गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

जळगाव दि. 8 – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी क्रांती दिनी “भारत से जुडो” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी मुख्य भाषण करतील त्यांच्यासह ज्येष्ठ गांधीजन व सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमास गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष व अशोक जैन व डीन प्रा. गीता धर्मपाल उपस्थित राहणार आहेत.
महात्मा गांधींनी इंग्रजांना “भारत छोडो… चले जाव”चा नारा ९ ऑगस्ट १९४२ रोजी दिला होता. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना “भारत से जुडो”ची आवश्यकता आहे. जैन हिल्सच्या गांधीतीर्थमधील कस्तुरबा सभागृहात दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
गांधी तीर्थच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवकाॕलनीत घर घर वृक्षारोपणाचा संकल्प

जळगाव दि.६ प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त ‘घर घर तिरंगा’ या मोहिमेसोबतच ‘घर घर वृक्षारोपण’ करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प शिवलनी परिसरातील सप्तश्रृंगी चौकातील रहिवाश्यांनी केला.
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जैन इरिगेशन सिस्टीम लि.च्या सहकार्याने हरित जळगाव हा सृजनशिल उपक्रम सुरू आहे. आज शिवकाॕलनीतील कोल्हेनगर (पश्चिम) येथील सप्तश्रृंगी चौकालगत असलेल्या गट नं. ५९ च्या हनुमान मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अरूण नारायण आसोदेकर, विनय पवार, महेश पाटील,किरण आसोदेकर, पारोळा वनअधिकारी बी. एस. पाटील, मुकंद वाणी, चंद्रकांत बाविस्कर, अमोल चौधरी यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. उपस्थितांनी निंब, करंज, बकूळ, कांचन, बुच, चांदणी, कन्हेर, जास्वंद, बेल, पारिजातक, पळस, अमलतास अशा १०० च्यावर रोपांची लागवड करण्यात आली. रहिवाश्यांनी वृक्षसंर्वधनाची प्रतिज्ञा घेत प्रत्येक घरासमोर एक झाड जगविण्याचा संकल्प केला. ॲड. जमिल देशपांडे यांनी फाऊंडेशन व प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, मयूर देशमुख, किशोर ताळे, प्रतिक फुसे, दिलीप मते, निलेश मिस्तरी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

सांस्कृतिक कार्यसंचलनायतर्फे बालगंधर्व स्मृतीदिनानिमित्त आयोजित नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन

जळगाव दि.30 प्रतिनिधी* – बालगंधर्व स्मृती दिनानिमित्ताने “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन करण्यात आले होते. यात नाट्य, संगीताने असंख्य रसिकांच्या मनात चांदणे फुलविले.
सं. मामापमान नाटकातील नांदीने अर्थात ” नमन नटवरा विस्मयककारा” त्यानंतर प्राजक्ताने सं. स्वयंवर नाटकातील “नाथ हा माझा” हे अजरामर नाट्यपद सादर करून सांस्कृतिक मैफिलीची सुरूवात झाली. नमन नटवरा विस्मयककारा..या नांदीने रसिकांच्या काळजात कलाकरांनी जागा निर्माण केली. भास्करबुवा बखलेंचे संगित स्वयंवरातील नाट्यपदाने बालगंधर्वांचे स्मरण करून दिले. नाट्यपदांच्या माध्यमातून सुरांची मैफल रंगत गेली. त्यानंतर सं. मत्स्यगंधा नाटकातील “गुंतता हृदय हे” ने रसिकांची दाद दिली. “मम आत्मा गमला” हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर देवघरचे ज्ञात कुणाला, ब्रह्ममूर्तीमंत, श्रीरंगा, बहुत दिन नच भेटलो, अवघे गरजे, रमणी मजसी निजधाम, सुरत पिया, नच सुंदरी, युवतीमना, हे सुरांनो अशी एकाहून एक सरस संगीताची मैफल रंगली. नाथ हा माझा…, रूप बली तो…, नयने लाजवित.., यासह भैरवीने नाट्य संगित रजनी मैफलीची सांगता झाली.
सुरूवातीला दीपप्रज्वलन झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, डॉ.अनुराधा राऊत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी,कलाकार प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे यांच्याहस्ते संपन्न झाले.
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व या नावाने लोकप्रिय असलेले, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. ज्या काळी रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसत त्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे ज्यांनी मोठी लोकप्रियता कमवली. अशा थोर बालगंधर्व यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर येथे केले होते. मराठी संगीत रंगभूमीला लोकप्रिय आणि समृध्द करण्यात बालगंर्धांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राजक्ता काकतकर, ओंकार प्रभुघाटे या कलाकारांनी आपली कला सादर केली. तबला साथ धनंजय पुराणिक, ऑर्गन मकरंद कुंडले यांनी दिली. कार्यक्रमाची संकल्पना व सादरीकरण स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत यांनी केले. प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरूवंदना सादर केली.

शुभम पाटील व प्रतिक रानडे बॅडमिंटन स्पर्धेत विजयी

जळगाव :  पहिली महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२२ नांदेड येथे झालेल्या दिनांक २५जुलै ते २९ जुलै २०२२ दरम्यान झाली. या स्पर्धेत  जैन स्पोर्टस अकॅडमी चा खेळाडू शुभम पाटील व प्रतिक रानडे हा पुरुष दुहेरी या गटात उपविजयी ठरला.
शुभम पाटील हा जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडू असून व त्याचा भागीदार प्रतीक रानडे हे दोघे सध्या ठाणे येथील श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे बॅडमिंटन अकॅडमी मध्ये सराव करीत आहे. त्याच्या या अतुनिय कामगिरी व पुढच्या वाटचालीसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष महेंद्र तेजा, सचिव विनीत जोशी, उपसचिव  तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य चंद्रशेखर जाखेट, रवींद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक  किशोर सिंह यांनी शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

बालगंधर्व स्मृती दिनानिमित्त “नाट्य संगीत रजनी” कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई –  नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व या नावाने लोकप्रिय असलेले, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. ज्या काळी रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसत त्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे ज्यांनी मोठी लोकप्रियता कमवली. अशा थोर बालगंधर्व यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून  “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० जुलै, 2022 रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, जळगाव येथे करण्यात आल्याची माहिती श्री. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिली आहे.
मराठी माणसाच्या ह्दयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश होतो. १९०५ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीच्या “शाकुंतल” नाटकातून त्यांनी नाट्यविश्वात प्रवेश केला. तेव्हापासून ते १९५५ पर्यंत त्यांनी रंगभूमीवर विविध स्त्री-पुरुष भूमिका करून मराठी नाटकाच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावली. मराठी संगीत रंगभूमीला लोकप्रिय आणि समृध्द करण्यात बालगंर्धांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.  “पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल ” असे त्यांच्या बद्दल आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून  “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राजक्ता काकतकर, ओंकार प्रभुघाटे हे कलाकार आपली कला सादर करतील.  तबला साथ धनंजय पुराणिक, ऑर्गन मकरंद कुंडले यांची असेल. सदर  कार्यक्रमाची संकल्पना व सादरीकरण स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांनी केले असून कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत या करणार आहेत. कार्यक्रमास श्री.अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जळगाव जिल्हा आणि डॉ.प्रवीण मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव आहेत. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा भरुभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

बालगंधर्व स्मृतीदिनानिमीत्त “नाट्य संगीत रजनी”चे आयोजन

जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता “नाट्य संगीत रजनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रम सादर करणारे कलावंत मुंबईचे असून  प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे आहेत. त्यांना तबल्याची साथ धनंजय पुराणिक व ऑर्गन ची साथ मकरंद कुंडले करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रख्यात अभिनेत्री दीप्ती भागवत करणार आहे. चुकवू नये असा हा कार्यक्रम तमाम जळगावकर रसिकांसाठी विनामूल्य असून सुरवातीच्या काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमास स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम वेळेत सुरु होणार असून रसिकांनी १० मिनिटे आधी आसनस्थ होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव दि.26 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 10 वी आयसीएसईचा निकाल नुकताच जाहिर झालास्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखलीअनुभूती स्कूलमधून कुदेब्बार्ना दास ही 96.4 टक्के गुणांसह प्रथम आलीतिला गणित याविषयात पैकीच्या पैकी 100 गुण प्राप्त झालेतर इतिहासभुगोलमध्ये 98, विज्ञान 96, इंग्रजी 90, हिंदी 92, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये 98 गुण मिळालेदक्ष जतिन हरीया हा विद्यार्थी 96 टक्क्यांसह द्वितीय क्रमांकरिषभ विनोद कुमार हा विद्यार्थी 94.6 टक्क्यांसह तृतीयतेजस ललितकुमार जैन हा विद्यार्थी 94 टक्क्यांसह चतुर्थ तर प्रसाद प्रदीप नाईक 93.2 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेतराष्ट्रीय पातळीवरील आयसीएसईच्या परिक्षेत 2,31,063 विद्यार्थी सहभागी झाले होतेत्यापैकी 1,05,369 विद्यार्थीनी तर 1,25,635 विद्यार्थी यशस्वी झालेतयामध्ये अनुभूती निवासी स्कूलमधून 39 विद्यार्थी परिक्षेत सहभागी झाले ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेयंदाच्या निकालामध्ये 90 टक्क्यांच्यावर 12 विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले तर 80 टक्क्यांच्यावर 21 विद्यार्थ्यांचा समावेश आहेविषयानुसार 90 गुणांच्यावर इतिहासभुगोल 18, हिंदीमराठी 16, गणित 15, इंग्रजी 8, विज्ञानमध्ये 7 तर कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये 14, विद्यार्थी आहेतसंपूर्ण भारतातून आयसीएसई शाळांध्ये अनुभूती स्कूलने आपला ठसा उमटविला आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील पहिलीच शाळा आहेसंस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावीएकमेकांमधील निर्भरता वाढावीआंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने अनुभूती स्कूलतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जात आहेतविद्यार्थ्यांवर शाळेत पाचवी पासूनच विशेष लक्ष दिले जातेशालेय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना पर्यावरणापासून ते जागतिक पातळीवरच्या विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून दिशा मिळावी यासाठी वर्षभर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नियोजन अनुभूती निवासी स्कूलतर्फे केले जातेयातून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे. ‘ग्रीनस्कूल म्हणून ख्याती असलेल्या या स्कूलमध्ये अभ्यासास अनुकूल वातावरण आहेअभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना देखील वाव मिळतो त्यामुळे चौफेर प्रगती विद्यार्थ्यांना करता येते विद्यार्थ्यांनी हे शंभर टक्के यश संपादन केले.’ या शब्दात अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासिस दास यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांवरील व्यक्तिगत लक्षप्रशस्त ग्रंथालयतज्ज्ञ शिक्षकांसह विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्याकडून अभ्यासाबरोबरच कलागुण जोपासले जातात यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होतेवर्षभर शिक्षक व शिक्षकतेतर कर्मचारांमुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाल्याचे सांगत अनुभूती स्कूलच्या संचालिका सौनिशा अनिल जैनजैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैनसहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

सीआयएससीई बोर्डाच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय

जळगाव दि.25 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची रितीका देवडा ही विद्यार्थीनी देशातून सीआयएससीई रॅंकच्या मेरिटमध्ये तिसरी तर अनुभूती स्कूलमधून ती पहिली आली आहे. वाणिज्य शाखेतील रितीका अरूण देवडा हिला 99.25 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच रितीका ही वाणिज्य शाखेतून अनुभूती स्कूलमध्ये प्रथम आली आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेत बसले होते.

शिक्षकांच्या अथक परिश्रमातुन  यश – रितीका देवडा

शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासाच्या मार्गावर सातत्य ठेवल्यामुळेच यश प्राप्त झाले आहे. यासाठी आवश्यक ग्रंथालयापासून ते शिक्षकांच्या परिश्रमातूनच मला देशातून तिसऱ्या मेरिटपर्यंत पोहचता आले. विविध साहित्यातून दैनदिन अभ्यासाचे नियोजन केल्याने हे यश मिळू शकले.  स्कूलचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नातूनच यशस्वी होता आले. संस्थापक भवरलालजी जैन यांच्या प्रेरणेतूनच ‘यश’ याविषयावर स्वत:चे पुस्तकसुद्धा प्रकाशित करता आले. रितीकाचे वडील अरूण देवडा व्यावसायीक असून आई गृहिणी आहे.

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी इयत्तेत आत्मन जैनला गणित विषयात पैकीच्या पैकी गुण

जळगाव दि. 25 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीच्या  निकालात आत्मन अशोक जैन हा 97.75 टक्के गुणांसह शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तसेच तो शाळेच्या विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे. त्याला गणित विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले तर  इंग्रजीत 98, केमिस्ट्रीत 97, फिजीक्स 96, कॉम्प्युटर 96  असे गुण प्राप्त झाले आहेत.  त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.

अभ्यासात सातत्य हेच यशाचे गमक – आत्मन जैन

“श्रध्देय भवरलालजी जैन हे माझे दादाजी नेहमी कार्यमग्न असलेले मी पाहिले आहे.  त्यांच्या संस्कारातूनच नियमीत अभ्यासाला प्राधान्य दिले. परिक्षा जवळ आल्यावर खूप अभ्यास करण्यापेक्षा वर्षभर अभ्यासात सातत्य ठेवले, यामुळेच हे यश मिळाल्याची भावना आत्मन अशोक जैन याने व्यक्त केली. गणित विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले यामागेही आजोबा, वडिल आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आशिर्वाद तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले अशी आत्मन जैन याने प्रतिक्रिया दिली.”

अनुभूती निवासी स्कूलचा यंदाही 100 टक्के निकाल 

जळगाव दि. 25 प्रतिनिधी –अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती स्कूलच्या 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली आहे. आयसीएसई बोर्डच्या 12 वी इयत्तेत 29 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी वाणिज्य शाखेतील  विद्यार्थीनी रितीका अरूण देवडा ही 99.25 टक्के गुणांसह पहिली आली. आत्मन अशोक जैन (97.75 टक्के) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून आत्मन हा  शाळेच्या विज्ञान  शाखेतून  प्रथम आला आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. गौरवास्पद बाब म्हणजे संपूर्ण भारतातून आयसीएसई रॅंकच्या मेरिटमध्ये रितीका तिसरी तर अनुभूती स्कूलमधून ती पहिली आली आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील पहिलीच शाळा आहे. संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने अनुभूती स्कूलतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यातून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे. अनुभूती निवासी स्कूलच्या निकालाची वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या निकालामध्ये 90 टक्क्यांच्यावर आठ विद्यार्थी असून भारतातील रॅंक मेरिटमध्येसुद्धा विद्यार्थी चमकले आहेत. अनुभूती स्कूलमध्ये पहिल्या पाचमध्ये रितीका व आत्मन यासह तृतीय क्रमांकाने परिनिती अग्रवाल (95.75 टक्के), चतुर्थ क्रमांकाने उर्वेशा सुनिल नवघरे (94 टक्के), पाचव्या क्रमांकाने तन्वी अमित ओसवाल (93.75 टक्के) उत्तीर्ण झाले. प्रथम आलेल्या रितीका देवडा हिला गणित व वाणिज्य विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले आहेत तर इंग्रजीत 99, अर्थशास्त्र 98, अकाऊंट 95 गुण मिळाले आहेत. तर द्वितीय आलेल्या आत्मन जैन याला गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले. तर इंग्रजीत 98, केमिस्ट्रीत 97, फिजीक्स 96, कॉम्प्युटर 96 गुण प्राप्त झाले आहेत. तसेच विषयानुसार 90 गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीत 20, वाणिज्यमध्ये 9, अर्थशास्त्र व गणितमध्ये 6, बिजनेस स्टडी 5, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर, मानसशास्त्र, कला यात 2, बायोलॉजी व अकाउंटमध्ये 1 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

कोरोनासारखी महामारी त्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदल अशा विपरीत परिस्थितीत विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

“अनुभूती स्कूलच्या स्थापनेपासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असल्याचा आनंद आहे. संपूर्ण देशात सीआयएससीई बोर्डच्या मेरिटमध्ये अनुभूतीची विद्यार्थीनी तिसरी आली, सोबत यशस्वी झालेले विद्यार्थ्यांचे यश कौतूकास्पद आहे. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकतेतर कर्मचारी, पालकांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन!” – अशोक जैन , अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स

जॉईन Trading Buzz
Exit mobile version