जैन उद्योग समूहाच्या वतीने काव्यरत्नावली चौकात गणपती निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आली होती

जैन उद्योग समूहाच्या वतीने काव्यरत्नावली चौकात गणपती निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आली होती यात

|| चराचरात आहे भगवंत ||

भक्तिभावाने ओथंबलेले दहा दिवस, सुखात होते,
आज बाप्पांना निरोप देताना पाणी डोळ्यात येते!

क्षणार्धात दिसते थ्रीडी तंत्रज्ञानासह फिरते ठेवण्यात आले असून ते
श्रींचे अष्टविनायक रूप, आरास, मंदिर + सुंदर सुस्वरूप !

समूहाच्या वतीने जगदीश चावला यांनी ही कलाकृती साकारली आहे

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

जळगाव दि. 8 – आचार्य सम्राट 1008 पूज्य श्री जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सव जैन हिल्स येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. यावेळी पारंपारिक वेशभूषेत श्रावक-श्राविकांच्या मधुर भक्तिगीतांसह पूज्य आचार्य जयमलजी म. सा. यांच्या नामाचा जयजयकार करण्यात आला. प्रवचन, मंगलाचरण, स्वागतगीत, भक्तिसंगीत, महामांगलिकने आचार्य जयमलजी म.सा. यांचे स्मरण करत गुरूगायनाने भव्यातिभव्य तिनदिवसीय जन्मोत्सवाचा समारोप झाला.

एक भवावतारी आचार्य सम्राट श्री जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवाप्रसंगी जळगाव संघपती दलिचंदजी जैन, अ.भा. श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अशोक जैन, नयनताराजी बाफना, कस्तूरचंदजी बाफना, शंकरलालजी कांकरिया, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, अजित जैन, अजय ललवाणी, नवरतन बोखाडीया, गौतमचंद कोठारी, जळगावनगरीच्या महापौर जयश्री महाजन, सुशिल बाफना, कांतीलाल कोठारी, सुरेंद्र लुंकड, विजय चोरडिया, विजयराज कोटेचा, अजय राखेचा यांच्यासह जळगाव, धुळे, नंदूरबार, चेन्नई, सिकंदराबाद, मारवाड रायचूर, गुवाहटी, नागोर, जोधपूर, अमरावती, बडनेरा, बोलाराम, म्हैसूर, बेंगलुरू, इरोड, इलकल, इंदौर, सुरत, अहमदाबाद, मारवाड पाली, ब्यावर, सेलम, तिरूतन्नी, गंगावती, तिरूवल्लूर सह संपूर्ण भारतभरातील श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.

श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन, अंहिसा रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाप्रसंगी जयगच्छाधिपती व्याख्यान वाचस्पती, वचन सिद्ध साधक उग्र विहारी, बारावे पट्टधर वर्तमान आचार्य प्रवर 1008 प. पू. श्री पार्श्वचंद्रजी म. सा, एस. एस. जैन समणी मार्गचे प्ररंभ कर्ता अनुप्पेहा ध्यान प्रणेता प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्रजी म. सा, विद्याभिलाषि जयेंद्रमुनीजी म.सा, सेवाभावी जयशेखरमुनिजी म.सा., मौनसाधक श्री. जयधुरंधरमुनिजी म.सा. विद्याभिलाषी श्री जयकलशमुनीजी म.सा., तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म.सा ठाणा 7 यांच्यासह समणी प्रमुखा श्री. निधीजीसह ठाणा 6 हे विराजमान होते. त्यांचा उपस्थीतीत पूज्य श्री. जयमलजी म.सा. यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मुख्य प्रवचनामध्ये तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म. सा. यांनी भगवान महावीर यांच्या मार्गावर चालण्यासाठी वीर कुणाला म्हणावे हे सांगितले. कोणतेही कठिणातील कठिण कार्य सहज सोपे करण्यासाठी विरता महत्त्वाची आहे. संकल्प महत्वाचा असून घेतलेल्या संकल्पावर कृतिशीलपणे आचरण करणे तसे जगणे महत्त्वाचे आहे यासाठी आचार्य पूज्य श्री.जयमलजी म.सा. याचे जीवनकार्य अभ्यासणे त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात संस्कारित करणे म्हणजे आचार्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गस्थ होणे होय. मनुष्याला यशस्वी होण्यासाठी अनेक यशाची मंत्रे शिकविणारी पुस्तके, व्याख्याने आहे. ती अभ्यासणेही महत्वाचे आहे, मात्र आपल्या आचार्यांच्या इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितले तर त्यांनी संघर्ष काळातही समयसूचकतेने घेतलेले निर्णय, त्यावर ठामपणे जगणे हे प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहे. हीच प्रेरणा घेऊन संकल्पमय जीवनाचा मार्ग अवलंबने, आदर्श विचार करून जगणे हीच पूज्य आचार्यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे स्मरण करणे होय.

जैन समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी यांनी शासक आणि प्रजा यांचा आचरण व्यवहार भाष्य केले. शासक जसे आचरण करेल तसे आचरण प्रजेमध्ये दिसते यासाठी आचार्यांनी अनेक शासक राज्यांना आपल्या प्रभूवाणीने हिंसा, व्यसनांपासून परावृत्त केले. धर्माला श्रद्धेने जोडले तर बौध्दिक विकास करता येतो तो आचार्यांच्या संस्कारात दिसतो. हा विचार करून प्रत्येकाने विशेषत: युवापिढीने नैराश्यातून आत्महत्येसह सर्वप्रकाराच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. हाच साधूवाद आचार्यांच्या जन्मोत्सवानिमित्त असल्याचे डॉ. सुयश निधीजी यांनी सांगितले.

जैन समणी श्रुत निधीजी यांनी आचार्यांच्या जन्मोत्सवाच्या तारिख आठ असल्याने आचार्यांना सांगितलेल्या आठ चमत्कारिक मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने मनातील वैराग्य भावना जागृत होते यातूनच संयमी होता येते संयमी होऊन मार्गस्थ होणे थोडे कठिण मात्र आचार्यांचा साधुवाद सोबत असल्याने त्यावर सहज चालता येते.

यावेळी जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यप्रवर प.पु. श्री पार्श्वचंद्र जी म.सा द्वारा महाप्रभावी महा मांगलीकसुद्धा देत आशिर्वाद दिला. यानंतर सामूहिक तेले तप प्रत्याख्यानासह गौतम प्रसादी लाभ हजारो श्रावक-श्राविकांनी घेतला. आचार्यश्री यांचा पुढील चार्तुमासाची विनंती रायचूर, चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरू, येथील श्रावक-श्राविकांनी केली आहे.

श्री. रेवतमलजी नाहर यांनी मनोगतामध्ये संयम, साधना आणि आस्था यांचा संगम जैन हिल्सवर आचार्यांच्या जन्मोत्सवाच्या आयोजनात दिसत असल्याचे कौतूक केले. ऑल इंडिया जे. पी.पी. जैन महिला फाऊंडेनच्या राष्ट्रीय अध्यक्षा ममता कांकरिया यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संघपती दलिचंद ओसवाल यांनी केले. आभार स्वरूपकुमार लुंकड यांनी मानले. सूत्रसंचालन चंदन भंडारी, जोधपूर यांनी केले. सदाग्यान भक्तिमंडल आणि जे. पी. पी. संगीत मंडल यांनी भक्तिगीते सादर केली. यशस्वीतेसाठी जळगाव जैन समाजातील विविध मंडळांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

दानविरांचा सन्मान

आचार्य पूज्य श्री. जयमलजी म.सा. जन्मोत्सवाचे यशस्वी आयोजन, व्यवस्था केल्याबद्दल संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अजित जैन, सौ. निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन व संपूर्ण चोरडिया परिवाराचा जय जापकलश, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. चोरडीया परिवाराचे मानपत्र पूष्पा भंडारी यांनी वाचले. शंकरलालजी कांकरिया व परिवाराला प्रदान केलेल्या मानपत्राचे वाचन अपुर्वा राका यांनी केले. अजय ललवाणी व परिवाराला प्रदान करण्यात आलेले मानपत्राचे वाचन अनिल कोठारी यांनी केले. राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहर यांचा सत्कार ईश्वरबाबुजी ललवाणी यांनी केला. जे. पी. पी. अंहिसा पुरस्काराने ममता कांकरिया यांचा सन्मान करण्यात आला.

पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

जळगाव दि.7 प्रतिनिधी – श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म. सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटीका सादर करण्यात आली. भक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ‘नवकार मंत्र’ ने झाली. दीपप्रज्वलन कस्तुरचंदजी बाफना, राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहल, नवरतन बोकडीया, ममता कांकरिया, रिखबराज बोहरा यांच्याहस्ते झाले. स्वागतगिताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ‘जयमल गुरूवर’ हे गुरुभक्तीगीत सादर करून आचार्यांचे स्मरण करण्यात आले.
जैन समाजातील संत परंपरा महानुभावांचे संस्कार यावर आधारित संपूर्ण भारतातील जैन महिला मंडळांनी नाटिका सादर केल्यात. यात ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशनच्या जळगावच्या पदाधिकारी व महिलांनी पूज्य जयमलजी म. सा. यांच्या विचारांवर आधारित पुष्पा भंडारीद्वारा लिखीत ‘जय जीवन झाँकी’ ही नाटिका सादर केली. ‘साधुवंदना’वर आधारित नाटीका जोधपूर, नागोर, चेन्नई, नंदुरबार येथील महिलांनी सादर केले. यावेळी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. जैन महिला फाऊंडेशन, श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावचे पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा राका व जोधपूरचे चंदन भंडारी यांनी केले.

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवात तपस्वींचा सन्मान

जळगाव दि. 7 (प्रतिनिधी) – आचार्य सम्राट 1008 पूज्य श्री जयमलजी म. सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज जैन हिल्स येथे 130 तपस्वीचा सामुहिक सन्मान करण्यात आला.  कस्तूरचंदजी बाफना, शंकरलालजी कांकरिया, अजय ललवाणी, सुशिल बाफना, सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, ममता कांकरिया यांच्याहस्ते तपस्वींचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितीत आचार्यांनी सर्व तपस्वींना साधुवाद दिला. जैन हिल्सच्या आकाश मैदानावर सुरू असलेल्या भव्यातिभव्य जन्मोत्सव समारोहप्रसंगी भारतभरातील श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.

श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाप्रसंगी जयगच्छाधिपती व्याख्यान वाचस्पती, वचन सिद्ध साधक उग्र विहारी, बारावे पट्टधर वर्तमान आचार्य प्रवर 1008 प.पू. श्री पार्श्वचंद्रजी म. सा, एस.  एस. जैन समणी मार्गचे प्ररंभ कर्ता अनुप्पेहा ध्यान प्रणेता प्रवचन प्रभावक  डॉ. श्री पदमचंद्रजी म.सा, विद्याभिलाषि जयेंद्रमुनीजी म.सा, सेवाभावी जयशेखरमुनिजी म.सा., मौनसाधक श्री. जयधुरंधरमुनिजी म.सा. विद्याभिलाषी श्री जयकलशमुनीजी म.सा., तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म.सा ठाणा 7 यांच्यासह समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी हे विराजमान होते. त्यांचा उपस्थीतीत चातुर्मासाचा कार्यक्रम सुरू आहे. एक भवावतारी आचार्य सम्राट श्री जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव जळगाव येथे साजरा होत आहे.

मुख्य प्रवचनामध्ये डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांनी ‘जैन’ शब्दाची व्याख्या सांगितली. जैन म्हणजे प्रत्येक सजीवाला जोडून ठेवणारा असतो. आचार्यांनी तेच कार्य केले असून त्यांच्या जन्मोत्सवाच्यानिमित्त एक संकल्प केला पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे. आचार्यांनी सांगितेला मार्ग त्यांचे साहित्य जपले पाहिजे. ज्यांची संस्कृती व साहित्य पुढील पिढी संस्कारीत करते तेच इतिहास घडवित असतात आचार्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे म्हणजे जैन होय. जैन हिल्सवरील पडीक जमिनीवर नंदनवन फुलविणारे ऋषभदेवतेचा संस्कारातून जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या भवरलाल जैन यांचे जीवन संघर्षमय होते. मात्र संघर्षातून जैनत्व सिद्ध करता येते आणि जैन समाजाचा गौरव वाढविता येतो हे त्यांच्या आचरणात दिसते ही शिकवण घेऊन आपल्या आयुष्यात आचरण करावे, स्वच्छता आणि स्वयंशिस्तीच्या आचरणात आनंदानुभूति मानावी हा संस्कार आचार्य जयमलजी म.सा. यांनी दिला असून त्या मार्गावर चालावे असेही यावेळी डॉ. पदमचंद्रजी म.सा. म्हणाले.

यावेळी मौनसाधक श्री. जयधुंरधरमुनिजी म.सा. यांनी उपस्थित श्रावक-श्राविका यांना आचार्य जयमलजी यांच्या विचारांवरच मोक्ष प्राप्त होतो. दुसऱ्यांसाठी क्षमाहित ठेवले पाहिजे हिच शिकवण गुरूंनी दिली असून आचार्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गस्थ झाले पाहिजे असे मौनसाधक म्हणाले.

जैन समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी यांनी तपस्याचे महत्त्व सांगत प्रत्येक श्रावक-श्राविकांनी तप, ताप, संताप या तिन शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. जीवनातील अंधकार दुर करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. जीवन लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आधी लक्ष्य ठरवावे लागेल. धर्मआराधनेसह गुरूंसोबत समर्पक झाल्यावर मार्गदर्शन सहज उपलब्ध होते. आत्माची पवित्रता ही गुरूंप्रती श्रद्धा दाखविते. साधकाच्या शुद्धीसाठी तपस्याचे महत्त्व आहे बाह्य साधन आणि अभ्यंकर साधन यातून साधकाची मनाची शुद्धता जपता येते. शरिरावरील, कपड्यांवर मळ साफ करण्यासाठी साबण तर सोनं-चांदीच्या शुद्धतेसाठी टूल्सचा वापर केला मात्र मनाच्या शुद्धतेसाठी आचार्यांनी तपस्या हा एकमेव मार्ग सांगितला असून त्यावर आचरण करणे म्हणजे जीवन तपमय झाल्यावर मोक्ष प्राप्त होते असेही जैन समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी म्हणाल्यात.

अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघाची कार्यकारी सभा बडी हांडा सभागृह येथे घेण्यात आली. ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाउंडेशनचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात याठिकाणी पार पडले

जैन हिल्सला आज ओजस्वी प्रवचन, गुरूगुनगान

गुरुवार 8 सप्टेंबर रोजी जैन हिल्स येथे डॉ. पदमचंद्र जी म. सा. यांचे सकाळी 9 ते 10 ओजस्वी प्रवचन, मंगलाचरण, स्वागत गीत, अतिथी स्वागत, प्रस्तावना व गुरुभक्ती होईल. सकाळी 10 ते 11 दरम्यान बहुमान, प्रासंगीक कार्यक्रम, सामूहिक तेले तप प्रत्याख्यान होईल व दुपारी पावणे बारा वाजेपासून आकाश ग्राउंड, जैन हिल्स येथे गौतम प्रसादी होईल. त्यापूर्वी जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यप्रवर प.पु. श्री पार्श्वचंद्र जी म.सा द्वारा महाप्रभावी महा मांगलीक दिली जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघपति दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव पदाधिकाऱ्यांनी केले आहे

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 संपन्न

तिघंही गटात रणविर साळुंखे, सृष्टी कुळकर्णी, वेदांत चौधरी प्रथम
जळगाव दि.6 प्रतिनिधी – स्व.सौ.कांताई यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त आज भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद येथे राज्यस्तरीय श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 चे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 आणि 11 वी ते 12 वी या तिन गटात झाली.
इयत्ता 5 वी ते 7 वी या गटात प्रथम क्रमांकाने चाळीसगाव येथील डाॕ. काकासाहेब पुर्णपार्त्रे माध्यमिक विद्यालयाचा रणविर योगेश साळुंखे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शेंदुर्णी येथील आ.ग.र.ग.माध्यमिक विद्यालयाचा अर्थव तुषार पाटील,नागलवाडीचे माध्यमिक विद्यालयाची मुग्धा विजय याज्ञिक, 8 वी ते 10 गटात जळगाव ए. टी. झांबरे विद्यालयाची सृष्टी विशाल कुळकर्णी प्रथम, चुंचाळे येथील नुतन माध्यमिक विद्यालयाचे रोशनी देविदास पाटील द्वितीय, पळसखेडे येथील नि.प. पाटील मा.विद्यालयाचा सुमित दिपक खैरे तृतिय, 11 वी ते 12 वी या गटात प्रथम चोपडाचे पंकज माध्यमिक विद्यालय वेदांत पांडुरंग चौधरी, द्वितीय वाकोदच्या राणीदान जैन माध्यमिक विद्यालय व शेंदुर्णीचे आ. रघुनाथराव गरूड महाविद्यालयचे प्रिती समाधान मोहिते व दिव्या संतोष चौधरी, तृतीय क्रमांक राष्ट्रीय कन्या शाळा ज्युनिअर काॕलेज रेणुका सिताराम सानप विजयी झाले.

दी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-आॕप सोसायटी लि.शेंदुर्णी संचलित राणिदानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद यांच्यातर्फे आयोजित व भवरलाल अॕण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. सकाळी दीपप्रज्वलनाने औपचारिक उद्घाटन झाले. मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संपादक हेमंत अलोणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद, जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, पांडुरंग पाटील, यू. यू. पाटील, ए. टी. चौधरी, ए. ए. पटेल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानयोगी आचार्य हे पुस्तक प्रकाशन झाले.
स्वागतगिताने व दीपप्रज्वलन माल्यार्पण करून पारितोषिक वितरण सोहळाची सुरूवात झाली. एस. टी. चिंचोले यांनी प्रास्तविक केले.
देवदत्त गोखले यांनी परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले, मिळालेल्या माहितीचे संकलन करून विषयाला न्याय दिल्याचे सर्वच स्पर्धकांचे कौतूक केले.
ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोणे यांनी कांताईंच्या स्मृतींना अभिवादन करीत आपल्या मनोगताला सुरुवात केली. दिलेला विषय, विषयाची मांडणी करणं, हातवारे आणि हावभाव करणे यातुन समाधिटपणा दिसुन आल्याचे सांगत वाकोद या मातीचा वक्तृत्व-कर्तृत्व उंचविणारे गुण आहे याची अनुभूती प्रत्यक्ष आली.
शेंदुर्णी संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद यांनी मनोगत व्यक्त केले. या संस्थेला वकृत्व स्पर्धेची वेगळी अशी ओळख निर्माण होत आहे. आपल्याला दुसऱ्याच्या समोर व्यक्त होता यावे, समाजासमोर ठामपणे आपले मत मांडता यावे यासाठी ही स्पर्धा यशस्वीपणे होत असल्याचे कौतुक केले.
परिक्षक म्हणून देवदत्त गोखाले, देवेंद्र पाटील, एस. व्ही. भोळे, प्रशांत देशमुख, भुषण पाटील, गणेश राऊत, अतुल पाटील, एम. बी. लोखंडे, सौ.ज्योती चौधरी यांनी काम पाहिले.
सुत्रसंचालन एस. ए. पाटील यांनी केले. स्पर्धा प्रमुख नितीन पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राणीदानजी जैन विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व जैन फार्म यांनी सहकार्य केले.
फोटो कॕप्शन – श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धेकासह ज्येष्ठ पत्रकार संपादक हेमंत अलोणे, संस्थेचे सचिव सतिष काशिद, जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, पांडुरंग पाटील, यू. यू. पाटील, ए. टी. चौधरी, ए. ए. पटेल, परिक्षक देवदत्त गोखले व मान्यवर

अभिनव शाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपतीची आरती

रेहान अलीकडून शाळेला विठ्ठल-रूक्मिणीची पाषाणातील प्रतिमा भेट

“भारतात अनेक जाती-धर्म आहेत. पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा हा भारतीयत्वाचा आहे. मुस्लिम विद्यार्थी आयान याने उत्सवासाठी गणेशाची मूर्ती देऊन तोच धागा बळकट केला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज केले.

अभिनव विद्यालयात आयान खान या विद्यार्थ्याने दिलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या गणेशाची आरती आज श्री. राऊत यांच्या हस्ते झाली. आज शिक्षकदिनानिमित्ताने शिक्षक दिनानिमित्त रेहान अली रजाक अली सय्यद याच्या पालकांनी शाळेस दगडी पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली .

श्री. राऊत यांनी आयान खान पठाण व रेहान अली रजा अली सय्यद यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक संतोष सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष श्याम भाऊ कोगटा उपाध्यक्ष संजय बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोद बियाणी, मुख्याध्यापक हेमंत पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

जळगाव दि.- जैन चॅलेंज आंतर शालेय जळगांव जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला आज अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या फुटबॉल मैदानावर सुरूवात झाली. ही स्पर्धा साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले २० संघ तसेच १७ वर्षाखालील मुले २५ संघ व मुली ८ संघ यांचा समावेश आहे. या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातील ए बी सी डी व ई असे ग्रुप केलेले आहे या प्रत्येक ग्रुप मधून एक संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री अभेद्य जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे श्री.अरविंद देशपांडे, श्री. रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक अब्दुल मोहसीन हे उपस्थित होते
या स्पर्धेत पंच म्हणून
पवन सपकाळे, कौशल पवार, हर्षद शेख, दीपक सस्ते, निखिल पाटील, वसीम शेख, अमय तलेलकर,अर्पित वानखेडे, नीरज पाटील, कुलदीप पाटील, व अल्तमशखान हे काम पाहत आहे

आजच्या १४ वर्षाखालील मुलांचे सामने
१. अंजुमन उर्दू स्कूल जामनेर विजयी विरुद्ध ए.टी.जांबरे विद्यालय जळगाव ४-१
२. अनुभूती इंटरनॅशनल स्कूल विजयी विरुद्ध एम.आय.तेली विद्यालय भुसावळ ४-०
३. इकरा रेसिडेन्शिअल स्कूल मोहाडी विजयी विरुद्ध ओरियन सी.बी.एस.ई विद्यालय २-१
अंजुमन विद्यालय जामनेर गोल करणारे खेळाडू अबू रेहान, फरहान खान तसेच अरहान खान यांनी दोन गोल केले
तर एटी झांबरे विद्यालय चा भावेश बोरगे याने एक गोल केला
अनुभूतीचे गोल करणारे खेळाडू ध्रुव बोजवानी,आयुष भोर तसेच अभिनव विजयस्वामी यांनी दोन गोल केले. इकरा रेसिडेन्शिअल स्कूल मोहाडीचे गोल करणारे खेळाडू मोहम्मद आरिफ व असमल खान यांनी प्रत्येकी एक गोल केला. आजच्या सामन्यात आराम खान,आयुष भोर व कौस्तुभ महाजन यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक देण्यात आले.
आज पाच सामने
उद्या दि. 3 रोजी सकाळी नऊ वाजता १७ वर्षाखालील मुलांचे पाच सामने होणार आहेत

जळगाव जिल्हा अधीक्षक श्री. प्रवीण मुंडे साहेब यांनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल…!

आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी माहेश्वरी विद्या प्रसारक संचलित अभिनव माध्यमिक विद्यालय येथे गणेश उत्सवानिमित्त विद्यालयात इयत्ता नववी मधील आयान खान पठाण या विद्यार्थ्याने पर्यावरण पूरक सुंदर अशी गणेश मूर्ती गणेश स्थापनेसाठी दिली. तसेच या वर्षी विद्यालयातर्फे गणेशोत्सव विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या लोकसभागातून सजावट व प्रसादाचे नियोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा मोदक प्रसाद म्हणून दिला.लेझिम ,सजावट, रांगोळी, हार , ह्यात विद्यार्थ्यांनी हिरीहिरीने सहभाग नोंदविला.
यावेळी सामाजिक सलोखा, एकात्मता जपण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव, वसुंधरा संवर्धन म्हणून प्लास्टिक मुक्त शहर महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा यावर विविध वेशभूषा सदर करीत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी
विविधतेतून एकता, समाजामध्ये सद्भावना हा संदेश दिला या उपक्रमाचे कौतुक म्हणून जळगाव जिल्हा अधीक्षक श्री प्रवीण मुंडे साहेब यांनी स्वतः विद्यालयात भेट देऊन आयान खान व त्याच्या कुटुंबियांचे सत्कार व कौतुक केले तसेच अभिनव विद्यालयातील हा अभिनव उपक्रम समाजाला तसेच सर्व देशाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरणा देणारा आहे अशा शब्दात विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधला .
यावेळी श्री मुंडे साहेब यांनी गणपतीची आरती केली. यावेळी विद्यालयातील संस्थेचे उपाध्यक्ष श्री संजय जी बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोदजी बियाणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सरोज दिलीप तिवारी ,श्री हेमंत पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते

विक्रांतचा जीव घेणाऱ्या अल्पवयीनच्या बापाच्या अटकेसाठी उद्या धरणे आंदोलन

जळगाव, विक्रांत संतोष मिश्रा (११ वर्षे) याचा कारची धडक मारून जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा बाप तथा कारमालक याला अटक करावी या मागणीसाठी उद्या (दि. २)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डायमंड्स व्हाट्स ॲप गृपतर्फे धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येईल. या आंदोलनात शहरातील इतर संघटना सहभागी होऊ शकतात.

या धरणे आंदोलनाबाबत डायमंड्स गृपची भूमिका अशी –
डायमंड व्हाट्स ॲप गृपचे सदस्य व जळगावचे नागरीकांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय मार्गाने एक दिवसाचे धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाच्या निमित्ताने खालील मागण्या करण्यात येत आहेत.

१) जळगाव येथे मेहरूण तलाव भागातील पायी फिरण्याच्या ट्रेकवर रविवार, दि. २८अॉगस्टला दुपारी साडेतीनला MH19 BU 6606 या कारने स्व. विक्रांत संतोष मिश्री याला धडक दिली. या घडकेमुळे विक्रांत याचा हकनाहक जीव गेला. ज्या कारने विक्रांतला उडविले त्याचा चालक हा अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी मुलांच्या अभिक्षण गृहात झाली. मात्र कारचा मालक खरा संशयित आरोपी व अल्पवयीन मुलाचा बाप मोहम्मद सलीम मोहम्मद मोबीन शहा (रा. जळगाव) हा घटनेपासून फरार असून त्याने अद्याप पोलीसांना तपासात कोणतीही मदत केलेली नाही.

संशयित आरोपी कार मालकाने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर दि. ५ अॉगस्टला सुनावणी होईल. त्यापूर्वी पोलीस विभागाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यासाठी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक व मा. जिल्हा सरकारी वकील यांनी कटाक्षाने बाजू मांडावी. संशयित आरोपी कार मालकास अटक होऊन पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

२) जळगाव शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. दुचाकी व चारचाकी वाहने अल्पवयीन मुले-मुली पळवतात. त्यांच्याकडे वाहन चालक परवाने नाहीत. अशा मुला-मुलींकडे बेजबाबदार पालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होऊन स्व. विक्रांत मिश्रासारखे बळी जातात. आमची नागरिक म्हणून मागणी आहे की, पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींना भर चौकात पकडावे. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज द्यावी. असे केल्याने बेजबादार पालक वठणीवर येतील.

मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

मुस्लिम समाजात अल्लाहचे रूप निरंकारी आहे. त्यामुळे मूर्ती हा प्रकार निषिद्ध आहे. हिंदू धर्मात प्रत्येक देवादिकाची मूर्ती आहे. अगदी दोन टोकांच्या या धर्म पद्धतीला संवेदनशीलतेचा आनंद देणारी वेगळी बातमी समोर आली. शाळेचे मूळ माहेश्वरी विद्याप्रसारक संस्थेची अभिनव माध्यमिक शाळा आहे. धर्माची भिंत श्रद्धा आणि लोकसहभागात आडवी येत नाही अशा सहिष्णु वृत्तीचा आदर्श नववीतील अवघ्या १५ वर्षांच्या आयन मझहर खान पठाण या विद्यार्थ्याने घालून दिला. पोलिसांच्या शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा गणेश मंडळात जाऊन सद्भावना आरती करायला हवी.

मनाला प्रसन्न करणारी ही बातमी सुरू होते अभिनव शाळेतून. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे शाळेतील सण-उत्सव बंदच होते. त्यामुळे मुले-मुली कलागुण दर्शनापासून लांब होते. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच निर्बंध हटविले आणि गणेशोत्सवाला दुपटीने उत्साहाचे भरते आले. यावर्षीही शाळेत गणेशोत्सव साजरा करायचे ठरले. पूर्वी शाळेतील शिक्षक आणि मुले-मुली वर्गणी करून उत्सव साजरा करीत. यावर्षी मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी वर्गणी न घेता शिक्षक-पालक-विद्यार्थी सहभागातून उत्सव साजरा करायचे ठरविले. अगदी मूर्तीपासून तर पूजेचे व सजावट साहित्य ज्याला जमेल त्यांनी द्यावे असे ठरले.

इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका सौ. निता पाटील यांनी वर्गातील मुला-मुलींना उत्सवाची संकल्पना सांगितली. गणेशाची मूर्ती कोण देणार असे विचारले. त्यावर आयान खान पठाण म्हणाला, ‘मैम मी मूर्ती देतो !’ सौ. पाटील यांनीही होकार दिला. हिंदुंच्या सर्वाधिक उत्साह व जल्लोषाच्या उत्सवाला गणेशाची मूर्ती मुस्लिम विद्यार्थी देत होता. संवेदनशीलता येथेच आहे. पण ती येथे संपत नाही.

आयानने वडील मझहर खान पठाण व अम्मीला शाळेतील संकल्पना सांगितली. आयानने गणेशाची मूर्ती द्यायचा शब्द दिला आहे, तो मान्य करून ते सुद्धा मूर्ती द्यायला तयार झाले. धर्मसंस्काराचा कोणताही कडवट संस्कार पठाण कुटुंबाला आडवा आला नाही. विषयाची संवेदनशीलता अजून पुढे आहे.

शाळेत गणेशाची मूर्ती द्यायची तर ती आणावी लागेल. मझहर खान यांचे नातेवाईक (काका सासरे) अयुबखान ताजखान पठाण हे जळगाव येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार चंदुलाल रसवंतीवाले यांच्याकडे गेली २०/२२ वर्षे वेगवेगळ्या देवादिकांच्या मूर्तीचे आणि त्यावर रंगकाम करीत आहेत. आयान खानला गणेशाची मूर्ती हवी हे कळल्यानंतर त्यांनी गणेशाची आकर्षक मूर्ती तयार करून दिली. कलाकाराच्या समोरही कोणत्याही भिंती नसतात हे सिद्ध झाले. आज आयान खान याने शाळेत गणेशाची मूर्ती आणली. त्याच मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. गणेशाच्या मिरवणुकीत शाळेतील मुलींचे लेझिम पथक होते. अभिनव विद्यालयातील अनेक उपक्रम जळगावकरांचे लक्ष वेधून घेतात.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version