शेअर बाजार | शेअर बाजारावर परिणाम करणारे घटक | शेअर बाजार मूलभूत

गुंतवणूक ही तुम्हाला श्रीमंत बनऊ शकते का?| Investment Ideas | Investment lab| मराठी बांधवांसाठी

ग्रामविकासाला चालना देणाऱ्या गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनाचे उद्घाटन

जळगाव दि.4- ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी कौशल्याला मूल्य कमी असेल असे वाटत असताना, महात्मा गांधीजींनी शिकविलेल्या रचनात्मक कार्यामुळे तंत्रज्ञानाला जोडून श्रमाची अस्मिता जपली जाऊ शकते, यातून आर्थिक समानता आणि रोजगार निर्मितीतून अहिंसात्मक समाजनिर्मितीचे कार्य आजच्या काळात सुरू ठेवण्याला प्रेरणा मिळते. याचेच दर्शन शाश्वत पर्यावरणासह ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या या प्रदर्शनातून होत आहे.’ असे उद्गार गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार यांनी काढले.
दिल्ली येथील भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएसएसआर) आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आणि गांधी जयंती निमित्त ‘हाऊ गांधी कमस अलाईव्ह’ (How Gandhi comes alive) या महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. सुदर्शन आयंगार बोलत होते. गांधी तीर्थ येथे सकाळी ११.३० वाजेला हा उद्घाटन सोहळा पार पडला.

चरखावर सुतकताई करून प्रदर्शनाचे उद्घाटन करताना डॉ. सुदर्शन आयंगार, प्रो. गिता धर्मपाल, अंबिका जैन, वैभव काळे, आनंद उकिडवे, उदय महाजन, अनिल जोशी, नितीन चोपडा, डॉ. अश्विन झाला, गिरीष कुलकर्णी, डॉ. निर्मिला झाला यांच्यासह मान्यवर.


याप्रसंगी नागपूर येथील नागपूर येथील वंडरग्रास संस्थेचे संचालक वैभव काळे, पुणे येथील आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य आनंद उकिडवे, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डीन प्रो. गिता धरमपाल, सौ. अंबिका अथांग जैन, उदय महाजन, गिरीष कुलकर्णी, नितीन चोपडा, अनिल जोशी, डॉ. आश्विन झाला उपस्थित होते. डॉ. सुदर्शन आयंगार यांनी चरखावर सुतकताई करून प्रदर्शनाचे उद्घान केले. प्रदर्शन 4 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत गांधी तीर्थ येथे पाहता येणार आहे. प्रदर्शनामध्ये महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यापैकी 18 बाबींवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. ग्रामीण भागात असलेल्या कौशल्याचा वैज्ञानिक कसोट्यांवर वस्तूनिष्ठपद्धतीने उद्योजकिय संस्कार देता येतो. यासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गांधीजींचे स्वदेशीचे विचारांचे प्रतिक प्रदर्शनात पाहता येते. या प्रदर्शनातील वैशिष्ट्य म्हणजे रेखाचित्रातून महात्मा गांधीजींची प्रतिमा साकारण्यात आली आहे. यातील एक रेषा ही सुताचा धागा असल्याचे प्रतिक मानले आहे. आणि हा धागा (रेषा) प्रदर्शनात अखंडपणे दाखविण्यात आली आहे. चरखाच्या सुताच्या धाग्यातून स्वराज्याची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

ग्रामोद्योग ही संकल्पना समोर ठेऊन गांधीजींचा हा सुताचा धागा पुढे जातो आणि स्थानिक कुशलता व ज्ञानव्यवस्थेवर आधारित वास्तुकला, विणकाम, भरतकाम, हस्तकला, वैदिक गणित पद्धती, संगीत, शिक्षण, आरोग्य, आदीसह ग्रामोद्योगामध्ये शाश्वत पर्यावरणासह विकासात्मक समाजव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणाऱ्या गांधी रिसर्च फाऊंडेशनसह अन्य सेवाभावी संस्थांची माहिती प्रदर्शनात देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील बाराबलुतेदारपद्धतीचा पुर्नविकासाचा संदेश हा धागा देतो. प्रदर्शनीच्या शेवटी याच धाग्याचे कापडात रूपांतर होऊन वर्तमानातील गांधीजींना अपेक्षित असलेली स्वराज्य ही संकल्पना समजविण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन गांधी तीर्थ अभ्यागतांना 16 ऑक्टोबर पर्यंत पाहता येईल. याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी डॉ. आश्विन झाला, डॉ. निर्मला झाला, योगेश संधानशिवे, आदिती त्रिवेदी, रिती शहा यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

‘महात्मा गांधीजींचे विचार आणि कल्पनांचा प्रचार व प्रसार ह्या प्रदर्शनातून होत आहे. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या प्रदर्शनाचा असून विविध कलाकौशल्यांसह ग्रामीण कलाकारांना व्यवसाभिमूख करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया सौ. अंबिका जैन यांनी दिली.’

‘गाव, खेड्यांमध्ये पारंपारिक कलाकौशल्य कलावंतांमध्ये असतात. त्यांच्याकडे पिढ्यान् पिढ्या हे कौशल्य संस्कारित होत असते मात्र उद्योजकीयदृष्टीने त्यांना व्यासपीठ मिळत नाही यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गांधीजींच्या रचनात्मक कार्यावर या प्रदर्शनात प्रकाश टाकण्यात आला आहे; कारण महात्मा गांधीजी हे स्वत: ग्रामीण भागातील जीवनशैली सुधारण्यासाठी कृतिशील प्रयत्न करित होते. त्यामुळेच त्यांनी खेडांकडे चला असा संदेश दिला. यामुळे हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया प्रो. गिता धरमपाल यांनी दिली.

Finland PM सना मरिन यांचा वायरल विडिओ

बरेच लोक मोठ्या सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींना फॉलो करतात आणि त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यास देखील आवडतात. पण नुकताच एका देशाच्या पंतप्रधानांचा असा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा आहे. हा व्हिडिओ लोकांसाठी नसून केवळ त्यांच्या मित्रांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन वर्षात गुंतवणूकदारांची संख्या झाली दुप्पट, या मागील कारण तपासा..

कोरोना महामारीच्या काळात, देशातील स्टॉक गुंतवणूकदारांची संख्या जवळपास दुप्पट झाली, परंतु विशेष म्हणजे या काळात स्टॉक ब्रोकर्सची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. BSE आणि NSE च्या सुमारे 200 ब्रोकर्सनी, म्हणजे एक चतुर्थांश, त्यांचे सदस्यत्व सोडले आहे किंवा त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

बीएसईच्या 98 दलालांनी सदस्यत्व कार्ड केले सरेंडर :-

गेल्या दोन वर्षांत, NSE च्या 82 आणि BSE च्या 98 ब्रोकर्सनी त्यांचे सदस्यत्व कार्ड सरेंडर केले आहे. NSE मध्ये 32 दलाल आहेत ज्यांनी चूक केली आहे. याशिवाय काही एक्सचेंजेसच्या ब्रोकर्सचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. काही ब्रोकरेज फर्म या दोन्ही प्रमुख एक्सचेंजचे सदस्य असल्याने, सदस्यत्व सोडणाऱ्या दलालांची एकूण संख्या कमी असू शकते. या वर्षी 31 मार्चपर्यंत, NSE मध्ये 300 पेक्षा जास्त नोंदणीकृत ब्रोकर आहेत, तेवढेच ब्रोकर BSE मध्ये आहेत.

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे एमडी सुनील न्याती म्हणाले, “पूर्वी बहुतेक ग्राहक ब्रोकरच्या कार्यालयात येत असत. आता लोक अॅपच्या माध्यमातून मोबाईलवर ट्रेडिंग करू लागले आहेत. याशिवाय, बाजार नियामक सेबीने देखरेख आणि अनुपालन कडक केले आहे. त्यामुळे छोट्या दलालांना जगणे कठीण झाले आहे.

बड्या ब्रोकर्समध्ये काम कमी होत आहे, छोटे बाहेर पडत आहेत – अंबरीश बालिगा, स्वतंत्र शेअर बाजार तज्ञ

स्टॉक ब्रोकिंग व्यवसाय एकत्रीकरणात आहे. मोठ्या ब्रोकर्समध्ये व्यवसाय कमी होत आहे, छोट्या कंपन्या बाहेर पडत आहेत.

वाढती नियामक अनुपालन आणि वाढती स्पर्धा यामुळे लहान कंपन्यांना टिकणे कठीण झाले आहे.

काही ब्रोकरेज कंपन्यांमध्ये, त्यांनी त्यांचा व्यवसाय मोठ्या फर्ममध्ये विलीन केला आणि स्वतःचे सदस्यत्व सोडले.

मे 2019 पासून आतापर्यंत NSE च्या 32 ब्रोकर्सनी डिफॉल्ट केले आहे, ज्यामुळे एक्सचेंजने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. गेल्या महिन्यात सननेस कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी एक्सचेंज डीफॉल्ट करणारी शेवटची ब्रोकरेज कंपनी होती. NSE ने म्हटले आहे की यावर्षी 30 एप्रिलपर्यंत त्यांनी 19 दलालांविरुद्ध दंड वसूल केला आहे.

अस्वीकरण :  tradingbuzz.in  वापरकर्त्यांना कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांशी संपर्क साधण्याचा सल्ला देते .

जॉईन Trading Buzz
Exit mobile version