बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट तर्फे आज चौधरी वाड्यात कार्यक्रम

जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी) –  बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची शनिवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता  १४४ वी जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमासाठी खामगाव जि. बुलडाणा येथील साहित्यिक प्रा. देवबा शिवाजी पाटील, चाळीसगावच्या सौ. कामिनी अमृतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, समस्त चौधरी परिवार, साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील  विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास येण्याचे करावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

कान्हदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात सन्मानाचे स्थान आहे. बहिणाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या, काव्यातील साधेपणा, सोपी अन् हृदयाला भिडणारी भाषा, भावनांमध्ये प्रांजळपणा, शब्दाआड रुजलेला माणूसकीचा ओलावा, निसर्ग, पशु-पक्षी, शेती माती आणि कष्टांवर अतुट प्रेमामुळे त्यांच्या कविता अगदी सहजरीत्या बालपणापासूनच घराघरात पाठ्यपुस्तकांद्वारे, गाण्याच्या माध्यमातून पोहोचली.

प्रमुख पाहुणे प्रा. देवबा शिवाजी पाटील, खामगाव, जि. बुलढाणा, सुप्रसिद्ध साहित्यिक, आजपर्यंत एकूण ५९ पुस्तके प्रकाशित, विषय – धार्मिक स्तोत्रे, संत साहित्य, काव्यसंग्रह, देशभक्ती, विज्ञान, निसर्ग, कथासंग्रह, शैक्षणिक, युवांसाठी लेखसंग्रह, सामाजिक वैचारिक लेखसंग्रह, शालोपयोगी साहित्य, बालकुमार कादंबरी, कथासंग्रह इ. असून अनेक मानाचे (६)  साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात विशेष सन्मान म्हणजे साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या ग्रंथावर समीक्षा ग्रंथ ही प्रकाशित झाली आहेत तसेच त्यांच्या काव्यसंग्रहांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ते साहित्य कुंज या नियतकालिकाचे संपादक आहेत. साहित्य कुंज या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी अनेक काव्य-लेख-कथा स्पर्धांचे व विद्यार्थी साहित्य मेळाव्यांचे आयोजन केले आहे. ते खामगाव येथे उन्मेष नावाचे वाचनालय ही चालवितात. प्रमुख पाहुण्यांसोबत चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका, निवेदक सौ. कामिनी सुनिल अमृतकर या देखील उपस्थित असतील. या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन “माह्यी माय सरसोती!” याचे ही आयोजन केले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा असे ट्रस्टतर्फे समन्वयक अशोक चौधरी यांनी आवाहन केले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण

जळगाव दि. २० प्रतिनिधी –  गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरे याच्या संयुक्त विद्यमाने कै.रामदास त्र्यंबक दिघे-पाटील  यांच्या स्मरणार्थ शाळेच्या परिसरात विविध प्रजातीचे ८५ रोपाची लागवड करण्यात आली.  याप्रसंगी  जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे राजेंद्र राणे, शाळेचे माजी विद्यार्थी अनिल पाटील, दापोरेचे सरपंच महादवराव गवंदे , गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ, शाळेचे शिक्षकांसह  गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार, वन विभाग व सामाजिक वनीकरणाचे क्षेत्रीय अधिकारी देविदास जाधव, अनिल साळुंखे, संदीप पाटील, भरत पवार आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांमध्ये राजेंद्र राणे यांनी वृक्ष संवर्धना बाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिली. अनिल पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ वृक्षारोपणाचा उपक्रम घेतला असून  शाळेच्या परिसरात जे वृक्ष लागवड केली आहे त्याची जबाबदारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसह सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगितले. दापोरे गावात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून जनहिताचे विविध उपक्रम राबविले जात आहे. सूत्रसंचालन श्री.समाधान पाटील यांनी केले. श्री. राहुल मोरे यांनी आभार मानले.

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ सुभाष चौधरी अनंतात विलीन

 जळगाव – ता ( 19 )  येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ सुभाष भास्कर चौधरी ( वय 79 )  यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर मोक्ष धाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले.  यावेळो माजी खासदार डॉ उल्हास पाटील, आमदार शिरोष चौधरी, केसीई चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन , प्राचार्य अनिल राव , ऍड प्रकाश पाटील, माजी महापौर नितीन लद्धा, भोरगाव लेवा पंचायत चे सदस्य ऍड संजय राणे  आर्किटेक्ट दिलीप कोल्हे, जैन परिवारातील सर्व सदस्य, कंपनी चे सहकारी ,  शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, वकील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार डॉ उल्हास पाटील, जैन इरिगेशन चे उपाध्यक्ष अनिल जैन, चौधरी परिवाराच्या वतीने राजीव चौधरी यांनी भावना व्यक्त केल्यात . डॉ चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन  रुग्ण सेवा केली.
डॉ चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते यासह  बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठा चे मॅनेजमेंट कौन्सिल चे सदस्य तसेच  सिनेट सदस्य , महावीर सहकारी बँकेचे संचालक होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

जळगाव दि.१४ प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहकार्य लाभले आहे.

याप्रसंगी एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे साठा अधिक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) महेश ढाके, साठवणूक विभागाच्या सहाय्यक अधिक्षक अर्चना मेढे, एल. एम. पवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जैव विविधत जपता यावी यासाठी वृक्षारोपणासह संवर्धनाची मोहिम हाती घेतली आहे. या सृजनशील उपक्रमात जळगाव हरित करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. राज्य वखार महामंडळ येथे झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी प्रास्ताविकात मदन लाठी यांनी उपक्रमाविषयी सांगितले.

सुधीर पाटील यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. अर्चना मेढे यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशतर्फे मागील वर्षी लावण्यात आलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे जोपासली असून ती सावली देत आहे. आज लावलेली झाडांची निगा सर्वांच्या सहकार्यातून राखणार असल्याची हमीसुद्धा त्यांनी दिली. एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया यांनी झाड हे ऑक्सीजन देऊन मनुष्याला जगविण्याचे कार्य करते, त्यामुळे आज वृक्ष जगवले तरच आपण जगू शकू असे सांगत, वृक्षारोपण करुन ते जगविण्याचे आवाहन केले तसेच  गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम खूपच कौतूकास्पद आहे यात सहभागी होता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे उमेश सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, वखार महामंडळाच्या शोभा सोनवणे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित

जळगाव दि.18 प्रतिनिधी– भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या प्रायोजनाने युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील 15 वर्षांपासून जळगाव शहरात तरुणींचा दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 15 ते 20 हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. विशेष करून महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय असते. यावर्षीसुद्धा मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे सायंकाळी 6.30 ते रात्री 9.00 वाजे दरम्यान तरुणींचा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुलींचे गोविंदा पथक राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्र परिसरात या एकमेव दहीहंडी उत्सवात विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो. दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजक प्रयत्नशील असतात.
तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अनिल जोशी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, पियुष हसवाल, राजेश नाईक आदी उपस्थित होते. यामध्ये तरूणींची दहीहंडी उत्सवाची कार्यकारीणी सर्वानुमते ठरविण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रितम शिंदे, उपाध्यक्ष-संदीप सूर्यवंशी, सचिवपदी प्रशांत वाणी, सहसचिव-पवन चव्हाण, खजिनदार-पियुष हसवाल, सहखजिनदार सागर सोनवणे, भटू अग्रवाल, सोशल मिडीया समन्वयक शुभम पुश्चा, सुरक्षा प्रमुख पियुष तिवारी, सदस्य- आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, समिर कावडीया, सैफ मनसुरी, विपीन कावडीया, अजय खैरनार, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, यश श्रीश्रीमाळ, गणेश भोई,  श्रेयस मुथा, मनजीत जांगीड, विनोद सैनी, इत्यादी.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

जळगाव– येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने शहरातील जय भवानी मंडळ संचालित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस गिरीश कुळकर्णी यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीला माहिती असावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या इतिहासाचा अभ्यास करावा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरूषांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे सांगितले. तसेच तीन प्रश्नांची बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास पुस्तक भेट देण्यात आले. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात कुणाल घुगे (इ. १० वी), रमेश पाटील (इ. ८ वी) भारती चव्हाण (इ. ९ वी), वेदांत पाटील (इ. ९ वी), आयेशा पठाण (इ. १० वी) या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिल्याने त्यांने पुस्तक स्वरूपात बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. खंबायत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपशिक्षिका सौ. एच. एम. अत्तरदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अश्विन झाला, विश्वजित पाटील, शुभम व फिरदोस यांचेसह शिक्षक वृंदानी सहकार्य केले.

अनुभूती बालनिकेतनद्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास ओसवाल 

जळगाव दि. ४ प्रतिनिधी –  ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती बालनिकेतन ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली. हा आनंद म्हणजे भवरलाल जैन यांच्या स्वप्नपूर्तीचा आहे’असे मनोगत सेवादास दलिचंद ओसवाल यांनी व्यक्त केले.

मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आली. त्याच्या कोनशिला अनावरण व उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मदनलाल देसर्डा, रोहित बोहरा, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेंद्र मयूर, रमेशदादा जैन उपस्थित होते. यांच्यासह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, अनुभूती बालनिकेतनच्या प्रमुख गायत्री बजाज, डॉ. विश्वेश अग्रवाल, प्रा. अनिल राव, भरत अमळकर, प्रदीप रायसोनी, डॉ. शेखर रायसोनी, डॉ. वर्षा पाटील, मधुभाभी जैन, डॉ. राहुल महाजन, अनिष शहा, यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.

अंबिका जैन यांनी प्रास्ताविकातून अनुभूती बालनिकेतन सुरु करण्याबाबतचा उद्देश सांगितला. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या धर्तीवर भावनिकदृष्ट्या समाजाची निर्मिती व्हावी आणि एक दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी याच विचारधारेतून अनुभूती बालनिकेतनची सुरवात केल्याचे सौ. अंबिका जैन यांनी सांगितले.

भवरलालजी जैन यांच्या ‘सार्थक करुया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ या विचारांचे प्रतिक म्हणजे अनुभूती बालनिकेतन असल्याचे रोहित बोहरा यांनी म्हटले. गायत्री बजाज यांनी मॉन्टेसरी तत्वज्ञान काय आहे हे सांगितले. भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी वेगळे काही करता येईल का हा विचार करत होते त्याचे स्वप्न अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराच्या प्रयत्नातून पुर्ण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरवात हरिहंतो भगवतो.. या मंत्राने दलिचंद ओसवाल यांनी केली. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतनी शक्ती हमें दे ना दाता.. हम होंगे कामयाब हे गीत म्हटले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

अनुभूती बालनिकेतनचे वैशिष्ट्ये  – ‘अनुभूती बालनिकेतन’ मध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून संस्कारीत होतील. शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन आनंदाने ते बदल स्वीकारतील अशी शिक्षणपद्धती आहे. आजूबाजूच्या पर्यावरणासह आपल्यापेक्षा मोठ्यांकडून परस्परभावनेतून, व्यवहार ज्ञानासह आचरण करण्याची शिकवण घेता येईल. स्वयंनिरीक्षणातून, प्रात्यक्षिक शिक्षणातून पुस्तकांविना मुलांच्या बुद्धिकौशल्याचा विकास करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या असलेल्या यथोचित वस्तू वेगवेगळ्या देशांतून  ‘अनुभूती बालनिकेतन’ येथे उपलब्ध करुन दिल्या आहेत. खेळता-खेळता टेबल लर्न करणे, वाचता-वाचता Vocabulary (शब्दसंग्रह) वाढविणे, शब्दांची आणि वाक्यांची रचना करणे, जगाच्या नकाशातून भुगोल शिकणे, पेन-पेन्सील व कागदाचा अचूक वापर करून अक्षरांची ओळख करणे, गणितांचे कोडे सोडणे, जड फर्निचरच्या जागी, मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे अश्या अनेक गोष्टी येथे आहेत. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, स्वयंपाक करताना भाजीपाला निवडणे, धान्य निवडणे, बटन लावणे यासारख्या प्रत्यक्ष कृतींचा समावेश अनुभूती बालनिकेतनमधील शिक्षणामध्ये केला आहे. 

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत

जळगाव दि. ४ प्रतिनिधी –  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित स्व. ॲड. बबनभाऊ बाहेती  यांच्या स्मरणार्थ ३० ते ३१ जुलै दरम्यान कांताई हॉल येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष एकेरी आणि १८ व २१ वयोगटाखालील मूलं एकेरी चाचणी निवड अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा झाली. अॅड. रोहन बाहेती यांच्या पुढाकाराने पुरुष एकेरीतील सर्व विजेत्या खेळाडूंसाठी रोख पारितोषिके देण्यात आलीत.पारितोषीक वितरणाप्रसंगी ॲड. रोहन बाहेती, अरविंद देशपांडे,  ॲड. रवींद्र कुळकर्णी, रोहित  कोगटा, अरुण गावंडे  उपस्थित होते.

पुरुष एकेरी स्पर्धेत प्रथम आलेल्या जैन स्पोर्टस अॅकडमीचे सय्यद मोहसीन यांनी ३००० रोख पारोतोषिकाने, नईम अन्सारी द्वितीय याला २००० हजार रुपये रोख, तृतीय आलेल्या अताउल्लाह खान ( प्लाझा क्रीडा संस्था) व चतुर्थ आलेल्या  हबीब शेख ( एकता क्रीडा मंडळ) यांना १५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शाहरुख शेख  पिंप्राळा हुडको, रईस शेख  तमन्ना क्रीडा संस्था, नदीम शेख  बिजली क्रीडा संस्था, मुबश्शिर सय्यद प्लाझा क्रीडा संस्था हे सुद्धा विजयी झालेत. विजयी झालेल्या खेळाडूंची मुंबई येथे दि. १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ५८व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरता जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.

याच स्पर्धेतून दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबईला होणाऱ्या १८ व २१ वर्ष वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता यश धोंगडे, देवेंद्र शिर्के, हुझेफा शेख, उम्मेहानी खान, दुर्गेश्वरी धोंगडे आणि दानिश शेख यांची जळगाव जिल्हा संघात निवड  झाली आहे. स्पर्धेचे प्रमुख महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, प्रमुख पंच अब्दुल क़य्यूम ख़ान व शेखर नार्वरिया यानी काम पाहीले. जळगाव जिल्हा कॅरम संघटनेचे शाम कोगटा व नितिन बरडे यानी सर्व विजयी खेळाडूंचे  कौतूक केले

एक पेड मां के नाम – गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशनचा उपक्रम

वावडदा, जळगाव. दि. ३ (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान 5.0  अंतर्गत पृथ्वी या तत्त्वावर  वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करून वृक्ष लागवडी चा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस.  माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात  गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या  संयुक्त विद्यमानाने ने  हाती घेतला आहे.
वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत व एक पेड मां के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या 10 प्रकारची 50 झाडें मान्यवराच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी सेवानिवृत्त वन   अधिकारी तथा सल्लागार  वन,वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड चे राजेंद्र राणे  , माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सर एन. आर. दाणे सर शिक्षक ऐ. डी. पाकले सर,एम.डी.अहिरे मॅम,एम.आर. चौधरी,एस.बी. पाटील,ऐ. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते
प्रत्येक विध्यार्थ्यांने एक मुलं एक झाड ही संकल्पना प्रत्येक विध्यार्थ्यांने राबविली पाहिजे तसेच प्रत्येक विध्यार्थ्यांने आपल्या घरा जवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आव्हान विध्यार्थ्यांना करण्यात आले या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशन चे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

मुंबई, जळगाव दि. ३१ (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा (EBITDA-इबीडा) १८०.८ कोटी रुपयांवर पोहोचला.

“यापूर्वी सांगितल्याप्रमाणे Q1FY25 चा महसूल कमी अपेक्षीत होता आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम दिसला. मुख्यतः जल जीवन मिशनच्या संस्थात्मक व्यवसायामुळे देशांतर्गत विक्री कमी झाल्यामुळे एकत्रित महसूल (उत्पन्न) सुमारे १३ टक्क्यांनी घटला. धोरणात्मक निर्णयाने ठरल्याप्रमाणे आम्ही प्रकल्प व्यवसाय कमी करत आहोत.

ऐतिहासिकदृष्ट्या, पावसाच्या काळात सूक्ष्म सिंचनासाठी व्यवसाय मंदावलेला असतो. तथापि, चांगला मान्सून आणि अलीकडील अर्थसंकल्पात कृषी, सिंचन क्षेत्र, मायक्रो, स्मॉल व मीडियम एन्टरप्रायजेस आणि कृषी-संबंधित व्यवसायांना मदत/अर्थसहाय्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मागणीचे पुनरुज्जीवन होऊन मंदावलेली मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आम्हाला आमच्या सर्व कार्यक्षेत्रांतील व्यवसायामध्ये चांगल्या व्यवसाय संधींची आशा आहे. या पार्श्वभूमिवर कंपनी शाश्वत वाढ करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे,” असे जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version