जळगाव : शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यानी त्यांचे ई केवायसी प्रमाणीकरण केलेले नाही अशा लाभार्थ्यांकरीता प्रमाणीकरण पुर्ण करण्यास दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थी शेतक-यांना ई केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
ज्या लाभार्थी शेतक-यांचा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी संलग्न केलेला असेल अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर मधील ई केवायसी या टॅब मधुन ओटीपी द्वारे लाभार्थ्यांना स्वतः ई केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. तसेच ई केवायसी करतांना काही तांत्रिक अडचण येत असल्यास लाभार्थ्यांना ग्राहक सेवा केंद्रावरुन सीएससी बायोमॅट्रिक पध्दतीने प्रमाणीकरण करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. 15/- मात्र निश्चित करण्यात आला आहे. तरी जिल्हयातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत आपले e-KYC प्रमाणीकरण पूर्ण करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Author: Trading Buzz
जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची होणार घट
जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, आणि टेमासेक-मालकीच्या रीवूलीस पीटीई लिमिटेड., सिंगापूर यांनी जैन इंटरनॅशनल ट्रेडिंग बी.व्ही. (जैन इरिगेशनची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी) आणि रीवूलीस यांच्यात निश्चित व्यवहारिक करार केला आहे. जैन इरिगेशनचा इंटरनॅशनल इरिगेशन बिझनेस (“आय.आय.बी.”) यापुढे रीवूलीसमध्ये विलीन करून जागतिक सिंचन आणि हवामान महासत्ता तयार केली जाईल, जी जगातील सगळ्यात मोठी दुसऱ्या क्रमांकाची असेल आणि ज्याचा महसूल ७५० दशलक्ष यु.एस. डॉलर्स (भारतीय रूपयात 5800 कोटी) इतका असेल. या रोखी आणि स्टॉक व्यवहारातून पुढील गोष्टी साध्य होतील.
या व्यवहारात रोख रकमेचा उपयोग जैन इरिगेशनचे एकत्रित कर्ज ४५% ने कमी करण्यासाठी केला जाईल, ज्याद्वारे जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची घट होण्यास मदत होणार आहे. ज्यात २२५ दशलक्ष यु.एस. डॉलर्स (भारतीय रूपयांत 1757 कोटी) पर्यंतच्या सर्व पुनर्रचित विदेशी बॉन्डचा आणि आय.आय.बी. समाविष्ट असलेल्या विदेशी ऑपरेटिंग कंपन्यांच्या संपूर्ण कर्जाचा समावेश आहे. विलीन झालेल्या संस्थेत जैन इंटरनॅशनल बिझनेस २२% ची भागीदारी कायम ठेवेल आणि राहीलेली ७८% टेमासेक कडे असेल. जैन इरिगेशनने बॉण्डधारक व आय.आय.बी कर्जदारांना दिलेली २,२७५ कोटी रुपयांची कॉर्पोरेट हमी देखील सोडवण्याची संधी जैन इरिगेशनला मिळेल. विलीन झालेल्या संस्थेसोबत जैन इरिगेशनचा दीर्घकालीन पुरवठा करार असेल. यामुळे महसूल आणि नफा वाढण्यास मदत होईल. विलीन झालेली संस्था प्रख्यात जैन ब्रँड्सचा वापर आणि प्रचार लक्षणीय उपस्थिती, मागणी, मूल्य असलेल्या मार्केट्समध्ये सुरू ठेवेल. प्रशासनाच्या दृष्टीने, कंपनीच्या संचालक मंडळावर जैन इरिगेशनचे प्रतिनिधी संचालक व निरीक्षक असतील आणि सूक्ष्म सिंचनातील त्यांच्या कौशल्याचा उपयोग कंपनीच्या वाढीस मदतीचा ठरेल. जागतिक सिंचनक्षेत्रात जैन इरिगेशन संभाव्य भावी मूल्य निर्मिती राखून ठेवेल. तसेच जैन इरिगेशन जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सिंचन बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतीय व्यवसायात आणखी सुधारणा करेल. यातून व्यवसायाचा विस्तार होऊन नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल. या कराराद्वारे अलीकडील पुनर्गठनात आर्थिक संघटनांशी सहमती केल्यानुसार भारतीय व्यवसायाच्या ताळेबंदावरील कर्ज कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.
विलीगीकरणाची ठळक वैशिष्ट्ये – ७५० दशलक्ष यु. एस. डॉलर्स महसूल असणाऱ्या या एकत्रिकरणाचा मार्केट विस्तार सहा महाद्वीप व ३५ देशांमध्ये नावीन्यता, डिजिटल तंत्रज्ञान व शाश्वता यावर आधारित असेल. जागतिक गुंतवणूक कंपनी टेमासेकने यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये रीव्युलीस मधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले आणि मार्च २०२२ मध्ये पूर्ण मालकी स्वीकारली.
हा व्यवहार म्हणजे आंतराष्ट्रीय आणि भारताच्या ताळेबंदातील कर्ज लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी (डीलिव्हरेजिंग ऑफ बॅलेन्सशीट) आणि वेगाने वाढणाऱ्या भारतातील व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याच्या जैन इरिगेशनच्या प्रयत्नातील दुसरा टप्पा आहे.
“शाश्वत आणि प्रभावी हाय-टेक कृषी व्यवसाय निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आमच्या मूल्यांशी मिळतीजुळती मूल्ये जपणाऱ्या टेमासेक या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गुंतवणूक कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की, रीवूलीस सोबतच्या विलीनीकरणामुळे जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज होईल. भौगोलिक पाऊलखुणा, आमच्या विस्तारीत सेवा आणि उत्पादने, तसेच तांत्रिक आणि सूक्ष्म सिंचनातील कौशल्यांची जोड लाभली आहे. यामुळे पर्यावरण बदल आणि अन्न सुरक्षा आव्हानांना शाश्वत उपायांसह तोंड देण्यास, तसेच उत्पादकांसाठी पाणी कार्यक्षमता आणि उत्पादकतेसाठीच्या महत्त्वपूर्ण ज्ञान हस्तांतरणासाठी आपण सक्षम होऊ. या मूल्यवर्धित दीर्घकालीन संबंधांमुळे कृषी आणि अन्न परिसंस्थेमध्ये अर्थपूर्ण सकारात्मक प्रभाव निर्माण होईल, अशी आम्हाला अशा आहे. तसेच, टेमासेक सोबत आम्ही भावी अन्न आणि शेतीसंबंधी इएसजी, हाय-टेक कृषी इनपुट, तंत्रज्ञानातील नाविन्यता, तसेच अल्पभूधारक शेतकर्यांच्या फायद्यासाठीच्या उपायांसह संयुक्तपणे सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी उत्सुक आहोत.” – अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
“जगभरातील सिंचन बाजारपेठांच्या वाढत्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या अर्थव्यवस्था आणि समर्पित, वैविध्यपूर्ण कर्मचारी पाया यांचा लाभ घेत असताना, आमच्या उत्पादक समुदायासाठी आणि एकत्रित व्यावसायिक भागीदारांप्रती असलेल्या सर्व वचनबद्धता पाळण्याची आणि त्या आणखी मजबूत करण्याची आम्ही खात्री करू. आमचे सर्व ग्राहक यापुढेही यशस्वी होतील आणि त्यांना विस्तारीत सेवा आणि उत्पादने, आघाडीचे औद्योगिक ब्रँड, विस्तारित उत्पादन क्षमता, अग्रगण्य सिंचन सेवा व्यवसायांच्या समर्थनाचा लाभ मिळत राहील, याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे. रीवूलीस कंपनीने विलीनीकरणापूर्वी चार कंपन्यांच्या संयोजनाचे प्रतिनिधित्व केले होते. या विलीनीकरणाद्वारे, जैन इरिगेशनच्या पोर्टफोलिओमधील आणखी अनेक कंपन्या जोडल्या जातील. यामुळे जगभरातील व्यवसाय एकत्र येऊन, असे जागतिक स्तरावर असे एकत्रीकरण साधण्याची आमची भूमिका अधिक मजबूत होऊन आर्थिक पाया सक्षम असलेली कंपनी निर्माण होईल. रीवूलीसच्या सर्व कर्मचाऱ्यांसह, मी जैन यू.एस.ए., ए.व्ही.आय, आय.डी.सी., आणि नानदानजैन च्या जागतिक संघांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. मला खात्री आहे की आम्हा सर्वांनाच या संयुक्त संघाच्या प्रदीर्घ अनुभव, निरंतर वचनबद्धता, आणि समर्पणाचा फायदा होईल.” – रिचर्ड क्लाफोल्झ, सीईओ, रीवूलीस
एकत्रीत कंपनी म्हणजे रीवूलिस आणि जैन इरिगेशनच्या दीर्घकालीन आणि उद्देशावर आधारित कंपनी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे व्हिजन प्रतिबिंबित करते. जी कृषी सिंचनाच्या परिवर्तनाचे नेतृत्व करेल. ही कंपनी सुलभता, नावीन्यता, आणि शाश्वतता यांच्या मदतीने जागतिक स्तरावरील उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांद्वारे आधुनिक सिंचन उपाययोजना आणि डिजिटल शेतीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यात नेतृत्व करेल.
ग्राहकांद्वारे प्रेरित: कंपनीचे २५ कारखाने आणि ३,३०० कर्मचारी यांच्या मदतीने सहा खंड आणि पस्तीस देशांमध्ये अतुलनीय मार्केट कव्हरेज असेल. रिव्हुलिस, जैन, नानदान जैन आणि युरोड्रिप या ब्रँड्सवर प्रत्येक हंगामात अवलंबून असणाऱ्या उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांना कंपनी पूर्णपणे समर्थन देत राहील.
इनोव्हेशनद्वारे प्रेरित: उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांना D5000 PC, Amnon, T-Tape, Chapin, Ro-Drip, Top, Excel, Compact, 5035 आणि Mamkad यासारख्या विश्वासार्ह उद्योग ब्रँडचा समावेश असलेल्या विस्तृत उत्पादन आणि सेवा श्रुंखलेचा फायदा होईल. आठ दशकांचे संशोधन, विकास, आणि उत्पादन अभियांत्रिकीचे शाश्वत आणि नावीन्यपूर्ण एकत्रीकरण करून जागतिक उत्पादकांच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण केल्या जातील.
डिजिटलद्वारे प्रेरित: जैन लॉजिक, मॅन्ना, आणि रीलव्ह्यू सारख्या डिजिटल शेती सेवांमुले, ही कंपनी सर्वात व्यापक व्यावसायिक व्याप्ती असणारी एक कणखर एजी-टेक सोल्यूशन देणारी कंपनी म्हणून उदयास ऐल. विस्तृत डिजिटल फार्मिंग सोल्यूशन्समुळे उत्पादकांना त्यांचे सिंचन कार्य प्रत्यक्ष वेळी पूर्ण करता येईल. तसेच उत्पादन वाढवून आणि कृषी निविष्ठा कमी करता येतील. यामुळे त्यांच्या उपजीविकेत सुधार होऊन जमिनींचे संरक्षण होईल.
शाश्वततेने प्रेरित: सूक्ष्म सिंचनाच्या जलसंधारण आणि मृदा संरक्षणाच्या ज्ञात फायद्यांपलीकडे, कंपनी आपला उद्देशपूर्ण ESG प्रवास सुरू ठेवेल. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, कंपनी मूर्त स्वरूपातील कार्बन उत्सर्जन लक्ष्यांसाठी वचनबद्ध असेल आणि उत्पादकांना आणि व्यावसायिक भागीदारांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि कार्बन साठा वाढविण्यासाठी मदत करण्यासाठी जागतिक कार्यक्रम सुरू करेल. कंपनीचे उद्दिष्ट केवळ उत्पादकांसाठी सूक्ष्म सिंचन सुलभता आणि या ग्रहाचे पोषण करणे एवढेच नसून, सर्वांसाठी अधिक शाश्वत आणि हवामान संवेदनक्षम भविष्य निर्माण करणे देखील आहे.
कंपनीचे सिंगापूर आणि इस्रायल, असे दोन मुख्यालये असतील आणि कंपनीचे नाव यापुढे ही रीवूलीस पीटीई लिमिटेड असेच राहील. कॉर्पोरेट ब्रँडिंगच्या उद्देशाने कंपनीला “Rivulis (In alliance with Jain International)” असे संबोधण्यात येईल. रिचर्ड क्लाफोल्झ, रिव्हुलिसचे सध्याचे सीईओ, हेच कंपनीचे नेतृत्व करत राहतील. आय.आय.बी. चे वरिष्ठ सहकारी संपूर्ण कंपनीत नेतृत्वाची भूमिका पार पाडतील, अशी अपेक्षा आहे. हा व्यवहार आवश्यक नियामक मंजूरी आणि अन्य पारंपारिक बंद अटींच्या अधीन असेल आणि २०२३ च्या सुरुवातीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गोल्डमन सॅक्स यांनी आर्थिक सल्लागार, बेकर मॅककेन्झी कायदेशीर सल्लागार आणि पी.डब्ल्यू.सी. ने JITBV चे कर आणि कामातील स्थैर्याचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात
जळगाव : जैन इरिगेशनच्या जैन हिल्स, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा त्याच प्रमाणे अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून त्या त्या लोकेशनवर योग मार्गदर्शकांनी कोरोनाचे नियम पाळत योग अभ्यास करून घेतला. योग दिनाचे महत्त्व समजून घेत नियमित योग करून निरामय आरोग्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.
जैन प्लास्टीक पार्क व टिश्युकल्चर पार्क : ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन आणि दोन प्राणायम हे योग करून प्रत्येक व्यक्ती निरामय जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास योगसाधक सुभाष जाखेटे यांनी व्यक्त केला. जैन प्लास्टिक पार्क व टाकरखेडा येथे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बोरसे यांनी केले. प्लास्टिक पार्कचे सुमारे ६०० हून अधिक सहकारी, टिश्युकल्चर पार्क येथील महिला सहकाऱ्यांनी देखील यात हिरीरीने सहभाग घेतला होता.
जैन फूड पार्क येथे योगसाधना शिबिर : जैन व्हॅली येथे जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्री पार्क, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सुमारे १००० सहकाऱ्यांनी जैन व्हॅली येथील मसाला प्रक्रिया प्लांट जवळ योगसाधना केली. योग प्रशिक्षक सौ. ज्योती पटेल यांनी योग प्रशिक्षण दिले. ऑक्सीजनची पातळी वाढविण्यासाठी ताडासन करून घेतले. श्वसन शक्ती वाढविण्यासाठी चंद्र व सूर्य नासिका पित्त, मयूरासन, अर्धमयूरासन, प्राणायम, सुर्यनमस्कार केले. पचनशक्तीसाठी पार्श्वोस्तासन, हात व खांद्यासाठी कुक्कुटासन, शरीर लवचिक होण्यासाठी आंजनेयासन, कंबर व पाठीसाठी भुजंगासन शलभासन, तणाव कमी करण्यासाठी अर्धचक्रासन, त्रिकोणासन, गरूडासन करून घेतले. तत्पूर्वी त्यांनी योगदिनाचे शास्त्रीय व अध्यात्मिक महत्त्व ज्योती पटेल यांनी समजून सांगितले. जैन टिश्यूकल्चर पार्कच्या वरिष्ठ सहकारी सौ. अनिता यादव यांच्याहस्ते सूतीहार देऊन ज्योती पटेल यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. व्ही. आर. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रमोद करोले, बालाजी हाके, अरविंद कडू, रोशन शहा, संजय पारख, असलम देशपांडे, उदय महाजन, नितीन चोपडा यांसह इतर सहकाऱ्यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी मानव संसाधन व कार्मिक विभागाच्या जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, रवि कमोद, आर. डी. पाटील, भिकेश जोशी व इतर सहकारी यांचे सहकार्य लाभले तसेच ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.
अनुभूती निवासी स्कूल व अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल : अनुभूती इंटरनॅशन निवासी स्कूल येथे इयत्ता 5 वी ते 12 च्या संपूर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकतेर कर्मचाऱ्यांनी योगसाधना केली. योगशिक्षीका डॉ. स्नेहल पाटील यांनी विविध योगासने करून घेतली. योग एक जीवनशैली यावर मार्गदर्शनही डॉ. स्नेहल पाटील यांनी केले. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार योगदिन साजरा करण्यात आला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील योग दिवस साजरा झाला.
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम
जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता 10 वीचा सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनीनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. अनुभूती शाळेत यंदा 10 वी साठी एकूण 51 विद्यार्थी होते, त्यातील 50 विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह गुणवत्ता यादीत आले आहे तर एक विद्यार्थी प्रथम वर्गात ( फर्स्ट क्लास ) आला आहे, या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहिली असता 90% च्यावर गुण मिळविणारे 15, 81 ते 90 टक्के गुण मिळविणारे 34, 74 ते 80 टक्के गुण मिळविणारे 2 विद्यार्थी आहेत. सर्वच वि्दयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
पुर्वा रविंद्रसिंग राजपूत -प्रथम (95.60 %), वैष्णवी भास्कर पवार, निकिता गौतम सोनवणे – द्वितीय (94.00 %), दिव्या विलास बारी- तृतीय (93.20 %), राज चंद्रकांत सोनवणे- चतुर्थ (92.60), प्रथमेश शाम वाघ, कु.तेजल दिपक चौधरी- पाचवे (92.20) ठरली. गुणवत्ताधारक उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.
इंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्र, गणित व सामाजिक शास्त्र या विषयात तर बहुतांश विद्यार्थ्यांनी 100 पैकी 95 च्यावर गुण पटकावले आहेत. शास्त्र विषयात राज सोनवणे व पुर्वा राजपूत 98 गुण, गणित विषयात वैष्णवी पवार 95 गुण, मराठी विषयात दिशा सपकाळे 94 गुण, हिंदीमध्ये पुर्वा 93 गुण तर इंग्रजी विषयात कु. क्रिष्णा भानुदास चव्हाण 93 गुण मिळविले आहेत.
कोविड नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष परिक्षा व घरची हलाखीची परिस्थिती अशा आव्हानात्मक स्थितीत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खूप दैदिप्यमान आहे, त्यांच्या या यशात अनुभूती स्कूलमधील शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदाचा मोलाचा सहभाग आहेच, सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल हे त्याचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली. शाळेत प्रथम आलेली पुर्वा राजपूत हिचे वडिल खासगी कंपनीत आहेत. दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली वैष्णवीचे वडिल कारपेंटर तर निकिताचे वडिल पेंटर आणि आई धुणीभांडी काम करतात.
तृतीय आलेल्या दिव्या बारीची आई साफसफाई करतात. चतुर्थ आलेल्या राज सोनवणेचे वडिल शेतकरी आहेत तर पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रथमेशचे वडील लॉड्री तर आई धुणीभांडी करतात. त्याच्यासोबत उत्तीर्ण झालेली कु. तेजल चौधरीची आई खासगी शिकवणी घेतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मिळवलेल्या या यशामुळे सर्वांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. समाजसेवा हा संस्कार आदरणीय भवरलालजी जैन यांच्या विचारांमधून घेतल्याचे सांगत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील दिशा निश्चित करताना डॉक्टर, आयपीएस, आयएएस, आयटी इंजिनीअर तर इंडियन नेव्हीमध्ये देशसेवा करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
गौतम अदानी बीपीसीएलच्या शर्यतीत सहभागी होताना दिसत आहेत, सविस्तर बघा ..
गौतम अदानी रिफायनर/मार्केटर विकत घेण्यासाठी दोन पीई कंपन्यांशी चर्चा करत आहे
गौतम अदानी दोन खाजगी इक्विटी कंपन्यांशी सरकारी ऑइल रिफायनर आणि मार्केटिंग कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) खरेदी करण्याच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी बोलणी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अदानी समूह अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट इंक आणि आय स्क्वेअर कॅपिटल यांच्याशी वाटाघाटी करत असल्याचे समजते; दोन खाजगी इक्विटी कंपन्या स्वतंत्रपणे BPCL साठी योग्य तत्परता करत आहेत,असे एका सूत्राने सांगितले..
मोठा करार
दोन बोलीदारांनी $12-13 अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या कराराच्या आकारामुळे जोखीम सामायिक करण्यासाठी भागीदारांना शोधून काढले आहे. परंतु हवामान बदलाच्या चिंतेचा सामना करण्यासाठी नूतनीकरणक्षम ऊर्जेकडे जागतिक वळणामुळे भागीदार शोधणे कठीण झाले आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने दिलेल्या विक्री अटींनुसार, BPCL साठी पात्र बोलीदार आर्थिक बोली लावण्यापूर्वी बदलू शकतात आणि/किंवा नवीन भागीदार आणू शकतात.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अंतिम मुदत संपली तेव्हा अब्जाधीशांनी बीपीसीएलसाठी ईओआय (स्वारस्याची अभिव्यक्ती) ठेवण्यापासून दूर राहिल्याने अदानीच्या या हालचालीला एक विचार म्हणून पाहिले जाते.
ऊर्जा संघर्ष
काही महिन्यांपूर्वी, अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी हरित उर्जेशी संबंधित व्यवसायांवर संघर्षात गुंतल्याने परिस्थिती नाटकीयरित्या बदलली आहे.
जूनमध्ये, मुकेश अंबानी यांनी जाहीर केले की रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमधील जामनगर येथील ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्समध्ये ₹75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
30 जुलै रोजी, अदानी यांनी “रिफायनरीज, पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स, विशेष रासायनिक युनिट्स, हायड्रोजन आणि संबंधित रसायने प्लांट आणि इतर तत्सम युनिट्स उभारण्याचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची स्थापना करून प्रतिसाद दिला,” अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अहमदाबाद स्थित. समूहाच्या प्रमुख कंपनीने कोणतेही तपशील न देता नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
तेल उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, पेट्रोकेमिकल्स व्यवसायात अदानींच्या प्रवेशाकडे रिफायनरी नसतानाही दृष्टी नव्हती.
रिफायनिंग व्यवसायात, उत्पादन पोर्टफोलिओमध्ये पेट्रोकेमिकल्सची उपलब्धता इंधनाच्या किंमती/मागणीतील घट यापासून बचाव करते. याशिवाय, रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सचे एकत्रीकरण चांगले नफा मार्जिन ठरतो.
BPCL, त्यामुळे, समूहाच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांवर परिणाम न करता अदानीच्या पेट्रोकेमिकल महत्त्वाकांक्षांमध्ये चांगले बसेल.
तथापि, भागीदारी फलदायी होईल याची खात्री नाही आणि चर्चा कोलमडू शकते, असे एका सूत्राने सांगितले. अदानी ग्रुप आणि आय स्क्वेअर कॅपिटलने टिप्पण्या मागणाऱ्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही. अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटने सांगितले की ते ऑफर करण्यासाठी “कोणत्याही टिप्पण्या नाहीत”.
निर्गुंतवणूक योजना
सरकारने बीपीसीएलचे 52.98 टक्के हिस्सेदारी धोरणात्मक खरेदीदाराला विकून खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. BPCL मुंबई, कोची आणि बीना (मध्य प्रदेशात) येथे रिफायनरी चालवते आणि भारतातील नंबर 2 तेल विपणन कंपनी आहे आणि रिफायनिंग क्षमतेनुसार तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील रिसोर्सेस जायंट वेदांता लिमिटेड ही बीपीसीएलची तिसरी दावेदार आहे.
दोन रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदार झाले मालामाल
विस वर्षापुर्वी अवघ्या 2 रुपये 43 पैसे किंमत असलेल्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या आयशर मोटार्स या शेअरमधे गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. ते गुंतवणूकदार आता कोट्याधिश झाले आहेत.
गेल्या विस वर्षापुर्वी आयशर कंपनीच्या शेअरची किंमत 2 रुपये 43 पैसे एवढी होती. या शेअरच्या किमतीने आज 2 हजार 731 रुपयांचा टप्पा गाठला आहे. दोन दशकात या शेअरने 1 लाख 12 हजार टक्क्यांपेक्षा अधिक किमतीचा परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.
कोरोना कालावधीत आयशर मोटर्स या कंपनीचा शेअर 1250 रुपयांपर्यंत निचांकी पातळीवर आला होता. मात्र स्थिती सुधारल्यानंतर या शेअरची किंमत 115 टक्क्यांनी वाढली. गेल्या दशकात या शेअर्समधे दहा हजार रुपयांची गुंतवणूक करणा-यांना आजमितीला 1 लाख 56 हजार रुपयांचा लाभ झाला आहे. तसेच विस वर्षापुर्वीच्या गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा लाभ झाला असेल.
MSCI निर्देशांकात IRCTC, Tata Power आणि Zomato यांचा समावेश होऊ शकतो
MSCI येणाऱ्या शुक्रवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या सहामाही निर्देशांकात फेरबदल करेल. या फेरबदलात झोमॅटो, झोमॅटो, एसआरएफ, टाटा पॉवर, माइंडट्री, गोदरेज प्रॉपर्टीज, आयआरसीटीसी आणि एमफेसिस यांसारख्या समभागांचा एमएससीआय निर्देशांकात समावेश केला जाऊ शकतो, असा ब्रोकरेज हाऊस एडलवाईसचा विश्वास आहे.
जर एडलवाईस यादीत समाविष्ट असलेले सर्व स्टॉक एमएससीआय निर्देशांकात समाविष्ट केले गेले तर भारताला सुमारे $1.3 अब्जचा ओघ दिसू शकतो. याशिवाय, एडलवाईसचा असा विश्वास आहे की IPCA लॅब आणि REC लिमिटेड या निर्देशांकातून वगळले जाऊ शकतात.
एडलवाईसच्या संशोधनानुसार, एमएससीआय इंडेक्समध्ये समाविष्ट केले जाणारे हे सर्व संभाव्य स्टॉक त्यांच्या सध्याच्या मिडकॅप श्रेणीतून काढून टाकले जाऊ शकतात आणि लार्जकॅप श्रेणीमध्ये ठेवू शकतात. यापैकी झोमॅटो लार्ज (Large) कॅपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा की हा अंदाज एडलवाईसच्या संशोधनावर आधारित आहे. एनएसईनेच(NSE) अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
शेअर मार्केट : इंडसइंड बँकेत 9 टक्के घसरण
मुंबई
आशियाई बाजारातील नकारात्मक ट्रेंडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी सारख्या मोठ्या समभागांच्या कमकुवतपणामुळे सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स 100 अंकांपेक्षा अधिक पडला. या दरम्यान, 30 शेअर्सचा निर्देशांक सकारात्मक ट्रेंडसह उघडला, पण सुरुवातीला 130.18 अंक किंवा 0.22 टक्क्यांनी घसरून 59,937.44 वर आला.
त्याचप्रमाणे निफ्टी 25.80 अंकांनी किंवा 0.14 टक्क्यांनी खाली येऊन 17,891 वर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा सर्वाधिक 9 टक्क्यांनी तोटा झाला. बँकेने मे महिन्यात ‘तांत्रिक त्रुटी’मुळे ग्राहकांच्या संमतीशिवाय 84,000 कर्जे वितरित केल्याचे मान्य केले होते. याशिवाय तसेच एशियन पेंट्स, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचे समभागही खाली पडले.
मोफत रेशन योजनेचा लाभ ३० नोव्हेंबरपर्यंतच, योजनेचा पाठपुरावा करण्याचा अद्याप प्रस्ताव नाही
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन वितरण 30 नोव्हेंबरच्या पुढे वाढवण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही आहे . केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की OMSS धोरणांतर्गत अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि खुल्या बाजारात अन्नधान्याची चांगली विक्री लक्षात घेता PMGKAY द्वारे मोफत रेशन वितरणाचा कालावधी नोव्हेंबरच्या पुढे वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मार्च 2020 मध्ये PMGKAY ची घोषणा केली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू केली, परंतु नंतर ती यावर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.
पांडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की “अर्थव्यवस्था सुधारत असल्याने आणि आमच्या मुक्त बाजार विक्री योजनेंतर्गत (OMSS) अन्नधान्याची विक्री देखील यावर्षी अपवादात्मकरित्या चांगली झाली आहे.” त्यामुळे PMGKAY चा विस्तार करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.” PMGKAY अंतर्गत, सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन पुरवते. त्यांना रेशन दुकानातून अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते. देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता सुधारण्यासाठी आणि किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार OMSS धोरणांतर्गत मोठ्या प्रमाणात ग्राहकांना तांदूळ आणि गहू पुरवत आहे.
आधार कार्डमध्ये नाव आणि जन्मतारीख किती वेळा बदलता येईल? येथे जाणून घ्या
जर कधी तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्मतारीख पुन्हा पुन्हा बदलू शकता, तर ते चुकीचे आहे. आधार कार्डमध्ये कोणताही बदल फक्त काही वेळाच होत असतो. त्यानंतर तुम्ही ते बदलू शकत नाही.
- मोबाईल फोन अपडेट करा
तथापि, जर तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डमध्ये अपडेट केलेला नसेल, तर प्रथम तुम्हाला ते अपडेट करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर जावे लागेल. जर मोबाईल नंबर अपडेट केला असेल तर तुम्ही ऑनलाइन काही बदल करू शकतात. यावेळी आधार हे कोणत्याही सेवेसाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आधार कार्डमधील सर्व माहिती अपडेट करून ठेवावी लागते.
- 2019 मध्ये बदल झाला
वर्ष 2019 मध्ये, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नाव, जन्मतारीख आणि लिंग बदलण्यावर मर्यादा लागू केली. यासाठी तुम्हाला थोडे शुल्कही द्यावे लागेल. उदाहरणार्थ, तुम्हाला बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये, डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये आणि आधार रंगात डाउनलोड करण्यासाठी 30 रुपये द्यावे लागतील.
- नाव फक्त दोनदा अपडेट केले जाऊ शकते
तुम्ही आधारमध्ये तुमचे नाव फक्त दोनदा अपडेट किंवा बदलू शकतात. जोपर्यंत जन्मदिवसाचा संबंध आहे, तुम्ही त्याची तारीख फक्त एकदाच बदलू शकता. यानंतर, तुम्ही जन्मतारखेत जास्तीत जास्त 3 वर्षे करू शकता. म्हणजेच, तुम्ही तुमच्या जन्म तारखेच्या तीन वर्षे पुढे किंवा तीन वर्षे मागे करू शकता. ही तारीख तुमच्या आधार नोंदणीच्या आधारावर ठरवली जाईल.
- फक्त नावनोंदणीचे पेपर योग्य मानले जातील
त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीने नावनोंदणीच्या वेळी दिलेला जन्मतारीख दस्तऐवज देखील रेकॉर्ड मानला जाईल. जर तुम्ही नावनोंदणीच्या वेळी कोणतेही दस्तऐवज दिले नसतील, तर तुम्ही जे सांगितले आहे तेच रेकॉर्डवर आणले जाईल. तुम्हाला भविष्यात जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्हाला कागदपत्र द्यावे लागेल. ते फक्त एकदाच बदलले किंवा अपडेट केले जाईल.
- Gender मध्ये बदल होऊ शकतात
जर तुम्हाला तुमच्या लिंगात काही बदल हवा असेल तर त्यासाठी एक वेळची सुविधा देखील आहे. तुम्ही ते एकदा बदलू शकता. जर तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि लिंग अनेक वेळा बदलायचे असेल तर ते शक्य आहे. पण जेव्हा अपवादात्मक परिस्थिती असेल तेव्हाच हे शक्य होईल. यासाठी तुम्हाला पुन्हा आधारच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल.
- आधारच्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधा
अशा परिस्थितीत, प्रथम तुम्हाला आधारच्या प्रादेशिक कार्यालयाला किंवा help@uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल. ईमेल करावा लागेल. मग तुम्हाला ते का करायचे आहे याचे कारण स्पष्ट करावे लागेल. त्यानंतर त्याच्याशी संबंधित तपशील आणि त्याचे पुरावे द्यावे लागतील. आधारचे प्रादेशिक कार्यालय त्यासाठी योग्य ती काळजी घेईल. आपले अपील योग्य आहे असे वाटल्यास क्षेत्रीय कार्यालय त्यास मान्यता देईल. तुमचे अपील वैध ठरले नाही, तर मान्यता दिली जाणार नाही.