गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

जळगाव दि.३० (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून पंडीत जवाहरलाल  नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा येईल. या सद्भावना शांती यात्रेत पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील,  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. माहेश्वरी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव महानगर पालिकेच्या प्रशासक सौ. विद्या गायकवाड, के.सी. ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदी मान्यवर निमंत्रीत आहेत. सोबत शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोच्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.

रॅलीनंतर महात्मा गांधी उद्यानात होणाऱ्या विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये  मा. श्रीमती अनुराधा शंकर अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) मध्यप्रदेश ह्या प्रमुख अतिथी असून, अध्यक्ष म्हणून मा. श्री. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थितीतांना गांधीजींचे पणतु मा. श्री. तुषार गांधी हे अहिंसेची शपथ देणार आहेत. शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेत’ सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.

चरखा जयंती निमित्त अखंड सूत कताई – महात्मा गांधींनी चरखा किंवा चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. २ ऑक्टोबर ह्या दिवशी चरखा जयंती ही साजरी केली जाते त्या निमित्ताने गांधी तीर्थ येथे अखंड सूत कताई होणार आहे. महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने गांधीतीर्थ सुरू राहणार आहे.

खानदेश में महात्मा गांधी पुस्तकाचे प्रकाशन – महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व आज त्रिखंडात सर्वमान्य झाले आहे. या देशातल्या पहिल्या ग्रामीण कॉंग्रेस अधिवेशनाचा मान खानदेशातील फैजपूर नगरीला लाभला. गांधीजी म्हणत की, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. खानदेशात गांधीजी आलेत व खानदेश गौरवान्वित झाला. लोकमान्य टिळक फंडाच्या निमित्ताने गांधीजी खानदेशात आले तेव्हा त्यांचे कमालीच्या उत्साहात  सर्वत्र स्वागत झाले. मानपत्रे व भेटवस्तु देण्यात आल्यात. त्यांचा लिलाव करून ती रक्कम फंडात जमा झाली. वेगवेगळ्या संस्थांना, सामाजिक उपक्रमांना, व्यावसायिकाना भेटून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्याची मशाल तेवती राखली. यात आबालवृध्द स्त्री-पुरुषांचा उत्कट सहभाग होता. अशा अनेक घटनांची नोंद असलेल्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण – गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी कांताई सभागृहात गांधीतीर्थद्वारे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमानंतर लगेचच पारितोषिके देखील मान्यवरांच्याहस्ते प्रदान होणार आहेत. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम

जळगाव दि.२४ प्रतिनिधी –  येवला येथे विभागीय कुस्ती स्पर्धा दि. २३ ला पार पडली. या स्पर्धेत  प्रगती विद्या मंदीर शाळेचा विद्यार्थी व शाहुनगरमधील हनुमान आखाडा व्यायामशाळेचा पैलवान चि. हर्षित मनिष झेंडे हा ७१ किलो वजनी गटात व ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांकाने विजयी झाला.

या स्पर्धेच्या गटात प्रत्येकी दोन राऊंड झाले व दोन्ही राऊंड मध्ये हर्षित झेंडे या पैलवानने जिंकून अंतिम फेरीत विजय मिळवला. आता त्याची दि. २४ ते २७ दरम्यान कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेसाठी निवड झाली असून तो त्या स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे रवाना झाला आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या एक्सपोर्ट मार्केटिंग विभागाचे सहकारी मनिष झेंडे यांचा हर्षित चिरंजीव आहे. यशस्वी कामगिरीसाठी त्याला गुरु वस्ताद विजयदादा वाडकर, शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यातील विजयी कारकीर्दीस त्याला कुटूंबिय, हनुमान आखाड्याचे विजयदादा वाडकर व समस्त पैलवान मित्रमंडळीतर्फे, शाळेतील समस्त शिक्षकांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.

महा. क्रिकेट असो. आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजयी

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झाल्या. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बलाढ्य पश्चिम बंगाल संघाला नमवत महाराष्ट्र संघाने दिमाखात विजय साकार केला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले गेले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टि-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ या स्पर्धेत  आज शेवटच्या दिवशी गुणतालिकेत अव्वल व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र संघात सामना रंगला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. निर्धारित २० षटकात ९ विकेटच्या मोबदल्यात १०८ धावा महाराष्ट्र संघाने केल्यात. त्यात तेजल हसबनीस २६, शिवाली शिंदे २४, मुक्ता मगरे १९ धावांचे योगदान दिले. बंगाल संघाकडून शलका ईसाब हिने ४ षटकात ४ विकेट घेतल्या. तिला मिता पाॕल व माॕली मंडळ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेऊन साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगाल संघ १८.१ षटकात फक्त ८३ धावांत गारद झाला.
महाराष्ट्र संघ २५ धावांनी विजयी झाला. महाराष्ट्र संघाकडून मुक्ता मगरे हिने ३ विकेट घेतल्यात. मुक्ता मगरे व उत्कृष्ट क्षेत्रररक्षण करत एक धावबाद व दोन झेल घेणाऱ्या ईशा पठारे यांना संयुक्तिक सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ॲपेक्स सदस्य अतुल जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रमेशदादा जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, सदस्य युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, अभंग जैन,  जैन इरिगेशनच्या एचआरडी विभागाच्या राजश्री पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष  रेखा गोडबोले उपस्थित होते. अंतिम सामन्यात पंच म्हणून संदीप गांगुर्डे, वरूण देशपांडे यांनी तर गुणलेखक म्हणून मोहम्मद फजल यांनी काम पाहिले. दरम्यान संपूर्ण मालिकेत गोलंदाजी व फलंदाजीने प्रभावीत करणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या मुक्ता मगरे हिला मालिकाविर म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत तिने  ७७ धावा व ९ विकेट घेतल्यात. उत्कृष्ट फलंदाज तेजल हसबनिस १३६ धावा, उत्कृष्ट गोलंदाज बंगालची शायिका ईसाब ९ विकेट, यष्टीरक्षक त्रिपुरा मोतोची देबनाथ ह्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  संपूर्ण स्पर्धेत चषक जैन इरीगेशन तर्फे प्रदान करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे उद्घाटन – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

जळगाव दि.23 प्रतिनिधी-  मानवी सभ्यतेचे भविष्य म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्त्वात सर्वसामान्यांना प्रभावित करण्याची ताकद होती आणि आजही आहे. चांगल्या नेतृत्वाचा लोक नेहमी सन्मान करतात त्यासाठी आपले नेतृत्व कसे आहे याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी संपुर्ण जगात हिंसा सुरू होती त्यावेळी महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला. हिंसा म्हणजे अंधकाराचा मार्ग असून अहिंसक मार्गाने निर्माण झालेले नेतृत्व हे शाश्वत असते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आजपासून ते ४ ऑक्टोबर पर्यंत नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन केले आहे. कॅम्पच्या उद्घानाप्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ. के. बी. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अनुभती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सौ. अंबिका जैन, रिसर्च डीन प्रो. गिता धरमापाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई उपस्थित होते.

नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये नेपाळसह, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मिर, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह १६ राज्यातील युवकांनी सहभाग घेतला आहे. संपुर्ण भारतातील सहभागी युवकांनी एकमेकांना सुतीहार घालून आगळ्यावेगळ्यापद्धतीने स्वागत केले.

सौ. अंबिका जैन यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याविषयी सांगितले.महात्मा गांधीजींनी उद्योगाकडे विश्वस्त भावनेने बघितले. ह्याच संस्कारातुन श्रध्देय भवरलालजी जैन यांनी गांधीजींच्या विचार-प्रसारासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची निर्मिती केली. जागतिक दर्जाचे ‘खोज गांधीजी की’हे मल्टीमिडीया म्युझियम, गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रंथालय यासह ग्राम उद्योग वाढीसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले विविध उपक्रमांमुळे सकारात्मक बदल होत असल्याचे अंबिका जैन म्हणाल्या.

डॉ. अश्विन झाला यांनी गांधीयन लिडरशिप कॅम्प आजही का आवश्यक आहे याबाबत सांगितले. मूल्य, सिद्धांताला धरून नेतृत्व म्हणजे गांधीजीचे विचार आहेत तेच नेतृत्व आजच्या युवकांमध्ये निर्माण व्हावे यासाठी २०१७ पासुन गांधी रिसर्च फाऊंडेशन हा कॅम्प घेत आहे. यात सामर्थ्याच्या आधारावर साधारण जीवनशैलीतून असाधारण कार्य करणाऱ्या गांधीजींच्या मुल्याधारीत नेतृत्वाची आजच्या पिढीमध्ये संस्कार व्हावेत या भावेनूतन हा उपक्रम आहे. देशात व्यक्तिमत्त्व विकासापेक्षा चारित्र्य महत्त्वाचे आहे तेच नेतृत्व निर्माण करण्याचे काम या  कॅम्पच्या माध्यमातून होत आहे.

प्रो. गीता धरमपाल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्यापैकी कोणी नेता नाही आणि अनुयायीसुध्दा नाही. ही एक महान मानसिकता तयार करा. चांगले आचरण करणे, परस्परांशी सहकार्य भावना ठेवणे, त्यात सत्यता असावी, लोकांचा विश्वासभाव जिंकताना दुसऱ्यांच्या आदर करा, चांगले करण्याची जबाबदारी घ्या, नेतृत्वासाठी अनुयायांची नाही तर साहसाची आवश्यकता आहे. आपल्यातील असलेली ताकद व कमजोरी स्वतः समजून घेतले पाहिजे.टिम वर्क महत्त्वाचे आहे हे समजून अहंकारचा त्याग करून प्रेमाने सर्वांशी वागणे म्हणजे नेतृत्व म्हणता येईल. सकारात्मकत वर्तन ठेऊन दुसऱ्यांचा आदर करा असे गीता धरमपाल यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी असलेल्या सौ. निशा जैन यांनी सांगितले की, संपुर्ण विश्वात व्यक्तिमत्व विकासासह वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत मात्र चारित्र्यवान व्यक्तीमत्व घडविण्याचा कुठलाही अभ्यासक्रम नाही. तो फक्त आपल्याला महात्मा गांधीजींच्या संस्कारात मिळतो.यातूनच चारित्र्यवान नेतृत्व घडवावे व जे चांगले आहे त्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवून पुढे यावे आणि आपल्यासह देशाच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन सौ.निशा जैन यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलाने झाली. यानंतर अनुभूती निवासी स्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘घुम चरखे घुम..’ हे गीत म्हटले. नितीन चोपडा यांनी सुत्रसंचालन केले. गिरीश कुळकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला

विविध विषयांवर होईल मंथन – गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू झालेल्या नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्प युवकांना गांधी विचार समजावे अहिंसा, सत्य या विचारांचे नेतृत्व कौशल्य निर्माण व्हावे, यासाठी मुल्यवर्धित शिक्षण-प्रशिक्षण देत आहे. या कॅम्पमध्ये गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधीजींचे पणतू तुषार गांधी, मध्यप्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक सौ.अनुराधा शंकर, डॉ. एम. पी. मथाई, कल्याण अक्कीपेडी, विनय चारूल, रमेश पटेल, अमृत देशमुख, अशोक जैन, अनिल जैन, मुंबईचे प्रसिध्द गजलकार फराजखान अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

महा. क्रिकेट असो. आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेची फायनल पश्चिम बंगाल व महाराष्ट्र संघात

जळगाव दि. २२ प्रतिनिधी –  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर  दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान सुरू आहे. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बलाढ्य पश्चिम बंगाल संघाला नमवत महाराष्ट्र संघाने फायनलमध्ये दिमाखात धडक मारली. उद्या (दि. २३) दुपारी १.३० वाजता दोघांमध्ये अंतिम सामना होईल. तत्पुर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी तामिळनाडू विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९.३० वाजता  सामना खेळविला जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टि-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ च्या आजच्या दिवसाची सुरवात त्रिपुरा विरूद्ध तामिळनाडू यांच्यात खेळविला गेलेल्या सामन्याने झाली. तामिळनाडूने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्रिपुरा  बिनबाद ३९ धावा असताना सातव्या षटकात पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती न घेतल्याने सामना थांबवून दोघंही संघाला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यानंतर दुपारी पश्चिम बंगाल विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात अंतिम सामना रंगला.

महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगालच्या मिता पॉल ३५ धावा व कशिश अग्रवाल १९ या सलामीच्या खेळाडूंनी चांगली सुरवात करून दिली. मात्र मधल्या फळीतील फलंदाजी कोळमडल्याने निर्धारीत २० षटकात सर्वबाद १०९ धावा बंगालला करता आल्यात. महाराष्ट्राकडून उत्कृष्ट गोलंदाजी मुक्ता मगरे हिने केली. तिने ४ षटकात ४ विकेट घेऊन बंगालचे कंबरडे मोडले. तिला अनुजा पाटील, ईशिता खळे, आदित्य गायकवाड प्रत्येकी १ विकेट साथ मिळाली. प्रत्युत्तरात महाराष्ट्र संघाची सुरवात धडाकेबाज झाली. मात्र संघाच्या २२ धावांच्या स्कोरवर किरण नवगिरे १० धावा करून आऊट झाली. यानंतर शिवाली शिंदे १९ धावा, तेजल हसबनिस ३१ धावा, अनुजा पाटील १९ धावा आणि मोक्याच्या क्षणी मुक्ता मगरे हिने नाबाद २२ धावांची खेळी करून महाराष्ट्र संघाला विजय मिळवून दिला. महाराष्ट्र संघाने १९.२ षटकांत ४ विकेटच्या मोबदल्यात ११३ धावा केल्यात व बंगालवर ६ विकेटने मोठा विजय प्राप्त केला. ४ विकेट घेणाऱ्या व २२ धावांची उपयुक्त खेळी करणाऱ्या मुक्ता मगरे हिला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. जैन परिवाराच्या सदस्या सौ. शोभना अजित जैन यांच्याहस्ते मुक्ता मगरे हिला चषक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष रेखा गोडबोले, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी यांची उपस्थिती होती.

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

जळगाव, दि. २२ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, निर्माते, अभिनेते पद्मश्री सतिश आळेकर (पुणे) यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी सुमती लांडे (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सिताराम सावंत (इटकी ता. सांगोला, सातारा) यांना जाहिर झाला आहे. ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.

साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. शोभा नाईक, सौ. ज्योती जैन हे ऑनलाईन उपस्थित होते. तर सदस्य ज्येष्ठ साहित्यीक रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. सुरवातीला कविवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यीक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.

जैन इरिगेशनचे कल्याणकारी अंग असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे बहिणाई पुरस्कार, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बिजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी नाटक, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव’ हा व्दिवार्षिक पुरस्कार असून २ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे याचे स्वरूप असेल. पहिल्या पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार राम सुतार, दुसरा जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा तिसरा पुरस्कार प्रसिद्ध लेखक, निर्माते, अभिनेते सतिश आळेकर यांना जाहिर करण्यात आला आहे.

‘कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्याकडून सृजनशील लिखाणाचे कार्य घडावे यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन इरिगेशनतर्फे सुरूच असते. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे ‘कला-साहित्य पुरस्कार’ जाहिर करताना आनंद होत आहे.’ – अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन

पुरस्कार प्राप्त साहित्यीकांचा परिचय – 1-सतिश आळेकर –  ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्यांना जाहिर झाला ते सतिश आळेकर यांनी पुण्याच्या ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे काम केले आहे. याशिवाय रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी काम केले आहे. फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ‘ओळख’, ‘काळोख’ या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’ आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. सतीश आळेकर यांनी ‘चिंटू’, चिंटू-२, ‘व्हेंटिलेटर’, भाई,भाई-२, मी शिवाजी पार्क, अय्या, चि व चि सौ कां, राजवाडे अँड सन्स, स्माईल प्लिज, हाय वे, देऊळ बंद, जाऊंद्याना बाळासाहेब इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. रंगभूमीप्रमाणेच ‘जैत रे जैत’ चित्रपटाची पटकथा, ‘देखो मगर प्यार से’ ही दूरदर्शन मालिका, ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. रंगभूमीवरील कारकीर्द आणि नाट्यकृतींचा आढावा घेणारे ‘गगनिका’ हे आत्मकथन चर्चेत आहे.

2) सुमती लांडे –  साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सुमती लांडे यांचे कमळकाचा, वाहेत अंतर, कमळकाचा: कावप्रत्यय कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. साहित्य क्षेत्रात कवयत्री, लेखिका,संपादक, प्रकाशक, ग्रंथ प्रसारक, ग्रंथ वितरक म्हणून सुमती लांडेचे कार्य आहे. शब्दालय प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी ग्रंथप्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. सुमती लांडे यांनी स्त्री वाद, स्त्री-पुरूष नातेसंबंध, वाड्मयीन चळवळी आणि दृष्टीकोन, पुरूष आकलनातला-अनुभवातला यांचे संपादन केले आहे.

3) सिताराम जगन्नाथ सावंत – इटकी ता. सांगोला जि. सातारा येथील रहिवाशी सिताराम सावंत रयत शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. ‘नामदार’, ‘लगीन’, ‘देशोधडी’, ‘भुई भुई ठाव दे’ अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कादंबरी, ‘काव्यार्य’ संपादन व ‘पांढर’ आणि ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा कथासंग्रहाने सिताराम सावंत यांनी मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवले आहे. शेतकरी, शिक्षक आणि लेखक हा प्रवास करताना शेतमालकांचे जमिनीचे ‘काळीज’ हातांमधून गेल्यानंतर त्यांच्या मनांचा तीव्रकोमल कोलाहल टिपणारी ‘भुई भुई ठाव दे’ कादंबरी व ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा कथासंग्रह सध्या मराठी विश्वात बहुचर्चित आहे. स्वतः अभियंता अर्हताप्राप्त असणाऱ्या या लेखकाने कठोर विचार करून आणि विवेकाची नीट मशागत करून ‘स्थावरजंगम’ विषयावर कादंबरीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.

4) अशोक कोतवाल – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य राहिलेले अशोक कोतवाल (जळगाव) यांचे ‘मौनातील पडझड’, ‘कुणीच कसे बोलत नाही’, ‘नुसताच गलबता’, ‘खांदे सुजलेले दिवस’, हे कवितासंग्रह तर ‘प्रार्थनेची घंटा’, ‘सावलीचं घड्याळ’, ‘दालगंडोरी’ हे ललित लेखसंग्रह, ‘घेऊ या गिरकी’ हे बालकविता यासह पुणे सुविद्या प्रकाशनाचे ‘खानदेशचे काव्यविश्व’  हे संपादन केले आहे. यातील ‘प्रार्थनेची घंटा’, ‘झडीचा पाऊस’, ‘दालगंडोरी’ ह्या साहित्यांचा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश आहे.

विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी)  – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क नसून गुरुवार, दि. २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत ऐनवेळी सहभाग दिला जाणार नाही यांची शाळांनी नोंद घ्यावी अशी माहिती गांधी रिसर्च फाऊंडेशन संस्थेच्यावतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून एका शाळॆतून एकच प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी शाळांनी मराठी वा हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत सादर करणे अपेक्षित असून चित्रपटातील गीते स्वीकारले जाणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटांचा कालावधी दिलेला असेल. संघातील विद्यार्थ्यांची संख्या वाद्य वादकांसह जास्तीत जास्त १२ असावी. गीत सादर करतांना पारंपरिक वाद्यांचा वापर अपेक्षित असून पाश्चात्य वाद्यांना परवानगी नाही. सहभाग नोंदणी करतांना प्रवेशिकेसोबत स्वतंत्र कागदावर संपूर्ण गीत, गीतकार व अन्य माहिती देणे अनिवार्य आहे.
सहभागी संघातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्या संघांना अनुक्रमे रु. ११ हजार, ७ हजार, ५ हजार व उत्तेजनार्थ रु. २ हजाराची तीन रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात स्पर्धा घेण्यात येईल व स्पर्धेनंतर तेथेच स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. सहभागी संघांनी सकाळी ७ वाजता आयोजित *अहिंसा सद्भावना शांती यात्रेत* सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. आपल्या शाळेच्या संघाची नोंदणी करण्यासाठी व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ या भ्रमध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही पत्रकात कळविले आहे.

राज्य क्रिकेट पंचाच्या पॅनेलमध्ये जळगावचा वरूण देशपांडे

जळगाव दि. २० प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतेच घेतलेली क्रिकेट पंच परिक्षा वरूण देशपांडे यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. संपुर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे क्रिकेटच्या राज्य पंचांच्या पॅनेलमध्ये वरूणचा समावेश करण्यात आला.

वरूण देशपांडे यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस टी (बापू) खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी यांच्यासह जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे रविंद्र धर्माधिकारी व सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे वरुण चे वडील अरविंद देशपांडे हे जळगाव जिल्हातील क्रिकेटचे प्रथम अधिकृत पंच आहेत. त्यानंतर जळगावचे संदीप गांगुर्डे हे दुसरे तर वरुण देशपांडे हा जिल्ह्याचा तिसरा अधिकृत पंच म्हणून जबाबदारी स्वीकारेल.

येवला येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्तीत वाकोद विद्यालयाचे यश

जळगाव दि. २० प्रतिनिधी – राणिदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील मुले यात आनंद गोपाल सोनेत हा ४४ वजन गटातुुन प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाला. या यशामुळे आनंद सोनेत ची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.

येवला येथील भाऊलाल लोणारी क्रीडा संकुल येथे आज दि. २० रोजी संपन्न झालेल्या नाशिक विभागात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातून स्पर्धेक आले होते. आनंद सोनेत याने तीन राऊंडमध्ये सहा स्पर्धेकांना चित करत विजय मिळवला. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह दि. शेंदुर्णी एज्युकेशन को. ऑप सोसायटीत लिमिटेड, शेंदुर्णी संस्थेचे चेअरमन संजय गरूड, सचिव सतिश काशीद, सहसचिव दीपकराव गरूड, ज्येष्ठ संचालिका उज्ज्वला काशीद, वसतिगृह सचिव कैलासराव देशमुख, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विजयी खेळाडूंचे पालक गोपाल सोनेत, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, क्रिडा शिक्षक के. एम. पाटील, ए. ए. पाटील व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून विजयी खेळाडूंचे कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर

जळगाव दि. २० प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथील मैदानावर सुरू आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी असुन आतापर्यंत पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र संघ पोहचला असून नेट रनरेटही चांगला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. दि.१५ ते २३ सप्टेंबर दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा चौथा दिवस होता.

आजच्या पहिल्या सामन्यात पश्चिम बंगाल विजयी – चौथा दिवसाचा पहिला सामना त्रिपुरा विरूद्ध बंगाल असा खेळविण्यात आला. त्रिपुरा संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पश्चिम बंगाल संघाने निर्धारित २० षटकांत झुमिया खातून ३६ (३७ चेंडू) धावा च्या मदतीने ८ गडी गमावून १११ धावा केल्यात. त्रिपुरा तर्फे हिना हिने सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्रिपुरा संघाने ११२ धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजी करताना रिजू सहा हिच्या नाबाद ४३ धाव वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. त्रिपुरा संघ ५ गडी बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता येईल. बंगाल संघ ८ धावांनी विजयी झाला. ह्या सामन्यात ३६ धावा व २ बळी घेणारी झुनिया खातून ही सामनावीर ठरली. अनुभूती निवासी स्कूलचे व्यवस्थापक विक्रांत जाधव यांच्याहस्ते ट्रॉफी देऊन तिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले.

महाराष्ट्राचा तामिळनाडूवर ६६ धावांनी विजय – आजचा दुसरा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात खेळला गेला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. यात किरण नवगिरे ३८ (२५ चेंडू) धावा, कर्णधार तेजल हसनबनीस ३० (३१ चेंडू), अनुजा पाटील २३ (१४ चेंडू), आदिती गायकवाड २१ (२६ चेंडू) नाबाद यांच्या योगदानामुळे निर्धारिती २० षटकांत ६ गडींच्या मोबदल्यात १२५ धावा केल्यात. १२६ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या तामिळनाडू संघाची सुरवात अडखळत झाली. अर्शी चौधरी १२, सबरिना १९ यांनी महाराष्ट्र संघाच्या आक्रमक गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाजींनी अपेक्ष प्रमाणे कामगिरी न केल्याने तामिळनाडूचा संघ १८ व्या षटकात फक्त ५९ धावांमध्ये गारद झाला. महाराष्ट्र संघातर्फे श्रद्धा, भक्ती, ईशिता यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर रसिका, अदिती गायकवाड, अनुजा पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. ऑलऑउंटर कामगिरी करणाऱ्या अनुजा पाटील हि सामनावीर ठरली. तिला जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, पंच संदिप जारे, अनिल सोनवणे उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version