जळगाव डाक विभागातील कर्मचारी व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे बॅडमिंटन खेळाडू अतुल प्रकाश ठाकूर यांची डाक विभागातर्फे नागपुर येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.
त्यांना जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील संघ रायपूर (छत्तीसगड) येथे नोव्हेंबर 2023 मध्ये होणार्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होईल. त्यांच्या यशाबद्दल डाक विभागाचे अधीक्षक एस. एस. म्हस्के, सहाय्यक अधीक्षक एम. एस. जगदाळे व सर्व कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जळगाव दि.१९ (प्रतिनिधी)– आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित आणि स्वर्गीय अविनाश दामले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, भडगाव, चोपडा, दोंडाईचा, धुळे, अकोला, बुलढाणा, खामगाव, मालेगाव, अमरावती या शहरा मधून २२४ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा क्रिडा संघ चे अध्यक्ष श्री रजनीकांत कोठारी जी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे फाउंडर मेंबर श्री मनोज आडवाणी जी, शिल्पा इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर चे श्री राजकुमार मुनोत, श्यामली मॅट्रेस चे श्री चंद्रकांत चौधरी व जळगाव जिल्ह्याचे पहिले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू श्री सुनिल रोकडे तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सहसचिव श्री तनुज शर्मा, सदस्य श्री शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत कीर्ती मुनोत, अतुल देशपांडे, वलीद शेख, सुफियान शेख, साद मलिक, दीपिका ठाकूर , अतुल ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी, उपविजयी व उत्तेनार्थ खेळाडूंना बक्षीस म्हणून रू.८५०००/- चे रोख रक्कम, मेडल, प्रमाणपत्र व श्यामली मॅट्रेस कडून गिफ्ट देण्यात आले.
या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे – ११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – विहान राहुल बागड
उपविजयी – प्रथम पराग नहाटा
उत्तेजनार्थ – आरव अमित दुडवे आणि कौस्तुभ संदेश पाटील
११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील
उपविजयी – श्रावणी विकास खैरनार
उत्तेजनार्थ – अद्विता संतोष पटोंड आणि ज्ञानेश्वरी अनिल पवार
१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – रुद्र प्रेमसिंग राठोड
उपविजयी – हिमांशु प्रशांत चौधरी
उत्तेजनार्थ – जनक रवी अग्रवाल आणि सहील शाम लाड
१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – तनिषा अनिल साळुंखे
उपविजयी – ओवी अमोल पाटील
उत्तेजनार्थ – अनीका अमित चौधरी आणि श्रावणी विकास खैरनार
१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अंशुल रविकांत जाधव
उपविजयी – प्रीतम राजेंद्र जैन
उत्तेजनार्थ – ऋतुराज सतीश देशमुख आणि आयुष गजानन कुलकर्णी
१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – रुखमनी भटेजा
उपविजयी – श्रवरी संतोष पतोंड
उत्तेजनार्थ – तनिषा अनिल साळुंखे आणि अनन्या पुरुषोत्तम बोरनारे
१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – प्रीतम राजेंद्र जैन आणि चाणक्य महेश सूर्यवंशी
उपविजयी – ऋषी छोटू मोरे आणि देवेंद्र पंकज पटेल
उत्तेजनार्थ – हिमांशू प्रशांत चौधरी आणि सिद्धेश अनिल पवार
व
खान मोहम्मद हमजा आणि देशराज कीर्ती मनोज
१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उपविजयी – उजेर रियाज देशपांडे
उत्तेजनार्थ – अर्णव निलेश निंबाळकर आणि दक्ष धनंजय चव्हाण
१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – आनंदी देशमुख
उपविजयी – स्वरा निलेश पाटील
उत्तेजनार्थ – जानवी संजय पाटील आणि रुक्मणी भाटेजा
१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – उजेर देशपांडे
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उत्तेजनार्थ – देवेंद्र हरिचंद्र कोळी आणि अर्श रहीम शेख
१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि करण संजय पाटील
उपविजयी – मोहित भोजवानी आणि जैद नावेद देशमुख
उत्तेजनार्थ – अर्णव निलेश निंबाळकर आणि केशव संजय वर्मा व
रौनक नितीन चांडक आणि देव देविदास वेद
पुरुष एकेरी
विजयी – चिराग गौतम शहा
उपविजयी – देवेश चंद्रकांत पाटील
उत्तेजनार्थ – घनश्याम प्रमोद पाटील व उमेर रियाज देशपांडे
महिला एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील
उपविजयी – गीता अखिलेश पंडित
उत्तेजनार्थ – आनंदी देशमुख व मनाली महिपाल बोरा
पुरुष दुहेरी
विजयी – उमर रियाज देशपांडे आणि निखिल प्रवीण मराठे
उपविजयी – वलीद फैजल शेख आणि देवेश चंद्रकांत पाटील
उत्तेजनार्थ – वेद विजयबाहेती आणि चिराग गौतम शहा
व
अर्श रहीम शेख आणि तुषार उपाध्ये
३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – तनुज शर्मा
उपविजयी – सचिन विष्णु बस्ते
उत्तेजनार्थ – विनायक बालदी व तुषार उपाध्ये
३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – विनायक बालदी आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – अतुल ठाकूर आणि सचिन विष्णू बसते
उत्तेजनार्थ -डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा
व
अमोल प्रताप सिंग पाटील आणि सुभाष तोतला
३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – मनाली अमित चौधरी आणि कीर्ती मोतीलाल मुनोत
उत्तेजनार्थ – संदीप कुमार पाटील आणि शितल अविनाश भोसले
व
विनायक बालदी आणि प्रज्ञा राजपूत
या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून वलिद शेख, सुफियान शेख, साद मलिक, ओजस सोनवणे, देवेश पाटील, गीता पंडित, शुभम चांदसरकर, देव वेद, प्रणेश गांधी, करण पाटील, अर्श शेख, रौनक चांडक यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत दिपिका ठाकूर, मो. हमजा खान, पुनम ठाकूर, राखी ठाकूर, सुमिती ठाकूर, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील, कृष्णन घुमलकर, ईशांत साडी, ओम अमृतकर यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जैन स्पोर्टस अकॅडमी प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया व गीता पंडीत यांनी केले.
या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन व जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती व हॉटेल प्रेसिडेंट चे मालक श्री मनोज आडवाणी यांनी केले व शुभेच्छा दिल्या.
जळगाव दि. १९ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे सुरू आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी असुन आतापर्यंत पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर कायम आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे.
आजच्या सामन्यांचे निकाल – स्पर्धेतील चौथा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात काल (दि.१८) ला सुरू होता. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात सर्वबाद १०० धावा केल्यात. तामिळनाडूने १.२ षटकात बिनबाद ५ धावा केला त्यावेळी सामना पावसामुळे थांबविण्यात आला. उर्वरित सामना त्याच षटकापासून सुरू करण्यात आला. १०० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या तामिळनाडू संघाच्या फलंदाजांनी आपल्या नावे केला. शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात तामिळनाडूच्या निरंजना नागराजन ४७ (४५ चेंडू) धावा नाबाद करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामनाविरचा पुरस्कारही निरंजना नागराजन हिला प्राप्त झाला. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजली पाटील (व्हॉलीबॉल) यांच्याहस्ते सामनाविर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रविंद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन यांनी केले.
पश्चिम बंगालचा तिसरा विजयी – आजच्या पहिल्या सामना महाराष्ट्र विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. बंगालने निर्धारित २० षटकांत कशिश अग्रवाल ५४ (४१ चेंडू) धावा केल्यात तिला ब्रिस्टी माजही ४१ (४२ चेंडू) धावा साथ दिली. प्रणा पॉल हिने २७ धावांची उपयुक्त खेळी करून धावगती वाढवली. बंगालने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १४५ केल्यात. १४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र संघाला किरण नवगिरे ४० (४८ चेंडू) धावा व ईश्वरी सावकार ३३ (४१ चेंडू) धावा यांनी दमदार सुरूवात करून दिली. दोघं ही बाद झाल्यावर महाराष्ट्र संघाची धावगती मंदावली. शिवाली शिंदे २८ हिने आक्रमक खेळ करित धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला परंतु तिला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. महाराष्ट्र संघ निर्धारित २० षटकात ७ गडींच्या मोबदल्यात १२७ धावा करू शकला. बंगाल संघ १८ धावांनी विजयी झाला. सामनावीरचा पुरस्कार बंगालच्या कशिश अग्रवाल हिला देण्यात आला. सामनावीर पुरस्कार अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रविंद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन केले.
आजच्या शेवट्या सामन्यात तामिळनाडू २३ धावांनी विजयी – आज च्या दिवसाचा शेवटा सामना त्रिपुरा विरूद्ध तामिळनाडू यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून तामिळनाडूने प्रथम फलंदाजी केली. २० षटकात ८ गडी गमावून ११३ धावा तामिळनाडूने केल्यात. यात आर्शी चौधरी २८ धावा, नेत्रा आणि अनुषा प्रत्येकी १९ धावांचे योगदान दिले. त्रिपुरा संघाने ११४ धावांचे लक्ष्य समोर ठेऊन फलंदाजी करण्यास सुरवात केली. परंतु ठरावीक अंतराने गडी बाद होत गेल्याने त्यांना निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून ९० धावाच करता आल्यात. हिना १७ तर शिवली हिने नाबाद राहत ३३ धावांचे योगदान दिले. तामिळनाडूचा संघ २३ धावांनी जिंकला.
तामिळनाडूनची एल. नेत्रा हिने ऑलराऊंडरची महत्त्वपुर्ण भुमिका निभावत १९ धाव व २ गडी बाद केल्याने तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. सामानावीर पुरस्कार जैन इरिगेशनच्या व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा साझीद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेत. यावेळी अरविंद देशपांडे, मुश्ताक अली उपस्थित होते. सुत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले.
जळगाव दि. १८ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येत आहे. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी झाले असुन पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. प्रत्येक सामना हा चुरशीचा होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टि-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ च्या दोन दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर कालपासून या स्पर्धेला सुरवात झाली. काल (दि.१७) ला महाराष्ट्र विरूद्ध त्रिपूरा व तामिळनाडू विरूद्ध बंगाल यांच्यात १४ षटकांचा सामना खेळविण्यात आला. यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली व निर्धारित १४ षटकांत २ गडी बाद ८१ धावा केल्यात. यात ईश्वरी सावकार ४१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिला शिवाली शिंदे १०, तेजल हसबनीस १८, अनुजा पाटील ७ यांनी साथ दिली. त्रिपूरा राज्याच्या संघाकडून हिना ला एकमेव गडी बाद करता आला. प्रतिउत्तरात त्रिपूराचा संघ १४ षटकात केवळ ७३ धावा करू शकला. अशाप्रकारे महाराष्ट्र संघ ८ धावांनी विजयी झाला. या सामन्यात ईश्वरी सावकार ही सामनावीर ठरली.
तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात अर्बना हिने सर्वाधिक २३ धावांसह निर्धारित १३ षटकांत ५ गडी गमावून ६८ धावा तामिळनाडू ला करता आल्यात. पश्चिम बंगालने हा सामना ११ व्या षटकात ३ गडींच्या मोबदल्यात ७३ धावा करून ७ गडी राखून जिंकला. सामनाविर म्हणून बंगालच्या मिता पॉल (३८ धावा) गौरव करण्यात आला.
आज (दि.१८)ला झालेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात त्रिपूरा विरूद्ध पश्चिम बंगाल यात त्रिपूरा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू बंगालच्या संघाने उत्कृष्ठ गोलंदाजी करताना त्रिपूरा संघाला १३ व्या षटकात गारद केले. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना बंगाल संघाने १० षटकातच केवळ १ गडीच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज पार केले. मिता पॉल हिने नाबाद १८ धावांचे योगदान देऊन बंगालचा विजय साकार केला. सामनाविरचा पुरस्कार बंगालची श्रोयोसी हिला ३ गडी बाद केल्याने देण्यात आला. सामनावीरांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गिता धरमपाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दरम्यान आजचा दुसरा व स्पर्धेतील चौथा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात सुरू असून महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात सर्वबाद १०० धावा केल्यात. तामिळनाडूने १.२ षटकात बिनबाद ५ धावा केला असून सामना पावसामुळे थांबविण्यात आला.
संपुर्ण स्पर्धेत आतापर्यंत पश्चिम बंगाल ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांवर असलेल्या महाराष्ट्र व चौथ्या क्रमांवर असलेल्या तामिळनाडू यांच्या सामना पावसामुळे थांबविण्यात आला होता. त्रिपुराने दोघंही सामने गमाविल्यामुळे त्यांना अजून एकही गुण प्राप्त करता आला नाही.
जळगाव (प्रतिनिधी) – कविवर्य ना. धों. महानोर यांच्याशी जेव्हाही बोलणं व्हायचे तेव्हा शेती, माती, पाणी आणि साहित्य यावरच चर्चा व्हायच्या यातुनच दादांशी ऋणानुबंध वाढत गेले. सुलोचनाच्या पाऊल खुणा हे काकुंच्या आठवणीतील पुस्तक मला अर्पण केल्याची आठवण ‘हा कंठ दाटुनी आला’ या कार्यक्रमागची भुमिका जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितली. यावेळी आई कांताई यांच्यासाठी महानोर यांनी लिहलेली ‘गुंतलेला जीव मायेचा’ ही कविता व ‘आम्ही या खेड्यात जन्मलो दुःखाची गाथा’ हे गीत म्हटले.
कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरूवात कविवर्य ना.धों. महानोर लिखीत शब्दांचा खेळ या गीताने झाली. याप्रसंगी मान्यवरांनी पुष्पार्पण केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, बाळासाहेब महानोर व कुटुंबातील सदस्य, रवींद्रभैय्या पाटील, डाॕ.सदानंद देशमुख, डॉ. सिसिलिया कार्व्हलो, श्रीकांत देशमुख, अशोक कोतवाल, अनिश शहा, नारायण बाविस्कर, डॉ. सुधीर भोंगळे, अमोल शेठ, विलास पाटील उपस्थित होते.
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व परिवर्तन तर्फे आयोजित ‘हा कंठ दाटुनी आला’ कार्यक्रमात ‘या नभाला या भुईला दान द्यावे’,’लेकी गेल्या दुर देशी जशा चिमण्या आकाशी’ यासह महानोरांच्या कविता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संदीप मेहता, श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, सिसिलिया कार्व्हलो, डाॕ. रेखा महाजन, हर्षल पाटील, शशिकांत महानोर, पूर्णिमा हूंडीवाले, सोनाली पाटील, जयश्री पाटील, सुनीला भोलाणे, नेहा पवार कविता वाचन केले.
तर सुदिप्ता सरकार, श्रद्धा कुळकर्णी, मंजुषा भिडे, रजनी पवार, चंद्रकांत इंगळे, ऐश्वर्या परदेशी, अक्षय गजभिये यांनी ‘आज उदास उदास पांगल्या सावल्या’, ‘शब्दांचा हा खेळ मांडला’, ‘गो-या देहावरती कांती’, ‘पिक करपलं पक्षी दूर देशी गेलं’, ‘मी गातांना गीत तुला’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘मी रात टाकली’, ‘जगजेठी भरली तिची ओठी’, ‘भरलं आभाळ, घन ओथंबुन येती’, ‘नभ उतरू आलं’ या गीतांसह राजसा जवळ जरा बसा ही लावणी सादर केली. त्यांना साथ संगत भूषण गुरव, योगेश पाटील, रोहित बोरसे यांनी दिली.
निवेदन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची होती. सुत्रधार हर्षल पाटील, विनोद पाटील होते.
जळगाव- भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 15 वर्षांपासून काव्यरत्नावली चौक जळगाव येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली असून यामध्ये गणेशोत्सवासाठी कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्याआली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अनिल जोशी, युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, राजेश नाईक आदि उपस्थित होते. सर्वानुमते निवड करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
जळगाव दि. १५ प्रतिनिधी – कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि.१६ सप्टेंबर २०२३ ला रात्री ८ वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे.
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व परिवर्तन तर्फे आयोजित ‘हा कंठ दाटुनी आला’ कार्यक्रमात कविता वाचन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संदीप मेहता, श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, सिसिलिया कार्व्हलो, रेखा महाजन, हर्षल पाटील, शशिकांत महानोर, पूर्णिमा हूंडीवाले, सोनाली पाटील, जयश्री पाटील, सुनीला भोलाणे, नेहा पवार करतील. गायन सुदिप्ता सरकार, श्रद्धा कुळकर्णी, मंजुषा भिडे, रजनी पवार, चंद्रकांत इंगळे, ऐश्वर्या परदेशी, अक्षय गजभिये करतील. त्यांना साथ संगत भूषण गुरव, योगेश पाटील, रोहित बोरसे यांची असेल. निवेदन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांचे असेल. कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची असून सुत्रधार विनोद पाटील असतील. जळगावकर रसिकांना कार्यक्रमात प्रवेश खुला असून जास्तीतजास्त संख्येने उपस्थिती राहून स्वरांजली मैफलची अनुभूती घ्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
जळगाव, दि. १४. (प्रतिनिधी) – वर्षभर शेतात राबणाऱ्या वृषभराजा बैलांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जैन हिल्सच्या हेलिपॅड पटांगणात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव येथील वीर योद्धा ग्रुपच्या सदस्यांनी ढोल, ताशा, झांझांच्या गजरात आखाडा, पिऱ्यामीड, तलवार दांडपट्टा यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके, (गुजरात) नर्मदा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी सादर केलेले होलीका नृत्य, मानवी मनोऱ्यांमधून साकारलेला श्रीकृष्ण रथ, शिरसोली येथील ढोल, ताशे तर सावखेडा येथील संबळ वाद्याच्या ठेक्यावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व पोळा सणासाठी आलेल्या पाहुण्यांनी नृत्याचा ठेका धरला. मानाचा पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी मिळविला.
जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अनिश शहा, स्वरुप लुंकड, पारस राका, विनय पारख, हेमंत कोठारी, प्रतिभा शिंदे, माजी नगरसेवक अमर जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, अॅपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, प्रशिक्षक मंदार दळवी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, डॉ. सुभाष चौधरी, राजा मयूर, फरहाद गिमी, शिरीश बर्वे, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रो. गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, महिला क्रिकेट खेळाडू, पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. जैन हिल्स हेलिपॅडवर पोळ्यासाठी भव्य दिव्य पोळ्याच्या क्षणचित्रांचे छायाचित्रे असलेल्या पार्श्वभूमिवर सजावट केलेले मंडप व व्यासपीठ उभारण्यात आले होते.
भारतीय कृषीक्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी १०० वर्षे तरी बैलाविना शेती हे समीकरण अबाधित राहणार आहे. भारतातील ही सॉईल संस्कृती गाय बैलांमुळे टिकून राहिली आहे असे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी आपले विचार व्यक्त केलेल तंतोतंत खरे आहेत. श्रद्धेय भाऊंनी जैन हिल्स येथे पोळा सण साजरा करण्याचा पायंडा सुरू केला आहे तो अव्याहत सुरू आहे असे कार्यक्रमाच्यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.
वाडा शिवार सारं, वडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण, मन मोहरून जाई
तुझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेनं होऊ कसा उतराई ।।
या काव्य पंक्तीनुसार पोळ्याच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता ध्यानमंदिरापासून बैलांची सवाद्य मिरवणूक सुरू झाली. श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ असलेल्या श्रद्धा धाम, श्रद्धा ज्योत येथे वंदन नमन करून ही मिरवणूक मारुतीच्या मंदिराजवळ आली. सरस्वती पॉईंट येथे नृत्य व काही चित्तथरारक प्रात्यक्षिके झाले. ११ वाजता पोळा फोडला गेला. पोळा फोडल्यावर जैन परिवारातील सदस्यांसह मान्यवरांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा गोड घास भरविला गेला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर सालदार स्नेहभेट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनजे व किशोर कुळकर्णी यांनी केले.
सालदार गडींचा सपत्नीक गौरव…
श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, वर्षभर शेतात राबणाऱ्या कंपनीच्या जैन हिल्स बॉटम, गोशाळा, जैन वाडा, जैन व्हॅली व्ह्यू, ५०० एकर, जैन रेसिडेन्सी ६० एकर, जैन डिव्हाईन पार्क, जेआरसी वैजनाथ साईट, जैन सोसायटी शिरसोली अशा विविध ठिकाणाच्या शेती विभागातील ४८ सालदार गडींचा सपत्नीक स्नेहभेट देऊन गौरव केला गेला. त्यात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, सौ. शैलाताई मयूर, सौ. शारदा चौधरी, अनिश शहा, डॉ. अनिल ढाके, विजयसिंग पाटील, प्रवीण जैन, सौ. निशा जैन, डॉ. भावना जैन, शेती विभागाचे संजय सोनजे या मान्यवरांच्याहस्ते हा स्नेह भेट देऊन गौरव करण्यात आला.
पुरणपोळीचा सुग्रास पाहुणचार…
जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंडवर पुरणपोळी-खीर असा सुग्रास पाहुणचार पोळ्या निमित्ताने होता. ही व्यवस्था राजाभोज खानपान विभागाच्या सहकाऱ्यांच्यावतीने उत्तम केली होती शहरातील निमंत्रीतांसह जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांनी या पाहुणचाराचा लाभ घेतला.
जळगाव दि. १४ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान होतील. वरिष्ठ गटाच्या ८० महिला खेळाडूंचा यात सहभाग असेल. महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ या स्पर्धेत असतील. जळगाव येथे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय संघातील महिला खेळाडूंचाही समावेश आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जाईल. या स्पर्धेत प्रत्येक सामना हा २० षटकांचा असेल व तो साखळी पद्धतीने खेळविण्यात येईल. प्रत्येक संघाशी दोनदा लढत देईल. व स्पर्धेतील गुणतालिकेतील प्रथम दोन संघात अंतिम लढत होईल. या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे विजयी, उपविजयी संघाला चषक देण्यात येईल. तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वात्कृष्ट खेळाडूला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक व मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिके सुद्धा देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन दि. १५ सप्टेंबर ला सकाळी ८.३० वाजेला अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर होईल. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सील सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे (परभणी), अॅपेक्स कौन्सील सदस्य राजेंद्र काणे (जालना), जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रमेशदादा जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार व युसूफ मकरा, सहसचिव अविनाश लाठी, सचिव अरविंद देशपांडे व कार्यकारिणी सदस्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहतील. स्पर्धेचा उद्घाटन सामना महाराष्ट्र विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९ वाजेला रंगेल. तर दुपारी १ वाजेला तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, अॅपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी दिली.
जळगाव (प्रतिनिधी)- आसाम येथे पार पडलेल्या ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदकांसह प्रथम स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेता शिवम शेट्टी, श्रीनिधी काटकर, अभिजीत खोपटे व नीशिता कोतवाल यांना ४ सुवर्णपदके जिंकली असून महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रवीण सोनकुल यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने भारतीय संघटनेकडून सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे व महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली. गुवाहाटी, आसाम येथे ९ ते ११ सप्टेंबर २०२३ दरम्यान ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धा पार पडली.
वरिष्ठ गटात राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील खेळाडूंनी ४ सुवर्णपदक जिंकणे हे प्रथमच घडले आहे. शिवम शेट्टी, अभिजीत खोपडे , श्रीनिधी काटकर व निशिता कोतवाल यांनी ४ सुवर्णपदके जिंकून इतिहास घडवला. नम्रता तायडे , स्वराज शिंदे व प्रसाद पाटील यांनी ३ कांस्यपदके पटकावली आहेत. पूमसे प्रकारामध्ये वैयक्तिक ६० वर्ष गटात मनीषा गरवालिया, ३० वर्षाखालील गटात मृणाली हरणेकर यांनी रौप्यपदक जिंकले आहे. वंश ठाकूर, शिवम भोसले व तनिष मालवणकर यांनीही रौप्यपदके जिंकली आहेत.
महाराष्ट्र टीम प्रमुख तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या महाराष्ट्र संघाने चांगली कामगिरी केली. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत असलेले प्रवीण सोनकुल यांना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया कडून “बेस्ट क्योरोगी कोच” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र संघाचे कोच म्हणून प्रवीण संकुल यांच्यासोबत जयेश बाविस्कर, संघ व्यवस्थापक प्रमोद कदम, पुमसे कोच रॉबिन सर, मॅनेजर विद्या जाधव तसेच अमोल तोडणकर, अरविंद निशाद आदी सर्व सपोर्टिंग कोच यांनीही महत्त्वाची जबाबदारी निभावली.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे व धुलीचंद मेश्राम, सचिव सुभाष पाटील, तसेच राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, अजित घारगे, सतीश खेमसकर यांनी सर्व पदक विजेते खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड !! आसाम येथील राष्ट्रीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेतील सर्व पदक विजेत्या खेळाडूंची गोवा येथे ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. अभिजीत खोपडे (५८ किलो), शिवम शेट्टी (६३ किलो), स्वराज शिंदे, (६८ किलो), प्रसाद पाटील (७४ किलो), श्रीनिधी काटकर (८७ किलो), साक्षी पाटील, (४६ किलो), मृणाल वैद्य (४९ किलो), निशिता कोतवाल ( ५३ किलो), भारती मोरे (६२ किलो), नम्रता तायडे (७३ किलो) या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.