जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी
जळगाव दि. 24 प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आंतर जिल्हा महिला क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन शनिवार, दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता जैन स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश स्कूल D Mart जवळ) होणार आहे. ज्या महिला खेळाडूंचा जन्म १ सप्टेंबर २००३ रोजी वा त्यानंतर झाला आहे अश्या खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र आहेत. अशा सर्व पात्र महिला खेळाडूंनी आपल्या मूळ जन्म दाखल्या व आधार कार्डसह उपस्थित रहावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.