भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित

जळगाव दि.18 प्रतिनिधी– भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या प्रायोजनाने युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील 15 वर्षांपासून जळगाव शहरात तरुणींचा दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 15 ते 20 हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. विशेष करून महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय असते. यावर्षीसुद्धा मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे सायंकाळी 6.30 ते रात्री 9.00 वाजे दरम्यान तरुणींचा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुलींचे गोविंदा पथक राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्र परिसरात या एकमेव दहीहंडी उत्सवात विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो. दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजक प्रयत्नशील असतात.
तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अनिल जोशी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, पियुष हसवाल, राजेश नाईक आदी उपस्थित होते. यामध्ये तरूणींची दहीहंडी उत्सवाची कार्यकारीणी सर्वानुमते ठरविण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रितम शिंदे, उपाध्यक्ष-संदीप सूर्यवंशी, सचिवपदी प्रशांत वाणी, सहसचिव-पवन चव्हाण, खजिनदार-पियुष हसवाल, सहखजिनदार सागर सोनवणे, भटू अग्रवाल, सोशल मिडीया समन्वयक शुभम पुश्चा, सुरक्षा प्रमुख पियुष तिवारी, सदस्य- आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, समिर कावडीया, सैफ मनसुरी, विपीन कावडीया, अजय खैरनार, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, यश श्रीश्रीमाळ, गणेश भोई,  श्रेयस मुथा, मनजीत जांगीड, विनोद सैनी, इत्यादी.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साह

जळगाव दि.16 – विकास आणि विकासात्मक वाटचाली कडे मार्गक्रमण होण्यासाठी ड्रीप, स्प्रिंकलर्स, पाईपसह आधुनिक तंत्रज्ञान कंपनीतर्फे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. कंपनी आता अधिक संशोधनावर भर देणार असून शेतकऱ्यांना परिवर्तनशील होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जा व जैन सौलर कृषी पम्प बाजारात पुर्नप्रस्थापीत केले जाईल. टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातही सकारात्मक बदल केले जात आहेत. सध्या व्यवसायांमध्ये मशिन लर्निंग व एआय तंत्रज्ञान वापरले जात आहे. शेतीत मशीन लर्निंग (एमएल) आणि आर्टिफिशीयल इंटिजलेन्स (एआय) कसे वापरावे याचा विचार करुन संशोधन केले जाणार आहे. भविष्याचा वेध घेवून शेतीत परिवर्तनाच्या माध्यमातून उन्नती साध्य होणार आहे. सकारात्मक बदल होऊन अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे. त्यादृष्टीने जैन इरिगेशन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. असे मनोगत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले.

 

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्लास्टिक पार्कच्या पटांगणात झाली. याप्रसंगी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, शिषीर दलाल, घन:श्याम दास, नॅन्सी बॅरी, डॉ. एच. पी. सिंग, चीफ फायनान्शिअल ऑफिसर बिपीन वलामे, कंपनीचे सेक्रेटरी ए. व्ही. घोडगावकर व संचालक मंडळ तसेच जैन फार्मफ्रेश फूडचे संचालक अथांग जैन व जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. सभेला भागभांडवलदार, सहकारी उपस्थित होते. सर्वसाधारण सभेची सुरुवात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘नमन करो ये भारत है’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. रायसोनी मॅनेजमेंट आणि अनुभूती निवासी स्कूलचे विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण सभेत कामकाज अनुभवले. अन्मय जैन यांच्यासह विद्यार्थ्यांनी तयार केलेले ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर केले. सभेच्या कामकाजाच्या सुरवातीला वर्षभरात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मागील वर्षाचे लेखाजोखा पत्रक, नविन संचालकांची नियुक्त आणि निवृत्ती यासह आठ ठराव सर्वानुमूते पारित करण्यात आले.

 

या सभेत स्वतंत्र संचालक घन:श्याम दास व डॉ. एच. पी. सिंग, राधिका दुधाट यांची निवृत्ती जाहिर करण्यात आली. तर त्यांच्या जागी शिषीर दलाल व अशोक दलवाई यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. तर जॉनेस्ट बास्टीयन, नॅन्सी बॅरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूकीची घोषणा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते निवृत्त संचालक डॉ. एच. पी. सिंग, घन:श्याम दास यांचा स्मृतीचिन्ह व आठवणीतला अल्बम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली.

 

यावेळी मनोगतात डॉ. एच. पी. सिंग यांनी सांगितले की, ‘भावना प्रेम आणि शक्ती जिथे असेल तिथे ईश्वराची प्राप्ती होते. भवरलालजी जैन यांना त्यांच्या कार्यातूनही प्राप्त झाली. त्यामुळेच ते शेतकऱ्यांसाठी ईश्वर ठरले. जो पर्यंत भूक लागेल तोपर्यंत शेतीतून उत्पादन घेतले जाईल सोबतच मूल्यवर्धित सेवा घडत राहिल. त्यामुळे शेतकरी सुखी तर आपण सुखी ही मोठ्याभाऊंची भावना पुढील पिढीवर संस्कारीत झाली आणि हा विचार प्रेरणादायी ठरला. यातूनच जैन इरिगेशनशी भावनिकरित्या ऋणाबंध जोपासल्याचे’ डॉ. एच. पी. सिंग म्हणाले.

 

‘शिस्त, गुणवत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावहारिक पारदर्शकतेमुळे जैन इरिगेशनशी जुळलो. कृषी क्षेत्रात खूप आव्हाने आहेत मात्र शाश्वत लक्ष्य ठेवले तर त्यातही मोलाचे योगदान देता येऊ शकते. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देता येऊ शकते.’ असे मनोगत घन:श्याम दास यांनी व्यक्त केले.

 

मान्यवरांच्या उपस्थित जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञान व उत्पादनांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी Jains Connect हे कंपनीशी सर्वांना जोडणारं अॅप लॉच करण्यात आले. जैन इरिगेशनच्या संकल्प गीत चित्रफितही प्रदर्शित करण्यात आली. आभार अतुल जैन यांनी मानले.राष्ट्रगिताने समारोप झाला.

 

 

सौर कृषि पंप विभाग नव्याने कार्यान्वित

 

अनिल जैन पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अधिक जवळ जाण्यासाठी, त्यांच्याशी जुळन राहण्यासाठी सौर कृषी पंप विभागाची नव्याने सुरवात करण्यात येणार आहे. ठिबक, तुषार, पाईप हे व्यवसाय तर आहेत. त्याच्या जोडीला सौर कृषी पंपाची जोड महत्त्वाची ठरणार आहे. कृषी पंप व अपारंपारिक ऊर्जा यांचा सुरेख संगम घडवून त्यामाध्यमातून कंपनीचा महसूल वाढविण्याचा विचार ही व्यक्त केला. जगात २.५ मिटर इतक्या मोठ्या व्यासाचा पाईप जैन इरिगेशनद्वारे निर्माण केला होतो. डिस्लॅनिशेन प्रकल्पांमध्ये शंभर वर्ष टिकणारा हा पाईप भविष्यातील व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

78 वा स्वातंत्र्यदिन 2024: PM मोदींच्या भाषणाची ठळक वैशिष्ट्य

देशाने आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला आणि देशाला संबोधित केले. यंदाच्या भाषणात त्यांनी देशाचा विकास आणि तरुणांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला.

महत्त्वाचे मुद्दे:

* वैद्यकीय शिक्षणात मोठा बदल: PM मोदींनी घोषणा केली की देशात 75,000 नवीन वैद्यकीय जागा सुरू केल्या जातील. हा निर्णय देशातील डॉक्टरांची संख्या वाढवण्याच्या आणि आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

* एक देश, एक कायदा: पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याची वकिली केली. ते म्हणाले की UCC सर्व भारतीयांसाठी समानता आणेल.

* तरुणांवर भर : पंतप्रधान मोदींनी तरुणांना देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी प्रेरित केले. तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, असे ते म्हणाले.

* आत्मनिर्भर भारत: पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, भारताला जागतिक नेता बनवायचे असेल तर आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल.

* शेतकऱ्यांचा आदर: पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना देशाचे अन्नदाता म्हणून वर्णन केले आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

एकूणच, पंतप्रधान मोदींचे भाषण देशाच्या विकासावर आणि तरुणांच्या सक्षमीकरणावर केंद्रित होते. त्यांनी देशवासियांना एकजुटीने काम करण्याची आणि भारताला एक मजबूत राष्ट्र बनवण्याची प्रेरणा दिली.

इतर महत्त्वाचे मुद्दे:

* 11व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण : PM मोदींनी सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला.

*ज्ञान (गरीब, युवक, अन्नदाता आणि महिला): यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

* कोविड -19 साथीचा रोग: पंतप्रधान मोदींनी कोविड -19 साथीच्या रोगाविरूद्ध भारताच्या लढ्याचा उल्लेख केला आणि देशवासियांच्या धैर्याबद्दल त्यांचे आभार मानले.

हा आयपीओ शेअर बाजारात जोरदार एंट्रीने लिस्ट झाला, गुंतवणूकदार धास्तावले; पुढे काय करायचे?

Unicommerce eSolutions Listing: SoftBank समर्थित Unicommerce Unicommerce eSolutions कंपनी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार पदार्पण करून सूचीबद्ध झाली आहे. कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये 113% च्या प्रीमियमसह सूचीबद्ध आहेत. कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 108 रुपये होती. पण तुलनेत, कंपनी BSE वर 113% च्या प्रीमियमसह Rs 230 वर सूचीबद्ध आहे. त्याच वेळी, ते NSE वर 117.5% च्या प्रीमियमसह 235 वर सूचीबद्ध आहे.

Unicommerce eSolutions IPO लिस्टिंग नंतर काय करावे?
अनिल सिंघवी यांनी हा आयपीओ रु. 170-180 च्या श्रेणीत सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तवली होती. चांगल्या लिस्टिंग नफ्यासाठी आणि दीर्घ मुदतीसाठी त्यात पैसे गुंतवण्याचा सल्ला त्यांनी दिला. आता सूचीबद्ध केल्यानंतर, त्यांचा सल्ला आहे की अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी ते 200 च्या जवळ ठेवावे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना पुढील 2-3 वर्षांसाठी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

Unicommerce Solutions ला चांगला प्रतिसाद मिळाला
युनिकॉमर्स कंपनीला 168 पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. NSE डेटानुसार, IPO अंतर्गत जारी केलेल्या 1,40,84,681 समभागांच्या तुलनेत 2,37,11,72,994 समभागांसाठी बोली प्राप्त झाली. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भाग 252.46 पट सदस्यता घेण्यात आला, तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा (QIBs) भाग 138.75 पट सदस्य झाला. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (RII) सेगमेंट 130.99 पट सबस्क्राइब झाले.

बांगलादेश: अनुराग ठाकूर बांगलादेशच्या मुद्द्यावरून तापले, काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला

बांगलादेश संकट: लोकसभेत बोलताना भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की जेव्हा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पदभार स्वीकारला तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यास सांगितले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

जळगाव– येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने शहरातील जय भवानी मंडळ संचालित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस गिरीश कुळकर्णी यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीला माहिती असावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या इतिहासाचा अभ्यास करावा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरूषांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे सांगितले. तसेच तीन प्रश्नांची बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास पुस्तक भेट देण्यात आले. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात कुणाल घुगे (इ. १० वी), रमेश पाटील (इ. ८ वी) भारती चव्हाण (इ. ९ वी), वेदांत पाटील (इ. ९ वी), आयेशा पठाण (इ. १० वी) या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिल्याने त्यांने पुस्तक स्वरूपात बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. खंबायत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपशिक्षिका सौ. एच. एम. अत्तरदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अश्विन झाला, विश्वजित पाटील, शुभम व फिरदोस यांचेसह शिक्षक वृंदानी सहकार्य केले.

अनुभूती बालनिकेतनद्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास ओसवाल 

जळगाव दि. ४ प्रतिनिधी –  ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती बालनिकेतन ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली. हा आनंद म्हणजे भवरलाल जैन यांच्या स्वप्नपूर्तीचा आहे’असे मनोगत सेवादास दलिचंद ओसवाल यांनी व्यक्त केले.

मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आली. त्याच्या कोनशिला अनावरण व उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मदनलाल देसर्डा, रोहित बोहरा, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेंद्र मयूर, रमेशदादा जैन उपस्थित होते. यांच्यासह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, अनुभूती बालनिकेतनच्या प्रमुख गायत्री बजाज, डॉ. विश्वेश अग्रवाल, प्रा. अनिल राव, भरत अमळकर, प्रदीप रायसोनी, डॉ. शेखर रायसोनी, डॉ. वर्षा पाटील, मधुभाभी जैन, डॉ. राहुल महाजन, अनिष शहा, यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.

अंबिका जैन यांनी प्रास्ताविकातून अनुभूती बालनिकेतन सुरु करण्याबाबतचा उद्देश सांगितला. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या धर्तीवर भावनिकदृष्ट्या समाजाची निर्मिती व्हावी आणि एक दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी याच विचारधारेतून अनुभूती बालनिकेतनची सुरवात केल्याचे सौ. अंबिका जैन यांनी सांगितले.

भवरलालजी जैन यांच्या ‘सार्थक करुया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ या विचारांचे प्रतिक म्हणजे अनुभूती बालनिकेतन असल्याचे रोहित बोहरा यांनी म्हटले. गायत्री बजाज यांनी मॉन्टेसरी तत्वज्ञान काय आहे हे सांगितले. भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी वेगळे काही करता येईल का हा विचार करत होते त्याचे स्वप्न अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराच्या प्रयत्नातून पुर्ण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरवात हरिहंतो भगवतो.. या मंत्राने दलिचंद ओसवाल यांनी केली. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतनी शक्ती हमें दे ना दाता.. हम होंगे कामयाब हे गीत म्हटले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

अनुभूती बालनिकेतनचे वैशिष्ट्ये  – ‘अनुभूती बालनिकेतन’ मध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून संस्कारीत होतील. शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन आनंदाने ते बदल स्वीकारतील अशी शिक्षणपद्धती आहे. आजूबाजूच्या पर्यावरणासह आपल्यापेक्षा मोठ्यांकडून परस्परभावनेतून, व्यवहार ज्ञानासह आचरण करण्याची शिकवण घेता येईल. स्वयंनिरीक्षणातून, प्रात्यक्षिक शिक्षणातून पुस्तकांविना मुलांच्या बुद्धिकौशल्याचा विकास करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या असलेल्या यथोचित वस्तू वेगवेगळ्या देशांतून  ‘अनुभूती बालनिकेतन’ येथे उपलब्ध करुन दिल्या आहेत. खेळता-खेळता टेबल लर्न करणे, वाचता-वाचता Vocabulary (शब्दसंग्रह) वाढविणे, शब्दांची आणि वाक्यांची रचना करणे, जगाच्या नकाशातून भुगोल शिकणे, पेन-पेन्सील व कागदाचा अचूक वापर करून अक्षरांची ओळख करणे, गणितांचे कोडे सोडणे, जड फर्निचरच्या जागी, मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे अश्या अनेक गोष्टी येथे आहेत. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, स्वयंपाक करताना भाजीपाला निवडणे, धान्य निवडणे, बटन लावणे यासारख्या प्रत्यक्ष कृतींचा समावेश अनुभूती बालनिकेतनमधील शिक्षणामध्ये केला आहे. 

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत

जळगाव दि. ४ प्रतिनिधी –  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित स्व. ॲड. बबनभाऊ बाहेती  यांच्या स्मरणार्थ ३० ते ३१ जुलै दरम्यान कांताई हॉल येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष एकेरी आणि १८ व २१ वयोगटाखालील मूलं एकेरी चाचणी निवड अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा झाली. अॅड. रोहन बाहेती यांच्या पुढाकाराने पुरुष एकेरीतील सर्व विजेत्या खेळाडूंसाठी रोख पारितोषिके देण्यात आलीत.पारितोषीक वितरणाप्रसंगी ॲड. रोहन बाहेती, अरविंद देशपांडे,  ॲड. रवींद्र कुळकर्णी, रोहित  कोगटा, अरुण गावंडे  उपस्थित होते.

पुरुष एकेरी स्पर्धेत प्रथम आलेल्या जैन स्पोर्टस अॅकडमीचे सय्यद मोहसीन यांनी ३००० रोख पारोतोषिकाने, नईम अन्सारी द्वितीय याला २००० हजार रुपये रोख, तृतीय आलेल्या अताउल्लाह खान ( प्लाझा क्रीडा संस्था) व चतुर्थ आलेल्या  हबीब शेख ( एकता क्रीडा मंडळ) यांना १५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शाहरुख शेख  पिंप्राळा हुडको, रईस शेख  तमन्ना क्रीडा संस्था, नदीम शेख  बिजली क्रीडा संस्था, मुबश्शिर सय्यद प्लाझा क्रीडा संस्था हे सुद्धा विजयी झालेत. विजयी झालेल्या खेळाडूंची मुंबई येथे दि. १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ५८व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरता जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.

याच स्पर्धेतून दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबईला होणाऱ्या १८ व २१ वर्ष वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता यश धोंगडे, देवेंद्र शिर्के, हुझेफा शेख, उम्मेहानी खान, दुर्गेश्वरी धोंगडे आणि दानिश शेख यांची जळगाव जिल्हा संघात निवड  झाली आहे. स्पर्धेचे प्रमुख महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, प्रमुख पंच अब्दुल क़य्यूम ख़ान व शेखर नार्वरिया यानी काम पाहीले. जळगाव जिल्हा कॅरम संघटनेचे शाम कोगटा व नितिन बरडे यानी सर्व विजयी खेळाडूंचे  कौतूक केले

एक पेड मां के नाम – गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशनचा उपक्रम

वावडदा, जळगाव. दि. ३ (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान 5.0  अंतर्गत पृथ्वी या तत्त्वावर  वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करून वृक्ष लागवडी चा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस.  माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात  गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या  संयुक्त विद्यमानाने ने  हाती घेतला आहे.
वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत व एक पेड मां के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या 10 प्रकारची 50 झाडें मान्यवराच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी सेवानिवृत्त वन   अधिकारी तथा सल्लागार  वन,वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड चे राजेंद्र राणे  , माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सर एन. आर. दाणे सर शिक्षक ऐ. डी. पाकले सर,एम.डी.अहिरे मॅम,एम.आर. चौधरी,एस.बी. पाटील,ऐ. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते
प्रत्येक विध्यार्थ्यांने एक मुलं एक झाड ही संकल्पना प्रत्येक विध्यार्थ्यांने राबविली पाहिजे तसेच प्रत्येक विध्यार्थ्यांने आपल्या घरा जवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आव्हान विध्यार्थ्यांना करण्यात आले या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशन चे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले

जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत अमळनेरचा मृगांक पाटील प्रथम

जळगाव दि. ३१ प्रतिनिधी :-  जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे  सात वर्षाखाली खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन दिनांक ३१ जुलै ला  दोन वाजता करण्यात आले होते.   स्पर्धेत पहिल्या दोन विजेत्या खेळाडूंची निवड वसई जिल्हा पालघर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात करण्यात आली.
स्पर्धा या स्विस लीग पद्धतीने एकूण पाच फेऱ्यांत घेण्यात आली. वसई येथे दि.३ ते ४ ऑगस्ट येथे राज्यस्तरीय स्पर्धा होईल. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत खालील पहिल्या पाच खेळाडूंना बक्षीस देण्यात आली. मृगांग पाटील पाच गुण,द्वितीय कबीर श्रीकांत दळवी चार गुण, तिसरा क्रमांक हार्दिक रावलानी तीन गुण, विराज गाला दोन गुण, शुभुया शिरुडे स्पर्धा कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ येथे संपन्न झाल्या.
स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, नथू सोमवंशी, आकाश धनगर, सोमदत्त तिवारी  काम केले. अमरसिंग बोरसे, नथू सोमवंशी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिक प्रदान करण्यात आली.  जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे  अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतूक केले.
जॉईन Trading Buzz
Exit mobile version