जळगावचे माजी अध्यक्ष श्री. दत्तात्रय सोमण यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांना वयाच्या ८० व्या वर्षी देवाज्ञा

नमस्कार !

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान चे विश्वस्त व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा जळगावचे माजी अध्यक्ष श्री. दत्तात्रय सोमण यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी दत्तात्रय सोमण यांना वयाच्या ८० व्या वर्षी सकाळी ५.३० वाजता देवाज्ञा झाली. त्यांनी देहदानाचा संकल्प केला असल्याने त्यांचा देह आजच सकाळी १०.३० वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, साकेगाव येथे देह सुपूर्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुली सौ. दीपिका चांदोरकर व सौ. अनघा देशपांडे असून तीन जावई नातवंडे, नातसुना, पणतु व पणत्या आहेत.

दीपक चांदोरकर.

‘खान्देश रन’ मध्ये जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकारी धावले


सुरक्षा विभागातील महेंद्र राजपूत 10 कि.मी.मध्ये तृतीय, वयस्क वयोगटात भीमराव अवताडे द्वितीय


जळगाव, दि. 04 – जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित ‘खान्देश रन’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे तब्बल 1000 हून अधिक सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यातील अनेकांनी 3, 5, 10, 21 कि.मी. मॅरेथॉन रन यशस्वीपणे पूर्ण केली. हजारो धावपटूंमधून 10 कि.मी. पुरूष गटात जैन इरिगेशनमधील सुरक्षा विभागातील सहकारी महेंद्र राजपूत तृतीय क्रमांकाने विजेता ठरला. तसेच वयस्क वयोगटात टाकरखेडा येथील सुरक्षा विभागातील सहकारी भीमराव अवताडे यांनी 10 कि.मी.मध्ये द्वितीय क्रमांकाने विजेते ठरले. त्यांना खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी, सन्मानचिन्ह यासह पाच हजाराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
‘खान्देश रन’च्या 6 व्या मॅरेथॉनची पहाटे 5.30 वाजता सुरूवात झाली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश चोरडिया यांनी 21 कि.मी. मॅरेथॉन रन ला हिरवी झेंडी दाखविली. यानंतर पोलीस अधिक्षक एम राजकूमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, महापौर जयश्री महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी. डी. बच्छाव, मनोज शिंदे, मनोज अडवाणी, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांनी प्रत्येक मॅरेथॉन रनच्या धावपटूंचा उत्साह वाढविला.


जैन परिवारातील अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मन जैन यांनी प्रत्यक्ष खान्देश रनमध्ये सहभाग घेतला. जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क, टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा, जैन एग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूड पार्क, डिव्हाईन पार्क मधील सहकारी, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती स्कूल प्रायमरी, अनुभूती स्कूल सेकंडरी मधील विद्यार्थी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे सहकारी, जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्साहाने खान्देश रन महोत्सवात सहभाग घेतला. यात वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. प्रत्येक वर्षी जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आलेले आहेत. कोरोना नंतरच्या काळात यंदा प्रथमच होणाऱ्या खान्देश रन ह्या उपक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.
जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहरी जाऊ नये, त्याचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवली आहे. आरोग्याच्या दृष्टीने सजग होत, निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी, यासाठी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सहकाऱ्यांना कान्हदेश रन मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.

सफल प्रीमियर लीगमध्ये सफल क्रेझी फाईव्ह, सफल स्ट्रायकर्स संघ विजयी

मुंबई दि.4– मुंबई वळाला रोड येथील जे. के. नॉलेज स्पोर्टस सेंटर ट्रर्फ येथे झालेल्या सफल प्रीमीयर क्रिकेट लीगमध्ये महिला संघ सफल क्रेझी फाईव्ह व पुरूष संघ सफल स्ट्रायकर्स संघ विजयी ठरले. दोघं संघांना मान्यवरांच्या उपस्थितीत चषक देऊन गौरविण्यात आले.
सस्टेनेबल ऍग्रो-कमर्शियल फायनान्स लिमिटेड (सफल) मार्फत आयोजित केलेल्या सफल प्रीमियर लीग च्या पारतोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी सफलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभाकर बोबडे यांची प्रमुख उपस्थितीती होती. त्यांच्यासह वित्त अधिकारी श्री. परेश शहा, क्रेडीट हेड श्री. सुमित कारखानीस, प्रशासकीय अधिकारी श्री. सुभाष अहिरे, लिगल हेड श्री. आकाश इंदुरकर, एसएमई हेड श्री. सुशांत पांडा, ऑपरेशन हेड श्री. रविराज बल्लाळ, विक्री विभागातील श्री. भास्कर चव्हाण, श्री. विनोद गांगुर्डे यांची उपस्थितीती होती. सफल प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये एकूण दोन महिला संघ व चार पुरुष संघ सहभागी झाले. यावेळी त्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट प्रतिसाद दिला. संपूर्ण स्पर्धेमध्ये महिला स्पर्धकांमधून सफल क्रेझी फाईव्ह हा महिला संघ विजेता ठरला, तसेच पुरुष संघामध्ये सफल स्ट्रायकर्स हा संघ विजेता ठरला, तर सफल लिजंड संघ हा उपविजेता घोषित करण्यात आला. पुरूष गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री. आदर्श दिवाणी (मॅन ऑफ द मॅच), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्री. आनंद गुरप्पू तर महिला गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून उत्कर्षा साबळे (मॅन ऑफ द मॅच), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एचआर हेड विना कशेळकर ठरलेत. स्पर्धा समविचाराने, प्रेमभावाने आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये सफलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय श्री प्रभाकर बोबडे हे सुद्धा समाविष्ट झाले होते. सफल चे एच.आर विभाग व संपूर्ण सफल कर्मचारी यांनी प्राथमिकतेने व सकारात्मक दृष्टीकोनातून योगदान देऊन एक चांगला उपक्रम स्थापित केलेला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व पदाधिकाऱ्यांचे कौतूक प्रभाकर बोबडे यांनी केले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 71 वा स्मृतिदिन साजरा

जळगाव दि. 3 (प्रतिनिधी)- ‘बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यामुळे सामान्य माणसाला जगण्याचे बळ, ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. माझ्या शालेय आयुष्यात बहिणाबाईंची कविता आली आणि माझे जीवनच उजळून निघाले. धरत्रीला दंडवत या  कवितेमुळे वाचनाची गोडी निर्माण झाली व आजपर्यंत प्रगती करू शकलो, साहित्य अकादमी पर्यंत पोहोचलो असे उत्स्फूर्त उद्गार सुप्रसिद्ध बाल साहित्यिक व शिरपूर येथील तहसीलदार आबा महाजन यांनी काढले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 71 वा स्मृतिदिन साजरा झाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. यावेळी बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज बहिणाई स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यकमाच्या सुरुवातीला आबा महाजन व मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात का.उ. कोल्हे विद्यालयातील विद्यार्थीनींनी व कवी प्रकाश पाटील यांनी बहिणाबाईची संसार ही कविता सादर केली. गिरीश कुळकर्णी यांनी गीता जयंती आणि बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन हा योगायोग आहे. जीवन विकासाचे तत्त्वज्ञान सांगणारी गीता आणि बहिणाबाईची कविता आपल्या आजुबाजुला घडलेल्या घटनांचा संबंध उलगडून दाखविते. बहिणाबाई यांना मिळालेली प्रज्ञा ही दैवी देणगीच होती असे मत व्यक्त केले. लेवागण बोलीवर काम करणारे साहित्यिक अरविंद नारखेडे, यांनी देखील बहिणाबाईच्या साहित्याबाबत प्रकाशझोत टाकला. लेवा गणबोली कडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कवयित्री बहिणाबाईंच्या पुण्यतिथी निमित्त “विश्व लेवा गणबोली दिन साजरा केले जातो, या भाषेचे दोन सम्मेलन झाले आता जानेवारीत तिसरे सम्मेलन होणार आहे याबाबतची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचा समारोप कवयित्री शीतल पाटील यांच्या कवितेने झाला. सूत्रसंचालन व समारोप ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेश चौधरी, प्रदीप, सोनार यांच्यासह चौधरी वाड्यातील सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास बहिणाबाईच्या नातसून पद्माबाई चौधरी, कला विभागाचे सहकारी विजय जैन, किशोर कुलकर्णी, देवेंद्र, दिनानाथ, कैलास, किरण, रंजना, कविता, शोभा, लक्ष्मी, कोकिळा, वैशाली, कोकिळा, सुनंदा, शालीनी चौधरी, हितेंद्र व विवेक चौधरी, साहित्यिक म्हणून तुषार वाघुळदे, अशोक पारधे, लिलाधर कोल्हे, पुष्पा साळवे, इश्वर राणा आदि मान्यवर उपस्थित होते.

सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल – अनिल जैन

जळगाव दि.25– शेतीच्या सातबारा पुरूषांच्या नावे असतो; मात्र शेतात सर्वाधिक काम महिला करत असतात. जेव्हा पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीयांचे नाव सातबारामध्ये लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरूष समानता प्रस्तापित होईल असे महत्त्वपूर्ण विचार जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विकास संवाद या संस्थेचे ‘लैंगिक पहचान की चुनौती समानता के सवाल’ हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.

गांधी तीर्थ, जैन हिल्स येथे विकास संसद आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक पहचान की चुनौती और समानता के सवाल’ या तीन दिवसीय 15 वा राष्ट्रीय संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटक म्हणून अनिल जैन बोलत होते. ही परिषद 27 नोव्हेंबर पर्यंत आहे. पुढे बोलताना अनिल जैन म्हणाले की, आज आपण ज्या जैन हिल्स, गांधीतीर्थ येथे आहोत ते निर्माण करण्यासाठी माझ्या वडिलांना श्रद्धेय भवरलालजी जैन यांना माझी आज्जी गौराई यांनी सात हजार रूपये जी संपूर्ण कुटुंबाची जमापूंजी होती ती दिली. यातून आठ हजार करोड व्यवसायाचा टप्पा गाठणारी कंपनी उभी राहिली. व्यवसायातील पहिली भागीदार आई असे भवरलालजी जैन मानायचे. त्यामुळे स्त्री-पुरूष समानतेचे बाळकडू आम्हाला आपसूक मिळाले.

विकास संवाद व गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजीत 15 व्या राष्ट्रीय मीडिया संवादामध्ये मार्गदर्शन करताना जैन इरिगेशन कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन. व्यासपिठावर चिन्मय मिश्र, सचिन कुमार जैन.

या राष्ट्रीय संवादात देशभरातील 16 राज्यातून शंभराहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विकास संवादचे समन्वयक सचिनकुमार जैन यांनी प्रास्ताविकात विकास संवाद आणि त्यांचे कार्य याबाबत उपस्थितांना परिचय करून दिला. तर डॉ. अश्विन झाला यांनी गांधी तीर्थ व जैन हिल्स बाबतची माहिती दिली. पहिल्या सत्रात रिता भाटिया यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी गांधी विचारांच्या दृष्टीने स्त्री-पुरूष समानतेची व्याख्या समजावून सांगितली. सुप्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास पाटील यांनी शब्दांच्या माध्यमातून खान्देश व जळगावची सैर घडवून दिली. पुणे येथील विचारवंत आनंद पवार यांनी ‘लैंगिक पहचान की चुनोती और समानता के सवाल’ अशा दोन भागांमध्ये आपले विचार मांडले. या तीन दिवसीय 15 व्या राष्ट्रीय मिडीया संवाद कार्यक्रमाचा पहिल्या दिवसाचा समारोप गांधी तीर्थ येथील ‘खोज गांधीजी की’ ऑडिओ व्हिडीओ गाईडेड संग्राहलयाच्या अनुभूतीने झाला.

स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमतावर आज मार्गदर्शन

उद्या दि.26 नोव्हेंबर ला प्रार्थनेने सकाळचे सत्र सुरू होईल. त्यात डॉ. विश्वास पाटील ‘जगदम्बा कस्तूरबा’ यावर मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात दीपा सिन्हा यांचे स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमता यावर महत्त्वपूर्ण संवाद होणार आहे. अरविंद मोहन याचे ‘हजार बेटियों वाले बापू’ यावर विशेष चर्चा होईल. तर चिन्मय मिश्र हे  ‘बच्चों में लैंगिक पहचान की चुनौतियां’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या संवाद कार्यक्रमाचा समारोप रविवारी, 27 नोव्हेंबर ला होईल.

नरहर कुरुंदकरांच्या जीवन-विचाराचे दर्शन घडविणारे अभिनव नाटक

जळगाव दि.25–  ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सहकार्याने बुधवार, ३० नोव्हेंबर ला संध्याकाळी ७ वा. कांताई सभागृह (नवीन बसस्थानकाजवळ) येथे सादरीकरण होईल.

स्थानिक कलाप्रेमींच्या सहकार्याने आयोजित या प्रयोगाला प्रवेश नि:शुल्क आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जवळपास वीस प्रयोग होत आहेत. त्यात पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, लातूर, अंबाजोगाई, सेलू, परभणी, हैदराबाद, वरोरा, नागपूर, वर्धा येथील प्रयोगानंतर जळगाव येथे पहिला प्रयोग होत आहे. दोन अंक आणि मध्यंतराचा कालावधी वगळता दोन तास असा या प्रयोगाचा अवधी आहे. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे आहे. नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपयुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले आहे. अनेक मान्यवरांनी कौतुक केलेल्या, सकस आणि रंजक विचार-यात्रा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

अनोखे रंगमंचीय सादरीकरण

सुप्रसिद्ध विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे ‘नरहर कुरुंदकर–एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे. हा कार्यक्रम म्हणजे नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाचा एक प्रकारचा अभिनव नाट्यप्रयोग आहे. मुंबई आणि नांदेड येथील प्रथितयश कलाकर हा प्रयोग सादर करतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, विश्वास अंबेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि सुप्रसिद्ध दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.

नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात.

बिसलेरी आता टाटाच्या मालकीची, 30 वर्षे जुनी कंपनी 7000 कोटींना विकली जाणार

सुमारे 30 वर्षे जुनी आंतरराष्ट्रीय शीतपेय कंपनी बिस्लेरी विकली जाणार आहे. टाटा ग्रुप (टाटा) थम्स अप, गोल्ड स्पॉट, लिम्का शीतपेय निर्माता बिस्लेरी खरेदी करणार आहे. बिस्लेरी आणि टाटा कंझ्युमर लिमिटेड यांच्यातील हा करार सुमारे 6000-7000 कोटींचा असणार आहे. रिपोर्टनुसार, या डीलसाठी दोन्ही कंपन्यांमध्ये दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. रिलायन्स आणि नेस्लेसारख्या कंपन्या सोडून त्यांनी आपली कंपनी टाटा समूहाच्या हातात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनी का विकावी लागली

बिस्लेरीचे अध्यक्ष रमेश जे चौहान, म्हणाले की कंपनीला पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे उत्तराधिकारी नाहीत. त्यांची मुलगी जयंती हिला या व्यवसायात फारसा रस नाही, त्यानंतर त्यांनी कंपनी विकण्याचा विचार केला. Tata Consumer Products Limited (TCPL) आणि Bisleri यांच्यातील या करारानुसार, Bisleri चे विद्यमान व्यवस्थापन दोन वर्षांसाठी काम करत राहील. बिस्लेरीची जबाबदारी टाटाकडे सोपवण्याचा निर्णय घेताना रमेश जे चौहान म्हणाले की, कंपनी विकण्याचा निर्णय अत्यंत क्लेशदायक आहे, परंतु मला माहित आहे की टाटा त्यांच्या कंपनीची चांगली काळजी घेतील. मला टाटांची कार्यसंस्कृती आवडते. मला माहित आहे की टाटा या कंपनीची चांगली काळजी घेईल.

इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रमेश चौहान म्हणाले की, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि टाटा कंझ्युमरचे सीईओ सुनील डिसोझा यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या, ज्यामध्ये मला जाणवले की हे लोक खूप चांगले आहेत. ते म्हणाले की, कंपनी विकल्यानंतर मी त्या पैशाचे काय करणार, याबाबत मी अद्याप विचार केलेला नाही. ही कंपनी कोणाच्या तरी हातात जावी, जो तिची काळजी घेईल अशी माझी इच्छा होती. मी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर ते बांधले, म्हणून मी अशा खरेदीदाराच्या शोधात होतो जो या कंपनीची आणि तिच्या कर्मचार्‍यांची समान काळजी घेईल. हा पैसा पर्यावरण विकास, गरिबांवर उपचार, जलसंधारण अशा कामांसाठी वापरणार असल्याचे बिसलरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी सांगितले. FMCG क्षेत्रात टाटा ग्राहक झपाट्याने वाढत आहे. या करारानंतर कंपनी या क्षेत्रातील टॉप 3 कंपन्यांमध्ये सामील होईल.

Paytm-Nykaa सह या 5 टेक कंपन्यांनी बुडवले गुंतवणूकदारांचे पैसे, पेटीएममध्ये तर 8 लाख कोटींचे नुकसान

वर्षभरापूर्वीपर्यंत न्यू एज तंत्रज्ञान कंपन्या बाजारात लोकप्रिय होत्या. बाजारातील तज्ञांपासून ते मोठ्या ब्रोकरेज हाऊसपर्यंत पेटीएम-नायका Zomato, Nykaa, Delhivery आणि Policybazaar सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होते. मात्र, या कंपन्यांचे भवितव्य काय, हे कोणीच सांगितले नाही? कोट्यवधींच्या तोट्यात उभ्या असलेल्या या कंपन्या नफ्यात येणार कशा? आता एक वर्षानंतर या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान केले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी पेटीएममध्ये गुंतवणूक केली त्यांनाच 8 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

 

स्टॉक विक्रमी नीचांकी गाठला

पेटीएमचा शेअर बुधवारी ४७२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्याचवेळी, गेल्या 16 महिन्यांत ज्या गुंतवणूकदारांनी पेटीएम, झोमॅटो, न्याका, दिल्लीवेरी आणि पॉलिसीबाजार या पाच नवीन तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये पैसे ठेवले आहेत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

मोठे अँकर गुंतवणूक वेगाने पैसे काढतात

Paytm, Nykaa यासह अनेक नवीन तंत्रज्ञान कंपन्यांमधून गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत. Paytm ते SoftBank ते Nykaa, VC फर्म Lighthouse India Fund 3 ने 525.39 कोटी रुपयांचे 3 कोटी शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले आहेत कारण IPO पूर्वीच्या गुंतवणूकदारांसाठी लॉक-इन कालावधी संपला आहे. झोमॅटो कंपनीचे संस्थापक मोहित गुप्ता यांनी ऑनलाइन फूड एग्रीगेटरचा राजीनामा दिला आहे.

गुंतवणूकदार उबेर झोमॅटोमधून बाहेर पडत आहे

झोमॅटोमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदार उबेर टेक्नॉलॉजिकलने या वर्षी ऑगस्टमध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडले. झोमॅटोचा शेअर बुधवारी ६२.१५ रुपयांवर व्यवहार करत आहे. Nykaa चा एक वर्षाचा लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर रोजी संपला आणि त्याच दिवशी स्टॉक कमी झाला. बुधवारी त्याचा शेअर १७१.१५ रुपयांवर व्यवहार करत होता. FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स (न्याका) चे मुख्य आर्थिक अधिकारी अरविंद अग्रवाल यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे. अरविंद अग्रवाल, FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडचे ​​मुख्य वित्तीय अधिकारी, 25 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनी सोडतील, Nykaa ने एका निवेदनात म्हटले आहे.

कॉर्पोरेट एक्शन/ Corporate Actions म्हणजे काय ?

तुम्ही तुमच्या सोशल मीडिया फीडमधून नियमितपणे स्क्रोल करत असाल, तर तुम्ही अनेक आगामी चित्रपट रिलीज किंवा गाणे रिलीज इव्हेंट्सचे निरीक्षण केले असेल. चित्रीकरणादरम्यान घडलेली काही मजेदार किंवा गंभीर घटना सामायिक करत तुम्हाला चित्रपटातील कलाकारांचे काही लेख किंवा मुलाखती देखील मिळतील. या सर्व एक्शन त्यांना त्यांच्या चित्रपटाभोवती एक चर्चा निर्माण करण्यात मदत करतात आणि अधिक लोकांना ते पाहण्यासाठी आकर्षित करतात. याचा बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर परिणाम होऊन तो ब्लॉकबस्टर होतो.

त्याचप्रमाणे, शेअर बाजारात येताना, सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्या काही एक्शन किंवा कार्यक्रम करतात. या एक्शन/इव्हेंटचा कंपनी आणि तिच्या शेयरहोल्डरवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. कंपनीच्या अशा कृतींना कॉर्पोरेट एक्शन म्हणतो. तर, आपण पुढे वाचत असताना ही संकल्पना उलगडू या.

कॉर्पोरेट एक्शन काय आहेत?

कॉर्पोरेट एक्शन म्हणजे कंपनीने केलेल्या कोणत्याही एक्शन ज्याचा कंपनी आणि तिच्या शेयरहोल्डरवर भौतिक प्रभाव पडतो. आता, भौतिक प्रभावाचा अर्थ काय? मटेरिअल इम्पॅक्ट म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर किंवा आर्थिक स्थितीवर किंवा शेअरच्या किमतीवर लक्षणीय किंवा थेट प्रभाव पाडणारी गोष्ट. त्यामुळे, कंपनीने शेअरधारक/गुंतवणूकदारांना आणि बाजाराला अशा कृतींबद्दल माहिती देणे आवश्यक आहे जेणेकरून ते माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेऊ शकतील. या एक्शन आर्थिक किंवा गैर-आर्थिक असू शकतात. उदाहरणार्थ, डिविडेंड जाहीर करणे किंवा कंपनीचे नाव बदलणे.

हे निर्णय कोण घेते?

कंपनीचे संचालक मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. BOD हे तुमच्या आणि माझ्यासारख्या भागधारकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या लोकांचे पॅनेल आहे. ते असे लोक आहेत जे कंपनीसोबत जवळून काम करत आहेत आणि त्यामुळे अशा कृतींबाबत निर्णय घेण्यासाठी सुसज्ज आहेत. मंडळाच्या एकमताने हे निर्णय घेतले जातात. काही कॉर्पोरेट कृतींमध्ये तुमच्या आणि माझ्यासारख्या भागधारकांकडून मते घेणे समाविष्ट असू शकते.

कॉर्पोरेट एक्शन का केल्या जातात?

  1. भागधारकांसह नफा सामायिक करा:

कंपन्या त्यांच्या शेअरहोल्डरांणा त्यांचा नफा त्यांच्यासोबत वाटून बक्षीस देण्याचे निवडू शकतात. असे केल्याने, ते त्यांच्या गुंतवणूकदारांचा आणि बाजाराचा कंपनीवरील विश्वास वाढवतात. डिविडेंड हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बजाज ऑटो, गेल, हिंदुस्तान झिंक या भारतातील काही अव्वल डिविडेंड देणाऱ्या कंपन्या आहेत.

  1. कॉर्पोरेट पुनर्रचना:

कॉर्पोरेट पुनर्रचनामध्ये कंपनीचे विद्यमान भांडवल किंवा परिचालन संरचनेत बदल करणे समाविष्ट आहे. कंपनीची भविष्यातील वाढ आणि नफा वाढवण्यासाठी हे केले जाते. काही उदाहरणांमध्ये विलीनीकरण आणि अधिग्रहण, डीमर्जर, स्पिनऑफ इत्यादींचा समावेश आहे. 2018 मध्ये, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरने 408 दशलक्ष सक्रिय सदस्यांसह आणि 32.2% च्या महसूल बाजारातील वाटा असलेली देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनण्यासाठी त्यांचे विलीनीकरण (Merger) पूर्ण केले. .

  1. शेअरच्या किमतीवर परिणाम:

शेअरच्या किमतीचा स्टॉकच्या तरलतेवर परिणाम होतो. जर स्टॉक महाग असेल तर तो अनेक गुंतवणूकदारांना कमी परवडणारा असेल किंवा जर तो स्वस्त किंवा पेनी स्टॉक असेल तर तो एक अत्यंत शंकास्पद पर्याय बनतो. त्यामुळे शेअरच्या किमतीवर प्रभाव टाकण्यासाठी कंपन्या कॉर्पोरेट एक्शन जसे की स्टॉक स्प्लिट, रिव्हर्स स्टॉक स्प्लिट, बोनस, बायबॅक इत्यादींचा वापर करतात. अल्काइल अमाइन्स, प्राइम फ्रेश, आरती ड्रग्ज ही अनुक्रमे स्टॉक स्प्लिट, बोनस आणि बायबॅकची अलीकडील काही उदाहरणे आहेत.

 

कॉर्पोरेट कृतींचे प्रकार काय आहेत?

कॉर्पोरेट एक्शन खालीलप्रमाणे 2 श्रेणींमध्ये वर्गीकृत केल्या आहेत:

  1. ऐच्छिक (Voluntary)

चला आमच्या चित्रपटाच्या उदाहरणासह पुढे जाऊ या. एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की तो पाहायचा की नाही, ही आपली इच्छा असते. त्याच पद्धतीने, ऐच्छिक कॉर्पोरेट एक्शन तुम्हाला यात भाग घ्यायचा की नाही हे निवडण्याची परवानगी देते. एक्शनवर प्रएक्शन करण्याच्या आपल्या निर्णयासह आपण प्रतिसाद देणे आवश्यक आहे. या कॉर्पोरेट एक्शनमुळे केवळ सहभागी भागधारक प्रभावित होतील. जसे कि shareBuyback

अधिकार समस्या (Right Issue):

या कॉर्पोरेट एक्शनमध्ये, विद्यमान शेअरहोल्डरांणा सवलतीत कंपनीचे अतिरिक्त शेअर्सचे सदस्यत्व घेण्याचा पर्याय दिला जातो. येथे, कंपनी त्यांच्या व्यवसायासाठी अतिरिक्त निधी उभारण्याचा प्रयत्न करते.

परत खरेदी: (ShareBuyback)

या कॉर्पोरेट एक्शनमध्ये, कंपनीचे प्रवर्तक त्यांच्या स्वतःच्या कंपनीचे शेअर्स सध्याच्या भागधारकांकडून आकर्षक किंमतीला विकत घेतात. हे सहसा कंपनीवरील प्रवर्तकांचा आत्मविश्वास वाढवते.

  1. अनिवार्य (Mandatory)

त्याच उदाहरणासह पुढे, तुम्ही चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. तर ते तुमच्यासाठी अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे, अनिवार्य कॉर्पोरेट एक्शनमध्ये कंपनीच्या भागधारकांचा अनिवार्य सहभाग समाविष्ट असतो. जेव्हा कंपनीच्या निर्णयाचा कंपनीच्या सर्व विद्यमान शेयरहोल्डरवर परिणाम होतो. कंपनीच्या शेअरहोल्डरांणा या निर्णयाबद्दल फारसे काही सांगता येत नाही. म्हणून, ते स्वीकारणे त्यांच्यासाठी “अनिवार्य” आहे. काही उदाहरणांमध्ये स्टॉक स्प्लिट, बोनस, कॅश डिव्हिडंड इ.

स्टॉक स्प्लिट:

या कॉर्पोरेट एक्शनमध्ये, कंपनीचे विद्यमान शेअर्स कंपनीने घोषित केलेल्या गुणोत्तरामध्ये विभागले जातात. विभाजनाचा शेअरच्या दर्शनी मूल्यावर परिणाम होतो.

बोनस:

या कॉर्पोरेट एक्शनमध्ये, कंपनीकडून तिच्या विद्यमान शेअरहोल्डरांणा अतिरिक्त शेअर्स मोफत दिले जातात.

 

डिविडेंड:

या कॉर्पोरेट एक्शनमध्ये, विद्यमान शेअरहोल्डरांणा बक्षीस म्हणून रोख डिविडेंड दिला जातो.

या 5 शेअर्समधे म्युच्युअल फंड कंपन्यांनी केली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक , तुमची आहे का या कंपन्यांमध्ये गुंतवणूक ?

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभरात महागाई शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. मात्र, गुंतवणूकदार या अत्यंत गाफील असलेल्या भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत आहेत. परदेशी गुंतवणूकदारही विक्रमी गुंतवणूक करत आहेत. म्युच्युअल फंड हाऊसेसही चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. या वर्षी म्युच्युअल फंड कंपन्यांनी अनेक शेअर्समधे गुंतवणूक केली आहे परंतु असे काही शेअर्स आहेत ज्यावर अनेक म्युच्युअल फंड हाऊसने एकाच वेळी पैसा लावला आहे. आम्ही तुम्हाला असे 5 स्टॉक्स सांगत आहोत ज्यावर म्युच्युअल फंड कंपन्यांनी मोठी रक्कम गुंतवली आहे.

 

  1. कजारिया सिरॅमिक्स

कजारिया सिरॅमिक्स, टाइल्स, बाथवेअर आणि सॅनिटरीवेअरची उत्पादक, बांधकाम साहित्याच्या क्षेत्रात एक मजबूत खेळाडू आहे. या कंपनीला रिअल इस्टेट मार्केटमध्ये सततच्या तेजीचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. ही भारतातील सिरेमिक/विट्रिफाइड टाइल्सची सर्वात मोठी उत्पादक आहे. यामुळे या कंपनीच्या शेअर्सवर म्युच्युअल फंड कंपन्या मोठ्या प्रमाणावर पैसा लावत आहेत. एका वर्षात म्युच्युअल फंड कंपन्यांनी या कंपनीचे १.२६ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. आज कंपनीचा शेअर 2 टक्क्यांहून अधिक वाढला आहे आणि शेअर 1,048.95 रुपयांवर व्यवहार करत आहे.

  1. ICICI लोम्बार्ड

ICICI लोम्बार्ड ही नॉन-लाइफ इन्शुरन्स क्षेत्रातील चांगली कंपनी आहे. कंपनी टियर-3 आणि टियर-4 शहरांमध्ये आपले वितरण नेटवर्क विस्तारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीच्या परताव्यात सुधारणा दिसून आली आहे, त्यामुळे गुंतवणूक उत्पन्नावरील परतावा सुधारला आहे. भविष्यात कंपनी आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्या यामध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. या वर्षी म्युच्युअल फंड कंपन्यांनी या कंपनीचे २.५७ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. कंपनीचा शेअर आज 1 टक्‍क्‍यांहून कमी होऊन 1,129.40 रुपयांवर व्यवहार करत आहे.

 

  1. कमिन्स इंडिया

कमिन्सला देशांतर्गत आणि निर्यात अशा दोन्ही बाजारात जोरदार मागणी आहे. कमोडिटीच्या किमती कमी झाल्यामुळे आणि स्पर्धात्मक परिस्थिती पाहता कंपनीच्या मार्जिनमध्येही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे लक्ष ऑटोमेशनवर आहे ज्यामुळे मार्जिन विस्तार वाढेल. बाजारातील तज्ज्ञांना त्याच्या शेअरच्या किमतीत मोठी उसळी मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंड कंपन्यांनी या कंपनीचे १.१७ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. आज कंपनीचा शेअर 0.63% खाली 1,341.30 रुपयांवर व्यवहार करत आहे.

  1. केईसी इंटरनॅशनल

केईसीकडे 1.1 लाख कोटी रुपयांच्या निविदा आहेत. कंपनीने 2022-23 मध्ये तिच्या महसुलात 20% (पूर्वी 15% प्रमाणे) वाढ केली आहे, जो एक विक्रम आहे. KEC ने रेल्वे व्यवसायातील ट्रेन कोलिशन अवॉयडन्स सिस्टमच्या नवीन उदयोन्मुख क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवली आहे. सिव्हिलमध्ये कंपनी 2,500 कोटी रुपयांचे आठ जल प्रकल्प राबवत आहे. डेटा सेंटरसाठी ही तिसरी ऑर्डर आहे. येत्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीपासून मार्जिनमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत, कंपनी भविष्यात अधिक चांगली कामगिरी करेल याची खात्री आहे. यामुळे म्युच्युअल फंड कंपन्या पैसा लावत आहेत. गेल्या वर्षी म्युच्युअल फंड कंपन्यांनी या कंपनीचे 38.78 लाख शेअर्स खरेदी केले होते. आज कंपनीचा शेअर 1.33 टक्क्यांनी घसरून 417.75 रुपयांवर व्यवहार करत आहे.

  1. लॉरस लॅब्स

लॉरस लॅब्स जेनेरिक API (सक्रिय फार्मास्युटिकल घटक) आणि फॉर्म्युलेशन, कस्टम सिंथेसिस आणि बायोटेक्नॉलॉजीच्या विभागांमध्ये कार्यरत आहेत. कस्टम सिंथेसिस आणि API व्यवसायातील मजबूत कामगिरीमुळे जून-सप्टेंबरमध्ये एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 31% ची मजबूत कमाई वाढ झाली. तथापि, फॉर्म्युलेशन व्यवसायाला कमी अँटी-रेट्रोव्हायरल ऑफटेकमुळे लक्षणीय नुकसान झाले आहे. एकूणच कंपनीचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणूक वाढवली आहे. गेल्या एका वर्षात म्युच्युअल फंड कंपन्यांनी लॉरस लॅबचे १.८४ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. आज तो 0.078 टक्क्यांनी घसरून 449.70 रुपयांवर व्यवहार करत आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version