ट्रेडिंग बझ – मंगळवारी शेअर बाजारात फ्लॅट क्लोजिंग झाले आहे. सेन्सेक्समध्ये वेगाने खरेदी होत आहे. आज सेन्सेक्स 18 अंकांनी घसरून 60,672 वर आणि निफ्टी 18 अंकांनी घसरून 17,826 वर बंद झाला. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस सर्वात जास्त 3.5% घसरला. तर एनटीपीसीचा शेअर 3.25 टक्क्यांनी वाढला आहे. याआधी सोमवारीही बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स 311 अंकांनी घसरून 60,691.54 वर आणि निफ्टी 97 अंकांनी घसरून 17,847.05 वर बंद झाला.
शेअर बाजारातील घसरणीची कारणे :-
युरोप, यूएस फ्युचर्स मार्केटमध्ये तीव्र घसरण.
TCS, WIPRO, TECH MAH सारखे बाजारातील हेवीवेट शेअर्स नरमले
डॉलर इंडेक्स 104 च्या जवळ गेला.
बाजाराची स्थिती :-
मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीची नोंद झाली. BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण 3597 शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी 1984 शेअर लाल चिन्हासह बंद झाले तर 182 शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेले बहुतेक शेअर्स नरमले: –
बीएसई सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 पैकी 17 शेअर्समध्ये विक्री दिसून आली, ज्यामध्ये सन फार्माचा शेअर सर्वाधिक 1.44% ने खाली आला. त्याच वेळी, NTPC चा शेअर 3.19% च्या मजबूतीसह बंद झाला आहे.
निफ्टीमधील सर्वाधिक वाढणारे आणि घसरणारे शेअर्स :-
टॉप गेनर –
NTPC +2.7%
टाटा स्टील +1.4%
HDFC बँक + 1.2%
HDFC ++1.1%
टॉप लुसर –
अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइज – 1%
बजाज ऑटो -0.7%
एसबीआय लाइफ इन्शुरन्स -0.7%
विप्रो – 0.7%