Author: Trading Buzz
विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन …
जळगाव दि. १ एप्रिल (प्रतिनिधी) – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यवसायिक कलावंताच्या तोडीचे आहेत. सदर प्रदर्शनात विशेषत्वाने उल्लेख करावा अशी एक रचना करण्यात आली ज्यामध्ये इयत्ता ९ चे विद्यार्थी रोहन पोतदार, चिन्मय पाटीदार आणि दिव्यांश बेद यांनी पॉटरी माध्यमातून साकारलेली ‘नो ट्री – नो बर्डस्’ (जिथे आधार संपतो, तिथे श्वासही थांबतो) ही इंस्टॉलेशन रचना विशेष उललेखनीय आहे. माती कामातून तयार केलेल्या पक्ष्यांना एका मृत झाडाच्या खोडाजवळ त्यात मृतावस्थेत दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनेनुसार आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तथाकथित विकास वाटेवरून चालत असताना माणसाने सिमेंटची जंगले तयार करत निसर्गाची आतोनात हानी केली आहे. सदर मांडणी शिल्पामध्ये मृत झालेल्या झाडाजवळ पडलेले मृत पक्षी म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आपण सर्व म्हणजेच मानवजात असा व्यापक संदेश देणारी ही कलाकृती संपूर्ण प्रदर्शनामध्ये लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांच्या निरागस भावविश्वातून प्रकट झालेली ही रचना प्रबोधनात्मक संदेश देत विचार करायला भाग पाडणारी आहे.
कॅनवास तसेच कागदावरील चित्रकला, पेस्टल रंग, स्टेन ग्लास, चारकोल-पेन्सिल अशा विविध माध्यमातून निसर्ग, शाळा, व्यक्तिचित्र, मांडणीचित्र, परिसर, संस्कृती, कल्पनाविलास यासह पर्यावरण हे सर्व काही या प्रदर्शनात सर्वांगसुंदर, सुबक पद्धतीने शाळेच्या निर्सगरम्य परिसरात मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचे असते ते अनुभूती निवासी स्कूलच्या कला विभागातील शिक्षकांकडून, व्यवस्थापनाकडून सातत्याने मिळत असते त्यातून अशा कलाकृतींची निर्मिती वर्षभर होत असते.
विविध कलांचा अभ्यास करून निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे आर्ट अॅण्ड क्राफ्ट विभाग परिसरात दि. १ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी अनुभूती स्कूलचे संचालक अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, डॉ. भावना अतुल जैन, प्राचार्य देबासिस दास, कला शिक्षक प्रीतम दास, प्रितोम खारा, अनुभुती स्कूलचे शिक्षक तसेच पालक वृंद व रसिक विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यांच्या ‘भाव चित्र विश्वात’ जावून त्यांच्या विविध कलांचा ’आनंद शोध’ घेत होते. अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृती या प्रदर्शनात आहेत.
ख्रिसमसपूर्वी सोने महागले, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा ताजा भाव
डिसेंबर महिना चालू आहे, हे वर्ष 2023 देखील लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच गुरुवार, 21 डिसेंबर रोजी भोपाळमध्ये (मध्य प्रदेश सोन्याची किंमत आज) 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत रु. 61,560 प्रति 10 ग्रॅम.
सोन्याचे भाव वाढले
(भोपाळ सोन्याचा आजचा भाव) भोपाळच्या सराफा बाजारात काल म्हणजेच बुधवारी (22 के सोने) 22 कॅरेट सोने 58,180 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर (24 के सोने) 24 कॅरेट सोने 61,090 रुपये प्रति 10 दराने विकले गेले. ग्रॅम म्हणजेच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही वाढ झाली आहे
जर आपण चांदीबद्दल बोललो तर, भोपाळच्या सराफा बाजारात बुधवारी 79,700 रुपये प्रति किलोने विकली जाणारी चांदी आज शनिवारी 80,200 रुपये प्रति किलोने विकली जाईल.
गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेतून महात्मा गांधीजींना आदरांजली
जळगाव दि. २ प्रतिनिधी– येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. कांताई सभागृह येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी जळगाव शहरासह तालुक्यातील १७ शाळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल ने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत सहभागी शाळांनी मराठी व हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत सादर केले. सहभागी संघातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्या संघांना अनुक्रमे रु. ११ हजार, ७ हजार, ५ हजार व उत्तेजनार्थ रु. २ हजाराची तीन रोख पारितोषिके देण्यात आले.
स्पर्धेचा निकाल – ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल (प्रथम), ए. टी. झांबरे विद्यालय (द्वितीय), विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (तृतीय) क्रमांक तर उत्तेजनार्थ श्रीमती ब. गो शानबाग विद्यालय सावखेडा, अनुभूती इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल, बाल विश्व इंग्लिश व सेमी इंग्लिश माध्यम शाळा दादावाडी क्रमांकाने पारितोषिक मिळाले. ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्कूलच्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक असे स्वरूप होते. परीक्षक म्हणून दीपक चांदोरकर, संपदा छापेकर, आदिती कुलकर्णी यांनी काम बघितले.
या शाळेचा सहभाग – गांधीतीर्थ देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेत शहरासह तालुक्यातील १५ शाळांनी सहभाग नोंदविला यामध्ये ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल, या.दे.पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय मोहाडी, स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली, सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली, कै. ॲड अच्युतराव अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळांनी ही सहभाग नोंदविला. प्रत्येक शाळेतील संघांनी देशभक्तीपर गीत सादर करून महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, सुधीर पाटील, विश्वजीत पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार यांच्यासह गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे अहिंसा सदभावना यात्रेद्वारे विश्व अहिंसा दिवस साजरा
जळगाव दि. २ प्रतिनिधी – लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासा पुर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातुनच समाज घडेल. असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांनी केले. त्या गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्त लालबहादूर शास्त्रीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांच्याहस्ते अहिंसा सदभावना यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. माहेश्वरी, गांधीजींचे पणतु तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, अशोक जैन, अनिल जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, भरत अमळकर, माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, राधेश्याम चौधरी, अँड. रविंद्रभैय्या पाटील, अथांग जैन, सुरेश जैन, अब्दुल भाई, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, सौ. अंबिका जैन आदींसह शहरातील प्रशासकीय अधिकारी, जैन इरिगेशन मधील सहकारी, नागरीक व शहरातील हरिजन सेवक संघ कन्या छात्रालय, शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय, नंदनीबाई माध्यमिक विद्यालय, ओरियन इंग्लिश मिडीअम स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, अनुभूती निवासी स्कूल, आदर्श सिंधी हायस्कूल, मनपा उर्दू माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यात्रेत भारत माता, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कस्तुरबा गांधी, सरोजनी नायडू, अब्दुल कलाम यांची वेशषभूषा असलेली चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. ‘जय जवान जय किसान’, ‘महात्मा गांधीजी की जय’ चा नारा देत लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून शांती यात्रा निघून सरदार वल्लभभाई पटेल मनपा इमारत, पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रेचे समारंभात रूपांतर झाले.
श्रीमती अनुराधा शंकर यांनी आपल्या भाषणात मुलांशी संवाद साधताना गांधीजींविषयी रंजक गोष्टी सांगितल्या. महात्मा गांधीजींच्या विचारांची आवश्यकता विद्यार्थ्यांना आहे. कारण हेच मुलं भविष्यात समाज घडवतील. प्रश्न विचारु न देणाऱ्यांशी मैत्री करू नये. सर्वधर्म प्रार्थना आपण म्हणतो पण एकमेकांशी त्या प्रार्थनेप्रमाणे आचरण करतो का? हे स्वतः ला समजले पाहिजे. आपण लालबहादुर शास्त्री, महात्मा गांधीजी यांचे बुध्दी, युक्ती व शक्ती हे गुण आत्मसात करावे असेही त्या म्हणाल्यात.
लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुर्ष्पापण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वधर्म प्रार्थना होऊन ॲड. अच्युतराव अत्रे इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो…’ भजन गायन केले. प्रास्तविकेत गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गतवर्षातील उपक्रमांविषयी सौ.अंबिका जैन यांनी माहिती दिली. नॅशनल लिडरशिप कॅम्पमधील प्रतिनिधीं समवेत गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी अहिंसेची शपथ दिली. पी. जी. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पदव्या प्रदान केल्या गेल्या.
डॉ. विश्वास पाटील लिखीत ‘खानदेश में महात्मा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात महात्मा गांधीजींविषयी कान्हदेशातील अनेक घटनांची नोंद ऐतिहासिक पुस्तकात आहे त्याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुषार गांधी होते. आ. सुरेश भोळे, आ. लता सोनवणे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, अनिल जैन, डॉ. सुदर्शन आयंगार, सौ. ज्योती जैन, भरत अमळकर, डॉ. विश्वास पाटील, फाऊंडेशनच्या रिसर्च डिन गीता धरमपाल, सौ. अंबिका जैन आदी मान्यवर उपस्थित होते. दीपक चांदोरकर यांनी शेवटी राष्ट्रगीत म्हटले. सुत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले. याच कार्यक्रमात गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल ही घोषित करण्यात आला. यात २१ जिल्ह्यातील १४५ स्पर्धक सहभागी झाले होते.
पहिला गट १ पुरस्कार विजेते – मानसी गाडे- प्रथम, (शेवगाव, जि. नगर), गुंजन अहिरराव-द्वितीय, (धाडणे, जि. धुळे) हंसिका महाले, – तृतीय (भुसावल) तर उत्तेजनार्थ नेहा पाटील, (नंदुरबार), धनश्री पाटील, (तारखेडा, ता. पाचोरा जि. जळगाव) दुसऱ्या गटातील विजेते स्पर्धक- सृष्टी थोरात- प्रथम, (नंदुरबार), सृष्टी कुलकर्णी – द्वितीय (जळगाव), पियुष अहिरराव- तृतीय, (धाडणे, ता. साक्री जि. धुले) उत्तेजनार्थ पारितोषिक प्रणाली पाटील, (तारखेडा ता पाचोरा), पीयुष अहिरराव हे विजेते ठरले. त्यांना मान्यवराच्याहस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविले गेले.
चरखा जयंती निमित्त अखंड सूत कताई – महात्मा गांधींनी चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. महात्मा गांधींनी त्यांचा जन्मदिन चरखा जयंती म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन केले होते. त्याचे औचित्यासाधून बैलगाडीवर चरखाची मिरवणूकही यावेळी काढण्यात आली होती. तसेच कार्यक्रमस्थळी फाऊंडेशनचे काही सहकारी पुर्णवेळ सुतकताई करत होते. चरखा जयंती निमित्ताने गांधी तीर्थ येथे आज दिवसभर अखंड सूत कताई करण्यात आली.
जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली
जळगाव दि. १ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड, गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टसह कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियानांर्तगत संस्थात्मक व सार्वजनिक स्तरावातील सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पुर्वदिवशी विशेष ‘स्वच्छांजली’ मोहिम राबविण्यात आली. सहकाऱ्यांनी अतिरिक्त श्रमदान करीत कार्यरत परिसरात साफसफाई केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सर्व सहकाऱ्यांना ‘स्वच्छांजली’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.
जैन अॅग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क व डिव्हाईन पार्क मधील सर्व सहकाऱ्यांनी फुड पार्कच्या मेन गेटपासून ते जुना जकात नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता मोहिम सकाळी १० ते ११ यावेळेत राबविली. यात प्लास्टीक कचरासह पर्यावरणाचे संवर्धन याविषयीसुद्धा जनजागृती करण्यात आली. स्वच्छांजली मोहिमेत विजय मुथा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. अनिल पाटील, पी. एस. नाईक, आशिष भिरूड, सी. आय. देसर्डा, श्री. ललवाणी, बालाजी हाके, संजय पारख, विकास मल्हारा, विजय जैन, अनिल जोशी, डॉ. भारद्वाज, संजय चौधरी, सुनिल खैरनार, सुनील गुप्ता, विनोद पंडीत, व्ही. पी. पाटील, डॉ. मिश्रा, संजय सोन्नजे, जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, डॉ. ठाकरे, राजेश आगीवाल, अभिजीत शुक्ल, अतुल इंगळे, डॉ. इंगळे, दीपक चांदोरकर, डॉ. जयश्री. महाजन, अझिझ खान, आर. बी. येवले, सतिश खडसे, गांधी रिसर्च फाऊंडेशन चे उदय महाजन, गिरिश कुलकर्णी, मदन लाठी, सुधीर पाटिल, नितिन चोपडा, जे. बी माथ्यू, अनुभूती स्कूलचे श्री. भुसांडे, विक्रांत जाधव, भिकन खम्बायत यांच्यासह प्रत्येक विभागातील सर्व सहकारी उपस्थित होते. यामध्ये जैन फुड पार्क मधील टिश्यूकल्चर लॅबमधील महिलांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेत कार्यलयीन आवारात विशेष स्वच्छता मोहिम राबवली.
तर जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथील सहकाऱ्यांनी जैन प्लास्टिक पार्कच्या मुख्य गेट पासून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते बांभोरी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छांजली मोहीम राबविली. यात कंपनीचे सेक्रटरी अवधुत घोडगावकर, सी. एस. नाईक, लक्ष्मीकांत लाहोटी, दिलीप येवलेकर, व्ही. एम. भट, राजीव सरोदे, एस. सुकुमार, अशोक कटारिया, दिलीप सांखला, हेमंत पेढणेकर, विजय शुक्ला, सतिषचंद्र मंगल, मिलींद खारूल, राजेंद्र महाजन, सुनील शहा, महेश इंगळे, अतीन त्यागी, राजश्री पाटील, अश्विनी खैरनार, संगिता खंबायत, श्रद्धा घारे, माया गुजराथी, चारूलता पाटील, नेहा ठाकरे यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ सहकाऱ्यांसह सर्व विभागातील सहकारी सहभागी झालेत. दरम्यान प्लास्टीक पार्कच्या सहकाऱ्यांनी टाकरखेडा व पाळधी येथेसुद्धा स्वच्छांजली मोहिम राबविली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन इरिगेशनच्या स्वच्छांजली उपक्रमाचे कौतूक करत सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
पर्यावरणाचे संरक्षण, आरोग्यहित रक्षण व अपघातमुक्ती अशा त्रिसुत्री असलेल्या अभियानात सार्वजनिक परिसरांची स्वच्छता राखणे हि आपली वैयक्तिक तसेच सामुदायिक जबाबदारी आहे अशी शिकवण देणाऱ्या पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संस्थात्मक स्तरावरील सहभाग जैन इरिगेशन सिस्टीम्स व विविध आस्थापनांनी तसेच सामाजिक अंग असलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांनी सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षण, आरोग्यहित रक्षण व अपघातमुक्ती ह्या उदात्त अभियानात स्वेच्छापुर्वक उत्स्फूर्त सहभाग सहकाऱ्यांनी घेतला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही सहभाग घेतला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छांजली’ मोहिम यशस्वीतेसाठी संजय सावंत, बाळू साबळे, आर. एस. पाटील, किशोर पाटील यांच्यासह हाऊसकिपींग विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन
जळगाव दि.३० (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा येईल. या सद्भावना शांती यात्रेत पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. माहेश्वरी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव महानगर पालिकेच्या प्रशासक सौ. विद्या गायकवाड, के.सी. ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदी मान्यवर निमंत्रीत आहेत. सोबत शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोच्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.
रॅलीनंतर महात्मा गांधी उद्यानात होणाऱ्या विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये मा. श्रीमती अनुराधा शंकर अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) मध्यप्रदेश ह्या प्रमुख अतिथी असून, अध्यक्ष म्हणून मा. श्री. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थितीतांना गांधीजींचे पणतु मा. श्री. तुषार गांधी हे अहिंसेची शपथ देणार आहेत. शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेत’ सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.
चरखा जयंती निमित्त अखंड सूत कताई – महात्मा गांधींनी चरखा किंवा चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. २ ऑक्टोबर ह्या दिवशी चरखा जयंती ही साजरी केली जाते त्या निमित्ताने गांधी तीर्थ येथे अखंड सूत कताई होणार आहे. महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने गांधीतीर्थ सुरू राहणार आहे.
खानदेश में महात्मा गांधी पुस्तकाचे प्रकाशन – महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व आज त्रिखंडात सर्वमान्य झाले आहे. या देशातल्या पहिल्या ग्रामीण कॉंग्रेस अधिवेशनाचा मान खानदेशातील फैजपूर नगरीला लाभला. गांधीजी म्हणत की, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. खानदेशात गांधीजी आलेत व खानदेश गौरवान्वित झाला. लोकमान्य टिळक फंडाच्या निमित्ताने गांधीजी खानदेशात आले तेव्हा त्यांचे कमालीच्या उत्साहात सर्वत्र स्वागत झाले. मानपत्रे व भेटवस्तु देण्यात आल्यात. त्यांचा लिलाव करून ती रक्कम फंडात जमा झाली. वेगवेगळ्या संस्थांना, सामाजिक उपक्रमांना, व्यावसायिकाना भेटून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्याची मशाल तेवती राखली. यात आबालवृध्द स्त्री-पुरुषांचा उत्कट सहभाग होता. अशा अनेक घटनांची नोंद असलेल्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण – गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी कांताई सभागृहात गांधीतीर्थद्वारे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमानंतर लगेचच पारितोषिके देखील मान्यवरांच्याहस्ते प्रदान होणार आहेत. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम
जळगाव दि.२४ प्रतिनिधी – येवला येथे विभागीय कुस्ती स्पर्धा दि. २३ ला पार पडली. या स्पर्धेत प्रगती विद्या मंदीर शाळेचा विद्यार्थी व शाहुनगरमधील हनुमान आखाडा व्यायामशाळेचा पैलवान चि. हर्षित मनिष झेंडे हा ७१ किलो वजनी गटात व ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांकाने विजयी झाला.
या स्पर्धेच्या गटात प्रत्येकी दोन राऊंड झाले व दोन्ही राऊंड मध्ये हर्षित झेंडे या पैलवानने जिंकून अंतिम फेरीत विजय मिळवला. आता त्याची दि. २४ ते २७ दरम्यान कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेसाठी निवड झाली असून तो त्या स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे रवाना झाला आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या एक्सपोर्ट मार्केटिंग विभागाचे सहकारी मनिष झेंडे यांचा हर्षित चिरंजीव आहे. यशस्वी कामगिरीसाठी त्याला गुरु वस्ताद विजयदादा वाडकर, शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यातील विजयी कारकीर्दीस त्याला कुटूंबिय, हनुमान आखाड्याचे विजयदादा वाडकर व समस्त पैलवान मित्रमंडळीतर्फे, शाळेतील समस्त शिक्षकांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.
महा. क्रिकेट असो. आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजयी
नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे उद्घाटन – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव दि.23 प्रतिनिधी- मानवी सभ्यतेचे भविष्य म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्त्वात सर्वसामान्यांना प्रभावित करण्याची ताकद होती आणि आजही आहे. चांगल्या नेतृत्वाचा लोक नेहमी सन्मान करतात त्यासाठी आपले नेतृत्व कसे आहे याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी संपुर्ण जगात हिंसा सुरू होती त्यावेळी महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला. हिंसा म्हणजे अंधकाराचा मार्ग असून अहिंसक मार्गाने निर्माण झालेले नेतृत्व हे शाश्वत असते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आजपासून ते ४ ऑक्टोबर पर्यंत नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन केले आहे. कॅम्पच्या उद्घानाप्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ. के. बी. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अनुभती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सौ. अंबिका जैन, रिसर्च डीन प्रो. गिता धरमापाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई उपस्थित होते.
नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये नेपाळसह, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मिर, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह १६ राज्यातील युवकांनी सहभाग घेतला आहे. संपुर्ण भारतातील सहभागी युवकांनी एकमेकांना सुतीहार घालून आगळ्यावेगळ्यापद्धतीने स्वागत केले.
सौ. अंबिका जैन यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याविषयी सांगितले.महात्मा गांधीजींनी उद्योगाकडे विश्वस्त भावनेने बघितले. ह्याच संस्कारातुन श्रध्देय भवरलालजी जैन यांनी गांधीजींच्या विचार-प्रसारासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची निर्मिती केली. जागतिक दर्जाचे ‘खोज गांधीजी की’हे मल्टीमिडीया म्युझियम, गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रंथालय यासह ग्राम उद्योग वाढीसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले विविध उपक्रमांमुळे सकारात्मक बदल होत असल्याचे अंबिका जैन म्हणाल्या.
डॉ. अश्विन झाला यांनी गांधीयन लिडरशिप कॅम्प आजही का आवश्यक आहे याबाबत सांगितले. मूल्य, सिद्धांताला धरून नेतृत्व म्हणजे गांधीजीचे विचार आहेत तेच नेतृत्व आजच्या युवकांमध्ये निर्माण व्हावे यासाठी २०१७ पासुन गांधी रिसर्च फाऊंडेशन हा कॅम्प घेत आहे. यात सामर्थ्याच्या आधारावर साधारण जीवनशैलीतून असाधारण कार्य करणाऱ्या गांधीजींच्या मुल्याधारीत नेतृत्वाची आजच्या पिढीमध्ये संस्कार व्हावेत या भावेनूतन हा उपक्रम आहे. देशात व्यक्तिमत्त्व विकासापेक्षा चारित्र्य महत्त्वाचे आहे तेच नेतृत्व निर्माण करण्याचे काम या कॅम्पच्या माध्यमातून होत आहे.
प्रो. गीता धरमपाल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्यापैकी कोणी नेता नाही आणि अनुयायीसुध्दा नाही. ही एक महान मानसिकता तयार करा. चांगले आचरण करणे, परस्परांशी सहकार्य भावना ठेवणे, त्यात सत्यता असावी, लोकांचा विश्वासभाव जिंकताना दुसऱ्यांच्या आदर करा, चांगले करण्याची जबाबदारी घ्या, नेतृत्वासाठी अनुयायांची नाही तर साहसाची आवश्यकता आहे. आपल्यातील असलेली ताकद व कमजोरी स्वतः समजून घेतले पाहिजे.टिम वर्क महत्त्वाचे आहे हे समजून अहंकारचा त्याग करून प्रेमाने सर्वांशी वागणे म्हणजे नेतृत्व म्हणता येईल. सकारात्मकत वर्तन ठेऊन दुसऱ्यांचा आदर करा असे गीता धरमपाल यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी असलेल्या सौ. निशा जैन यांनी सांगितले की, संपुर्ण विश्वात व्यक्तिमत्व विकासासह वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत मात्र चारित्र्यवान व्यक्तीमत्व घडविण्याचा कुठलाही अभ्यासक्रम नाही. तो फक्त आपल्याला महात्मा गांधीजींच्या संस्कारात मिळतो.यातूनच चारित्र्यवान नेतृत्व घडवावे व जे चांगले आहे त्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवून पुढे यावे आणि आपल्यासह देशाच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन सौ.निशा जैन यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलाने झाली. यानंतर अनुभूती निवासी स्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘घुम चरखे घुम..’ हे गीत म्हटले. नितीन चोपडा यांनी सुत्रसंचालन केले. गिरीश कुळकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला
विविध विषयांवर होईल मंथन – गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू झालेल्या नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्प युवकांना गांधी विचार समजावे अहिंसा, सत्य या विचारांचे नेतृत्व कौशल्य निर्माण व्हावे, यासाठी मुल्यवर्धित शिक्षण-प्रशिक्षण देत आहे. या कॅम्पमध्ये गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधीजींचे पणतू तुषार गांधी, मध्यप्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक सौ.अनुराधा शंकर, डॉ. एम. पी. मथाई, कल्याण अक्कीपेडी, विनय चारूल, रमेश पटेल, अमृत देशमुख, अशोक जैन, अनिल जैन, मुंबईचे प्रसिध्द गजलकार फराजखान अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.