शेअर बाजाराची आज जोरदार सुरुवात झाली. BSE चा 30 समभागांचा प्रमुख संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 323 अंकांच्या वाढीसह 54210 च्या पातळीवर उघडला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही हिरव्या चिन्हासह दिवसाच्या व्यवहाराची सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स 231 अंकांच्या वाढीसह 54118 च्या पातळीवर होता, तर निफ्टी 56 अंकांनी वाढून 16,114 च्या पातळीवर होता. सेन्सेक्स च्या शेअर्समध्ये केवळ टायटन, डॉ. रेड्डीज, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचसीएल टेक हेच शेअर्स लाल चिन्हावर होते.
मंगळवारची स्थिती :-
देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आणि जागतिक बाजारातील विक्रीमुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही बेंचमार्क निर्देशांक जवळपास एक टक्क्याने घसरले. गुंतवणूकदार किरकोळ महागाई आणि औद्योगिक उत्पादन (IIP) डेटाची वाट पाहत आहेत.
बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स घसरणीसह उघडला आणि शेवटी 508.63 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 53,886.61 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान, ते 570.26 अंकांपर्यंत घसरले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 157.70 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 16,058.30 वर बंद झाला होता.