जळगाव दि.२१ – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ जळगाव… सुंदर जळगाव… हरित जळगाव संकल्पना साकार करण्यासाठी प्राथमिक स्तरावर कार्य सुरु झाले आहे. या उपक्रमाची यशस्विता समाजाच्या सहभागावर अवलंबून आहे. यासाठी म्हणून येत्या गुरुवारी (दि. २३ फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जैन हिल्सवरील गांधीतीर्थ येथे होणाऱ्या या बैठकीस संस्थेचे संचालक तथा गुजराथ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक संस्था व व्यक्तींनी उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. शहराच्या विकासात, सौंदर्यीकरणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. यासाठी विविध शाळा, महाविद्यालयांमधील स्काऊट, एनएसएस, एनसीसी तसेच सामाजिक संस्था, गणेश मंडळे व सामाजिक कार्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी आपले प्रतिनिधी पाठवून आपला सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे.
प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे निधन
जळगाव : प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे मेंदू मधे रक्तस्त्राव (sub arachnid brain hemorrhage) झाल्याने दुःखद निधन झाले....