तेल कंपन्यांनी आज म्हणजेच सोमवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. सलग 26 व्या दिवशी किमती स्थिर आहेत. आजही पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आहे. तर, महाराष्ट्रातील परभणीमध्ये देशातील सर्वात महाग पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये/लिटर आहे,
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 115.12 रुपये आणि 99.83 रुपये आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 118.14 रुपये आणि डिझेलची किंमत 101.16 रुपये आहे. पाटण्यात पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 116.23 रुपये आणि 101.06 रुपये प्रति लिटर आहे.
तुमच्या शहराचे दर याप्रमाणे तपासा :-
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. तुम्ही इंडियन ऑइल (IOC) चे ग्राहक असल्यास, तुम्ही RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवू शकता आणि HPCL ग्राहक ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.