जळगांव . दिनांक २५ व २६ जुलै दरम्यान कांताई साभगृह येथे जळगांव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित जिल्हा स्तरीय सिताराम (बबन भाऊ) बाहेती यांच्या जयंती निमित्त जळगांव जिल्हा मानाकंन व निवड कॅरम स्पर्धेत नॅशनल कॅरम क्लब नशिराबादचा खेळाडू मुस्तूफा खान यांने जळगांव जिल्हयात ६वे स्थान प्राप्त केले. पुणे येथे दिनांक ०४ ते ०७ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता त्याची जळगांव जिल्हा पुरुष संघात निवड करण्यात आली आहे.
त्याच्या निवडीबद्दल नॅशनल कॅरम क्लब तर्फे सर्वश्री मोहम्मद फजल मन्यार, समद मेंबर, अजिज मोमिन, समद आयडिया,नवाब खान,समिर अली, अजमल खान ( राजु भाई ) रियाज अली ( भुरा भाई) अताऊल्लाह खान, मुज्जमिल मन्यार, सिद्दिक शेख, जमीर खान, मुनसफ अली, अहमद पठाण, मुजिबुद्दिन, वसीम अहमद,अकील अ.रहेमान, एजाज अ.रहेमान,गणेश माळी, आदी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
Category: Jain Irrigtion
गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
नविन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाचे विद्यार्थीही अभ्यासणार महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान
जळगाव दि. 27 – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात आज महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कराराद्वारे शैक्षणिक, संशोधन आदान-प्रदान, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आदींचा समावेश आहे. याअंतर्गत विद्यापिठातील विद्यार्थ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमांमधे सहभागी होता येणार आहे.
महात्मा गांधीजींची विचारधारा यांचा प्रचार-प्रसारासाठी पीजी डिप्लोमा, संपोषित ग्रामीण पुर्ननिर्माणासाठी स्नातकोत्तर डिप्लोमा, संघर्ष परिवर्तनवर कार्यशाळा, युवा पिढीचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प, आंतरराष्ट्रीयस्तरावर शांती व अहिंसेच्या संदर्भात विंटर स्कूल, संशोधनासाठी वेगवेगळे इंटर्शनशिप, फेलोशिप, महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन यांच्यासह गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रामविकास असे विविध उपक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशन राबवित असते. या सर्व उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील विद्यार्थ्यांनाही यात संधी निर्माण होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनने यापूर्वी अमेरिकेतील एरिझोना स्टेट विद्यापीठ, मेक्सिकोमधील सायंटिस विद्यापीठ, महात्मा गांधीद्वारा स्थापित गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, इटली येथील पीस फाऊंडेशन आदींमधे यापूर्वी सामंजस्य करार केलेले आहेत. या श्रृखंलेत आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे.
या करारावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. डॉ. गिता धर्मपाल यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या, यावेळी विद्यापिठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व संचालक डॉ. राजेश जावळेकर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने वरिष्ठ सल्लागार व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, समन्वयक उदय महाजन, असोसियट प्रोफेसर डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. विद्यापीठातर्फे प्रा. ए. एम. महाजन, प्रा. सतीष कोल्हे, प्रा. डी. एच. मोरे, प्रा. पी. पी. माहुलीकर, डॉ. विकास गिते, प्रा. प्रविण पुराणीक, प्रा. उमेश गोगडीया, प्रा.दीपक सोनवणे, सीए. रवींद्र पाटील, पीआरओ डॉ.सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. के. बी. पाटील यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन व विद्यापीठाच्या कराराद्वारा भविष्यात युवकांसाठी रचनात्मक शिक्षण प्रणालीत नव-नवीन संकल्पना साकार होतील. डिग्रीपेक्षा प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अनुभव घेता येईल, असे प्रतिपादन यावेळी केले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी हा करार ऐतिहासीक असल्याचे सांगितले. डॉ. राजेश जावळेकर यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.
धनादेश अनादर प्रकरणी कृपाण शेती सेवालयच्या आनंद कृपाणला शिक्षा
जळगाव दि.२४ प्रतिनिधी – जळगाव च्या जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीला खात्यात पैसे नसताना ७ लाख ८४ हजार १९५ रूपयांचा धनादेश गोंदिया येथील कृपाण शेती सेवालय या फर्मचे प्रो. प्रा. आनंद कवडूजी कृपाण यांनी दिला होता.
हा धनादेश अनादर झाला. याप्रकरणी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगावच्यातर्फे कैलास नागोलाल अग्रवाल यांनी फिर्याद दाखल केली व साक्ष नोंदवली. फिर्यादी कंपनीचे वकील म्हणून अॅड. निशांत सुशील अत्रे यांनी काम पाहिले. दि.१८ जुलै ला अंतिम सुनावणी झाली. त्यात ७ लाख ८४ हजार १९५ रूपयांचा धनादेश अनादर झाल्याने न्यायालयाने आरोपीस एन.आय.अॅक्ट मधील तरतुदीखाली दोषी धरले. एक वर्षाचा साधा कारावास व रक्कम १० लाख रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रक्कमेपैकी ९ लाख रूपये एवढी रक्कम फिर्यादी कंपनीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशसुध्दा केलेत.
डोळे येण्याच्या साथीवर डॉ. कडू यांचे मार्गदर्शन
पावसाळ्याचे वातावरण हे अनेक प्रकारच्या जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळेच ह्या वातावरणात अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी पसरतात. त्यापैकीच एक डोळ्यांचा साथीचा रोग जो ह्या वातावरणात पसरतो आहे तो आहे ‘कंजंक्टीवायटिस’. ह्या साथीच्या रोगाचे कारण व निदान काय? डोळे येण्याची साथ ही मुख्यत्वे एक प्रकारच्या वायरसमुळे असते.
हा आजार कसा पसरतो? हा आजार मुख्यत्वे वायरसच्या थेट संपर्कात आल्याने होतो. उदा. डोळे आलेल्या व्यक्तीच्या हातावर किंवा रूमालावर हा वायरस असू शकतो. ह्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श तुमच्या हातास झाला आणि तो हात तुम्ही डोळ्यांना लावला तर तुम्हाला ह्या रोगाची लागण होऊ शकते.
अशा प्रकारे प्रादुर्भाव झालेले पृष्ठभाग उदा. दारांचे हँडल्स, रूमाल, टाॅवेल, काॅम्प्युटरचे माऊस, इत्यादी ह्यांच्या स्पर्शाद्वारे हा आजार पसरतो. शिवाय आजार झालेल्या व्यक्तिच्या शिंकेतून किंवा खोकल्यातूनही हा आजार पसरू शकतो.
गैरसमज – असे मानले जाते की डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे बघितल्याने आपलेही डोळे येऊ शकतात, हा गैरसमज आहे. निव्वळ बघितल्याने आजार पसरत नाही.
लक्षणे -(१) डोळ्यात टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटणे.
(२) डोळे लाल, गुलाबी होणे.
(३) डोळ्यांना खाज, जळजळ होणे.
(४) सकाळी झोपेतून उठताना पापण्या एकमेकांना चिकटून बसणे.
(५) पापण्यांना सूज येणे, इत्यादी.
आजार झाल्यानंतर घ्यावयाची काळजी –
(१) लक्षणे दिसतच शाळेत किंवा कामावर जाणे बंद करावे.
(२) स्वतःच्या वस्तू उदा. टाॅवेल, रूमाल, उशी, इ. दुसऱ्यास वापरायला देऊ नये.
(३) घरच्या व्यक्तींच्या थेट संपर्कात येणे टाळावे.
(४) सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे.
(५) वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे.
(६) डोळ्यांना आणि चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे.
(७) प्रोटेक्टीव गाॅगल लावावा.
(८) स्वतःहून काही उपचार न करता डाॅक्टरांच्या सल्यानुसारच आैषधोपचार सुरू करावा.
कंजक्टीवायरिसमुळे डोळ्यात इतर कोणत्या गुंतागुंती (Complications) न झाल्यास हा आजार ५ ते ७ दिवसांत ठिक होतो. डॉ. अमोल कडू विभाग प्रमुख, क्लिनीकल सर्व्हिसेस, कांताई नेत्रालय, जळगाव
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३ उत्साहात
जळगाव दि.२२ (प्रतिनिधी)– आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित आणि स्वर्गीय विनोद जवाहरानी उर्फ (बंटी भैय्या) यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक २१ ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९९ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याची पहिली बॅडमिंटन महिला राष्ट्रीय खेळाडू कुमारी अनिता ध्यानी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे फाउंडर मेंबर डॉ. तुषार उपाध्ये, शिल्पा फर्निचर चे मालक श्री राजकुमार मनोज व श्री शितलदास जवाहरानी आणि श्री राजेश जवाहरानी तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सहसचिव श्री तनुज शर्मा, सदस्य श्री शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत अनुप नाथांनी, प्रेम हसवानी, घनश्याम अडवाणी, डॉ. तळेले , अतुल ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा चॅम्पियन ची ट्रॉफी, प्रमाणपत्र व सिताफळ चे रोप देण्यात आले.
या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – आरव अमित दुडवे
उपविजयी – विहान राहुल बागड
११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी पुरुषोत्तम बोरनारे
उपविजयी – राखी विजय सिंह ठाकुर
१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शांतनु शैलेश फालक
उपविजयी – अन्मय अमोल जोशी
१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील
उपविजयी – तनिषा अनिल साळुंखे
१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अन्वेष सुधीर नारखेडे
उपविजयी – स्वामी उन्मेश पाटील
१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – तनिषा अनिल साळुंखे उपविजयी – ओवी अमोल पाटील
१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – स्वामी उन्मेश पाटील आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे
उपविजयी – रजत प्रेमळ पटेल आणि शांतनु शैलेश फालक
१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – उजेर रियाज देशपांडे
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – सौम्या मनोज लोखंडे
उपविजयी – इशिका कपिल शर्मा
१७ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – दक्ष धनंजय चव्हाण आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे
उपविजयी – रितुल विनोद बोरा आणि सुंदर जयसिंग पवार
१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
१९ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील उपविजयी – सौम्या मनोज लोखंडे
१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि करण संजय पाटील
उपविजयी – जाजीब सुहेल शेख आणि अर्श रहीम शेख
पुरुष एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – कौशिक प्रवीण बागड
महिला एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील
उपविजयी – गीता अखिलेश पंडित
पुरुष दुहेरी
विजयी – उमर रियाज देशपांडे आणि करण संजय पाटील
उपविजयी – कौशिक प्रवीण बागड आणि मयूर राजेंद्र भावसार
३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – विनायक बालदी
उपविजयी – तनुज शर्मा
३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा
उपविजयी – डॉ. अमित चौधरी आणि किशोर सिंग सिसोदिया
३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – डॉ. वृषाली विवेक पाटील आणि कीर्ती मोतीलाल मुनोत
या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून खुशाल भावसार, भूषण पाटील, गीता अखिलेश पंडित, शुभम जितेंद्र चांदसरकर, शुभम पाटील, देवेंद्र कोळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत जाजीब शेख, दिपिका ठाकूर, अक्षय हुंडीवाले, अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, तेजम केशव, राखी ठाकूर, हमजा खान, आर्य गोला, प्रणेश गांधी, करण पाटील, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमी ची खेळाडू गीता पंडित व आभार प्रदर्शन प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.
या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन व जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती व हॉटेल प्रेसिडेंट चे मालक श्री मनोज आडवाणी यांनी केले व पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सिद्धांत गुजर याचे सीए परिक्षेत यश
जळगाव दि.१६– येथील सिद्धांत भागवत गुजर याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सीए ची परिक्षा उत्तीर्ण केली. अंतिम परिक्षेत ४२६ गुण प्राप्त झाले. जैन इरिगेशनमधील टिएबील विभागातील सहकारी भागवत गुजर यांचा सिद्धांत मुलगा असून त्याच्या यशाबद्दळ आई-वडिलांसह नातेवाईकांनी कौतूक केले आहे. ऑडीट विभागातील वरिष्ठ सहकारी लक्ष्मिकांत लाहोटी यांचेही सिद्धांतला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते.
चंद्रयान-3 साठी हातेडच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका
हातेड येथील संजय देसर्डा शास्त्रज्ञाची द्रवरुप इंधनासाठी कामगिरी
जळगाव, दि. १५ – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण केले. एलव्हीएम-3 लाँचरचा वापर करण्यात आलेला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरेल. या मोहिमेमध्ये कान्हदेशातील जळगाव जिल्ह्यातील हातेड या छोट्याशा गावातून इस्रो पर्यंत पोहचणारे संजय गुलाब देसर्डा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरलेली आहे. जैन फार्म फ्रेश फुडस् च्या करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा, प्लास्टिक पार्क येथील कस्टम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोंगरमल देसर्डा आणि जैन फूडपार्क येथे कार्यरत छगनमल देसर्डा यांचे ते पुतणे असून या त्यांच्या सहभागाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व कंपनीच्या विस्तारीत कुटुंबातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
615 कोटी रुपये खर्चून तयार केलेले हे मिशन सुमारे 50 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. या मोहिमेत चंद्रयानचा एक रोव्हर (छोटा रोबोट) बाहेर येईल जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचं स्थान निश्चित केले जाईल. इथेच रोव्हर चंद्राच्या या भागात कोणते खनिजे आहेत, पाणी आहे का, इत्यादीचा शोध घेईल असे संजय देसर्डा यांनी सांगितले.
मूळ हातेड येथील राहणारे व चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद देसर्डा यांचे सुपुत्र संजय हे गेल्या २० वर्षांपासून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-3 यशस्वी प्रक्षेपण झाले. या यानासाठी त्यांनी द्रवरुप इंधनावर काम केले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या मोहिमेसाठी कार्यरत होते. अवकाशात सोडल्या जाणाऱ्या तीन प्रकारचे यानांसाठी इंधन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. यानाचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि काल प्रक्षेपीत झालेल्या यानात एलव्हीएम ३ मध्ये द्रव (लिक्विड) इंधन लागत असते. यात वरीष्ठ शास्त्र म्हणून इस्त्रोकडून जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती. यापूर्वी संजय देसर्डा यांनी मंगळयान, चंद्रयान – २, चंद्रयान -३ या व्यतिरिक्त अनेक मोहिमेत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावलेली आहे. चंद्रयान मोहिमेसाठी हातेडच्या सुपुत्राचे परिश्रम व बुद्धीची कामगिरीसाठी मोलाची भूमिका पार पाडता आली याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतवासियासाठी आहे. संजय देसर्डा यांच्या या विशेष कार्याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हातेड ते इस्त्रो खडतर प्रवास…
संधी प्रत्येकाला मिळत असते परंतु संधीचे सोन्यात रुपांतर करणे फार कमी लोकांना जमते. संजय गुलाबचंद देसर्डा यांचा जन्म हातेडच्या देसर्डा परिवारात झाला. शालेय शिक्षण हातेडच्या सरकारी शाळेत झाले नंतर त्यांना अभियांत्रिकीमध्ये अधिक रस असल्याने फैजपूरच्या जे.टी. महाजन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा व लाभलेली प्रगल्भ बुद्धीमत्ता आणि देसर्डा परिवाराने दिलेल्या प्रोत्सहनामुळे ते गेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयआयटी वाराणसी म्हणजे बनारस हिंदु युनिर्व्हसिटी येथून एमटेक पद्युत्तर शिक्षण घेत असताना २००३ मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू साठी इस्त्रोचे कमिटी आली व त्यात संजय यांची निवड झाली. ऑगस्ट २००३ मध्ये नियुक्ती झालेल्या संजय देसर्डा यांनी इस्त्रोकडून विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या त्या यशस्वी पार पाडल्या आहेत. जसे भारतातील इस्त्रो आहे तसेच पॅरिस येथील ‘केनेस’ नावाची रॉकेटमध्ये काम करणारी संस्था आहे त्यासाठी आठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झालेली होती. याशिवाय ‘टीम एक्सलन्स’ पुरस्काराने देखील त्यांचा गौरव झालेला आहे. हातेड ते इस्त्रो हा प्रवास आपल्यासाठी अनुभवांनी भरलेला होता असे संजय म्हणतात. संजय यांच्या परिवारात त्यांची पत्नी सौ. चित्रा या गृहिणी आहेत, मोठी कन्या ऊर्जा आणि लहान मुलगा आयुष हा बारावीमध्ये असून तो देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शास्त्रज्ञ म्हणून आपले करियर करणार अशी त्याची इच्छा आहे.
अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा
जळगाव दि.7 – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलचा स्थापना दिन व ‘फेशर्स डे’ साजरा केला.
अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील एकमेव शाळा सुरू केली. सोळा वर्षापासून सुरू असलेल्या अनुभूती स्कूल च्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘फेशर्स डे’ साजरा केला. याची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या समवेत सौ. ज्योती जैन, सौ.शोभना जैन, डाॕ. भावना अतुल जैन, सौ. अंबिका अथांग जैन, प्राचार्य देबासिस दास यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरक संवाद साधला. अनुभूती स्कूल हे एक कुटुंब असून येथे फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही, तर आपल्या कलागुणांमध्ये निपूण होण्याची संधी मिळते. कला, साहित्य, स्पोर्टस यासह सांस्कृतिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाच उद्देश अनुभूती स्कूलचा असल्याचे अतुल जैन म्हणाले.
प्राचार्य देबासिस दास यांनी अनुभूती स्कूलच्या विकासात्मक वाटचालीबाबत सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला नृत्यासह गणेश वंदना विद्यार्थ्यांनी सादर केली. सारे जहाँ से अच्छा हे देशभक्तीपर गीत, लकडी की काठी, हरे क्रिष्णा हरे रामा अशा एकाहून एक गीतांसह मेमिक्री, भांगडा नृत्य, तबला वादन, मानवतेचा संदेश देणारे ‘हिच आमची प्रार्थना’, केदारनाथ व ईच्छा पूर्ती एकांकिका अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. सोशल मीडीयाचा प्रभाव या विषयावर विद्यार्थ्यांनी नाटिकेतून प्रबोधन केले. 5 व 6 च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले महादानी नाटक विशेष ठरले. ‘फुलो ने मिट्टीसे पुछा..’ हे पर्यावरण गीत सादर केले. राजस्थानच्या पारंपरिक नृत्याने ‘फेशर्स डे’चा समारोप झाला.
दरवर्षी स्कूलचा स्थापना दिन व फेशर्स डे साजरा केला जातो. यादिवशी स्कूलमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना अनुभूती स्कूलची शैक्षणिक जीवनमूल्यांची ओळख झालेली असते. अनुभूती स्कूल निवासी असल्याने विद्यार्थी येथील वातावरणाशी एकरूप होतात. हा आनंदोत्सव म्हणजे फेशर्स डे यात विद्यार्थ्यांनी धम्माल केली.
आभार प्रमोद कांबळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले.
स्व. विनोद जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप – २०२३ स्पर्धा
जळगाव दि.७ – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित व ४ फेदर्स बॅडमिंटन अॅकॅडमी आयोजित स्वर्गीय विनोद (बंटी भाई) जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ “जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप-२०२३” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जुलै ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी तसेच पुरुष आणि महिला खुलागट व ३५+ वर्षावरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा स्वरूपात घेतल्या जातील. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात नाव नोंदणीची अंतिम दिनांक १६ जुलै २०२३ असून संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी किशोर सिंह (९४२११२११०६) यावर संपर्क साधावा. किंवा पत्ता:- जैन स्पोर्ट्स अकॅडमी, कांताई सभागृह, नवीन बस स्टॅन्ड जवळ, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अतुल जैन व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन यांचे अध्यक्ष डॉ. तुषार उपाध्ये यांनी केले आहे.
खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा तसीन तडवी प्रथम तर गुणवंत कासार द्वितीय
जळगाव – येथील जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ फेऱ्याअखेर ६ गुण मिळवीत स्पर्धेत जळगावच्या तसीन तडवी याने प्रथम क्रमांक मिळवला.त्यास १२०० रूपयांचे पारितोषिक व चषक प्राप्त केला. तर दुसर्या स्थानी जळगावचाच फिडे मानांकित खेळाडू गुणवंत कासार ५ याने गुणांसह द्वितीय स्थान पटकाविले.त्यास तर तिसरे स्थान जयेश सपकाळे पटकाविले.
स्पर्धेत खुल्या गटातील पहिल्या दहा खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तसेच उत्तेजनार्थ बक्षीस वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना मेडल देऊन गौरवण्यात आले
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव तसेच अप्पर कोषाधिकारी शकील देशपांडे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू नथू सोमवंशी, प्रवीण ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेत एकूण ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यात १५ फिडे मानांकित खेळाडू होते.स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांनी काम पाहिले.
पारितोषिक वितरण समारंभाचे आभार अभिषेक जाधव यांनी मानले.
खुला गटातील विजयी खेळाडू पुढील प्रमाणे
१) तसीन तडवी सहा गुण
२) गुणवंत कासार
३) जयेश सपकाळे
४) अक्षय सावदेकर
५) विवेक तायडे
६) संस्कार पवार
७) अजित कुमार शेगोकार
८) आयुष गुजराथी
९) किरण सोनवणे
१०) अजिंक्य निकम
१३ वर्षाखालील वयोगट
१) क्षितिज वारके
२) टिळक सरोदे
३) सोहम चौधरी
११वर्षाखालील वयोगट
१) आरुष सरोदे
२) निकुंज जैन
३) हिमांशू सरोदे
९ वर्षाखालील वयोगट
१) देवांक लड्डा
२) गौरव बोरसे
३) रोनीत बालपांडे
विशेष उत्तेजनार्थ
श्लोक वारके, अजय पाटील,गुणवंत पाटील, सुकृत पाठक यांना बक्षिसे देण्यात आली.
उत्तेजनार्थ महिला खेळाडू
१) ऋतुजा बालपांडे
२) चेतना सोनवणे
३) शरण्या शिंदे
तर सर्वात लहान खेळाडू म्हणून विशेष उत्तेजनार्थ चाळीसगावची , शौर्या पाटील हिला गौरवण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, नथू सोमवंशी,परेश देशपांडे,अभिषेक जाधव, आकाश धनगर यांनी काम पाहिले.