Tag: trading buzz
अनुभूती बालनिकेतनद्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास ओसवाल
जळगाव दि. ४ प्रतिनिधी – ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती बालनिकेतन ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली. हा आनंद म्हणजे भवरलाल जैन यांच्या स्वप्नपूर्तीचा आहे’असे मनोगत सेवादास दलिचंद ओसवाल यांनी व्यक्त केले.
मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आली. त्याच्या कोनशिला अनावरण व उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मदनलाल देसर्डा, रोहित बोहरा, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेंद्र मयूर, रमेशदादा जैन उपस्थित होते. यांच्यासह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, अनुभूती बालनिकेतनच्या प्रमुख गायत्री बजाज, डॉ. विश्वेश अग्रवाल, प्रा. अनिल राव, भरत अमळकर, प्रदीप रायसोनी, डॉ. शेखर रायसोनी, डॉ. वर्षा पाटील, मधुभाभी जैन, डॉ. राहुल महाजन, अनिष शहा, यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अंबिका जैन यांनी प्रास्ताविकातून अनुभूती बालनिकेतन सुरु करण्याबाबतचा उद्देश सांगितला. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या धर्तीवर भावनिकदृष्ट्या समाजाची निर्मिती व्हावी आणि एक दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी याच विचारधारेतून अनुभूती बालनिकेतनची सुरवात केल्याचे सौ. अंबिका जैन यांनी सांगितले.
भवरलालजी जैन यांच्या ‘सार्थक करुया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ या विचारांचे प्रतिक म्हणजे अनुभूती बालनिकेतन असल्याचे रोहित बोहरा यांनी म्हटले. गायत्री बजाज यांनी मॉन्टेसरी तत्वज्ञान काय आहे हे सांगितले. भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी वेगळे काही करता येईल का हा विचार करत होते त्याचे स्वप्न अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराच्या प्रयत्नातून पुर्ण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरवात हरिहंतो भगवतो.. या मंत्राने दलिचंद ओसवाल यांनी केली. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतनी शक्ती हमें दे ना दाता.. हम होंगे कामयाब हे गीत म्हटले. राष्ट्रगीताने समारोप झाला.
अनुभूती बालनिकेतनचे वैशिष्ट्ये – ‘अनुभूती बालनिकेतन’ मध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून संस्कारीत होतील. शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन आनंदाने ते बदल स्वीकारतील अशी शिक्षणपद्धती आहे. आजूबाजूच्या पर्यावरणासह आपल्यापेक्षा मोठ्यांकडून परस्परभावनेतून, व्यवहार ज्ञानासह आचरण करण्याची शिकवण घेता येईल. स्वयंनिरीक्षणातून, प्रात्यक्षिक शिक्षणातून पुस्तकांविना मुलांच्या बुद्धिकौशल्याचा विकास करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या असलेल्या यथोचित वस्तू वेगवेगळ्या देशांतून ‘अनुभूती बालनिकेतन’ येथे उपलब्ध करुन दिल्या आहेत. खेळता-खेळता टेबल लर्न करणे, वाचता-वाचता Vocabulary (शब्दसंग्रह) वाढविणे, शब्दांची आणि वाक्यांची रचना करणे, जगाच्या नकाशातून भुगोल शिकणे, पेन-पेन्सील व कागदाचा अचूक वापर करून अक्षरांची ओळख करणे, गणितांचे कोडे सोडणे, जड फर्निचरच्या जागी, मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे अश्या अनेक गोष्टी येथे आहेत. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, स्वयंपाक करताना भाजीपाला निवडणे, धान्य निवडणे, बटन लावणे यासारख्या प्रत्यक्ष कृतींचा समावेश अनुभूती बालनिकेतनमधील शिक्षणामध्ये केला आहे.
जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत
जळगाव दि. ४ प्रतिनिधी – महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित स्व. ॲड. बबनभाऊ बाहेती यांच्या स्मरणार्थ ३० ते ३१ जुलै दरम्यान कांताई हॉल येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष एकेरी आणि १८ व २१ वयोगटाखालील मूलं एकेरी चाचणी निवड अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा झाली. अॅड. रोहन बाहेती यांच्या पुढाकाराने पुरुष एकेरीतील सर्व विजेत्या खेळाडूंसाठी रोख पारितोषिके देण्यात आलीत.पारितोषीक वितरणाप्रसंगी ॲड. रोहन बाहेती, अरविंद देशपांडे, ॲड. रवींद्र कुळकर्णी, रोहित कोगटा, अरुण गावंडे उपस्थित होते.
पुरुष एकेरी स्पर्धेत प्रथम आलेल्या जैन स्पोर्टस अॅकडमीचे सय्यद मोहसीन यांनी ३००० रोख पारोतोषिकाने, नईम अन्सारी द्वितीय याला २००० हजार रुपये रोख, तृतीय आलेल्या अताउल्लाह खान ( प्लाझा क्रीडा संस्था) व चतुर्थ आलेल्या हबीब शेख ( एकता क्रीडा मंडळ) यांना १५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शाहरुख शेख पिंप्राळा हुडको, रईस शेख तमन्ना क्रीडा संस्था, नदीम शेख बिजली क्रीडा संस्था, मुबश्शिर सय्यद प्लाझा क्रीडा संस्था हे सुद्धा विजयी झालेत. विजयी झालेल्या खेळाडूंची मुंबई येथे दि. १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ५८व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरता जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.
याच स्पर्धेतून दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबईला होणाऱ्या १८ व २१ वर्ष वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता यश धोंगडे, देवेंद्र शिर्के, हुझेफा शेख, उम्मेहानी खान, दुर्गेश्वरी धोंगडे आणि दानिश शेख यांची जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे. स्पर्धेचे प्रमुख महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, प्रमुख पंच अब्दुल क़य्यूम ख़ान व शेखर नार्वरिया यानी काम पाहीले. जळगाव जिल्हा कॅरम संघटनेचे शाम कोगटा व नितिन बरडे यानी सर्व विजयी खेळाडूंचे कौतूक केले
एक पेड मां के नाम – गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशनचा उपक्रम
जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी
मुंबई, जळगाव दि. ३१ (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा (EBITDA-इबीडा) १८०.८ कोटी रुपयांवर पोहोचला.
“यापूर्वी सांगितल्याप्रमाणे Q1FY25 चा महसूल कमी अपेक्षीत होता आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम दिसला. मुख्यतः जल जीवन मिशनच्या संस्थात्मक व्यवसायामुळे देशांतर्गत विक्री कमी झाल्यामुळे एकत्रित महसूल (उत्पन्न) सुमारे १३ टक्क्यांनी घटला. धोरणात्मक निर्णयाने ठरल्याप्रमाणे आम्ही प्रकल्प व्यवसाय कमी करत आहोत.
ऐतिहासिकदृष्ट्या, पावसाच्या काळात सूक्ष्म सिंचनासाठी व्यवसाय मंदावलेला असतो. तथापि, चांगला मान्सून आणि अलीकडील अर्थसंकल्पात कृषी, सिंचन क्षेत्र, मायक्रो, स्मॉल व मीडियम एन्टरप्रायजेस आणि कृषी-संबंधित व्यवसायांना मदत/अर्थसहाय्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मागणीचे पुनरुज्जीवन होऊन मंदावलेली मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आम्हाला आमच्या सर्व कार्यक्षेत्रांतील व्यवसायामध्ये चांगल्या व्यवसाय संधींची आशा आहे. या पार्श्वभूमिवर कंपनी शाश्वत वाढ करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे,” असे जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.
योगासना स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विवेक सूर्यवंशी याला सिल्वर मॅडेल
जळगाव दि. २९ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा योगासना स्पोर्टस असोसिएशन व सोहम डीपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी यांच्या मार्फत जिल्हास्तरीय योगासना स्पोर्टस चॅम्पीयनशीप २०२४-२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात सब ज्युनिअयर मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली, सिनिअर मुले व मुली अशा चार गटात ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ट्रॅडिशनल योगा, आर्टीस्टिक सिंगल व पेयर, रिदिमिक पेयर अशा ४ प्रकारात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयअम प्रायमरी व सेकंडरी स्कुल मधील सहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
ट्रॅडिशनल योगासन या प्रकारात पाच आसने कंपलसरी व दोन आसने ऑप्शनल घ्यावी लागतात. कंपलसरी आसन प्रत्येक आसनात ४५ सेकंद स्थिरता ठेवावी लागते आणि ऑप्शनल आसणे १५ सेकंद स्थिर ठेवावे लागते. या योगा प्रकारात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचा इयत्ता ६ वीतील विद्यार्थी विवेक अमोल सूर्यवंशी याने सिल्वर मॅडेल प्राप्त केले. पारितोषिक समारंभात विजेत्यांना मु. जे. महाविद्यालयाचे जिमखाना विभाग प्रमुख चेतन महाजन, नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर गौरव जोशी, सोहम योग व नॅचरोपॅथीचे संचालक देवानंद सोनार यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
दरम्यान या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जळगाव जिल्हा योगासना स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मोहगावकर व मु. जे. महाविद्यालयाचे बेलोरकर उपस्थित होते. जळगाव जिल्हा योगासन स्पोटर्स असोशिएशनचे सचिव पंकज खाजबागे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. विवेक सूर्यवंशीच्या या यशामुळे संगमनेर येथे होणाऱ्या ५व्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यास योग प्रशिक्षक स्मिता बुरकुल यांचे मार्गदर्शन लाभले. त्याला पुढील यशासाठी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, क्रीडा प्रशिक्षक श्वेता कोळी, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् च्या निकीता पवार व लोकेश महाजन यांना रौप्य
जळगाव दि.२९ प्रतिनिधी :– तायक्वांडो असोसिएशन बिड व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ते २७ दरम्यान बिड येथे ३४ व्या कनिष्ठ (ज्युनियर) मुलं व मुली यांच्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्जवलन करून करण्यात आले. यावेळी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश करा, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रवीण बोरसे हे उपस्थित होते.
या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता. मुलींच्या ५२ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कु. निकीता दिलीप पवार हिने रौप्य पदक प्राप्त केले. रावेर तालुका असोसिएशनचा लोकेश महाजन यानेसुद्धा रौप्यपदक पटकावले त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर जळगाव, तसेच जयेश कासार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी विजेता
बॅडमिंटन तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश
जळगाव दि. २८ प्रतिनिधी – जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते. मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मनीषा भिडे व रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मंजुषा देशमुख उपस्थित होते.
अनुभूती निवासी स्कूलने “जळगाव तालुका आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत २०२४-२५” मध्ये चार विजेतेपदे जिंकली. स्पर्धेत, १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात तसेच १९ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. याव्यतिरिक्त, १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या श्रेणींमध्ये चौथे स्थान अनुभूती स्कूलने पटकावले.
तालुकास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघाची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांना मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया, सह प्रशिक्षक दीपिका ठाकूर, तसेच क्रीडा शिक्षक शशिकांत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. विजयी झालेल्या संघ व निवड झालेल्या खेळाडूंचे अनुभूती निवासी स्कूल चे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास , व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यशस्वीतेसाठी मुख्य पंच किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जाझीब शेख, पुनम ठाकूर, ईशांत साळी, हमजा खान, अक्षद पगारीया, मेहर लाडके, ओम अमृतकर, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, आरोही परांजपे, चिन्मय पाटीदार, मशरुफ शेख, अर्ष शेख यांनी सहकार्य केले.
अंतिम निकाल असा
१७ वर्षांखालील मुले – अनुभूती स्कूल वि. वि. रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल स्कोअर :- (२-१)
१७ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल वि. वि. किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल स्कोअर : – (२-१)
१९ वर्षांखालील मुले – अनुभूती स्कूल वि. वि. जी एच रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय स्कोअर :- (२-०)
१९ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल वि. वि. जी एच रायसोनी पब्लिक स्कूल स्कोअर :- (२-०)