ठाणांग सूत्र आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार- प.पू.विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

जळगाव, दि. ६ (प्रतिनिधी) – ‘ठाणांग सूत्र’ आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार आलेला आहे. आपण वाचन संस्कार जपले पाहिजे, असे आवाहन आचार्यभगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी केले.  ‘संपर्क’, ‘सहवास’, ‘सान्निध्य’ आणि ‘संबंध,’ ‘प्रेम’, ‘प्रेरणा,’ आणि  ‘प्रोत्साहन’ संकल्पना ‘ठाणांग सूत्र’ आगम वाचना शिबीरात सरस्वती लब्धप्रसाद, विपुल साहित्य सर्जक, पद्मभूषण पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी अत्यंत सोप्या भाषेत श्रावक – श्राविकांना समजावून सांगितल्या. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा दुसरा दिवस होता. या कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार आहे. या सहाव्या शिबिरात गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यासह विविध प्रांतातील चारशेहून अधिक श्रावक-श्राविकांचा सहभाग आहे.

सकाळ सत्रात संयम बहुल, संवर बहुल आणि समाधी बहुल या विषयावर विवेचन केले. एखाद्या गोष्टीवर अमल करायचाच नसेल तर न करण्याचे हजार बहाणे असतात. हे आपल्याला करायचेच असा पक्का संकल्प असेल तर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करण्याशिवाय राहत नाही. त्यासाठी हरिभद्र सुरीश्वरजी महाराजांची त्रिसुत्री उपस्थितांना सांगितली. उत्तम कार्य करायचे असेल तर ते दीर्घकाळ करावे, निरंतर सातत्याने करावे तिसरी गोष्ट म्हणजे निष्ठेने करावे हा मोलाचा संदेश महाराज साहेबांनी दिला.

दुसऱ्या सत्रात आगम वाचना विशेष असून जे उत्तम विचार आचारणाचे प्रेरणास्थान असल्याचे विवेचन केले. संतानी सांगितलेल्या साधनेच्या मार्गावर चालणे म्हणजे साधक होय. कठिण परिस्थितीतही भूमिका मजबूत असावी ती कमजोर झाली तर पापांवर नियंत्रण मिळविण्याच्या क्रियेला स्पिडब्रेकर लागल्याशिवाय राहत नाही. परमेश्वराला सुखाचा विरोध आहे तर आनंद स्वरूप सुखाची अपेक्षा आहे त्यात स्वाधिन म्हणजे आनंद पराधिन म्हणजे सूख तर आत्मसंचित म्हणजे आनंद स्वरूप होय. अंतर्यामी, अंत:करण, अंर्तमूख होऊन कुठल्याही कार्यात धर्माची आठवण ठेवली पाहिजे. शिक्षणाचा चांगला सदुपयोग केला तरच आपण खरे विद्यार्थी, धनाचा विनयशिलतेने उपयोग केला तर आपण खरे व्यापारी, मुनींनी दिलेल्या धर्मउपदेशानुसार राग, द्वेष, स्वाद, लोभ दूर ठेवून सदाचरणी बना असा संदेश परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी दिला.

‘श्रुत संजीवन’ ह्या जैन आगम आधारीत पुस्तकाचे विमोचन – आचार्य पद्म सुरीश्वर म. सा. यांनी दुर्मिळ जैन ग्रंथ लिपीबध्द केले आहे. गुरुदेव यांच्या शिष्य परिवाराने  श्रुतसंजीवन पुस्तकाचे निर्माण केले. या पहिल्या अंकाची निर्मिती धुळे संघाने केलेली आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, संदीप भाई, मनोज भाई (सौदी अरेबिया), श्रेयस कुमट, नितीन चोपडा, अमित कोठारी, केतन भाई यांच्याहस्ते ‘श्रुत संजीवन’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.तसेच या आगम वाचना शिबीराचा समारोप, अंतिम दिवस उद्या दि.७ एप्रिल ला आहे.

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन …

जळगाव दि. 5 एप्रिल (प्रतिनिधी) – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यावसायिक कलावंताच्या तोडीचे आहेत. सदर प्रदर्शनात विशेषत्वाने उल्लेख करावा अशी एक रचना करण्यात आली ज्यामध्ये इयत्ता ९ चे विद्यार्थी रोहन पोतदार, चिन्मय पाटीदार आणि दिव्यांश बेद यांनी पॉटरी माध्यमातून साकारलेली ‘नो ट्री – नो बर्डस्’ (जिथे आधार संपतो, तिथे श्वासही थांबतो) ही इंस्टॉलेशन रचना विशेष उल्लेखनीय आहे. माती कामातून तयार केलेल्या पक्ष्यांना एका मृत झाडाच्या खोडाजवळ त्यात मृतावस्थेत दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनेनुसार आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तथाकथित  विकास वाटेवरून चालत असताना माणसाने सिमेंटची जंगले तयार करत निसर्गाची आतोनात हानी केली आहे. सदर मांडणी शिल्पामध्ये मृत झालेल्या झाडाजवळ पडलेले मृत पक्षी म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आपण सर्व म्हणजेच मानवजात असा व्यापक संदेश देणारी ही कलाकृती संपूर्ण प्रदर्शनामध्ये लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांच्या निरागस भावविश्वातून प्रकट झालेली ही रचना प्रबोधनात्मक संदेश देत विचार करायला भाग पाडणारी आहे.

कॅनवास तसेच कागदावरील चित्रकला, पेस्टल रंग, स्टेन ग्लास, चारकोल-पेन्सिल अशा विविध माध्यमातून निसर्ग, शाळा, व्यक्तिचित्र, मांडणीचित्र, परिसर, संस्कृती, कल्पनाविलास यासह पर्यावरण हे सर्व काही या प्रदर्शनात सर्वांगसुंदर, सुबक पद्धतीने शाळेच्या निर्सगरम्य परिसरात मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचे असते ते अनुभूती निवासी स्कूलच्या कला विभागातील शिक्षकांकडून, व्यवस्थापनाकडून सातत्याने मिळत असते त्यातून अशा कलाकृतींची निर्मिती वर्षभर होत असते.

विविध कलांचा अभ्यास करून निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे आर्ट अॅण्ड क्राफ्ट विभाग परिसरात  दि. १ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे संचालक अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, डॉ. भावना अतुल जैन, प्राचार्य देबासिस दास, कला शिक्षक प्रीतम दास, प्रितोम खारा, अनुभुती स्कूलचे शिक्षक तसेच पालक वृंद व रसिक विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यांच्या ‘भाव चित्र विश्वात’ जावून  त्यांच्या विविध कलांचा ’आनंद शोध’ घेत होते. अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृती या प्रदर्शनात आहेत.

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन …

जळगाव दि. १ एप्रिल (प्रतिनिधी) – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यवसायिक कलावंताच्या तोडीचे आहेत. सदर प्रदर्शनात विशेषत्वाने उल्लेख करावा अशी एक रचना करण्यात आली ज्यामध्ये इयत्ता ९ चे विद्यार्थी रोहन पोतदार, चिन्मय पाटीदार आणि दिव्यांश बेद यांनी पॉटरी माध्यमातून साकारलेली ‘नो ट्री – नो बर्डस्’ (जिथे आधार संपतो, तिथे श्वासही थांबतो) ही इंस्टॉलेशन रचना विशेष उललेखनीय आहे. माती कामातून तयार केलेल्या पक्ष्यांना एका मृत झाडाच्या खोडाजवळ त्यात मृतावस्थेत दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनेनुसार आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तथाकथित  विकास वाटेवरून चालत असताना माणसाने सिमेंटची जंगले तयार करत निसर्गाची आतोनात हानी केली आहे. सदर मांडणी शिल्पामध्ये मृत झालेल्या झाडाजवळ पडलेले मृत पक्षी म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आपण सर्व म्हणजेच मानवजात असा व्यापक संदेश देणारी ही कलाकृती संपूर्ण प्रदर्शनामध्ये लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांच्या निरागस भावविश्वातून प्रकट झालेली ही रचना प्रबोधनात्मक संदेश देत विचार करायला भाग पाडणारी आहे.

कॅनवास तसेच कागदावरील चित्रकला, पेस्टल रंग, स्टेन ग्लास, चारकोल-पेन्सिल अशा विविध माध्यमातून निसर्ग, शाळा, व्यक्तिचित्र, मांडणीचित्र, परिसर, संस्कृती, कल्पनाविलास यासह पर्यावरण हे सर्व काही या प्रदर्शनात सर्वांगसुंदर, सुबक पद्धतीने शाळेच्या निर्सगरम्य परिसरात मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचे असते ते अनुभूती निवासी स्कूलच्या कला विभागातील शिक्षकांकडून, व्यवस्थापनाकडून सातत्याने मिळत असते त्यातून अशा कलाकृतींची निर्मिती वर्षभर होत असते.

 

विविध कलांचा अभ्यास करून निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे आर्ट अॅण्ड क्राफ्ट विभाग परिसरात  दि. १ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी अनुभूती स्कूलचे संचालक अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, डॉ. भावना अतुल जैन, प्राचार्य देबासिस दास, कला शिक्षक प्रीतम दास, प्रितोम खारा, अनुभुती स्कूलचे शिक्षक तसेच पालक वृंद व रसिक विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यांच्या ‘भाव चित्र विश्वात’ जावून  त्यांच्या विविध कलांचा ’आनंद शोध’ घेत होते. अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृती या प्रदर्शनात आहेत.

अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ठ नेपथ्य म्हणून गौरव

जळगाव दि. ८ प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा विभागीय स्तरावर घेण्यात आली. यामध्ये नाशिक विभागातून जळगाव केंद्रावर जानेवारी २०२३ मध्ये ही स्पर्धा झाली.

प्राथमिक फेरीत २२ च्यावर बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर झालीत. यात भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव या संस्थेने ‘ढ नावाची आधुनिकता’ हे बालनाट्य सादर केले. ‘ढ नावाची आधुनिकता’ या नाटकासाठी अरविंद बडगुजर यांनी उत्कृष्ट नेपथ्य केले. नाशिक विभागातून अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ट नेपथ्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

नाशिक येथील परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात ७ जुलै ला हा सन्मान सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ नेपथ्यकर्मी चंद्रकांत जाडकर, जयदीप पवार, विजय साळवी, विभागीय पारितोषिक वितरण समारंभ समन्वय राजेश जाधव, मीना वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते अरविंद बडगुजर यांनी पुरस्कार स्वीकारला. अरविंद बडगुजर यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन  चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३ उत्साहात

जळगाव दि.२२ (प्रतिनिधी)– आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन  प्रायोजित आणि स्वर्गीय विनोद जवाहरानी उर्फ (बंटी भैय्या) यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत  जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक २१ ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९९ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याची पहिली बॅडमिंटन महिला राष्ट्रीय खेळाडू  कुमारी अनिता ध्यानी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे फाउंडर मेंबर डॉ. तुषार उपाध्ये,  शिल्पा फर्निचर चे मालक श्री राजकुमार मनोज व श्री शितलदास जवाहरानी आणि श्री राजेश जवाहरानी तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सहसचिव श्री तनुज शर्मा, सदस्य श्री शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत अनुप नाथांनी, प्रेम हसवानी, घनश्याम अडवाणी, डॉ. तळेले , अतुल ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा चॅम्पियन ची ट्रॉफी, प्रमाणपत्र व सिताफळ चे रोप देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – आरव अमित दुडवे
उपविजयी –  विहान राहुल बागड

११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी –   ओवी पुरुषोत्तम बोरनारे
उपविजयी – राखी विजय सिंह ठाकुर

१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – शांतनु शैलेश फालक
उपविजयी – अन्मय अमोल जोशी

१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील
उपविजयी – तनिषा अनिल साळुंखे

१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अन्वेष सुधीर नारखेडे
उपविजयी – स्वामी उन्मेश पाटील

१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – तनिषा अनिल साळुंखे उपविजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – स्वामी उन्मेश पाटील आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे
उपविजयी – रजत प्रेमळ पटेल आणि शांतनु शैलेश फालक

१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – उजेर रियाज देशपांडे
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी –  सौम्या मनोज लोखंडे
उपविजयी – इशिका कपिल शर्मा

१७ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी –  दक्ष धनंजय चव्हाण आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे
उपविजयी – रितुल विनोद बोरा आणि सुंदर जयसिंग पवार

१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील  उपविजयी – सौम्या मनोज लोखंडे

१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि करण संजय पाटील
उपविजयी – जाजीब सुहेल शेख आणि अर्श रहीम शेख

पुरुष एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – कौशिक प्रवीण बागड

महिला एकेरी
विजयी – राजश्री संदीप पाटील
उपविजयी – गीता अखिलेश पंडित

पुरुष दुहेरी
विजयी – उमर रियाज देशपांडे आणि करण संजय पाटील
उपविजयी – कौशिक प्रवीण बागड आणि मयूर राजेंद्र भावसार

३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – विनायक बालदी
उपविजयी – तनुज शर्मा

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा
उपविजयी – डॉ. अमित चौधरी आणि किशोर सिंग सिसोदिया

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया
उपविजयी – डॉ. वृषाली विवेक पाटील आणि कीर्ती मोतीलाल मुनोत

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून खुशाल भावसार, भूषण पाटील, गीता अखिलेश पंडित, शुभम जितेंद्र चांदसरकर, शुभम पाटील, देवेंद्र कोळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत जाजीब शेख, दिपिका ठाकूर, अक्षय हुंडीवाले,  अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, तेजम केशव, राखी ठाकूर,  हमजा खान, आर्य गोला, प्रणेश गांधी, करण पाटील, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमी ची खेळाडू गीता पंडित व आभार प्रदर्शन प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन व जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती व हॉटेल प्रेसिडेंट चे मालक श्री मनोज आडवाणी यांनी केले व पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 71 वा स्मृतिदिन साजरा

जळगाव दि. 3 (प्रतिनिधी)- ‘बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यामुळे सामान्य माणसाला जगण्याचे बळ, ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. माझ्या शालेय आयुष्यात बहिणाबाईंची कविता आली आणि माझे जीवनच उजळून निघाले. धरत्रीला दंडवत या  कवितेमुळे वाचनाची गोडी निर्माण झाली व आजपर्यंत प्रगती करू शकलो, साहित्य अकादमी पर्यंत पोहोचलो असे उत्स्फूर्त उद्गार सुप्रसिद्ध बाल साहित्यिक व शिरपूर येथील तहसीलदार आबा महाजन यांनी काढले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 71 वा स्मृतिदिन साजरा झाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. यावेळी बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज बहिणाई स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यकमाच्या सुरुवातीला आबा महाजन व मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात का.उ. कोल्हे विद्यालयातील विद्यार्थीनींनी व कवी प्रकाश पाटील यांनी बहिणाबाईची संसार ही कविता सादर केली. गिरीश कुळकर्णी यांनी गीता जयंती आणि बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन हा योगायोग आहे. जीवन विकासाचे तत्त्वज्ञान सांगणारी गीता आणि बहिणाबाईची कविता आपल्या आजुबाजुला घडलेल्या घटनांचा संबंध उलगडून दाखविते. बहिणाबाई यांना मिळालेली प्रज्ञा ही दैवी देणगीच होती असे मत व्यक्त केले. लेवागण बोलीवर काम करणारे साहित्यिक अरविंद नारखेडे, यांनी देखील बहिणाबाईच्या साहित्याबाबत प्रकाशझोत टाकला. लेवा गणबोली कडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कवयित्री बहिणाबाईंच्या पुण्यतिथी निमित्त “विश्व लेवा गणबोली दिन साजरा केले जातो, या भाषेचे दोन सम्मेलन झाले आता जानेवारीत तिसरे सम्मेलन होणार आहे याबाबतची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचा समारोप कवयित्री शीतल पाटील यांच्या कवितेने झाला. सूत्रसंचालन व समारोप ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेश चौधरी, प्रदीप, सोनार यांच्यासह चौधरी वाड्यातील सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास बहिणाबाईच्या नातसून पद्माबाई चौधरी, कला विभागाचे सहकारी विजय जैन, किशोर कुलकर्णी, देवेंद्र, दिनानाथ, कैलास, किरण, रंजना, कविता, शोभा, लक्ष्मी, कोकिळा, वैशाली, कोकिळा, सुनंदा, शालीनी चौधरी, हितेंद्र व विवेक चौधरी, साहित्यिक म्हणून तुषार वाघुळदे, अशोक पारधे, लिलाधर कोल्हे, पुष्पा साळवे, इश्वर राणा आदि मान्यवर उपस्थित होते.

संत सावतानगरमध्ये वृक्षारोपणाप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या सह ८० वर्षाच्या आजी व नातवंडांनी वृक्षसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

जळगाव दि.22 प्रतिनिधी – शहरातील शेतकी शाळेमागील बाजूला असलेल्या संत सावता नगरमधील दोन खुल्या भुखंडावर आज सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील ८० वर्षाच्या आजीसह नातवंडांनी वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा घेतली. आयुक्त विद्या गायकवाड यांनी प्रतिज्ञा देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित वृक्षारोपणा प्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड,जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, मनपा अभियंता प्रकाश पाटील, योगेश वाणी,अतुल वाणी, पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप पाटील, नगरसेवक प्रतिभा पाटील, श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित पर्यावरण जिल्हा प्रतिनिधी वसंत पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संत सावतानगर गजानन पार्क गट नं. ७६०/७६१ या दोन खुल्या भुखंडामध्ये निंब, करंज, गुलमोहर, चिंच, पिंपळ, बकूड, पुत्रवंती, बदाम, बुच अशी १२० झाडे लावण्यात आली.
यावेळी परिसरातील मनोहर महाजन, नितीन पाटील, राहुल पाटील, श्रीकृष्ण देशमुख, गजानन शुरपाटने, भागवत कोशे, परशुराम बडगुजर, राजेंद्र भावसार, राजेंद्र महाजन, विशाल भावसार, महेश पवार, बाळकृष्ण साळुंखे, स्वप्निल पाटील, प्रविण चौधरी यांच्यासह ८० वर्षाच्या आजी जनाबाई चौधरी, विजुबाई नन्नवरे, रूपाली पाटील, भावेश बाविस्कर, विशाल वाणी, लकी या चिमुकल्यांनी सहभाग घेतला. आयुक्त विद्या गायकवाड यांनी उपस्थित पर्यावरण प्रेमींना वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा दिली.
भावेश व लकी या दोघांनी घरातील कचरापासून खत तयार करून त्यापासून झाडांचे संगोपन करत असल्याचे आयुक्त विद्या गायकवाड यांना सांगितले. यावेळी आयुक्तांनी दोघांचा सत्कार करून प्रोत्साहन दिले. अतिन त्यागी, सुधीर पाटील, विजकुमार वाणी यांनी जागतिक तापमान वाढ त्यामुळे होणारी हानी याविषयी अवगत करत वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. जैन इरिगेशनच्या गार्डन टिम मधील रविंद्र सपकाळे, शंकर गवळी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. वसंत पाटील यांनी आभार मानले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version