ट्रेडिंग बझ – या आठवडयात व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी (21 जून) शेअर बाजार हिरव्या चिन्हाने उघडला. थोड्या वेळाने सेन्सेक्सने नवा उच्चांक निर्माण करून 63588 च्या पातळीला स्पर्श केला. निफ्टी देखील 18850 च्या वर व्यवहार करत आहे. हे त्याच्या रेकॉर्डच्या जवळपास आहे. जागतिक बाजारातून कमकुवत होण्याची चिन्हे असतानाही शेअर बाजारात खरेदी दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत आणि निफ्टी 50 निर्देशांक विक्रमी उच्चांकाच्या जवळ आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे 100 अंकांची वाढ दिसून आली, तर निफ्टी 50 निर्देशांक 18850 च्या आसपास उघडला. आजच्या व्यापार सत्रात 1,782 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आणि 656 शेअर्समध्ये विक्री झाली. याशिवाय 120 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
सेन्सेक्सने नवा विक्रम रचला :-
21 जून रोजी बाजारात नवा उच्चांक झाला आहे. सत्रात बेंचमार्क निर्देशांकाने 63,588 चा स्तर ओलांडला आहे.
निफ्टीचे टॉप लुसर शेअर्स :-
Divis Labs, JSW स्टील, Hindalco, Cipla आणि Axis Bank
निफ्टीचे टॉप गेनर्स शेअर्स :-
HDFC लाईफ, अल्ट्राटेक सिमेंट, हिरो मोटोकॉर्प, विप्रो आणि डॉ रेड्डीज लॅब.
सोने व चांदी :-
मजबूत डॉलरमुळे सोन्या-चांदीत जोरदार घसरण. चांदी साडेतीन टक्क्यांनी घसरून 23.25 डॉलरच्या खाली, तर सोने 15 डॉलरच्या खाली घसरून 1950 डॉलरच्या खाली घसरले. कच्चे तेलही एक टक्क्याने घसरले आणि ते $76 च्या खाली आले.
जागतिक बाजारातील मंदी कायम :-
प्रदीर्घ वीकेंडनंतर अमेरिकेचा बाजार सलग दुस-या दिवशी गडबडीत घसरला. डाऊने 250 अंकांची घसरण केली, तर नॅस्डॅक तळापासून 100 अंकांनी सावरल्यानंतरही 25 अंकांनी घसरला.