भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढत्या मागणीमुळे नवीन नोकऱ्यांसाठी भरतीने सप्टेंबर 2021 चा स्तर ओलांडला आहे आणि ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे. नोकऱ्यांची माहिती देणाऱ्या ‘इंडीड’ या जागतिक संकेतस्थळाच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, फेब्रुवारी 2020 ते मार्च 2022 या कालावधीत नोकऱ्यांसाठी अर्ज आमंत्रित करण्याच्या दरात 30.8% वाढ झाली आहे. सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकऱ्यांची सर्वाधिक मागणी असल्याचे अहवालात म्हटले आहे.
9.7 टक्के वाढ झाली आहे, तर आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इंडिड इंडिया विक्री प्रमुख शशी कुमार, म्हणाले, “आम्ही जवळजवळ सर्व व्यावसायिक श्रेणींमध्ये नोकऱ्यांच्या मागणीत वाढ पाहिली आहे. भारतातील कामगार, विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रातील, नोकरीच्या निवडी अधिक आहेत आणि आज महामारीपूर्वीच्या तुलनेत अधिक संधी असेल.”