Breaking News: सरकार महात्मा गांधींनंतर रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्रांसह नोटा जारी करणार !

भारतात आतापर्यंत महात्मा गांधींचे चित्र असलेल्या नोटा छापल्या जात होत्या. पण लवकरच तुम्हाला रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्रासह एक नोट दिसणार. एका वृत्तानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) रवींद्र नाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्र असलेल्या नोटा बनवण्याचा विचार करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा वित्त मंत्रालयाने कोणतेही विधान जारी केलेले नाही आहे. पण अजून पर्यंत आरबीआय (RBI) ने याची कोणतीही पुष्टी व त्या संबंधात कोणतेही वक्तव्य केल नाहीये.

आतापर्यंत काय झाले होते ? :-

अहवालानुसार, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा मुद्रण आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SPMCIL) ने महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्र नाथ टागोर यांचे वॉटरमार्क असलेले दोन संच IIT दिल्लीचे प्राध्यापक दिलीप साहनी यांना पाठवले आहेत. प्राध्यापक साहनी यांना दोन संचांमधून निवड करण्यास सांगितले आहे. त्यानंतर ते सरकारला सादर केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या एका अहवालात RBI ला नोटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि त्यांना अधिक सुरक्षित करण्यासाठी टागोर आणि कलाम यांच्या फोटोसह नोट जारी करण्याचे सुचवण्यात आले होते.

रवींद्रनाथ टागोर हे भारताच्या राष्ट्रगीताचे लेखक आहेत. त्याचबरोबर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मैन म्हटल जात. भारताच्या जडणघडणीत या दोन महापुरुषांचे विशेष योगदान आहे. महात्मा गांधींनंतर या दोन महापुरुषांच्या फोटो असलेल्या नोटा निघाल्या, तर येत्या काही वर्षांत आणखी काही महापुरुषांच्या छायाचित्र असलेल्या नोटाही निघू शकतात.

अनेक देश हा प्रयोग करत आहेत :-

अमेरिका आणि जपानमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचे चित्र असलेल्या नोटा आधीच जारी केल्या जात आहेत. अमेरिकन डॉलरवर जॉर्ज वॉशिंग्टन ते अब्राहम लिंकन यांचे चित्र तेथील नोटांवर दिसते. त्याच वेळी, जपानच्या येन चलनावर अनेक दिग्गजांची छायाचित्रे देखील दिसतात.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version