कोरोना काळात गुंतवणूदारांना मालामाल करणार्‍या “ह्या” शेअरने केले कंगाल…

ट्रेडिंग बझ – कोरोनाच्या काळात गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारा शेअर आता त्यांनाच कंगाल करत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या हेल्थकेअर आणि वेलनेस कंपनी न्यूरेकाचे शेअर्स 2175 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 511.80 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आज तो रु. 497 या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.

शेअर्स 634.95 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते :-
Neureka चा ₹100 कोटीचा IPO 39.93 पट सबस्क्राइब झाला होता, 25 फेब्रुवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स रु.634.95 वर सूचीबद्ध झाले. आता ते लिस्टिंग किंमतीपेक्षाही खाली आले आहे. जर आपण त्याच्या शेअरच्या किमतीच्या इतिहासाबद्दल बोललो तर, या वर्षी आतापर्यंत, Neureka चे शेअर्स 75 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे निम्म्याहून खाली आले आहेत. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक सुमारे 34 टक्क्यांनी घसरला आहे आणि गेल्या 5 दिवसांत तो 16 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

कोरोना काळात किमती वाढल्या :-
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ऑक्सिमीटर, थर्मामीटर, बीपी मॉनिटर, नेब्युलायझर यांसारख्या उत्पादनांची मागणी वाढली, सूचीबद्ध झाल्यानंतर काही महिन्यांतच कंपनीचे शेअर्स दुप्पट झाले. वास्तविक, न्यूरेका ही अशीच उत्पादने बनवते.

कंपनी पाच श्रेणींमध्ये उत्पादने पुरवते – क्रॉनिक डिव्हाइस, ऑर्थोपेडिक, मदर आणि चाइल्ड, पोषण आणि जीवनशैली विभाग. या कंपनीने ‘डॉ. ट्रस्ट’ आणि ‘डॉ.’फिजिओ’सारखे ब्रँड बनवले आहेत.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version