‘या’ मोठ्या कंपनीच्या शेअरची किंमत घसरणार

मुंबई : कर्जाच्या खाईत बुडालेल्या व्हीडिओकॉन कंपनीचे शेअर बाजारातील अस्तित्व घसरणार असल्यचे दिसत आहे. व्हीडिओकॉन इंडस्ट्रीड लिमिटेड आणि व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेड दोन कंपन्या सध्या शेअर मार्केटमधे सूचिबद्ध आहेत. काही दिवसांत या दोन्ही कंपन्यांच्या शेअरची किंमत शून्य होणार असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही कंपन्यांचे दिवाळे निघाले होते. त्यामुळे शेअर बाजारातील या कंपन्यांची सूचिबद्धता नाहीशी होणार आहे.
व्हीडिओकॉन उद्योग समूहाकडून याबाबतीत प्रसिद्धीपत्रक जारी झाले आहे. यामध्ये व्हीडिओकॉन इंडस्ट्रीड लिमिटेड आणि व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या समभागधारकांना सूचीबद्धता संपल्यानंतर कोणताही लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. व्हीडिओकॉन समूहाकडील एकूण मूल्य कर्जदारांचे पैसे फेडण्याइतपत पुरेसे नसल्यामुळे इक्विटी शेअरधारकांना कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नसल्याचे व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे. व्हीडिओकॉन इंडस्ट्रीज ही कंपनी देखील 18 जुनपासून बीएसई आणि एनएसई या दोघा बाजारांमधून डिलिस्ट होणार आहे. अनिल अग्रवाल यांच्या मालकीची ट्विन स्टार टेक्नॉलॉजी सदर व्हीडिओकॉन कंपनी विकत घेणार आहे. जवळपास तिन हजार कोटी रुपयांचा हा सौदा असेल. यासाठी लवकरच ट्विन स्टार टेक्नॉलॉजी कंपनीकडून पाचशे कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. उर्वरित रक्कम नॉन-कंवर्टिबल डिबेंचर्सच्या स्वरुपात दिले जाणार आहेत.
एनसीएलटीच्या आदेशानुसार व्हीडिओकान कंपनीचे समभाग डिलिस्ट करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. साधारण 18 जूननंतर व्हीडिओकॉन इंडस्ट्रीजचे समभाग खरेदी-विक्रीसाठी शेअर मार्केटमधे उपलब्ध राहणार नसतील. या समभागांची किंमत संपेल.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version