जळगाव दि.7 प्रतिनिधी – श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म. सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटीका सादर करण्यात आली. भक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ‘नवकार मंत्र’ ने झाली. दीपप्रज्वलन कस्तुरचंदजी बाफना, राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहल, नवरतन बोकडीया, ममता कांकरिया, रिखबराज बोहरा यांच्याहस्ते झाले. स्वागतगिताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ‘जयमल गुरूवर’ हे गुरुभक्तीगीत सादर करून आचार्यांचे स्मरण करण्यात आले.
जैन समाजातील संत परंपरा महानुभावांचे संस्कार यावर आधारित संपूर्ण भारतातील जैन महिला मंडळांनी नाटिका सादर केल्यात. यात ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशनच्या जळगावच्या पदाधिकारी व महिलांनी पूज्य जयमलजी म. सा. यांच्या विचारांवर आधारित पुष्पा भंडारीद्वारा लिखीत ‘जय जीवन झाँकी’ ही नाटिका सादर केली. ‘साधुवंदना’वर आधारित नाटीका जोधपूर, नागोर, चेन्नई, नंदुरबार येथील महिलांनी सादर केले. यावेळी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. जैन महिला फाऊंडेशन, श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावचे पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा राका व जोधपूरचे चंदन भंडारी यांनी केले.
Author: Trading Buzz
आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवात तपस्वींचा सन्मान
जळगाव दि. 7 (प्रतिनिधी) – आचार्य सम्राट 1008 पूज्य श्री जयमलजी म. सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज जैन हिल्स येथे 130 तपस्वीचा सामुहिक सन्मान करण्यात आला. कस्तूरचंदजी बाफना, शंकरलालजी कांकरिया, अजय ललवाणी, सुशिल बाफना, सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, ममता कांकरिया यांच्याहस्ते तपस्वींचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितीत आचार्यांनी सर्व तपस्वींना साधुवाद दिला. जैन हिल्सच्या आकाश मैदानावर सुरू असलेल्या भव्यातिभव्य जन्मोत्सव समारोहप्रसंगी भारतभरातील श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.
श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाप्रसंगी जयगच्छाधिपती व्याख्यान वाचस्पती, वचन सिद्ध साधक उग्र विहारी, बारावे पट्टधर वर्तमान आचार्य प्रवर 1008 प.पू. श्री पार्श्वचंद्रजी म. सा, एस. एस. जैन समणी मार्गचे प्ररंभ कर्ता अनुप्पेहा ध्यान प्रणेता प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्रजी म.सा, विद्याभिलाषि जयेंद्रमुनीजी म.सा, सेवाभावी जयशेखरमुनिजी म.सा., मौनसाधक श्री. जयधुरंधरमुनिजी म.सा. विद्याभिलाषी श्री जयकलशमुनीजी म.सा., तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म.सा ठाणा 7 यांच्यासह समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी हे विराजमान होते. त्यांचा उपस्थीतीत चातुर्मासाचा कार्यक्रम सुरू आहे. एक भवावतारी आचार्य सम्राट श्री जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव जळगाव येथे साजरा होत आहे.
मुख्य प्रवचनामध्ये डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांनी ‘जैन’ शब्दाची व्याख्या सांगितली. जैन म्हणजे प्रत्येक सजीवाला जोडून ठेवणारा असतो. आचार्यांनी तेच कार्य केले असून त्यांच्या जन्मोत्सवाच्यानिमित्त एक संकल्प केला पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे. आचार्यांनी सांगितेला मार्ग त्यांचे साहित्य जपले पाहिजे. ज्यांची संस्कृती व साहित्य पुढील पिढी संस्कारीत करते तेच इतिहास घडवित असतात आचार्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे म्हणजे जैन होय. जैन हिल्सवरील पडीक जमिनीवर नंदनवन फुलविणारे ऋषभदेवतेचा संस्कारातून जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या भवरलाल जैन यांचे जीवन संघर्षमय होते. मात्र संघर्षातून जैनत्व सिद्ध करता येते आणि जैन समाजाचा गौरव वाढविता येतो हे त्यांच्या आचरणात दिसते ही शिकवण घेऊन आपल्या आयुष्यात आचरण करावे, स्वच्छता आणि स्वयंशिस्तीच्या आचरणात आनंदानुभूति मानावी हा संस्कार आचार्य जयमलजी म.सा. यांनी दिला असून त्या मार्गावर चालावे असेही यावेळी डॉ. पदमचंद्रजी म.सा. म्हणाले.
यावेळी मौनसाधक श्री. जयधुंरधरमुनिजी म.सा. यांनी उपस्थित श्रावक-श्राविका यांना आचार्य जयमलजी यांच्या विचारांवरच मोक्ष प्राप्त होतो. दुसऱ्यांसाठी क्षमाहित ठेवले पाहिजे हिच शिकवण गुरूंनी दिली असून आचार्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गस्थ झाले पाहिजे असे मौनसाधक म्हणाले.
जैन समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी यांनी तपस्याचे महत्त्व सांगत प्रत्येक श्रावक-श्राविकांनी तप, ताप, संताप या तिन शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. जीवनातील अंधकार दुर करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. जीवन लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आधी लक्ष्य ठरवावे लागेल. धर्मआराधनेसह गुरूंसोबत समर्पक झाल्यावर मार्गदर्शन सहज उपलब्ध होते. आत्माची पवित्रता ही गुरूंप्रती श्रद्धा दाखविते. साधकाच्या शुद्धीसाठी तपस्याचे महत्त्व आहे बाह्य साधन आणि अभ्यंकर साधन यातून साधकाची मनाची शुद्धता जपता येते. शरिरावरील, कपड्यांवर मळ साफ करण्यासाठी साबण तर सोनं-चांदीच्या शुद्धतेसाठी टूल्सचा वापर केला मात्र मनाच्या शुद्धतेसाठी आचार्यांनी तपस्या हा एकमेव मार्ग सांगितला असून त्यावर आचरण करणे म्हणजे जीवन तपमय झाल्यावर मोक्ष प्राप्त होते असेही जैन समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी म्हणाल्यात.
अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघाची कार्यकारी सभा बडी हांडा सभागृह येथे घेण्यात आली. ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाउंडेशनचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात याठिकाणी पार पडले
जैन हिल्सला आज ओजस्वी प्रवचन, गुरूगुनगान
गुरुवार 8 सप्टेंबर रोजी जैन हिल्स येथे डॉ. पदमचंद्र जी म. सा. यांचे सकाळी 9 ते 10 ओजस्वी प्रवचन, मंगलाचरण, स्वागत गीत, अतिथी स्वागत, प्रस्तावना व गुरुभक्ती होईल. सकाळी 10 ते 11 दरम्यान बहुमान, प्रासंगीक कार्यक्रम, सामूहिक तेले तप प्रत्याख्यान होईल व दुपारी पावणे बारा वाजेपासून आकाश ग्राउंड, जैन हिल्स येथे गौतम प्रसादी होईल. त्यापूर्वी जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यप्रवर प.पु. श्री पार्श्वचंद्र जी म.सा द्वारा महाप्रभावी महा मांगलीक दिली जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघपति दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव पदाधिकाऱ्यांनी केले आहे
भारत आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाहेर, सुपर 4 मध्ये टीम इंडियाचा श्रीलंकेकडून 6 गडी राखून पराभव
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 8 विकेट गमावत 173 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य ठेवले. 13 च्या स्कोअरवर भारताने दोन गडी गमावले. केएल राहुल सहा धावा करून बाद झाला तर विराट कोहली खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहितसह सूर्यकुमारने तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूत ९७ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. रोहित ७२ धावा करून बाद झाला. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही 34 धावा करून बाद झाला. 19व्या षटकात भारताने दोन चेंडूंत सलग दोन विकेट गमावल्या. दीपक हुड्डापाठोपाठ पंतही १७ धावा करून बाद झाला. शेवटी रविचंद्रन अश्विनने सात चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १५ धावांची मौल्यवान खेळी केली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक 2022 सुपर-4 मधील तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे भारतीय संघाच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सुपर 4 मधील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याआधी टीम इंडियाला पाकिस्तानने ५ विकेटने हरवले होते. त्याचबरोबर श्रीलंकेचा सुपर 4 मधील हा सलग दुसरा विजय आहे. श्रीलंकेने त्यांच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. भारताकडून मिळालेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीच्या जोडीने शानदार सुरुवात केली. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 67 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. यानंतर चहलने एकाच षटकात निसांका आणि चरित असलंका यांना बाद करत भारताला सलग दोन यश मिळवून दिले. निसांकाने 52 धावा केल्या तर असलंका खाते न उघडताच बाद झाला. मात्र, कुसल मेंडिसने आठवे अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने अर्धशतक पूर्ण करताच गुणतिलकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताला तिसरे यश मिळवून दिले. 110 धावांवर श्रीलंकेने चौथी विकेट गमावली. मात्र यानंतर भानुका राजपक्षे आणि कर्णधार दासून शनाका यांनी पाचव्या विकेटसाठी 34 चेंडूत 64 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला सहा विकेटने विजय मिळवून दिला. शनाकाने नाबाद 33 आणि राजपक्षेने नाबाद 25 धावा केल्या.
भारतीय टीममध्ये दीपक चाहर ची एन्ट्री, आवेश खान बाहेर
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खान आशिया चषक 2022 मधून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहरचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. दीपक चहर टीम इंडियासोबत आशिया कप 2022 साठी यूएईला गेला होता आणि त्याला स्टँड-बॉय खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु आता तो मुख्य संघात आला आहे, म्हणजेच आता तो भारतासाठी सामने खेळू शकणार आहे.
आशिया चषक स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये आवेश खानची कामगिरी फारशी चांगली नव्हती आणि पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यात तो खेळला नव्हता. आवेश खानला ताप होता आणि त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. या सामन्यात भारतीय संघाचा ५ गडी राखून पराभव झाला. त्याचवेळी दीपक चहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतून दुखापतीतून दीर्घकाळानंतर संघात पुनरागमन केले आणि चांगली कामगिरी केली. त्यानंतर आशिया कप 2022 साठी तीन स्टँड-बॉय खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. दीपक चहर, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर हे तीन स्टँड-बॉय खेळाडू होते. यातील रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर अक्षर पटेलचाही मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.
अश्विनचे संघात पुनरागमन, श्रीलंकेविरुद्ध करा किंवा मरोच्या सामन्यात भारताचा हा प्लेइंग-11
आशिया चषकाचा महत्त्वाचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला येथे जिंकणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचा पुढील प्रवास कठीण होऊ शकतो. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असून, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात टीम इंडियाने बदल केला असून, रवी बिश्नोईला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे. तर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुबईची ही खेळपट्टी फिरकीसाठी उपयुक्त असल्याचे बोलले जात असल्याने संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.
भारताचा खेळ-11: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 संपन्न
तिघंही गटात रणविर साळुंखे, सृष्टी कुळकर्णी, वेदांत चौधरी प्रथम
जळगाव दि.6 प्रतिनिधी – स्व.सौ.कांताई यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त आज भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद येथे राज्यस्तरीय श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 चे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 आणि 11 वी ते 12 वी या तिन गटात झाली.
इयत्ता 5 वी ते 7 वी या गटात प्रथम क्रमांकाने चाळीसगाव येथील डाॕ. काकासाहेब पुर्णपार्त्रे माध्यमिक विद्यालयाचा रणविर योगेश साळुंखे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शेंदुर्णी येथील आ.ग.र.ग.माध्यमिक विद्यालयाचा अर्थव तुषार पाटील,नागलवाडीचे माध्यमिक विद्यालयाची मुग्धा विजय याज्ञिक, 8 वी ते 10 गटात जळगाव ए. टी. झांबरे विद्यालयाची सृष्टी विशाल कुळकर्णी प्रथम, चुंचाळे येथील नुतन माध्यमिक विद्यालयाचे रोशनी देविदास पाटील द्वितीय, पळसखेडे येथील नि.प. पाटील मा.विद्यालयाचा सुमित दिपक खैरे तृतिय, 11 वी ते 12 वी या गटात प्रथम चोपडाचे पंकज माध्यमिक विद्यालय वेदांत पांडुरंग चौधरी, द्वितीय वाकोदच्या राणीदान जैन माध्यमिक विद्यालय व शेंदुर्णीचे आ. रघुनाथराव गरूड महाविद्यालयचे प्रिती समाधान मोहिते व दिव्या संतोष चौधरी, तृतीय क्रमांक राष्ट्रीय कन्या शाळा ज्युनिअर काॕलेज रेणुका सिताराम सानप विजयी झाले.
दी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-आॕप सोसायटी लि.शेंदुर्णी संचलित राणिदानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद यांच्यातर्फे आयोजित व भवरलाल अॕण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. सकाळी दीपप्रज्वलनाने औपचारिक उद्घाटन झाले. मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संपादक हेमंत अलोणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद, जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, पांडुरंग पाटील, यू. यू. पाटील, ए. टी. चौधरी, ए. ए. पटेल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानयोगी आचार्य हे पुस्तक प्रकाशन झाले.
स्वागतगिताने व दीपप्रज्वलन माल्यार्पण करून पारितोषिक वितरण सोहळाची सुरूवात झाली. एस. टी. चिंचोले यांनी प्रास्तविक केले.
देवदत्त गोखले यांनी परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले, मिळालेल्या माहितीचे संकलन करून विषयाला न्याय दिल्याचे सर्वच स्पर्धकांचे कौतूक केले.
ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोणे यांनी कांताईंच्या स्मृतींना अभिवादन करीत आपल्या मनोगताला सुरुवात केली. दिलेला विषय, विषयाची मांडणी करणं, हातवारे आणि हावभाव करणे यातुन समाधिटपणा दिसुन आल्याचे सांगत वाकोद या मातीचा वक्तृत्व-कर्तृत्व उंचविणारे गुण आहे याची अनुभूती प्रत्यक्ष आली.
शेंदुर्णी संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद यांनी मनोगत व्यक्त केले. या संस्थेला वकृत्व स्पर्धेची वेगळी अशी ओळख निर्माण होत आहे. आपल्याला दुसऱ्याच्या समोर व्यक्त होता यावे, समाजासमोर ठामपणे आपले मत मांडता यावे यासाठी ही स्पर्धा यशस्वीपणे होत असल्याचे कौतुक केले.
परिक्षक म्हणून देवदत्त गोखाले, देवेंद्र पाटील, एस. व्ही. भोळे, प्रशांत देशमुख, भुषण पाटील, गणेश राऊत, अतुल पाटील, एम. बी. लोखंडे, सौ.ज्योती चौधरी यांनी काम पाहिले.
सुत्रसंचालन एस. ए. पाटील यांनी केले. स्पर्धा प्रमुख नितीन पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राणीदानजी जैन विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व जैन फार्म यांनी सहकार्य केले.
फोटो कॕप्शन – श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धेकासह ज्येष्ठ पत्रकार संपादक हेमंत अलोणे, संस्थेचे सचिव सतिष काशिद, जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, पांडुरंग पाटील, यू. यू. पाटील, ए. टी. चौधरी, ए. ए. पटेल, परिक्षक देवदत्त गोखले व मान्यवर
दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार | DA बाबत सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते
सरकारने डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के दराने डीए दिला जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन संरचनेचा भाग आहे.
राज्य सरकारने सणापूर्वीच त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवून भेटवस्तू दिल्या आहेत. आता केंद्रीय कर्मचारी त्यांच्या DA (DA Hike) वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांचा डीए वाढवू शकते. सरकारने मार्च 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये शेवटची वाढ केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे डीए ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्यात आला. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के दराने डीए दिला जात आहे.
डीए ४ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो
अहवालांवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या डीए वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते. यावेळी सांगण्यात येत आहे की डीएमध्ये 4 टक्के वाढ केली जाऊ शकते आणि दसऱ्यापूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून वाढीव महागाई भत्त्यासह पगार मिळणे अपेक्षित आहे.
अपडेट म्हणजे काय?
केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र, आठवा वेतन आयोग तूर्तास येणार नसल्याचे सरकारने निश्चितपणे स्पष्ट केले आहे. एआयसीपीआयचे आकडे, ज्याच्या आधारे डीए ठरवला जातो, तेही आले आहेत. AICPI जुलैमध्ये 129.2 अंकांवर आहे. त्यामुळे सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.
पगार किती वाढणार?
सरकारने डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. गणनेनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर त्याचा 34 टक्के दराने महागाई भत्ता 6,120 रुपये होतो. त्याच वेळी, 38 टक्क्यांनुसार, ते 6,840 रुपये होईल.
लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे
सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन संरचनेचा भाग आहे. हा निर्णय मंजूर झाल्यास 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह 65 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६.७१ टक्क्यांवर आला आहे. जूनमध्ये तो 7.01 टक्के होता. अशा परिस्थितीत सरकार डीए 4 टक्क्यांनी वाढवू शकते. जेव्हा महागाईचा दर ७ टक्क्यांहून अधिक होता, तेव्हा डीए ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता होती.
पाकिस्तान कडून मिळालेल्या पराभवानंतर भारत आता फायनल मध्ये पोहचू शकेल का ?
आशिया कप 2022 फायनल: आशिया चषक-2022 आता सुपर-4 टप्प्यात पोहोचला आहे आणि एकापेक्षा जास्त सामने पाहिले जात आहेत. रविवारी (4 सप्टेंबर) सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला, त्यानंतर अंतिम फेरीचा मार्ग रंजक बनला आहे. सुपर-4 मधील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना होता, ज्यात त्याचा पराभव झाला होता. अशा स्थितीत भारतीय संघ अजूनही अंतिम फेरी गाठू शकेल का, यासाठी हे समीकरण समजून घ्यावे लागेल.
आता पॉइंट टेबलची स्थिती काय आहे?
आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये एकूण चार संघ आहेत, यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. आतापर्यंत चारही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला असून पॉइंट टेबलचे चित्र स्पष्ट होत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका प्रत्येकी एक सामना जिंकून टॉप-2 मध्ये आहेत. भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
• श्रीलंका – 1 सामना, 1 विजय, 2 गुण, 0.589 NRR
• पाकिस्तान – 1 सामना, 1 विजय, 2 गुण, 0.126 NRR
• भारत – 1 सामना, 0 विजय, 0 गुण, -0.126 NRR
• अफगाणिस्तान – 1 सामना, 0 विजय, 0 गुण, – 0.589 NRR
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकेल का?
भारताला अजून सुपर-4 मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले तर अंतिम फेरीत पोहोचणे निश्चित होईल. कारण त्याचे चार गुण असतील आणि केवळ टॉप-2 संघच अंतिम फेरीत पोहोचतील. पण भारताचा खराब फॉर्म कायम राहिल्यास आणि श्रीलंका किंवा अफगाणिस्तानने थोडी नाराजी निर्माण केल्यास भारताला अंतिम फेरी गाठणे कठीण होऊ शकते.
• भारत विरुद्ध श्रीलंका – ६ सप्टेंबर
• भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ८ सप्टेंबर
पाकिस्तान अंतिम फेरीत प्रवेश करणार का?
आगामी सामन्यातही पाकिस्तानला श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत या सामन्यांमध्ये त्याचा पराभव झाला तर त्याला अंतिम फेरी गाठता येणार नाही. पण जर पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर ते अंतिम सामन्यातही पोहोचेल आणि त्यानंतर 11 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकते.
• पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान – ७ सप्टेंबर
• पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – ९ सप्टेंबर
टीम इंडिया आतापर्यंत आशिया कप 2022 मध्ये
• पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव
• हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव
• पाकिस्तानकडून पाच गडी राखून पराभव (सुपर-४)
https://tradingbuzz.in/10729/
अभिनव शाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपतीची आरती
रेहान अलीकडून शाळेला विठ्ठल-रूक्मिणीची पाषाणातील प्रतिमा भेट
“भारतात अनेक जाती-धर्म आहेत. पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा हा भारतीयत्वाचा आहे. मुस्लिम विद्यार्थी आयान याने उत्सवासाठी गणेशाची मूर्ती देऊन तोच धागा बळकट केला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज केले.
अभिनव विद्यालयात आयान खान या विद्यार्थ्याने दिलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या गणेशाची आरती आज श्री. राऊत यांच्या हस्ते झाली. आज शिक्षकदिनानिमित्ताने शिक्षक दिनानिमित्त रेहान अली रजाक अली सय्यद याच्या पालकांनी शाळेस दगडी पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली .
श्री. राऊत यांनी आयान खान पठाण व रेहान अली रजा अली सय्यद यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक संतोष सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष श्याम भाऊ कोगटा उपाध्यक्ष संजय बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोद बियाणी, मुख्याध्यापक हेमंत पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
भारत-पाक सामन्यात नाणेफेकीत मोठी चूक.. भारताची पहिली बॅटिंग होतीच नाही?
आशिया चषकाच्या सुपर-4 सामन्यात रविवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले. आठवडाभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला, जेव्हा दोन संघांमध्ये युद्ध झाले. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या नाणेफेकीत एक चूक झाली.
नाणेफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तिथून हा गोंधळ सगळ्यांच्या लक्षात आला. वास्तविक, समालोचक रवी शास्त्री यांना नाणेफेकीसाठी नाणेफेक करायची होती, तेव्हा रोहित शर्माने नाणे नाणेफेक केल्यावर बाबर आझमने टेल निवडले
https://twitter.com/OrthodoxAthiest/status/1566419472982114304?s=20&t=jMyCouFT_kHyKXCxmDu3Jg
पण समालोचक रवी शास्त्री यांनी त्याला हेड ऐकवले, जरी तिथे उपस्थित मॅच रेफरीने बाबर आझमचे किस्से ऐकले होते. अशा परिस्थितीत जेव्हा नाणे टेलवर पडले, तेव्हा ते म्हणाले की बाबरने टेल बोलला होता आणि त्यांनी नाणेफेक जिंकली आहे. यानंतर बाबर आझमने भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
https://tradingbuzz.in/10755/
https://tradingbuzz.in/10726/