बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

जळगाव दि.30 – केंद्रीय विद्यालयाच्या 19 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर रश्मी रविंद्र कमोद या खेळाडूंची निवड झाली आहे. पुणे येथील स्पोर्टस् कॉम्पलेक्स (डीआरडीओ) येथे दि. 22 ते 23 दरम्यान केंद्रीय विद्यालयाच्या बॅडमिंटन स्पर्धेची विभागीयस्तरावरील विजेत्यांची स्पर्धा झाली. यामध्ये रश्मी कमोदने आपल्या आक्रमक खेळ दाखवित विजश्री खेचून आणली. या विजयानंतर ची केंद्रीय विद्यालयाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

केंद्रिय विद्यालयाच्या नाशिक क्लस्टर बॅडमिंटन स्पर्धा-2022 या स्पर्धेत 19 वर्षाआतील मुलींच्या गटात सिंगल प्रकारमध्ये निवड झाली होती. त्यात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, जालना या जिल्हातील खेळाडूंपैकी रश्मी कमोद ची पुणे विभागीय स्तरावर यशस्वी निवड झाली होती. 19 वर्ष वयोगटात विभागीय स्तरावर गोवा व महाराष्ट्र मिळून 60 च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीयस्तरावर निवड झाल्याने पुढील वाटचालीसाठी प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, क्रीडा शिक्षक पंकज वराडे, प्रशिक्षक किशोर सिंह, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, समन्वयक अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह तिची आई सौ. स्नेहल, वडील रविंद्र कमोद यांची शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशाबद्दल बॅडमिंटन क्षेत्रातील मान्यवरांनी कौतूक केले आहे

शेअर बाजार बुधवारी बंद राहणार का?

गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी, ३१ ऑगस्ट रोजी देशांतर्गत शेअर बाजार बंद राहतील. चलन आणि डेरिव्हेटिव्ह बाजार देखील व्यापारासाठी बंद राहतील. अधिकृत बीएसई वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या स्टॉक मार्केट हॉलिडे 2022 च्या यादीनुसार बुधवारी इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि SLB सेगमेंटमध्ये कोणतेही काम होणार नाही.

शिवाय, कमोडिटी मार्केट देखील सकाळच्या सत्रात सुट्टी पाळतील. मात्र, बुधवारी संध्याकाळच्या सत्रात कमोडिटी मार्केटमध्ये व्यवहार पुन्हा सुरू होतील.

मंगळवारी भारतीय इक्विटी निर्देशांक मोठ्या प्रमाणावर स्थिरावले.

30-पॅक सेन्सेक्स 1,564.45 अंकांनी वाढून 59,537.09 वर बंद झाला. निफ्टी50 ने सत्राचा शेवट 17,750 च्या वर आरामात केला. या महिन्यात निफ्टी 3.4 टक्क्यांनी वधारला आहे.

विद्यापीठाच्या भरमसाठ शुल्कवाडीच्या विरोधात अभाविप चे आंदोलन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठाने वाढविलेल्या भरमसाठ शुल्कावाडीच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. व संपूर्ण विद्यापीठ भारत माता की जय , वंदे मातरम , कुलगुरू हमे पडणे,दो देश को आगे बडणे दो अश्या घोषणानी गजबजले होते. त्या वेळी मोठया संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. प्रसंगी प्रांत मंत्री कु अंकिता पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले त्या म्हणाल्या की उत्तर महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या लाखो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्रोत म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची ओळख आहे.तरी अशी अचानक इतक्या प्रमाणात शुल्क वाढ करणे चुकीचे असून हा निर्णय विद्यापीठाने तात्काळ मागे घ्यावा.

https://youtu.be/t5AIap1ddNU

विद्यापीठामार्फत सुमारे 40% ते 73% पर्यंत शुल्क वाढ करण्यात आलेली आहे. या शुल्क वाढीचा फटका विभागातील गरीब विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या मुलांना बसणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही अन्यायकारक शुल्कवाढ तातडीने कमी करावी व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागमी अ भा वि प ने मा.कुलगुरू महोदयांन कडे केली .प्रसंगी विभाग संयोजक कल्पेश सोनवणे,प्रांत शोध कार्य संयोजक अश्विन सुरवाडे , जिल्हा संयोजक मयूर माळी , महानगर मंत्री रितेश महाजन , चैतन्य बोरसे , नितेश चौधरी, भूमिका कानडे,पवन बावस्कर , हांसराज चौधरी, चेतन नेमाडे, प्रीतम निकम , वैभवि ढिवरे,मोनाली जैन मनीष चव्हाण योगेश अहिरे , आदित्य चौधरी व संपूर्ण विभागातून कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

जळगाव दि.29 प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय अन्नधान्य साठवणूक विभागातर्फे व गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास 200 च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा उपस्थितीत सर्वांनी घेतली.
जैवविविधता जपता यावी यासाठी हरित शहर ही संकल्पना घेऊन गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सहकार्यातून वृक्षसंवर्धनाचा एक सृजनशील उपक्रम सूरू केला आहे. यात ठिकठिकाणी झाडे लावून त्याचे संवर्धनाची जबाबदारी लोकसहभागातून जळगावकर घेत आहे. वृक्षारोपणाचा उपक्रमात महाराष्ट्र राज्य वखार महामंडाळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभागाचे साठा अधिक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) के. एन. पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. राज्य वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, शालीग्राम राणे, देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, मराठी प्रतिष्ठानचे विजयकुमार वाणी, शासकीय अन्नधान्य साठवणूक विभागाचे ज्यूनिअर साठा अधिक्षक एम. आर. ढाके, भांडारपाल ए. आर. मेढे, अव्वल महसुल कारकून अयाज शेख उपस्थित होते.
यावेळी सुधीर पाटील यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमाविषयी सांगितले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षलागवडीसह संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी विजयकुमार वाणी यांनी आपल्या जीवनात झाडांना खूप महत्त्व असून ऑक्सिजन देणारे झाडे किती मौल्यवान असतात हे सांगत ती जोपासली गेली पाहिजे असे आवाहन केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनसह जैन इरिगेशनतर्फे झाडे लावण्यासाठी सहकार्य केले जाईल असे अनिल जोशी म्हणाले. यशस्वीतेसाठी शासकीय अन्नधान्य विभागातील निलेश पाटील, योगेश पाटील, धनराज बाविस्कर, विकास चौधरी, आकाश चौधरी, सतिष पाटील, पवन चौधरी यांनी सहकार्य केले.

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक सामन्यात फखर जमानने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने बाबर, आवेश, कार्तिक चकीत

फखर जमान कदाचित बॅटने प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला असेल, परंतु भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या आशिया चषक 2022 च्या सामन्यात त्याच्या हावभावाने ऑनलाइन अनेकांची मने जिंकली आहेत. डावखुरा फलंदाज 6 चेंडूत 10 धावांवर बाद झाला कारण पॉवरप्ले षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 43/2 अशी झाली. सहाव्या षटकातील दुसऱ्या शेवटच्या चेंडूत त्याला आवेश खानने काढून टाकले, कारण पॉईंट क्षेत्ररक्षकावर वेगवान गोलंदाजाने लहान चेंडूला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करताना तो मागे झेलबाद झाला.

https://youtu.be/7e8_Bucp1VA

https://youtu.be/wb30ihSbmlA

 

तथापि, फखरने दाखवलेला क्रीडाभावना उल्लेखनीय होता, ज्याने क्षेत्ररक्षक आणि पंच या दोघांनाही धार वगळल्याचे दिसत असताना चालण्याचा निर्णय घेतला.

फखर ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा त्याच्या हावभावाने डगआउटमध्ये भारतीय क्षेत्ररक्षक आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दोघेही आश्चर्यचकित झाले. आवेश आणि कार्तिकने हावभाव केला की त्यांना कोणताही आवाज ऐकू येत नाही, तर बॅटरच्या हावभावाकडे बाबर पूर्णपणे अवाक दिसला. त्याचा साथीदार मोहम्मद रिझवानही वर गेला आणि त्याच्याशी बोलला आणि तो पुन्हा डगआउटकडे जात होता.

बेकायदेशीर: पत्त्याच्या गठ्ठाप्रमाणे खाली पाडले TWIN TOWER। बघा व्हिडीओ

आज दुपारी 2:30 वाजता नियंत्रित इम्प्लोशन तंत्राचा वापर करून सुपरटेक लिमिटेड – एपेक्स आणि सेयान – ने बांधलेल्या बेकायदेशीर टॉवर्सना धूळ आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कमी करण्यासाठी फक्त चौदा सेकंद लागले. नोएडाच्या सेक्टर 93 ए मध्ये. दोन टॉवर्स, भारतातील सर्वात उंच इमारतींमध्ये 915 फ्लॅट, 21 दुकाने आणि 2 तळघर होते, जे दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा उंच होते. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे दुपारी 2.15 च्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आणि तो 2.45 वाजेपर्यंत तोडण्याच्या मोहिमेसाठी बंद राहील. बेकायदेशीर टॉवर्स बांधणाऱ्या सुपरटेक लिमिटेडचे अध्यक्ष आर के अरोरा म्हणाले की, इमारतीच्या आराखड्यात कोणतेही विचलन झाले नाही आणि ते पाडण्याचे आदेश दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो.

एटीएस ग्रीन्स व्हिलेज आणि एमराल्ड कोर्ट – जवळपासच्या सोसायटीमधील सुमारे 5,000 रहिवाशांनी त्यांचे फ्लॅट पाडण्यासाठी रिकामे केले. दक्षिण आफ्रिकेच्या जेटसोबत भागीदारी करणाऱ्या मुंबईस्थित एडिफिस इंजिनीअरिंगने नियंत्रित इम्प्लोजन तंत्राचा वापर करून स्फोट घडवून आणले.
विध्वंसाच्या ठिकाणी आणि नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेच्या आसपास सुमारे 500 पोलीस आणि वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नोएडामध्ये ड्रोनसाठी नो-फ्लाय झोन लागू करण्यात आला आहे. स्फोटाच्या वरील एक सागरी मैलाच्या त्रिज्येतील हवेची जागा विध्वंसाच्या काळात उड्डाणांसाठी अनुपलब्ध करण्यात आली होती.

यशवंतनगरमधील श्री. गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव दि. 27 –रामानंदनगर स्टाॕपजवळील यशवंतनगरमधील श्री. गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी नुकतीच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी सागर गलु चौधरी, उपाध्यक्षपदी ऋषिकेश बालकृष्ण पाटील, सचिवपदी पराग रोहिदास राणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी श्री. गणेश मित्र मंडळाचे अकरावे वर्ष असून आठ फुट उंच गणरायाची मूर्ति स्थापन केली जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान सामाजिक संदेशात्मक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजनही मंडळातर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये वृक्षसंवर्धन व बेटी बचाव बेटी पढाओ यावर संदेशात्मक आरस करण्याचा मानस मंडळाच्या कार्यकारिणीत व्यक्त करण्यात आला आहे.

Sagar Chaudhari
Mukesh Borole
Parag Rane
Rushikesh Patil

नविन कार्यकारिणीमध्ये सल्लागारपदी मुकेश तुकाराम बोरोले, खजिनदार म्हणून परेश नारखेडे तर सदस्य म्हणून भुषण नेहेते, अंकित चव्हाण, चेतन नारखेडे, निखील चव्हाण, मनिष बोंडे, देवेश अकोलकर, वैभव अकोलकर, योगेश चौधरी, सिद्धेश कासार, पवन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण

जळगाव दि.27 जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या नविन जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात गांधी रिर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक(गृह) संदीप गावित, राखीव पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी श्री. विजय मोहरील, श्री. देवेंद्र पाटील, कवायत निर्देशक सोपान पाटील यांच्यासह सहकारी उपस्थितीत होते. गुलमोहर, बेहळा, टिकोमा, बकूळ, निंब, जांभूळ अशी 80 च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम महत्त्वाचा असून झाडे जगविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे असे विचार यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी व्यक्त केले.

12 वर्षाखालील जैन चँलेंज आंतरशालेय मुली व मुलांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा – 2022

दुर्गेश्वरी योगेश धोंगडे आणि पियुष भुईकर अजिंक्य पुर्वी भावसार आणि ऋतिक अग्रवाल उपविजेता

जळगाव दि.27– जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेत मुलींच्या गटात विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने कुणालाही एकही गुण न मिळू देता एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरीत अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलच्या पुर्वी भावसार हिचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. तसेच मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलचा पियुष भुईकर याने रायसोनी पब्लिक स्कूलच्या ऋतिक अग्रवालचा पराभव करून विजेते पद प्राप्त केले. मुलींमध्ये् विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या श्रावणी मोरे आणि पुर्वा भुतळा यांनी तसेच मुलांमध्ये अॅंग्लो उर्दू हायस्कूलचा माज पठाण आणि रायसोनी पब्लिक स्कूलचा महर्षी जोशी यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. ह्या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स तर्फे चषक, प्रमाणपत्र, कॅरमचे स्ट्राईकर व सोंगट्या व्यापारी महामंडाळाचे उपाध्यक तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्य युसूफ मकरा आणि जैन स्पोर्टस् अॅकडमीचे मुख्य प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद मोहसीन यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून आयशा खान, सय्यद जुबेर,योगेश धोंगडे यांनी काम यशस्वीतेसाठी सहकार्य केले
फोटो कॅप्शन सर्व विजयी उपविजयी खेळाडूंसोबत डावीकडून कोमल तायडे, सय्यद मोहसीन, युसूफ मकरा, अरविंद देशपांडे, संजय चव्हाण, शहेबाज शेख

जॉईन Trading Buzz
Exit mobile version