जैन हिल्स येथे पोळा उत्साहात साजरा

जळगाव दि.26 – संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक… पावरी नृत्य, आदिवासी नृत्य सोंग व घोडा, गुरख्या डेंगा… हनुमान पार्वती मोर नंदीनृत्याविष्कार.. ढोल बाजाचा गजर… ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद… ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष श्री. अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या फुगडीसह… विदेशी नागरीक डॅनियल हदाद (इस्त्राईल) यासह मान्यवरांनी, अनुभूती स्कूलचे विद्यार्थ्यांनी, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्यांवर नृत्यांसह ठेका धरत आनंद द्विगणीत केला. जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास केंद्रावर बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा झाला.

जैन कृषि संशोधन केंद्राच्या ध्यानमंदिरापासून मिरवणूकीस सुरवात झाली. श्रद्धाज्योत या श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या समाधीस्थळी बैलांच्या मिरवणूकीने प्रदक्षिणा घातली व वंदन केले. त्यानंतर श्रद्धाधाम, सरस्वती पॉईंट मार्ग सवाद्य मिरवणू्क काढण्यात आली होती. मुख्य सोहळा जैन हिल्स हेली पॅड येथील मैदानावर झाला. यावेळी व्यासपीठावर अणूशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, महात्मा गांधीजींचे पणतू श्री. तुषार गांधी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, श्री. राजा मयूर, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. एम. पी. मथाई यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

अशोक जैन यांनी पोळा फोडण्याच्या सोहळ्यासाठी हिरवी झेंडी दाखविली. सालदार अविनाश गोपाल यांनी पोळा फोडण्याचा मान मिळविला. सौ. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना गोड घास भरविला. जैन परिवारातील सर्वात लहान सदस्य अर्थम अथांग जैन याच्याहस्ते सुद्धा घास भरविण्यात आला. भव्य अशा व्यासपीठावर सप्तधान्याची रास, शेती उपयोगी अवजारांचे पूजन अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

भूमिपुत्रांचा सत्कार

जैन कृषि संशोधन विकास केंद्रातील विविध ठिकाणांवर 25 च्यावर बैल जोड्या आहेत. त्यांच्यासाठी 35 च्यावर सालदार गडी शेती-मातीत राबत असतात. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व जैन परिवाराच्या हस्ते सर्व सालदारांचा परिवारासह सत्कार व संसारोपयोगी साहित्य भेट सन्मानाने देऊन गौरव करण्यात आला.

‘भारतीय संस्कृती, कृषी सांस्कृतिक वैभवाचा जैन हिल्स परिसरात मला अनुभव आला. प्रत्यक्ष सहभाग घेता आल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया डॅनियल हदाद यांनी दिली.’

‘ऋषभराजाला ऊर्जास्वरूपात आजही शेतीमध्ये स्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शेतीमध्ये ऋषभराजाला अनन्य साधारण महत्त्व त्याचमुळे प्राप्त झालेले आहे. पोळ्याच्या दिवशी ऋषभराजाचे पूजन त्याच्या कष्टाप्रती केलेला सन्मानच ठरतो अशी भावना डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.’

‘डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी भवरलालजी जैन यांची आठवण काढत पोळा सणात लोकसंस्कृती जोडली याचे नाविन्य जपत त्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्याचे सुरू केले ही कृषी संस्कृती पुढच्या पिढीनेही जपली आहे याचा आनंद आहे. पोळा हा सण कान्हदेशात सांस्कृतिक मूल्य जोपासणारा ठरलेला आहे असेही ते म्हणाले.’

‘सण-उत्सव वर्षभर येत असतात मात्र बळिराजा आणि त्याच्यासोबत राबणाऱ्या सर्जा-राजाचा कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा बंधूभाव जोपासणारा वाटतो. गत 25 वर्षापासून हा सण जैन हिल्सला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन म्हणाले.’

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले शेतकरी बांधव हे त्यांच्या परिवारासह उपस्थितीत होते. या पोळा सणाच्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनच्या सर्व विभागातील सर्व सहकारी प्रयत्न केले. या कार्यक्रमात सहकारी हे परिवारासह उपस्थिती होते. यासह अनुभूती निवासी स्कूलमधील 200 हून अधिक विद्यार्थी, गांधी तीर्थ येथे देशभरातून अभ्यासक्रमासाठी आलेले विद्यार्थीही उपस्थितीत होते.

जिल्हास्तरीय आंतर शालेय 14 व 17 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धा संपन्न

जळगाव दि. 25- जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 14 व 17 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धा-2022’ अनुभूती निवासी स्कूल येथे संपन्न झाली. दि. 24 ते 25 या दोन दिवसीय झालेल्या स्पर्धेचा समारोप आज झाला. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव विजयी ठरले. तर उपविजयी सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव ठरले. तसेच मुलांमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, चाळीसगाव विजयी ठरले. तर उपविजयी काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव ठरले. स्पर्धेच्या 17 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव विजयी ठरले. तर उपविजयी सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव ठरले. तसेच मुलांमध्ये सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव विजयी तर सेंट जोसेफ काॕ. इंग्लिश मिडिअम स्कूल जळगाव उपविजयी झाले.
स्पर्धेच्या सर्वाकृष्ट खेळाडू म्हणून 14 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये सोम्या लोखंडे, मुलांमध्ये जयवंत पवार तर 17 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये सत्ताक्षी वाणी तर मुलांमध्ये ऊजेर देशपांडे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
जिल्ह्यातील 35 शाळांमधून 92 संघ सहभागी झाले होते. त्यात 550 खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले. विजयी व उपविजयी शालेय संघातील स्पर्धेकांना चषक, पदक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, जैन स्पोर्टस ॲकडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले.
जळगाव जिल्हा बॕडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, जैन स्पोर्टस ॲकडमीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अरिवंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धेत मुख्य पंच किशोर सिंह, सहपंच जाझीब शेख, रौनक चांडक, गीता पंडीत, मिहिर कुलकर्णी, अर्ष शेख, करण पाटील, व्रजनाभ कोल्हे, सुफियाॕन शेख, धिर वेद, शुभम चांदसरकर, ऊजेर देशपांडे, देव वेद, ऋवेदा काबरा, सौम्या लोखंडे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रविण ठाकरे, समिर शेख, सोमदत्त तिवारी, विकास बारी यांनी सहकार्य केले.

जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज कॕरम स्पर्धा-2022’

जळगाव दि. 25– जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज कॕरम स्पर्धा-2022’ या स्पर्धेला सुरूवात झाली. कांताई सभागृह येथे कॕरम स्पर्धेचे कॕरम खेळून उद्घाटन झाले. उद्घाटनाप्रसंगी जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे विजय मोहरील, अनिल जोशी, आंतरराष्ट्रीय कॕरमपटू आयेशा खान, माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे यांच्यासह सर्व सहभागी शाळांचे क्रीडाशिक्षकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पंधरा शालेय संघातील एकूण 75 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात मुलींमध्ये विद्या इंग्लिश स्कूलचे, मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूलचे वर्चस्व राहिले.
उद्या दि. 26 होणाऱ्या मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामान्यात दुर्गेश्वरी धोंगडे विरूध्द श्रावणी मोरे (दोघंही विद्या इंग्लिश स्कूल), दुसरा उपांत्य सामन्यात पुर्वा भुतडा (विद्या इंग्लिश स्कूल) विरुध्द पुर्वी भावसार (अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी) यांच्या दरम्यान सामना रंगेल. तसेच मुलांच्या उपउपांत्य फेरीत अँग्लो उर्दू हायस्कूलचे तीन खेळाडू, रायसोनी पब्लिक स्कूल व अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरीचे प्रत्येकी दोन खेळाडू आणि सेंट लाॕरेंस हायस्कूलचा एक खेळाडू यांनी प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर अंतिम फेरीचे सामने होतील. विजेत्या स्पर्धक व शाळांना जैन चँलेंज चषक व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल. पारितोषिक वितरण समारंभ कांताई सभागृह येथे उद्या दि. 25 ला दुपारी 2 वाजता व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष यूसफ मकरा, महाराष्ट्र कॕरम असोशिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान व जळगाव जिल्हा कॕरम असोसिएशनचे सचिव नितीन बर्डे यांच्या उपस्थिती होईल. सय्यद मोहसीन, आयशा खान, योगेश धोंगडे, सय्यद जुबेर यांनी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आणि स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

जळगाव, दि. 24 (प्रतिनिधी) – जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना जाहीर झाला आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.
कान्हदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, सौ. ज्योती जैन यांची उपस्थिती होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.
जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा दुसरा पुरस्कार जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना जाहीर झाला आहे.
बृहृन्महाराष्ट्रातील श्रेष्ठ लेखकांच्या निवड समितीने एकमताने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसतात.-   डॉ. भालचंद्र नेमाडे, अध्यक्ष, निवड समिती
कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहातर्फे सुरूच असते. बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला-साहित्य पुरस्कार जाहिर करताना आनंद होत आहे. – अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन
परिचय – 1) प्रभाकर कोलते – ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्यांना जाहीर ते प्रभाकर कोलते मुंबई येथील जे.जे. कला महाविद्यालयात कलाशिक्षण घेऊन तेथेच हाडाचे प्राध्यापक होते. प्रभाकर कोलते कला शिक्षणाविषयी आपलं मत अतिशय प्रभावीपणे आणि स्पष्ट मांडतात त्यामुळेच ते कला विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. भारतीय अमूर्त कलेतील सध्याच्या नामांकित चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलतेंचे नाव अग्रस्थानी आहे. अमूर्त कलेवर भाष्य करणारे आणि लिहीणाऱ्या अतिशय दुर्मिळ जागतिक दर्जाच्या चित्रकारांमध्येही ते पुढे आहेत. भारतीय अमूर्त कलेमध्ये काम करणाऱ्या क्रियाशील पिढीमध्ये बहूतांश चित्रकारांवर प्रभाकर कोलते यांचा प्रभाव आहे. संत परंपरेचा अभ्यास करून अमूर्ततेतील अध्यात्म सांगणारा योगी चित्रकार म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या अनेक चित्रमालिका देशात-परदेशात गाजलेल्या आहेत.
2) संध्या नरे-पवार –  श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी संध्या नरे-पवार यांची निवड झाली. मुक्तपत्रकार व संधोधनपर लेखनामध्ये त्यांचे साहित्य आहे. आदिवासी स्त्रीयांविषयी संवेदनशील वास्तव मांडून अमानवी प्रथांवर प्रखड भाष्य करणारे ‘डाकीण’, ‘तिची भाकरी कोणी चोरली’ या पुस्तकांसह त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
3) प्रवीण दशरथ बांदेकर – सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज येथे इंग्रजीचे अध्यापन करतात. त्यांनी कविता, कादंबरी, ललित, समीक्षा आदी लेखन केले असून कविता संग्रह – ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं…’, ‘चिनभिन’, कादंबऱ्या – ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘इंडियन अॅनिमल फार्म’, ललित लेख संग्रह – ‘घुंगुरकाठी’,  ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’, बालसाहित्य- ‘चिंटू चुळबुळे’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे.
4) वर्जेश सोलंकी – वर्जेश सोलंकी हे आगाशी ह्या लहानशा खेड्यात वास्तव्यास असून महाविद्यालय जीवनापासून काव्यलेखनाला त्यांनी सुरूवात केली. वर्जेश ईश्वरलाल सोलंकींच्या ‘कविता’, ‘ततपप’, ‘वेरविखेर’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध, ‘दीडदमडीना’ (ललितगद्य), ‘पेरूगन मुरूगन’ (लघुकांदबरी), ‘वृद्धशतक’  व ‘अनेक एक’ (कवी कमल वोरा ह्यांच्या गुजराती कवितांचा मराठी अनुवाद), ‘हुसैनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ (कथासंग्रह) इत्यादी साहित्य प्रकाशित असून अनेक कविता व कवितासंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश आहे.

बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची जयंती साजरी

जळगाव दि. 24 प्रतिनिधी– कान्हदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जरी निरीक्षक होत्या मात्र त्यांच्या साहित्यातून त्या ज्ञानी आहेत, ज्ञानाला पुस्तकाची किंवा कोणत्याही विद्यापीठाची गरज नसते तर जीवनातील व्यवहारज्ञानातून माणूसकीचा मार्ग आपल्याला मिळतो, हाच माणूसकीचा मार्ग बहिणाईंच्या साहित्यात दिसतो. बहिणाई निसर्गाशी संवाद साधतात आणि पृथ्वीच्या आरशात स्वर्ग पाहतात हे तत्वज्ञान पुढील पिढीला माणुसकीला मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.
जुने जळगावमधील चौधरीवाड्यातील बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची 142 वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी बहिणाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, खापर पणतू देवेश चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, ज्ञानेश्वर शेंडे, विजय जैन, हर्षल पाटील, अशोक चौधरी उपस्थित होते. सुदर्शन अय्यंगार व पद्माबाई चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन करण्यात आले. यावेळी मुंबईच्या निशा कोल्हे, आदिती त्रिवेदी, रिती शहा, देवेंद्र पाटील यांच्यासह चौधरी वाड्यातील परिवारातील सदस्यांनी बहिणाईंना अभिवादन केले.
पुढे बोलताना सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, अकबर बादशाह यांच्या काळातील कवि रहिम यांच्या साहित्याचा कवयित्री बहिणाईंच्या मायबोली ओव्यांमध्ये सारांश दिसतो. बहिणाईंच्या साहित्याचा तौलनिक अभ्यास विद्यार्थ्यांसह उपस्थितीत साहित्यप्रेमींसमोर उदाहरणांसह मांडला. साहित्य हे प्रवाही असते. बहिणाईंच्या साहित्यामध्ये शेतकरी महिला, तिच्या जीवनातील व्यथा दिसतात. निसर्गाशी एकरूप होऊनच आपल्याला स्वर्ग मिळतो यातूनच परमेश्वराची प्राप्ती होते. यासाठी बहिणाईंच्या ‘माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमधी उगवत’ या ओवींचा दाखला त्यांनी दिला. ज्ञान पुस्तकात नाही तर जीवनात आलेल्या अनुभवात, निरीक्षणातून विकसीत होत जाते अशा साहित्यातून बहिणाई या ज्ञानी, विचारवंत ठरतात असे प्रतिपादन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.
अनुभूती निवासी स्कूलचे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेखक, साहित्यिकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे साहित्य अभ्यासले. यावेळी त्यांना मराठी शिक्षक हर्षल पाटील यांनी मार्गदर्शन केले. विजय जैन यांनी बहिणाईंच्या साहित्यावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी बहिणाईंच्या कविता सादर केला. मनपा शिक्षिका पुष्पा साळवे यांनी बहिणाईंवर स्व:लिखीत कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना ज्ञानेश्वर शेंडे यांनी केली. अशोक चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेंद्र पाटील, ललित हिवाळे, प्रशांत पाटील, दिनेश थोरवे यांनी सहकार्य केले.

जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

जळगाव दि. 24 प्रतिनिधी –  जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आंतर जिल्हा महिला क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन शनिवार, दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता जैन स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश स्कूल D Mart जवळ) होणार आहे. ज्या महिला खेळाडूंचा जन्म १ सप्टेंबर २००३ रोजी वा त्यानंतर झाला आहे अश्या खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र आहेत. अशा सर्व पात्र महिला खेळाडूंनी आपल्या मूळ जन्म दाखल्या व आधार कार्डसह उपस्थित रहावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.

UPI पेमेंट वर सरकार पैसे आकारणार का? अर्थ मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

केंद्र सरकारने UPI पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारल्याचा दावा करणाऱ्या अहवालांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रविवारी ट्विटच्या मालिकेत, वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) हे “डिजिटल पब्लिक गुड” आहे आणि UPI सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारण्याचा विचार नाही. ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की वसुलीचा खर्च इतर मार्गांनी भागवावा लागेल आणि सरकारने देशातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टमसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे. मंत्रालयाने पुढे जोडले की डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी यावर्षी मदत जाहीर केली.

UPI पेमेंट वर सरकार पैसे आकारणार? अर्थ मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

शून्य-एमडीआर व्यवस्था मागे घेण्यासाठी सरकारला त्याच्या शून्य-एमडीआर (व्यापारी सवलत दर) धोरणाकडे पुन्हा पाहण्याची मागणी केली, जी RuPay आणि UPI व्यवहारांवर अनुपस्थित राहते. एमडीआरच्या स्वरूपात डिजिटल पेमेंटवर आकारल्या जाणार्‍या शुल्काद्वारे, सेवा प्रदाते असा युक्तिवाद करतात की ते सिस्टम सुधारू शकतात.
देशातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टमसाठी उद्योग संस्था असलेल्या पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) देखील या वर्षाच्या सुरुवातीला सरकारला पत्र लिहिले होते, जे केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या सादरीकरणापूर्वी आहे, . UPI आणि Rupay डेबिट कार्डसाठी. सध्या, व्हिसा आणि मास्टरकार्ड डेबिट कार्ड्स एमडीआर (०.४ ते ०.९ टक्के) आकर्षित करतात जे जारीकर्त्या बँका आणि अधिग्रहणकर्त्यांद्वारे सामायिक केले जातात.

UPI च्या संदर्भात, RBI च्या पेपरने व्हिसा आणि मास्टरकार्ड डेबिटपेक्षा वेगळे वागले पाहिजे का यावर अभिप्राय मागवला. सरकारने ट्विटमध्ये म्हटले आहे की ते “आर्थिक आणि वापरकर्ता-अनुकूल” असलेल्या डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देते.

Finland PM सना मरिन यांचा वायरल विडिओ

बरेच लोक मोठ्या सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींना फॉलो करतात आणि त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यास देखील आवडतात. पण नुकताच एका देशाच्या पंतप्रधानांचा असा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा आहे. हा व्हिडिओ लोकांसाठी नसून केवळ त्यांच्या मित्रांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मूलभूत गुंतवणूक शिका | महागाईवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग (आणि श्रीमंत व्हा)

महागाई ही किमतीत वाढ होण्याची एक व्यापक आर्थिक घटना आहे जी थेट तुमच्या वित्त आणि पैशावर परिणाम करते. हे केवळ तुमची खर्च करण्याची क्षमता मर्यादित करत नाही तर तुमचे परतावा देखील खाऊन टाकते.

तुमच्या गुंतवणुकीतील परतावा महागाईच्या किमान एक पाऊल पुढे असला पाहिजे. अन्यथा, तुमचे पैसे कमी होतील. आणि इक्विटी हा महागाईवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. या प्रकरणात, आपण इक्विटी गुंतवणूक आपल्याला महागाईवर मात करण्यास आणि चांगला नफा मिळविण्यात कशी मदत करू शकते ते पाहू.

वित्त जगात, इक्विटी म्हणजे मालमत्तेची मालकी होय. उदाहरणार्थ, कल्पना करा की एखाद्या कंपनीकडे 1 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या खरेदीसाठी निधी देण्यासाठी, मालकाने स्वतःच्या भांडवलापैकी 50 लाख रुपये दिले, तर कंपनीने उर्वरित 50 लाख रुपये बँकेकडून कर्ज घेतले. परिणामी, मालकाची इक्विटी 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. जेव्हा तुम्ही कंपनीच्या इक्विटीमध्ये शेअर खरेदी करता, तेव्हा तुम्ही प्रभावीपणे त्या व्यवसायाचे अंश-मालक बनता.

  • महागाई समजून घेणे आणि त्यावर मात करण्याचे मार्ग

महागाई ही किमतीत वाढ होण्याची एक व्यापक आर्थिक घटना आहे जी थेट तुमच्या वित्त आणि पैशावर परिणाम करते. हे केवळ तुमची खर्च करण्याची क्षमता मर्यादित करत नाही तर तुमचे परतावा देखील खाऊन टाकते. सध्याच्या परिस्थितीत, मुदत ठेवी (FDs) सारख्या निश्चित उत्पन्न गुंतवणूक साधनांवर किंमती वाढीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो कारण महागाईचा दर अशा गुंतवणुकीद्वारे प्रदान केलेल्या परताव्यापेक्षा समान किंवा जास्त असू शकतो.

दुसऱ्या शब्दांत, जर तुमचा राहण्याचा खर्च 7 टक्क्यांनी वाढला आणि तुमची गुंतवणूक तुम्हाला फक्त 5 टक्के देत असेल, तर तुम्ही पैसे गमावत आहात. सरकारी रोखे आणि बचत खाती यासारख्या इतर निश्चित उत्पन्न साधनांप्रमाणेच ही कथा आहे, जे सर्व काही वेळा महागाईपेक्षा कमी परतावा देतात. गुंतवणूकदाराने अशा गुंतवणुकीची निवड केली पाहिजे जी महागाई दरावर मात करू शकतील.

 

  • इक्विटी- महागाई विरुद्ध एक शस्त्र

गेल्या 30 वर्षांमध्ये सेन्सेक्स सुमारे 15 टक्के वार्षिक दराने वाढला आहे. याचे कारण म्हणजे कंपन्यांचे उत्पन्न जवळपास त्याच गतीने वाढले आहे. दुसरीकडे, बहुतेक एफडी आणि इतर निश्चित उत्पन्न साधने 4-6 टक्के परतावा देतात. त्यामुळे एफडीपेक्षा इक्विटी अधिक चांगल्या आहेत, असे समजण्यासारखे आहे, बरोबर? पण थांब. एकूण मालमत्ता वाटप, जोखीम सहनशीलता आणि आर्थिक उद्दिष्टे यांसारख्या घटकांचा विचार करून इक्विटी गुंतवणूक करावी.

उदाहरणार्थ, इक्विटी दीर्घ मुदतीसाठी उच्च परतावा देऊ शकते, परंतु बाजारातील अस्थिरतेमुळे ते अल्पकालीन उद्दिष्टांसाठी योग्य पर्याय असू शकत नाहीत.

  • इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
  • भांडवली नफा आणि लाभांश

दीर्घकालीन, कंपनीच्या शेअर्सची किंमत तिच्या नफ्यात वाढ दर्शवते. नफा वाढला तर शेअरची किंमतही वाढते. शेअर्सच्या किमतीत वाढ होण्याला भांडवली नफा म्हणतात. इतकेच नाही तर कंपन्या भागधारकांना लाभांशाद्वारे बक्षीस देतात.

  • नियंत्रण

एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून, तुम्हाला अंश-मालकी मिळते. दुसऱ्या शब्दांत, तुम्ही काही महत्त्वाच्या निर्णयांवर मत देण्याच्या अधिकारासह कंपनीचे भागधारक बनता.

  • तरलता

सोने आणि रिअल इस्टेट सारख्या इतर काही मालमत्ता वर्गांप्रमाणे, तुम्ही स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर तुमची इक्विटी होल्डिंग्स सहज विकू शकता.

  • बोनस शेअर्स

अनेक कंपन्या विशेष प्रसंगी त्यांच्या विद्यमान भागधारकांना बोनस शेअर्स ऑफर करतात. हे भागधारकांना मोफत दिलेले इक्विटी शेअर्स आहेत.

  • स्टॉक स्प्लिट

काही कंपन्या त्यांच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य विभाजित करतात. उदाहरणार्थ, रु. 10 चे दर्शनी मूल्य असलेला स्टॉक प्रत्येकी रु 1 च्या दर्शनी मूल्याच्या 10 शेअर्समध्ये किंवा प्रत्येकी रु 5 च्या दर्शनी मूल्याच्या दोन शेअर्समध्ये विभागला जाऊ शकतो. या सरावामुळे शेअर्सची किंमत कमी होते, परंतु तुमच्या एकूण होल्डिंग्सचे मूल्य अपरिवर्तित राहते कारण तुमच्याकडे आता जास्त शेअर्स असतील. स्टॉक स्प्लिटमुळे शेअर्सची तरलता वाढते, जो इक्विटी गुंतवणुकीचा आणखी एक फायदा आहे.

  • इक्विटीमध्ये सुरक्षितपणे गुंतवणूक कशी करावी

आता आम्ही चलनवाढ म्हणजे काय आणि इक्विटी गुंतवणूक तुम्हाला त्यावर मात करण्यास कशी मदत करू शकते याबद्दल चर्चा केली आहे, इक्विटीमध्ये सुरक्षितपणे गुंतवणूक करण्याबद्दल चर्चा करण्याची वेळ आली आहे. त्याबद्दल कसे जायचे ते येथे आहे:

– शेअर मार्केटमध्ये जाण्यापूर्वी पुरेसे संशोधन आणि विश्लेषण करा.

– ट्रेडिंग/गुंतवणुकीसाठी डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडा.
– तुम्ही गुंतवलेल्या कंपन्यांच्या ताळेबंदाचे आणि कॅशफ्लो स्टेटमेंटचे नियमितपणे विश्लेषण करा. या सर्व कंपन्यांच्या नफा आणि तोटा (P&L) खात्यांवर लक्ष ठेवा.

– तुमचा पोर्टफोलिओ विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांसह वैविध्यपूर्ण असल्याची खात्री करा. तसेच, तुमच्या पोर्टफोलिओचा नियमितपणे मागोवा घ्या आणि एकाच कंपनीत जास्त पैसे टाकू नका.

– अल्पावधीत इक्विटी अस्थिर असू शकतात. त्यामुळे खरेदी-विक्रीचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्याकडे वेळ, कल किंवा वित्तविषयक योग्य समज नसल्यास, आर्थिक सल्लागाराची मदत घेणे अर्थपूर्ण आहे.

 

 

जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

जळगाव दि. 19 – जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा केला गेला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन व छायाचित्रकार राजेंद्र माळी यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे प्रतिनिधीक पूजन करण्यात आले. या प्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी देखील सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.

जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास राजेंद्र माळी, तुषार बुंदे, हिमांशू पटेल, निवृत्ती वाघ, किशोर कुळकर्णी, सुनील दांडगे, उदय महाजन, अशोक चौधरी, अनिल नाईक मुरलीधर बडगुजर आणि आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे विद्यमान चेअरमन अशोक जैन व जैन परिवाराने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. कंपनीतील सर्व छायाचित्रकार एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करत असतात.

महत्त्वाच्या गोष्टी छायांकीत करण्यासाठी कॅमेरा अत्यंत उपयुक्त साधन आहे. जैन कंपनीच्या इतिहासात देखील विविध कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र जणू दस्तावेजाचे काम करत आहेत. कॅमेरा म्हणजे तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व आजही अबाधित राहिलेले आहे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईल अशा प्रवासाला सुरुवात झाली. या बदलत्‍या काळात छायाचित्र काढण्‍यासाठी कॅमेरा असायलाचं हवा असे नाही तर आज प्रत्‍येकांकडे आपला स्‍मार्टफोन आहे. त्‍याच्‍या एका क्‍लिकवर आपण छायाचित्र आपल्याकडे काढून घेऊ शकतो. जगभरातल्या छायाचित्रकारांना प्रेरणा देणारा दिवस असून त्या निमित्ताने उदय महाजन, विकास मल्हारा यांनी शुभेच्छा दिल्या.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version