मैंच चालू असताना बांगलादेशी विकेटकिपर नुरुल हसनमुळे अंपायर ने संपूर्ण संघाला शिक्षा का दिली ?

ट्रेडिंग बझ :- T20 विश्वचषक 2022 च्या सिझनमध्ये, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश सिडनीत एकमेकांविरुद्ध दुसरा सामना खेळत आहेत. या सामन्यात बांगलादेशचा विकेटकिपर नुरुल हसनने हुशारी दाखवली, जी अंपायरच्या नजरेतून सुटू शकली नाही. यासाठी ग्राउंड वरील अंपयर ने संपूर्ण संघाला शिक्षा केली. वास्तविक, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टोस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दमदार सुरुवात झाली. रिले रोसोने संघासाठी 109 धावांचे शतक झळकावले, तर क्विंटन डी कॉक (63) यांनीही अर्धशतक झळकावले. आफ्रिकन संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 205 धावा होती.

अशा प्रकारे नुरुल हसनने होशियारी दाखवली :-
पण या सामन्यात स्टार अष्टपैलू शाकिब अल हसनने 11 वे षटक केले. त्याचा शेवटचा चेंडू नो-बॉल होता, ज्याला फ्री हिट मिळाले. इतक्यात बांगलादेशी विकेटकिपरने हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला. शाकिबला गोलंदाजी करताना तो विकेटच्या मागे आपली स्थिती बदलताना दिसला. अंपायरने ते पाहिले. यानंतर अंपायर रॉड टकर यांनी दुसरे अंपायर लँग्टन रुसेरे यांच्याशी बोलले आणि त्यानंतर दंड म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 5 धावा जमा केल्या.

यावेळी विकेतकिपरने जागा बदलू नये :-
वास्तविक, जेव्हा शाकिब चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत होता. तो धावून चेंडू फेकणार होता तेव्हा नुरुल हसनने त्याची पोझिशन बदलली होती. तो डावीकडे आला होता. यादरम्यात अंपायरने ते बघितला आणि बांगलादेशच्या संपूर्ण संघावर 5 धावांचा दंड ठोठावला आणि ही धाव आफ्रिकन संघाच्या खात्यात जमा झाली
ICC च्या नियमांनुसार, विकेटकीपरने बॉलरची रनअप सुरू होण्यापासून आणि चेंडूच्या डिलीव्हरी दरम्यानची जागा बदलू नये.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version