जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आज भक्तामर की अमर गाथा संगीत नाटकाचे आयोजन

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – येथील भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी ६.०० वाजता ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की, रंगभूमीवर १०० कलावंत  भक्तामर स्तोत्रातील देवत्व आणि चमत्कारी शक्ती जिवंत करतील, ज्यामुळे आमची श्रद्धा अधिक दृढ होईल आणि जैन धर्मातील सखोल तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन तसेच पुरुष विभागाचे प्रवीण पगारिया तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी केले आहे.

भक्तामर स्तोत्रचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे मानले जाते की या स्तोत्रातील भक्तीची भावना इतकी मोलाची आहे की जर ते  मनाच्या एकाग्रतेने पाठ केले तर देवाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. भावी पिढी मूल्यांशी जोडलेली असावी, त्यांना जैन धर्माचे ज्ञान व ताकद समजावी, आपली संस्कृती आणि धर्म किती महत्त्वाचे आहे याची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली आहे.  *भक्तामर की अमर गाथा* (संगीत नाटक) कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. जास्तीतजास्त संख्येने परिवारासह या कार्यक्रमाची अनुभूती घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) –  महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले आहे. अहिंसा सद्भावना शांती यात्रेसह देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात समस्त जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.

अहिंसा सद्भावना शांती यात्रा ही लालबहादूर शास्त्री टॉवर पासून आरंभ होऊन नेहरू चौक – शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचेल. या यात्रेत जिल्हा पालक मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे(राजूमामा), आ. लताताई सोनवणे, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री अंकित, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, डॉ. भरत अमळकर, जळगावच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन या मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी उद्यानातील सर्व उपस्थितांना अहिंसा शपथ देण्यात येईल. महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे यावेळी मार्गदर्शन लाभणार आहे.

गांधी जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे जळगाव तालुक्यातील शाळांसाठी शहरी व ग्रामीण गटात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे सकाळी १० वाजता कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी संघांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात येईल. आपला जन्मदिवस हा चरखा जयंती म्हणून साजरा व्हावा असे महात्मा गांधीजींनी म्हटल्यानुसार हा दिवस चरखा जयंती म्हणूनही साजरा केला जातो. चरखा जयंतीच्या निमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने गांधी तीर्थ येथे सकाळी ८.०० ते रात्री ८.०० दरम्यान अखंड सुत कताई करण्यात येणार आहे. संस्थेचे सहकारी सुत कताई करतील, यामधे चरखा चालवू इच्छिणारे वा शिकणेसाठी पण सहभागी होता येणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये जळगावकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

जळगाव दि.२८ प्रतिनिधी  –  गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही व यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि  १५००/- ची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

जळगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळांसाठी गांधी तीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात होईल. स्पर्धा संपल्यानंतर तेथेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसह यशस्वी शाळांना रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शाळांनी भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले, असून त्यासाठी दि.३० सप्टेंबर पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३०६२३३०) किंवा गिरीश कुळकर्णी यांच्याशी (९८२३३३४०८४) संपर्क साधावा असे प्रसिद्धी  पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

इनरव्हील क्लब जळगावच्या महिलांना मार्गदर्शन,एचआयव्हीग्रस्त महिलेला शिलाई मशिन वाटप

जळगाव दि.26 प्रतिनिधी – महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घर, परिवार आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकरित्या पुढे येऊन सर्व विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या विचारांतून दीन, दुबळ्यांसह गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम इनरव्हीलच्या माध्यमातून करता येत आहे, त्यासाठी जळगाव इनरव्हील क्लबच्या माध्यमातून उषा जैन व टिम प्रयत्न करत असल्याचा आनंद आहे. सध्या समाजात अस्वस्थता असून सामाजिकस्तरावर अस्वस्थता आहे ही भरकटेलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. इनरव्हिल क्लबच्या विशिष्ट प्रक्रियेतून विधायक कार्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा व आपल्या संस्कृतीचे संवर्धन करावे असे आवाहन डिस्ट्रीक चेअरमन जयश्री पोफळे यांनी केले.
रोटरी क्लबच्या गणपती नगर येथील हॉलमध्ये झालेल्या ऑफीशल चेअरमन व्हिजीटप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर डिस्ट्रीक्ट ट्रेजरर प्रिती दोशी, जळगाव इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, ट्रेझरर गुंजन कांकरिया, पीडीसी नुतन कुंक्कड, पीएटी मिनील लाठी, सीसी रंजन शहा उपस्थित होते.
दीपप्रज्ज्वलनाद्वारे कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. मयुरी पवार यांनी भगवती स्तुती म्हटली. अर्चना लोंढे यांनी कुण्या गावाचं आलं पाखरु.. या गीतावर वेलकम डान्स  सादर केला. साधना गांधी यांनी परिचय करुन दिला. गुंजन कांकरिया यांनी हिशोबाचा लेखाजोखा मांडला. निशीता रंगलानी यांनी इनरव्हील क्लब ने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष उषा जैन यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सांगत भविष्यातील प्रोजेक्ट विषयी क्लबमधील महिला सदस्यांना माहिती दिली. महिला सुरक्षेतेसह, सायबर क्राईम, सोशल माध्यामांसह मोबाईल टिव्हीचा वाढलेला अतिरेक वापर, यामुळे महिलांसह मुलांच्या मानसिक संतुलनावर होणार परिणाम, गुड टच ब्याड टच याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पदवी ला असलेल्या मुकबधिर मुलीला विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच एचआयव्हीग्रस्त महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने शिलाई मशिनचेही वाटप करण्यात आले. डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच

जळगाव दि.२५ प्रतिनिधी –  जैन इरगेशन सिस्टीम्स लि. च्या स्पोर्ट्स विभागातील प्रशिक्षक मुशताक अली हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंच परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या अधिकृत पंचांच्या यादीत त्यांनी स्थान पटकावले आहे.

क्रिकेट खेळाडू ते क्रिकेट प्रशिक्षक व आता क्रिकेटचे अधिकृत पंच हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुशताक अली हे आता जिल्ह्यातील चौथे अधिकृत पंच ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे सहसचिव अविनाश लाठी, जळगावचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनच्या पंच समितीचे सदस्य संदीप गांगुर्डे यांच्यासह जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांविषयी जागृती व्हावी. लहान मुलामुलींपर्यंत या लोक कला पोहोचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे दि.२२ सप्टेंबरला सादरीकरण केले.

यात अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप सोडली. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम विजयी झाले त्यांना ११ हजाराचे रोख पारितोषक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. समुह गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला यासाठी सात हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. एकल लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झाले. ३ हजार व चषकाने गौरविण्यात आले. एकल लोक गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक दोन हजार रोख व चषकाने सन्मानित करण्यात आले. यासह वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले त्यांना ५०० रुपये रोख व चषक असे पारितोषिक प्रदान करण्यात आले. समूह लोकगीत व समूह लोकनृत्याच्या सादरीकरणात एकूण २७ शाळांनी सहभाग घेतला होता. पारितोषिक वितरणाप्रसंगी आमदार सुरेभ भोळे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, मृदंग अॅड्सचे अनंत भोळे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष-प्रशासन हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष-उपक्रम अमोल ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. विनोद ढगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनुभूती स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन यांच्यासह प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले. ज्ञानेश्वर सोनवणे, भूषण खैरनार यांच्यासह अनुभूती स्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत.

भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती – अतुल जैन

भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती असल्याची प्रतिक्रिया जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी दिली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा नेत्रदीपक विजय हा देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही संघांनी – पुरुष आणि महिला – अत्यंत चांगली कामगिरी केली. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली प्रतिभा तर सिद्ध केलीच, पण मानसिक कणखरपणा आणि सांघिक कार्यातून हे सिद्ध केले की भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती बनला आहे.
पुरुष संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी सातत्याने प्रत्येक सामना अचूक रणनीती आणि एकाग्रतेने हाताळला. त्याच्या अनेक खेळांमधील निर्णायक चाली पाहून संपूर्ण जगाने त्याच्या कौशल्याचे कौतुक केले. महिला संघानेही दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कठीण परिस्थितीतही धीर सोडला नाही. त्याच्या खेळात संयम आणि जिद्द दिसून आली.
या दोन भारतीय संघांच्या विजयावरून देशातील बुद्धिबळाची पातळी सातत्याने वाढत असून, भारतीय खेळाडूंमध्ये विश्वविजेते बनण्याची क्षमता असल्याचे दिसून येते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ही कामगिरी येणाऱ्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल.
भारतीय खेळाडू जागतिक शतरंज ऑलिंपियाड, ग्रँडमास्टर स्पर्धा, आणि इतर प्रमुख स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या अधिक संख्येने युवा खेळाडूंनी यश संपादित केले आहे. विशेष म्हणजे पुरुष(ओपन) व महिला या दोन्ही गटांत भारताने एकाच वेळी पहिल्यांदाच विजयी सुवर्ण पदक प्राप्त करुन भारताचे वाश्विक स्तरावर वर्चस्व प्राप्त केले आहे. आणि या दृष्टीने त्यांना “गोल्डन जनरेशन”म्हणता येईल
चेस किंवा शतरंज हा मूळ भारतीय खेळ आहे, आणि त्याची उत्पत्ती भारतात प्राचीन काळात झाली. शतरंजचे मूळ रूप संस्कृतमध्ये “चतुरंग” म्हणून ओळखले जात असे
सध्याची भारतीय युवा खेळाडूंची पिढी अत्यंत प्रतिभाशाली आहे.अर्जुन एरिगैसी,डी गुकेश, प्रज्ञाननंदा, विदित गुजराथी, दिव्या देशमुख, टी.आर. वैशाली सारखे खेळाडू जागतिक स्तरावर यशस्वी होत आहेत, ज्यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे. सर्व विजयी खेळाडू,कर्णधार, प्रशिक्षकांचे, AICF चे पदाधिकारी या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। अतुल जैन अध्यक्ष, जळगाव जिल्हा चेस एसोसिएशन

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने साधलेले अपूर्व यश भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला असल्याची प्रतिक्रिया जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनीं दिली आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे. अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे. या विजयामागे केवळ खेळाडूंचा नाही, तर प्रशिक्षक, व्यवस्थापक, संघाचे पदाधिकारी, आणि खेळाच्या प्रत्येक टप्प्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. संघाच्या या संघटित प्रयत्नांमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाला आहे.

हा विजय केवळ एका स्पर्धेचा नाही, तर भारतीय बुद्धिबळाच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या यशाने नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, आणि देशभरात बुद्धिबळ खेळाच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ होईल. या विजयामुळे भारत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एक अग्रगण्य शक्ती बनत आहे, आणि हे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
चेस ऑलिंपियाड मधील सर्व सहभागी प्रतिभाशाली खेळाडू अर्जुन एरीगैसी, डी गुकेश,आर प्रगनानन्धा, विदित गुजराथी, हरीकृष्ण पेंटाला व महिला गटातील खेळाडू हरीका द्रोणावल्ली, आर वैशाली, तानिया सचदेव, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल यांनी जागतिक स्तरावर यश प्राप्त केले यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे.या सर्व विजेत्या खेळाडूंचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. चेस ऑलिम्पियाडचे कप्तान म्हणून ग्रैंड मास्टर अभिजीत कुंटे आपले नेतृत्व अद्वितीय आहे. आपल्या मार्गदर्शनात भारतीय टीमने अनेक महत्त्वाच्या यशांचे शिखर गाठले आहे. आपली रणनीती, समर्पण आणि प्रेरणा खेळाडूना नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करते. आपल्या कामगिरीसाठी आपल्याला मनःपूर्वक अभिनंदन!
विशेष म्हणजे चेस ऑलिम्पियाड विजेता  *विदित गुजराथी* ला शतरंज प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात सहकार्य करण्याची संधी *जैन इरिगेशन* ला मिळाली, याचा आम्हाला अभिमान आहे. आज त्याच्या यशस्वी घोडदौडीला पाहून हृदयभरून येतं, आणि त्याच्या प्रगतीने आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. त्याची मेहनत, समर्पण आणि यश खरोखरच प्रेरणादायी आहे.”
  1. आमच्या सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना, आणि संपूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित असून, भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आपल्या संघाच्या उज्ज्वल वाटचालीसाठी अशाच उंच भरारीची आणि यशस्वी भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! अशोक जैन सल्लागार समिती सदस्य,
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF)

जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात

 जळगाव दि.२३ (प्रतिनिधी)– जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती स्कूल द्वारे सहआयोजित जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ मधील १४, १७ आणि १९ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्यात. अनुभूती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे १९ ते २१  सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली.

या स्पर्धेत शहरातील शाळांमधील १४, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या २० संघांचा समावेश होता. या स्पर्धेत ५० संघांचे २५० खेळाडूंचा सहभाग नोंदविला. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लि. तर्फे क्रमश: गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक पारितोषिक म्हणून देण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन  जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडासमन्वयक रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती निवासी स्कूल शाळेचे व्यवस्थापक विक्रांत जाधव, भिकन खंबायत, जैन स्पोर्ट्स अॅकडमी फुटबॉलचे प्रशिक्षक श्री मोहसीन व मुख्य पंच दीपिका ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक देण्यात आले. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले.

स्पर्धेचा निकाल

१४ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय क्रमांक –  पोदार इंटरनेशनल स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल

१४ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – महाराणा प्रताप हायस्कूल, द्वितीय क्रमांक –  सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल

१७ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – ओरियन स्कूल (स्टेट बोर्ड), द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल

१७ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक –  सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल

१९ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – बबन बाहेती महाविद्यालय

१९ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – एम. जे. कॉलेज, द्वितीय क्रमांक –  सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – नूतन मराठा महाविद्यालय

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर व पंच म्हणून नमन जैन, ईशांत साळी, रजत पटेल, फाल्गुन पाटील, शांतनू फालक, संस्कार, अंकित कोळी, देवेंद्र कोळी, अनामय जोशी, फाल्गुनी पवार, तेजश्री शुक्ल, हमजा खान, मिहिर कुलकर्णी, रीत नाथांनी, शुभम चांदसरकर, करण पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात विकास बारी, शुभम पाटील, पूनम ठाकूर, राखी ठाकूर, जाझीब शेख, मशरुख शेख यांनी परिश्रम घेतले. सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

जळगाव दि.२० प्रतिनिधी – तालुक्यातील रामदेववाडी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा रामदेववाडी तांडा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. यात 120 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरात विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी रोटरी रॉयलचे अध्यक्षा डॉ. वर्षा रंगलानी यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी, ब्रश कसा करावा आणि दातांच्या आरोग्यासाठी पोषक आहार कसा असावा या संदर्भात मार्गदर्शन केले. ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत सांगितले. डॉ. नितीन  विसपूते यांनी व्यसनांचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तंबाखू, गुटखा, सुपारी यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. डॉ. बिंदू छाबडा यांनी विद्यार्थ्यांना हाताधुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

रोटरी क्लब रॉयल यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना ब्रश आणि बिस्कीट वाटप केले.  डॉ. जयदिपसिंग छाबडा, नितीन मंधान, पिंकी मंधान, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. निशा तलरेजा, आणि सिमा मुलानी यांनी दंत चिकित्सक शिबिरासाठी सेवा दिली. ज्यांना दंतचिकित्सक विषयी समस्या होत्या, त्यांना पुढील उपचारासाठी टोकन देण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार हे मौखीक आरोग्याच्या दृष्टाने समस्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत माहिती पोहचविणार आहे.  प्रशांत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जि.प. शाळेच्या शिक्षिका रत्नप्रभा वाणी, कल्पना सपकाळे, हर्षा तायडे, पुनम बागुल यांनी शिबिराच्या व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version