ट्रेडिंग बझ – गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. अवघ्या चार दिवसांत सोने 1759 रुपयांनी महागून 52281 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीही 2599 रुपयांनी वाढून 61354 रुपयांवर पोहोचली. त्याच वेळी, एमसीएक्सवर सोन्याचा भाव एका आठवड्यात सुमारे 3 टक्क्यांनी वाढला, तर चांदीनेही 2 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढ हे कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 5.4 टक्क्यांनी वाढून 1771 डॉलर प्रति औंस आणि चांदी 4 टक्क्यांनी वाढून 21.70 डॉलर प्रति औंसवर पोहोचली.
भाव वाढतच आहे :-
IBJA इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, 4 नोव्हेंबर रोजी सराफ बाजारात सोने 50522 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्याचवेळी चांदीचा भाव 58755 रुपये प्रति किलो होता. यानंतर आज सोमवारपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे.
सोन्या-चांदीचे भाव का वाढत आहेत :-
सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉलर निर्देशांकातील घसरण. अमेरिकन डॉलर निर्देशांक 106.41 या 12 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. या निर्देशांकात युरो, येन, पाउंड आणि कॅनेडियन डॉलरच्या तुलनेत अमेरिकन डॉलर कमकुवत झाला आहे. याशिवाय क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या घसरणीनेही सोन्या-चांदीच्या किमतींना आधार दिला आहे. यासोबतच सोन्या-चांदीच्या वाढीच्या प्रमुख कारणांमध्ये अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीतील घसरण यांचा समावेश आहे. अमेरिकेत वार्षिक आधारावर चलनवाढ नऊ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.