“अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट”

जळगाव : अनुभूती स्कूल येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जळगाव तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलांमध्ये अनुभूती स्कूलने १७ व १९ वर्षाआतील वयोगटा मध्ये प्रथम स्थान आणि १४ वर्षातील वयोगटात तृतीय स्थान प्राप्त केले, तसेच मुलींमध्ये १४ वर्षाआतील वयोगटात प्रथम स्थान आणि १७ व १९ वर्षाआतील वयोगटात द्वितीय स्थान प्राप्त केले.

विजयी व उपवीजयी संघांना अनुभूती स्कूलचे प्राचार्य श्री देबाशिस दास व व्यवस्थापक श्री विक्रांत जाधव तसेच क्रीडा शिक्षक श्री दीपक बीस्ट यांचे हस्ते जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे प्रायोजित स्वर्ण व रजत पदक देण्यात आले.

प्रायोजक तर्फे पदक तर शासनातर्फे प्रमाणपत्र – या स्पर्धेतील विजयी उपविजय संघातील खेळाडूंना वैयक्तिक सुवर्ण व रजत पदक जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे देण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगाव तालुका प्रतिनिधी प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली विकास बारी, शुभम पाटील, दिपीका ठाकुर प्रनेश गांधी, करण पाटील, पुनम ठाकुर, भावेन खाबिया, सुयश आंधळे, पियुष सोनी, अक्षत पगारिया, मेहेर लाडके, मयंक मुथा, चिन्मय पाटीदार यांनी पंच म्हणून कामगिरी पार पडली तसेच स्पर्धेचे सूत्रसंचालन अनुभूती स्कूलच्या बॅडमिंटन प्रशिक्षिका श्रीमती दीपिका ठाकूर आणि आभार तालुका प्रतिनिधी श्री प्रशांत कोल्हे यांनी केले.

अनुभूतीतून अवकाश तज्ञ घडावेत- विजयसिंग पवार

जळगाव दि.22 प्रतिनिधी – अनुभूती चंद्रयान महोत्सवासारखे उपक्रम राबवून भविष्यात या शाळेतून अवकाश घडतील असे प्रतिपादन खगोल अभ्यासक अमळनेर येथील विजयसिंग पवार यांनी केले. ती चांद्रयान महोत्सवात आयोजित “अवकाशावर बोलू काही” या विषयावर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विज्ञान लेखक नोबेल फाउंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी उपस्थित होत्या.

पुढे बोलताना विजयसिंग पवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना अवकाशाशी संबंधित चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.ते पुढे म्हणाले की, अवकाश क्षेत्रात भविष्यात अफाट संधी आहेत. तंत्रज्ञानाची कास धरणारी नवीन पिढी निर्माण करणे समाजाची जबाबदारी आहे .चंद्रयान, मिशन आदित्य, गगनयान यासारख्या मोहिमातून भारताने अवकाश क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भविष्यात भारत अवकाश तंत्रज्ञानाचे नेतृत्व करणार आहे.या नेतृत्वासाठी सक्षम पिढ्या घडविले. आपली जबाबदारी आहे हे काम अनुभूती विद्यालय सक्षमपणे करते आहे. याची आज जाणीव झाली. स्वर्गीय भवरलालजी भाऊ यांच्या दातृत्वातून अनेक घरांमध्ये कीर्ती आणि यशाचा दिवा पेटतो आहे. अनुभूती इंग्लिश मिडियम स्कुल चे काम पाहून मी आज थक्क झालो. असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बागरेचा, वंदना मारकड यांनी केले. रिटा महाजन यांनी आभार मानले.

उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल अशोक जैन यांचा एबीपी माझाच्या ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) –  महाराष्ट्रासह देशभर प्रतिष्ठीत असलेला, एबीपी न्यूज नेटवर्कच्या एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीतर्फे दिला जाणारा ‘माझा सन्मान-२०२३’ या पुरस्काराने उद्योग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्राचे मानबिंदू असलेल्या मंडळींचा माझा सन्मान सोहळा मुंबईच्या परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे  सोमवारी  संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे , जेष्ठ सिने अभिनेते जितेंद्र  यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माझा सन्मान पुरस्काराचे यंदाचे १५ वे  वर्ष आहे. सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना ‘माझा सन्मान’ प्रदान करण्यात येतो. यंदाही महाराष्ट्रासह देशातही ज्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे अश्या व्यक्तीमत्वांना ‘माझा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जैन इरिगेशन कंपनीची सहा दशकांपूर्वी ७००० रुपयांच्या बीज भांडवलातून सुरुवात झाली. आज जवळपास ७९०० कोटींच्या वार्षिक उलाढालीचा आलेख कंपनीने उंचावला आहे. जगभरात ३३ कारखाने, १४५ हून अधिक देशात निर्यात, ११०००  च्यावर सहकारी ही कंपनीची बलस्थानं आहेत. यातूनच लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमानात सर्वांगीण बदल कंपनीने घडवले. पाणी बचतीसह, शेत, शेतकरी यांचा विकास हेच जीवन-लक्ष्य केंद्रस्थानी ठेवत कंपनी व्रतस्थपणे कार्य करीत आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनी निभावत आहे. या अतुलनीय कामागिरीला अधोरेखित करत श्री. अशोक जैन यांना सन्मानीत करण्यात आले.

यावर्षी श्री. अशोक जैन यांच्यासोबत अमेरिकेतील मिशिगन राज्याचे खासदार श्रीनिवास ठाणेदार, जेष्ठ गायक सुरेश वाडकर, जेष्ठ लेखक अशोक पत्की, सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर, सिने-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे, कीर्तनकार सत्यपाल महाराज, ज्येष्ठ संशोधक सुरेश वाघे,  दत्तात्रय वारे गुरुजो, क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर, यांनाही सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार माझ्या शेतकरी बांधवांना, सहकाऱ्यांना अर्पण  – अशोक जैन

१२८ वर्षांपूर्वी आमचे पूर्वज राजस्थान येथून पाण्याच्या शोधात महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या शेवटच्या गावी वाकोदला आले आणि योगा योग म्हणा की, पाण्याच्या शोधात आलो आणि पाण्यामध्ये आम्ही आज काम करतो आहे. पाण्यामध्ये काम करत असताना शेती आणि शेतकरी हेच आमचे जीवन राहिले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू यायला पाहिजे यासाठी राबणे हे आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे. हा पुरस्कार एबीपी माझाने एका ग्रामीण भागातून आलेल्या उद्योजकाला दिला त्याबद्दल मी एबीपी माझा, राजीव खांडेकरजी व सर्व सहकाऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो.

हा पुरस्कार मी सर्व शेतकरी बांधव व कंपनीतील ११ हजार सहकाऱ्यांना अर्पण करतो. ११ हजार सहकाऱ्यांपैकी ९ हजार सहकारी हे आपले मराठी बांधव आहेत. मराठी बांधवांच्यासाथीने हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. महाराष्ट्र हा विद्येचा, संस्कृतिचा, उद्योगाचा अन कृषिवैभवाचा! आपण सर्व मिळून निर्धार करू या जग जिंकण्याचा…’  अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली.

भविष्यात चंद्रावर वसाहती होणार – अमोघ जोशी

जळगाव दि.२१ प्रतिनिधी – भविष्यकाळात चंद्रावर वसाहती उभारल्या जातील इतकी प्रगती अवकाश तंत्रज्ञानात मानव करणार आहे, असे प्रतिपादन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित ‘अनुभूती चांद्रयान’ महोत्सवात ‘अपोलो ११ ते चांद्रयान ३’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया, विज्ञान तंत्रज्ञान लेखक जयदीप पाटील, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, खगोल अभ्यासक किशोर वंजारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अमोल जोशी म्हणाले की, अपोलो 11 हे मानव जातीचे अंतराळातील सर्वात पहिले आणि यशस्वी उड्डाण ठरले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवण्याचे ठरविले आहे. अवकाश क्षेत्रात भारताचे हे मोठे यश असेल. यातील पहिला यशस्वी टप्पा चांद्रयान ३ ठरेल यानंतर इस्रो तर्फे पुढील कालावधीत सूर्यासाठी मिशन आदित्य पाठविले जाणार आहे.

याप्रसंगी बोलताना प्राध्यापक नंदलाल गादिया म्हणाले की, अवकाश क्षेत्रात भविष्यात अनेक संधी आहेत आणि स्पर्धा देखील आहे. यासाठी स्पर्धेमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. शालेय वयात शिक्षणाला महत्त्व द्या. भौतिकशास्त्र, गणित, इंग्रजी यासह इतर विषयांनाही प्राधान्य द्या. अनुभूती शाळेने सुरू केलेला चांद्रयान महोत्सव एक आदर्श उपक्रम आहे असेही ते म्हणाले. हर्षा वाणी, वंदना मरकड यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप पाटील यांनी समारोप केला.

अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलमध्ये चांद्रयान महोत्सवाचे आयोजन

जळगाव दि.20 प्रतिनिधी – भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे चांद्रयान-३ चंद्रावर २३ ऑगस्ट ला उतरणार आहे. या ऐतिहासिक अवकाशीय घटनेचे औचित्य साधून अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल तर्फे २१ व २२ ऑगस्ट दरम्यान अनुभूती चांद्रयान महोत्सवाचे आयोजन केले आहे.

अवकाश तंत्रज्ञान तसेच इस्रो संदर्भात व्याख्यानांचे आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पेस मॉडेल चे प्रदर्शनसुद्धा यावेळी भरवले जाणार आहे. चांद्रयान महोत्सवानिमित्त खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांचे “अपोलो-११ ते चांद्रयान-३” याविषयावर मानवाच्या चंद्रसफरींचा इतिहास सांगणारे व्याख्यान २१ ऑगस्ट ला सकाळी १०.३० वाजेला अनुभूती इंग्लीश मिडीअम प्रायमरी स्कूल येथे आयोजित केले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजेला अमळनेर येथील वक्ते विजयसिंह पवार यांचे “अवकाशावर बोलू काही” याविषयावर व्याख्यान अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल सेकंडरी येथे आयोजीत केले आहे. याप्रसंगी कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. असे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी कळविले आहे.

जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा

जळगाव दि. 19 – जैन इरिगेशनच्यावतिने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला. जैन परिवारातील सदस्य अभंग अजित जैन यांच्याहस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी मनिष शहा, अनिल जोशी, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन उपस्थित होते. आजच्या दिनाचे औचित्यसाधून सर्व छायाचित्रकारांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्यात.
जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास छायाचित्रकार राजेंद्र माळी, ललित हिवाळे, हिमांशू पटेल, तुषार हरिमकर, योगेश संधानशिवे, जगदिश चावला, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.


जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन परिवाराने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. आज भवरलालजी जैन यांचे नातू अभंग अजित जैन यांनी कंपनीतील सर्व छायाचित्रकारासोबत एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला.

जागतिक छायाचित्र दिनी कॅमेरा पूजन प्रसंगी डावीकडून ललित हिवाळे, मनिष शहा, तुषार हरिमकर, देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, योगेश संधाशिवे, अभंग अजित जैन, हिमांशू पटेल, विकास मल्हारा, अनिल जोशी, किशोर कुळकर्णी, विजय जैन, जगदिश चावला.

अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलमध्ये चांद्रयान महोत्सवाचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी अवकाश तंत्रज्ञानावर व्याख्यानासह प्रदर्शनीसुद्धा

जळगाव दि.१९ – भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे चांद्रयान-३ चंद्रावर २३ ऑगस्ट ला उतरणार आहे. या ऐतिहासिक अवकाशीय घटनेचे औचित्य साधून अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल तर्फे २१ व २२ ऑगस्ट दरम्यान अनुभूती चांद्रयान महोत्सवाचे आयोजन केले आहे.


अवकाश तंत्रज्ञान तसेच इस्रो संदर्भात व्याख्यानांचे आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पेस मॉडेल चे प्रदर्शनसुद्धा यावेळी भरवले जाणार आहे. चांद्रयान महोत्सवानिमित्त खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांचे “अपोलो-११ ते चांद्रयान-३” याविषयावर मानवाच्या चंद्रसफरींचा इतिहास सांगणारे व्याख्यान २१ ऑगस्ट ला सकाळी १०.३० वाजेला अनुभूती इंग्लीश मिडीअम प्रायमरी स्कूल येथे आयोजित केले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजेला अमळनेर येथील वक्ते विजयसिंह पवार यांचे “अवकाशावर बोलू काही” याविषयावर व्याख्यान अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल सेकंडरी येथे आयोजीत केले आहे. याप्रसंगी कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. असे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी कळविले आहे.

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जपान येथे सादरीकरण

जळगाव दि.१८ प्रतिनिधी –  जपान मध्ये वाकायामा येथे आशियाई आणि ओशनियन हायस्कूल विद्यार्थी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण परिषद’ मध्ये भारताच्यावतीने एकमेव शाळा, अनुभूती रेसिडेन्शिअल स्कुल, जळगावचा विद्यार्थी, अतिशय जैन याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत “भारतातील जल समस्या आणि त्यावरील उपाययोजना” या विषयावर संशोधन सादर केले.

या परिषदेत विविध २२ देशांतील शाळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.  यांत विद्यार्थी प्रतिनिधींद्वारे जागतिक पातळीवर होणारे बदल आणि त्याचा त्यांच्या देशातील वातावरण, भौगोलिक, पर्यावरण, शिक्षण इ घटकांवर होणारे परिणाम आणि त्यावर करता येऊ शकणाऱ्या उपाय योजनांवर संशोधन सादर केली जातात. या परिषदेमध्ये अनुभूती स्कूलचा विद्यार्थी अतिशय जैन, शिक्षक स्वागत रथ यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भारताचे महावाणिज्य दूत निखिलेश गिरी, जपान वाकायामाचे गर्व्हनर किशीतमोटो शुहेई यांनी हा गौरव केला.  या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या परिषदेत २०१४ पासून दरवर्षी अनुभूती रेसिडेन्शिअल स्कुल भारताचे प्रतिनिधित्व करीत असून आतापर्यंत अनुभूती रेसिडेन्शिअल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, अन्न-सुरक्षा, त्सुनामी अशा विविध पर्यावरण आणि मानवी विकास समस्यांवरील विषयांचे सादरीकरण केले आहे.

या अत्यंत महत्वाच्या जागतिक पातळीवरील परिषदेत सहभागी होण्यासाठी अनुभूती स्कुलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन यांचे अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.  शाळेच्या वतीने या दौऱ्यासाठी वाणिज्य शिक्षक स्वागत रथ यांची विद्यार्थी प्रतिनिधी अतिशय जैन याला मार्गदर्शक सोबती म्हणून निवड केली होती.

जळगाव येथे अधिकृत ३३व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

जळगाव दि.17 प्रतिनिधी – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या एकमेव अधिकृत राज्य संघटनेकडून आयोजित अधिकृत ३३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धा दिनांक २२ व २३ ऑगस्ट २०२३ दरम्यान जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवडले जाणार असल्याने या राज्य स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, अशी माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या एकमेव राष्ट्रीय खेळ संघटनेस इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (IOA) व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली असून महाराष्ट्रामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत संघटना जळगाव येथे राज्य स्पर्धेचे आयोजन करत आहे. अधिकृत राज्य संघटनेच्या बॅनरखाली जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या मदतीने जळगाव येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल जळगाव येथे 3३ व्या महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरुषांच्या ८ व महिलांच्या ८ वजनी गटांमध्ये या स्पर्धा जागतिक संघटनेच्या नवीन नियमानुसार सेंसर वर पार पडणार आहेत. क्योरोगी व पुंमसे या दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडतील. फ्री स्टाइल पुंमसे चा देखील समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक संघटनेच्या नवीन नियमासह नव्याने राष्ट्रीय पंच परीक्षा व रिफ्रेशर सेमिनार उत्तीर्ण राष्ट्रीय पंचांच्या मदतीने या स्पर्धा पार पडतील. सर्व वजन गटातील सुवर्णपदक विजेते खेळाडू ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, शिवाय यावर्षी गोवा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला दोन्ही संघ पात्र करणे हे खेळाडूंची प्राथमिकता असेल.

महाराष्ट्रातील सर्व नामांकित खेळाडू व प्रशिक्षक यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच अधिकृत जिल्हा संघटना आपल्या निवड झालेल्या खेळाडूंची प्रथमच नोंदणी करणार असून यामुळे राज्य संघटना आता नवनवीन आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान अवगत करत आहे. राज्य संघटनेचे पदाधिकारी असलेले अजित घारगे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी,यांच्यावर राज्य स्पर्धेची जबाबदारी देण्यात आली आहे.

खेळाडूंसाठी नेहमीच पाठबळ देणारी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत संघटना राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा खेळाडूंचा प्रवेश शुल्क, प्रवास भाडे, किट आदी सुविधा खेळाडूंना नेहमी प्रमाणेच राज्य संघटनेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर देखील आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती तायक्वांदो. असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, व्यंकटेश कररा, महासचिव मिलिंद पठारे, अजित घारगे, शाम खेमसकर, निरज बोरसे आदींनी माहिती दिली

राज्यस्तरीय “रत्नागिरी कॅरम लीग” स्पर्धेत सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस संघ तृतीय

जळगाव दि.17 प्रतिनिधी – रत्नागिरी येथील नामदार उदय सामंत फाउंडेशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रत्नागिरी कॅरम लीग या स्पर्धेच्या सहाव्या पर्वात जैन इरिगेशनच्या जैन सुप्रीमोस ह्या संघाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना तृतीय क्रमांक पटकाविले. जैन सुप्रीमोस संघाला रोख रुपये एक लाख वीस हजार व आकर्षक असे चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त झाले.

सदर संघात कर्णधार म्हणून ठाण्याचा जैद फारुकी, उपकर्णधार पंकज पवार तसेच धुळे चा निसार शेख, पुणे चा किरण धेंडे आणि जळगावची आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू आईशा खान यांचा समावेश होता. तसेच संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून जळगावचे राष्ट्रीय कॅरम खेळाडू सय्यद मोहसिन यांची निवड करण्यात आली होती. सदर संघाने साखळी फेरीत सात पैकी पाच सामने जिंकून एकूण दहा गुणांची कमाई केली. ह्या स्पर्धेत अव्वल चारही संघांचे एकूण दहा गुण होते. परंतु गुण आणि सेट यांच्या सरासरी नुसार जैन सुप्रीम संघाला अंतिम चौघात चौथे स्थान प्राप्त झाले होते.

यानंतर जैन सुप्रीमोस संघाने एलिमिनेटर राउंड मध्ये कॅरम लवर्स ह्या रत्नागिरीच्या संघास २-१ ने पराभूत करून क्वालिफायर-२ साठी आपले स्थान निश्चित करून स्पर्धेतील तिसरे क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. क्वालिफायर-२ च्या सामन्यात जैन सुप्रीमोस संघाला मुंबईच्या शिवगर्जना संघाविरुद्ध एक दोन ने पराभव स्वीकारावा लागला. जैन सुप्रीमोज संघाच्या या यशस्वी कामगिरीवर त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, मोहम्मद फजल तसेच राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान व इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version