फक्त एका वर्षात या शेअर ने गुंतवणूक दारांना श्रीमंत केले …

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक आहे, परंतु त्याच जोखमीमुळे कमी कालावधीत प्रचंड मोठा परतावा मिळू शकतो. असाच एक स्टॉक म्हणजे ‘रजनीश वेलनेस लिमिटेड’ या कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात आपल्या शेअरहोल्डरांना 3100% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एका वर्षातच त्याचे शेअर्स 5.56 रुपयांवरून चक्क 203 रुपयांपर्यंत वाढले आहे. सध्या तो 170 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.

Rajnish Wellness Ltd

शेअर्स चा इतिहास :-

2018 मध्ये या शेअरची किंमत 44 रुपयांच्या जवळपास होती. यानंतर 2020 मध्ये जेव्हा कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या आणि शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती, तेव्हा हा शेअरही या घसरणीतून टिकू शकला नाही आणि 5 रुपयांच्या जवळ येऊन कोसळला. तथापि, लॉकडाऊन उघडल्यानंतर, आर्थिक क्रियाकलाप पुन्हा सुरू झाला आणि बाजारातही जोरदार तेजी दिसून आली.

बाजारातील तेजीत हा शेअर 5 रुपयांवरून 203 रुपयांपर्यंत पोहोचला. या वर्षी स्टॉक जवळजवळ 700% वर आहे. रजनीश वेलनेस शेअरने गेल्या 6 महिन्यांत 300% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी 1 महिन्यांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले होते, ते आज 3 लाख रुपये झाले आहेत. एक वर्षापूर्वी, जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या स्टॉकची किंमत 33 लाख रुपये इतकी झाली असती.

अस्वीकरण :- येथे केवळ शेअर्स ची माहिती दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे आणि कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या .

विप्रो चे शेअर 40% घसरले ; तज्ञांचा दिला इशारा ?

जॉईन Trading Buzz
Exit mobile version