नाही :-
दुसर्‍या ट्विटमध्ये, IRCTC ने अपडेट केले की तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे. समस्येचे निराकरण होताच, आम्ही त्याबद्दल माहिती देऊ. आणखी एका अपडेटमध्ये, कंपनीने सांगितले आहे की प्रवासी Amazon, MakeMyTrip वरून तिकीट बुक करू शकतात. IRCTC वर पेमेंटसाठी वॉलेटसोबत पर्यायी पेमेंट पर्याय काम करत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे तेव्हा हे अपडेट आले आहे.

रेल्वेने अतिरिक्त तिकीट काउंटर उघडले :-
रेल्वेच्या एका अपडेटमध्ये असे सांगण्यात आले आहे की, प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेल्वे काउंटर उघडण्यात आले आहेत. नवी दिल्लीतील सामान्य पीआरएस काउंटर व्यतिरिक्त, अनेक ठिकाणी अतिरिक्त काउंटरची यादी देखील आली आहे.

 

जॉईन Trading Buzz
Exit mobile version