राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

जळगाव दि. ८ प्रतिनिधी –  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वनमाळी हॉलमध्ये दिनांक ४ते ६ मे दरम्यान संपन्न  झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम्सचा खेळाडू नईम अन्सारी विजयी ठरला आहे.

नईम अन्सारी याने राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विश्वविजेत्या प्रशांत मोरे चा क्वार्टर फाइनलमध्ये धक्कादायक पराभव केला. प्रशांत मोरे ने पहिला सेट २५-६ असा एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सेट नईमने अनुक्रमे २५-१७, २३-१८ असा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सेमी फाइनल मधे फ़हीम क़ाज़ी याचा २-१ असा पराभव करून अंतिम फेरीत नईम अन्सारीने प्रवेश केला. अंतिम सामन्यामध्ये जैन इरिगेशनचा अभिजीत त्रिपणकर (पुणे) याचा २/१ सेट ने पराभव करुन नईम ने राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. महिला एकरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हीचा २-१ सेटने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. नईम अन्सारी सैयद मोहसीन यांचे मार्गदर्शन लाभले.

नईम अन्सारी याच्या या विजयाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह जळगाव जिल्हा कॅरम असो. आणि जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे. राधेशाम कोगटा व मंज़ूर ख़ान यांनी अभिनंदन केले.

सीआयएससीई बोर्ड १२ परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा १०० टक्के निकाल

जळगाव दि. ०६ प्रतिनिधी –  दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा दास  ९२.५० टक्के प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, याशिवाय जेईई मेन्स २०२४ च्या ऑल इंडीया रँकमध्ये देबर्णा दास हिने ५६९६ रँक प्राप्त केले आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही भविष्याशी निगडीत अनुभवाधारीत शिक्षण देणारी स्कूल आहे. सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील पहिलीच शाळा आहे. परस्परांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जातात. छंद जोपासत वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रमांमध्ये कौशल्य दाखवित विद्यार्थीही यश संपादित करतात. कॉमर्स शाखेत प्रथम आलेल्या तुषार कावरे याला इंग्रजीत ९४, अर्थशास्त्र ९३, अकाऊंट ९२, वाणिज्य ९८, बिजनेस स्टडी ९३ गुण मिळाले आहेत. तर विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या देबर्णा दास हिला इंग्रजीत ९२, केमिस्ट्रीत ९१, फिजीक्स ८९, बायोलॉजी ९१, गणित ९६ गुण प्राप्त झाले आहेत.

भविष्याचे वेध घेत असताना शैक्षणिक अभ्यासक्रमासह आपल्यातील सूप्त कलागुणांना जोपासून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलचे संचालक मंडळ, श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन, सौ. निशा अनिल जैन, देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

“श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक संवेदना जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही १०० टक्के निकाल राखला. याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन! निसर्गरम्य वातावरण, स्पर्धात्मक जगाशी सामना करण्याची ताकद अनुभूतीच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. नुकतेच एज्युकेशन वर्ल्ड दिल्ली आणि एज्युकेशन टुडे बेंगलूर या देशातील शिक्षण क्षेत्रात नामांकित रेटिंग एजन्सींनी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक तर संपूर्ण भारतामध्ये अग्रस्थानी नामांकित केले आहे.” – श्री. अतुल जैन, अध्यक्ष, अनुभूती निवासी स्कूल

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

जळगाव दि.५ प्रतिनिधी – धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील श्री महामंडलेश्वर स्वामी लोकेशानंद महाराज सेवाश्रम या ठिकाणी पाच दिवशीय निवासी युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन  गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सरपंच डॉ. विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी, सामाजिक कार्यकर्ते रतीलाल पाटील, संजय चौधरी, सुनिल चव्हाण, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करण्यात आले. स्वागत गीताने उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शिबीराच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि क्षमता विकासासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असते. विद्यार्थ्यांमध्ये मध्ये नैतीक मुल्यांची रुजवणूक करने, महात्मा गांधीजींच्या  विचारांचे संस्कार युवा पिढी होऊन,  गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर राष्ट्राची निर्मिती योगदान प्रत्येक युवकाने द्यावे, हाच या मागचा उद्देश असतो.

या प्रसंगी सरपंच डॉ.विजय पाटील यांनी विद्यार्थींशी संवाद साधला व शिबीरासाठी शुभेच्छा दिल्यात तसेच ज्येष्ट गांधीयन अब्दुल भाई यांनी श्रम संस्काराचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रथम सत्राचे प्रमुख वक्ते गिरीष कुळकर्णी यांनी युवकांची जबाबदारी काय शिबीरातून काय शिकाल व्यक्तीमत्त्व कसे घडवावे या विषयी सोदाहरण मार्गदर्शन केले. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, मंदिर सेवेकरी किसन अंबोरे आणि शिबिरार्थी उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम अस्वार यांनी आभार मानले.

जैन हिल्स येथे फालीच्या १० व्या संम्मेलनाचा समारोप* 

जळगाव, दि. २९ (प्रतिनिधी)– ‘शेतीत नावीण्यपूर्ण प्रयोग करून शेतीतून समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळवू शकता. २०४७ पर्यंत भारत विकसीत देश बनेल व त्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत मोलाची भूमिका बजावेल.’ भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यातील समारोपाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात फालीचे चेअरमन तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बँरी, ज्या कंपन्यांनी या कार्यक्रमास सहयोग दिला त्या कंपनीचे प्रतिनिधी अजय तुरकने, सुचेत माळी(रॅलीज इंडिया), डॉ. शविंदर कुमार (महेंद्रा), मयूर राजवाडे, अजिंक्य तांदळे (यूपीएल), जयंत चॅटर्जी, प्रवीण कासट आणि राजकुमार (स्टार अॅग्री), डॉ. समीर मुरली, गौतम पात्रो (गोदरेज अॅग्रोव्हेट), डॉ. दिलीप चौधरी (अमूल) आणि जैन इरिगेशनचे डॉ. बी.के. यादव, डॉ. प्रकाश पंचभाई यांची उपस्थिती होती.

फालीच्या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना अनिल जैन म्हणाले की, शेती क्षेत्रात खूप मूल्यवर्धन करण्याची संधी आहे. शेतीतून सर्वांना अन्न-धान्य प्राप्त होते परंतु सौंदर्य प्रसादने जरी बनवायचे असतील तरी त्यासाठी फळे, फुले लागत असतात. शेतीमध्ये प्रामाणिक कार्य केले तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास निर्माण करत भविष्यात तुम्हाला शेती संदर्भात काही मार्गदर्शन लागले तर जैन इरिगेशनचे तज्ज्ञ सहकार्य करतील. फालीच्या माध्यमातून तुम्ही शेतीमध्ये काम कराल ही सकारात्मक गोष्ट असल्याचे ते म्हणाले. यावेळी फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी सुसंवाद साधला. त्यांनी दहा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्याच्या भाषणाचा अनुवाद फालीच्या मॅनेजर रोहिणी घाडगे यांनी केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन हर्ष नौटियाल यांनी केले.

 *बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन विजेते* 

ॲग्रीकल्चरल वेस्ट इको फ्रेंडली बेस्ट, शारदा पवार विद्यानिकेतन शारदानगर, पुणे (प्रथम), डीओसी ट्रेझर-जनता गर्ल हायस्कूल शेंदुरजन घाट जि. अमरावती (द्वितीय), काऊ डंग प्रोडक्ट- सोमेश्वर विद्यालय मुढाळे जि. पुणे (तृतीय), पर्पल सेलिब्रेशन- श्री विठ्ठल माध्यमिक अँड ज्युनियर कॉलेज भिकोबानगर जि. पुणे (चौथा), व्हेजिटेबल डीहायड्रेशन (नूतन माध्यमिक विद्यालय किनगावराजा जि. बुलढाणा (पाचवा) असे विजेते ठरले व त्यांचा गौरव मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.

*नाविन्यपूर्ण इंनोव्हेशन विजेते*

सेफ्टी स्टिक – महात्मा गांधी विद्यालय आष्टा जि. सांगली (प्रथम), स्मार्ट ॲग्री स्प्रेअर- दानोली हायस्कूल दानोली जि. कोल्हापूर (द्वितीय), स्टार्टर चेंबर फॉर बिगिनर्स अँड ऑफ सिझन क्रॉप्स- जयश्री पेरिवाल इंटरनॅशनल हायस्कूल जयपूर (राजस्थान) (तृतीय), एआय बेस्ड सोलार इन्सेक्ट ट्रॅप ॲण्ड फार्म प्रॉटेक्शन सिस्टीम फॉर ॲनिमल- महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगावमाळी जि. बुलढाणा (चौथा), रेन पाईप (एचडीपीई) रॅपर- आदिवासी विकास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खजरी जि. गोंदिया (पाचवा) असे विजेते ठरले.

*संवाद, पत्रकार परिषद*

शालेय जीवनापासूनच शेती करणे कसे फायद्याचा, उत्तम व्यवसाय आहे हे समजावून देणे प्रत्यक्ष अनुभव देण्याचे काम फलीला माध्यमातून केले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून केले जात आहे. या दहा वर्षात चाळीस हजार विद्यार्थ्यां पर्यंत फालीचे काम पोहोचले आहे. या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील १७५ शाळांच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. भविष्यात २०३२ पर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे अशी माहिती फालीचे चेअरमन तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी दिली. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला. फालीचे माजी विद्यार्थ्यांनी फालीमुळे आपली प्रगती कशी झाली याबाबत अनुभव कथन केले. रोहिणी घाडगे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. पत्रकार परिषदेचे संचालन व आभार प्रदर्शन जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांनी केले. 

फाली संमेलनाचा २९ एप्रिलला समारोप

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी)– ‘प्रचंड मेहनत, उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून मनापासून केलेली शेती खूप फायदाची ठरते.’ असा सूर शेतकरी संवादात निघाला. फाली १० व्या संमेलनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी फालीच्या विद्यार्थांनी प्रगतशील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. या संवाद कार्यक्रमास ललीत चौधरी, पंकज चौधरी (वड्री), ज्ञानेश्वर हिवराळे (मांगलवाडी), अनिकेत भागवत पाटील( पिंपळगाव खुर्द. जामनेर), प्रणव महाजन (ऐनपूर),  बाळू माणिक अहिरे (आमोदा) हे शेतकरी सहभागी झाले होते.
या संवाद कार्यक्रमात जैन इरिगेशन,युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले होते त्यांच्याशी देखील फाली विद्यार्थ्यांनी मुक्तपणे संवाद साधला. फाली संमेलनात तिसऱ्या टप्यातील सकाळ सत्रात विद्यार्थ्यांनी विविध शेती प्रयोग, प्रकल्पांना भेटी दिल्या. दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम, जैन हिल्स येथे गट चर्चा झाली. यात ११ गट आणि तितकेच विषय चर्चेसाठी निवडले गेले होते. 
फाली १० व्या संमेलनाचा आज समारोप – २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी फालीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे अभय पारनेरकर, स्टार अॅग्रीचे संचालक अमित अग्रवाल, कार्बन क्रेडीटवर काम करणारी संस्था ‘वराह’ चे सीईओ मधुर जैन तसेच युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.  
सकाळ सत्रात विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे बिझनेस प्लॅन सादर होतील तर दुपार सत्रात जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले जातील. विविध प्रकारच्या या नावीण्यपूर्ण  इंहोव्हेशनचे परीक्षण करून  पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येऊन फाली संम्मेलनाचा समारोप होईल.  

फाली संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचा पारितोषिक वितरण सोहळा 

जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) – ‘शेतीला भवितव्य आहे, तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच शेतीविषयी प्रेम निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात यावे यासाठी फालीचे संम्मेलन गत दहा वर्षांपासून जैन हिल्स येथे आयोजले जाते. विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेत शेती क्षेत्रामध्ये आपले भवितव्य घडवावे असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात केले.

यावेळी व्यासपीठावर फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशनचे संचालक डॉ. एच.पी. सिंग, जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन, गोदरेज अॅग्रोवेटचे डॉ. मोहन कुंभार, अनुप्रिया सिंग, यूपीएलचे योगेश धांडे, गणेश निकम, स्टार अॅग्रीचे सुरज पनपत्ते, निकिता शेळके, निलम मोटीयानी, अमूलचे अनिलकुमार बडाया, विक्रम जानी, महेंद्राच्या विशाखा पटोले, प्रॉम्प्टचे रितेश सुतारिया, उज्ज्वीवन स्मॉल बॅंकींगचे योगेश गुरदालकर, वैभव पाटील या कंपनी प्रतिनिधींची उपस्थिती होती.

यावेळी एका विद्यार्थीनीने जैन इरिगेशनच्या कंपनीच्या स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अशोक जैन म्हणाले की, ‘तुझ्या हातून असे काम व्हावे की, फक्त पाच सात व्यक्तींचे नव्हे तर हजारोंचे पोट भरेल त्या सोबत कीडा, मुंगीचेही पोट भरेल असा काही व्यवसाय कर..हा सल्ला माझ्या वडिलांना त्यांच्या आईकडून मिळाला. एका शेतकऱ्याच्या मुलाने सुरू केलेली ही कंपनी आहे. ही कंपनी तीन पिढ्यांच्या साठवलेल्या ७ हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू होऊन, आज साडेसात हजार करोड रुपयांची उलाढाल होत आहे आणि ११ हजार लोक कंपनीत काम करत आहेत. मुख्यत्वाने शेती व शेतकरी यांच्यासाठीच जैन इरिगेशनचे जगभरात कार्य सुरू आहे.

  जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. फालीचे उपक्रम भविष्यातील उपक्रम इत्यादी बाबत चर्चा केली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कंपनीच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. फाली एज्युकेटर आणि फालीला सौजन्य देणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटियाल यांनी तर आभारप्रदर्शन रोहिणी घाडगे यांनी केले.

बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन विजेते

ॲग्रीसेन्स: हरनेसिंग रिमोट सेन्सिंग फॉर प्रिसिजन ॲग्रीकल्चर- न्यू इंग्लिश स्कूल भालोद जि. जळगाव (प्रथम), सोरगम फिअस्ट – डॉ. आप्पासाहेब उर्फ एस. आर. पाटील उडगाव टेक्निकल हायस्कूल उडगाव ज़ि. कोल्हापूर (द्वितीय),  बायो सीएनजी – प्रभात विद्यालय हिंगोणे जि. जळगाव (तृतीय), नेचरल डाय ॲण्ड पावडर फॉर्म वालनट शेल-  आदर्श निवासी स्कूल बनासकाठा गुजरात (चौथा), मोरिंगा पावडर – सीताबाई पटवर्धन हायस्कूल कोल्हापूर (पाचवा) असे विजेते ठरले.

नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन विजेते

ॲलगे पॉल्युशन बॅरिअर- सर्वोदय विद्या मंदीर प्रकाशा जि नंदुरबार (प्रथम), हायड्रेट एक्सेल ॲडव्हान्सिंग ॲग्रिकल्चरल डीहायड्रेशन- प्रभात विद्यालय हिंगोणे जि. जळगाव (द्वितीय), वॉटर स्टोअरेज फॉर्म एअर फॉग- झेड. पी. गर्ल्स हायस्कूल अमरावती (तृतीय), स्मार्ट ग्रीन हाऊस – आर. एस. माने पाटील विद्यामंदीर, विसापूर जि. सांगली (चौथा),  नट इस – हिरकणी विद्यालय गावडेवाडी जि. पुणे (पाचवा) या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नाविन्यपूर्ण इन्होवेशन्सला पहिल्या पाचचे क्रमांक देण्यात आले.

फालीच्या १० व्या संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळ सत्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे बिझनेस प्लॅन सादर केले तर दुपार सत्रात जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले होते. सुमारे ५८ प्रकारच्या या नावीण्यपूर्ण  इंहोव्हेशनचे परीक्षण करण्यात आले.

फालीच्या १० व्या संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी २५ एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत क्षेत्र भेटी झाल्या. यात टिश्यू कल्चर लॅब, यूएचडीपी (अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्टेशन) फ्रूट डेमो प्लॉटला, फळ प्रक्रिया आणि कांदा निर्जलीकरण प्लांट, टिश्यू कल्चर पार्क आणि फ्युचर फार्मिंग इत्यादी प्रकल्पांना भेट दिली. सुप्रसिद्ध “खोज गांधीजी की” या एकमेव अद्वितीय दृक-श्राव्य संग्रहालयास देखील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

फालीसाठी जैन इरिगेशनसह ज्या ज्या कंपन्यांचे सहकार्य मिळाले अशा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत दुपारच्या सत्रात फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये गट चर्चा केली. जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडचे संचालक अथांग जैन यांनी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. सायंकाळच्या सत्रात आकाश ग्राउंडवर प्रगतशील शेतकरी डॉ. वैभव पाटील, प्रशांत राणे (कुंभारखेडे), राहूल आस्कर (वाकोद), पवन सुपडू पाटील (हातनुर), रवींद्र रामदास चौधरी (नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर. मध्यप्रदेश), भिमसिंग रामसिंग खंडाळे (वरखेड ता. चाळीसगाव), कमलाकर पाटील (बेलखेड ता. मुक्ताईनगर) या शेतकऱ्यांशी संवाद साधला.

फालीच्या दहाव्या संम्मेलनाचा समारोपाचा तिसरा टप्पा २८ व २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी फालीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे अभय पारनेरकर, स्टार अॅग्रीचे संचालक अमित अग्रवाल, कार्बन क्रेडीटवर काम करणारी संस्था ‘वराह’ चे सीईओ मधुर जैन तसेच युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.

फाली १० व्या संम्मेलनाचा २५ एप्रिलपासून दुसरा टप्पा

जळगाव दि.२४ (प्रतिनिधी)-  भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमांतर्गत पहिला टप्पा २२ व २३ एप्रिलला यशस्वी झाला. आता २५ व २६ एप्रिल २०२४ दरम्यान दुसरा टप्पा जैन हिल्स येथे संपन्न होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थ्यांचा व त्यांच्या समवेत ५० फालीच्या शिक्षकांचा सहभाग राहणार असल्याचे कळविले आहे.

फाली संम्मेलनाचे हे दहावे वर्ष असून जैन इरिगेशनसह, गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचा सहयोग लाभलेला आहे. या वर्षापासून मध्यप्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांचा पहिल्यांदाच सहभाग झाला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य काही कंपन्यांकडून फालीला सौजन्य प्राप्त होणार आहे. असोसिएशन फॉर फालीचे बोर्ड मेंबर्स (सदस्य) त्यासाठी पाठपुरावा करत आहेत असे फालीचे चेअरपर्सन, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी २५ एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत क्षेत्र भेटी होतील. यात टिश्यू कल्चर लॅब, यूएचडीपी (अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्टेशन) फ्रूट डेमो प्लॉटला, फळ प्रक्रिया आणि कांदा निर्जलीकरण प्लांट, टिश्यू कल्चर पार्क आणि फ्युचर फार्मिंगला भेट देऊन आल्यावर सुप्रसिद्ध “खोज गांधीजी की” या एकमेव अद्वितीय दृक-श्राव्य संग्रहालयास विद्यार्थ्यांची भेट होईल. त्यातून विद्यार्थ्यांना महात्मा गांधींचे जीवन आणि कार्य अनुभवता येऊ शकेल. जैन हिल्स येथील ठिबक सिंचन प्रात्यक्षिक व परिश्रम येथे विद्यार्थ्यांची भेट ठरलेली आहे. दुपार सत्रात सहभागी कंपन्यांचे अधिकारी व प्रयोगशील शेतकरी या दरम्यान गट चर्चा होईल. सायंकाळी ७.०० नंतर फालीचे विद्यार्थी प्रयोगशील विकसीत शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळी विद्यार्थ्यांचे बिझनेस प्लॅन सादरीकरण होईल. दुपारी आकाश मैदानावर विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले जाणार असून त्यातून परीक्षक विजेत्यांची निवड करतील. या दोन्ही  प्रकारात विजेत्या ठरलेल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येऊन समापन होईल.

फालीच्या पहिल्या सत्राचा पारितोषिक देऊन समारोप

जळगाव दि.२३ (प्रतिनिधी) – ‘भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान आणि (फाली) भविष्यातील शेती नायकांची आवश्यता आहे. आपण दररोज भोजन करतो त्या शेतकऱ्यांप्रती प्रत्येकाने कृतज्ञतेचा नमस्कार करायला हवे असे मोलाचे विचार जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले. फालीच्या पहिल्या सत्रातील बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन व इन्होंव्हेशन प्रेझन्टेशन विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी सुसंवाद साधताना तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पुण्य, पैसा आणि आशीर्वाद हे शेती व शेतीशी संबंधीत व्यवसाय केल्याने मिळतात, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचा रस्ता अडविण्यापेक्षा पाणी अडवा, कुणाची जिरविण्यापेक्षा पाणी जिरवा, तिसरी गोष्ट म्हणजे कुणाची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा त्यामुळे पर्यावरण आणि पर्यायाने सर्वांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होतील. शेतीला व्यापार व्यवसाय या दृष्टीने बघावे म्हणते शाश्वत शेती करू शकाल. यावेळी जितके अन्न आवश्यक असेल तितकेच घेईल, अन्न वाया घालविणार नाही याची शपथही अतुल जैन यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर नॅन्सी बॅरी यांच्यासह फालीसाठी सहयोग करणाऱ्या ११ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अधिवेशनची आज पहिल्या सत्राचा समारोप झाला. यावेळी अतुल जैन बोलत होते.  जैन हिल्सच्या आकाश मैदानावर कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थित नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन, बिझनेस प्लॅनचे सादरीकरणामधील विजेत्यांना टीशर्ट, चषक, मेडल देऊन गौरविण्यात आले. अॅग्रीकल्चर एज्युकेटरचासुद्धा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महेंद्रा कंपनीचे दीपक ललवाणी, प्रॉम्प्ट कंपनीचे नरेश पाटील, ध्रुव वाघेला, आयटीसीचे सहयोग तिवारी, शैलेंद्रसिंग, स्टार अॅग्रीचे निवेश जैन,  इमरान कांचवाला, यूपीएल कंपनीचे अविनाश ठाकरे, योगेश धांडे, गोदरेज अॅग्रोवेटचे विनोद चौधरी, डॉ. आकाश, अमूलचे परेश पाटील, मौलिक कांबळे, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, किशोर रवाळे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटियाल यांनी तर भाषा अनुवाद रोहिणी घाडगे यांनी केले. फालीच्या १० वर्षे वाटचालीबाबत व पुढील योजनांबाबत फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांनी उपस्थितांशी इंग्रजीतून संवाद साधला.

बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन विजेते  – हर्बल न्युट्रिशियस रागी, नवमहाराष्ट्र विद्यालय पंधरे पुणे (प्रथम), कार्बन फार्मिंग – एफ एम खंडेलवाल हायस्कूल शिरूड जि धुळे (द्वितीय),  ॲग्रिमजदूर मोबाईल ॲल्पिकेशन – सी एम राईस  गव्हर्नमेंट हायर सेकडरी स्कूल शिवाजी नगर इंदौर मध्यप्रदेश, (तृतीय), जन औषधी सुविधा सॅनेटरी नॅपकीन- बी. डी. आदर्श विद्यालय केलवड जि. नागपूर (चौथा), यलो ॲण्ड ब्यु स्टिकी ट्रॅप्स ( परशुराम नाईक विद्यालय बोरगावमंजू जि. अकोला (पाचवा) क्रमांकाचे विजेते ठरले.

नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन विजेते – मल्टीपर्पज फार्मिंग- न्यू इंग्लिश स्कूल फॉर मलकापूर जि. कोल्हापूर (प्रथम), सायकल स्प्रेईंग इक्विपमेंट- आचार्य गजाननराव गरुड सेकंडरी स्कूल शेंदुर्णी जि. जळगाव (द्वितीय), ऑटोमेटिक इरिगेशन सिस्टिम्स- जयदीप रेसिडेन्शीयल कळंब जि. यवतमाळ (तृतीय), फल्टीलायझर ॲप्लिकेटर – श्रीमती अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय वरेधरना जि. नाशिक (चौथा), सोलार पॅनल स्प्रेईंग मशीन- पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव बसवंत ज़ि. नाशिक (पाचवा) क्रमांकाने विजयी झाले.

विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन व बिझनेस प्लॅन सादरीकरण – दुपारच्या सत्रात जैन हिल्स येथे विद्यार्थ्यांनी बिझनेस प्लॅन व इंहोव्हेशन सादरीकरण केले. यात  भुईमूग शेंगा सोलणी यंत्र –  (नवजीवन सेकंडरी आश्रम स्कूल आंबा तांडा), इंहोव्हेटिव्ह फार्म मल्टी पर्पज मॉडेल – (गुरु दयाल सिंग राठोड सेकंडरी आश्रम स्कूल गराडा), सायकल स्प्रे इक्विपमेंट- (आचार्य गजाननराव गरुड सेकंडरी स्कूल शेंदुर्णी), फॉर्म सिक्युरिटी अलार्म-(राणीदानजी जैन सेकंडरी आणि श्रीमती कांताबाई जैन हायर सेकंडरी स्कूल वाकोद),  फर्टीलायझर एप्लीकेटर मॉडेल-(जनता विद्यालय चाटोरी), सोलर व्हेजिटेबल ड्रायर- (वसंतराव नाईक सेकंडरी आश्रम स्कूल तेलवाडी),  शेंगदाणा काढणी यंत्र- (स्वामी प्रणव आनंद सरस्वती हायस्कूल कालीमठ), फर्टीलायझर स्प्रेडर (श्रीमती राधाबाई शिंदे हायस्कूल हस्ता), फर्टीलायझर एप्लीकेटर (अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय), मल्टीपर्पज फार्म मशीन, लाईव्ह सेविंग स्टिक(छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय खेडगाव), सोलर पॅनल स्प्रेईंग मशीन (पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव बसवंत), अॅग्रीकल्चर मल्टीपर्पज इम्प्लिमेंट श्रीराम विद्यालय, मल्टीपर्पज एग्रीकल्चर बायसिकल (प्रकाश हायस्कूल मालेगाव), सोलार फेन्सिंग सिस्टीम (न्यू इंग्लिश हायस्कूल मोहपा), इलेक्ट्रिक कल्टीवेटर-(म्युन्सिपल हायस्कूल कलमेश्वर), मल्टीपर्पज कल्टीवेटर, सोलर वॉटर पंप, मॉडर्न ओनियन स्टोरेज (पीएम रुईकर ट्रस्ट हायस्कूल नांजा), व्हेंटिलेटर ओनियन स्ट्रक्चर (माणिकराव पांडे विद्यालय फालेगाव), फळ आणि भाजीपाला ड्रायर (राजापूर हायस्कूल राजापूर), एक हॅचरी मशीन, काजू हार्वेस्टर, झिरो बजेट शेण गोळा करण्याचे यंत्र, हॅन्डविडर, फर्टीलायझर डिस्ट्रीब्यूटर, शेवगा शेंग काढणी यंत्र, सीड डिबलर मशीन, फार्मस्टिक, सायकल होल, ऑटोमॅटिक ट्रॅक्टर अशा सुमारे ५८ मॉडेल्सची मांडणी जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर करण्यात आली होती.

रामलल्लाच्या प्रतिमेसह, विशेषांकाचे जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना वाटप

जळगाव दि.२३ प्रतिनिधी – ‘प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान हे सेवेचे, स्वामीभक्तीचे, संस्कारशीलतचे ते प्रतिक होय. याच संस्कारातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन परिवार सेवाभाव जोपासत आहे. प्रभू ‘रामलल्ला’ विशेषांकाचे प्रकाशन आज ग्रामदैवत श्रीराम मंदिरात झाले. या पार्श्वभूमीवर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह सहकाऱ्यांकडून आध्यात्मिक, धार्मिक आणि सेवाभाव जोपासला जावा ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना’ ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी व्यक्त केली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. निर्मित जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांक हनुमान जयंतीदिनी प्रकाशन  आज श्रीराममंदीर येथे झाले. त्याप्रसंगी ह.भ.प. मंगेश महाराज बोलत होते. यावेळी कानळदा कण्वआश्रमचे स्वामी अद्वैतानंद चंद्रकिरण महाराज, ह.भ.प. श्रीराम महाराज, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, दीपक घाणेकर, अनिल राव, भालचंद्र पाटील, योगेश्वर गर्गे, स्वानंद झारे, सचिन नारळे, उदय भालेराव, ललीत चौधरी, संदीप रेदासनी, संजय रेदासनी, राजेश नाईक, महेंद्र पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भूमिपुत्र संपादकीय मंडळाचे सदस्य अनिल जोशी, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती. अशोक जैन यांनी रामलल्ला विशेषांक निर्मितीमागची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल जोशी यांनी केले.

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, कान्हदेशातील प्रभू रामचंद्रांच्या पाऊलखुणा, रामलल्ला प्रतिष्ठापनाप्रसंगी जळगाव शहरात लालबहादूर शास्त्री टॉवरसह विविध चौक, उद्याने येथे उत्साहाने-आनंदाने करण्यात आलेली सुंदर सजावट, अशोक जैन यांना अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मिळालेले निमंत्रण, अयोध्या यात्रेची अनुभूती, जळगावचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या राममंदिरासह कान्हदेशातील मंदिरांचा थोडक्यात इतिहास अशा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांसह रामलल्ला विशेषांक भावपुष्पांची श्रद्धाशील मांदियाळी असणारा आहे.

‘आयुष्याच्या वाटचालीत देशात-परदेशात वेगवेगळ्या निमित्ताने कितीही भ्रमंती झाली असली तरी अयोध्या येथील अनुभव हा केवळ औपचारिक प्रवासाचा अनुभव, एवढ्याच पातळीवर न राहता, आयुष्याच्या वाटचालीला भावार्थ देणारी ती एक साक्षात पवित्र अनुभूती होती! आनंदाला आध्यात्मिक आचारविचारांचे, श्रद्धाशील अंत:करणाचं कोंदण असलं तर शब्दातीत प्रचीती येते हे निश्चित! जैन परिवारातील पूर्वजांची पुण्याई आहेच, जिल्हावासियांच्या सदिच्छाही कायमस्वरूपी पाठीशी असल्यामुळेच अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनुभूती प्राप्त होऊ शकली याची विनम्र जाणीव आहे, राममंदिर साकार करणाऱ्या सर्वांविषयी, त्यांच्या परिवारातील सदस्यांविषयी नितांत आदर भावना आणि कृतज्ञता मनात ठेवत रामलल्ला विशेषांक सचित्र शब्दातीत केला आहे.’ अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी यावेळी दिली.  जैन भुमिपूत्र ‘रामलल्ला विशेषांक’ जैन इरिगेशनच्या सर्व दहा हजार सहकाऱ्यांना वितरीत करण्यात आला, यासोबत गृहपत्रिकेचा नेहमीचा अंक, प्रभू रामलल्लांची प्रतिमा आणि प्रसाद वाटप करण्यात आला.

 

फोटो ओळ –

जैन हिल्सला फालीचे दहावे अधिवेशन सुरु

जळगाव दि. 22 (प्रतिनिधी)–  शेती करायची असेल तर प्रत्येकामध्ये सर्वगुण संपन्न असावे, ईलेक्ट्रीशयन पासून सर्व काही करावे लागते. भविष्यात मजूरांची टंचाई निर्माण होईल मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढले पाहिजे. गुणवत्ता, ॲग्रोनाॕमिक सेवेत जैन इरिगेशनमध्ये शेतकऱ्यांचा विचार केला जातो ते कुटुंबाप्रमाणेच समजतात, असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यानी व्यक्त केले.
भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अधिवेशनची आज जैन हिल्सला सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या सुसंवादात, शेतीत प्रत्येक दिवशी समस्या आहे, मात्र सोल्यूशन शोधावे लागेल, एकच चावी आहे ती म्हणजे जैन इरिगेशन!  बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे. शेती करावीच लागेल नाहीतर खाणार काय? शेती हा असा व्यवसाय असून ती करावीच लागेल त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेतली पाहिजे यातुन भविष्यातील नायक घडविले जातील. शेती पोट भरण्यापूरती न करता उत्पादन वाढविणे हे महत्त्वाचे आहे. असा केळी, हळद, मका, कांदा, आले, आंबा उत्पादक  शेतकऱ्यांनी सुसंवाद साधला. हवामानातील  बदल, मार्केंटिग, नविन तंत्रज्ञान, केळी उत्पादनाचे नफ्याचे आर्थिक गणिते, जैन तंत्रज्ञान यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. सुनील नारायण पाटील-देवरे (भारूडखेडा ता जामनेर), प्रताप काशिनाथ भुतेकर (तोंडापूर, ता जामनेर), अंकूश राजेंद्र चौधरी (चांगदेव, ता. मुक्ताईनगर), प्रफुल्ल महाजन (वाघोदा ता. रावेर), निखील मनोहर ढाके (न्हावी ता. यावल) या शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगत भविष्यातील शेतीविषयी मार्गदर्शन केले.  रागिणी सहारे, सुजीत नलवंडे, पार्थ बाभूळकर, सानिका बोडके, निलेश चौधरी, प्रियंका शाहू या फाली विद्यार्थ्यांनी लिड केले. जुली पटेल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
पहिल्या टप्प्यातील पहिला दिवस – फाली उपक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, व मध्यप्रदेश राज्यातील ४०० विद्यार्थी व ५० फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू,  टिश्यू कल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.
अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा – दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे गट चर्चा झाली यामध्ये जैन इरिगेशनचे तज्ज्ञ डॉ. के बी पाटील, डॉ. अनिल ढाके, अतिन त्यागी, संजय सोनजे, जगदीश पाटील हे तसेच इमरान कांचवाला, निवेश जैन (स्ट्रार ॲग्री), दीपक ललवाणी ( महिंद्रा सेंट्रल ऑफ एक्सलन्स),  शैलेंद्र सिंग, सहयोग तिवारी (आय टी सी),  डॉ.परेश पाटील (अमूल इंडिया), डॉ.विनोद चौधरी (गोदरेज टायसन) त्याच प्रमाणे रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील प्रगतशील शेतकरी अमोल पाटील सहभागी झाले होते.
 फालीचा १० वा वर्धापन दिन – फाली कार्यक्रमाचा आज १० वा वर्धापन दिन होता या निमित्ताने फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला.  आजचे पाहुणे म्हणून लाभलेले प्रगतशील शेतकरी अमोल पाटील यांचा ही वाढदिवस होता. त्यांच्या जन्म दिनाच्या औचित्याने पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण – फाली १० मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.
जॉईन Trading Buzz
Exit mobile version