ट्रेडिंग बझ – तीन दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर त्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोने खरेदीचे नियोजन करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये संमिश्र कल दिसून आला आणि सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये घसरण झाली. 16 जानेवारीला 56,883 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे.
चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते :-
तज्ञांचे मत आहे की, फेब्रुवारीपर्यंत सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा विक्रम केला होता. गुरुवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, दुपारी 1 च्या सुमारास सोन्याचा भाव 39 रुपयांनी घसरून 56325 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तसेच चांदीचा भाव 430 रुपयांनी घसरून 67797 रुपयांवर पोहोचला. बुधवारच्या सत्रात सोने 56325 रुपये आणि चांदी 67797 रुपयांवर बंद झाली होती.
सराफ बाजारात दोन्ही धातू कोसळले :-
गुरुवारी सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्हीच्यां दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) गुरुवारी जाहीर केलेल्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 107 रुपयांनी घसरून 56642 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीचा दर काल संध्याकाळी बंद भावापेक्षा 1730 रुपयांच्या घसरणीसह 67264 रुपयांवर दिसला. एकाच दिवसातील चांदीच्या दरातील ही सर्वात मोठी घसरण आहे.
गुरुवारी म्हणजेच आज व्यवहारादरम्यान, 23 कॅरेट सोन्याचा दर 56415 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 51884 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 42482 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. याआधी बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 56755 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.