मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

जळगाव/मुंबई दि. १६ प्रतिनिधी – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने राऊट मोबाईल लि.संघावर विजय मिळवित क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कॉर्पोरेट क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजन मध्ये रोमांचकारी सामान्यात विजय मिळविला. जैन इरिगेशनचा संघ ‘ए’ डिव्हीजन मध्ये मागील वर्षी टाईम्स शिल्ड स्पर्धेचा विजयी संघ असून कॉरपोरेट स्पर्धा जिंकून जैन इरिगेशनच्या संघाने कॉर्पोरेट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे.

मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामान्यात नाणेफेक राऊट मोबाईल लि. ने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या जैन इरिगेशनच्या संघाने निर्धारित २० षटकात सहा फलंदाजांच्या मोबदल्यात २१८ धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये जय बिस्टाने ५४ चेंडूमध्ये ८५ धावा कुठल्यात. यात सहा चौकार व पाच षटकारांचा आतषबाजी होती. त्याला शाश्वत जगताप ने चांगली साथ दिली. दोघांना प्रथम विकेट साठी ८.१ ओव्हर मध्ये ११३ धावांची भागिदारी रचली. त्याला आयुष झिमरने २१ चेंडूमध्ये ४५ धावा करत उत्कृष्ट साथ दिली. आयुष झिमरे ने तीन चौकार व चार षटकार खेचले. २१८ धावांचे लक्ष्य घेतलेल्या राऊंट मोबाईल लि.चा संघ  निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात २०८ धावा करु शकला.  यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. संघातील गोलंदाज प्रशांत सोलंकी यांने ३७ धावांच्या मोबादल्यात तीन फलंदाजांना महत्त्वाच्या वेळी बाद केले. जगदीश झोपे यानेसुद्धा ३४ धावांत तीन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.

तत्पूर्वी सेमिफायनला मुंबई कस्टमने निर्धारित २० षटकांमध्ये केलेल्या २४४ धावांचा यशस्वी पाठलाग करत अवघ्या १८ ओव्हर मध्ये २४७ धावा करत आठ विकेटने विजय मिळविला होता. यामध्ये जय बिस्टा याने नाबाद १३५ रनांची खेळी विक्रमी ठरली. यात शाश्वत जगताप ४४ (२१ चेंडू), साईराज पाटील ३४ (१७ चेंडू), सुरज शिंदे २९ (१२ चेंडू) योगदान होते. तर गोलंदाजीमध्ये जगदीश झोपे व सोहम याने प्रत्येकी एक विकेट घेऊन विजयामध्ये मोलाची साथ दिली.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघात शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, जय बिस्टा, साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांम्वेकर, आयुष झिमरे या खेळाडूंचा सहभाग होता.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, मुंबई क्रिकेट संघाचे संयोजक मयंक पारिख, जैन स्पोर्टस अॅकडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

‘एपिक’ फोटो प्रदर्शनाची सुरवात – चित्रांचा संग्रह जळगावकरांसाठी प्रेरणादायी!

जळगाव दि. १६ प्रतिनिधी – जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो  प्रदर्शन पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये आज दि. १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत आयोजीत केले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन फीत सोडून व दीपप्रज्वलनाद्वारे झाले. याप्रसंगी शकुंतला चावला, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, तुषार बुंदे, सौ. अश्विनी बुंदे, जैन इरिगेशनचे जगदिश चावला, योगेश संधानशिवे, मायरा लोटवाला यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या प्रदर्शनित मायरा लोटवाला यांच्या अनोख्या दोन म्युरल पेटिंग बघता येतील.

 या प्रदर्शनातन ४१ समाविष्ट छायाचित्रांमध्ये दृष्य कथा, बोलक्या गोष्टी, साजरे होणारे उत्सव आदी विविध विषयांचा समावेश आहे. जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या सोबतचे क्षण, आठवणी, उत्कृष्ट नमुन्याद्वारे प्रदर्शनात बघता येईल. प्रदर्शित केलेल्या चित्रांचा संग्रह प्रेरणादायी आणि मोहक आहे. यामध्ये तुषार बुंदे विश्वासाने, “जग छान गोष्टींनी भरलेले आहे; ते टिपण्यासाठी तुम्हाला फक्त दृष्टी हवी आहे.” सह्याद्रीच्या खडबडीत निसर्गचित्रांपासून ते जैवविविधतेवरच्या पुस्तकापर्यंत सर्व काही त्यांच्या लेन्सने पाहिले आहे. आयुष्याने त्याला वेगवेगळ्या दिशेने खेचले असले तरी, फोटोग्राफीची त्याची आवड मोबाईल कॅमेऱ्यांच्या साधेपणामुळे जोपासली गेली. हृदयस्पर्शी दृष्टींसह सामान्य क्षणांना दृश्य कथांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.

“एक चित्र स्मृती बनते.” क्षणभंगुर क्षणांना भावनांमध्ये बदलून, तो जे पाहतो ते जगाला दाखवण्यासाठी जगदीश चावला यांने आपले जीवन समर्पित केले आहे. शब्द जरी मनाशी बोलत असले तरी जगदीशचे फोटो आत्म्याशी बोलतात, ज्या भावनांकडे जास्त दुर्लक्ष केले जाते. त्याचे कार्य आपल्याला केवळ चित्रच नव्हे तर त्यामागील हृदयाचे ठोके पाहण्यासाठी आमंत्रित करते. सर्वांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत खुले आहे. कलात्मक अभिव्यक्ती या दोन्ही कलाकारांच्या भावनांमधून जळगाकरांनी प्रदर्शनी पाहता येईल. ज्येष्ठ छायाचित्रकार ईश्वर राणा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी मनिष शहा, देवेंद्र पाटील, योगेश सोनार, दिनेश थोरवे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. नितीन चोपडा यांनी सुत्रसंचालन  केले.

सायबर घोटाळ्यांपासून सावध राहा! तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी या टिप्स नक्की वाचा

दिवाळीच्या सणात खरेदीची लगबग असते, आणि याच संधीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार सक्रिय होतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, मागील वर्षी 11 लाखांपेक्षा अधिक सायबर फसवणुकीच्या घटना नोंदवल्या गेल्या.
विशेषतः वृद्ध लोकांना लक्ष्य करणाऱ्या या चार प्रकारच्या घोटाळ्यांबद्दल जागरूक राहणे अत्यावश्यक आहे:

1. ग्राहक समर्थन घोटाळा

  • फसवणूक करणारे बनावट ग्राहक समर्थन क्रमांक तयार करतात.
  • लोक चुकीच्या क्रमांकावर कॉल करून त्यांना स्क्रीन-शेअरिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगतात.
  • याचा वापर करून ते पीडितांच्या डिव्हाइसवर नियंत्रण मिळवतात.

2. आभासी अटक घोटाळा

  • फसवणूक करणारे स्वतःला पोलिस, ईडी किंवा कस्टम अधिकारी असल्याचे सांगतात.
  • पीडितावर खोटा गुन्हा लादून त्यांना पैसे देण्यासाठी धमकावतात.

3. आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) घोटाळा

  • गुन्हेगार पीडितांचा आधार बायोमेट्रिक डेटा चोरून त्याचा वापर बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी करतात.
  • हे फसवणूक प्रामुख्याने ग्रामीण भागात जास्त होते.

4. सोशल मीडिया घोटाळे

  • बनावट खाती तयार करून, फसवणूक करणारे पीडितांच्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना आर्थिक मदत मागतात.
  • ओळखीचा मेसेज वाटल्यामुळे लोक सहजपणे फसवले जातात.

घोटाळ्यांपासून बचाव करण्यासाठी या 5 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

  1. आधार बायोमेट्रिक्स लॉक ठेवा:
    • UIDAI च्या myaadhaar पोर्टलवर जाऊन तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करा. वापर झाल्यानंतर पुन्हा लॉक करायला विसरू नका.
  2. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळा:
    • कोणी ॲप डाउनलोड करण्यास किंवा डिव्हाइसवर सॉफ्टवेअर स्थापित करण्यास सांगत असल्यास, आधी तज्ञाचा सल्ला घ्या.
  3. QR कोड वापर:
    • पैसे पाठवण्यासाठी QR कोड स्कॅन केला जातो, पण पैसे मिळवण्यासाठी कधीच नाही. ही मूलभूत गोष्ट लक्षात ठेवा.
  4. चुकीने पैसे ट्रान्सफर झाले तरी सावधगिरी बाळगा:
    • जर कोणी जास्त पैसे पाठवले असल्याचे सांगितले, तर तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नका.
  5. लिंक किंवा संदेश तपासा:
    • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्याआधी शंका येत असल्यास ती टाळा.

जर सायबर फसवणूक झाली तर:

  • 1930 या क्रमांकावर कॉल करा आणि ताबडतोब पोलिसांना माहिती द्या.
    तुमच्या सावधगिरीमुळे तुमचे आर्थिक नुकसान टळू शकते!

व्हॉट्सॲपचे नवीन वैशिष्ट्य: आता अपूर्ण मेसेज्स व्यवस्थित ठेवता येणार!

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आता एक नवीन वैशिष्ट्य घेऊन येत आहे – ‘ड्राफ्ट’ (मसुदा) फीचर, जे वापरकर्त्यांना अपूर्ण राहिलेले मेसेज पूर्ण करण्यास मदत करेल. यामुळे मेसेज लिहिताना विसरून गेलेले किंवा अर्धवट राहिलेले चॅट्स परत मिळवणे सोपे होणार आहे.

हे फीचर कसे काम करेल?

  • जर तुम्ही एखादा मेसेज लिहायला सुरुवात केली आणि तो अपूर्ण राहिला, तर WhatsApp त्यावर “ड्राफ्ट” (मसुदा) असा सूचक दर्शवेल.
  • याशिवाय, तो चॅट इनबॉक्सच्या शीर्षस्थानी हलवेल, म्हणजे तुम्हाला तो शोधण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही.
  • हे फीचर अशा परिस्थितीत खूप उपयुक्त ठरेल, जिथे मेसेज लिहिताना तुमचे लक्ष विचलित होते किंवा तो मेसेज पाठवायला विसर पडतो.

फीचरची घोषणा

WhatsApp चे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या चॅनेलवर या वैशिष्ट्याची घोषणा करताना सांगितले, “आम्हा सर्वांना या फीचरची गरज होती.
हे वैशिष्ट्य आता Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी जगभरात उपलब्ध झाले आहे.

WhatsApp चे इतर उपयुक्त फीचर्स

WhatsApp ने याआधीही अनेक उपयुक्त फीचर्स आणले आहेत:

  1. लिस्ट फीचर: यामुळे इनबॉक्स व्यवस्थित ठेवण्यासाठी कुटुंब, काम किंवा मित्रांसाठी सानुकूल फिल्टर्स तयार करता येतात. निवडलेल्या वर्गवारीनुसार फक्त त्या संपर्कांचे मेसेज दिसतात.
  2. चॅट फिल्टर: न वाचलेले मेसेज, गट चॅट्स किंवा सानुकूल फिल्टर्ससाठी प्रीसेट पर्याय उपलब्ध आहेत.
  3. “सर्व” टॅब: इनबॉक्समधील सर्व चॅट्स एका ठिकाणी पाहण्याचा पर्याय.

सूचना: WhatsApp च्या या नव्या फीचर्सचा आनंद घ्या आणि तुमच्या चॅट अनुभवाला अजून सोयीस्कर बनवा! 😊

एका वर्षात 16 पट वाढलेला स्टॉक, कंपनीची स्टॉक स्प्लिटची मोठी घोषणा!

डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने त्यांच्या स्टॉकच्या विभाजनाबाबत (Stock Split) महत्वाची घोषणा केली आहे. ही कंपनी पॉवर केबल बनवणारी एक आघाडीची कंपनी आहे. काही वर्षांपूर्वी या कंपनीचा स्टॉक पेनी स्टॉक (खूप कमी किंमतीचा) होता, पण आता गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवून हा मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे.

कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला कळवले की 3 डिसेंबर 2024 ही तारीख स्टॉक स्प्लिटसाठी निश्चित केली आहे. यानंतर शेअरची किंमत कमी होईल, पण भागधारकांच्या गुंतवणुकीच्या एकूण मूल्यावर काहीही परिणाम होणार नाही.

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय?

स्टॉक स्प्लिट म्हणजे कंपनी आपल्या शेअर्सना लहान भागांमध्ये विभागते. त्यामुळे प्रत्येक शेअरची किंमत कमी होते, पण गुंतवणूकदारांकडे असलेल्या शेअर्सची संख्या वाढते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 1 शेअर असेल आणि त्याचे स्प्लिट 1:10 असेल, तर तुम्हाला 10 शेअर्स मिळतील. मात्र, त्यांची एकूण किंमत आधीइतकीच राहील.

या कंपनीचा प्रवास

डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रवास खरंच खूप लक्षवेधी आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, हा स्टॉक 10 रुपयांच्या खाली व्यवहार करत होता. आज तो 1440 रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षात या शेअरने 1500 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांच्या पैशात 16 पट वाढ झाली आहे. 2024 मध्ये आतापर्यंत (11 महिन्यांत) या शेअरने 800 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

सध्याची स्थिती

गेल्या एका महिन्यात स्टॉकची किंमत 9 टक्क्यांनी कमी झाली असून तो 1936 रुपयांच्या उच्चतम पातळीवरून 1440 रुपयांपर्यंत आला आहे. तरीही, या मल्टीबॅगर स्टॉककडे गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे.


सूचना: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. स्टॉक मार्केटमध्ये धोका असतो, त्यामुळे माहिती आणि अभ्यास करूनच निर्णय घ्या.

“इपिक” फोटो प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी): शहरातील पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो  प्रदर्शनाचं आयोजन आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात समाविष्ट छायाचित्रांमध्ये दृष्य कथा, बोलक्या गोष्टी, साजरे होणारे उत्सव इत्यादी विविध विषयांचा समावेश आहे. येथे प्रदर्शित केलेल्या चित्रांचा संग्रह प्रेरणादायी आणि मोहक असाच ठरणार आहे. सर्वांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत खुले असणार आहे. कलात्मक अभिव्यक्ती आणि या दोन्ही कलाकारांच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी जळगाकरांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदर्शनाचे आयोजक तुषार बुंदे व जगदीश चावला यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिक सेवादास दलुभाऊंनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव दि. १३ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेचे मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होत आहे. निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. आज १३ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर मतदार संघात जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य सेवादास दलिचंद जैन (वय ९४ वर्षे) यांच्या गृहमतदानाने या मोहीमेस आरंभ झाला.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने मतदानाचा टक्का वाढवावा त्यादृष्टीने दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाची मोहीम १३ व १४ नोव्हेंबर दरम्यान राबविली जात आहे. मतदारांनी येत्या २० रोजी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असेही आवाहन करण्यात आले.

*लोकशाही बळकटीसाठी उत्तम पर्याय- दलिचंद जैन*

येत्या २० रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत वयोवृद्ध, दिव्यांग यांना मतदान कसे करता येईल याबाबत संभ्रम होता परंतु, निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्तुत्य निर्णयामुळे वयोवृद्ध, दिव्यांग बांधवांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ही बाब म्हणजे लोकशाही बळकटीसाठी उचलेले उत्तम पाऊल होय. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो असे दलिचंद जैन म्हणाले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचे उद्घाटन

जळगाव दि.१० प्रतिनिधी – शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात प्रत्येकाच्या मनातील विश्वस्ताची भावना विकसित होण्यास पुरेसा वाव आहे, असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिर-२०२४ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, संस्थेच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल व ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांची उपस्थिती होती.

आपल्या मनोगतात डॉ. अनिल काकोडकर पुढे म्हणाले कि, समाजाची आर्थिक उन्नती होत असताना दिसत असले तरी सामाजिक समस्या संपलेल्या नाहीत. सामाजिक विषमता वाढतच आहे व तेच मानसिक अशांतीचे मूळ आहे. काही गोष्टी आम्ही मिळवल्या असल्यात तरी खूप काही गमावलेले आहे. त्यासाठीच येथे उपस्थित युवकांनी संकल्प करण्याची आवश्यकता आहे. आताचा काळ अनुकूल असून महात्मा गांधीजींना अपेक्षित असलेला अहिंसामुक्त, निर्भय भारत निर्माण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सहभागी शिबिरार्थींनी रघुपति राघव राजाराम भजन सादर केले. डॉ. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविकात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी शिबिराची आवश्यकता प्रतिपादित करतांना देशासाठी वेळ देणाऱ्या तरुणांची गरज असल्याचे सांगितले. आपले जीवन समाजासाठी व देशासाठी असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजातील समस्यांना उत्तर शोधण्याची क्षमता युवकांमध्ये असून त्यासाठी बंडखोरवृत्ती वाढली पाहिजे असे ते म्हणाले. शिबिरातून जाण्यापूर्वी आपल्यातील अवगुण शोधून त्यांना दूर सारा, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी शुभेच्छा देताना समाजाप्रती कटिबद्ध होण्यासाठी सिद्ध व्हा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार नितीन चोपडा यांनी केले. या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिरात भारताच्या १८ राज्यासह नेपाळमधील ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.

१२ दिवसीय या निवासी शिबिरात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची गांधी कथा, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांचे ‘पदाशिवाय नेतृत्व’, ‘आपण आणि आपले संविधान’ विषयावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ‘आयुष्यासाठी शिक्षण’ विषयावर डॉ. गीता धर्मपाल, ‘युवक आणि नेतृत्व’ विषयावर दीपक मिश्रा, ‘नेतृत्वाचे उदाहरण’ विषयावर गिरीश कुलकर्णी, ‘चरखा आणि रेषा’ विषयावर भरत मूर्ती, ‘लवचिक समुदायाच्या दिशेने’ विषयावर कल्याण व शोबिता, ‘संघर्ष परिवर्तन व सामाजिक विश्लेषण’ विषयावर डॉ. अश्विन व डॉ. निर्मला झाला यांचे तर ‘गांधीजींचे तत्वज्ञान राजकारण व सत्याचे अनुसरण’ विषयावर बरुण मित्रा यांचे सत्र होणार आहे. तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल जैन यासह विविध मान्यवरांशी शिबिरार्थी संवाद साधणार आहेत. तसेच फराझ खान, कवी संदीप द्विवेदी, अतिन त्यागी यांचे विशेष सत्र होणार आहे. शिबिरात म्युझियम भेट, पीस वॉक, पीस गेम, विविध विषयांवर चर्चासत्र, भारत कि संतान, गोशाळा, शेती व नर्सरी काम इ. गोष्टी होणार आहेत.

21 कंपन्यांचे Dividend: एक्स-डेट लक्षात ठेवा, फायदा घ्या!

आगामी आठवड्यात 21 कंपन्यांच्या Dividend ची एक्स-डेट आहे. जर तुम्हाला Dividend चा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला या तारखा लक्षात ठेवाव्या लागतील. यापैकी काही कंपन्यांची एक्स-डेट 12 नोव्हेंबर आणि त्यानंतर येत आहे. त्यामुळे, ज्या गुंतवणूकदारांना या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून Dividend घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी अजूनही संधी आहे. पण, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा – एक्स-डेट नंतर शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला Dividend मिळणार नाही. त्यामुळे, Dividend चा फायदा मिळवण्यासाठी एक्स-डेटपूर्वी शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे.

12 नोव्हेंबर रोजी एक्स-डेट असलेल्या कंपन्या

तुम्हाला 12 नोव्हेंबर रोजी Dividend मिळवायचा असेल, तर या कंपन्यांची एक्स-डेट आहे:

  • डी लिंक इंडिया लिमिटेड – अंतरिम Dividend ₹5
  • इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड – अंतरिम Dividend ₹5.5
  • IRFC – अंतरिम Dividend ₹0.8
  • PDS – अंतरिम Dividend ₹1.65

14 नोव्हेंबर रोजी एक्स-डेट असलेल्या कंपन्या

14 नोव्हेंबर रोजी Dividend च्या एक्स-डेटसह या कंपन्यांची सूची खालीलप्रमाणे आहे:

  • ऍप्टस व्हॅल्यू हाउसिंग – अंतरिम Dividend ₹2
  • अमर राजा एनर्जी – अंतरिम Dividend ₹5.3
  • एस्ट्रल – अंतरिम Dividend ₹1.5
  • कंटेनर कॉर्पोरेशन – अंतरिम Dividend ₹3.25
  • IRCTC – अंतरिम Dividend ₹4
  • केपी एनर्जी – अंतरिम Dividend ₹0.2
  • केपी ग्रीन इंजिनिअरिंग – अंतरिम Dividend ₹0.2
  • केपीआय ग्रीन एनर्जी – अंतरिम Dividend ₹0.2
  • ऑइल इंडिया – अंतरिम Dividend ₹3
  • पेज इंडस्ट्रीज – अंतरिम Dividend ₹250
  • पॉवर ग्रिड – अंतरिम Dividend ₹4.5
  • QGO फायनान्स – अंतरिम Dividend ₹0.15
  • राइट्स लिमिटेड – अंतरिम Dividend ₹1.75

लक्षात ठेवा

एक्स-डेट ही तारीख असते, ज्या दिवशी स्टॉक खरेदी केल्यावर तुम्हाला Dividend चा हक्क मिळणार नाही. जर तुम्हाला Dividend मिळवायचा असेल, तर तुम्हाला या कंपन्यांच्या शेअर्स एक्स-डेटपूर्वीच खरेदी करावे लागतील.

अस्वीकरण:

TradingBuzz वर दिलेला सल्ला किंवा मते ही तज्ञांची आणि ब्रोकरेज फर्मची वैयक्तिक मते आहेत. यासाठी वेबसाइट किंवा व्यवस्थापन जबाबदार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा किंवा प्रमाणित तज्ञाचा सल्ला घ्या.

शेअर बाजार : सोमवारपासून नव्या आठवड्यात बाजारावर या घटकांचा प्रभाव

भारतीय शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात आणखी एक आठवडा एकत्रीकरणाचा (Consolidation) अनुभव घेतला. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार सावधपणे सुरू झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या घोषणा केल्यानंतर, बाजारात एक वेगळीच हलचाल दिसली आणि खालील पातळीवरून रिकव्हरी सुरू झाली. पण जागतिक घडामोडी आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांनी ही गती कायम ठेवू दिली नाही. आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेवर अनेक घटकांचा प्रभाव राहणार आहे.

तिमाही निकाल आणि आर्थिक डेटा

जगातील मोठ्या घडामोडींचा सामना केल्यानंतर भारतीय बाजाराचे लक्ष आता देशांतर्गत घटकांकडे वळणार आहे. जुलै-सप्टेंबर तिमाही निकालांचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. खासकरून, देशाच्या आर्थिक पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने हे चांगले संकेत आहेत. विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, निवडणुकीनंतर सरकारी खर्चात वाढ होईल आणि त्याचा परिणाम येत्या तिमाहीत दिसून येईल. सणासुदीचा हंगामही खपाच्या आकड्यांना सुधारण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे बाजाराला चालना मिळेल. आयआयपी (IIP) आणि महागाई दराच्या आकडेवारीची घोषणा 12 नोव्हेंबरला होणार आहे, तर घाऊक महागाईची आकडेवारी 14 नोव्हेंबरला जाहीर होईल.

प्राइमरी मार्केटमध्ये काय घडणार?

या आठवड्यात, 3 नवीन IPO उघडण्याची अपेक्षा आहे, आणि 4 नवीन शेअर्स सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. Zinka Logistics Solutions चा IPO मेनबोर्ड सेगमेंटमध्ये सबस्क्रिप्शनसाठी उघडला जाईल. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सचा IPO 11 नोव्हेंबरला बंद होईल. SME विभागात 2 नवीन IPO उघडतील. याशिवाय, स्विगी, सॅजिलिटी इंडिया, एसीएमई सोलर होल्डिंग्ज आणि निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स नव्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. SME विभागामध्ये कोणतीही नवीन सूची होणार नाही.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) झालेल्या सातत्याने विक्रीमुळे भारतीय बाजारात नकारात्मक दबाव दिसून आला आहे. गेल्या आठवड्यात FII ने सुमारे ₹20,000 कोटींची विक्री केली आहे. तथापि, या काळात डीआयआय (DII) ने ₹14,391 कोटींची खरेदी केली आहे. गेल्या 29 सत्रांमध्ये FII ने ₹1.41 लाख कोटींची विक्री केली आहे. चीनमधील मदत पॅकेजामुळे FII चा आकर्षण चीनकडे वाढला आहे, कारण तेथे भारतीय बाजाराच्या तुलनेत स्वस्त मूल्यांकन मिळत आहे.

जागतिक घडामोडी आणि संकेत

जागतिक बाजारावर नजर ठेवली तर, अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या विजयामुळे जागतिक बाजारांना दिलासा मिळाला आहे. याव्यतिरिक्त, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 आधार अंकांनी कपात केली आहे, जे अपेक्षित होते. या आठवड्यात 13 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील चलनवाढीच्या आकड्यांची घोषणा होणार आहे, जो फेडच्या धोरणावर प्रभाव टाकू शकतो. यासोबतच, चीनमधील मदत पॅकेज आणि यूएस बाँड यिल्ड आणि डॉलर इंडेक्स याच्याही परिणामांची बाजारावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया होईल.

कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर

गेल्या काही सत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 2% घट झाली. अमेरिका आणि मेक्सिकोमधील वादळामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला धोका असण्याची शक्यता कमी झाली आहे. याव्यतिरिक्त, चीनमध्ये मदत पॅकेज जाहीर झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली नाही. शुक्रवारच्या सत्रात, ब्रेंट क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल $73.87 वर घसरले, परंतु साप्ताहिक आधारावर कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 1% वाढ झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने इराण आणि व्हेनेझुएला यांच्यावर निर्बंध लादल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर दबाव पडू शकतो, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात.

समारोप

भारतीय शेअर बाजारात आगामी आठवड्यात विविध घटकांचा प्रभाव दिसून येईल. कंपन्यांच्या तिमाही निकालांचा परिणाम, FII आणि DII च्या खरेदी-विक्रीचा ट्रेंड, जागतिक आर्थिक आणि राजकीय घडामोडी यांचा विचार केला तर बाजारात चढ-उतार होऊ शकतात. कच्च्या तेलाच्या किमती आणि यूएस डॉलरच्या कामगिरीकडे देखील गुंतवणूकदारांची लक्ष असेल.

महत्त्वाची सूचना: या प्रकारच्या बाजारातील हलचालींबद्दल सल्ला घेताना, तज्ञांचा किंवा वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version