जळगाव दि. १४ – ५६ व्या सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धा २०२२-२३ मुंबई-दादर येथील श्री हलारी ओसवाल समाज हॉल येथे दि. ११ जानेवारी २०२३ ला पार पडली. या स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकडमीची खेळाडू कु. दुर्गेश्वरी योगेश धोंगडे विजयी झाली. तिने रत्नागरीच्या निधी सप्रे हिचा ४-२५ व ५-२५ ने पराभव केला. दुर्गेश्वरी धोंगडे हिने कॅडेट ग्रुप १२ वयोगटामध्ये पहिला क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्रातून प्रथम आल्याने दुर्गेश्वरीचा चषक, प्रमाणपत्र ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे अरूण केदार यांच्याहस्ते गौरविण्यात आले. या यशानंतर तिची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून राष्ट्रीय कॅरम स्पर्धा वाराणसी येथे खेळविली जाणार आहे. दुर्गेश्वरी धोंगडे हिला प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्टस ॲकडमीतील प्रशिक्षक सय्यद मोहसीन व योगेश धोंगडे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल जैन स्पोर्ट्स अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे यांच्यासह सहकाऱ्यांनी कौतूक केले.
Author: Trading Buzz
सीए परिक्षेत देशभरातून अनुभूती स्कूलची सौम्या जाजू २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा
जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी (दि. ३० जानेवारी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी भव्य अशा “ग्राम संवाद सायकल यात्रे”चे आयोजन करण्यात आले आहे. १३ दिवस चालणारी हि यात्रा जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून सुमारे ३५० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
समाजातील सहभागाने हि सायकल यात्रा यशस्वी करण्याचे नियोजन सुरु आहे. सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. या सहभागी स्वयंसेवकांसाठी संबंधित कालावधीत वापरासाठी सायकलींची आवश्यकता आहे. आपणास विनंती आहे कि, आपल्याकडील चालू स्थितीतील व प्रवासासाठी योग्य सायकल उपलब्ध करून द्यावी. सायकल यात्रेनंतर आपणास आपली सायकल योग्य स्थितीत परत करण्यात येईल. सायकल वापरण्यायोग्य करण्यासाठी काही दुरुस्ती करावी लागणार असल्यास तसेही सांगावे.
सायकलसह यात्रेच्या मार्गावरील गावातील शाळा/महाविद्यालयात कार्यक्रम, स्थानिक पातळीवर रात्री गावकऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन, सकाळी गावात प्रभात फेरीचे आयोजन आदी माध्यमातून स्थानिक नागरिक आपला सहभाग नोंदवू शकणार आहेत. तसेच सहभागी स्वयंसेवकांचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण आदी विषयातही आपला सहभाग नोंदवू शकणार आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३३६२३३०) यांचेशी संपर्क साधावा.
सौरभ यालकर सीए परिक्षा उत्तीर्ण
जळगाव दि.11- जैन उद्योग समूहातील व्यवस्थापक पदावरील वरिष्ठ सहकारी राजेंद्र यालकर यांचा मुलगा चि. सौरभ राजेंद्र यालकर याने नोव्हेंबर-२०२२ मध्ये सि.ए.(CA) परिक्षा दिली होती. या परिक्षेचा अंतिम निकाल लागला. यात सौरभने चांगल्या गुणांसह सीए ची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. सौरभच्या यशाबद्दल त्याचा परिवार,दिगंबर जैन समाजातील मान्यवर यांच्यासह सर्वस्तरातून त्याचे कौतूक होत आहे. तसेच जैन इरिगेशनच्या व्यवस्थापनाकडूनही त्याचे कौतूक झालेे. त्याने यापूर्वी बी.कॉमला 79 टक्के प्राप्त केले होते. दिगंबर जैन समाजातील साधारण कुटुंबात वाढलेला एक आदर्श विद्यार्थी सीए अंतिम परिक्षा उत्कृष्टरित्या उत्तीर्ण झाला याचा आनंद वडील राजेंद्र यालकर यांनी व्यक्त केला.
गौतम अदानीने एकाच दिवसात खेळ उलथून टाकला, टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसरे स्थान पटकावले
खबरदार : देशात कोरोनाचे १७९ नवीन प्रकरणे समोर
कोविड-19 अपडेट: देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. चीन आणि जपाननंतर आता भारतातही कोरोनाचे नवे रूप आले आहे. आता देशातील संक्रमित लोकांची संख्या 3,124 झाली आहेे. WHO च्या मते, BF 7 हा कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे. कोरोनाव्हायरसच्या विविध प्रकारांच्या प्रसाराच्या चिंतेमुळे अनेक महत्त्वाच्या प्रवेश बिंदूंवर चाचणी-ट्रॅकिंग वाढवण्यात आले आहे. पुनर्प्राप्तीचा दर 98.8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
२४ तासांत इतक्या कोरोना चाचण्या झाल्या
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात 24 तासांत 208 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. आता देशातील रिकव्हरी रेट 98.80 टक्के झाला आहे. दैनिक सकारात्मकता दर 0.10% आहे आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 0.10% आहे. त्याच वेळी, एकूण संक्रमणांपैकी 0.01 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, कोविड-19 विरोधी लसींचे 220.16 कोटींहून अधिक डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत आणि 24 तासांत 1,74,467 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
भारतात XBB.1.5 प्रकारातील प्रकरणांची संख्या वाढली आहे
देशात कोरोनाव्हायरसच्या XBB.1.5 स्वरूपाच्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. भारतीय SARS-COV-2 Genomics Consortium (INSACOG) ने गुरुवारी ही माहिती दिली. हा प्रकार अमेरिकेत कोरोना विषाणू संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. या सात प्रकरणांपैकी गुजरातमध्ये तीन आणि कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक आढळून आला आहे.
RT PCR ७२ तास अगोदर अपलोड करणे बंधनकारक
आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तास आधी आरटी पीसीआर अपलोड करणे बंधनकारक असेल, असे या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. प्रवासी प्रवाशांसाठीही ही व्यवस्था अनिवार्य आहे. यासोबतच देशात येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी केली जाणार आहे.
हवाई सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया म्हणाले, “आम्ही भारतात आल्यानंतर ज्यांना ताप आहे किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेशही जारी करणार आहोत.” यासोबतच चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सध्याची आरोग्य स्थिती जाहीर करण्यासाठी हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक असेल.
बालगंधर्व संगीत महोत्सवाची प्रातःकालीन मैफल
जळगाव दि.१२– २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवावी प्रात:कालीन मैफलीचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन मैफल रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता महात्मा गांधी उद्यानात संपन्न होत आहे.
रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे ही विनंती आहे.
या मैफिलीचे कलावंत तरुण व युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. यामध्ये ओंकार प्रभुघाटे व संपदा माने आहेत. नाट्यसंगीत व अभंगवाणी ने ओतप्रोत भरलेली ही मैफिल संक्रांतीच्या शुभदिनी रसिकांची सकाळ गोड करणारी ठरेल. या कलावंतांना साथ संगत रामकृष्ण करंबेळकर (तबला), गणेश मेस्त्री (पखावज), वरद सोहोनी (संवादिनी), धनंजय कंधारकर (तालवाद्य) व सुसंवादिनी म्हणून निरुपण करणार आहे अनुश्री फडणीस-देशपांडे. चुकवू नये अशी ही मैफल तमाम जळगावकरांसाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानची नवीन वर्षाची संक्रांतीची भेट आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्री. अमन मित्तल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. २१ व्या वर्षानिमित्त संपन्न होणाऱ्या या स्वरोत्सवात सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत असून आसन व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य क्रमाने आसन व्यवस्था आहे.
चुकवू नये अश्या या प्रातःकालीन नाट्यसंगीत व अभंगवाणी च्या कार्यक्रमास जळगावकर रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) चे संचालक डॉ. दिपक खिरवाडकर, अधिकारी श्रीकांत देसाई व कार्यक्रम अधिकारी श्री. दिपक कुलकर्णी तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी केले आहे.
विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टर ला राज्य शासनाचा पुरस्कार!
मुंबई दि.10 – जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार श्री. विजय जैन यांच्या प्लास्टिक प्रदूषण विषयाचे गांभीर्य अधोरेखित करत, घराबाहेर पडताना आपली कापडी पिशवी सोबत बाळगण्याची आठवण करून देणाऱ्या लक्षवेधी पोस्टर रचनेला महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६२ व्या वार्षिक प्रदर्शनात ५० ००० (रुपये पन्नास हजार) चे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्रा प्रमोद रामटेके, अमूर्त चित्रकार, नागपूर, श्री. राजीव मिश्रा, कला संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि १० जानेवारी २०२३ रोजी सायं ५.३० वा. प्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते जैन यांना गौरविण्यात आले.
उपयोजित कलेच्या सदर पोस्टरसह विजय जैन यांच्या रेखा व रंगकला विभागात “रंगलीपी” ही जलरंग चित्र मालिका देखील या वार्षिक कला प्रदर्शनाचा भाग आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ११ ते १६ दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी प्लास्टिक कचऱ्यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयाला साध्या सोप्या रुपात मांडल्याचे सांगत श्री विजय जैन उपयोजित कलेबरोबर रेखा व रंगकलेमध्ये देखील आपले योगदान सातत्याने देत असल्याबद्दल यांचे कौतुक केले आहे. नुकताच “पुरुषी अहंकार” या विषयावरच्या त्यांच्या पोस्टरला मुंबईच्या “डूडल सोशल ॲड फेस्ट” या राष्ट्रीय स्पर्धत नामांकन मिळाले आहे. सदर स्पर्धेचे ते २०१७ चे विजेते आहेत. विजय जैन यांच्या “स्त्री शिक्षणा”च्या पोस्टर ला उत्तर प्रदेश ललित कला अकादमी चा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत, प्रौढ शिक्षण, झाडं वाचवा, बाल कामगार, सकस आहार- विद्यार्थी, सोशल मीडिया वापर: एक जबाबदारी आणि कोरोना काळातील मास्क वापरासाठी उद्युक्त करणारी सोशल मीडिया मालिका अशा सामाजिक विषयाला धरून त्यांनी अतिशय कल्पक आणि प्रबोधनात्मक पोस्टर रचना साकारल्या आहेत. त्यांच्या या कामाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वरोत्सवात सहगायनातुन रसिकांची तृप्ती
२२ वा बालगंधर्व महोत्सव ५, ६, ७ जानेवारीला; बालगंधर्व महोत्सवाच्या २१ आवर्तने अनूभवना-या रसिक श्रोत्यांचा गौरव
जळगाव दि.8– बालगंधर्व संगीत महोत्सवात आजच्या दिवसाची संध्याकाळ रम्य झाली रसिक स्वरोत्सवात न्हाऊन निघाले. कारण होते ज्येष्ठ गायक पंडीत डॉ. राम देशपांडे व त्यांच्या सौभाग्यवती अर्चना देशपांडे मुलगा गंधार देशपांडे यांच्या सहगायनाचे. पंडीत डाॕ.राम देशपांडेंनी आपल्या गायनाची सुरवात राग यमन कल्याणने केली. ताल तीलवाड्यात बंडा ख्याल “जिया मानत नाही” व द्रुत ख्याल तिनतालात ” ननदिके बचनुवा संह न जाये ” अत्यंत दमदार पणे सादर केले. त्यानंतर पंडितजीचा स्वरचित तराणा “देनी देनी देनी तनन” हा एकतालातील सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर पंडिता किशोरीताई अमोणकर यांनी गाऊन अजरामर केलेल्या ” बोलावं विठ्ठल, पहावा विठ्ठल” या अभंगला स्वतःची राग भिन्न षड्ज रागात बांधलेल्या चालीचा तोच अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असलेले आणि अजरामर झालेले सं. कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालेवर आधारित “सूरत पिया बिन छिन बिसराये” हे पद सादर करून रसिकांना तृप्त केले. पंडितजींनी आपल्या मैफिलीची सांगता कोण जागता कोण सोता या भजनाने झाला. पं. कुमार गंधर्व यांची गाऊन अजरामर केलेल्या “सावरे ऐजैयो, जमुना किनारे मोरा गाव” या गीताने केली. आणि रसिकांच्या कानात हे सूर घुमत राहिले. त्यांना साथ संगत तबल्यावर रामकृष्ण करंबळेकर, संवादिनीवर अभिनय रवंदे, तानपु-यावर मयूर पाटील, वरूण नेवे यांनी केली.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत. दोघंही सत्रात सहभागी कलावंताचा सत्कार जैन इरिगेशनचे डाॕ. अनिल पाटील, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, वेगा केमिकल्सचे भालचंद्र पाटील, निनाद चांदोरकर, दीपिका चांदोरकर, डाॕ. अर्पणा भट यांनी केले.
मोहन वीणा, सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने समारोप
बालगंधर्व संगीत महोत्सतील व्दितीय समारोपाच्या सत्रात पद्मभुषण व कॕनिडीयन ग्रॕमी ॲवार्ड विजेते पिता पुत्र पं. विश्वमोहन भट व पं. सलिल भट यांच्या मोहन वीणा व सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने झाले. सुरूवातीला पंडीतजींनी स्वरचित विश्वरंजनी रागामध्ये आलाप, जोड , झाला, विलंबीत तिन तालात व मध्य व द्रुत लय तिन तालात सादर करून रसिकांना एका वेगळ्या रागाची अनुभूती रसिकांना दिली. १९९० दशकात अमेरिकेमध्ये पंडीतजींनी एका अल्बमची निर्मिती केली त्यामध्ये असलेली रचना “अ मिटींग बाय द रिव्हर” या रचनेसाठी ग्रॅमी ॲवार्ड दिले गेले हा ग्रॅमी ॲवार्ड सर्वप्रथम भारतात आणण्याचा मान पं. विश्वमोहन भट यांना मिळाला. त्याचसोबत राग जोग मधील एक उत्कृष्ट रचना सादर केली. ही रचनासुध्दा ग्रॕमी ॲवार्डमध्ये समाविष्ट होती. पंडीतजींच्या मैफिलाचा आणि २१ व्य बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप दोन्हीही कलावंतांनी जुगलबंदीच्या माध्यमातून वंदे मातरम् ने केला. त्यांच्याबरोबर तबल्याची संगत युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे बडोद्याचे हिंमाशू महंत यांनी केले.
रसिक श्रोत्यांचाही झाला गौरव
बालगंधर्व संगीत महोत्सवात या २१ व्या आर्वतनाच्या माध्यमातून ज्या रसिक श्रोत्यांनी ही २१ आवर्तने उपस्थित राहून हा महोत्सव काना- मनात साठवला आहे, अशा रसिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी व विश्वस्त प्रा.शरदचंद्र छापेकर यांच्याहस्ते कृतज्ञता गौरव करण्यात आला. यात इंद्रराव पाटील, दिगंबर महाजन, सुदिप्ता सरकार, मेजर नाना वाणी, देविदास पाटील तसेच मायटी ब्रदर्सच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे मिलींद थथ्थे यांचाही सन्मान झाला.
२२ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ ला
आभार प्रदर्शन करताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी पुढील वर्षी बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ होणार असल्याचे जाहीर केले. तसेच याच महोत्सवाची एक मैफल ‘अभंगवाणी’ च्या माध्यमातून रविवार दि.१५ जानेवारी २०२३ ला महात्मा गांधी उद्यानात सकाळी ६.३० आयोजित करण्यात येणार असल्याची माहीत त्यांनी दिली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले. गुरूवंदना मयूर पाटील यांनी म्हटली.
2023 मध्ये गुंतवणुकीसाठी 5 सॉलिड म्युच्युअल फंड ; नवीन वर्षाची गुंतवणूक धोरण जाणून घ्या
- प्रू. आयसीआयसीआय निफ्टी इंडेक्स फंड
- डीएसपी निफ्टी मिडकॅप 150 क्वालिटी 50 इंडेक्स फंड
- टाटा लार्ज आणि मिड कॅप
- कोटक मल्टी कॅप फंड
- प्रू आयसीआयसीआय मल्टी अॅसेट फंड