गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सहा उमेदवारांची पोलीस दलासाठी निवड  

जळगाव दि. २९ (प्रतिनिधी) – वाकोद येथील गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सहा जणांची पोलीस दलासाठी स्तुत्य निवड झालेली आहे. जळगाव पोलीससाठी रितेश पाटील, कल्पेश मोहने यांची, गजानन मगर यांची धाराशिव पोलीस दलात, वाकोद येथील तुषार पांढरे, अभय पांढरे यांची पुणे एसआरपीएफ तर भूषण पाटील दौंड एसआरपीएफ पोलीस दलासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

शिपाई, एम.पी.एस.सी. युपीएस.सी, ग्रामसेवक, कृषिसेवक, आरोग्यं सेवक इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शक, पुस्तके व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या गोष्टीचा लाभ या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. केवळ सहा महिन्यांमध्ये सुरू झालेल्या या गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे यश म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया अतुल जैन यांनी व्यक्त केली. हे केंद्र सुरू करण्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व अतुल जैन यांची प्रेरणा लाभलेली आहे.  

कुठलीही व्यक्ती असो ती व्यक्ती जन्माला आली की ऋणी बनते. त्यात मातृऋण, पितृऋण, गुरुऋण आणि मातृभूमीचे ऋण असते. मातृभूमीचे ऋण तर सर्वात मोठे असते त्याच ऋणाची उतराई होण्यासाठी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन आणि जैन परिवार वाकोद गावासाठी ग्राम विकासाचे काम वा तत्सम गोष्टी, कल्याणाचे काम करत आले आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका म्हणता येईल. अथक परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर या केंद्रातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच झालेल्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पोलीस दलाच्या निवड चाचण्या व परीक्षा झाल्या. पोलीस भरती सराव परीक्षेचे, शारीरीक क्षमतेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सहा उमेदवारांनी आपल्या बौध्दीक व शारीरीक कौशल्याची चुणूक दाखविली आहे. रितेश पाटील (१५० पैकी १३९), कल्पेश मोहने (१५० पैकी १३८),  गजानन मगर (१५० पैकी १३०), तुषार पांढरे (२०० पैकी १८३) आणि अभय पांढरे (२०० पैकी १९०) भूषण पाटील (२०० पैकी १८६) असे गुण प्राप्त केले आहेत.  

२६ जानेवारी २०२४ ला स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांचे शिबीर घेण्यात आले त्यात प्रमुख पाहुणे म्हणून कपिल पवार साहेब आले होते.  त्याच कार्यक्रमात या केंद्राचे अनौपचारिकपणे उद्घाटन झाले. या केंद्राचे प्रमुख जयदीप पाटील असून समन्वयक म्हणून पल्लवी पाटील काम पाहत आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीत विविध विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील ठेवण्यात आले होते. त्यात अशोक बाविस्कर (मराठी व्याकरण), देवल पाटील (सामान्य अध्ययन), अक्षय देवरे (पॉलीटिकल सायन्स), जयदीप पाटील (अंकगणित), देवलसिंग पाटील (जनरल नॉलेज) आणि दिलीप पाटील यांनी सर्वसमावेशक विषयांवर मार्गदर्शन केले. या केंद्रामध्ये भविष्यात युपीएससी, एमपीएससी बाबत पुस्तके उपलब्धते सोबतच  तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.

शिवतीर्थ मैदानावर तरूणींचा दहिहंडी महोत्सव

जळगाव दि. २६ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सव उद्या (दि. २७) ला शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान होईल. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व शहरातील मान्यवर उपस्थित राहतील.

क्रेनच्या सहाय्याने आठ दहिहंड्या उभारण्यात येतील. यात  दहिहंडी फोडण्याचा मान फक्त महिला गोविंदा पथकांना आहे. दहिहंडी सारख्या साहसी खेळात महिलांचा सहभाग वाढावा हा या आयोजनामागील उद्देश आहे. नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल असे एकूण आठ महिलांचे गोविंदा पथक सहभागी होतील.

यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश आहे. यासह शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक वादन करतील. प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी करतील. यासह लेझर शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरणासह ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालगोपालांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था असून जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे विराज कावडीया यांनी केले आहे.

गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सहा उमेदवारांची पोलीस दलासाठी निवड  

जळगाव दि. २९ (प्रतिनिधी) – वाकोद येथील गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सहा जणांची पोलीस दलासाठी स्तुत्य निवड झालेली आहे. जळगाव पोलीससाठी रितेश पाटील, कल्पेश मोहने यांची, गजानन मगर यांची धाराशिव पोलीस दलात, वाकोद येथील तुषार पांढरे, अभय पांढरे यांची पुणे एसआरपीएफ तर भूषण पाटील दौंड एसआरपीएफ पोलीस दलासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

शिपाई, एम.पी.एस.सी. युपीएस.सी, ग्रामसेवक, कृषिसेवक, आरोग्यं सेवक इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शक, पुस्तके व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या गोष्टीचा लाभ या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. केवळ सहा महिन्यांमध्ये सुरू झालेल्या या गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे यश म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया अतुल जैन यांनी व्यक्त केली. हे केंद्र सुरू करण्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व अतुल जैन यांची प्रेरणा लाभलेली आहे.  

कुठलीही व्यक्ती असो ती व्यक्ती जन्माला आली की ऋणी बनते. त्यात मातृऋण, पितृऋण, गुरुऋण आणि मातृभूमीचे ऋण असते. मातृभूमीचे ऋण तर सर्वात मोठे असते त्याच ऋणाची उतराई होण्यासाठी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन आणि जैन परिवार वाकोद गावासाठी ग्राम विकासाचे काम वा तत्सम गोष्टी, कल्याणाचे काम करत आले आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका म्हणता येईल. अथक परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर या केंद्रातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच झालेल्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पोलीस दलाच्या निवड चाचण्या व परीक्षा झाल्या. पोलीस भरती सराव परीक्षेचे, शारीरीक क्षमतेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सहा उमेदवारांनी आपल्या बौध्दीक व शारीरीक कौशल्याची चुणूक दाखविली आहे. रितेश पाटील (१५० पैकी १३९), कल्पेश मोहने (१५० पैकी १३८),  गजानन मगर (१५० पैकी १३०), तुषार पांढरे (२०० पैकी १८३) आणि अभय पांढरे (२०० पैकी १९०) भूषण पाटील (२०० पैकी १८६) असे गुण प्राप्त केले आहेत.  

२६ जानेवारी २०२४ ला स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांचे शिबीर घेण्यात आले त्यात प्रमुख पाहुणे म्हणून कपिल पवार साहेब आले होते.  त्याच कार्यक्रमात या केंद्राचे अनौपचारिकपणे उद्घाटन झाले. या केंद्राचे प्रमुख जयदीप पाटील असून समन्वयक म्हणून पल्लवी पाटील काम पाहत आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीत विविध विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील ठेवण्यात आले होते. त्यात अशोक बाविस्कर (मराठी व्याकरण), देवल पाटील (सामान्य अध्ययन), अक्षय देवरे (पॉलीटिकल सायन्स), जयदीप पाटील (अंकगणित), देवलसिंग पाटील (जनरल नॉलेज) आणि दिलीप पाटील यांनी सर्वसमावेशक विषयांवर मार्गदर्शन केले. या केंद्रामध्ये भविष्यात युपीएससी, एमपीएससी बाबत पुस्तके उपलब्धते सोबतच  तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.

शिवतीर्थ मैदानावर आज तरूणींचा दहिहंडी महोत्सव

जळगाव दि. २६ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सव उद्या (दि. २७) ला शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान होईल. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व शहरातील मान्यवर उपस्थित राहतील.

क्रेनच्या सहाय्याने आठ दहिहंड्या उभारण्यात येतील. यात  दहिहंडी फोडण्याचा मान फक्त महिला गोविंदा पथकांना आहे. दहिहंडी सारख्या साहसी खेळात महिलांचा सहभाग वाढावा हा या आयोजनामागील उद्देश आहे. नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल असे एकूण आठ महिलांचे गोविंदा पथक सहभागी होतील. यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश आहे. यासह शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक वादन करतील.

प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी करतील. यासह लेझर शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरणासह ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालगोपालांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था असून जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे विराज कावडीया यांनी केले आहे.

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

जळगाव दि. २५ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ ला शिवतीर्थ मैदान जळगाव येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान तरूणींचा दहिहंडी महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. आय. रायसोनी महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल असे एकूण आठ महिलांचे गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश आहे. यासह शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक वादन करणार आहेत.

विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक देणार आहेत. प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करणार आहेत. यासह लेझर शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरण होणार आहे. ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

क्रेनच्या सहाय्याने आठ दहिहंड्या उभारण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हा एकमेव तरूणींचा दहिहंडी महोत्सव आहे ज्या दहिहंडी फोडण्याचा मान फक्त आणि फक्त महिला गोविंदा पथकांना देण्यात येतो. दहिहंडी सारख्या साहसी खेळात महिलांचा सहभाग वाढावा हा या आयोजनामागील उद्देश आहे. आयोजनाचे हे १६ वे वर्ष असून जळगावकर नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालगोपालांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. असे  युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत- कामिनी अमृतकर 

जळगाव दि. २४ (प्रतिनिधी) – ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे. कवितांचा अनमोल ठेवा त्यांनी आपल्यासाठी सोडलेला आहे. त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले…’ असे गौरोद्गार चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका कामिनी अमृतकर यांनी काढले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४४ वी जयंती साजरी झाली त्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमास बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, शहरातील साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील  विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जैन इरिगेशनचे सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. आरंभी तुळशीचे रोप व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन केले गेले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त निष्णात हृदयरोगतज्ज्ञ दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  गायिका मनिषा कोल्हे यांनी ‘बहिणाबाईंच्या माझी माय सरसोती…’ या गाण्याचे सुश्राव्य संगीतासह नेहमीपेक्षा वेगळ्या चालीचे गीत सादर केले. शीतल पाटील यांनी ‘संकटाले देऊ मात..’ ही स्वतःची कविता सादर केली. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजीडीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी देखील बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. यात  प्राजक्ता ढगे, नेहा पावरा, गायत्री कदम यांचा सहभाग होता. शानभाग विद्यालयाचे शिक्षक उमेश इंगळे, जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन, सौ. प्रज्ञा नांदेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

“माह्यी माय सरसोती!” पुस्तक प्रदर्शन – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित “माह्यी माय सरसोती!”  पुस्तकांच्या  प्रदर्शनाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने उद्घाटन झाले. ज्या पत्री पेटीत सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाई चौधरीच्या कविता ठेवल्या होत्या त्या पेटीतून पाच निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांनी बहिणाबाईंचे पुस्तक बाहेर काढावे अशी जैन इरिगेशनचे ग्रंथपाल व चौधरी परिवारातील अशोक चौधरी यांची आगळी वेगळी संकल्पना होती. यात स्मिता चौधरी (चौधरी परिवारातील सदस्य), कामिनी अमृतकर (शिक्षिका), सौ. मनिषा कोल्हे (गायिका), शीतल शांताराम पाटील (साहित्यीक) आणि प्रिया चौधरी (गृहिणी) यांचा समावेश होता. आर. आर. शाळेतील कला शिक्षक स्व. सुधाकर संधानशिवे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारीत ९ ग्रंथांचे मुखपृष्ठ साकारले, त्यांच्या पुस्तकांचा संच त्यांचे सुपुत्र क्रियेटीव्ह आर्टिस्ट योगेश संधानशिवे यांनी बहिणाई स्मृति ग्रंथालयास सस्नेह भेट दिले. त्यांचा सत्कार विश्वस्त दिनानाथ चौधरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन किशोर कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक अशोक चौधरी, प्रदीप पाटील, सुभाष भंगाळे, ज्ञानेश्वर सोनार यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, विजय लुल्हे त्याच प्रमाणे कैलास चौधरी, दिलीप चौधरी, प्रिया चौधरी, काजल चौधरी, कविता चौधरी, नीलिमा चौधरी समस्त चौधरी वाड्यातील सदस्य उपस्थित होते.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट तर्फे आज चौधरी वाड्यात कार्यक्रम

जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी) –  बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची शनिवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता  १४४ वी जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमासाठी खामगाव जि. बुलडाणा येथील साहित्यिक प्रा. देवबा शिवाजी पाटील, चाळीसगावच्या सौ. कामिनी अमृतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, समस्त चौधरी परिवार, साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील  विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास येण्याचे करावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

कान्हदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात सन्मानाचे स्थान आहे. बहिणाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या, काव्यातील साधेपणा, सोपी अन् हृदयाला भिडणारी भाषा, भावनांमध्ये प्रांजळपणा, शब्दाआड रुजलेला माणूसकीचा ओलावा, निसर्ग, पशु-पक्षी, शेती माती आणि कष्टांवर अतुट प्रेमामुळे त्यांच्या कविता अगदी सहजरीत्या बालपणापासूनच घराघरात पाठ्यपुस्तकांद्वारे, गाण्याच्या माध्यमातून पोहोचली.

प्रमुख पाहुणे प्रा. देवबा शिवाजी पाटील, खामगाव, जि. बुलढाणा, सुप्रसिद्ध साहित्यिक, आजपर्यंत एकूण ५९ पुस्तके प्रकाशित, विषय – धार्मिक स्तोत्रे, संत साहित्य, काव्यसंग्रह, देशभक्ती, विज्ञान, निसर्ग, कथासंग्रह, शैक्षणिक, युवांसाठी लेखसंग्रह, सामाजिक वैचारिक लेखसंग्रह, शालोपयोगी साहित्य, बालकुमार कादंबरी, कथासंग्रह इ. असून अनेक मानाचे (६)  साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात विशेष सन्मान म्हणजे साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या ग्रंथावर समीक्षा ग्रंथ ही प्रकाशित झाली आहेत तसेच त्यांच्या काव्यसंग्रहांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ते साहित्य कुंज या नियतकालिकाचे संपादक आहेत. साहित्य कुंज या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी अनेक काव्य-लेख-कथा स्पर्धांचे व विद्यार्थी साहित्य मेळाव्यांचे आयोजन केले आहे. ते खामगाव येथे उन्मेष नावाचे वाचनालय ही चालवितात. प्रमुख पाहुण्यांसोबत चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका, निवेदक सौ. कामिनी सुनिल अमृतकर या देखील उपस्थित असतील. या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन “माह्यी माय सरसोती!” याचे ही आयोजन केले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा असे ट्रस्टतर्फे समन्वयक अशोक चौधरी यांनी आवाहन केले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण

जळगाव दि. २० प्रतिनिधी –  गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरे याच्या संयुक्त विद्यमाने कै.रामदास त्र्यंबक दिघे-पाटील  यांच्या स्मरणार्थ शाळेच्या परिसरात विविध प्रजातीचे ८५ रोपाची लागवड करण्यात आली.  याप्रसंगी  जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे राजेंद्र राणे, शाळेचे माजी विद्यार्थी अनिल पाटील, दापोरेचे सरपंच महादवराव गवंदे , गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ, शाळेचे शिक्षकांसह  गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार, वन विभाग व सामाजिक वनीकरणाचे क्षेत्रीय अधिकारी देविदास जाधव, अनिल साळुंखे, संदीप पाटील, भरत पवार आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांमध्ये राजेंद्र राणे यांनी वृक्ष संवर्धना बाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिली. अनिल पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ वृक्षारोपणाचा उपक्रम घेतला असून  शाळेच्या परिसरात जे वृक्ष लागवड केली आहे त्याची जबाबदारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसह सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगितले. दापोरे गावात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून जनहिताचे विविध उपक्रम राबविले जात आहे. सूत्रसंचालन श्री.समाधान पाटील यांनी केले. श्री. राहुल मोरे यांनी आभार मानले.

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ सुभाष चौधरी अनंतात विलीन

 जळगाव – ता ( 19 )  येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ सुभाष भास्कर चौधरी ( वय 79 )  यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर मोक्ष धाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले.  यावेळो माजी खासदार डॉ उल्हास पाटील, आमदार शिरोष चौधरी, केसीई चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन , प्राचार्य अनिल राव , ऍड प्रकाश पाटील, माजी महापौर नितीन लद्धा, भोरगाव लेवा पंचायत चे सदस्य ऍड संजय राणे  आर्किटेक्ट दिलीप कोल्हे, जैन परिवारातील सर्व सदस्य, कंपनी चे सहकारी ,  शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, वकील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार डॉ उल्हास पाटील, जैन इरिगेशन चे उपाध्यक्ष अनिल जैन, चौधरी परिवाराच्या वतीने राजीव चौधरी यांनी भावना व्यक्त केल्यात . डॉ चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन  रुग्ण सेवा केली.
डॉ चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते यासह  बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठा चे मॅनेजमेंट कौन्सिल चे सदस्य तसेच  सिनेट सदस्य , महावीर सहकारी बँकेचे संचालक होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

जळगाव दि.१४ प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहकार्य लाभले आहे.

याप्रसंगी एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे साठा अधिक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) महेश ढाके, साठवणूक विभागाच्या सहाय्यक अधिक्षक अर्चना मेढे, एल. एम. पवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जैव विविधत जपता यावी यासाठी वृक्षारोपणासह संवर्धनाची मोहिम हाती घेतली आहे. या सृजनशील उपक्रमात जळगाव हरित करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. राज्य वखार महामंडळ येथे झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी प्रास्ताविकात मदन लाठी यांनी उपक्रमाविषयी सांगितले.

सुधीर पाटील यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. अर्चना मेढे यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशतर्फे मागील वर्षी लावण्यात आलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे जोपासली असून ती सावली देत आहे. आज लावलेली झाडांची निगा सर्वांच्या सहकार्यातून राखणार असल्याची हमीसुद्धा त्यांनी दिली. एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया यांनी झाड हे ऑक्सीजन देऊन मनुष्याला जगविण्याचे कार्य करते, त्यामुळे आज वृक्ष जगवले तरच आपण जगू शकू असे सांगत, वृक्षारोपण करुन ते जगविण्याचे आवाहन केले तसेच  गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम खूपच कौतूकास्पद आहे यात सहभागी होता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे उमेश सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, वखार महामंडळाच्या शोभा सोनवणे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version