मुंबई
आशियाई बाजारातील नकारात्मक ट्रेंडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी सारख्या मोठ्या समभागांच्या कमकुवतपणामुळे सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स 100 अंकांपेक्षा अधिक पडला. या दरम्यान, 30 शेअर्सचा निर्देशांक सकारात्मक ट्रेंडसह उघडला, पण सुरुवातीला 130.18 अंक किंवा 0.22 टक्क्यांनी घसरून 59,937.44 वर आला.
त्याचप्रमाणे निफ्टी 25.80 अंकांनी किंवा 0.14 टक्क्यांनी खाली येऊन 17,891 वर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा सर्वाधिक 9 टक्क्यांनी तोटा झाला. बँकेने मे महिन्यात ‘तांत्रिक त्रुटी’मुळे ग्राहकांच्या संमतीशिवाय 84,000 कर्जे वितरित केल्याचे मान्य केले होते. याशिवाय तसेच एशियन पेंट्स, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचे समभागही खाली पडले.